ठाण्यातील हिरांनादनी इस्टेट जवळ मंथ 1 पार्क अव्हेन्यू कॉप्लेक्सच्या मागे असणाऱ्या भागाराच्या साठ्याला लागली अचानक आग
अग्निशमन दल ,आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवत आहे
यामध्ये कोणीही जखमी नाही
किरीट सोमय्या मुंबईत दाखल
विक्रांतमध्ये दमडीचा घोटाळा झाला नाही
एकही पुरावा नाही, फक्त स्टंटबाजी करायची
न्याय मिळायला सुरूवात झाली आहे
आंदोलन जे करत आहेत त्यांना देव सदबुद्धी देऊ
हे नाटकं उद्धव ठाकरेंनी रचलं होतं, संजय राऊत फक्त प्रवक्ते
यांचे घोटाळे बाहेर यायाला लागले म्हणून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न
तुम्हाला शिक्षा होईपर्यंत मी असाच सक्रिय राहणार
पोलिसांचा वापर माफियासरखा केला
नवाब मलिक यांची सपत्ती जप्त झाली
मला होमवर्क करण्यासाठी मला नॉट रिचेबल जावं लागलं
एफआयर कोणत्या आधारावर केला
ही फक्त सुरूवात आहे, दोन दिवसांनी अनिल परबांची केस दापोली कोर्टात येणार
यशवंत जाधव, अनिल परब, हसन मुश्रीफ या तिघांची पाळी
नंदकिशोर यांच्या किती कंपन्यातून मनी लाँन्ड्रिंगचाही हिशोब काढणार
मंत्रालयात घोटाळ्याचा पैसा चेक करायला गेल्या असतील
कोर्टाच्या निर्णायाचं स्वागत – नारायण राणे
मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षानंतर समारोपला मंत्रालयात जायला हवं – नारायण राणे
आज अडीच वर्षानंतर गेले स्पीड मानयला हवा – नारायण राणे
चुकीच्या पद्धतीनं सोमय्यावर कारवाई – नारायण राणे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (gunratna sadavarte) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता वेगळी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे (msrtc) वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या कामगारांसोबत एका उद्यानात बैठक घेतली. यानंतर आणखी एक बैठक पार पडली होती. वाचा त्याचसंदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी – इथे क्लिक करा –
पाहा सरकारी वकील घरत यांनी काय म्हटलं?, पाहा व्हिडीओ :
सरकारी वरील प्रदीप घरत यांनी कोर्टाबाहेर आल्यावर काय म्हटलं?
-आज गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 7 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
-इतर दोन आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
-गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यात आलाय.
-सातारा पोलीस त्यांना आर्थर रोड कारागृहातून घेऊन जातील.
-मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांना देण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय.
-जयश्री पाटील यांना सहआरोपी केलंय.
-कट रचणे, आरोपींना प्रोत्साहन देण्याचा जयश्री पाटील यांच्यावर आरोप
दोन्ही बाजुंचा युक्तीवाद संपला
काही वेळातच निकाल
गुणरत्न सदावर्ते यांच्या यांच्याबाबत गिरगाव कोर्टात सुनावणी सुरु
जयश्री पाटील यांच्यावरही आरोपी करण्यात आले आहेत
जयश्री पाटील फरार असल्याची माहिती
पवारांना जातीयवादी का म्हणू नये
मनसे नेते संदीप देशपांडेंचा पत्रकार परिषदेत पलटवार
ईडीच्या चौकशीमुळे संजय राऊतांच्या बुद्धीला गंंज लागला आहे
आमचा आक्षेप संजय राऊतांच्या भाषेला आहे
कुणाबाबत बोलतात त्याला आमचा आक्षेप नाही
अमेरिकेच्या भारतावरील टीकेवरून राष्ट्रवादीची मोदींवर टीका
पंतप्रधान उत्तर का देत नाहीत – शरद पवार
राज ठाकरेंच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही – पवार
दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख केला – पवार
अमरावतीमध्ये 25 मिनिटे शिवाजी महाराजांवर भाषण
शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जिजाबाईंनी घडवलं – पवार
