गेल्या दोन दिवसांपासून हनुमान चालीसेवरून चांगलाच वाद पेटला आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. नवनीत राणा त्यांचे पती रवि राणा आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. दरम्यान आज नवनीत राणा यांची तब्येत खालावली असून, त्यांचा रक्तदाब वाढल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर सध्या भायखळा कारागृहाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशात पुन्हा एकदा कोरुना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिल्ली हरियाणा तामिळनाडू या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने संभाव्य धोक्याची खबरदारी घेत, राज्यात पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मास्कची सक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी,प्रवासा दरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी,प्रत्येकाने सामाजिक अंतर राखावे असे आवाहनही करण्यात आले आहे. या संदर्भाचा आदेश राज्याचे मुख्य सचिव पी.रवी कुमार यांनी आज सोमवारी सायंकाळी जारी केला आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशाचे नियमभंग करणाऱ्या विरोधात कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
त्रंबकेश्वर मंदीरात अमित ठाकरेंच्या हस्ते अभिषेक आणि महाआरती
एकीकडे हनुमान चालीसा वरून वातावरण तापलेल असताना अमित ठाकरे त्रंबकेश्वर चरणी..
अमित ठाकरे यांचा खाजगी दौरा असल्याची माहिती
मुख्यमंत्री अनेक झाले
लोकप्रियता ही माझी नाही तुमची
तुमच्या चांगल्या कामामुळे मी लोकप्रिय मुख्यमंत्री
या कार्डाने सर्व तिकीट मिळणार पण निवडणुकीचे कार्ड मिळणार नाही
हे कार्ड असल म्हणून कोणत्या पक्षात जाता येणार नाही
हाच फरक आमच्या आणि राष्ट्रपती राजवटीत
मुंबईकरांसाठी आमचे काम मग
हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का सोडलं बोलायला
बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात
कोर्टाने मंदिर बांधायला दिले आहे
घंटाधारी लोकांनी गदाधारी लोकांना शिकवू नका
तुमची संस्कृती असेल तर या घरात पण नीट या दादागिरी करून याल तर ती मोडून काढू
मास्क काढू नका, सक्ती नसली तरी मुक्ती झाली नाही
लवकरच एक सभा
मुंबईला 4500 कोटी दिले आणखी 1 हजार कोटी देणार आहोत
5 वी पर्यंत 200
10 वी पर्यंत 250
पुढे 350 रुपयांचा पास देणार
खासगी प्रमाणे पालिकेच्या शाळेचा दर्जा
लोकांना खासगी गाडी पेक्षा बेस्ट चांगली वाटेल
ऍसिडिटी झालीय त्यांना दाखवा
किती ठिकाणी असा दर्जा
बिन कामाच्या भोंग्यांना काडीची किंमत देत नाही
विरोधकांचा समाचार मला घ्यावाच लागणार आहे
आम्ही काम केल्यानंतर सांगतो
पुढच्या चार वर्षात मुंबईला हजार कोटी देत आहे
अजित पवार अर्थमंत्र्यांनीही मान होकारार्थी हलवली
आम्ही खोटंनाटं काही करत नाही
बीएसटी एक नंबर आहे
घंटाधारी नको आमचं गदाधारी हिंदूत्व-सीएम
लोकप्रियता ही एकट्याची नाही
सर्व अधिकाऱ्यांचं माझ्यासोबत राहणाऱ्या लोकांचं कौतुक
आपलं जगभर कौतुक झालं, अजून काय हवं
लोकांचे आशीर्वाद मिळणार नसतील तर पाट्या टाकून काय उपयोग
देशातली पहिली नगरी म्हणून मुंबईकरांनी करून दाखवलं
सुट्टे पैसे नसले की पंचायत होते
सध्याची तरुण पिढी नवीन करत आहे
दीडशे वर्षांपूर्वी मुंबई घोडागाडी, ट्राम, बेस्ट मुबई कराच्या सेवेत आहे
बेस्ट उपक्रमाने एकाच कार्डावर बेस्ट, लोकल, मेट्रो प्रवासाप्रमाणेच देशभरातील परिवहन सेवेसाठी उपयुक्त ठरणारी सामायिक कार्डसामायिक कार्ड म्हणजेच ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांची वेळेत बचत होणार आहे. हे सामायिक कार्ड प्रारंभी १०० रुपयांत बेस्टच्या मुंबईतील सर्व आगारांत मिळणार आहे
या कार्ड चा फायदा टोल, गॅस, इल्क्ट्रिक बिल भरता येणार आहे
