Maharashtra News Live Update : रत्नागिरीत नवजात बालकांची होतेय विक्री, कोणत्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार?

| Updated on: Apr 24, 2022 | 10:27 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : रत्नागिरीत नवजात बालकांची होतेय विक्री, कोणत्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार?
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज रविवार 24 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा क्षेत्रातचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. वरुड शहरातील मूलताई चौकात योगेश घारड यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार केला आहे. योगेश घारड यांना रात्रीच उपचारासाठीसाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीची घटना असून घटनेनंतर घटना स्थळी जमाव उपस्थित झाल्याने तणावपुर्ण शांतता असल्याची माहिती मिळाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Apr 2022 09:15 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत

    जवळपास अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा होता खंडित

  • 24 Apr 2022 08:18 PM (IST)

    भाजपचे कंदील आंदोलन

    यवतमाळ- भारनियमन विरोधात भाजप आक्रमक ,

    शहरातील पाचकंदील चौकात भारनियमन विरोधात आंदोलन


  • 24 Apr 2022 07:44 PM (IST)

    पैठण एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

    मेट्रिस नावाच्या कंपनीला भीषण आग

    संपूर्ण कंपनी सापडली आगीच्या भक्ष्यस्थानी

    10 किलोमीटर पासून दिसतोय आगीचा धूर आणि लोट

    अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

  • 24 Apr 2022 07:30 PM (IST)

    रत्नागिरीत नवजात बालकांची होतेय विक्री

    जिल्हा शासकीय रुग्णालयातून एका नवजात बालकाची विक्री

    रत्नागिरीतील धक्कादायक प्रकार समोर

    गरीब कुटूंबाना केलं जातय टार्गेट

    हिंदूत्ववादी संघटनांमुळे धक्कादायक प्रकार समोर

  • 24 Apr 2022 07:18 PM (IST)

    95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

    – उदगीर येथे पार पडले 95 वे मराठी साहित्य संमेलन

    – राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने झाला समारोप

  • 24 Apr 2022 06:20 PM (IST)

    साहित्य संमेलन अपडेट 

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार साहित्य संमेलनाची सांगता

    – 22 एप्रिल पासून उदगीर येथे सुरुय अ. भा. मराठी साहित्य संमेलन

    – आज संमेलनाचे सूप वाजणार

    – साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले त्याबद्दल उदगीर येथील जनतेचे आणि आयोजकांचे आभार मानतो

    – साहित्यिक आणि साहित्य हे आपले जीवन घडवणारे आहेत.

    – वकृत्व स्पर्धेत मला बक्षीस मिळाले. त्यात सावरकर, पुरंदरे, देसाई या लेखकांची पुस्तके मला भेट मिळाली.

    त्यांच्या पुस्तकातून मला जीवनाचे तत्वज्ञान मिळाले

    – कुठलीही सत्ता डोळे नष्ट करु शकते पण विचार नष्ट करु शकत नाही

    – डोळे दान केले जाऊ शकतात पण दृष्टी नाही.

    – साहित्य संस्कृती आणि इतिहास हे जीवन समृद्ध करत असतात

    – माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आणीबाणीच्या विरोधातील नवनिर्माण आंदोलनातून झाली.

    – आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य आहे. साहित्य संगीत इतिहासातून

    – आपल्याकडे होणारे चित्रपट, नाटक हे केवळ मनोरंजनासाठी नसून हे संस्कार देण्यासाठी आहे

    – हा संस्कार माणसाचे जीवन घडवत असतो

    – उत्तम, अधिक उत्तम आणि सर्वोत्तम हाच माणसाचा स्वभाव असला पाहिजे

    – मला एक विनंती करायची आहे.

    – स्वामी विवेकानंद यांनी भविष्यवाणी केली.
    18 वे शतक हे मोघलांचे राज्य होते.
    – 19 व्या शतक हे इंग्रजांचे होते
    – 20 वे शतक अमेरिका
    – 21 वे शतक हे भारताचे आहे. यात आपल्याला विश्वसमूदायामध्ये पोहोचवायचे असेल तर सामूदायिक एकमत असले पाहिजे

    – ज्ञान हे शिक्षणातून मिळते.

    – ज्ञानाचे रुपांतर हे संपत्तीमध्ये करायचे आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची कुवत आपल्यार निर्माण करायची आहे

    – साहित्यिकांनी जलसंवर्धनावर खूप पुस्तके लिहिली आहेत

    – जोपर्यंत लातूर जिल्ह्यातील इरिगेशन 18 टक्के आहे. मात्र ते प्रमाण जोपर्यंत 50 टक्केपर्यंत गेल्याशिवाय जनता सुखी होणार नाही

    – शेतकरी इतका समृध्द झाला पाहिजे की तो उर्जादाता झाला पाहिजे

    – माझ्याकडे पाण्यावर चालणारी कार आहे.