मात्र पुरंदरेंनी दादोजी कोंडदेवांचा उल्लेख केला – पवार
मी ऐनवेळी कोेणतीही भूमिका बदलली नाही – पवार
आजही राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र – शरद पवार
राज ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने एकही जागा दिली नाही
सभेला गर्दी होते, मात्र मत पडत नाहीत – पवार
प्रबोधनकारांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्यांवर टीका केली
राज्यासह देशभरात साप्रदायिक विचारधारा वाढण्याचा प्रयत्न
लोकांना मी विनंती करतो की, त्यांनी धार्मिक राजकारणाला बळी पडू नये – पवार
महाराष्ट्रातील सामजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न – पवार
राज ठाकरे भाषणात भाजपबद्दल एकही शद्ब बोलत नाहीत
भाजपाने राज यांच्यावर कोणती जबाबदारी दिली आहे का? – पवार
मोदींना भेटण्यात चुक काय, मी एक खासदार आहे – पवार
राज्य सरकार एसटी संपावर टीका नाही, फक्त मला टार्गेट केलं – पवार
सदावर्तेंनी माझ्याबाबत द्वेश निर्माण केला त्यामुळेच माझ्यावर हल्ला – पवार
माझ्या वाचनात आलंय सोमय्यांनी पैसे गोळा केले
शरद पवार यांची विक्रांत घोटाळ्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे पुरवठा मंत्री, अमेय खोपकरांची
राज ठाकरेंवर टीका करण्याची आव्हाडांची लायकी नाही
राज ठाकरेंना मुस्लिमविरोधी ठरवलं जातंय
अचानक ट्रॅक बदलण्याचे कारण काय, भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल
भावाच्याच सरकारवर टीका करत असल्यानं आता ईडी बोलावणार नाही, भुजबळांची राज ठाकरेंवर टीका
जातीयवाद कोण वाढवतंय, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल
‘पेशवे नव्हते असं तुम्ही कसं काय म्हणू शकता’
राज ठाकरेंमध्ये जातीयवाद ठासून भरला आहे
मुंब्य्रात २००९ नंतर केवळ दोनच अतिरेकी सापडले तेही बाहेरुन आलेले इतिहास तपासून पाहा
हाजी अराफत शेखच्या बाजूला बसून जेवायचात
त्याला दाढी होती का, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना सवाल
राजकीय व्यापसपीठात नवा जॉनी लिव्हर सापडलाय
सुळे घुसले की किती दुखतं ते बघा, आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका
अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी होत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तात्काळ सुटका व्हाव
या मागणीसाठी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे
खंडपीठाने सुनावणी करण्यास सहमती दर्शवली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा धनंजय मुडेंना फोन
फोनवरून तब्येतीची केली विचारपूस
काळजी घेण्याचा दिला सल्ला
लवकर बरे व्हाल अशा शुभेच्छा दिल्यात
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात उस्मानाबाद शहारात मोस्ट वॉन्टेड फरार मोस्ट म्हणून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. विक्रांत निधी घोटाळ्यातील फरार आरोपी मोस्ट वॉन्टेड भाजप खासदार किरीट सोमय्या असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. फरार आरोपी सोमय्या यांना शोधून अणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल, देशप्रेमी संघटना धाराशिव या नावाने उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी पोस्ट बाजी करण्यात आली असून भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या परिसरात लावलेले हे पोस्टर काढण्यात आले आहे
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कौटुंबिक चर्चा
काळजी घे बहिणीचा भावाला सल्ला
दगदग करू नकोस काळजी घे सोबत आहे मी
बाकी काही होत राहील
पंकजा मुंडे, प्रितम मुंडे, यशश्नी मुंडे आणि पंकजांच्या आईनं घेतली भेट.
