महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
आंबेगाव (पुणे)
-आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी कारखान्यामधील लेबर कॉन्ट्रॅक्टरची हत्या
-सचिन जाधव असं लेबर कॉन्ट्रॅक्टर च नाव असून त्यांची मंचर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार देण्यात आली होती
-आज सचिन जाधव यांचा मृतदेह अहमदनगर जिल्ह्यातील कोरथन घाटात टाकण्यात आला होता
-आरोपींनी मयत सचिन जाधव यांची हत्या करून त्यांचा मृतदेह आणि त्याचे वाहन अहमदनगर जिल्ह्यात जाळण्याचा प्रयत्न केला आहे
– पैशाच्या देवाण-घेवानातून हा वाद झाला असल्याचं समोर,मयत सचिन जाधव यांनी आरोपी कडून काही पैसे घेतले होते आणि ते पुन्हा ते पैसे देण्यासाठी विलंब करत असल्याच्या कारणावरून हत्या झाली
-ह्या हत्ये प्रकरणी दोन आरोपींनी पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक,मुख्य आरोपी बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांना अटक केली असून इतर आरोपीचा शोध सुरू
-मयत सचिन जाधव हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्ते
पुणे :
राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेला प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचा सभापती मंगलदास बांदल याला अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्रापूर पोलिसांनी केली बांदल याला अटक
दत्तात्रय मांढरे यांनी दिली या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिली फिर्याद
उस्मानाबाद – पैसे घेऊन गाड्या सोडतानाचा उस्मानाबाद पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल
100 ते 300 रुपये घेऊन सोडली जात होती वाहने, ब्रेक द चैनमध्ये उस्मानाबाद पोलिसांचा कारनामा उघड
खासगी वाहनांना प्रवास बंदी असताना देखील वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलीस पैसे घेताना व्हिडीओत कैद
उस्मानाबाद लातूर रोडवरील बेंबळी या ठिकाणी पोलीस नाका आहे तिथला प्रकार
जळगाव : “मुक्ताईनगर भाजपाचे 10 नगरसेवक शिवसेनेचे गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अपात्रच्या भीतीपोटी पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेत गेल्याचं दिसतंय. बाकीचे नगरसेवक माझे समर्थक आहेत. त्यामुळे नगर परिषदेवर कुठलाही परिणाम याचा होणार नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा
शरद पवार यांना उद्या बारामतीला जायचे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली होती.
शरद पवार यांच्या आजारपणा नंतर मुख्यमंत्र्यांशी पहिली भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस
भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा
मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या पेचावर चर्चा झाल्याची शक्यता.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि NCP च्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती
कोव्हिडं नियंत्रण उपाययोजनांवरसुद्धा चर्चा झाल्याची माहिती
वाशिम : कारंजा तालुक्यातील पिंप्री मोखड परिसरातील तलावात दोन जणांचा बुडून मृत्यू
मृतदेह तरंगत असल्याचे समोर आल्यामुळे घटना आली उघडकीस
साहेबराव दत्ताजी बोबडे आणि चंपत उकंडा गायकवाड असं मृतकांची नावं
महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल
सिंधुदुर्ग : नारायण राणे उद्धव ठाकरेंच्या द्वेशाने पछाडलेले
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर पलटवार
भाजपमध्ये किंमत नसल्यामुळे राणे वैफल्यग्रस्त असल्याचा नाईकांचा दावा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोकणात आले माञ त्यांच्या दौऱ्यापासून राणेंना दूर ठेवण्यात आल्यामुळे त्या द्वेशापोटी राणे उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर पलटवार
पुणे – पुण्यातील 15 वर्षांच्या मुलाने एसससी बोर्डाविरुध्द मुंबई उच्च न्यायलयात दाखल केली याचिका
– दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करा, याचिकेतून मागणी
– दहावीच्या परिक्षेबाबतच्या अनिश्चततेमुळे विद्यार्थ्यांवर भावनिक आणि मानसिक ताण आल्याचा विद्यार्थ्याचा दावा
– रिशान सरोदे याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मागील याचिकेविरूद्ध हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे
– 1 जुनला न्यायलयात हे प्रकरण मांडले जाणार आहे.