    – आपल्या लिखाणामागच उद्दिष्ट काय आहे आणि त्या मागे उद्देश काय आहे हे पाहिले पाहिजे

    – राजकारण, पत्रकारितेसह समाजातील सर्वच गोष्टींचा ऱ्हास झालेला आहे. तो भरुन काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

    – मी भाषणासाठी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा अमेरिकेतील मंत्री म्हणाले, आमच्या देशातील मोठी समस्या आहे ती म्हणजे आमची समाजव्यवस्था कोलमडली आहे. कारण आमचे तरुण तरुणी लीव्ह इनमध्ये राहतात

    – मात्र भारतात तसे नाही. भारतीय समाजजीवन समृध्द आणि संपन्न आहे. कारण आमच्याकडे शिवाजी महाराजांपासून थोर लोकांचे संस्कार आहेत.

    – समाजात चांगले वाईट, सत्य असत्य आहे.

    – आपल्याला समाजात जे चांगले दिसेल, जे विकासाला नवीन दिशा देणारे आहे. ते लिहावे. लिहिण्याचा अधिकार आहे.

    – वाद विवाद आहे. राजकारणातही आहे. साहित्याच्या व्यासपीठावरुन राजकारण बोलण्याची गरज नाही.

    – राजकारणात साहित्यिकाला महत्व आहे. पु ल देशपांडे, दुर्गा भागवत यांनी लोकशाही वाचवण्यासाठी काम केले

    – राष्ट्र घडवायचे असेल तर सुधाकर नाईक आणि श्रीकांत जीचकार यांच्यामुळे संस्कृत विश्वविद्यालय उभे राहिले

    – शिक्षण हे राजकारणापासून मुक्त असले पाहिजे.

    – आपल्या देशात जातीयता, अस्पृश्यता, धर्मांधता आहे. हे संपवायचे असेल तर लेखकाची भूमिका महत्वाची आहे.

    – माणूस हा जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ आहे.

    – येणाऱ्या काळात विश्वात महासत्ता व्हायचे असेल तर साहित्य, संस्कृती टिकवली पाहिजे

    – मतभेद असतात. मतभेद हे जीवंतपणाचे लक्षण आहे.

    – पण मतभेद असला तरी चालेल पण मनभेद नसावे.

    – आपल्या देशात 1947 पुर्वी साम्यवाद, समाजवाद आणि पुंजीवाद होता. मात्र आता काळ बदलला आहे.

    – व्यक्ती आणि पक्ष यामध्ये पक्ष श्रेष्ठ आहे.

    – पार्टी आणि तत्वज्ञान यात तत्वज्ञान श्रेष्ठ आहे.

  • 24 Apr 2022 05:57 PM (IST)

    पुणे

    आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात पुण्यातही तक्रार दाखल

    कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात काँग्रेसच्या प्रवक्त्या संगिता तिवारी यांनी तक्रार केली दाखल

    रवी राणा यांच्यावर मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

    तक्रारदाराला जबाब नोंदवण्यासाठी उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्याच्या सूचना

    पुण्यातही रवी राणांवर गुन्हा दाखल होणार ?

  • 24 Apr 2022 05:13 PM (IST)

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

     

    भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

    येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

  • 24 Apr 2022 04:56 PM (IST)

    एसटी बसला भीषण आग

    औरंगाबाद जळगाव महामार्गावर एसटी बसला भीषण आग

    आगीत एसटी बस जळून खाक

    एसटी बसच्या ड्राईव्हर कॅबिनला लागली भीषण आग

    प्रसंगावधान राखून प्रवाशी उतरले बसच्या खाली

    सुदैवाने हानी नाही

  • 24 Apr 2022 04:49 PM (IST)

    उदगीर साहित्य संमेलन अपडेट :

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उदगीरमध्ये जंगी स्वागत

    – मंत्री नितीन गडकरी यांचा क्रेनद्वारे मोठा हार घालत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत केले स्वागत

    – नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होतोय

  • 24 Apr 2022 04:31 PM (IST)

    कारागृहाच्या बाहेर शिवसैनिक आक्रमक

    नवी मुंबई

    हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा

    रवी राणा हाय हायच्या घोषणा

    तळोजा कारागृहाच्या बाहेर शिवसैनिक आक्रमक

  • 24 Apr 2022 04:19 PM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उदगीर येथील साहित्य संमेलनात दाखल

    – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार साहित्य संमेलनाची सांगता

    – 22 एप्रिल पासून उदगीर येथे सुरुय अ. भा. मराठी साहित्य संमेलन

    – आज संमेलनाचे सूप वाजणार

  • 24 Apr 2022 04:07 PM (IST)

