आज गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट जाणून घेणार आहोत आजच्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच राज्यातील सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच इतर देखील काही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असून, शेतींच्या कामांना वेग आला आहे. अशा सर्व घडामोडी आज आपण जाणून घेणार आहोत.
– उमेश कोल्हे हत्या प्रकरण
– दोन अटक केलेल्या आरोपींना घेऊन यांना एनआयए मुंबईसाठी रवाना
– अमरावती रेल्वे स्टेशनवरून एनआयए पथक कडक बंदोबस्तासह दोन्ही आरोपीना मुंबईत
– आरोपींना 7 ऑगस्ट पूर्वी मुंबई NIA कोर्टात करणार दाखल
– मुसिफ अहमद अ. रशीद व अब्दुल अरबाज अ. सलीम रा.दोघेही अमरावती असे अटक केलेल्या आरोपींची नावे
– अमरावती शहरात आजही अनेक ठिकाणी छापेमारी करून काहींची चौकशी केल्याची माहिती आहे..
शाखेत गर्दीच असतेच
माझी शाखेची भेट होती
आता थकायचं नाही आता लढायचं
इतका जोश इथे आहे जणू आपण गद्दाराणा पांढलं आहे
वरळीमधील जागा जास्तीत जास्त मताने आणाचे आहे
– नागपूर जिल्ह्यात वीज पडून 10 माकडांचा मृत्यू
– झाडावर वीज पडक्याने झाडावर बसलेल्या 10 माकडांचा मृत्यु
– नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा, वलनी गावातील घटना
मावळ,पुणे
-मावळातील सात वर्षीय बालिकेचं अपहरण आणि अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीसह; त्याच्या आईला ही फासावर लटकवा
-राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांची मागणी
-आज विद्या चव्हाण यांनी पीडित कुटुंबियांशी भेट घेतली असता अजून एक धक्कादायक खुलासा
-जेव्हा या मुलींचे अपहरण होऊन तिची हत्या करण्यात आली तेव्हा आरोपीच्या आईला ही घटना माहीत असताना तिने मौन बाळगले
-त्यामुळे तीही तितकीच दोषी असल्याचं विद्या चव्हाण यांनी नमूद केलं
-पोलीस प्रशासनाने चांगली कामगिरी केली असून लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा करायला पाहिजे
चंद्रपूर : माजी आमदार उद्धवराव शिंगाडे यांचे निधन
ब्रह्मपुरी विधानसभा श्रेत्राचे माजी आमदार उद्धवराव शिंगाडे यांचे आज संध्याकाळी 5 वाजता निधन,
1999 ते 2004 या काळात भाजप कडून होते विधानसभेत आमदार,
ग्रामीण भागाशी नाळ कायम असलेला,
निष्कलंक आणि प्रसिद्ध कीर्तनकार अशी होती त्यांची ख्याती,
जनता दल, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिला त्यांचा राजकीय प्रवास,
उद्या चिंचोली या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
नवी दिल्ली
शिंदे गटातील खासदार उद्या राष्ट्रपती ना भेटणार
उद्या दुपारी 12 वाजता होणार भेट
राष्ट्रपती भवनात 12 खासदार उद्या भेटणार
शेतकरी कुटुंबांना न्याय देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धान्य टाकून पेरणी
लक्षवेधी धरणे आंदोलन
शेळ्या, बैलं घेऊन अनोखे आंदोलन
यवतमाळमधील महागाव तालुक्यातील काळी टेंभी येथील नाल्याला आलेल्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला वाहून गेली.
कमलाबाई मारोती पवार (वय 50) हिचा अद्याप शोध लागलेला नाही.
तिच्यासोबत असलेली महिला आणि मारुती पवार या दोघांचे जीव वाचले
दोन बैल व गाडी पुरामध्ये वाहून गेली
ही घटना आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
मुडाणावरच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नाल्याला मोठा पूर
तलाठी डी. बी. चव्हाण व यंत्रणा घटनास्थळावर वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहेत.
