Maharashtra News Live Update : उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक, बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

| Updated on: Aug 19, 2022 | 9:42 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक, बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

आज दिनांक 16 ऑगस्ट 2022  आज राज्याच्या काही भागात पाऊस सुरूच आहे. तर काही महत्त्वाच्या घडामोडी आज घडण्याची शक्यता आहे. या सर्व बातम्यांचा आढावा आपण आज घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Aug 2022 10:26 PM (IST)

    नालासोपा-यात नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी गेली वाहून

    नालासोपारा :– नालासोपा-यात नाल्यात पडून 15 वर्षांची मुलगी गेली वाहून

    दीक्षा यादव असे वाहून गेलेल्या 15 वर्षाच्या मुलीचे नाव आहे

    नालासोपारा पूर्व धानीव बाग नाका येथे आज दुपारी घडली घटना; राञी उशीरा पर्यंत वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी शोध घेतला पण मुलीचा शोध अद्यापही लागला नाही

    धानीव बाग येथे दोन बैठ्या चाळी मध्ये 200 ते 300 फूट लांबीचा मोठा नाला आहे. हा नाला काही ठिकाणी खुला तर काही ठिकाणी बंदीस्थ असून, कमरे पर्यंत या नाल्यात पाणी आहे.

    आज दुपारी 1 च्या सुमारास दिक्षा यादव ही मुलगी बाथरुमला जात असताना तिचा पाय घसरून ती नाल्यात पडली. आणि ती वाहून गेली आहे.

    आज दिवसभर वसई विरार नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाउस असल्याने नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला होता. ती या पाण्याबरोबर वाहून गेली.

    पेल्हार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतला. माञ राञी उशिरा पर्यंत दिक्षाचा शोध लागला नाही.

  • 16 Aug 2022 08:28 PM (IST)

    क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे

    विरार : क्लास वरून घरीजाताना दहावीत शिकणाऱ्या तरुणीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

    विरार पश्चिमेकडील बोळींजच्या कृष्णा मथुरा नगर येथील एब्रोल सोसायटीच्या समोर आज सायंकाळी 5 च्या सुमारास घडली घटना..

    तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय 15) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

    आज दिवसभर वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस पडत असल्याने सासोयटीच्या समोरच्या रस्त्यावर पाणी साचलं होतं.

    त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेली एम.एस.ई.बी.ची केबल ब्रेक झाल्याने, पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता त्याच पाण्यातून जाताना तरुणीला विजेच्या करंट लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.


  • 16 Aug 2022 08:07 PM (IST)

    उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक, बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

    उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक

    सकाळी 11 वाजता होणार बैठक

    बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

  • 16 Aug 2022 07:54 PM (IST)

    मुंबई अध्यक्ष पदावर पुन्हा वर्णी लागताच ऍड आशिष शेलार यांचे पहिले लक्ष्य वरळी

    मुंबई अध्यक्ष पदावर पुन्हा वर्णी लागताच ऍड आशिष शेलार यांचे पहिले लक्ष्य वरळी

    शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

    वरळीतील जांबोरी मैदानात शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन

    आशीष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी केले दहीहंडी उत्सवाचे आयोजन

    वरळीत शिवसेनेचे तीन आमदार(आदित्य ठाकरे-सुनील शिंदे-सचिन अहिर), एक खासदार आणि माजी मंत्री (अरविंद सावंत), माजी महापौर (किशोरी पेडणेकर), अनेक माजी नगरसेवक असतानाही यंदा दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान पटकवण्यात भाजपने मारली बाजी

    शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू

    जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरणावर महापालिकेने अलीकडेच जवळपास 2 कोटी रुपये खर्च केले असून, दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे तो खर्च वाया जाऊ नये यासाठी तिथे उत्सव साजरा न करण्याची भूमिका असा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांनी केलाय.

