मुंबई : आज सोमवार 18 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा फडकविला मुळे दोन गटात वाद निर्माण झाला आहे. अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचार बंदी लावण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाले. जमावाने पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून संपूर्ण अचलपूर शहरात तसेच परतवाडा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या दोन्ही शहरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे.
एकीकडे भोंग्यांच्या विषयावरून वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या सकाळी बदलापूरमध्ये राष्ट्रगीत लावलं जाणार आहे.
हरियाणा सरकारने घेतला मोठा निर्णय
चार जिल्ह्यांमध्ये मास्क सक्ती
गुरुग्राम, सोनीपत, फरीदाबाद आणि झजर जिल्ह्यात मास्क बंधनकारक असणार
राजधानी नवी दिल्ली आणि काही शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने हरियाणा सरकारने घेतला निर्णय
अनेक पक्षांची बांधणी करण्याचे काम सुरू आहे.
देशात सांप्रदायिक स्थिती निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे
याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी एकत्र येत आहोत
हा अत्यंत चिंताजनक विषय आहे
तसेच पेट्रोल डिझेल आणि तेलाच्या किंमतीही चिंता वाढवण्याचे प्रयत्न सुरू
याबात लवकच बैठक घेण्याबाबत विचार आहे
कुणाला धोका असेल तर राज ठाकरेंना सुरक्षा पुरवल्यास आम्हाला काही आक्षेप नाही
नितीन गडकरी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे खासदार उन्मेष पाटील यांनी केली नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील तरसोद ते चिखली दरम्यान झालेल्या चौपदरी करणाच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
तर जळगाव औरंगाबाद मार्गाचेही गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन.
सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यावर भूमिगत झाले बाप-बेपे फरार झाले, कुणाकडे जाऊन लपले, याचा शोध घ्यावा..
आता हायकोर्टानं त्यांना आरोपी म्हणून चौकशीसाठी बोलवलंय..
राजकीय सूडाच्या कारवायांकडे आम्ही बघतच नाही.. तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी आम्हाला पर्वा नाही..
माननीय शरद पवार साहेबांचीही अशाप्रकारे राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात नाव टाकून त्यांनाही अडवण्याचा प्रयत्न झाला..
तुम्ही ठाकरे कुटुंबाला, राऊंताना आमच्या माणसांना बदनाम करायचं,, या सगळ्याचा हिशोब तुम्हाला भविष्यात द्यावा लागेल..
हा वाद कुठे थांबेल माहिती नाही
आम्ही झुकणार नाही
आम्ही वैफल्यग्रस्त होणारी माणसं नाही
मुख्यमंत्रीपदाची ठाकरेंनी शपथ घेतल्यापासून हे अस्वस्थ आहे
यात आरोप करण्यात अडीच वर्षे निघून गेली
अडीच वर्षांचा करार तुम्ही पाळला नाही म्हणून हे घडलं
तुम्ही महात्मा गांधी आहात का, दादासाहेब धर्माधिकारी आहात का.. विनोबाजी भावे आहात का.. तुम्ही भ्रष्ट आहात…
लोकांसाठी वेगळ्या कारणावरुच पैसे गोळा केले… आणि पक्षाला दिले..
पावती कुठंय.. फक्त 11 हजार.. मी म्हणतो 58 कोटी रुपयांचा आरोप माझा बरोबर आहे…
आता तुम्ही न्यायालयावर आरोप लावलाय का? – उत्तर – आरोप नाव नाहीये, मी वस्तूस्थिती सांगतोय.
दिशा सालीयनमध्ये दिलासा.. अटकेपासून संरक्षण, विक्रांतप्रकरणात अटकेपासून संरक्षण, मुबै बँकेच्या घोटाळ्यात अटकेपासून संरक्षण, अशी 10-12 उदाहरण देता येईल…
आम्हाला अटकेपासून संरक्षण नाही, आमच्यावर ताशेरे ओढले जातायत, आमच्या केसेस ऐकून घेतल्या जा नाहीयेत.
आता संयम संपलेला आहे…मुख्यमंत्री, गृहमंत्री एक्शन मोडमध्ये…
केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत, हैदोस घातलाय…
या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहे…
केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल..
देशमुखांच्या 6 वर्षांच्या नातीची चौकशी करावी..
नवाब मलिक 55 लाखांची केस 5 लाखांवर आली..
संजय राऊत 11 कोटी 1500 कोटी… जुन्या काळातलं कोणतं तरी प्रकरण काढायचं…
आज मीडियासुद्धा एकतर्फी वागतंय..