मान्सून अलर्ट
राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार
5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता
कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
मुंबईतही 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेञ तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सुनचं पुनरागमन
तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासाच नवं कमी दाबाचं क्षेञ तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता
सीएनजी दरवाढी विरोधात पुण्यात 9 ऑगस्ट रोजी रिक्षाचालकांचा मोर्चा काढण्यात येणार
हा मोर्चा 9 ऑगस्ट रोजी खासदार गिरीष बापट आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा
या मोर्चात पुणे, पिंपरी चिंचवडमधील रिक्षा चालक सहभागी होणार
मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 10 ते 1.30 वाजेपर्यंत पुण्यासह, पिंपरी चिंचवडमधील रिक्षा सेवा बंद
रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार यांची माहिती
वर्षा बंगल्याला अखेर शिंदेंच्या नावाची पाटी लागली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत
पण मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल विचारला जातोय
कारण अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेली.
तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटीदेखील पूर्ण
ओला रिक्षावर भलंमोठं झाडं पडलं
घटनेत रिक्षाचा चक्काचूर
कल्याण पूर्वेतील नेतीवली ते सुचकनाका परिसरातील घटना
सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी नाही
माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
झाड बाजूला काढण्याचं काम सुरू
शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक
सोमवारी खासदार मंडलिक यांच्या घरावर शिवसेनेचा धडक मोर्चा
कोल्हापुरातील शिवाजी पार्क इथल्या घरावर दुपारी बारा वाजता मोर्चाचं नियोजन
शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची माहिती
खासदार धैर्यशील माने यांच्यानंतर आता खासदार मंडळी यांच्या घरावरही निघणार मोर्चा
मोर्चात हजारो शिवसैनिक मतदार सहभागी होणार असल्याचा देवणे यांचा दावा
गद्दारीबद्दल प्रा. संजय मंडलिक यांना जाब विचारणार
देवणे यांची राहुल शेवाळे यांच्यावरही टीका
शेवाळेना सध्या काही काम नाही
मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राहुल शेवाळे यांच तोंड बंद होईल
पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोघांनी केला बलात्कार
पिडीत महिला गरोदर
महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
24 तासाच्या आत पोलिसांनी दोन्ही नराधमांना ठोकल्या बेड्या
गुड्डू उर्फ सिध्देश भाटकर व राहुल देवराव बोरडकर अशी अटक झालेल्या नरधमांची नावे
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
थोड्या वेळात शरद पवारांच्या घरी विरोधी पक्षाची बैठक
बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत होणार चर्चा
भंडाराचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली
त्यानंतर आता त्यांचा ठिकाणी नागपुरचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी भंडाऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक
जुन्या वैमनस्यातून फावड्याने वार करत बांधकाम ठेकेदाराची दिवसाढवल्या हत्या.
भंडारा शहरातील घटना.2 आरोपी अटकेत व 2 फरार.
2 फरार आरोपीचा शोध सुरु आहे.शहरात या हत्येचा घटनेने दहशतीचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का
आता मुंबई बँकेतही होणार सत्तांतर
मुंबई बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम
भाजप नेते-आमदार प्रवीण दरेकर पुन्हा होणार बँकेचे अध्यक्ष
सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात दिला आहे अध्यक्ष पदाचा राजीनामा, तर विठ्ठल भोसले यांनी दिला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा
प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन
अमरावती शहराबाहेर असलेल्या सुकळी डम्पिंग ग्राउंडवर आणून टाकले मृतावस्थेतील चार गोवंश.
चारही गोवंश दोरखंडाने आहेत बांधले.
हत्येसाठी नेत असताना वाहतुकी दरम्यान गोवंशाचा मृत्यू झाल्याचा संशय
मृतावस्थेत असलेल्या गोवंशामूळे परिसरात पसरली दुर्गंधी
या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पोलीस तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसने केली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल
खाजगी विमानाने नवी दिल्ली विमानतळावर फडणवीस दाखल
फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता
विजेच्या कडकडासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर सुरू
15 दिवसाच्या उघडी खंडानंतर पुन्हा पाऊस
दिवसभर ढगाळी वातावरणाचे दुपारी चार वाजता मुसळधार पावसाला सुरुवात
आधीच 11 दिवसाच्या सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
पावसाच्या उघडीपीनंतर शेतकरी कामाला लागला होता
पिकांना नवसंजीवनी मिळत असतानाच पुन्हा पावसाला सुरुवात
पुन्हा पिकांना बसणार फटका
कणकवली-तळेरे येथे बिबट्याचे कातडे जप्त.