  • 16 Aug 2022 07:53 PM (IST)

    सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत खासदार हेमंत पाटील यांचे शक्ती प्रदर्शन

    सह्याद्री गेस्ट हाऊस ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थाना पर्यंत खासदार हेमंत पाटील यांचे शक्ती प्रदर्शन

    मुंबई मधून नवीन नियुक्त केलेले ठाकरे गटातील नांदेड हिंगोली आणि बीड या तिन्ही जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व बारा तालुकाप्रमुख आज शिवसेनेत करणार प्रवेश

    चाय पाणी वर बहिष्कार टाकण्यापेक्षा नवीन सरकारला शुभेच्छा देत प्रोसहन देत काम करायची संधी दिली पाहिजे

    शिवसेना चे चिन्हाचा सर्वस्व अधिकार आयोगाचा आहे आयोग जो निर्णय देईल ते आम्हाला मान्य

  • 16 Aug 2022 06:52 PM (IST)

    विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे – देवेंद्र फडणवीस

    राज्याचं पावासाळी अधिवेशन सुरु होत आहे. विरोधी पक्षाने आमच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे. विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली आहे. मागच्या दीड महिन्यापूर्वी ते सत्तेत होते. विरोधी पक्ष नेत्यांना मी अशवस्त करु इच्छितो की, आमच्या सरकारला ते म्हणाले की हे बेईमानीने आलेलं सरकार आहे. शिवसेना आणि भाजपचं हे सरकार आहे. हे सरकार तिथं आलं होतं. त्यामुळे सुधीर भाऊ सांगतात की गजनीची लागण झाली आहे. विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. विरोधी पक्ष नेता न विचारता केला. त्यामुळे मला असं वाटतंय की, खरं म्हणजे केवळ ४६ दिवसांमध्ये सर्वसामान्यांचं सरकार आहे.

  • 16 Aug 2022 06:50 PM (IST)

    नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली

    नाशिक – नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली.

    गोदा घाट परिसरात अनेक गाड्या पाण्यात अडकल्या.

    गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग १५०० क्युसेक ने सुरू आहे.

    गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    वाहनांना बाहेर काढण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू

  • 16 Aug 2022 06:44 PM (IST)

    भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती

    भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक सुरू

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक

    बिहार राज्यातील भाजपचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित

    नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप हायकमांडची महत्वपूर्ण बैठक

  • 16 Aug 2022 06:20 PM (IST)

    राजुरा एसटी आगारातील कर्मचाऱ्याची बल्लारपुरातील घरी गळफास लावून घेत आत्महत्या

    राजुरा एसटी आगारातील कर्मचाऱ्याची बल्लारपुरातील घरी गळफास लावून घेत आत्महत्या,

    आगारातील महिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या,

    भगवान यादव असे मयताचे नाव, आगारातील 2 आरोपी कर्मचारी 10 हजार रु. महिना मागत असल्याचा घरी सापडलेल्या सुईसाईड नोट मध्ये उल्लेख,

    बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपींवर कठोर कारवाईची कुटुंबियांची मागणी

  • 16 Aug 2022 06:19 PM (IST)

    दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारीने मारहाण केल्याचा कारणावरून एकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

    दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारीने मारहाण केल्याचा कारणावरून एकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या ,

    नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात एकच गोंधळ,

    महिला पोलीस कर्मचारी याचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ,

    राजेश भुजंग लहाने (48) असं मृताचे नाव ,

    राजेश शहरातील गौतम नगर येथील रहिवाशी ,

  • 16 Aug 2022 06:05 PM (IST)

    विद्यार्थिनींच्या होस्टेलमध्ये सुरक्षारक्षकाचा हंगामा

    विद्यार्थिनींच्या होस्टेलमध्ये सुरक्षारक्षकाचा हंगामा .

    राजधानी नवी दिल्लीतल्या करोल बाग इथली धक्कादायक घटना

    विद्यार्थिनींच्या पीजी होस्टेलमध्ये दारूच्या नशेत सुरक्षारक्षकांन मुलींची छेड काढली

    काही मुलींना मारहाण केल्याचाही आरोप

    करोल बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मुलींसोबतच गैरवर्तन सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद

    महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

  • 16 Aug 2022 06:02 PM (IST)

    पातोंडा सावखेडा रस्त्यावर बस व दुचाकीचा भीषण अपघात

    पातोंडा सावखेडा रस्त्यावर बस व दुचाकीचा भीषण अपघात

    अपघातात दुचाकी वरील तरुण जागीच ठार

    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या पातोंडा सावखेडा दरम्यान एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात दुचाकी बस मध्ये अडकून १०० मीटर पर्यंत फरपटत गेली. दरम्यान या घटनेत दुचाकी वरील तरुण जागीच ठार झाला आहे. तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेऊन संपूर्ण दुचाकी जाळून भस्मसात झाली आहे.