    चंद्रपूर:-राणा प्रकरणात राज्याच्या मदत-पुनर्वसन मंत्र्यांची उडी,

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरातील भाषणात घसरली जीभ,

    राज ठाकरे यांच्या भोंगा उतार-झेंडा बदलू भूमिकेवर सडकून टीका,

    राज ठाकरे यांचा चों&*&& फाटलाय अशी केली भाषा,

    राणा दाम्पत्याने राज्य-मुंबईची कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप,

    राणा दाम्पत्यासाठी -नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर,

    राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा चे महत्व आम्हाला सांगू नये अशी केली टीका

  • 24 Apr 2022 04:05 PM (IST)

    -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार साहित्य संमेलनाची सांगता

    – 22 एप्रिल पासून उदगीर येथे सुरुय अ. भा. मराठी साहित्य संमेलन

    – आज संमेलनाचे सूप वाजणार

    थोड्याच वेळात (4 वाजता) नितीन गडकरी येथील.

  • 24 Apr 2022 04:05 PM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळाव्यात भर उन्हात मोठ्या भाविकांची गर्दी

    गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता नदीला सुरू असलेला सिंहस्थ कुंभमेळाव्यात भर उन्हात पण मोठ्या भाविकांची गर्दी

    महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर सुरू असलेल्या प्राणहिता नदीला सिंहस्थ कुंभ मेळावा 13 एप्रिल पासून 24 एप्रिल आज पर्यंत सुरू आहे आज शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी सिरोंचा तालुक्यातील तापमान 40- 41 असल्यानंतर सुद्धा मोठी गर्दी भाविकांची प्राणहिता चा नदीघाटावर पाहायला मिळू शकते आज सायंकाळी गंगा आरती झाल्यानंतर पुष्कर मेळावा संपेल या कुंभमेळाव्यात महाराष्ट्राचा छत्तीसगड तेलंगाना आंध्र प्रदेश उडीसा राज्यातून भाविक दहा दिवस दर्शनासाठी घेऊन पवित्र गंगा स्नान केले भर उन्हात भाविकांची गर्दी झाली आहे

  • 24 Apr 2022 04:04 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन

    रत्नागिरी- सावर्डे खरवते इथल्या उद्यानविद्या  महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन

     

  • 24 Apr 2022 02:34 PM (IST)

    राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही बेबंदशाही चालली आहे – नारायण राणे

    राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही बेबंदशाही चालली आहे

    जे सत्तेत आहेत तेच धिंगाणा घालतायेत

    पोलीस आणि शिवसैनिक एकत्र येऊन सुड उगवण्याचं काम करतायेत

    जेव्हा सरकार कायदा आणि सुव्यवस्था एकत्र होत नाही

    खून होतायेत, दरोडे पडतायेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले जात नाहीत अशा काळात राष्ट्रपती राजवट येणं गरजेचं आहे

    या देशात लोकशाही आहे कोणी हनूमाना चालीसा पठण करण्यासाठी येत असेल विरोध का

    एका व्यक्तीला एक कायदा आणि दूसऱ्याला दूसरा कायदा

    मुख्यमंत्र्यांचा कोणावरही अंकूश नाही ना संजय राऊतांवर ना कोणावर ?

    संजय राऊतांच नाव नको माझा दिवस खराब जाईल,

    नवनीत राणा या खासदार आहेत एक आमदार आहेत

    आज कोणाला सुरक्षा व्यवस्था आहे सुशांतसिंग की हत्या होताना दिशा सालियनची हत्या होताना एक मंत्री सहभागी होता

    राज्यात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे

     

    मुख्यमंत्री कधी सक्षम होते राज्याचे प्रश्न माहिती नाही

    शेवटचं भाषण अंतिम आठवडा प्रस्तावावार केलं कलानगरच्या नाक्यावर केलं तसं

    महाराष्ट्राला 10 वर्ष या मुख्यमंत्र्यानं मागे नेलाय

    89 हजार कोटी तुट आहे या राज्याची व्यवस्था पुर्ण बिघडलीये

  • 24 Apr 2022 02:31 PM (IST)

    फडणवीसांच्या घरात जाऊन त्यांनी हनुमान चाळिसा म्हणाावी – संजय राऊत

    फडणवीसांच्या घरात जाऊन त्यांनी त्यांनी हनुमान चाळिसा म्हणाावा त्यांनी

    राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

    लोकांना भडकवून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे

    एखाद्याला जोडे मारायचे आहेत, त्याला मारले पाहिजे

    दोन मंत्री आतमध्ये टाकले आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करीत आहे

     

  • 24 Apr 2022 01:36 PM (IST)

    कोर्टामध्ये नेमकं काय झालं

    पुरुषाला आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जाईल

    नवनीत राणा यांची भायखळा जेलमध्ये पाठवलं जाईल

    न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे

    मुख्यमंत्र्यांबाबत त्यांनी अपशब्द वापरले आहे

    शासनाला आव्हान दिल्याने सेडिशनचा गुन्हा लावला

    १२४ अ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

    राणा दाम्पत्यावर लावलेले आरोप कमकुवत आहेत.