सिंधुदुर्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई.
देवगड तालुक्यातील दोघांना घेतलं ताब्यात.
दोन कारसह 11.50 लाखांचा मुद्देमाल ही केला जप्त.
गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून केली कारवाई.
बिबट्याच्या कातड्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपये.
कातडे वाहनातून घेऊन जात असताना पोलिसांची कारवाई.
येवल्यातील आफगाणी सुफी हत्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी संतोष ब्राम्हनेला अटक
राहुरी पोलिसांनी केली अटक
मागील महिन्यात येवला तालुक्यात अफगानी सुफीची करण्यात आली होती हत्या
या हत्या प्रकरणात कोपरगाव येथील संतोष ब्राम्हने हा मुख्य संशयीत
घटनेनंतर तेव्हापासून संतोष ब्राम्हने होता फरार
गावठी कटटे आणि पाच जीवंत काडतुसेही हस्तगत
संतोष ब्राम्हणे सह त्याचे दोन साथीदार गोपाल बोरगुले , विशाल पिंगळे यांनाही अटक
मंचर, पुणे
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे आंदोलन
– संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको
– मात्र मंचर पोलिसांनी केला विरोध,आंदोलकांना घेतले ताब्यात.
– कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी आणि कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक…
– रविकांत तुपकर यांना घेतले पोलिसांनी ताब्यात.
वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात
मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस
मुक्काम पोस्ट ऑर्थर रोड, किती महिने हे सांगता येत नाही ,…
मला काळजी वाटते 6 ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात हजर व्हायचं आहे
प्रोफेसर मेधा किरीट सोमया मानहानी प्रकरणात कोर्टाने आदेश दिले
6 ऑगस्टला पोलीस हजर करणार की नाही याची काळजी वाटत आहे
एकंदर जे प्रकरण दिसत आहे नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहे फॉरेन टूर दुबई, चायनाला गेले होते
इथली प्रॉपर्टी, तिथली प्रॉपर्टी कोट्यवधी रुपयांचे कॅश ट्रानजेक्शन
एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीतच होते पण आता प्रभाग रचना का बदलली सांगता येणार नाही
जे उमेदवार असतात त्यांना वॉर्ड बदलला तर त्रास होतोच
राज्यपालांकडे आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा
92 नगरपालिका, 4 नगरपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही
बांठीया कमिशननमध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जात आहे
अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे
5 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल का याबाबत माहीत नाही
अनेक याचिकांची गुंतागुंत सुप्रीम कोर्टात चालू आहे ती कशी सुटते ते बघू..
ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही.. पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच संजय राऊतांविषयी व्यक्त केले मत
-जुगार खेळणाऱ्या संत तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्तावर संस्थान करणार कारवाई
– पोलिसांच्या ताब्यात असलेला विश्वस्त विशाल मोरे यांच्यावर संस्थांनामधून निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते
– विश्वस्त विशाल मोरे पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे संस्थान आधी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार
– त्यामध्ये विशाल मोरे यांनी समाधानकारक असा खुलासात दिला नाही तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार
-संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची माहिती
सुनील राऊत यांची संजय राऊतांच्या कोठडीवर प्रतिक्रिया
आम्ही अलिबागमध्ये कोणताही भ्रष्टाचार केला नाही – राऊत
संजय राऊत यांच्यावरील आरोप चुकीचे – सुनिल राऊत
सर्व बाजुचा युक्तिवाद पूर्ण
थोड्याच वेळात कोर्टाचा निर्णय
राऊत यांच्या कोठडीत वाढ होणार?
कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष
स्वप्ना पाटकरांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू
स्वप्ना पाटकर गोरेगाव पत्राचाळप्रकरणातील साक्षीदार
संजय राऊत माझ्या क्लाईन्टला धमकावत होते – पाटकरांचे वकील
संजय राऊत अटकेत असताना ते कशी काय धमकी देऊ शकतात
कोर्टाचा स्वप्ना पाटकर यांच्या वकिलाला सवाल
अनोळखी व्यक्तीकडून राऊतांच्या पत्नीला पैसे मिळाल्याचे पुरावे
ईडीचा कोर्टात दावा
प्रविण राऊतांकडून मिळालेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीनीची खरेदी – ईडी
संजय राऊत यांना सोमवारपर्यंत कोठडी द्यावी
ईडीकडून कोर्टात मागणी
सोमवारपर्यंत इतर लोकांची चौकशी करू
ईडीची कोर्टात मागणी
संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना
राऊतांच्या ईडी कोठडीवर थोड्याच वेळात सुनावणी
ईडी कोर्टाकडे कोठडी वाढून मागणार?
