Maharashtra News Live Update : संजय राऊत उद्या ईडी चौकशीला सामोरे जाणार नाहीत

| Updated on: Jul 20, 2022 | 6:29 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : संजय राऊत उद्या ईडी चौकशीला सामोरे जाणार नाहीत
मोठी बातमी
Follow us on

आज मंगळवार दिनांक 19 जुलै 2022  आज सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच शिवसेनेकडून बंडखोरी केलेल्या शिवसैनिक आमदार, खासदारांवर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्याच्य़ा काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र राज्याच्या काही भागात पाऊस अद्यापही सुरूच आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज आपन अशा सर्व घडामोडी जाणून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jul 2022 11:24 PM (IST)

    पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडीकडून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची चौकशी

    शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. पण संजय राऊत सध्या दिल्लीत असल्यामुळे ते उद्या चौकशीला सामोरे जाणार नसल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांनी आज ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आलीय.

  • 19 Jul 2022 11:21 PM (IST)

    संजय राऊतांना पुन्हा ईडीचे समन्स, राऊत उद्या चौकशीला जाणार नाहीत

    गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. उद्या सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. दरम्यान, संजय राऊत सध्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे ते उद्याच चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती मिळतेय.


  • 19 Jul 2022 11:17 PM (IST)

    शिंदे गटाचे राहूल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोदपदी कायम? ओम बिर्लांनी मान्यता दिल्याची सूत्रांची माहिती

    शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेटही घेतली. शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात यावी, तसंच मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांना कायम ठेवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शिंदे गटाची मागणी मान्य केल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

  • 19 Jul 2022 08:39 PM (IST)

    ईडी प्रकरणावरून भावना गवळींचा शिवसेनेला टोला

    ईडी प्रकरणावरून भावना गवळींचा शिवसेनेला टोला

    ही सगळी प्रकरणं कोर्टात आहे आणि कोर्टातली सगळी प्रकरणं ही एका दिवसात स्टँम्प देऊन क्लीनचीट होत नाहीत

    आम्ही सगळे शिवसैनिक आहोत

    खरी शिवसेना आणि वेगळी शिवसेना असं काही नाही

    हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंचा विचार आम्ही पुढे घेऊन जातोय

    सगळे खासदार एकत्रित काम करतील

    ईडी प्रकरणावरून होत असलेल्या टिकेला दिलं प्रत्युत्तर !

  • 19 Jul 2022 08:19 PM (IST)

    माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

    माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

  • 19 Jul 2022 07:38 PM (IST)

    ग्लोबल टीचर प्राईझ रणजितसिंह डिसले राजीनामा मागे घेण्याची शक्यता

    – ग्लोबल टीचर प्राईझ रणजितसिंह डिसले राजीनामा मागे घेण्याची शक्यता

    – ग्लोबल टीचर प्राईझ विजेते रणजितसिंह डिसले यांनी घेतली झेडपी सीईओ दिलीप स्वामींची भेट

    – 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षकपसाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच घेतली भेट

    – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर झेडपी सीईओंच्या भेटीने विविध चर्चांना उधाण

    – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले राजीनामा मागे घेण्याची शक्यता

    – डिसलेंना विचारले असता, मी दशसुत्री कार्यक्रमानिमित्ता भेटल्याची प्रतिक्रिया

    – रणजितसिंह डिसले आणि झेडपी सीईओ दिलीप स्वामींची ॲंटी चेंबरला एक तास चर्चा

  • 19 Jul 2022 07:37 PM (IST)

    आज आपल्या मुळावरती घाव घालायला सुरुवात केली आहे – उद्धव ठाकरे

    आज आपल्या मुळावरती घाव घालायला सुरुवात केली आहे. मागीतलं तर मी तुम्हाला काहीही देईल. माझ्यासमोर गद्दार असू दे किंवा आणखी कोण असू दे…सदस्य नोंदणी…कोण काय बोलतंय याकडे तु्म्ही लक्ष देऊ नका…त्या रागाचा भावनेचा प्रेमाचा…आलेली संधी सोडू नका…मी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माझा दौरा करणार आहे. दुसऱ्या पक्षात जे काय चाललंय…त्याबाबत मला काही माहित नाही. महत्त्वाच्या घडामोडी…