13 आणि 14 वर्षांपूर्वी विक्रांतच्या नावाखाली पैसे दिले, त्यांना वाटतं आमचे पैसे योग्य ठिकाणी गेले…
राजभवन आमचं नाही भाजपचं आहे
विक्रांतच्या नावावर सोमय्या यांनी पैसा गोळा केला
यांच्या अंगावरचे डाग यांना दाखवयाला नको का
तुम्ही सर्वात जास्त भ्रष्ट आहे
आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रावर सत्ता बनवली, आमचं हिंदूत्व, आमचा लढा आम्ही बाजूला ठेवलेला नाही…
राज्य भोंगे उतरवा, भोंगे चढवा यावर चालत नाही..
जर देशात अशांतता निर्माण जाली, तर ती का झाली यापेक्षा शांततेचं आवाहन करणं हे कर्तव्य आहे..
एक दोन वर्ष सत्ता हातातून काय गेली, त्यानंतर जी तडफड जी आहे, त्यातून महाराष्ट्रात अशांत करण्याचे, अस्थिर करण्याचे,,, महाराष्ट्रात जातीय दंगली करायचा, असले प्रयत्न सुरु आहेत..
महाराष्ट्र तुमचाही आहे ना…
राज ठाकरे आता अयोध्येला जात आहे, ते सुद्धा भाजपनं सांगितलं असेल अयोध्येला जायला..
राज ठाकरेंआधी आम्ही गेलो अयोध्येत तेव्हा तर त्यांनी आमच्यावर टीका केली… यांनी देवपण यूपीतला लागतो म्हणाले होते..
आम्ही आज जातोय का.. आम्हाला नसेल तिथे यश मिळालं.. पण आम्ही तिथे जातो, कार्यकर्त्यांना भेटतो…
मथुरामध्ये सेनेचा उमेदवार होता..
तुम्ही उत्तर भारतीयांसाठी केलेली वक्तव्य भाजपनं आठवली पाहिजे..
राजकारणात सोय पाहिली जाते….शत्रू चा शत्रू मित्र मानला जातो..
रावसाहेब दानवे हे आमचे राजकीय विरोधक आहे
ते निराशेत आणि वैफल्यग्रस्ततेत आहेत
सत्ता गमावल्यावर काय होतं हे भाजपकडे पाहून कळतं
हा महाराष्ट्र सर्वांचा आहे
आम्ही सत्तेचा अमपट्टा घेऊन नाही आलो
आता राज ठाकरेंना आयोध्यत जायचं भाजपने सुचवलं असेल
शिवसेनेला हे फॉलो करत आहेत
आम्ही आधीपासून तिथे निवडणुका लढत आहेत
बाळासाहेबांनी भोंग्याचा मुद्दा उचलला.. कलकत्तानंतर अलहाबाद हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात मुद्दा गेला..
आज ९४-९२चं चित्र महाराष्ट्रात नाही..
मेहमुब्बा मुफ्ती तुम्हाला भाजपात दिसत नाही…राष्ट्रद्रोही, अतिरेक्यांची प्रोटेक्टर, अतिरेक्यांचं
अवडंबर माजवणारा भाजप आम्हाला कसलं ज्ञान देतोय..
आम्ही कधी अतिरेक्यांसोबत सरकार नाही स्थापन केलं..
बुऱ्हाण वाणीला मारलं तेव्हा त्याच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना पेन्शन देणारी मेहबुबा मुफ्ती..
विरोधकांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार.. तमिळपण आमचे मित्र आहेतच.. कोण काय बोलतं, त्याच्यावर आम्ही शिवसेनेच्या भूमिका ठरवत नाही..
कोणी जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारने पाऊलं उचलावी
राज ठाकरेंचा भाजपकडून वापर सुरू
बाळासाहेब ठाकरेंनीही भोंग्यांचा मुद्दा उचलला
न्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई झाली तर वेगळं
आता यांना फक्त वातावरण गरम करायचं आहे
यांच्यामुळे हिंदुत्वाला उकळी फुटली असे होत नाही
आमचं हिंदुत्व हे रणांगणावरील हिंदुत्व
आता जे चाललं आहे तो फक्त दिखावा
एकाच आठवड्यात दुसऱ्या वेळी सोनिया गांधींची ही दुसरी भेट
रणदीप सुरजेवाला आणि मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत बैठक सुरू
10 जनपथ वर आज राजकीय खलबते
अचलपूर नगर परिषदने हटवले शहरातील विविध धर्माचे,आणि राजकीय पक्षाचे झेंडे…
अचलपूर मध्ये झेंडा लावण्यावरून वाद झाल्याने नगरपरिषद ने उतरवले झेंडे..आणि पोस्टर
सध्या अचलपूर आणि परतवाडा शहरात तणावपूर्ण शांतात, पोलिसांचा चोख बंदोबस्त…..
