महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
सोलापूर :
उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला
शेतकऱ्यांनी टायर जाळून केला शासणाचा निषेध
करमाळा तालुक्यातील कोंडारचिंचोली येथे आंदोलनाचा भडका
करमाळा – भिगवण रोडवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय झाला होता
उजनीच्या पाणी वळवण्याचा निर्णय रद्द देखील झाला
मात्र या रद्द बाबत कोणताच आदेश न निघाल्याने उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने उद्यापासून जिल्हाभर आंदोलनाचा दिला होता इशारा
मात्र आंदोलनाची सुरुवात आजपासून
– ठाणे पोलीस आयुक्तपदी जयजीत सिंग यांची नियुक्ती
– ATS प्रमुख यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
– अखेर २ आठवड्यांनी ठाणे पोलीस आयुक्त पदी वर्णी
– जयजीत सिंग यांनी मनसुख हत्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली होती
नवी मुंबईत उद्या पाणीपुरवठा होणार नाही
मनपा क्षेत्रातील बेलापुर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, एरोली या विभागात पाणीपुरवठा होणार नाही
सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या क्षेत्रातही पाणीपुरवठा होणार नाही
उद्या संध्याकाळपासून पाणी पुरवठा होणार नाही
मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील दुरुस्तीची कामे होणार
मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्ती ची कामे हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठा होणार नाही
पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा
महापालिकेला सहकार्य करावं असं करण्यात आलं आवाहन
मराठा आरक्षण विषयावर काँग्रेस नेत्यांची बैठक
अशोक चव्हाण यांच्या मेघदूत निवासस्थानी बैठक
बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, विश्वजित कदम उपस्थित
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर
25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात
29 जूनला मतदान, 1 जुलैला मतमोजणी
राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाची घोषणा
सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र
कोरोना वाढत असताना न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीची घोषणा
48 हजार मतदार असल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे प्रशासनापुढे आव्हान
अहमदनगर जिल्ह्यात पाऊस
कोपरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस..
वादळी वार्यासह पावसाची हजेरी
उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा
जिल्ह्यात अनेक भागात सुसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावर
पुणे –
– पुण्यातील मार्केटयार्डमध्ये फळभाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ,
– तर कांदा-बटाटा, पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ,
– फळभाज्या, पालेभाज्यांना पाऊस आणि वाऱ्याचा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात सोमवारी आवक कमी आणि मागणी अधिक होती,
– त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या फळभाज्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. तर कांदा-बटाटा, पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15 टक्क्यांन वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
– सोमवारी बाजारात 70 ट्रकची आवक झाली. मात्र कोरोनामुळे शनिवार आणि रविवार बाजार बंद असल्याने भाज्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी होती,
– मागणीच्या तुलनेत आवक असल्याने दरवाढ झाली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांची माहिती.
पालघर : तौक्ते चक्रीवादळमुळे मुंबई जवळच्या समुद्रात झालेल्या बार्ज जहाज दुर्घटनेतील जहाजाचे अवशेष गुजरातच्या उंबरगाव तालुक्यातील नारगोल समुद्र किनारी मिळून आले आहेत. बार्ज जहाजावरील सीमेन्सचे कर्तव्य बाजवणाऱ्या कर्मचाऱ्यांची बेगसह जहाजावरील टँक व कँटीन कंटेनर समुद्री लाटेसह नारगोल किनारी नागरिकांना मिळून आले आहेत. सदर माहिती मिळताच मरीन पोलीस स्टेशन नारगोलचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कागदपत्र असलेली बेग ताब्यात घेतली असून टँक समुद्रातून नागरिकांच्या सहकाऱ्याने बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे.