मुंबई : खासदार संभाजी छत्रपती 27 मे रोजी सकाळी 9:30 वाजता शरद पवार यांची भेट घेणार
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर होणार भेट
शिवसेनेचा भाजपला दे धक्का
मुक्ताईनगरमधील भाजपच्या सात विद्यमान तर 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित
मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि इतर 4 जणांचा प्रवेश
यातील
रायगड : पेणच्या खारेपाटातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार
30 कोटींच्या योजनेला जलसंपदा विभागाची मंजुरी
खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे सदस्य सचिव निबांळकर याच्यांसोबत पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 50 गावांना भेडसावणाऱ्या शहापाडा धरणाचा तसेच योजनेचा घेतला आढावा.
चंद्रपूर: काँग्रेसची आक्रमकता चहाच्या कपातील वादळ
पदोन्नतीतील आरक्षण वादाच्या मुद्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
सत्तेला चिकटून बसणारी काँग्रेस अशा वक्तव्यांनी केवळ आभास निर्माण करत असल्याचे मुनगंटीवार यांचे मत
तुमच्या प्रश्नासाठी आम्ही कार्यरत असल्याचा देखावा करतेय काँग्रेस
काँग्रेसच्या आक्रमकतेला कुणीही गांभीर्याने घेत नाही
सुधीर मुनगंटीवार यांची टीका
चंद्रपूर –
चंद्रपूर शहरात अवैध दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट
चंद्रपूर जिल्ह्यात 2015 पासून आहे दारूबंदी
दारूबंदीची अंमलबजावणी करण्यास पोलिस प्रशासन ठरत आहे असफल
चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील नागरिकांचा संयमाचा बांध फुटला
अवैध दारू विक्रेत्यांची नागरिकांना जीवे मारण्याची धमकी
संतापलेल्या नागरिकांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर केला हल्लाबोल
अवैध दारू विक्रेत्यांना दिली शेवटची ताकीद, इंदिरानगरच्या नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
औरंगाबाद –
संभाजीराजे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
गर्दीमुळे सोशल डिस्टनशिंगचा उडाला पूर्ण फज्जा
असंख्य कार्यकर्त्यांची संभाजीराजेंच्या भेटीसाठी गर्दी
सुभेदारी विश्राम गृहातील लॉन्स वर झाली मोठी गर्दी
संभाजीराजेचा सुरू आहे महाराष्ट्र दौरा
दौऱ्यादरम्यान औरंगाबादेत आले असता झाली गर्दी
गर्दीमुळे कोरोना नियमांचं झालं उल्लंघन
मुंबई –
‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते भूवनेश्वर, मुंबई-कोलकाता विमान वाहतूक पुढील 6 तासांसाठी बंद, सर्व फ्लाईट रद्द
बारामती : शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली…
– उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी करणार होते आंदोलन…
– अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड…
– दोन आंदोलकांना बारामती तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात…
– आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा : आंदोलकांनी व्यक्त केली भावना
पुणे –
मार्केटयार्ड परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांनी 8 ते 10 हॉटेल, रेस्टॉरंट चालकांनी धान्य, किराणा आदी मालाची रक्कम थकवली
घाऊक व्यापाऱ्यांनी केली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार
प्रत्येक रेस्टॉरंट चालकाने पाच लाख ते दहा लाखांपर्यंत उधारी थकविली असल्याने ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात
पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत प्राथमिक तपास केला सुरू
यवतमाळ –
यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दराने गाठली शंभरी,
101.46 पैसे इतका पेट्रोल चा आजचा दर
तर डिझेल 90 रु वर
जिल्ह्यात कोरोनाचा स्कोर कमी होत असताना लॉक डाऊन मध्ये पेट्रोलचा स्कोर वाढतीवर
सर्वसामान्यांच्या खिश्यावर पडणार ताण
अंबरनाथ :
शिवसेना नगरसेवकाने केली तरुणाला बेदम मारहाण
आकाश परशुराम पाटील असं नगरसेवकाचं नाव
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण
रवी जयसिंघानी असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव
अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ :
बैलगाड्यांच्या शर्यतींप्रकरणी अखेर गुन्हा दाखल
उसाटणे गावात रविवारी २३ मे रोजी झाल्या होत्या शर्यती
या शर्यतींचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली होती
याप्रकरणी हिललाईन पोलिसांकडून चार जणांविरोधात गुन्हा दाखल
प्रवीण काशिनाथ पाटील, सचिन विश्वनाथ भंडारी, गुरुनाथ वसंता पाटील, महेश गणेश पाटील अशी चौघांची नावं
शिरूर,पुणे
-पुण्यात ट्रॅक्टरसह 77 लाखाचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई
-पुणे जिल्ह्यातील शिरुरसह अहमदनगर, सोलापूर व विविध तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे प्रकार पुढे आले होते
-या प्रकारामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता.त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या टोळीला केली अटक
-ह्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी सतीश अशोक राक्षे , ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, प्रविण कैलास कोरडे व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २८ गुन्हे उघडीस करण्यात आले आहेत
तौक्ते चक्रीवादळासाठी 250 कोटींची नुकसन भरपाई
राज्य सरकारने तयार केला प्रस्ताव
250 कोटी रुपय देण्यात प्रस्ताव
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला
वादळाचा तडाखा प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर बसला नाही
महसूल यंत्रणेकडून अहवालत नमूद
मंत्रीमंडळात बैठकीत यावर शिक्कामोर्तब बसणार
नागपूर –
गुन्हे शाखा पोलीस युनिट 2 पथकाची मोठी कारवाई
जुनी तारीख टाकून स्टॅम्प पेपरची विक्री करणाऱ्या चौघांना अटक
पोलिसांनी छापा टाकून केली अटक
15 हजार रुपये किमतीचे स्टॅम्प पेपर जप्त
पुणे –
पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ चा शहाळे महोत्सवाचे आयोजन
गणपती बाप्पांना तब्बल ५०० शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक जयंती हा अवतार झाला होता
वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण
नागपूर –
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 26 दूकाने आणि प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 1 लाख 70 हजारचा दंड वसूल केला
हनुमाननगर झोन अंतर्गत अभय नगर ओमकारनगर मधील तेजस्वी मार्बल अण्ड हार्डवेअर या दुकानाला सील करण्यात आले.
गांधीबाग झोन अंतर्गत गांधीगेट महाल येथील विनस लाईट हाऊस या दुकानाला सील करण्यात आले.
पथकाने ५३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
सोलापूर – खताचा जुना साठा नव्या दराने विक्री करणाऱ्या बारा विक्रेत्यांचे परवाने 15 दिवसासाठी निलंबित
कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी केले परवाने निलंबित
केंद्र शासनाने रासायनिक खतावरील अनुदानात केली आहे भरीव वाढ
मात्र जिल्ह्यातील खत विक्रेते शेतकऱ्यांकडून जुन्या दराचे खत नव्या दराने विक्री करत असल्याच्या आल्या होत्या तक्रारी
कृषी विभागाने तपासणी मोहीम राबवून केली कारवाई
औरंगाबाद –
कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला बेदम मारहाण
औरंगाबाद शहरातील अजब नगर परिसरातील घटना
मारहाणीची दृष्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद
मारहाण करून तरुणाला गाडीवर सोबत नेल्याचा घडला प्रकार
सायंकाळच्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात घडला प्रकार
चारही तरुणांची ओळख अद्याप अस्पष्ट
– नागपूर जिल्ह्यात बिना रॅायल्टी रेतीची अवैध वाहतूक
– रेती वाहतूकीचे सात टिप्पर पोलिसांनी पकडले, १० जणांना अटक
– १.२८ कोटींचा मुद्देमाल जप्त, अनेक रेती तस्कर पोलीसांच्या रडारवर
– कामठी पोलीस स्टेशन हद्दीत नेरी शिवारात पोलीसांची मोठी कारवाई
– नागपूर जिल्ह्यातील अनेक घाटांवरुन रेतीची अवैध वाहतूक
– राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या महसूलाची रोज चोरी