    आरोपात काही दम नाही

  • 24 Apr 2022 01:29 PM (IST)

    राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राणा दाम्पत्याला जामीनाचा मार्ग मोकळा

    राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राणा दाम्पत्याला जामीनाचा मार्ग मोकळा

    राणा दाम्पत्यावरील सुनावणी पुर्ण झाली आहे

    सरकारी वकीलांनी सुध्दा युक्तीवाद केला आहे

    वीस मिनिटांच्यावरती हा युक्तीवाद सुरू झाला होता

    कोणत्याही क्षणी जामीनासाठी अर्ज करतील

  • 24 Apr 2022 01:19 PM (IST)

    अमरावती राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान पक्षातर्फे होमहवन

    अमरावती राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान पक्षातर्फे होमहवन

    काल रवी राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी धुडगूस केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ युवा स्वाभिमान पक्षाची गांधीगिरी

    राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानाची काल शिवसैनिकानी जागा अशुद्ध केल्याचा आरोप..

    शिवसैनिकानी महिलांना शिवीगाळ केल्याचा आरोप;बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर सुरू केलं होम हवन..

  • 24 Apr 2022 12:23 PM (IST)

    खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची समन्वय बैठक सुरू

    खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची समन्वय बैठक सुरू

    खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल हटवा

    पुणे शहरातील सर्वपक्षीय प्रतिनिधी,लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व सामाजिक संघटना व विविध व्यावसायिक पेशातील संस्था संघटना यांनी या बैठकीस उपस्थित

    शिवापुर टोलनाका हटाव कृती समिती ने १६ फेब्रुवारी २०२० ला केलेल्या आंदोलनात MH 12 व MH 14 टोल मुक्त केल्याचा निर्णय झाला होता सबब आत्ताची टोल वसूली बेकायदाच

  • 24 Apr 2022 12:22 PM (IST)

    राणा दाम्पत्याने केल हनुमान चालीसा पठण

    राणा दाम्पत्याने केल हनुमान चालीसा पठण

    रात्री सांताक्रूझ पोलीस स्टेशनच्या कोठडीत पठण

    101 वेळा केलं हनुमान चालीसाचे पठण

    रात्री हनुमान चालीसा पठण केल्याची माहिती

  • 24 Apr 2022 12:10 PM (IST)

    2024 पर्यंत 25 हजार कोटींची कामे सुरू करू – नितीन गडकरी

    2024 पर्यंत 25 हजार कोटींची कामे सुरू करू

    औरंगाबाद ते पैठण हा सर्वात महत्वाचा रस्ता आहे, या रस्त्याला थोडा उशीर झाला पण काम सुरू झालं आहे, एकनाथ महाराज यांच्याबद्दल खूप श्रद्धा आहे.

    वाळूज ते चिखलठाना रोड, हा डबल डेकर रोड होणार, खाली रस्ता आणि वर पूल अशी रचना असेल 25 किलोमीटर लांबी असा हा रस्ता असेल

    औरंगाबाद डबल डेकर पुलावर मेट्रो सुद्धा असेल

  • 24 Apr 2022 12:01 PM (IST)

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साई दरबारी…

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत साई दरबारी…
    सहपरिवार साईदर्शनासाठी साई दरबारी…
    गोवा राज्याच्या मतमोजणी पुर्वीही लावली होती साई दर्शनासाठी हजेरी….
    मुख्यमंत्री पदी पुन्हा संधी मिळाल्यानंतर तसेच आज वाढदिवस असल्याने सावंत यांचे सहपरिवार साईदर्शन….

    डॉ.प्रमोद सावंत बाईट्स –

    मोदींच्या नेतृत्वात नविन भारताचा विकास…
    सबका साथ सबका विकास हे ध्येय…
    मोदिजी राजकारण करत नसून विकासाचे राजकारण करताहेत…
    महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काही लोकांना राजकारण करायचंय ती वेगळी गोष्ट आहे…
    मोदिजींबरोबर पुढं जाणं महाराष्ट्रातील जनतेसाठी चांगलं…
    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शिर्डीत वक्तव्य…

    मतमोजणी पुर्वीही साईदर्शन…
    माझी इच्छा साईबाबांनी पूर्ण केली…
    जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी हि साईचरणी केली होती प्रार्थना…
    नवस फेडण्यासाठी तसेच वाढदिवस असल्याने साईदर्शनाला आलो…
    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतले साईदर्शन…
    गोव्यात रोजगार, पर्यटनावर भर देणार…
    आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून गोव्याला स्वयंपूर्ण बनवणार…
    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शिर्डीत वक्तव्य…

  • 24 Apr 2022 11:25 AM (IST)

    वरुड शहर बंदचे आवाहन; शहरात पोलिसांचा बंदोबस्त

    वरुड येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्या वरील गोळीबार प्रकरन

    योगेश घारड यांच्या वरील प्राणघातक हल्लाचा वरुड येथे तीव्र निषेध.