  • 16 Aug 2022 05:03 PM (IST)

    खमारी गावाला आला बेटाच स्वरूप 

    – खमारी गावाला आला बेटाच स्वरूप

    – एखाद्याची प्रकृति बिघडली तर उपचारा करता नेता येत नाही.

    – गावाच्या बाहेर आलेले नागरीक बाहेरच अडकून पडले आहेत.

    प्रशासनाची कुठलीच मदत नाही

  • 16 Aug 2022 05:03 PM (IST)

    हिंगोली- शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात

    हिंगोली- शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात

    दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाला सुरुवात

    हळद पिकाला दिलासा तर इतर पिकांचे मात्र नुकसान

  • 16 Aug 2022 05:02 PM (IST)

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधान सभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या विधान सभेच्या सर्व 55 आमदारांना पक्षादेश जारी

    उद्धव ठाकरे गटांचे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला पक्षादेश जारी

    अधिवेशन काळात दररोज संपूर्ण दिवस कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचा पक्षादेश जारी

    विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचें प्रतोद भरत गोगावले यांना दिली आहे मान्यता

    प्रतोद पदाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित

  • 16 Aug 2022 04:05 PM (IST)

    चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, त्याबाबतचा निर्णय एकत्रित घेतला

    चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, त्याबाबतचा निर्णय एकत्रित घेतला

    सहा जवान शहीद झाले आहे

    आमचं मतं स्पष्ट आहे, ज्याप्रकारे हे सरकार सत्तेवर आलं आहे. ते अत्यंत चुकीचं आहे.

    शिंदे सरकार हे चिंधड्या स्थापन झालेलं सरकार आहे

    सुप्रिम कोर्टात हे प्रकरण आहे. त्यामुळे हे अधिवेशन खूप कमी काळाचं आहे.

    शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान केल जात आहे.

  • 16 Aug 2022 03:47 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलेच्या गळ्यावर वार करून हत्या, भोसरी परिसरातील घटना

    -पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिलाच्या गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलीय

    -ही घटना आज भोसरी परिसरात घडली आहे.

    -पूजा देवी प्रसाद अस हत्या झालेल्या महिला च नाव आहे

    -मयत पुजा च प्रगती कलेक्शन नावाचं दुकान असून तिथं आज सकाळी ही घटना घडली आहे

    -भोसरी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत, हत्येचं कारण अस्पष्ट आहे.

  • 16 Aug 2022 03:46 PM (IST)

    विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालेला आहे

    – विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालेला आहे
    – मराठा आरक्षणासाठी ते लढत राहिले
    – त्या अपघाताची चौकशी झाली आहे पाहिजे अशी आमची मागणी
    – रिपब्लिकन पक्ष आम्हाला अजून वाढवायचं आहे
    – आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद मिळावा ही आमची मागणी
    – 12 आमदारांच्या यादीत आम्हाला देखील स्थान मिळावे
    – 2024 मधील निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात जागा मिळतील
    – भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत
    – घराणेशाही विरोधात मोदी काम करत आहेत
    – अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळाले आहे
    – मराठा समजला आरक्षण मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न
    – ओबीसी समजला देखील राजकीय आरक्षण मिळावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे
    – शिवसेना मध्ये उभी फूट पडली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नेते आले आहेत
    – फडणवीस यांनी मोठे मन करून जागा जास्त असताना देखील शिंदे यांना मुख्यमंत्री केले
    – खरी शिवसेना हे शिंदे यांचाच आहे अस निकाल निवडणूक आयोग लवकर देऊ शकतो आठवले यांचं भाकीत
    – 2/3 आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना चिन्ह शिंदे यांना मिळणार

    – नितीशकुमार आधी लालू सोबत होते, नंतर मोदी सोबत गेले आता पुन्हा मोदी सोबत येतील
    नितीशकुमार यांचे बिहार मधील सरकार फार काळ टिकणार नाही
    – नितीश कुमार भाजप सोडून गेल्यानं nda ला काही फरक पडणार नाही
    त्यांनी धोका दिला त्यांचे आमदार फुटून परत येतील
    भाजप मित्र पक्ष स्मपवत हे खरं नाही, माझा पक्ष वाढतोय, मला तसा अनुभव आला नाही
    2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार चेहरा नाही

    – मोदींच्या समोर, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, सोनिया गांधी, शरद पवार कुठलेच चेहरे चालणार

    – मी मोदींच्या पाठिशी आहे त्यामुळे त्यांना घाबरण्याचे कारण नाही

  • 16 Aug 2022 03:45 PM (IST)

    मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

    मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई.

    अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटकडून 2435 कोटी रुपयांचे एमडी सदृश्य अंमली पदार्थ जप्त..

    या प्रकरणात एकूण 7 आरोपीना अटक केली असून एका महिला आरोपीचा समावेश आहे..

    Anc कडून गुजरात राज्यातही करण्यात आली मोठी कारवाई..

  • 16 Aug 2022 03:41 PM (IST)

    मंगेशकर कुटूंबातील दोन सदस्य नंदनवन इथे दाखल

    भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाच्या संदर्भात नंदनव बंगल्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक सुरू…

    – मंगेशकर कुटूंबातील दोन सदस्य नंदनवन इथे दाखल

    – काही वेळात बैठक संपणार…

  • 16 Aug 2022 03:41 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा गंभीर पूर परिस्थिती उद्भवली

    गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा गंभीर पूर परिस्थिती उद्भवली

    जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचे दीडशे घरे पाण्याखाली

    सिरोंचा तालुक्यातील आठ गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची आज रात्रीपासून होणार sdrf पथकाकडुन सुरुवात

    मिरची व कापसाचे पेरण्या केलेले दहा हजार हेक्टर जमीन तिसऱ्यांदा गेली पाण्याखाली

    यांचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी

  • 16 Aug 2022 02:15 PM (IST)

    Amul Milk Price Increase : अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले

    पुन्हा महागाईचा फटका

    अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले

    नव्या किंमती उद्यापासून लागू होणार

  • 16 Aug 2022 01:56 PM (IST)

    Eknath Shinde : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान, सुनील प्रभूंना पत्र

    अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम

    शिवसेना नेते सुनील प्रभूंना निमंत्रण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रभूंना पत्र

  • 16 Aug 2022 01:49 PM (IST)

    Maharashtra News Live Update : वैनगंगा नदी धोका पातळी ओलांडली

    भंडारा – घरात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू सूरु

    वैनगंगा नदी धोका पातळी ओलांडली

    245.50 इतकी इशारा पातळी असून आजची धोका पातळी 248.16 इतकी पोहचली आहे.

    गणेशपुर, गणेश नगरी, टप्पा मोहला या भागात पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली आले.

    अडकलेल्या नागरिकांचा रेस्क्यू करून एसडीआरएफच्या टीमद्वारे सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय

  • 16 Aug 2022 01:46 PM (IST)

    Maharashtra News Live Update : ठाण्यात पावसाची तुफान बॅटींग

    ठाण्यात पावसाचा जोर वाढला

    ठाण्यात पावसाची तुफान बॅटींग सुरू

  • 16 Aug 2022 01:25 PM (IST)

    Maharashtra News Live Update : शिंदे गटाच्या कोल्हापूरमधील पदाधिकार्‍यांची निवड उद्या

    शिंदे गटाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची निवड उद्या जाहीर होणार

    उद्या दोन जिल्हाप्रमुख नेमले जाणार

    माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

    शिंदे गटाचं जिल्हा प्रमुखपद कोणाला मिळणार याची उत्सुकता

    शिवसेना भावना वरूनही राजेश क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनाभवन असावं असं याआधी पक्षनेतृत्वाला वाटलं नाही हे दुर्दैव

  • 16 Aug 2022 12:58 PM (IST)

    Bihar Cabinet Expansion : बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

    काँग्रेसचे आमदार मुरारी प्रसाद गौतम, आरजेडीचे आमदार मोहम्मद इस्राईल मन्सुरी आणि इतरांनी बिहार सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

     

  • 16 Aug 2022 12:54 PM (IST)

    Maharashtra News Live Update : विनायक मेटे अपघात प्रकरण, ट्रक-कारची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी

    विनायक मेटे अपघात प्रकरण

    ट्रक आणि त्यांच्या कारची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी

    काही सॅम्पल देखील घेण्यात आले

    ही फॉरेन्सिक टीम कलिना येथील आहे

  • 16 Aug 2022 12:43 PM (IST)

    Kashmiri Pandit : जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं, 2 काश्मीरी पंडितांवर गोळीबार

    जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं

    2 काश्मीरी पंडितांवर गोळीबार

    गोळीबारात एकाचा मृत्यू तर एक जखमी असल्याची माहिती

  • 16 Aug 2022 12:23 PM (IST)

    ITBP Bus Acciden : जम्मू काश्मीरात बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

    बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

    जम्मू काश्मीरातील घठना,

    जम्मू कश्मीरच्या पहलगाममधल्या चंदनवाडीत हा अपघात झाला

    32 जवान जखमी असल्याची माहिती

     

  • 16 Aug 2022 12:10 PM (IST)

    Maharashtra News Live Update : ओबीसी आणि मराठा आरक्षणावर गुलाबराव पाटलांचं भाष्य

    ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारनं आणि याही सरकारनं विरोध केलेला नाही

    ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी गुलाबराव पाटलांचं भाष्य

    ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी मागच्या सरकारनेही प्रयत्न केले, याही सरकारनं प्रयत्न केले.

    पुढील काळातही सगळ्या समाजातल्या पीडित घटकाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू

    सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी सरकारच्या मागे उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करू

  • 16 Aug 2022 12:02 PM (IST)

    Maharashtra News Live Update : मुकेश अंबानी धमकी प्रकरणात नवा खुलासा

    अफजल गुरू असल्याचं सांगून धमकी

    मुकेश अंबानी धमकी प्रकरणात नवा खुलासा

  • 16 Aug 2022 11:38 AM (IST)

    Maharashtra News Live Update : विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे लाईव्ह

    विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भात तपास व्हावा- विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे

    मला कळाल्यानंतर मी तातडीनं फोन केले

    ड्रायव्हरकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न- ज्योती मेटे

  • 16 Aug 2022 11:16 AM (IST)

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या क्षणीच पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात दोन जुळ्या बालकांचा मृत्यू; ही संताप जनक घटना

    स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात दोन जुळ्या बालकांचा मृत्यू ही संताप जनक घटना

    आजही स्वातंत्र्याला 75 वर्षे झाले तरी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षणांपासून आदिवासी समाज वंचित

    त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत . ग्रामीण आरोग्याच्या सुविधा नाहीत

    मोखाड्यातील घटनेत वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन बालकांचा मृत्यू

    स्वातंत्र्यानंतरच्या सत्ताधाऱ्यांना मोठी चपराक

    असा तीव्र संताप श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी व्यक्त केला

  • 16 Aug 2022 11:14 AM (IST)

    Maharashtra News Live Update : महाराष्ट्र सत्तासंघर्षाची याचिका मेंशन, अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही – कोर्ट

    महाराष्ट्र सत्तासंघर्षाची याचिका मेंशन

    अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही – कोर्ट

    सुप्रीम कोर्टात आज याचिका मेंशन करण्यात आली

    केंद्रीय निवडणूक आयोग येत्या 19 ऑगस्टला निर्णय देणार

    अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही – कोर्ट

    येत्या 22 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे सुनावणी

  • 16 Aug 2022 10:56 AM (IST)

    Nagpur University Exam Cancellation : नागपूर विद्यापीठाच्या आज आणि उद्याच्या सर्व परीक्षा रद्द

    – भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील पूर स्थितीमुळे परीक्षा रद्द

    नागपूर विद्यापीठाच्या आज आणि उद्याच्या सर्व परिक्षा रद्द

    – भंडारा आणि गोंदियात आज, उद्या येलो अलर्ट

    – बीए, बी.कॅाम, बीएससी, बीईची परिक्षा पुढे ढकलली

    – लवकरंच पुढच्या तारखा जाहीर होणार

    – 60 हजार विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलल्या

  • 16 Aug 2022 10:46 AM (IST)

    धक्कादायक मेळघाटात जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून केली एकाने आत्महत्या

    धक्कादायक मेळघाटात जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट करून केली एकाने आत्महत्या

    मेळघाटातील कलमखार गावातील घटना

    कलमखार गावातील रामू गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव

    मासेमारी करण्यासाठी आणलेल्या जिलेटीनचा वापर करून केली आत्महत्या

    राहत्या घरात जिलेटीनच्या कांड्या फोडून केली आत्महत्या

    आत्महत्येचे कारण अध्याप अस्पष्ट

  • 16 Aug 2022 10:39 AM (IST)