– नागपूर जिल्हयात बिना रॅायल्टी चालतात शेकडो रेती टिप्पर
पश्चिम बंगालला यास चक्रीवादळाचा तडाखा, समुद्र खवळला
#WATCH | West Bengal: Sea turns rough at Digha in Purba Medinipur district, as #CycloneYaas nears landfall. pic.twitter.com/19nbvbgHNL
— ANI (@ANI) May 26, 2021
कोल्हापूर :
कुरुंदवाडचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान पाणीपुरवठा सभापती जवाहर उर्फ बाबासो पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला
शहरातील गणेश बँके नजीक पाटील यांच्यावर अज्ञाताने केले चाकु ने वार
हल्यात बाबासो पाटील किरकोळ जखमी
हल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
शहरातील भरवस्तीत घडलेल्या प्रकाराने खळबळ
पुणे :
राज्यातील 353 तालुक्यांमधील 1973 गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत एक मीटरपर्यंत, तर 1300 पेक्षा अधिक गावांमध्ये तीन मीटरपर्यंत भूजल पातळीत घट
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून भूजल पातळीत घट झाल्याचे आले समोर
राज्यातील 3 हजार 694 निरीक्षण विहिरींद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाद्वारे भूजल सर्वेक्षण विभागाने हे निष्कर्ष काढले
‘पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमधील 372 गावांमध्ये भूजल पातळीत घट
यामध्ये एक मीटरपर्यंत भूजल पातळी घटलेली 186 गावे आहेत, तर एक ते दोन मीटरपर्यंत 125 गावांतील भूजल पातळी घटली
दोन ते तीन मीटरपर्यंत आणि तीन मीटरपेक्षा अधिक भूजल पातळी घटलेल्या गावांची संख्या अनुक्रमे 20 आणि 41
सातारा, सांगली जिल्ह्यांतील एकाही तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची पातळीत घटनाही
राज्यात मार्चअखेर विहिरींच्या भूजल पातळींच्या केलेल्या अभ्यासातून राज्यातील चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ यांसारख्या सहा जिल्ह्यांमधील 13 तालुक्यांतील विहिरींमधील भूजल पातळीत एक मीटरपेक्षा जास्त
या 13 तालुक्यांमधील 238 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती असल्याचा अंदाज
पुणे
राज्यात पोलिसांना आरोपीचे रेखाचित्र काढण्यासाठी खासगी व्यक्तींवर अवलंबून राहावे लागणार नाही
पोलीसच काढणार आरोपींचे रेखाचित्र
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने रेखाचित्राच्या बाबतीत पोलिसांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या कोर्सच्या 83 जणांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पूर्ण
या कोर्ससाठी सीआयडीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करण्यात आलाय करार
पुणे :
वैकुंठ स्मशानभूमी येथून होणाऱ्या वायुप्रदूषण विरोधात आता नवी पेठेतील सर्व हौसिंग सोसायट्या एकवटल्या
प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी एकत्रित येऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका केली दाखल
आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त हवा आहे, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली
पुणे महानगरपालिका, महापालिकेचा विद्युत विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य शासन आणि आरोग्य विभाग यांना केलं प्रतिवादी
अॅड असीम सरोदे, अजिंक्य उडाणे, अॅड. अजित देशपांडे व अॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली याचिका
यापूर्वी नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी देखील यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये
पुणे
खरीप हंगामासाठीच्या निविष्ठा पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर सनियंत्रण कक्ष
2लाख19 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
28 हजार 86 क्विंटल बियाणांची मागणी
शेतक-यांना मिळणार बांधावर खते व बियाणे
14 भरारी पथकाची तसेच 38 गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांची खरिप व्यवस्थेवर नजर
जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सनियंत्रण कक्ष स्थापन