    बजरंग दल व शिवसेननेच्या वतीने वरुड येथे बाईक रॅली

    वरुड शहर बंदचे आवाहन; शहरात पोलिसांचा बंदोबस्त

  • 24 Apr 2022 11:23 AM (IST)

    जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

    जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

    परवा रात्रीच झाला होता स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार

    त्यातच पुन्हा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नगर जिल्ह्यात खळबळ

    तर राहुल राजळे यांची प्रकृती गंभीर, पुण्याला रुबी हॉस्पिटलला हलवलं

    घटनेवर मंत्री शंकराव गडाख यांची प्रतिक्रिया

    हा राहुल राजळेवर हल्ला नसून माझ्यावर झालेला हल्ला

    हा दुर्दैवी हल्ला,,अस काही होईन अस माझ्या मनात ही नव्हतं

    काही दिवसांपासून खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे

    माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेय

    माझ्या आणि कुटुंबावर शिवराळ भाषा वापरली जाते

    नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्थरावर चाललाय

    मात्र मला पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास

  • 24 Apr 2022 11:13 AM (IST)

    नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन

    नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 हजार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन

    औरंगाबाद शहरातील जबिंदा मैदानावर होतेय विकास कामांचे उद्घाटन

    कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित

    धुळे सोलापूर हायवे, औरंगाबाद पैठण महामार्ग, औरंगाबाद शिउर रस्त्यासह अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

    कार्यक्रमाला शिवसेना भाजपचे मोठे नेते उपस्थित

  • 24 Apr 2022 11:11 AM (IST)

    विचारांची लढाई विचाराने लढई जाईल – नितेश राणे

    विचारांची लढाई विचाराने लढई जाईल

    दगडांची लढाई दगडाने लढली जाईल

    पोलिसांना बाजूला करा

    भारतीय जनता पक्ष सुध्दा आक्रमक होईल

    संजय राऊत का बिकाऊ आहे

    संजय राऊत हा बाथरूनमध्ये लपला होता

    आम्हाला चोवीस द्या

    कसं नीट करायचं हे आम्हाला माहिती आहे

     

  • 24 Apr 2022 11:00 AM (IST)

    राज्यात दीड हजार मेगा वॅटच्या वर अघोषित भारनियमन होत आहे – चंद्रशेखर बावनकुळे

    शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरा समोर येऊन हनुमान चालिसा पठण करावं , मी त्यांचं स्वागत करेल , त्यांची व्यवस्था करणार , पेंडोल टाकून बसण्याची व्यवस्था करत लाडू चा प्रसाद सुद्धा देणार ,- बावनकुळे यांचं शिवसेनेला आवाहन

    भाजप च्या नेत्याच्या घरा समोर जर कोणी हनुमान चालिसा म्हणणार म्हटलं असत तर आम्ही त्यांची व्यवस्था केली असती ,त्यांना जेवण प्रसाद आणि पूजापाठ ची व्यवस्था केली असती

    हे सरकार इंग्रजा सारख वागत आहे , झेड सुरक्षा असलेल्या व्यक्ती वर हल्ला होत आहे म्हणजे त्याला पोलिसांनाच सपोर्ट आहे

    राज्यातील विकास या सरकारने केला नाही या पासून सरकार ला लक्ष डायव्हर्ट करायचं आहे म्हणून हे सगळं होत आहे

    राज्यात अराजकता निर्माण केली जात आहे

    या सरकार ला कोणालाही समजावून घ्यायचं नाही फक्त अराजकता माजवयाची आहे

    राष्ट्रपती शासन ची मागणी आम्ही करत नाही मात्र सगळ्या राज्यात वेगवेगळ्या घटना घडत आहे

    ऑन भारनियमन –
    राज्यात दीड हजार मेगा वॅट च्या वर अघोषित भारनियमन होत आहे

    सरकार दावा करते अघोषित भार नियमन होत नाही

    गडचिरोली पासून कोल्हापूर पर्यंत शेतकऱ्यांना फक्त 2 तास वीज मिळते आहे

    परवा पर्यंत अडीच हजार मेगा वॅट भरनियमय होत होत

    केंद्र सरकारने 5 हजार मेगा वॅट पेक्षा जास्त वीज दिली , मागच्या सरकार पेक्षा जास्त वीज दिली , कोळसा दिला

    यांना जानेवारी ,फेब्रुवारी मध्ये नियोजन केले नाही ,जो कोळसा पावसाळ्यात कामी आला असता …

    मात्र पाप केंद्रावर टाकत आहे

    वीज दरवाढ केली , जानेवारी पासून लागू होणार अनामत रक्कम घेतली जात आहे

    वीज बाहेर घेऊन त्यात भ्रष्टाचार करणे हा सुद्धा उद्देश असू शकतो

    आज पासून भाजप कंदील आंदोलन करणार

    पुढील काळात मंत्र्यांच्या घरी कंदील सप्रेम भेट पाठवू

    सरकार यावर मानलं नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन होईल त्यात भाजप सहभागी होईल

