मुंबई : आज मंगळवार 19 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातील नरडाणा येथील रहिवासी प्रभाकर रघुनाथ सूर्यवंशी हे आपल्या आई व दोन मुलांसह धरणगाव तालुक्यात आपल्या नातेवाईकांकडे आले होते. दरम्यान नातेवाईकांची भेट झाल्यानंतर दुचाकीने परत नरडाणाकडे जात असताना रोटवद गावाजवळ रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान बैलगाडीला दुचाकी धडकल्याने प्रभाकर सूर्यवंशी व त्यांची सात वर्षाची मुलगी नायरा सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. प्रभाकर सूर्यवंशी यांची आई ममता सूर्यवंशी व नऊ वर्षाचा मुलगा मोहित सूर्यवंशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजपकडून पोलखोल अभियानाला सुरुवात करण्यात आलीय. मुंबईत विविध भागात भाजप नेत्यांकडून सभेचं आयोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात कांदिवलीत पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. ऑलिम्पिकमध्ये अनेकजण अनेक पदकं जिंकत असतात. भ्रष्टाचाराच्या ऑलिम्पिकमध्ये शिवसेनेला गोल्ड मेडल मिळेल, असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. इतकंच नाही तर ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’ असा नवा नाराच मुंनगंटीवार यांनी दिलाय.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात दिलासा नाही
जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन फेटाळला
नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि सेना नेते योगेश क्षीरसागर यांची अडचण वाढली
राज ठाकरे यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाची ऑलर्जी का ? – मिटकरी
रामाचे खरे भक्त असाल तर केंद्रातील झेड सेक्यूरीटी नाकारून अयोध्येला जावून दाखवाल – अमोल मीटकरी, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा, इस्लामपूर
– चंद्रकांत पाटील हे वाचाळवीर आहेत
-चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर मध्ये भाजपचा सुपडासाफ केला आहे आणि लवकरच आता राज्यातही सुपडा साफ होईल
-भाजपच्या वरिष्ठ नेत्याने याकडे लक्ष दिले पाहिजे
-मागच्या निवडणुकीत माझा पराभव झाला तो भाजपच्या गद्दारी मुळे झाला आणि त्या गद्दारीलाच कोल्हापूरच्या जनतेने उत्तर दिलेला आहे
-विजयी उमेदवार सह आमच्या सर्वांचे काँग्रेसच्या नेत्यांनी सत्कार केला
-मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही कामगीरी केली
-उद्या बारा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत
राष्ट्रवादीची परिसंवाद यात्रा आज जत, मिरज, सांगली मार्गे इस्लामपुरात पोहोचली आहे
सभेसाठी जयंत पाटील यांच्या बरोबर धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे
शाळेची फी थकविल्याने एक विद्यार्थ्याला वेगळ्य़ा वर्गात एकटेच तीन तास बसवून शाळेने दिली शिक्षा, नातेवाईकांचा आरोप
शाळेने फेटाळले आरोप
कल्याण-शाळेची फी थकीत असल्याने दहावीच्या एका विद्यार्थ्याला शाळेने शिक्षा देत या विद्यार्थ्याला एकटेच तीन तास एका रुममध्ये बसविले. जोर्पयत तुझे आई वडील येणार नाही. तोर्पयत इथेच बसावे लागेल असे फर्मान सुनावले. या मुलाची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्याला भोवळ आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्ता या शाळेच्या विरोधात शिक्षण प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येणार हे पाहावे लागेल.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील 3 पूजाऱ्यांवर मंदिर संस्थानने मंदिर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे. यातील 2 पूजाऱ्यांना प्रत्येकी एक वर्ष तर एका पूजाऱ्याला 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. सुरक्षा रक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे व भाविकांना अनधिकृतपणे दर्शनासाठी आत सोडणे या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुजारी संदीप टोले व कृष्णा जितकर यांना प्रत्येकी 1 वर्ष मंदिर प्रवेश बंदी केली आहे तर ओमकार भिसे यांना 3 महिने प्रवेश बंदी केली आहे. टोले व जितकर यांनी सुरक्षा रक्षकला मारहाण केली होती त्यामुळे त्यांच्यावर कलम 307 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला होता
अमरावतीच्या अचलपूर शहरात दोन गटांतील दगडफेक व हाणामारी प्रकरण…..
दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही गटातील 24 आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी..
अचलपूरच्या न्यायालयाने सुनावली आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी….
पोलिसांनी तपासासाठी तीन दिवसांची मागीतलेली पोलीस कोठडी न्यायालयाने केली मान्य..
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील रांतजन गावचे सुपुत्र जवान गोरख चव्हाण यांचं अपघाती निधन
– कर्तव्यावर असताना उत्तराखंडात झालं अपघाती निधन
– ताफ्यातील गाडी दरीत कोसळल्याने झाला अपघात
– सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये चालक पदावर होते कार्यरत
– अचानक झालेल्या अपघाती निधनाने गावावर पसरली शोककळा
– त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे
– उद्या शासकीय इतमामात रांतजन गावी होणार अंत्यसंस्कार
– बारामती तालुक्यातील शिरसाई कालव्याची जलवाहिनी दुसऱ्यांदा फुटली,
– जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया,
– याआधी 8 महिन्यांपूर्वी पाईपलाईन फुटली होती,
– याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची ग्रामस्थांची मागणी
अचलपूर परतवाडा शहर व अन्य दोन गावात सुरू असलेल्या संचार बंदीत दैनंदिन गरजा अत्यावश्यक सेवेसाठी आता सायंकाळी 6 ते रात्री 8-30 वाजेपर्यंत मुभा..
रात्री अडीच तास नागरिकांना खरेदीसाठी आता बाहेर पडता येणार…
उपविभागीय दंडाधिकारी संदीप कुमार अपार यांनी काढले आदेश..
संजय राऊत
आमचं अयोध्येशी नातं जुनं त्यामुळे आम्हाला तयारीची गरज नाही
मुख्यमंत्री अयोध्येला जाऊन आले आहेत
आता आदित्य ठाकरेंच्या जाण्याची तारीख चार पाच दिवसात ठरवू
शरयुच्या किनारी एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागती
कोण काय बोलतंय त्याच्यावर आमचे दौरे ठरत नाहीत
अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांनी बलिदान दिलं आहे
अशी वक्तव्य कोण करत असेल तर त्या बलिदानाचा अपमान आहे
पन्नास वर्षे शिवसेना वादळाशी संघर्ष करत शिवसेना इथपर्यंत पोहोचली आहे
आम्हाला वादळं नवीन नाहीत, नवीन वादळं निर्माण करण्याची ताकद शिवसेनेतच आहे
शिवसेना आणि भिती या शब्दाचा मेळ बसत नाही, तो शब्द आमच्या कोशात नाही
ज्या प्रकारे आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढत आहे
त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटते
म्हणून आमच्यावर हल्ले सुरू
आम्ही तरीही भ्रष्टाचार बाहेर काढत राहू
राज्यात कोशळाचा साठा कमी उपलब्ध आहे
कोळसा तुटवड्यावक तोडगा काढण्यासाठी ही बैठक
आमच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत
आमच्यावर केलेले आरोप भाजपवर पलटले आहेत
कोळशाच्या उत्पादनाचे आणि रेल्वेच्या रॅकचे नियोजन असले पाहिजे
ज्या बैठका असतात त्यातून हे सर्व नियोजन केले जाते
या बैठकीला आमचा पुढाकार नक्की आहे
राज्यात वीज कमी पडू देणार नाही
राज्यात लोडशेडिंग नाही
आपण पहिलं असं राज्य आहे, ज्याने सर्वात आधी वीजेचे नियोजन केले
आम्हाला सदोतीस रॅकची गरज आहे पण फक्त सव्वीस मिळाले आहेत
साडेतीन तासांच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या बाहेर आले
पोलिसांना चौकशीत आम्ही सहकार्य करीत होतो.