    Shambhuraj Desai : शंभूराज देसाई लाईव्ह

    मंत्रिपदावरुन नाराजी नाही-शंभूराज देसाई

    खातेबदल संदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना

    खातेवाटपासंदर्भात शिंदे गटातील कुणीही नाराज नाही

    बांगर चिडले असतील, त्यांचं हे वागणं नियमाचं पालन न केल्यानं, तरीही हात उगारनं योग्य नाही

    बांगर यांच्याकडून अनावधानानं झालं असेल-शंभूराज देसाई

    मेटेंच्या अपघातासंदर्भात अहवाल आल्याशिवाय बोलणं योग्य नाही

    दैनिक सामनात काय छापलं जातंय, हे अवघा महाराष्ट्र पाहतोय

    आमच्यात मतभेद निर्माण करायचा, हा केविलवाना प्रयत्न सामनातून सुरू आहे

  • 16 Aug 2022 10:25 AM (IST)

    चंद्रपूरातील गोसेखुर्दच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

    चंद्रपूर : गोसेखुर्दच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ…

    ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावाला वैनगंगा नदीच्या पाण्याचा वेढा

    ब्रह्मपुरी तालुक्याशी असलेला संपर्क तुटला

    वैनगंगेच्या पाण्यामुळे गांगलवाडी-मुडझा रोड पूर्णपणे बंद

  • 16 Aug 2022 10:09 AM (IST)

    गडचिरोली भामरागड तालुक्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असून पुरामुळे जवळपास शंभर घरे पाण्याखाली

    गडचिरोली भामरागड तालुक्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असून पुरामुळे जवळपास शंभर घरे पाण्याखाली

    इंद्रावती नदी धोका पातळीच्या वर वाहत असून इंद्रावती नदीच्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

    भामरागड तालुक्याची दूरध्वनी सेवा व विद्युत सेवा खंडित

    जिल्हाधिकारी सॅटलाईट फोनद्वारे येथील प्रशासनाला संपर्क करत आहेत

    वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असून आष्टी, गोंडपिपरी महामार्ग पूर्णपणे बंद

    चामोशी तालुक्यातील शिवनी नदीला पूर आला असून शिवनी गावाजवळून राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली चामोर्शी पूर्णपणे बंद

  • 16 Aug 2022 09:55 AM (IST)

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज चौथा स्मृतिदिन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांकडून आदरांजली

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज चौथा स्मृतिदिन

    राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांनी वाजपेयी यांना वाहिली आदरांजली

    अटल स्मृतिस्थळावर वाजपेयी यांचे अनेक प्रेरणादायी संदेश

     

  • 16 Aug 2022 09:47 AM (IST)

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने इस्लामपूर शहरात मशाल रॅली

    सांगली

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने इस्लामपूर शहरात मशाल रॅली

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन

    नागरिकांची गर्दी

  • 16 Aug 2022 09:42 AM (IST)

    संवादाची सुरुवात वंदे मातरम् यांनी व्हावी यामध्ये राजकारण नाही; सुधीर मुनगंटीवार

    – संविधानाने मान्यता दिलेल्या गोष्टीला विरोध तरत असेल तर त्यांचे मन परिवर्तन करु

    – या अभियानात राज्यातील अर्धा कोटी विद्यार्थी जुडावे

    – विरोध करण्याचं कारण नाही

    – सकारात्मक विरोधी पक्ष ही आगामी अधिवेशनात अपेक्षा आहे

    – अडीच वर्षे सत्ता असताना ते जो निर्णय घेऊ शकले नाही त्याबाबत विरोध कसा करणार

    – जितेंद्र आव्हाड राईचा पर्वत करत आहे. वंदे मातरम् नाही म्हटलं ते जेलमध्ये टाकेल असं कुणीही म्हटले नाही

  • 16 Aug 2022 09:36 AM (IST)

    Maharashtra News Live Update : गिरणा धरणात पाण्याच्या साठ्यात वाढ

    गिरणा धरणात पाण्याच्या साठ्यात वाढ

    धरणातील 2 वक्रद्वार 2 फुटाने तर 4 वक्रद्वार 1 फुटाने उघडले

    नदी काठच्या गावांना सातर्कतेचा इशारा

  • 16 Aug 2022 09:34 AM (IST)

    Maharashtra News Live Update : सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या उठावाचा परिणाम नाही- पुरुषोत्तम बरडे

    सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकनाथ शिंदे यांच्या उठावाचा फारसा परिणाम ठाकरे सेनेवर झाला नसल्याचा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांचा दावा

    सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील वगळता जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नाही मात्र संघटनेचे जाळे मोठे आहे

    मंत्री तानाजी सावंत यांना शह देण्यासाठी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्याची शक्यता

    शिंदे गटाच्या उठावानंतर सोलापूर जिल्हा शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या हालचालींना वेग

  • 16 Aug 2022 09:15 AM (IST)

    Maharashtra News Live Update : मंत्री सुधीर मुनगंटीवार लाईव्ह

    मराठी गीतात सुंदर वर्णन ‘वंदे मातरम्’चं केलं

    वंदे मातरम् हा राजकीय शब्द नाही – सुधीर मुनगंटीवार

    दुसऱ्या भूमिकेची खाती आम्ही घेतली

    आम्हाला मत परिवर्तन करावं लागेल

    संवादाची सुरुवात वंदे मातरम् यानं होणं यात वाईट काय?

    एखादा विरोधक आहे, तर त्याला कमी लेखण्याचा माझा हेतू नाही

    कामाचा वेग कमी असेल तर विरोधकांना सूचना कराव्यात

  • 16 Aug 2022 08:49 AM (IST)

    Maharashtra News Live Update : भंडारा ते बालाघाट राज्य मार्ग बंद

    भंडारा ते बालाघाट हा मध्यप्रदेशला जाणारा राज्य मार्ग बंद

    राज्य मार्गावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प

    1 किलोमिटर पर्यंत ट्रकच्या रांगा

  • 16 Aug 2022 08:22 AM (IST)

    Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाची पाणीपातळी 95 टक्क्यांवर

    जायकवाडी धरणात 30 हजार क्यूसेक्स पाण्याची आवाक सुरू

    तर जायकवाडी धरणातून 28 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

    18 दरवाजे दीड फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग सुरू

    जायकवाडी धरण 95 टक्के भरल्यामुळे मराठवड्याने सोडला सुटकेचा निःश्वास

  • 16 Aug 2022 08:18 AM (IST)

    Maharashtra News Live Update : भंडारा जिल्ह्याला पुराचा वेढा

    भंडारा जिल्ह्याला पुराचा वेढा

    भंडारा- तुमसर राज्य मार्ग बंद

    शहरातही पुराचा वेढा, प्रशासनाकडून सतर्केतेचा इशारा

    वैनगंगा नदीने आपले पात्र सोडल्याने जवळपास 25 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयासी तुटला

  • 16 Aug 2022 08:05 AM (IST)

    Jitendra Awhad on Sudhir Mungantiwar : बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का? जितेंद्र आव्हाडांची सुधीर मुनगंटीवारांवर टीका

    बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का?

    माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवारांवर टीका

     

  • 16 Aug 2022 07:54 AM (IST)

    Amravati Accident : ट्रॅव्हल पलटली, दोन प्रवाशांचा मृत्यू

    अमरावती-नागपूर महामार्गावर मध्यरात्री नांदगावपेठ जवळ खाजगी ट्रॅव्हल पलटली

    दोन प्रवाशांचा मृत्यू काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

    नागपूर येथून बुलडाण्याला जात होती खाजगी ट्रॅव्हल

    मृतकामध्ये पंजाब आणि नागपूरमधील लोकांचा समावेश

  • 16 Aug 2022 07:42 AM (IST)

    Kirit Somaiya Tweet : भाजप नेते किरीट सोमय्यांचं ट्विट

    भाजप नेते किरीट सोमय्यांचं ट्विट यांनी शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्यासंदर्भात ट्विट केलंय

    वाचा ट्विट

     

  • 16 Aug 2022 07:39 AM (IST)

    Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान दि. अटल बिहारी वाजपेयींची चौथी पुण्यतिथी

    देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आज चौथी पुण्यतिथी

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती धनखड, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची उपस्थिती होती

     

     

  • 16 Aug 2022 07:32 AM (IST)

    United States | वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भारतीय राष्ट्रध्वज डिजिटल पद्धतीनं प्रदर्शित

    भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित वर्ल्ड ट्रेड सेंटरवर भारतीय राष्ट्रध्वज डिजिटल पद्धतीनं प्रदर्शित करण्यात आलाय.