  • 24 Apr 2022 10:59 AM (IST)

    पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे – दिलीप वळसे पाटील

    पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे

    हे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना असं वाटतंय की हे सरकार सत्तेत राहिलं नाही पाहिजे

    हे खरं नाही. सोमय्यांना पोलिस स्टेशनला जाण्याची गरज नाही

    नियमाप्रमाणे जे काही असेल ते होईल

    लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना भेटायला जायची मुभा आहे

    विचार विनिमय करून सरकार निर्णय घेईल

    मला माहिती नाही…

     

  • 24 Apr 2022 10:54 AM (IST)

    बीडमध्ये अज्ञात टोळक्याने टायर जाळून दगडफेक केली, परिसरात तणावपुर्ण शांतता

    बीडमध्ये अज्ञात टोळक्याने टायर जाळून दगडफेक केली, परिसरात तणावपुर्ण शांतता

    बीडच्या गेवराई शहरातील दसरा मैदानाजवळ अज्ञात टोळक्याने रस्त्यावर टायर जाळून दोन एसटी बस आणि एका खाजगी बस वर दगडफेक केली आहे. रात्री अचानक घडलेल्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान रस्त्यावर टायर जाळून दगड फेक का ? करण्यात आलीय याच कारण समजू शकलेले नाही. या घटनेत तिन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षकांनी यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेतली. आता पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

  • 24 Apr 2022 10:53 AM (IST)

    रवी राणा आणि नवनीत राणा यांना घेऊन पोलिस कोर्टाकडे रवाना

    रवी राणा आणि नवनीत राणा यांना घेऊन पोलिस कोर्टाकडे रवाना

    वांद्रे कोर्टात त्यांना हजर करणार आहेत

    सांताक्रुझ पोलिसांना कोठडीची मागणी केली जाणार आहे

  • 24 Apr 2022 10:44 AM (IST)

    राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका..

    राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका.. राजकीय हस्तक्षेप कुणीही केला नाही पाहिजे.. यात झालाय असंही माझं म्हणणं नाहीय.. सगळ्यांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली, तर असे प्रस्न निर्माण होणारच नाही… आपण कारभार करत असताना राज्य उत्तम पद्धतीनं पुढे जावं, हीच शिकवणार पवार साहेबांची आहे…

  • 24 Apr 2022 10:44 AM (IST)

    करायचं तर तुम्ही तुमच्या घरासमोर काही करायचं ते करा ना बाबा – अजित पवार

    कुणावरच हल्ला नाही झाला पाहिजे.. प्रत्येकानं शांततेनं केलं पाहिजे.. आपण पण कुणालाही उचकावण्याचा प्रयत्न नाही ना केलेला पाहिजे ना..
    प्रश्न नाही पटला नाही मी त्यावर नो कॉमेन्ट म्हणून गप्प बसलं पाहिजे.. दुसऱ्यावर राग काढण्याच काय कारण काय..

    कोण काय बोलतं यावर मला विचारु नका.. कायदा सुव्यवस्था गृहमंत्री मुख्यमंत्री अख्ख कॅबिनेट प्रयत्न करतंय.. तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी.. त्या संदर्भात करत असताना.. मातोश्रीच्या बद्दल शिवसैनिकांच्या भावना तीव्र असतातच.. त्यांचं दैवत म्हणून ते बघत असतात.

    तीच गोष्ट पवारसाहेबांच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या बाबतीत…सोनिंयाच्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांची. मोदी-शाहांच्या बाबातीच भाजपची आहे…

    पण नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत, असं काही कशाला करायचं..

    करायचं तर तुम्ही तुमच्या घरासमोर काही करायचं ते करा ना बाबा…

  • 24 Apr 2022 10:37 AM (IST)

    शद्रोन्ही असलेल्या आरोपीला जनता माफ करणार नाही – संजय राऊत

    देशद्रोन्ही असलेल्या आरोपीला जनता माफ करणार नाही

    कालची पोलिसांची भूमिका योग्य आहे

    तुम्ही त्यांच्याकडून धमकावून पैसे घेतले आहेत

    झेड प्लस सुक्युरिटी हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे

    आमच्य़ा विरोधात जो बोलेल त्याला झे प्लस सुरक्षा देण्यात आली आहे

    केंद्रीय तपास यंत्रणा कोणासाठी काम करीत आहे

    पण जर काही झालं दिल्लीत भेटी घ्यायच्या

    ही कोणत्या लोकशाहीची गोष्ट करीत आहेत

    या महाराष्ट्रातली कायदा सुववस्था

    मी समर्थन करतो, शिवसेना समर्थन करते

    हे बोगस प्रमाणपत्रावरून जरी निवडून आले आहेत

    चंद्रभागा नावाची आज्जी सुद्धा रस्त्यावर उतरली होती.