  • 19 Jul 2022 07:24 PM (IST)

    नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे किंवा ठाकरे कुटुंबाचे संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चांगलेच आहेत – संजय राऊत

    उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सांगतात. महाविकास आघाडी करतानाही त्यांनी भाजप आपली गळचेपी करत असल्याचंही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं होतं. ज्यांनी आपला अपमान केला, मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला नाही, त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

    नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे किंवा ठाकरे कुटुंबाचे संबंध बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चांगलेच आहेत. आता मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत ज्या कुणी गौप्यस्फोट केलाय. कदाचित त्यांना मोदींनीच सांगितलं असेल की आमच्या बैठकीत असं असं झालं होतं. 2014 ला भाजपनं जेव्हा शिवसेनेसोबत युती तोडली तेव्हा यातील किती जणांनी प्रश्न विचारले होते? तेव्हा आमच्या मनात युती करावी हाच विचार होता. आज आम्हाला विचारतात युती का तोडली? आता कितीजण प्रश्न विचारत आहेत. युती तोडण्यास शिवसेना जबाबदार नाही.

    2014 पासून पुढील संपूर्ण काळ कोण होतं भाजपला उत्तर देण्यासाठी? महाविकास आघाडीच्या काळात बाळासाहेब आणि शिवसेनेवरही हल्ले झाले, त्यावेळी यातील कितीजण होते हल्ले परतवून लावण्यासाठी?

  • 19 Jul 2022 07:09 PM (IST)

    ही केस शिवसेनेसाठी नाही तर देशासाठी महत्त्वाची आहे. कारण देशात लोकशाही आहे की नाही हे यावरून समजेल – आदित्य ठाकरे

    ही केस शिवसेनेसाठी नाही तर देशासाठी महत्त्वाची आहे. कारण देशात लोकशाही आहे की नाही हे यावरून समजेल. मी लोकांना भेटणार आहे. कोणावरही टीका करणार नाही. ज्यांना यायचं आहे ते येतील, ज्यांना नाही यायचं ते येणार नाहीत. यांच्यावरती गद्दारीचा लागलेला शिक्का लोकांनी पाहिलेला. ते गद्दार आहेत जगजाहीर आहे, ते गद्दारचं राहणार आहेत.

  • 19 Jul 2022 07:03 PM (IST)

    नागपूर विभागात जे अतिवृष्टी झाली त्यातील काही भागाची पाहणी केली

    नागपूर विभागात जी अतिवृष्टी झाली त्यातील काही भागाची फडणवीसांनी पाहणी केली

    वर्धा चंद्रपूर ला भेट दिली

    साधारणतः 120 टक्के पर्यन्त पाऊस पडला कमी दिवसात जास्त पाऊस पडल्याने नुकसान झाली

    1 लाख 35 हजार हेक्टर एवढं नुकसान शेतीच झालं

  • 19 Jul 2022 07:02 PM (IST)

    काँग्रेस आणि भाजपाचे दोन जेष्ठ नेते एकाच मंचावर

    काँग्रेस आणि भाजपाचे दोन जेष्ठ नेते एकाच मंचावर

    भाजप नेते विनय सहस्रबुद्धे आणि काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे एकाच मंचावर

    अरुण शेवते यांनी ऋतुरंग दिवाळी अंकातील संपादित केलेल्या नऊ पुस्तकांचा प्रकाशन समारंभ

    माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे विनय सहस्त्रबुद्धे, माजी जलसंधारण मंत्री शंकराव गडाख, जेष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आदी मान्यवरांच्या हस्ते होणार या पुस्तकांचे प्रकाशन

    ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अमरीश मिश्र यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार प्रकाशन सोहळा