आनंद महिंद्राने बेस्ट च्या बसस्टॉप च कौतुक केले आहे
काही लोक वातावरण खराब करत आहे
मातोश्रीच्या बाहेर चाळीसा म्हणयाचा अट्टाहास केला होता
तुमचं घर नाही का, कायदा सुव्यवस्था का बिघडवता
मुंबई आर्थिक राजधानी
मराठी पण टिकल पाहिजे बाहेरच्यांनी यावे राहावे खावे पण वातावरण बिघडवू नये
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये
मुंबई आपली सर्वांची आणि सुरक्षित आहे
महानगरपालिका कार्य अहवाल प्रकाशन सोहळा
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार कार्य अहवालाचे प्रकाशन
जळगावात भाजपा कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले हनुमान चालीसाचे पठण
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसा म्हटल्यास देशद्रोह ठरणार असेल तर आम्ही हनुमान चालीसा म्हणू अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली होती
औरंगाबाद शहरात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची अजूनही परवानगी मिळालेली नाही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रिका छापल्या असून राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रिकेचा अनावरण करण्यात आले तर औरंगाबाद शहरामध्ये या पत्रकांचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे
तासगाव मधील बेदाणा शेडमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळवारा आणि पाऊसामुळे बेदाणा सौदे थांबवावे लागले
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी याची मोठी तारांबळ उडाली
कोल्हापूरच्या ऐतिहासिक खासबाग मैदानात पुन्हा एकदा घुमणार पैलवानांचा शड्डू
खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भारतीय कुस्ती महासंघाचें अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या मध्ये झाली बैठक
नोव्हेंबर महिन्यात पुरुष आणि महिलांसाठी ही मातीतल्या कुस्ती स्पर्धा घेण्याचं नियोजन
राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणार मातीतली राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा
पाचल गावात अवकाळी पावसाच्या सरी
जिल्ह्यात अनेक भागात दुपारनंतर तापमानात वाढ
आठवडाभर अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
बीड तालुक्यातील जरूड येथील दुर्दवी घटना
रथ ओढताना झाली दुर्घटना
मुलाचे ओळख अद्याप पटली नाही
जुवेली परिसरातल्या घटनेनं खळबळ
पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात
आगीत 50 च्या वर मोटारसायकल जळून खाक
वारंवार बजावूनही लोकप्रतिनिधींकडून वक्तव्यांवर आळा नाही
त्यांचा हेतू पुन्हा अटक न व्हावी अशी होती
न्यायालयाने त्यांना अटक करण्याची गरज भासल्यास त्यांना आधी नोटीस देण्याचे आदेश
जबाबदार अधिकारी त्यांना अटक करण्यास गेले
त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही
पोलिसांशी निंदाजनक व्यवहार केला
अटकेच्या प्रक्रियेत त्यांनी अडथळे आणले
जबरदस्ती करून त्यांना अटक करावी लागली
म्हणून हा तिसरा गुन्हा महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे
न्यायलयासमोर आज सर्व बांजू मांंडण्यात आली आहे
न्यायालयाचे लक्ष भेटवण्याचा प्रयत्न यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला
सदावर्तेंना आज ऑर्थर रोड जेलमध्ये ठेवलं जाणार
पुणे पोलीस ताबा मागण्याची शक्यता
– सोलापूर कृषी उत्पन्न बाझार समितीच्या परिसरात झाला भीषण अपघात
– अपघातात ४ जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी
– सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर घडली घटना
– अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांना रुग्णालयात दाखल केले
– शहरानजीक भीषण अपघात झाल्याने चिंतेची बाब
– विरोधी पक्ष त्यांचं काम करत आहे