भाई जगताप यांचा भाजपवर निशाणा
– केशव उपाध्याय हे झोलाछाप असल्यासारखे, त्यांच्या झोल्यातून काहीही बाहेर पडतं, देशात वॅक्सिनेशन कधी करणार, हा आमचा प्रश्न? आम्ही काय प्रश्न विचारू नये. त्यांच्या बोलण्याला आम्ही किंमत देत नाही
– मोदींनी विदेशात जी लस पाठवली त्याचा आम्ही निषेध करतो. उद्यापसून आंदोलन करणार. हिंमत असेल तर फाडून दाखवा पोस्टर. माझं आव्हान आहे
मीरा भाईंदर :-
नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारावर काशी मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलांकडून नालेसफाई करून घेत असल्याचं आढळून आले, मनसे कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोडच्या विनय नगर मध्ये गटार साफ करत होते एकूण पाच बालमजूर
ठेकेदार मनोज मयेकर तसेच सुपरवायझर रमेश काळे यांच्या बालमजूर कायदा अंतर्गत गुन्हा दाखल
– नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा आ. कृष्णा खोपडेंचा इशारा
– जिल्हा नियोजन विभागाच्या निधीच्या वाटपात भेदभावाचा आरोप
– ‘दलित विकास निधी फक्त उत्तर नागपूर मतदारसंघात दिला’
– निधी वाटपात उत्तर नागपूर सोडल्यास इतर शहरावर अन्याय
– निधी वाटपात भेदभाव झाल्याने न्यायालयात दाद मागणार
– ‘तोक्ते’ नंतर देशात पुन्हा एकदा ‘यस’ चक्रिवादळाची शक्यता
– बंगालच्या खाडीत तयार झालंय ‘यस’ चक्रिवादळ
– २६ तारखेला ओडीसा आणि पश्चिम बंगाल धडकणार
– ‘यस’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरंही होणार परिणाम
– २६ तारखेपासून विदर्भात पावसाची शक्यता
– ‘एस’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता
पुणे
शिवसंग्रामचे विनायक मेटे सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांची घेणार भेट,.
सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर राहणार उपस्थित,
मराठा आरक्षण रद झाल्यानंतर सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनायक मेटेची मागणी,
सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी करणार चर्चा,
सारथी संस्थेच्या परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात,
रत्नागिरी- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची भेट
पालकमंत्री अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट संदर्भातली सादर केली काही महत्वाची कागदपत्र
अनिल परब यांच रिसॉर्ट कस बेकायदेशीर आहे त्यासंदर्भातही दिले पुरावे
थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन सोमय्या सादर करणार महत्त्वाचे पुरावे
कोल्हापूर :
खासदार संभाजीराजे छत्रपती शाहू समाधीस्थळाचं दर्शन घेणार
थोड्याच वेळात संभाजीराजे समाधीस्थळी येणार
समाजातील तज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करण्यासाठी आजपासून संभाजीराजेंचा राज्यभर दौरा
दौरा सुरू करण्याआधी संभाजीराजे समाधीस्थळी होणार नतमस्तक
कोल्हापुरात आज मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी आणि तालीम संस्थांसोबत संभाजीराजे चर्चा करणार
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तलावाचे खोलीकरणचे काम सुरू आहे
तलाव खोलीकरण यामुळे शेतकऱ्यांना होणार सिंचनाची सोय
अनेक शेतकरी तलावाच्या पाण्याच्या भरोशावर अस करतात शेती
जिल्हा परिषदेकडून तलाव खोलीकरणाचे काम सुरू
गडचिरोली जिल्ह्यातील 40 टक्के ग्रामपंचायत भागात तेंदू संकलन सुरू
या तेंदु संकलानामुळे आदिवासी यांना मिळतो मोठा रोजगार
आदिवासी समाजात उदरनिर्वाह करण्याचे मोठे साधन तेंदूपत्ता संकलन
एका कुटुंबाला एका दिवसात दहा हजार रुपयाच्या उत्पन्नाच्या तेंदूपत्ता यातून मिळतो
औरंगाबाद :-
निर्बंधांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सत्र कायम..
औरंगाबादेत 162 जणांवर थेट गुन्हे दाखल ..
70 दुकानांना ठोठवला 1 लाख 70 हजारांचा दंड..
ठराविक वेळेनंतरही व्यापाऱ्यांनी दुकाने खुली ठेवल्याने मनपा आणि पोलीस पथकामार्फत कारवाई..