नाशिक – पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत काढलेल्या आदेशाचे साधू महंतांनी केले स्वागत
– मात्र आयुक्तांच्या काही निर्णयावर साधू महंत नाराज
– कुठल्याही धार्मिक विधीला रोज भोंग्याची आवशकता नसते त्यामुळे भोंग्यावर बंदी ठेवावी
– प्रत्येक धर्माच्या सण आणि उत्सव वेळी भोंगे लावण्यासाठी परवानगी द्यावी
– महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांची मागणी
– तसेच मस्जिद समोर 100 मिटर अंतरावर भोंगे लावता येणार नाही ,आजान च्या आधी 15 मिनिटं व नंतर 15 हनुमान चाळीसा लावू नये हे पोलिस आयुक्तांच वाक्य निंदनीय
– जेवढा देश मुस्लिमांचा तेवढाच हिंदूंचा देखील त्यामुळे सर्वांना समान अधिकार द्यावेत
– घर मिळतंय म्हणून आमदार घर मिळावं म्हणून अर्ज करणारच, धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक, पवाने आणि सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा…आमदारांना खर्या अर्थाने घर घेण्याची गरज आहे का हे पाहून घर द्यावं…
– आज अनेक आमदार आहेत ज्यांना घराची गरज आहे, आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेऊन घरं वितरित झाली पाहिजेत…
– एक तारखेला देवेंद्र फडणवीस यांची प्रचंड मोठी सभा मुंबईत होणार, पोलखोलच्या निमित्ताने अडीच वर्षात जे घोटाळे केले, मनपात भ्रष्टाचार झालाय, याची पोलखोल ऊघड करणारी जाहीर सभा होणार…
– मुंबई मनपा, राज्य सरकार आणि इतरांनी जो हैदोस घातलाय त्याचा हिशोब करणार.,.
– संघर्ष हा सत्ताधारी पक्षाकडून निर्माण केला जातोय, ७ ते ८ नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, हा प्रयत्न खोटा होता, हे न्यायालयाने सिद्ध केलं, पण न्यायालयावरही टिका केली… कीतीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही…
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात झेंडा लावण्यात वरून दोन गटारील हाणामारी प्रकरण….
तीन ठीकाणी घडलेल्या घटनांमध्ये ३ गुन्ह्यांची नोंद…..
आतापर्यंत पोलिसांनी केली 23 आरोपींना अटक….
कलम १४४ अंतर्गत सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवण्यावर देखील निर्बंध लावण्यात आले आहे.
दोन गटातील १०० पेक्षा अधिक गुन्हेगार असल्याची शक्यता..
सीसीटीव्हीच्या आधारे उर्वरित गुन्हेगारांचा पोलिसाकडून शोध सुरू आहे..
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांची माहिती…
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना अचलपूर मध्ये तळ ठोकून….
पुण्यात वडगाव शेरीमध्ये युवक काँग्रेसचं भोंगे आंदोलन
वाढत्या महागाईच्या विरोधात पेट्रोल पंपावर लावले भोंगे
पेट्रोल डीझेलचे दर कमी करणार मोदींच आश्वासन यावर क्या हूआ तेरा वादा असं गाणं लावण्यात आलं होतं..
महागाईच्या विरोधात बोलण्यापेक्षा भोंग्यावरून तेढ निर्माण केलं जातंय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संकेत गलांडे यांनी आरोप करत आंदोलन केलं..
अमरावती मधील अचलपूर येथील दोन गटातील राडा प्रकरण…
अचलपूर मध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात…
भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी सह काही भाजप कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात…
कलम १४४ लागु असल्याने व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी घेतले ताब्यात….
भाजप पदाधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल होण्याची शक्यता;
आसेगावं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले भाजप कार्यकर्त्यांना पोलीस…
नवी दिल्ली – राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा ?
केंद्र सरकारकडून राज यांना सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता
गेल्या पंधरा दिवसात राज ठाकरे यांच्याकडून मोठी वक्तव्य
सुरक्षा दर्जा बाबत अद्याप निर्णय नाही
केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार – सूत्रांची माहिती
मशीद भोंग्याबाबत राज यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य
– सातारा शहर पोलिस आज सदावर्तेंना दुपारच्या सत्रात सातारा न्यायालयात हजार करणार
– ॲड सदावर्ते यांची पोलिस कोठडीची मागणी करणार
– सातारा पोलिस कोणत्याही व्यक्तीची बेताल वक्तव्ये सहन करणार नाही
– सातारा शहर पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची माहिती
– ॲड सदावर्ते यांना पोलिस कोठडी की न्यायालयीन कोठडी याबाबत होणार निर्णय
– सदावर्तेंच्या जामीनाबाबत आज सुनावणी
पुण्यात एसडीपीआय पार्टीची पत्रकार परिषद
मस्जिदीवरील भोंग्यासंदर्भात घेणार पत्रकार परिषद
राज्य सचिव अझहर तांबोळी भूमिका मांडणार !
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडीया*
राज ठाकरेंनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय
राज ठाकरेंना हिंदुत्वाचं राजकारण करायचं आहे
हे भाजपाचं राजकारण आहे..
संजय राऊत म्हणतात की ते हिंदू ओवैसी आहेत
तर मग जसं ओवैसींना रोखण्यासाठी जसे प्रयत्न केले तसे तुम्ही राज ठाकरेंना काय ?.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल का होत नाही
रमजान आणि इतर इफ्तार पार्टीवर.बहिष्कार टाका
हिंदू ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न करा
मस्जिदीच्या समोर भोंगे तुम्ही लावा आम्ही भोंगे वाजवू
ओबीसी आरक्षणा बाबतीत केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात कराडमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा हल्लाबोल मेळावा
मेळाव्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्री विजय वडेट्टीवार सतेज पाटील तसेच विश्वजीत कदम हे उपस्थित राहणार
लखीमपूर खीरी प्रकरण
आशिष मिश्रा याचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द
कोर्टाने एका आठवड्यात शरणागतीचे दिले आदेश
हायकोर्टावरही ताशेरे
हायकोर्टाने पीडितांची बाजू समजून घेतली नाही – सुप्रीम कोर्ट
– पोलीस आयुक्तांपेक्षा आम्हाला राज ठाकरे यांचा आदेश महत्वाचा
– 3 मे नंतर मस्जिदि समोर अजान च्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार
– ज्या बाळासाहेबांनी भोंगे हटवण्याचं वारंवार सांगितलं, त्या बाळासाहेबांचे चिरंजीव जर जेल मध्ये टाकणार असतील तर आम्ही तयार आहोत
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांचा आज कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा
मंत्री मुश्रीफ यांची बदनामी करणाऱ्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
समरजीत घाटगे जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप
कागल मधील शिवाजी चौकातून होणार मोर्चाला सुरुवात
वाढदिवसाच्या जाहिराती वरील मजकूर यानंतर आता मुश्रीफ यांच्या जन्म दाखल्यावरून रंगला वाद
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार आज उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालय व स्त्री रुग्णालय येथे भेट देणार असून त्या निमित्ताने रुगनालयात सजावट रांगोळी काढण्यात आली आहे मात्र रुग्णान पिण्यासाठी पाणी टाकी व पाण्याची सोय नसल्याने तात्पूर्ती व्यवस्था म्हणून पाण्याचे जार ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाचा वेळ काढू भूमिका यावेळी दिसून आली आहे.
चंद्रपूर – शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध कॅफे मद्रास दुकानाला लागली आग,
शहरातील साउथ इंडियन नाश्त्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे कॅफे मद्रास,
आज सकाळी गर्दी असताना अचानक कुलिंग यंत्रणेतून धूर दिसू लागल्यानंतर झाली पळापळ,
काही वेळात आगीने घेतले रौद्ररूप, चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन यंत्रणेने विझविली आग,
या दुकानाच्या शेजारीच शाळा व मंदिर असल्याने अग्निशमन पथकाला होती चिंता,
मात्र अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणून अग्निशमन पथकाने केले अभिनंदनीय काम,
आगीत या जुन्या दुकानाची झाली मोठी हानी
छत्तीसगडच्या पोलीस कॅपवर नक्षली हल्ला, हल्ल्यात चार जवान जखमी
बिजापुर जिल्ह्य़ात दरभा या उपपोलीस ठाण्यावर राञी अकरा वाजता युबीजीएल या शस्ञाने हल्ला केला
या हल्ल्यात चार जवान जखमी झाले दोन जवानांची प्रकृती गंभीर हेलीकॉप्टर ने रायपुरला हलवण्यात आले आहे..