करीत आहोत करीत राहणार
न्यायालयाचाा सन्मान सुध्दा करीत आहोत.
नंदकिशोर चतुवेदीला उद्धव ठाकरे सरकारने लपवून ठेवले आहे
गुरूवारपर्यंत मला इथं यायचं आहे
शुक्रवारी मी दिल्लीत जाऊन नंदकिशोर चतुवेदी बाबतची माहिती केंद्र सरकारमधील योग्य अधिकाऱ्याला देणार आहे.
पोलिसांनी जी माहिती पाहिजे ती देत आहे
सत्तावन्न करोडचा आकडा मला अजून काही समजलेला नाही
न्यायालयाचा मान करतो आणि पोलिसांचा सन्मान करतो
राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने मागितली पोलिसांकडे परवानगी
मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मागितली परवानगी
1 मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यासाठी मनसेने केला अर्ज
मनसेच्या अर्जावर अद्याप पोलिसांचा निर्णय नाही
नाशिक – मस्जिदींवरील भोंग्यांचा डेसीबल मोजायला सुरुवात..
नाशिक ग्रामीण पोलीस पोहोचले सय्यद पिंप्री गावात
गावातील मस्जिद मध्ये अजान सुरू असताना मोजले आवाजाचे डेसीबल
राज ठाकरे यांच्या इशाऱ्या नंतर खबरदारी म्हणून पोलीस एक्शन मोड वर
ग्रामीण भागात दिवसा 55 डेसीबल , तर रात्री 45 डेसीबल आवाजाची आहे मर्यादा
यावर आवाज असेल तर कडक कारवाईचा नाशिक पोलिसांचा इशारा
राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात तीन मे च्या दिलेल्या अल्टिमेटम नंतर आता पालघर मधील मनसेही आक्रमक झालेली आहे,
आज पालघर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसीलदार तसच पालघर पोलिसांना पत्र देण्यात आल आहे .
येत्या तीन तारखेच्या आत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असं निवेदन मनसे कडून देण्यात आलंय .
त्यामुळे भोंग्यांवरून आता पालघर मधील वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात पुन्हा एक मृत्यू…
मोहफूल वेचतांना सुरेश लोनबले (50) या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू,
मयत ग्रामस्थ पवनपार येथील रहिवासी असून आज सकाळी गावाजवळील जंगलात मोहफुल वेचायला गेला असताना झाला वाघाचा हल्ला,
आज सकाळी सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथे बिबट्याच्या हल्ल्यात अंगणात झोपलेल्या माणिक नन्नावारे या 70 वर्षीय इसमाचा झाला होता मृत्यू
ब्रेक – भाजपच्या पोल खोल सभेच्या रथाची काच फोडणारे चार जण सीसीटिव्हीत कैद झाल्याची माहीती…
– पोलिसांनी आसपासच्या परिसरातील काल रात्रीचे सीसीटिव्ही घेतले ताब्यात…
– रात्रीचा सुमारास चार जण बाईकवरून आले होते अशी माहीती… पोलिसांकडून तपासाला सुरवात…
– आरोपीला अटक करण्याची भाजप नेत्यांची मागणी…
मी आणि गोपीचंद पडळकर 26 नोव्हेंबर 2021 रोजी बाजूला झालो कारण त्यावेळी बेसिक पगारवाढ कामगारांना देण्यात आली
सरकार विलीनीकरण, सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही, अशात गोरगरीब कामगारांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही संप मागे घेतला
आज जो काही निर्णय न्यायालयाने दिलाय, त्यात ना विलीनीकरण झालं, ना सातवा वेतन आयोग मिळाला
काही लोक कामगारांची दिशाभूल करतायत, हे आंदोलन भरकटलं
पवार साहेबांच्या घरावर कामगार गेला याचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु त्या शेतकऱ्यांनी काय केलं? तुमच्या अंगावर दगड मारला? चपला मारल्या?