    धमकी देणार बघून घेईल

    त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, हातात दोन बाहुले असल्याने…

  • 24 Apr 2022 10:15 AM (IST)

    ड्रायव्हरने जीवावर खेळून बाहेर काढलं – किरीट सोमय्या

    शरद पवार असो अजित पवार वळसे पाटील असो, राऊत असो की ठाकरे सरकार असो… गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, घोटाळे करतात… राष्ट्रपती राजवट..

    किरीट सोमय्याची एफआयआर का घेतली नाही…बोगस तक्रार मुंबई पोलीसांनी का रजिस्टर केली…

    ड्रायव्हरने जीवावर खेळून बाहेर काढलं..या आठ कमांडोंची मारपीट झाली.. आणि हे म्हणतात सोमय्याच्या ड्रायव्हरला अटक करा..

    भाजप गेल्या १२ महिने उद्धट ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढतोय. भाजप आक्रमक आहे आणि आक्रमक राहणार.. एक कार्टून टाकलं सोशल मीडियावर टाकलं. तर वडाळ्याच्या तरुणाचं मुंडन त्याच्या कुटुंबापुढे केलं… ठाकरे सरकार उद्धट आहे.. नेवी ऑफिसरला त्याच्या घरात घुसून मारण्याचं पाप यांनी केली.. मनसुख हिरेनची सुपारी देऊन हत्या ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांनी केली.. ज्यांनी बेकायदेशीरपणे ठाकरेंनी नियुक्त केलं होतं…

  • 24 Apr 2022 10:11 AM (IST)

    मोदी आणि देव यांच्यामुळे मी जीवंत आहे – किरीट सोमय्या

    20-25 ऑपिसरसोबत मी चर्चा केली.. रवी आणि नवनीत राणा यांची भेट घेतली, त्यांनी मी कल्पना दिली की माझ्यावर हल्ला होण्याची भीती..

    सीआयएसएपच्या कमांडरने सांगितलंय की सर आप व्यवस्था करीए… तेव्हा पाच अधिकारी खाली गेले… कुणाशी बोलले माहिती नाही.. मला सांगितलं सगळं क्लिअर केलंय… तुम्ही जाऊ शकता.. मी खाली गेलो..दरवाजा उघडला बसलो.. बाहेर गेलो आणि फुटपाथवरुन सगळेच माझ्यावर दाखवले.. मोदी आणि देव यांच्यामुळे मी जिवंत..

  • 24 Apr 2022 10:10 AM (IST)

    किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद

    चार इंच वर दगड लागला असता तर मी आज आंधळा झालो असतो…

  • 24 Apr 2022 10:03 AM (IST)

    पण गेट उघडताच शिवसैनिक तुटून पडले, याला संजय पांडेच जबाबदार आहे – किरीट सोमय्या

    मी पोलिसांनी आधीच कळवलेलं की मी येणार आहे पोलीस स्टेशनवर. त्याआधी शिवसैनिकांनी तयारी केली होती. साठ सत्तर पोलीस जमले होते. येताना मला शिविगाळ आणि गाडीत जातानाचा प्रयत्न झाला.. पोलिसांना मी कल्पना दिली होती, हे हल्ला करतील माझ्यावर.. पोलिस म्हणाले आम्ही आहोत.. त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली..

    मुख्यमंत्री कार्यालय, पोलीस, या सगळ्या यंत्रणांचे एकमेकांना फोन.. हे इतकं मॅन्युप्युलेशन एकटे उद्धव ठाकरेंच करु शकतात..

    एफआयआरमध्ये् लिहिलंय की शिवसैनिक ३ किमी दूर आहे..

    माझ्या गाडीवर एकच दगड लांबून आला, हे स्टेटमेन्ट माझ्या नावानं संजय पांडेनं लिहिलंय..

    मग जेव्हा माझी सही घ्यायला आले, तेव्हा म्हटल नाही करणार सही..मला धमकी दिली की तुम्ही सही नाही केली तरी अशाचप्रकारची एफआयआर दाखल होणार…

  • 24 Apr 2022 09:46 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मधील कांडली गावात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

    अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मधील कांडली गावात सिलेंडरच्या गोडाऊनला भीषण आग….