राजकारणालं शत्रुत्व विसरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा संवाद
राज ठाकरे भाजपची बी टीम ही खोटी माहिती आहे,
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
‘मविआ’ने खोटी माहिती देण्यासाठी इको सिस्टिम तयार केलीय
भाजप नेत्या पंकजा मुंडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कँंडी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. तर प्रीतम मुंडे देखील दाखल झाल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ हे देखील धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी रुग्णालयात आले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊतांचा ‘मनसे’ला चिमटा
ईडीच्या कारवाईतून सूट दिल्याने राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय
दिवा विजताना जास्त फडफडतो, तशी राज ठाकरेंची अवस्था
जो भोंगा वाजतोय, तो भाजपचाच भोंगा आहे
किरीट सोमय्यांना बोलताना मी शिवराळ भाषा वापरली,
त्याचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे
मराठी भाषेविरोधात किरीट सोमय्या कोर्टात गेले होते
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं प्रेझेंटेशन या लोकांनी तयार केलं आहे
त्याचे सूत्रधार किरीट सोमय्या आहेत
किरीट सोमय्यांना तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलावून सत्कार करा
मनसे नेते राज ठाकरेंना शिवसेना नेते संजय राऊतांचे आव्हान
एका द्वेषातून हे सगळं बोललं जातंय
हे तुमचं बोलनं नसून कुणीतरी तुमच्या तोंडाला भोंगा लावला आहे
राज ठाकरेंवर संजय राऊतांची टीका
राज ठाकरेंची टीका माझ्यावर नसून महाराष्ट्रावर आहे
त्यांना फार महत्व देऊ नका,
राज ठाकरेंच्या प्रश्नावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाही, फक्त भोवळ आली
उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
– पुणे पोलीस चित्रा वाघ यांची चौकशी करण्याची शक्यता,
– पीडित मुलीने केलेत चित्रा वाघ यांच्यावर आरोप,
– पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर चौकशी केली जाणार
– चित्रा वाघ यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता
अजित पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल
मंत्री धनंजय मुंडे जनरल आयसीयूमध्ये
तब्येत स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
काळजी करण्यासारखं काही नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी, ब्रीच कँंडीमध्ये भेट घेणार
मंत्री धनंजय मुंडे जनरल आयसीयूमध्ये
तब्येत स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
काळजी करण्यासारखं काही नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी, ब्रीच कँंडीमध्ये भेट घेणार
सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
नागपूर महापालिका आयुक्त आज करणार महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
– महापालिकेची मुदत संपल्यावर प्रशासक म्हणून आयुक्त 2022-23 चा प्रस्तावित अर्थसंकल्प करणार सादर
– महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असली तरी कुठलीही नवी करवाढ प्रस्तावित नसल्याची माहिती
– अर्थसंकल्प 2 हजार 600 कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता
– सध्या प्रशासकीय सर्वाधिकार आयुक्तांना असल्याने त्यांना अपेक्षित धोरणे अर्थसंकल्पातुन राबविण्याचा करणार प्रयत्न
औरंगाबादमध्ये वाळू माफियांकडून बेकायदेशीर पद्धतीने बेफाम वाळू उपसा सुरू
शेतात आणि नदीत तीस फूट खोल खड्डे खोदून वाळू उपसा सुरू
जेसीबी आणि डंपरच्या बेसुमार वाळू उपसा सुरू
बेसुमार वाळू उपश्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
बेसुमार वाळू उपश्याकडे तलाठी तहसीलदार आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष
औरंगाबाद ब्रेकिंग
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील तब्बल 123 कर्मचारी फक्त कागदोपत्री
123 कर्मचारी कामावरच येत नसल्याची धक्कादायक माहिती
परिचारिका संघटनेकडून केलेल्या मोजणीत धक्कादायक माहिती समोर
कर्मचारी कामावरून गायब होत असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम
रुग्णांच्या नातेवाईकांनाच स्ट्रेचर ढकलाव्या लागत असल्याचे चित्र
123 गायब कर्मचारी शोधण्याचे घाटी प्रशासनाला संघटनेचे आवाहन
बुलडाणा : एप्रिल महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात जाणवतेय पाणीटंचाई
तर मे महिन्यात याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता,
27 गावांसाठी 28 विहिरींचे अधिग्रहण,
तर जिल्ह्यातील 3 गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुढील काळात 768 गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे,