– आरोप प्रत्यरोपच काम करत आहेत
– मुख्यमंत्र्यांनी आज्जीच्या कुटुंबियांना जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण करतील
ऑन किरीट सोमैय्या
– ते केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले आहेत, त्यांच्या शिष्ठामंडळाने केंद्रातल्या सचिवांना निवेदन दिलं आहे,
– मुंबई पोलिस आयुक्त अधिक चौकशी करत आहेत
ऑन मोहित कंबोज
– हे विषय 2-3 आठड्यानपूर्वी झाले आहेत
ऑन ऑनलाईन परिक्षा
– विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आदेश दिले आहेत की परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या
– राज्यसरकारला कुलगुरिंनी आदेश दिले आहेत आणि आम्ही ठाम आहोत
– जुन महिन्यात परीक्षा होतील
ऑन nss
– 5 वर्षांनंतर हा कौतुक सोहळा होत आहे
– कोरोना काळात हे शक्य झालं नाही
– मात्र आता आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत
ऑन सर्वपक्षीय बैठक
– त्याबाबतीत गृहमंत्री बोलले आहेत मी बोलणं जास्त उचित राहणार नाही
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत झाली कैद
मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी वाया
जवळपास अर्धा पाण्याची नासाडी झाल्यानंतर पाणीपुरवठा करण्यात आला बंद
सर्वपक्षीय बैठक संपली
भोंग्यावर बंदी नाहीच
गृहमंत्री वळसे पाटलांची सर्वपक्षीय बैठकीनंतर घोषणा
आवाजाची मर्यादा मात्र पाळावी लागणार
गृहमंत्री वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
पोलीस संरक्षण असतानाही किरीट सोमय्यांवर हल्ला – फडणवीस
सर्वपक्षीय बैठकीवर भाजपाचा बहिष्कार
बैठकीत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नाही- फडणवीस
सर्वपक्षीय बैठक ही टाईमपास – फडणवीस
हनुमान चालीसा पाकिस्ताना जाऊन म्हणायची का?
फडणवीसांची महाविका आघाडीवर सडकून टीका
देशातील अनेक राज्यात वीजेची कमतरता आहे – पवार
पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने कमतरता – पवार
धर्माबद्दल आपल्या भावनाचे प्रदर्शण करायला नको – पवार
ज्या प्रदर्शनाने सामाजीक सलोखा राहत नाही, अलिकडच्या काळात हे जास्त होत आहे – पवार
मतभेद असावेत पण मनभेद नको – पवार
किरीट सोमय्या गृहराज्यमंत्र्यांना भेटणार
नित्यानंद राय यांची भेट घेण्यासाठी सोमय्या नोर्थ ब्लॉककडे रवाना
केंद्रीय गृह सचिव यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना सोमय्या भेटणार
आज किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी गृहसचिवांना आपण आपल्यावरील हल्ल्याची माहिती दिली तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले असं सोमय्या यांनी सांगितले, दरम्यान सोमय्यांच्या या वक्तव्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. जर राज्यात परिस्थिती बिघडली असती तर सोमय्या दिल्लीला जाऊ शकले नसते असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
ॲड गुणरत्न सदावर्ते यांना आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार
सदावर्ते यांच्या पाच दिवसांची पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात नेलं जाणार
थोड्याच वेळात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून सदावर्तेंना न्यायालयात हजर केले जाणार
सदावर्तेंना पुन्हा जेल की बेल आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार
गृहसचिवांसोबत 20 ते 25 मिनिटे चर्चा – सोमय्या
गृहसचिवांकडून राज्यातील परिस्थितीबाबत चिंता
सोमय्यांनी घेतली गृहसचिवांची भेट
आपल्यावरील हल्लाबाबत गृहसचिंवाना माहिती दिली
राज्यात स्पेशल टीम पाठवण्याची समोय्या यांची मागणी
दुध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं – किशोरी पेंडणेकर
इथे लगेच रक्त दिसायला लागलं
