मुंबई : आज शनिवार 9 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. ईडी कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी लावलेल्या योद्धा बॅनरवर गधा असा उल्लेख, संजय राऊत यांच्या चेहर्यावर लावली चप्पल, बाजूला कुत्र्याचा फोटो आणि पक्षाची लाज काढणारा नेता, शिवसेनेचं खाऊन शरद पवारांचे गोडवे गाणारा नेता, झाकणझुल्या अशा खालच्या भाषेचा वापर बॅनरवरती करण्यात आला आहे.
उस्मानाबाद – तुळजाभवानी मंदिरातील 2 पूजाऱ्यावर 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद
तुळजाभवानी मंदिरात पूजाऱ्यांनी केली होती सुरक्षा रक्षकाला मारहाण , सुरक्षा रक्षक गंभीर जखमी
पुजारी कृष्णा जितकर व संदीप टोले यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद
मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून केली मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
2 पूजाऱ्यांनी केली सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी केली गंभीर मारहाण
सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत , उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंद
विनोद चौगुले यांच्यानंतर पृथ्वीराज पाटील याने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश देण्यासाठी आलो होतो
मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्ही 9 मराठीला माहिती
शरद पवारांनी साताऱ्याला मैदान दिलं यासाठी त्यांचे आभार
पुढच्या काळात राज्य सरकार अशा स्पर्धा भरवणार
– कायदा हातात घेतल्यावर कोणाचीही सुटका होणार नाही
– सदावर्तेंनी आपलं अपयश लपवण्यासाठी त्यांनी कालचे कृत्य केले
– जो पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदा कारवाई करले
चौकशी सुरू आहे, यातून काय बाहेर येतंय हे चौकशीनंतर कळेल
एसटी कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन
कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये
सदावर्तेंच्या आरोपता काहीही तथ्य नाही
आरोप करण्याची त्यांना सवय आहे
मी त्यांचे आरोप फेटाळून लावतो
पोलिसांनी काय करायचं हे मी बोलणं योग्य होणार नाही
ते त्यांचं काम करणार
पवारांच्या घराबाहेरील आंदोलन भोवलं
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीत पोलीस सुरक्षेत वाढ
आधी 150 ते 200 पोलिसांचा होता बंदोबस्त आता 300 पोलीस राहणार सुरक्षेसाठी तैनात
शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट
गुणरत्न सदावर्तेंचा फैसला काही वेळातच
सदावर्तेबरोबर अनेक एसटी कर्मचारी अटकेत
संजय राऊत काय माणूस आहे याची कुंडली आमच्याकडे आहे
एकीकडे शरद पवारांच्या घरावर हल्ला होत असताना दूसरीकडे मुंबईचे आयुक्त आणि संजय राऊत यांची बैठक सुरू होती
त्याचा आणि याचा काय संबंध तर नाही ना ? नितेश राणेंचा सवाल
हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात आहे का.? नितेश राणेंची अप्रत्यक्ष टीका
– नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती
– शरद पवार उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर
– उद्या सकाळी 10 वाजता शरद पवार यांचं नागपूर विमानतळावर आगमन
– नागपूर विमानतळावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचा सत्कार करणार
– शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी होण्याची शक्यता
– उद्या नागपूर विमानतळावर असणार अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था
– नागपूर – अमरावती प्रवासादरम्यानंही असणार चोख सुरक्षा व्यवस्था
कायदा हातात घेऊ नका
पाच महिने एसटी बंद ठेवली
केलेल्या कारवाई मागे घेण्यात आल्या
गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे.
१०७ आंदोलनकर्ते कोर्टात दाखल होणार
पहिल्या दिवसापासून दिशाभूल करीत असल्याचा आरोप
अपयश लपवण्यासाठी हे सगळ षडयंत्र आहे
पोलिस गुणरत्न सदावर्तेंना घेऊन कोर्टात दाखल
माझी हत्या होऊ शकते
हे लोक लोकशाहीचा गळा घोटत आहेत
एक मात्र नक्की, काल जो प्रकार घडला ते आंदोलन नव्हतं, तो हल्ला होता. हल्ला करण्याच्या उद्देशाने कुणाच्यातरी पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे केलं, त्यांनी कामगार चळवळीचं नाव बदनाम केलं, इंटेलिजन्स फेल्युअर हा घोळ आहे, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, ते सरकार पाहिल, मात्र कामगारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी प्रमुख नेत्यावर हल्ला करुन गुन्हा केला. पवार साहेब आणि मी एकदम संयमी नेते आहेत.
गुणरत्न सदावर्ते हा नेता वा वकील नाही, तो विरोधी पक्षाने पोसलेला गुंडच आहे. सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं,
जंग जंग पछाडताहेत, त्यातून त्यांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्न पडताहेत, आणा ना आणून दाखवा.