पाणीटंचाई निवारण्यासाठी 13 कोटी 74 लाखांचा कृती आराखडा मंजूर
– यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला ‘अ’ नामांकन
– नॅक तर्फे मिळाला विद्यापीठाला नामांकन
– नामांकन मिळाल्याने यूजीसी अनुदानाचा मार्ग मोकळा
– केंद्र व राज्य सरकारकडून विद्यापीठाला कोट्यवधींचा निधी मिळणार
बुलडाणा : बँकेत नकली नोटा भरणाऱ्या विरुद्ध कारवाई
25 हजारापैकी 5 हजार च्या नोटा निघाल्या नकली
एच डी एफ सी बँकेतील प्रकार,
शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून शेख तौफिक शेख गफ्फार विरुद्ध गुंज5 दाखल,
जिल्ह्यात मागील चार महिन्यात तिसरा गुन्हा दाखल
नाशिक ब्रेकिंग
-रीतसर अर्ज करा आणि परवानगी मिळवा
– नाशिक शहरात 20 तारखेपर्यंत जमाव जमवण्यास बंदी
– पाच लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई
– मिरवणुका शोभायात्रा काढण्यास बंदी
नाशिक : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 7 हजार प्रकरणे प्रलंबित
– प्रकरणे निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत
– सेवा प्राधिकरणामार्फत जिल्हाभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
– लोक अदालतीत वाद मिटवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील चे शुक्रवारी काढली जाणार हत्तीवरून मिरवणूक
सांगरूळ फाटा ते कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पर्यंत काढली जाणार मिरवणूक
माजी आमदार चंद्रदीप नरके यांची माहिती
पृथ्वीराज पाटील हा कुंभी कासारी सहकारी कारखान्याचा मानधनधारक मल्ल
कुस्ती स्पर्धेत यश मिळवलेल्या इतरही मल्लांचा होणार सत्कार
मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेना नेते संजय राऊतांना टोला
संपादक जेलमध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो
– ही नवी म्हण आहे. जय महाराष्ट्र!
संपादक जेल मध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो-ही नवी म्हण आहे. जय महाराष्ट्र! pic.twitter.com/MjxlPIPXjW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 13, 2022
दिवा विझताना मोठा होतो!
हे आज पुन्हा दिसले!
जय महाराष्ट्र!!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2022
एसटी महामंडळमध्ये निवड झाली, पण अजूनही नियुक्तीची अनेकांना प्रतीक्षा
सरळसेवा भरती; प्रशिक्षण पूर्ण, तीन वर्षापासून महामंडळच्या आदेशाकडे डोळे
एसटी महामंडळ ने 2019 मध्ये राबवली होती सरळ सेवा भरती प्रक्रिया
अनेकदा निवेदन देवुनही परीक्षार्थीची नियुक्ती नाहीच
प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयात पाठवल्याची अधिकाऱ्यांची माहिती
– नागपुरात पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम
– पोलीस संरक्षणात विशेष पथकाकडून तपासणी
– टिल्लू पंपाच्या वापरामुळे पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार
– एका दिवसांत तब्बल 28 टिल्लू पंप जप्तीची कारवाई
– बेकायदा बुस्टर पंपाचा वापर कायदेशीर गुन्हा
– भाजपने पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केल्यानंतर मनपा ॲक्शन मोडमध्ये
अमरावती शहरासह जिल्ह्यात जी ग्रुपमध्ये 56 फिडरवर इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू
अमरावती शहरातील सात, तर जिल्ह्यातील 49 फिडरवरील ग्राहकांना फटका
कोळशाचा अभाव आणि निर्मितीच्या तुलनेत विजेची मागणी वाढल्याने लोडशेडिंग
घरगुतीसह शेतातील कृषी पुरवठयावरही संकट
एन उन्हाळ्यात भारनियम; नागरिक उकाळ्यामूळे त्रस्त
– आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे राज्य सरकारने दिलेत आदेश
– महापालिका निवडणुकांसाठी यापूर्वी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभागरचना रद्द,
– नव्याने प्रभाग होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
– 21 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या निकालावर जुनी की नवी प्रभागरचना राहणार याचे भवितव्य ठरणार
– नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परिक्षा ॲाफलाईनंच होणार
– विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रकिया सुरु
– दोन वर्षानंतर विद्यापीठाच्या परिक्षा ॲाफलाईन होणार
– विद्यार्थी संघटनांची ॲानलाईन परिक्षांची मागणी विद्यापीठाने फेटाळली
– एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार ॲाफलाईन परिक्षांना सुरुवात
– वर्ग ॲानलाईन झाले, म्हणून विद्यार्थी संघटनांची होती ॲानलाईन परिक्षांची मागणी
– पण विद्यापीठ ॲाफलाईन परिक्षा घेण्यावर ठाम
16 एप्रिलला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे राहणार उपस्थित
राज ठाकरेंनी केलेल्या टिकेला अजित पवार , सुप्रिया सुळे उत्तर देणार का?