    गोडाऊनला आग लागल्याने आतापर्यंत १० ते ११ सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती…

    गावालगतच गॅस एजन्सीची गोडाऊन असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

    अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

  • 24 Apr 2022 09:18 AM (IST)

    रावसाहेब दानवे लाईव्ह

    महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे – दानवे

    महाराष्ट्रात पोलिसांच्या विश्वासाहार्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले – दानवे

    किरीट सोमय्या यांच्या चालकावर गुन्हा दाखल, मात्र शिवसैनिकावर गुन्हा नाही

    दानवेंची राज्य सरकारवर टीका

  • 24 Apr 2022 08:42 AM (IST)

    पुणे : रुपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा

    रुपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना अखेर दिलासा

    ठेव विमा महामंडळाकडून रुपी बॅंकेच्या पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांच्या बॅंक खात्यात 687 कोटी रुपये जमा

    बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पाच लाखांवरील ठेवीदारांचे भवितव्य अधांतरीच

  • 24 Apr 2022 08:00 AM (IST)

    दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हनुमान चालीसा च्या नावाने दंगा करण्यात आला

    – दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हनुमान चालीसा च्या नावाने दंगा करण्यात आला
    – एप्रो क्रिएट ॲक्शन म्हणून पोलिसांनी अटक केली
    – काल रात्री जी घटना घडली त्या संदर्भात देखील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे
    – पोलीस कारवाई करतील
    – कालची घटना दुर्दैवी मात्र सर्वांनी समजूतदार पणा दाखवावा सहकार्य करा
    – पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही त्यांना त्यांचं काम माहिती आहेत
    – राष्ट्रपती राजवटीची मागणी कोणी केली अस काही दिसत नाही
    – अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे
    – दगडफेक झाली हे खर आहे मात्र कोणाकडून झाली कोणी केली याचा तपास सुरू आहे यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे
    – दगडफेक संदर्भात पोलिस योग्य ती कारवाई करतील
    – मुख्यमंत्री संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यावर पोलिस चौकशी करून कारवाई करतील

  • 24 Apr 2022 07:49 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर असून काश्मीर मध्ये तब्बल 20 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे यामध्ये बनिहाल ते काझीगुंड या बोगद्याच उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे…. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून संध्याकाळी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान मुंबईत दाखल होणार आहेत

  • 24 Apr 2022 07:48 AM (IST)

    संजय राऊत व सेना पदाधिकारी यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

    संजय राऊत व सेना पदाधिकारी यांचेवर त्वरित गुन्हा दाखल करा अशी तक्रार मनसे कडून हुडकेश्वर पोलिसात करण्यात आली

    मनसे तर्फ शिवसेना नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत। यांचेवर तसेच सभा आयोजकांवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी करण्यात आली मागणी

    यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी विस्तृत चर्चा करून तक्रार दाखल केली,

    21 एप्रिल रोजी नागपुरातील बेसा पॉवर हाऊस चौक येथे राऊत यांच्या सभेत शिवसेने तर्फे तलवार भेट दिली असता ती त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उंच करून दाखविली होती

  • 24 Apr 2022 07:47 AM (IST)

    खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाचा मानाचा द बेने मेरीटो हा पुरस्कार जाहीर

    राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाचा मानाचा द बेने मेरीटो हा पुरस्कार जाहीर झाला आहे कोल्हापुर मधल्या पोलंड वसाहतीच्या नूतनीकरण सह इंडो – पोलीश संबंध दृढ केल्याबद्दल संभाजीराजे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पोलंड प्रजासत्ताकचे परराष्ट्र व्यवहार मंत्री झिबगनिव राऊ यांच्या हस्ते येत्या मंगळवारी नवी दिल्लीत पोलंड दूतावासात हा पुरस्कार संभाजीराजे छत्रपती यांना दिला जाणार आहे..

  • 24 Apr 2022 07:46 AM (IST)

    राणा दाम्पत्य सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये

    मध्यरात्री राणा दांपत्याला सांताक्रूझ पोलीस स्टेशन मध्ये हलवलं

    सध्या राणा दाम्पत्य सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये

    उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे खार मधून सांताक्रुझला नेल्याचा राणा दाम्पत्याचा आरोप

  • 24 Apr 2022 06:42 AM (IST)

    राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित

    राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित

    या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार

    यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या आॅनलाइन बदली आदेश मिळू शकणार

    या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर

  • 24 Apr 2022 06:41 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

    नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

    – नाशिक जिल्हा परिषद सिओ लीना बनसोड यांची कारवाई

    – कामात हलगर्जीपणा दाखविल्याने निलंबनाची कारवाई

    – सीईओंच्या कारवाईने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

  • 24 Apr 2022 06:40 AM (IST)

    सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाला जोरदार सुरवात

    सांगली शहर परिसरात वादळ वाऱ्या सह मुसळधार पावसाला जोरदार सुरवात

    विजेचा प्रचंड कडकडाट आणि जोरदार वादळ वाऱ्यासह मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

    शहर परिसरात उकड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही

    मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे

  • 24 Apr 2022 06:39 AM (IST)

    किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी, भाजप कार्यकर्ते आक्रमक

    किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी, भाजप कार्यकर्ते आक्रमक

    बांद्रा पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत

    राष्ट्रपती राजवट लागू करा अशा घोषणा