विक्रांत लिलाव-
माझ्या माहितीप्रमाणे ते पोलीस स्टेशनला गेलेले नाहीत, ते भूमिगत आहेत, फरार आहेत, असं मला सांगण्यात आलंय, ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात पोहचलेत, कर नाही त्याला डर कशाला, भाजपाच मंत्र आहे ना तो, आमच्याबाबतीत वापरता. तुम्ही लोकांना प्रश्न विचारता, उत्तरं मागता, जबाव दो जबाव दो, आता तुम्हीपण जवाब द्या, मला जी माहिती होती, ती पोलिसांसमोर ठेवली, आता पोलीस काम करतात. केंद्रीय तपास यंत्रणांचे एजंट म्हणून काही लोक काम करतात, आमच्याकडे तशी पद्धत नाही.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे
मीडियाला माहित होतं, मग पोलिस काय करत होत
पोलिसांची चौकशी व्हायला हवी
अतिशय भयावह असं चित्र होतं.
त्याची चौकशी व्हायला हवी
हल्ल्याचा निशेष देखील केला आहे.
पोलीसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्हं,
पवार साहेबांचा एसटीशी काय संबंध नाही
कोणीतरी यांच्या पाठीमागे आहे
शरद पवार देशाचे नेते आहेत
त्यांच्या घरावर हल्ला करण योग्य नाही
तुम्ही सुध्दा आरश्याचा घरात राहता हे लक्षात ठेवा
किरीट सोमय्या अंडर ग्राऊंड झाले आहेत
लोकांना प्रश्न विचारतात, परंतु त्यांच्यावर वेळ आल्यावर का पळत आहेत
हे कायद्याचं राज्य आहे
जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते
रश्मी शुक्लाचा इशारानुसार फोन टेपिंग केलं आहे
मी कोणाचं नाव घेणार नाही
पोलिसांनी काय समज पाठवलं मला माहित नाही
पोलिसांनी जवाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहेत
कर नाही त्याला डर कशाला
किरीट सोमय्यांनी ५८ कोटी रूपये जमा केले आहेत
पोलिस तुम्हाला विचारतील पैशाचे प्रश्न
देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचा देखील हिसाब द्यावा लागतो
शरद पवारांचा आजचा सातारा दौरा रद्द
सुरक्षेच्या कारणास्तव आजचा दौरा रद्द
नियोजित दौरा रद्द
काल शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शरद पवार यांचा आजचा दौरा झाला रद्द….
महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आज होणाऱ्या फायनल साठी शरद पवार राहणार होते हजर…
काही कारणास्तव दौरा रद्द झाल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती
निकिता चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडी कडे सोपवावा का ?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार ला मागितलं उत्तर
जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश
प्रताप नगर मधील रहिवाशी निकिता चौधरी चा झाला होता संशयास्पद मृत्यू
15 मार्च ला ती कार्यालयात गेली त्यानंतर घरी पोहचली नाही
मात्र दुसऱ्या दिवशी तिचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला होता
– काल किरीट हे दिलेलीत होते पण संध्याकाळनंतर कुणाचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये, त्यांचे पुत्रही गेल्या १ आठवड्यापासून नाॅट रिचेबल झालेयत…
– संजय राऊतांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स देण्यात आले आहे…
– आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले, राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे.
तर किरीट सोमय्या म्हणतात, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते हा त्यांचा सवाल आहे,
– त्यामुळे किरीट आज ट्रांबे पोलीस ठाण्यात हजर होणार का हा मुळ प्रश्न…
ती लोक कुठं तरी कमी पडली आहे
मीडिया बरोबर माहिती घेत आहे,
हे जर मीडियाने शोधल आणि संबंधित यंत्रणेला का माहीत झालं नाही
याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पवार साहेबांनी ६० वर्षे समाजकारण आणि राजकारण करीत आहेत
कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे
सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही
कालच्या प्रकारामधील सत्य पोलिस शोधून काढतील
सुप्रियाने देखील त्यांना हात जोडून विनंती केली आहे
टोकाचं वागण्याचा प्रयत्न करू नका
पोलिस हे सगळं पाहतील
पोलिसांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत काहीही बोलण योग्य नाही
त्याला काहीही अर्थ नाही
पालकमंत्र्यांना सुध्दा सांगितलं होतं
याच्यामागे कोण आहे, हे पोलिस शोधून काढतील
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्टेशनवर टिय्या
रेल्वे स्टेशनवर पोलिस बंदोबस्त वाढला
काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पोलिसांनी कारवाई केली आहे
रेल्वे प्रशासनाने इथून जाण्यास सांगितले आहे
आम्ही मुंबईत असुरक्षित असल्याचे कर्मचाऱ्यांची भावना
– कॉंग्रेसचे अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची एकसष्टीनिमित्त ओपन जीपमधून रॅली
– अक्कलकोटमधील या रॅलीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे ओपन जीपमध्ये सामील
– यावेळी क्रेनद्वारे मोठा हार घालत तिन्ही नेत्यांचे जंगी स्वागत
– माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टीनिमित्त अक्कलकोटमध्ये त्यांचा नागरी सत्कार
– या सत्काराला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आदींची उपस्थिती.