     

  • 16 Aug 2022 07:28 AM (IST)

    Maharashtra News Live Update : पुरग्रस्तांना मदतीचं वाटप नाही

    राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या मदतीची घोषणा केली, पण अद्याप शेतकऱ्यांना मदतीचं वाटप नाही

    – घोषणा होऊन पाच दिवस झाले तरिही मदतीचं वाटप नाही

    – राज्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान

    – विदर्भात कापूस, सोयाबीन, धान, फळबागांचं सर्वाधिक नुकसान

    – शेतकरी संकटात असताना, अद्याप मदतीचं वाटप नाही

    – मदतीचं वाटप लवकर करण्याची राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

  • 16 Aug 2022 07:14 AM (IST)

    Government Bank Jobs : 6400 पेक्षाही जास्त जागांवर बंपर पदभरती!

    इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनत्या वतीने बंपर भरती करण्यात येणार

    प्रोबेशनरी ऑफिसर अर्थात पीओ पदांसाठी भरती (Jobs in Bank) केली जाईल.

    आयबीपीएसच्या वतीने केल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियेची वाट पहिली जातेय

    पदभरतीचं नोटीफिकेशनही (Bank Job Notification) जारी करण्यात आलं आहे.

    अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

  • 16 Aug 2022 07:10 AM (IST)

    Saamana : मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपावर सामानातून टीका

    मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपही झालंय. त्यावर सामानातून टीका करण्यात आलीये.

    “जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति शपथविधी करू शकतील काय? राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झालाय. त्याची फुकट मजा बघायला काय हरकत आहे?”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

    सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 16 Aug 2022 07:08 AM (IST)

    Pune : पुणे महानगरपालिकेकडून आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात

    कोरोनानंतर दोन वर्षांनी पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार

    – पुणे महानगरपालिकेकडून आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात,

    – गणेशोत्सवाच्या कालावधीत 150 फिरते हौद बांधण्याचा पालिकेचा निर्णय

    – फिरत्या विसर्जन हौदांसह नागरी संस्था विसर्जनासाठी 135 निश्चित हौदांची सोय करण्यात येणार.

  • 16 Aug 2022 07:07 AM (IST)

    Maharashtra News Live Update : ‘महाराष्ट्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्याचं जात प्रमाणपत्र पडताळणी करु शकत नाही’

    महाराष्ट्र सरकारची समिती केंद्रीय कर्मचाऱ्याचं जात प्रमाणपत्र पडताळणी करु शकत नाही’

    – असा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल

    – केंद्रीय जीएसटी विभागातील अधीक्षक अरुण हिंगणेकर यांनी दाखल केली याचिका

    – महाधिवक्ता, आदिवासी विभागाच्या सचिवांना न्यायालयाची नोटीस

    – याचिकाकर्ता अरुण हिंगणेकर यांच्या सेवेला अंतरिम संरक्षण

  • 16 Aug 2022 06:51 AM (IST)

    Mumbai Corona : मुंबईत सोमवारी 584 नवीन करोनाबाधित आढळले

    मुंबईत सोमवारी 584 नवीन करोनाबाधित आढळले. यापैकी 522 रुग्णांना लक्षणे नाहीत.

    सापडलेल्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमीच आहे. सोमवारी 407 रुग्ण बरे झाले.

    आढळलेल्या नव्या रुग्णांपैकी 522 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. यातील 62 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यापैकी 14 जणांना प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध कराव्या लागल्या.

    सध्या 5 हजार 218 सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सोमवारी 7 हजार 215 चाचण्या करण्यात आल्या.

  • 16 Aug 2022 06:39 AM (IST)

    TATA, ST : एसटी महामंडळ टाटा कंपनीकडून 700 विनावातानुकूलित बस घेणार

    एसटी महामंडळ टाटा कंपनीकडून 700 विनावातानुकूलित बस घेणार

    यापैकी 50 बस विनावातानुकूलित शयनयान प्रकारातील असल्याचेही सांगण्यात आले.

    पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत या बस ताफ्यात येणार आहेत.

    हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळातील व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचाही समावेश होता.

    प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात वातानुकूलीत शयनयान बसचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

  • 16 Aug 2022 06:35 AM (IST)

    Rain Update : विदर्भात पावसाचा हाहाकार

    विदर्भात पावसाचा हाहाकार

    गोंदिया, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस

    अनेक ठिकाणी वाहूतक विस्कळीत