मुंबई : आज शुक्रवार 5 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मध्यरात्री मुंबईत पोहचले. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी नंतर अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्वाचे मानला जात आहे. राज्यात मंत्री मंडळाच्या विस्तारावर दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.