काही कारणास्तव पुण्यातील परिवार संवाद यात्रा झाली होती रद्द
तर 23 एप्रिलला कोल्हापूरातील गांधी मैदानावर परिवार संवाद यात्रेचा होणार समारोप
शरद पवार 23 तारखेला राज ठाकरेंना प्रत्तुत्तर देण्याची शक्यता
– संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जूनला पपंढरपूरकडे प्रस्थान
– तब्बल दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच पालखीचे पंढरपूरकडे पायी प्रस्थान होणार,
– 9 जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचेल,
– तर मुख्य आषाढी एकादशी 10 जुलैला आहे.
– पंढरपूरमध्ये झालेल्या आषाढी वारी सोहळा नियोजन बैठकीत पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका
प्रकृती स्थिर ब्रिज कँडी रूग्णालयात दाखल
सर्व रिपोर्ट्स नाॅर्मल असून सात दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा डाॅक्टरांचा सल्ला
विदर्भातील 191 ‘फिडर’वर लोडशेडिंग
– ऐन उन्हाळय़ात विदर्भातील नागरिकांना मनस्ताप
– अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 101 फिडरवर लोडशेडिंग
विजेची वाढती मागणी व कोळशाच्या तुटवडय़ामुळे राज्यात सुमारे 2,500 ते 3,000 मेगावॅट विजेची तूट
– विदर्भात सध्या 1336 फिडरच्या मदतीनं वीज पुरवठा
नागपूरातील नालेसफाईला सुरूवात, कुठलाही गाजावाजा न करता मनपाने सुरु केली नालेसफाई
– शहरातील नद्या आणि नालेसफाई दोन टप्प्यात होणार
– सहा उपभागांमधील नालेसफाईच्या पहिल्या टप्प्याला झाली सुरुवात
– नालेसफाईचा दुसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार
– यंदा नद्या आणि नाल्यांची खोली, रुंदी स्वच्छ केली जाणार
– नदीशेजारच्या वस्तीत पुराचा धोका लक्षात घेता नालेसफाई
– डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण
– पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार,
– या दिवशी डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष नोंदविण्यात येणार,
– तसेच बचाव पक्षाकडून त्यांची उलटतपासणी घेण्यात येणार,
– डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात महापालिकेतील सफाई कर्मचारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे,
– डॉ. दाभोलकर यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची साक्ष प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली.
– सामनातून पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधानांना काश्मिर खोऱ्याबद्दल खडेबोल
– काश्मिर खोऱ्यातील लोकांच्या बद्दल शहाबाज शिरीफांनी तोडले तारे
– मोठ्या शरीफांच्या वेळी बर्थडे डिप्लोमसीचा धक्का देणारे आता या
-छोट्या शरीफांच्या मुक्तफळांबाबत कोणती डिप्लोमसी आवलंबणआर आहेत ??
– आसा परखड सवालही सामनातून पाकिस्तानला करण्यात आला आहे
– पाकिस्तानचा कोणताही पंतप्रधान सत्तेत आल्यावर काश्मीर प्रश्नाची बांग देतचं असतो
– त्याच प्रमाणे याही पंतप्रधानांनी आपल्या पहिल्याच भाषणात काश्मिर बद्दल बांग दिलीच
– दहशतवादी कारवाया करून काशमिर खोरे आशांत ठेवणारे पाकडेच आहेत
– आजपर्यंत हजारो काश्मिरी पंडीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांनी बळी पडले
– हिंदुस्थानसोबत चांगले संबध हवे आहेत असे म्हणायचे आणि काश्मिर प्रश्नावरही गरळ ओकायची
– आशी दुहेरी भुमीका पाकिस्थान नेहमी घेत असतो
– सामनातून पाकिस्तानला काश्मिरी पंडीतांच्या मुद्द्यावरून खडे बोल