मुंबई : आज शुक्रवार 15 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला संपवण्याची शपथ घेणारा गँगस्टर अली बुदेश याचा बहरीनमध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अली बुदेश हा मुंबईतील घाटकोपर येथे राहणारा होता. पोलीस व केंद्रीय यंत्रणांना गुंगारा देऊन तो विदेशात पसार झाला होता. गेली काही वर्षे बहरीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले होते. तो स्मगलिंगचे नेटवर्क चालवायचा.
कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते त्यांच्या व्यवस्थापनामुळे समस्या निर्माण झाली आहे,
कोळशाचं प्रमाण, त्याची जी परिस्थिती असते त्यानुसार किती पाहिजे प्रमाण असते त्यानुसार दररोज कोळसा दिला जातो,
या स्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाची परिस्थिती आहे जर देशाची परिस्थिती नाही तर केंद्र मंत्र्यांनी सर्व राज्याच्या ऊर्जा मंत्री सोबत चर्चा का केली,
तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल तर इम्पोटेड कोळसा खरेदी करावा, असं सांगितलं, याचा अर्थ देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालाय,
कोरोना नंतर विजेची मागणी वाढली आहे, मात्र राज्य सरकारने पूर्णपणे व्यवस्थापन केले आहे, अधिकारी आमचे रोज नजर ठेवून आहेत, बैठका घेत आहेत,
ही वेळ या देशात दुसऱ्यांदा आलेला आहे, राज्य सरकारची या अजिबात चूक नाही, आम्हाला आता कोळसा वापरून पावसासाठी सुद्धा साठा करून ठेवायचा आहे,
राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे, मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा,
मात्र दोन वर्षांत अडीच वर्षात आम्ही आजही व्यवस्थित पुरवठा करू शकलो,
मात्र केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्को मला कर्ज देऊ नका पत्र दिले आहे,
ग्रामविकास खात्याने 8 हजार कोटी रुपये दिले नाही, त्यामुळे आमची थोडी कुचंबणा झाली आहे,
त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र, तक्रार दिली आहे,
जर आम्हाला हे पैसे मिळाले तर वीज घ्यायला शक्य होईल आणि 19 तारखेपर्यंत मी नियोजन केलेलं आहे सर्व परिस्थिती सुरळीत होईल,
सर्व पर्यायांवर आम्ही लढतो आहे, बँका आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे,
दानवेंनी आरोप करण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहे, हे वीसरू नये,
आरोप करणे खूप सोपे आहे, मात्र राज्य आमचं असेल तर विरोधकांचाही आहे, त्यामुळे सकारात्मक विचार करावा आणि यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करावा,
जे वीजचोर्या करतात, वीज बिल भरत नाही, त्यांचं काय करायचं, फुकटात मिळत नाही, पैसा लागतो, माझं राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी वीज त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे, त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही,
सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम जे निकष राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहे,
दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावं, त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे,
त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे
– सोलापुरात भीमसैनिकांचा प्रशासनाविरोधात मोर्चा
– आंबेडकर अनुयायी डॉ. आंबेडकर चौकात जमायला सुरुवात
– कार्यकर्त्यांनी 100 फूटाचा निळा ध्वज आणत केले शक्तीप्रदर्शन
– हळूहळू कार्यकर्ते जमायला सुरुवात
– 17 एप्रिलला होणाऱ्या मिरवणुकीला डीजेची परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा
– थोड्यावेळात होणार मोर्चाला सुरुवात
मुश्रीफांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
मला काळा डाग लावण्याचा प्रयत्न
मी स्वत: जाहीरात दिलेली नाही
संयमाने आणि शांततेने घ्या, असा कार्यकर्त्यांना सल्ला द्या
सोन्याचे चमचे तोंडात घिवून जन्माला आलेले अधिककाळ टिकत नाही
तुमच्या सगळं लक्षात आलं आहे
लोकं त्यांना उत्तर देतील
अनेक वर्षापासून आपण एकत्र राहतोय
हे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करीत आहे.