तुम्ही मावळमध्ये शेतकरी पाणी मागायला आला त्यांना गोळ्या घातल्या.. ऊस आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या.. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडं घातली.. माझ्यावर ऊस आंदोलनात बावशी फाट्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला.. आम्ही इतका मार खाल्ला तरी आकांततांडव कधी केला नाही
तुम्ही कामगारांची दिशाभूल केली.. नेहमी राष्ट्रवादीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात छापलं की आमचं सरकार आलं की आम्ही एसटीचं विलीनीकरण करू.. तुम्ही त्यांची फसवणूक केली
आता सरकारचं जे काही चाललंय ती सगळी स्टंटबाजी चालली आहे, पवारांची कामगार संघटना मोडीत निघाली आहे.. एसटी कामगार दुसरीकडे जाऊ नये, म्हणून सदावर्ते यांच्यावर केसेस दाखल करून महाराष्ट्र दर्शन सुरू आहे.. एसटी कामगार आपल्या दावणीला यावा म्हणून हे सगळं चाललं आहे
एकप्रकारे हे सरकार आणि आदरणीय पवार साहेब एसटी कामगारांना दहशतवादी असल्याप्रमाणे वागणूक देत आहेत
देवेंद्र फडणवीसांचा आज पुणे दौरा
आज दिवसभरात विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी
थोड्याच वेळात पुणे विमानतळावर दाखल होणार
सोबत भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील
पवार साहेबांनी उसाच्या शेतीच्या माध्यमातूनच राजकारणाचा मळा या राज्यामध्ये फुलवलेला आहे
ऊस पीक हे जर आळशी शेतकऱ्यांचं असेल तर साखर कारखाने जे ऊस पिकावर उभे आहेत, ते काय वळू बैलांचे आहेत का? मग ही वळू बैलं लुटारू आहेत असं आम्ही म्हटलं, तर काय वावगं आहे?
एका बाजूला ऊस शेतकऱ्याला तुम्ही आळशी म्हणता आणि दुसरीकडे त्याच्या ऊस पिकावर साखर कारखानदारीच्या माध्यमातून तुम्हीच दरोडा घालता? पवार साहेबांची ही दुटप्पी भूमिका आहे
आणि ऊस पीक जर आळशी माणसाचं आहे असं पवार साहेबांना वाटत असेल, तर पवार साहेबांना विनंती करतो, तेवढं हर्बल गांजाचं बियाणं कुठे ठेवलंय तेवढं तुम्ही द्या, त्याची पेरणी राज्यातला शेतकरी करेल आणि उदंड पीक उदयाला येईल, अमाप पैसा शेतकऱ्याला मिळेल, उसाची शेती आम्ही सोडून देतो
खऱ्या अर्थाने या राज्यातल्या शेतकऱ्याचं, शेती व्यवसायाचं वाटोळं कुणी केलं असेल, तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे, आणि म्हणून त्यांच्या भक्तांनी त्यांना जाणता राजा म्हटलंय, म्हणजे त्यांना सगळं समजतं की शेतकऱ्याला कसं लुटायचं !
अमरावतीच्या अचलपूर मधील दोन गटातील हाणामारी प्रकरण..
अचलपूर परतवाडा शहरात लागली आहे संचार बंदी…..
रमजानच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीत तीन तास शिथिलता देण्यात यावी…
मुस्लिम समुदायाचे दोन प्रतिनिधी आणि हिंदू समाजाचे दोन प्रतिनिधी घेनार पोलीस अधिकाऱ्यांची भेट….
अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांची घेणार भेट….
अचलपूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता;पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील घेत आहे बैठक
निवडक पदाधिकाऱ्यांन सोबत घेत आहे बैठक
नागपूरच्या रवी भवन मध्ये सुरू झाली बैठक
आता दंगे सुरू केले आहेत
मुंबईत सुध्दा त्यांनी असाचं तणाव निर्माण केला आहे
देशाची अर्थव्यवस्था पहिलीच कोलमडलेली आहे.
देश की अर्थव्यवस्थाला मोठा फटका बसेल
दंगे सदृश परिस्थिती निर्माण केली आहे
कोविडच्या संकटातून आत्ता कुठेतरी देश सावरतोय
अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे
महाविकास आघाडी म्हणून एक आहे
ताकतीने लढलो आणि जिंकलो
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
संबंधित व्यक्तीवरती कारवाई केली जाईल
काही घटकांच्या असा प्रकार होत आहे
त्याची महाराष्ट्र पोलिसांनी तयारी केली आहे
अद्याप मला अशी काही माहिती नाही
आज महाराष्ट्रातल्या वरिष्ठांची बैठक बोलावली आहे
अधिकाऱ्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल
राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांशी कायम बोलण होत असतं
आयबी रॉ बरोबर बोलून निर्णय घेणार
काही घटकांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे.
आपल्या देशात वेगवेगळ्या विषयावर राजकारण तापायला सुरूवात झाली आहे
महागाई, सीमा सुरक्षा, अशा अन्य गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे
अमरावतील, अकोल्यात कोणी घडवलं हे सगळ्यांना माहित आहे
वरीष्ठ पोलिस अधिकारी त्याबाबत निर्णय घेतील
संबंधित अधिकारी लक्ष ठेऊन आहेत, त्यामुळे ते निर्णय घेतील
केंद्राकडून काही दोषी व्यक्तींना सुरक्षा पुरवली जात आहे
सुरक्षेचा वापर त्यांनी कशा पद्धतीने करायचा हे त्यांनी ठरवाव.
एकनाथ खडसेंच्या सुचनेचं मी पालन करेल
कोणाला किती सुरक्षा द्यायला हा निर्णय अधिकाऱ्यांचा आहे
मुख्यमंत्र्याच्या सोबत नेहमी बैठक होते
तसा विचार आहे, सगळ्या राजकीय पक्षांचा
मी माझ्या नियमानुसार माझं काम करतोय
अनेक प्रकारचे आक्षेप आहेत
विशेष करून सायबर काईम येतात
आम्ही पावलं टाकतोय…
-महिलेसमोर नाक घासायला लावल्याने तरुणाची आत्महत्या
-पिंपरी चिंचवड मध्ये महिले बाबत चुकीचे वक्तव्य केल्याच्या गैरसमजुतीतून चौघांकडून तरुणास मारहाण करण्यात आली, त्याला नाक ही घासायला लावले
-झालेला हा अपमान सहन न झाल्याने तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
-ही घटना डुडुळगाव इथं घडलीय सचिन सोपान तळेकर असे आत्महत्या केलेल्या 29 वर्षीय तरुणाचे नाव
-किरण रामदास कान्हुरकर , विजय दत्तात्रय तापकीर, अमोर बाळासाहेब तापकीर आणि अभिनव अर्जुन गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
-त्यांच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय
देशात एक करोडो जागा खाली आहे त्यांचे पद भरा नाहीतर मी स्वतः बेरोजगारांचा मोर्चा काढील
केंद्राने श्रमिक इ कार्ड तयार केले हे चांगलं पाऊल आहे
बेरोजगारांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये केंद्राने जमा करावे यामुळे त्यांना दिलासा मिळेल
राम नवमी ला रैली वर दगडफेक झाली हे इंटिलिजेस फेलीवर आहे
जिहादी ची हिम्मत वाढत आहे
निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे कदाचित महागाई , बेरोजगारी वरील लक्ष हटविण्यासाठी असल्याची शक्यता नाकारता येत नाही
आताच दंगे कसे सुरू झाले ते सुद्धा गुजरात मध्ये
दंगे करून हिंदू ना जेल मध्ये पाठविले , मरने हे षडयंत्र तर नाही