युबीजीएल हे अत्याधुनिक शस्त्र सुरक्षा दलाकडे असते
दरमा पोलीस स्टेशनला उडविण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांनी यावेळी केले होते
महाराष्ट्राला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात हल्ला झाल्यामुळे गडचिरोली पोलीस सतर्क
गोपीचंद पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टिका
यांना बहूजनांचा इतिहास मोडीत काढायचा आहे मागे काही ठेवायचं नाही अशी यांची भूमिका आहे
संबंध नसताना सांगलीत अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन करता ,जेजुरीत जाता पण वाफगावच्या किल्ल्याबद्दल तुम्ही बोलत नाही
रयत शिक्षण संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या
अन्यथा आम्ही ताब्यात घेऊन किल्ल्याचा जिर्णोद्धार करू गोपीचंद पडळकरांचा इशारा
शरद पवार आणि राज्य सरकारची नियत आता लक्षात आलीये
आम्ही लोकवर्गणीतून किल्ल्याचा जीर्णोद्धार करू पडळकरांचा इशारा
– विक्रांत घोटाळ्यातील आरोपींनी चौकशीसाठी उपस्थीत राहण्यास सांगेतले आहे
– विक्रांत घोटाळ्याचा तपास पोलीस करत आहेत
– ईडी किंवा केंद्रिय यंत्रणा याच्यांपेक्षा राज्यातील संस्था चांगला तपास करतात
– आयोध्याचा आणि शिवसेनेच नात हे काही राजकीय नाही आहे
– फार जुने आयोध्येचे आणि शिवसेनेचं नात आहे
– आमचे मन साफ आहे त्यासाठी आम्ही आयोध्येला जातो आहे
– आयोध्येला ज्याला जायचे आहे त्यांनी जावे
ON RAJ
– मराठवाड्याची जनता ही कायम शिवसेनेच्या मागे
– त्यामुळे कोणाला सभा घ्यायच्या असल्यास घेऊ द्या
– कोणि बाळासाहेबांची काँपी करत असल्यास करत असेल तर
– कोणी स्पॅान्सरशीपची राजकारण करत असेल तर करू द्या
– आम्हाला त्याने काही फरक पडत नाही
– आम्ही स्पॅान्सरशीपचे राजकारण करत नाही
– संजय राऊतांचा राज ठाकरेंवर घणाघात
ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम, सोमय्यांच्या चार दिवसाच्या चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा पोलिस तपासाचा भाग त्यामुळे पोलिस तपास करतील
बीजेपी काहीही म्हणू शकते
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे.
आयोध्येमध्ये जाण्याच निर्णय मनसेने घेतला आहे
दर्शन घेण आमचं सुध्दा कर्तव्य आहे
खूप काम आहे अजून
आमचं मन साफ आहे
आम्ही सगळे श्रध्देसाठी करतो
शिवसेनेला आत्तापर्यंत समर्थन केलं आहे
बाळासाहेबांची कोणी कॉपी करीत असेल तर काय करायला पाहिजे
शिवसेना आपल्या ताकदीवर कायम उभी राहिली आहे
कोणी कुठेही सभा घ्यायला हवी
जुनं दळणदळत बसू नका
महाराष्ट्रातली जनता संयमी आणि सुज्ञ आहे
जे स्वत:उघडे नागडे झाले आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार
राजभवनात जाणाऱ्या पैशांना मध्येच कुठे पाय फुटले
उस्मानाबाद शहरातील एकमेव CNG पंप वरील गॅस संपल्याने वाहनधारकांचे हाल
CNG संपल्याने गाड्या पंपावर , आज सायंकाळी CNG येण्याची शक्यता
बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी ठार…
गोठ्यात बांधलेल्या गायींवर बिबट्याने हल्ला करून दोन गायी ठार केल्याची घटना मानोरा तालुक्यातील सेवा दास नगर शेतशिवारात रात्री दरम्यान घडली आहे.
सेवा दास नगर येथील मोहन राठोड यांच्या शेतातील गोठ्यातील गायींवर
रात्री दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यातील दोन गायी ठार केल्या आहेत.