पत्राचाळ घोटाळाप्रकरणात राऊत ईडीच्या अटकेत
उद्या राज्यभरात काँग्रेसचे आंदोलन
विविध प्रश्नांवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन
राज्यपालांकडे निवेदन सादर करणार
शेतकरी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, अग्निपथ योजना, महागाई अशा विविध मुद्द्यांवर आंदोलन
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश
1 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच एमडी ड्रग्स जप्त
मुंबईबाहेर सुरू असणाऱ्या एका ड्रग्स फॅक्टरीवर कारवाई
जवळपास 700 किलो एमडी ड्रग्स जप्त
या प्रकरणात पाच आरोपींना अटक
औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का
काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष करणार भाजपामध्ये प्रवेश
दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष करणार भाजपामध्ये प्रवेश
जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके करणार भाजपामध्ये प्रवेश
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना वैतागून निर्णय घेतल्याची माहिती
जालन्यात स्टील कारखान्यावर आयकर विभागाची धाड
एस. आर. जे. पित्ती आणि कालिका स्टील या दोन कारखान्यांवर छापा
नाशिकच्या आयकर विभागाचा स्टील कारखान्यावर छापा
कर बुडवल्याच्या संशयावरून स्टील कारखान्यावर छापा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या माणिकनाळ गावात डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी छापा टाकून 13 लाख 40 हजारांचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांचा छापा पडताच आरोपी फरा झाला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात
परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकांनी पाऊस
सकाळी 9 वाजल्यापासून पावसला सुरुवात
पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेला गद्दारी नवी नाही. ज्या वेळी गद्दार बाहेर पडले तेव्हा पुन्हा एकदा शिवसेना ताकदीनं उभी राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसैनिकांनी अनेक मोठ्या माणसांना पराभूत केले आहे. यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे देखील देसाई यांनी म्हटले आहे.
शिंदे गट शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के देतच आहे. आता शिवसेनेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेचे विभाजन झाले असून, दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. तर दोन खोल्याअद्यापही शिवसेनेच्या ताब्यात आहेत.
आज 11 वाजता काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक
नॅशनल हेराल्डचं कार्यालय ईडीकडून सील केल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक
बैठकीत काँग्रेसची पुढची रणनीती ठरणार
ईडीचा गैरवापर होत असल्याचा काँग्रेसचा आरोप
नागपूर शहरात तीन स्वाईन फ्लू संशयितांच्या मृत्यूने खळबळ
आज आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक
नागपुरात कोरोना, डेंग्यू नंतर आता स्वाईन फ्लूची दहशत
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत 67 स्वाईन फ्लूचे रुग्ण
मेडिकल शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून पडलेल्या पावसाचा प्रभाव अंधेरी सब वेवर दिसत आहे. अंधेरी सब वे तुडुंब भरला असून, हा मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ बंद करण्यात आला आहे. तसेच शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा ग्रामपंचायतींच्या मतदानाला सुरुवात
बजाज नगर ग्रामपंचायतसह सोळा ग्रामपंचायतसाठी आज मतदान
शिंदे गट आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
शिंदे गट स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक
16 ग्रामपंचायतींमध्ये कोण मारणार बाजी याकडे जिल्ह्याचे लक्ष
बाजाजनगर ग्रामपंचायतीमध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि शिवसेनेत चुरस
नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू
चंद्रपूर येथील भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्याचा मृत्यू, एक जखमी
जीवती तालुक्यात शेडवाही शिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील हिॅगणा पोलीस हद्दीत वीज पडून उज्ज्वला थुटूरकर या महिलेचा मृत्यू
अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 1.44 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल सादर
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 79.48 कोटींची गरज
केंद्रीय पथक आज नागपूर विभागाच्या नुकसानीचा आढावा घेणार
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्राच्या पथकाकडून आढावा बैठक
गडचीरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील नुकसानीचाही आढावा घेणार
सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे असं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.