औरंगाबादेत मागील दरवाज्याने दुकाने खुली असल्याने धडक कारवाई
उल्हासनगर :
उल्हासनगरात अवघ्या २० रुपयांसाठी तरुणाची हत्या
कॅम्प ५ भागातील जय जनता कॉलनीतील प्रकार
अनिल आहुजा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव
आरोपी साहिल मैराळे याला हिललाईन पोलिसांनी केली अटक
अनिल याने २० रुपये द्यायला नकार दिल्याने साहिलने केली हत्या
यवतमाळ- जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या रेती घाटावर रेतीचा उपसा
यवतमाळ शहरात रेती माफियांनी
साठवून ठेवलेली 12 हजार ब्रास रेती जप्त
62 रेती साठे असून त्याना नोटीस महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे
माहिती अधिकार कार्यकर्ता मारहाण प्रकरणा नंतर
तहसीलदार कुणाल झालटे यांच्या नेतृत्वात महसूल यंत्रणा ऍक्शन मोड वर
सोलापूर –बार्शी तालुक्यातील धसपिंपळगावात एका वस्तीजवळ सापडले मृत अर्भक
अज्ञातावर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बार्शी तालुक्यात खळबळ…
अनैतिक संबंधामधुन राहिलेले तिन ते चार महिने वयाचे पुरूष जातीचे मृत स्थितीमधील अर्भक
अर्भकाची गुप्त रितीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अर्भक मयत अवस्थेत शेतात टाकुन देवुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
अज्ञातावर याप्रकरणी भा द वि 312 व 318 कलमान्वये गुन्हा दाखल
सांगली जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम देणार अर्थ व्यवस्थेला ऑक्सिजन
2 वर्ष झाली तरी कोरोनाचा कहर सुरूच
सर्व कारखाने उद्योग ,व्यापार बंद झाले
मात्र बळीराजा ने शेतीचा कारखाना ठेवला सुरूच
त्यामुळेच आपली अर्थ व्यवस्था तारली आहे
यंदाही शेतकरी खरीप हंगाम च्या तयारीला जोरात लागला आहे
महापूर ,दुष्काळ ,कोरोना ,या मुळे शेतकरी संकटात सापडला
सरकारने याचा विचार करून शेतकऱ्यांना खत बियाणे शेती औषधे यांत सवलती देयावे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे याची मागणी
पिंपरी चिंचवड
– पिंपरी-चिंचवड पोलीस सामाजिक सुरक्षा पथकाने हिंजवडी परिसरातील हॉटेल ठेका रेस्टोवर छापा टाकत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर्स आणि साहित्य जप्त
-लॉकडाऊन काळात हॉटेल ठेका रेस्टो मध्ये ग्राहकाना बसून देऊन प्रतिबंधित हुक्का साहित्य पुरवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे
-यामध्ये 50 हजार रुपये किंमतीचे हुक्का फ्लेवर्स व त्याचे साहित्य जप्त करण्यात हॉटेल मालक आणि चालका सह 4 ग्राहकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रत्नागिरी- भाजप नेते किरीट सोमय्या आज रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांची घेणार भेट
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील बेकायदेशीर रिसाॅर्ट प्रकरणी घेणार भेट
बेकायदेशीर रिसाॅर्ट प्रकरणी सोमय्या कायदेशीर तक्रार दाखल करण्याची शक्यता
काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत जावून सोमय्या यांनी घेतली होती केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट
नाशिक – 11 दिवसांनी आज शहरातील उद्योग सुरू होणार
अनेक लघु उद्योजक मात्र गावी असलेल्या कामगारांच्या प्रतीक्षेत
नियमांची पूर्तता करूनच उद्योग सुरू करण्याचे निर्देश
कच्च्या मालाची दरवाढ आणि जुन्या दराने घेतलेली ओर्डर यांचा समनव्य राखण्याचं मोठं आव्हान
वीजकंपनी कामगारांचा आजपासून राज्यभरात संप,
कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंदचा दिला इशारा,
महावितरण, महापारेषण ,महानिर्मिती यासह सहा कंपन्यांचे कर्मचारी जाणार संपावर,
वीज कर्मचारी अभियंते संयुक्त कृती समिती करणार संप,
समितीचे राज्यभरात 12 हजार कर्मचारी ,
वीज कर्मचारी कामगारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या,
कामगारांच्या कुटूंबाच तातडीने लसिकरण करा,
आणि कोव्हीड काळात वीजबिल वसूली नको अशा कामगारांच्या मागण्या आहेत,
कंत्राटी वीज कामगार संघानं या संपाला पाठिंबा दिलाय
पुणे
किल्ले सिंहगडावर अतिक्रमणाचा विळखा
अतिक्रमणाला आवर घालण्यासाठी वन विभागाने बाजावल्या टपरी आणि हॉटेलचालकांना नोटीसा
कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर टपरीचालकांनी स्वतः टपऱ्या कमी कराव्यात; अन्यथा अतिक्रमण कारवाई करण्याचा वन विभागाचा इशारा