  • 19 Jul 2022 06:28 PM (IST)

    आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल – राहूल शेवाळे

    २१ जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पक्षासोबत राहू. पण तेव्हा सांगितलं भाजपसोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला त्रास होतोय. असं सांगितलं. शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी त्या भूमिकेचं स्वागत करेल. त्यावेळी राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपने तो निर्णय घेतला तर मी स्वागत करेल अंस सांगितलं. त्याचं आम्ही स्वागत केलं. त्यानंतर पुन्हा बैठका झाल्या. तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला. पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितलं. आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल असं आम्ही सांगितलं. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींना भेटायला आले. तेव्हा या भेटीत मोदींकडे उल्लेख केला. त्यावेळी युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली. जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजप नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजप श्रेष्ठीत नाराजी पसरली. कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण त्या शिवसेनेकडून युतीचा रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत चार पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली नाही. आमच्या चार पाच बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीतही आम्ही युती करायला तयार आहोत. पण मला सहकार्य मिळत नाही. आम्ही सर्व त्यावेळी प्रयत्न करत होतो. पण एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे संजय राऊत हे महाविकास आघाडीसोबत बैठका आणि उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणं सुरू होतं. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाल्या. आम्ही युतीचे प्रयत्न करत असताना मार्गारेट अल्वांना पाठिंबा दिला गेला.

    दोन बैठका झाल्या होत्या. त्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रं दिलं. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी असताना त्या चार वर्षात त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला.त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं उचित वाटलं नाही. उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी रिस्पॉन्स आला नाही आणि राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो.

  • 19 Jul 2022 06:26 PM (IST)

    उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएला आमचा पाठिंबा आहे. विनायक राऊतांबद्दल आमची नाराजी होती – राहूल शेवाळे

    राहुल शेवाळे

    उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएला आमचा पाठिंबा आहे. विनायक राऊतांबद्दल आमची नाराजी होती. विनायक राऊतांना गटनेतेपदावरून हटवावं असं सांगितलं होतं. पण तो निर्णय त्यांनी घेतला नाही. त्यामुळे संवैधानिक हक्कातून आम्ही नवा गटनेता निवडला आहे. आम्ही कोणताही गट स्थापन केला नाही. आम्ही फक्त गटनेता बदलला आहे. अरविंद सावत यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांनी कॅबिनेटचा दिला होता. एनडीएतून बाहेर पडतोय असं कोणतंही पत्रं शिवसेनेने कधीच दिलं नाही. तसेच यूपीएत जात असल्याचंही पत्रं दिलं नाही. त्यामुळे आम्ही आजही एनडीएत आहोत.

  • 19 Jul 2022 06:15 PM (IST)

    या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात या वचननाम्यातील एकही गोष्ट नव्हती. पवारांनी संभाजीनगरच्या नामांतराबाबत भूमिका स्पष्ट केली.

    या आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात या वचननाम्यातील एकही गोष्ट नव्हती. पवारांनी संभाजीनगरच्या नामांतराबाबत भूमिका स्पष्ट केली. त्याचा किमान समान कार्यक्रमात उल्लेख नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. आम्ही १२ खासदारांनी राष्ट्रवादी विरोधात लढाई केली. त्यात जिंकलो. पण दुर्देवाने पडलेल्या उमेदवारांनाच बळ देण्याचं काम अडीच वर्षात झालं. महाविकास आघाडीकडून तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या काळात शिंदे यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही पक्षाकडे या भूमिका मांडत होतो. पण पक्षाने वेळ दिला नाही. त्यामुळे हा प्रसंग आला आहे.

  • 19 Jul 2022 06:14 PM (IST)

    वचननाम्याच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. पण दुर्देवाने महाविकास आघाडी झाली. 