आम्ही महागाई चा मुद्दा मागे पडू देणार
पोलिसांची रिपोर्ट आहे तर सावधान राहायला पाहिजे
हिंदू गोळी खाऊन जेल मध्ये जाणार नाही उद्धव ठाकरे हे होऊ देणार नाही ते बाळा साहेब प्रमाणे जिहादी ना डोकं वर काढू देणार नाही
जेव्हा मेहबुबा मुक्ती सोबत भाजप ने युती केली होती तेव्हा भाजप ने हिंदुत्व सोडलं अस कोणी म्हणत नव्हतं… मग आता शिवसेना ने हिंदुत्व सोडलं अस म्हणणं चुकीचं आहे
आपण केलं ते बरोबर आणि दुसर्याने केलं तर चूक अस होत नाही
कोल्हापूर पोलीस अँड गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्याच्या तयारीत
शाहूपुरी पोलिसांचं एक पथक सदावर्ते चा ताबा घेण्यासाठी मुंबईला गेल्याची सूत्रांची माहिती
आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दुपार पर्यन्त सदावर्ते ना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता
आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे सदावर्ते ना कोल्हापूर मध्ये आणण्याची कोल्हापूर पोलिसांची तयारी
कोल्हापूर पोलिसांना ऍड गुणरत्न सदावर्तेचा ताबा आज मिळणार का याकड लक्ष
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा समाजाबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी सदावर्तेवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – पोलीस आयुक्त दीपक पांडये यांचा आणखी एक दणका
धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंगयांचे डेसीबील मोजण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम मोजणार भोंगयांचा आवाज
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसीबल मोजण्यासाठी देणार विशेष ट्रेनिंग
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकारी एकत्रित मोजणार धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांचे डेसीबील
नादुरुस्त असलेल्या डेसीबल मोजण्याच्या मशीन तात्काळ दुरुस्त करून घेण्याचे पोलीस आयुक्तांचे प्रदूषण मंडळाला आदेश
पुण्यात कचरा गोळा करणारे कर्मचारी वापरणार स्मार्ट वॉच
कचरा गोळा करण्याचा स्मार्ट पद्धतीने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी संगणकप्रणाली विकसित केली जाणार
पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटी मिळून हा प्रकल्प राबविला जाणार
शहरातील कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभा केला जाणार
वाहनांसाठी जीपीएस तर कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार
या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली
पुण्यातील कमाल तापमान 41 अंशांवर जाणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा
त्यामुळे आणखी कडक उन्हाळा सहन करण्याची तयारी पुणेकरांना करावी लागणार
यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे
7 व 8 एप्रिल रोजी शहरात 40. अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती
गेले 15 दिवस सातत्याने कमाल तापमान 39 अंशांच्या पुढे राहिले आहे त्यात पुढील काही दिवस तापमान 41 अंशापर्यत जाणार असल्याचा इशारा
नागपुरात इलेक्ट्रिक बस चा मुहूर्त लांबला का ?
15 एप्रिल पर्यंत येणार होत्या 25 इलेक्ट्रिक बस
तर एप्रिल अखेरीस 15 बस , अश्या एप्रिल महिन्यात 40 बस महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार होत्या
मात्र अजून बस आल्या नाही , आता जून मध्ये येणार असल्याचा अंदाज
डिझाल बस मुळे वाढत आहे खर्च
त्यामुळे आता नागपूरकर प्रवाश्यांना इलेक्ट्रिक बस साठी जून पर्यन्त वाट पहावी लागणार का ?
अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
भाविकांच्या गर्दी मुळे लाल महाल चौकापासून ट्रॅफिक जाम
दर्शनासाठी भाविकांची लागली रांग
विदर्भात उष्णतेची लाट
आणखी दोन दिवस पारा 45 अंशा पर्यंत जाण्याची शक्यता
विदर्भात अलर्ट जारी
नागपूरचा पारा 43.3 अंश सेल्सिअस वर पोहचला
सरासरी पेक्षा 3 अंशाची वाढ
चंद्रपूर मध्ये 44.2 वर
दोन दिवसानंतर मात्र उष्ण लाटा पासून दिलासा मिळणार असून पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली
नागपूर हवामान विभागाचा अंदाज
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा एक भाग भरण्याची प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार
त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेता यावी, ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याचा सराव व्हावा, यासाठी 1 ते 14 मे दरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ करता येणार
वाहनांच्या खरेदी नंतर चॉईस नंबर ची मोठी मागणी
चॉईस नंबर साठी नागपूरकरांनी मोजले 2 कोटी 73 लाख रुपये
वर्षभरात तब्बल 3हजार 541 जणांनी घेतले चॉईस नबर
आरटीओ ला मिळाला मोठा महसूल
शहरा सोबत ग्रामीण भागातही वाढली मागणी
चॉईस नंबर साठी भरावा लागतो शुल्क
त्यातून वर्षभरात आरटीओ ला 2 कोटी 73 लाखाची कमाई
पाईपलाईन फुटल्याने २४ तासापेक्षा जास्त वेळ पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता…
पाईपलाईन दुरुस्तीकाम युद्ध पातळीवर सुरू..
पाणी जपून वापरण्याचे मनपा आवाहन..
मालेगांव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन काल फुटल्याने त्याचा परिणाम आता शहराच्या पाणी पुरवठयावर झाला असून २४ तासा अथवा त्यापेक्षाही जास्त वेळ पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो पाणी जप वापरण्याचे आवाहन मालेगांव मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.उंबरदे गावाजवळ फुटलेल्या या पाईपलाईन दुरुस्ती काम हे युद्धगतीने सुरू असून गेल्या १२ तासापासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उंबरदे येथे तळ ठोकून आहेत.रात्रीच्या अंधारात देखील काम सुरू असून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
तब्बल दोन वर्षांनी संपूर्णत: कोविड निर्बंधमुक्तीनंतर अंगारक संकष्टी चतुर्थीनिमीत्त मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
आज रात्री १.३० वाजेपासूनच भक्तांसाठी बाप्पाचे दर्शन खुले करण्यात आले…
कोविड निर्बंध हटवले गेल्यामुळे आता मंदिरात प्रवेश करण्याठी क्यू आर कोड प्रणाली शिथील करण्यात आलीय. त्यामुळे अंगारक संकष्टी चतुर्थीला भाविक आधी सारखे थेट मंदिरात येऊन दर्शन करत आहेत.
अंगारक संकष्टी चतुर्थीला काय नियोजन करण्यात आलंय याच संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे सदस्य यांच्याशी बातचीत केलं आमच्या प्रतिनिधी रमेश शर्मा यांनी
– वर्धेच्या दत्तपूर टी पॉईंट वर अज्ञातांनी केला एकावर प्राणघातक हल्ला
– हल्यात रवीद्र कोटंबकर हे गंभीर जखमी
– कोटंबकर हे वर्धेच्या एका वृत्तपत्राचे आहे संपादक
– वर्धेवरून सेलूला जातं असतांना अज्ञातांनी कार अडवत केली मारहाण
– कोटंबकर यांच्या ड्रायवरलाही मारहाण करत गाडीची सुद्धा करण्यात आली तोडफोड
– कोटंबकर यांच्या डोक्यावर, पायावर मारहाण जखमा
– 10 ते 12 हल्लेखोर असल्याची माहिती
– सेवाग्राम येथील रुग्णालयात सुरु आहे उपचार
– सेवाग्राम पोलिसांत अज्ञात आरोपीतांविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल
– कलम 307 , 143 , 148 अंतर्गत गुन्हा दाखल
– आरोपीच्या शोधात पोलिसांची पथक रवाना