पोलिसांनी त्याची चौकशी करावी
किरीट सोमय्या दिल्लीत गेले आहेत
महाराष्ट्राच्या हक्काचं सगळं घेऊन या
केंद्राकडून महाराष्ट्राला लागणारी सुबत्ता देखील घेऊन या
तुम्हाला भेटायचं होतं तुम्ही भेटायचं होतं…
एका माणसावरती दगड पडला असेल – जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्रातली जनता हुशार आहे
तुम्ही आगीत उडी घ्याल तर मग काय होईल
दिल्लीत गेले आहेत, जाऊ द्या
पोलिसांची शंका आहे
तुम्ही कशावरती राज्य बरकास्ती मागता
भाजपाच्या दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा
राज्यात घडलेल्या सर्व घटनांची घेतली माहिती
मागील चार दिवसात घडलेल्या घडामोडींची घेतली माहिती
गृहमंत्री अमित शाहा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा
राणा प्रकरण, किरीट सोमय्या , मोहित कंबोज हल्ला प्रकरणा्ची घेतली माहिती
महाविकास आघाडी सरकार विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याचे केंद्रीय भाजपचे आदेश
किरीट सोमय्या मारहाण प्रकरण
गृहखात्याकडून प्रकरणाची सत्यता पडताळन्यासाठी परिसरातील सीसीटिव्हीची तपासणी केली जाणार
किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरचं संबंधित हल्ल्यातून झाली की नाही याची पडताळणी करण्यात येणार
व्हिडीओ मध्ये दिसणारी जखम कृत्रिम तर याबाबात पोलीस खात्याला शंका?
पोलिसांच्या मदतीने हल्ला केला जातो, चौकशी झाली पाहिजे
सोमय्यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
माझ्या नावाने खोटी एफआयआर दाखल केली – सोमय्या
महाराष्ट्र भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीमध्ये
शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नेत्यांची 11 वाजता सह्याद्रीवर बैठक
अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली होणाऱ्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण नाही?
सर्व पक्षाच्या नेत्यांची नावे मात्र शिवसेनेच्या एकाही नेत्याचं नाव नाही
भोंग्यांसंदर्भात मार्गदर्शक सूचनाबाबत माहितीसाठी बैठकीचं आयोजन
मुंबईत भाजप विरूद्ध शिवसेना नवा संघर्ष पेटण्याची शक्यता
शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घराबाहेर भाजपकडून बॅनरबाजी
भाजपनं लावले यशवंत जाधवांच्या घोटाळ्याची पोलखोल करणारे बॅनर
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पुढे ढकललं- सूत्र
‘2 मे’ला समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन नाही- सूत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार होतं उद्घाटन
नागपुरात उष्णतेची लाट
42. 2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुढील दोन दिवसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता
नागपूरचा पारा 44 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 337 वा पालखी सोहळा जून महिन्यात पार पडणार आहे, पंढरपूरकडे पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. याकरिता पालखी सोहळा प्रमुखांची निवड करण्यात आलीये. संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे यांची निवड पालखी सोहळा प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.
नाशिकच्या शिवसैनिकांची राणा दाम्पत्याविरोधात पोलिसात तक्रार
राणा दाम्पत्याविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार
राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी
गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी
राज्यातील शिक्षकांच्या बदल्या होणार मोबाईल अॅपद्वारे
शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द
आगामी शैक्षणिक वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या अॅपद्वारे
शिक्षकांना आता घरबसल्या मिळणार ऑनलाईन बदलीचे आदेश