    या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अजून पाच वर्ष एनडीएला म्हणजे भाजपसोबतची युती महत्त्वाची. भ्रष्टाचाराला आळा सर्व सामान्य जनतेसाठी नवनीवन रोजगार, महिला हिताचे कार्यक्रम, स्वयंरोजगाराची दृष्टी आदींचा सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान मोदींना अधिक संधी मिळावी म्हणून आमची ही युती आहे. हा वचननामा उद्धव ठाकरेंनी बनवला होता. या वचननाम्याच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. पण दुर्देवाने महाविकास आघाडी झाली.

  • 19 Jul 2022 06:11 PM (IST)

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर त्याचा आपल्याला फायदा होईल अशी भूमिका खासदारांची होती – राहूल शेवाळे

    आम्ही खासदार म्हणून आमची भूमिका मांडत आहोत. २०१९मध्ये आम्ही युतीतून विजयी झालो. २०१९चा आमचा वचननामा उद्धव ठाकरेंनी बनवला होता. त्यात पहिली गोष्ट होती. देशाच्या सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी कामगार आणि सर्व कष्टकरी जनतेच्या हितासाठी शिवसेना-भाजप एकत्र राहील, हिंदुत्वाचे रक्षण आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपसोबत युतीचा निर्णय आणि गेल्या 60-70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही असे महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन या पाच वर्षात सुरुवात झाली.

  • 19 Jul 2022 06:00 PM (IST)

    आमच्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलंच आहे – एकनाथ शिंदे

    मी आमची भूमिका वारंवार सांगितली आहे. आमच्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलंच आहे. पण महाराष्ट्रातील जनतेनेही त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलं आहे. निवडणूकपूर्व आमची युती होती. महिन्याभरात आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अडीच वर्षापूर्वी व्हायला हवं होतं. ते आता केलं. लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. आम्ही सरकार स्थापन केल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. इंधनापासून शेतीपर्यंतचे अनेक निर्णय घेतले. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे कामही सुरू केलंय. केंद्र सरकारचं पाठबळ मिळत आहे. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी काहीच कमी पडू देणार नाही, असं केंद्राने सांगितलं. केंद्र आणि राज्य एकत्र येऊन काम करत तेव्हा त्या राज्याचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना धन्यावाद देतो.

    जे जे खासदार २२ लाख मतदारांतून निवडून येतात. एवढ्या मोठ्या मतदारांचं नेतृत्व करतात अशा खासदारांनीही बाळासाहेबांच्या विचाराचं स्वागत केलं. लोकसभा अध्यक्षांना तसं पत्रं दिलं आहे. राज्यात जेवढं चांगलं काम करता येईल ते आम्ही करू…..

  • 19 Jul 2022 05:58 PM (IST)

    आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित खासदार

    आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे. सर्व बारा खासदार आहेत. त्यांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्रं दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करून १२ लोकांचं पत्रं दिलं आहे.

  • 19 Jul 2022 05:56 PM (IST)

    बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन केलं – एकनाथ शिंदे

    दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी आहे. त्यासाठी आलो आहे. वकिलांची भेट घेतली. सर्वात आधी १२ खासदारांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका आहे, जी आण्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन केलं.

  • 19 Jul 2022 05:55 PM (IST)

    १२ खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं – मुख्यमंत्री

    १२ खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं

    शिवसेनेच्या १२ खासदारांचं मी स्वागत करतो, त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो

    महाराष्ट्रात जे नवं सरकार स्थापण केलं. त्याबाबत अधिक बोलण्याची गरज नाही

    महाराष्ट्रातील जनतेने देखील मोठ्या प्रमाणात समर्थन केलं आहे

    गेल्या महिन्याभरात आम्ही तो निर्णय घेतला

    सर्वसामान्याचं सरकार आम्ही तयार केलं

    आम्ही अनेक निर्णय घेतले

    लोकहिताचे निर्णय देखील घेतले

  • 19 Jul 2022 05:34 PM (IST)

    संजय राऊत यांच्या ट्विटची राज्यात चर्चा

  • 19 Jul 2022 05:08 PM (IST)

    12 खासदारांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं

    12 खासदारांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं

    गटनेता बदलण्याची केली मागणी

    लवकरच निर्णय होण्याची शक्यता

    गटासंदर्भातसुद्धा लोकसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील

    आम्ही सगळ्यांशी तशी मागणी केली आहे

    मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकत्र काम करूयात असा सल्ला दिलाय

    पंतप्रधानांची वेळ अजून मिळाली नाही त्यासंदर्भात निर्णय होईल,..