बिबट्याने हल्ला करून गायी ठार केल्यानं सेवादास नगर परिसरात भीती पसरली असून वन विभागाने बिबट्या ला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
1. ‘3 मे’पर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची परवानगी घ्या
2. सर्व मशिदीवरील भोंग्यांना पोलीस परवानगी घेणं बंधनकारक
3. भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्यासाठी देखील परवानगी घ्या
4. परवानगी न घेतल्या ‘3 मे’ नंतर कारवाई करणार, भोंगे काढणार
5. हनुमान चालीसा पठणासाठी अजानच्या 15 मिनिट आधी परवानगी असेल
6. मशिदीपासून 100 मीटर लांब अंतरावर हनुमान चालीसा पठण करता येणार
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचे महत्वपूर्ण आदेश
3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्या
अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार
मुस्लिम धर्मियांनींही भोंग्यांची परवानगी घ्यावी
हनुमान चालिसा लावण्यासाठीही पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक
आजण पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल
पुण्यातून उड्डाणं करणाऱ्या विमानांची संख्या वाढली
दिवसाला 70 ते 80 विमानांच उड्डाण पुण्यातून होतंय
महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली
सुरुवातीच्या काळात होणाऱ्या 50 ते 60 उड्डाणांवरून ही संख्या आता 80 वर पोहोचली आहे
नाशिक – पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचे महत्वपूर्ण आदेश
3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्या
अन्यथा 3 मे नंतर थेट कारवाई करून भोंगे काढणार
मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी
कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक
आजण पूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मिटर लांब हनुमान चालीसा लावता येईल
नागपुरात तापमानाचा पारा वाढला
तापमान 43 अंश वर पोहचले ,
नागपूरकरांची होत आहे लाहीलाही
नागपुरात दरवर्षी पारा वाढत असतो मात्र या वर्षी एप्रिल महिन्यातच तापमान 43 च्या पार झालं
मे महिना अजून लागायला वेळ आहे मात्र तापमानात वाढ झाल्याने त्याचा होत आहे मोठा परिणाम
नागपूरकराना काळजी घेण्याची आवाहन
गोंडी रीतीने जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात आदिवासी सामुहिक विवाह सोहळा संपन्न.
12 जोडपे विवाहबंधनात.
सामूहिक विवाह सोहळा केला तर शासनाकडून फक्त 10 हजार रुपये अनुदान दिला जातो, मात्र आजच्या महागाईत 10 हजारात काहीही होत नाही. त्यासाठी सरकारने निधी वाढवावी असे मत आदिवासी नेत्यांनी केले आहे .
– सिटीलिंकची नाशिक दर्शन बस सुरू होणार
– नाशिककरांसह पर्यटकांना दिलासा
– सेवा सुरू करण्याची महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले निर्देश
– पर्यटनाला चालना मिळण्यास सह पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ
रत्नागिरी- रत्नागिरी शहराला आज पाणी पुरवठा राहणार बंद
नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे कारण
मुख्य साठवण टाकीला शहरातील अनेक भाग जोडण्यात येणार
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे नगरपरिषद प्रशासनाचं आवाहन
कोल्हापुरचा विजय हा जातीय हिंसा घडवू पाहाणाऱ्यांना चपराक आहे
– पाच ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपचा सुपडा साफ झाला
– निवडणूका जिद्दीने, एकजुटीने लढल्या की, भाजपचा पराभव करता येतो
– हे या पाच ठिकाणच्या पोटनिवडणूकीतुन स्पष्ट झाले आहे
– हा विजय म्हणजे भाजपचा खूप मोठा पराभव झाला असे नाही
– पण भाजपचे बगलबच्चे देशभरात धार्मीक द्वेशाचा विषाणु पसरवत आहेत
– धार्मीक हिंसेचे वनवे पेटवत असतांना चार राज्यातील निवडणूकीत भाजपचा पराभव झाला
– ही भाजपला मोठी चपराक आहे
– कोल्हापुरमध्ये भाजपला मिळालेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहेत
– चार राज्यातील पराभवावर सामानातुन भाजपला फटकारे
– राजकारण सोडूवन आपण हिमालयात जाऊ
– अशी घोषणाही केल्या गेली होती
– त्यांना ही संधी कोल्हापूरकरांनी दिली होती
– ती त्यांनी साधायला हवी होती
– पण आता चंद्रकांत पाटलांनी त्यावरून पलटी मारली
– अर्थात चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातचं राहावे
– कारण ते येथे राहतील तो पर्यंत मवीआ सरकारचा विजय होत राहील
– असे भाकीतही सामनामध्ये करण्यात आले आहे