विक्रांतचा पैसा कुठे गेला
एक टॉयलेट घोटाळा काढणार
विक्रांत ते टॉयलेट घोटाळा
शेकडो रूपयांचा घोटाळा केला आहे
या सगळ्यांवरती फडणवीसांनी बोलावं
एखादं ट्विट त्यांनी विक्रांत घोटाळ्यावरती करावं
युवा प्रतिष्ठान आणि सोमय्यांनी घोटाळा केला आहे
घोटाळ्याची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहे.
सत्र न्यायालयात जावं लागतं.
राजभवन सांगतंय पैसे जमा झाले नाहीत
लोकांची दिशाभूल करू नका
टॉयलेट घोटाळा दुगर्धी पसरवणार
सरकार पडत नाही, पडणार नाही
पुढचे किमान २५ वर्षे सत्ता मिळणार नाही
५८ कोटीचा घोटाळा झाला आहे,
राकेश वाधवानवरती दबाब आणला
तपासाला आता सुरूवात झाली आहे
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 35 टक्के अधिक पाऊस,
भारतीय हवामान खात्याचा अंदाज,
मागीलवर्षी 23 टक्के अधिक पडला होता पाऊस
आणखी अद्यावत पावसाचा अंदाज मे महिन्यात होणार जाहीर,
तर मागील 2 वर्षांपासून त तंतोतंत खरा ठरतोय अंदाज
मुंबई महापालिकेचा उद्यान विभागाचा महत्वाचा निर्णय…
– पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांचे संरक्षण, जतन, संवर्धन करण्यासाठी नवा उपक्रम राबवणार…
– मुंबईत वृक्ष संजीवनी मोहीम राबवली जाणार… वृक्ष संजीवनी मोहिमेत प्रामुख्याने मुंबईतील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांभोवतीचे काँक्रीट, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, विद्युत तारा, केबल काढणे ही कामे केली जाणार.
– अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवली जाणार…
रत्नागिरी- उत्तर रत्नागिरीत मोठा राजकीय भुकंपाची शक्यता
राष्ट्रवादीचा नेता शिवसेनेच्या वाटेवर?
राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेतून आमदारकीच्या दृष्ट्रीने आहिस्ते कदम
विधानसभा निवडणुकीत मोठे बदल अपेक्षित
खेड दापोली मतदार संघातील शिवसेनेचा वाद जवळून पहाणारा राष्ट्रवादीचा नेते शिवसेनेत प्रवेश करणार
जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा.
योगेश कदम आणि रामदास कदम यांना काटशह देण्यासाठी खेळी, सुत्रांची माहिती
संपवरील एसटी कर्मचारी सेवेत रुजू व्हायला झाली सुरवात
काल नागपूर विभागातील 95 संपकरी कर्मचारी झाले कर्तव्यावर रुजू
199 एसटी बस द्वारे सुरू झाली आता प्रवासी वाहतूक।
बस ची संख्या वाढत असल्याने प्रवश्याना दिलासा मिळत आहे
तर दुसरी कडे लाल परी आता वेगाने रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे
औरंगाबाद जिल्ह्यातील 74 जळगाव या गावात तरुणाला बेदम मारहाण करून खूण
चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून केला खून
मारहाणीचा व्हिडीओ लागला tv9 मराठीच्या हाती
संतोष एरंडे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
ओट्यावर बसून घराकडे पाहतो म्हणून झाली होती बेदम मारहाण
मारहाणीनंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला तरुणाचा मृत्यू
जीवन गटकाळ आणि वैभव गटकाळ असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे
मारहाण आणि खून प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शेतीच्या वादावरून शेतकऱ्याला शेजाऱ्याची बेदम मारहाण
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या नवगावची घटना
मारहाण झालेल्या शेतकऱ्यांचा रक्तबंबाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आजम निजाम शेख असं गंभीर मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव
जखमी शेतकऱ्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू
मारहाण प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल