राज्यात कोळसाटंचाई असल्याने त्याचा परिणाम हा विद्युत निर्मितीवर होत असल्याचे पहायला मिळत आहे. वीज निर्मितीची मागणी वाढली, मात्र पुरवठा कमी असल्याने राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा भारनियमन सुरू झाले आहे. आता महाजनकोच्या वीज निर्मिती केंद्रात देखील कोळसाटंचाई निर्माण झाली आहे. कोराडी, भुसावळ, नाशिक वीज निर्मिती केंद्रात फक्त दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. तर चंद्रपूर केंद्रात सहा दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. कोळशाची आवक वाढवण्यात आली आहे, मात्र तरी देखील राज्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे पहायला मिळत आहे. कोळसा टंचाई असल्याने त्याचा मोठा फटका हा विज निर्मितीला बसत आहे.
चंद्रपुरात खासदार धानोरकरांच्या घरी घरफोडी , तीन आरोपी अटकेत,
चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, या बंगल्यात काहीही चीजवस्तू न सापडल्याने केली तोडफोड,
मुख्य दाराचे कुलूप तोडून आत शिरले चोरटे,
खासदार बंगल्यात नसल्याची केली होती रेकी, पोलीस तपासात आणखी 2 घरफोड्या आल्या उजेडात
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात चौघेजण बुडाले
चार जण पोहण्यासाठी गेले त्यापैकी दोघेजण सापडले , दोघेजण बेपत्ता
अलोरे शिरगाव पोलिसाकडून तपास सुरू
राज ठाकरेंचे हिंदूजननायक नावाचे बॅनर्स झळकले
मनसैनिकांकडून राज ठाकरेंना हिंदूजननायक पदवी
हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा आशयाचे झळकले बॅनर्स
पुण्यातून मोठ्या संख्येनं मनसैनिक औरंगाबादला जाणार
पुण्यात साने गुरुजी चौकात झळकले बॅनर्स
राज ठाकरे हिंदूजननायक असा मोठा आशय
गडचिरोली जिल्ह्यात अवैध रुपाने लाकूड तस्करी करताना तस्करासह ट्रॅक्टरही जप्त वन विभागाची कारवाई
आलापल्ली वन विभाग अंतर्गत पेरमिली जंगल क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली
वन विभागाने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे चार आरोपी सध्या फरार आहेत
मोठी लाकूड तस्करी हे वन तस्कर करित होते
जवळपास वीस लाख रुपयांचे लाकडासह 1 ट्रॅक्टर जप्त
पोलिसांना तुम्ही जो माज दाखवला तर पुढे अवघड आहे
अडसूळच खासदार चांगले होते असं म्हणण्याची वेळ आलीये
तुम्ही जो आरोप केला तो पहिल्याच दिवशी पोलीस कशाला करतील
तुम्ही दोन चार महिने आतमध्ये राहिला असतात तर गोष्ट वेगळी होती,
हा पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आयुक्तांंनी ट्टीट केलं नसतं परिस्थिती बाहेर आली नसती,
राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आणि भाजपला समर्थन करण्यासाठी कशाला खोटं बोलतायेत
खरी परिस्थिती मांडा ना खोटं कशाला बोलताय तुम्ही सामाजिक परिस्थिती मांडत नाहीत ही स्वार्थासाठी लढाई चालली आहे
देवेंद्र फडणवीसांचही आश्चर्य वाटतं की त्यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली
कोणी मुलभूत अधिकार कशाला काढून घेतील ?
नवनवीत राणांनी जे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलंय त्यावर सही करण्यासाठी पेन कोणी पोलिसांनीच दिला असेल ना ?
अस सवाल करत पोलिसांची बदनामी खपवून घेणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय ..
आज संध्याकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत बदलापूर पूर्वेत वीजपुरवठा खंडित राहणार
सबस्टेशनची नादुरुस्त केबल दुरुस्त झाली असून ही केबल लाईनला जोडण्यासाठी घेणार ब्रेक डाऊन
महावितरण कडून देण्यात आली माहिती
20 ते 25 वाळू तस्करांचा एसडीओंच्या पथकावर वाळू तस्कररांचा हल्ला.
जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास घडली असून यात एसडीओ जखमी
एसडीओ जखमी, वाहनाच्या काचा फोडल्या…. वाचवायला गेलेला पोलिस ही जखमी.
मुजोर वाळू माफियांची दादागिरी.
पवनी पोलिसात गुन्हा दाखल….
मोठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक देणार 50 हजार रुपयांच घावटी कर्ज
कर्ज देण्यास बँकेला दिली राज्य सरकारने परवानगी
कैद्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी वकिलीची फी भरण्यासाठी घेता येणार कर्ज
तर कैद्यांच्या श्रमातून मिळालेल्या वेतनातून बँक परतफेड करणार
महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांची माहिती.
राज्यातील पहिलाचा अभिनव उपक्रम 223 कैद्यांनी केले कर्जासाठी अर्ज
विक्रमी 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान
उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवनावर परिणाम
सिंधुदुर्ग- कणकवली खारेपाटण येथे पिंपळाची फांदी अंगावर पडून एकाचा मृत्यू.
अनंत शेलार(वय 55) हे पिंपळाच्या झाडाखालून पायी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर पिंपळाची एक मोठी फांदी मोडून पडली.
शेलार यांचा जागीच मृत्यू.
लगतच्या छोट्या घराचे ही फांदीमुळे नुकसान.
औरंगाबाद पोलिसांकडून सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची पाहणी सुरू
डीसीपी आणि एसीपी कडून मैदानाची पाहणी सुरू
दोन्ही पक्षाच्या वकिलाकडून युक्ती वाद न्यायाधीश यांनी ऐकला
आणि याबाबत अंतिम निर्णयायासाठी उद्याची तारीख दिली गेली
उद्या काय निकाल न्यायाधीश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सभेच्या परवानगीसाठी पोलिसांना भेटणार
पोलिसांना आम्ही सहकार्य करू
आम्हाला खात्री आहे सभेला परवानगी मिळणार
बाळासाहेबांचा आदर्श राज ठाकरेंच्या समोर आहे
त्यांच्या खांद्यावर खेळून मोठे झाले
बाळासाहेब बाळासाहेब होते राज राज आहेत
राज ठाकरेंनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
परत परत तेच कॅसेट वाढवूज फायदा नाही
पवारांना राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे
त्यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा माणूस नाही
जनता हाच आमचा मौका आहे, आम्हाला दुसऱ्या मौक्यााची गरज नाही
नास्किकचे आस्तिक झाले, आंदोलन करायला लागली, आणि आता हनुमान चालीसावरून गोंधळ सुरू झालं
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात शिवशाही बसचा ब्रेक फेल होऊन अपघात
अपघातात चार गाड्यांचा चक्काचूर झाल्याची प्राथमिक माहित
ब्रेक फेल झाल्यानंतर बस रिव्हर्स मध्ये भरधाव वेगाने आली मागे
नागरिकांची मोठी झाली पळापळ
अचानक ब्रेक फेल झाल्याने सीबीएस परिसरात वाहतुकीची कोंडी
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरु
न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्या न्यायालयात होणार होती सुनवाणी
मात्र गुप्ता यांच्या ऐवजी एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात सुनवणी सुरू
गणेश नाईक यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळले आहे
गणेश नाईक यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू
एवढे वर्षे प्रेम संबंध असताना आता असे आरोप करणे म्हणजे राजकीय दबाव व फायद्यासाठी केले जात आहे
376 कलम हे लावले आहे ते योग्य नाही…
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकावर गुन्हा दाखल
20 एप्रिल रोजी पुण्यातील सॉलीसबरी पार्कात घडली होती घटना
घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर , व्यक्तीच्या डोक्यावरून गेली चारचाकी
मार्केट पोलीस ठाण्यात अनूप मेहतावर गुन्हा दाखल
अनोळखी व्यक्ती फुटपाथच्या बाजूला झोपली होती गाडी पुढे घेताना अंदाज न आल्यानं अंगावरून गेली गाडी
या प्रकरणात व्यावसायिकाला अटक करण्यात आलीये
अंगावर काटा आणणारी ही घटना आहे…
शंकरराव गडाख यांना धमकावणारांस अटक करा मागणी…
हजारो नागरीक उतरले रस्त्यावर….
नेवासे पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा…
मंत्री शंकरराव गडाख यांना जिवे मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल…
आरोपींचा शोध घेऊन कारवाई करा…
मागणीसाठी आज सकाळपासून नेवासे तालुका बंद…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तिप्पट फी वाढ झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा
विद्यापीठ प्रशासनाला फी वाढीबाबत विचारणार जाब
विद्यापीठ प्रशासनाला निवेदने देवूनही तोडगा नाही
ऍड गुणरत्न सदावर्ते यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा यासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल
याचिका स्वीकारून हाय कोर्टाने सदावर्ते व राज्य सरकारला नोटीस जारी केली
एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करून पैशाचा अपहार केल्याप्रकरणी अकोला जिल्ह्याच्या आकोट पोलिस स्टेशन मध्ये सदावर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता
दाखल गुन्ह्यात सदावर्ते यांना आकोट सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला होता
हा अटकपूर्व जमीन रद्द करण्यात यावा यासाठी अकोला येथील विजय मालोकर यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे
– कोव्हिड रिलीफ निधीच्या लाभार्थ्यांमध्ये तफावत आढळल्याने केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रात तपासणी
– ऑफलाईन डेटामध्ये चुकीची मंजुरी झाली का याची पडताळणी केंद्रीय पथकाकडून सुरू
– सोलापूरसह राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये केंद्राचे तपासणी पथक आल्याची प्राथमिक माहिती
– सोलापुरात दोन अधिकारी कोव्हिड रिलीफ फंडाच्या तपासणीसाठी दाखल
– कोव्हिडमुळे मृत्यू पावलेल्या नातेवाईकांकडून एकूण 11 हजार 904 अर्ज प्राप्त
– मात्र केंद्राच्या ICMR च्या नोंदणीनुसार 5730 लोकांचे मृत्यू झाल्याची माहिती
– कोव्हिड निधीसाठी अतिरिक्त 6 हजार 174 मृतांच्या नातेवाईकांचे अर्ज आल्याने तपासणी सुरू
– राज्यात कोव्हिड रिलीफ फंडात घोळ झाल्याच्या संशयावरून राज्यातील 10 जिल्ह्यात तपासणी पथक दाखल
– राज्यभरात एकूण 1 लाखापेक्षा अधिक बोगस अर्ज दाखल झाल्याचा केंद्र सरकारला संशय
संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
अज्ञात आरोपीने जाळल्या दुचाकी
अज्ञात आरोपीचा पोलीस घेत आहे शोध
25 तारखेच्या रात्री घडली घटना
राजेश टोपे यांची पत्रकार परिषद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद
नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पुन्हा कोरोना चाचण्या वाढवणार – टोपे
देशभरातील मोठ्या कायद्यांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता
केंद्रीय गृहमंत्रालयाने सूचना मागवल्या
आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यांमध्ये बदल होणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अभ्यास करण्याच्या सूचना
खासदार नवनीत राणा यांची दिल्ली पोलिसांकडे तक्रार
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात केली तक्रार
दिल्ली पोलीस आयुक्तांना दिलं पत्र
संजय राऊत यांनी बदनामी केल्याचा आरोप
मनसे भाजप युती बाबत सध्या कुठलीही चर्चा नाही
भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही
भाजप -मनसे युतीबाबत गिरीष महाजन यांची सावध प्रतिक्रिया
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सुनील बोरसे असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कैद्याचे नाव
कारागृह कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले कैद्याचे प्राण
नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून राज्य सरकारवर पाटलांचा निशाणा
एवढी सुरक्षा व्यवस्था असताना हल्ला कसा झाला?
चंद्रकांत पाटलांचा सवाल
किरीट सोमय्या प्रकरणाची गभीर दखल केंद्रीय गृहखात्याकडून घेण्यात आलीये – पाटील
ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राची बदनामी – पाटील
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात
दोन कंटेनरची समोरासमोर धडक
परशुराम घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प
मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा
वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
राज्यात आज आणीबाणीची स्थिती, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत – सदावर्ते
सरकारनं आपल्या वागण्याचा थोडा विचार करावा – सदावर्ते
कष्टकरी समजाला सरकारने समजून घ्यावे – सदावर्ते
‘भाजप दाऊद गँगच्या लोकांना का वाचवत आहे’
‘युसूफ लकडावालाचे बेकायदेशीर पैसे अजूनही राणांच्या खात्यात’
संजय राऊतांचा नवनीत राणा, रवि राणांवर निशाणा
मुंबईतील वातावरण अशांत करण्यामागे दाऊद गॅँगचा हात – राऊत
नवनीत राणांना ईडी चहा कधी पाजणार
संजय राऊतांचा सवाल
किराणा दुकानात हवालाचे रॅकेट
औरंगाबाद गुन्हे शाखेकडून 1 कोटी 9 लाखांची रक्कम जप्त
चेलीपुरा परिसरातील किराणा दुकानात सुरू होते हवाला रॅकेट
नोटा मोजण्याच्या मशीनमुळे पोलिसांना आला संशय
गुन्हे शाखेने धाड टाकत एक कोटी रुपयांसह व्यापारी आणि मशीन घेतले ताब्यात
आशिष सावजी असं हवाला रॅकेट चालवणाऱ्या आरोपीचे नाव
गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर ठाणे न्यायालयात सुनावणी
गणेश नाईक यांच्याविरोधात धमकावणे आणि बलात्काराचा आरोप
न्यायालयाकडून दिलासा मिळणार की अडचणीत वाढ होणार?
पुढील 3 महिन्यात राज्यातील सर्व चेकपोस्ट होणार बंद?
राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात ‘अभ्यास गटाची’ स्थापना
परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृहविभागाचा निर्णय
3 महिन्यात अहवाल शासनाला देण्याचे परिवहन विभागाला आदेश
आदेशाची प्रत TV9 च्या हाती
कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर
विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संप
12 मेपर्यंत मागण्या मान्य न केल्यास 13 मेपासून संप
कर्मचाऱ्यांचा इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून मागण्यांच्या संदर्भात विचार सुरू