    हेमंत गोडसे यांची माहिती

  • 19 Jul 2022 05:04 PM (IST)

    बारसू सोलगाव रिफायनरी विरोधात रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक

    रत्नागिरी – बारसू सोलगाव रिफायनरी विरोधात रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक

    मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांना रिफायनरी रद्द करण्यासाठी पत्राद्वारे विनंती

    रिफायनरी चे ड्रोन परिसर सर्वेक्षण आता आणि माती परीक्षण देखील थांबवण्याची केली मागणी

    नवीन मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे लक्ष

  • 19 Jul 2022 04:51 PM (IST)

    हिंगोली लोक सभेचे खासदार हेमंत पाटील यांचा पुतळा जाळला

    हिंगोली-हिंगोली लोक सभेचे खासदार हेमंत पाटील यांचा पुतळा जाळला

    सेनगाव येथील ठाकरे गटांच्या शिवसेनिकांनी जाळला पुतळा

    सेनगाव येथील तहसील कार्यालया समोर जाळला पुतळा

    शिंदे गटासोबत फोटो व्हायरल झाल्याने जाळला पुतळा

  • 19 Jul 2022 04:17 PM (IST)

    शरद पवारांच्या ट्विटची चर्चा

  • 19 Jul 2022 04:10 PM (IST)

    मनसे विध्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे वसईत दाखल

    मनसे विध्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे वसईत दाखल झाले आहेत..

    नालासोपारा पूर्व रेंजन्सी हॉल मध्ये अमित ठाकरे विध्यार्थी शी सवांद साधत आहेत

    विध्यार्थी यांच्याशी संवाद साधताना पत्रकारांना मात्र हॉल मध्ये थांबण्यास मज्जाव केला आहे…

  • 19 Jul 2022 04:05 PM (IST)

    शिवसेना सोडून जाताना आदरणीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे -रविकांत वरपे

    शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी आदरणीय शरद पवार साहेब व अजितदादा पवारांवर शिवसेना फोडीचे बेछूट आरोप केले. रामदास कदमांनी हे लक्षात घेतले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा एकनाथ शिंदेच्या मागे जी महाशक्ती उभी आहे त्या महाशक्तीने एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना पक्ष फोडला आहे,त्याच महाशक्ती पुढे तुम्ही लोटांगण घालणार आहात. आज तुमच्या सारखे जुने शिवसैनिक ज्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं मंत्रीपदे दिली परंतु शिवसेना सोडण्यासाठी तुमच्याकडे काही कारण नसल्याने असे बेछूट आरोप आदरणीय पवार साहेब व अजित दादांवर करत आहात. परंतु सत्तेसाठी सगळे शिवसेना सोडून जाताना आदरणीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. रविकांत वरपे

  • 19 Jul 2022 04:03 PM (IST)

    मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार

    मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच वाजता पत्रकार परिषद घेणार

  • 19 Jul 2022 03:45 PM (IST)

    राज्यातील विविध भागातील महिलांच्या अडचणी समज़ुन घेण्यासाठी ‘ महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जातोय

    राज्यातील विविध भागातील महिलांच्या अडचणी समज़ुन घेण्यासाठी ‘ महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जातोय

    ९१ तक्रारी आज या जनसुनावणीत पुढे आल्या. या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केले जात आहे

    सायबर सेलकडे २५,००० तक्रारी आलेल्या आहेत. यात १ हजार तक्रारी महिलांच्या आहेत.

    ऑन श्रीकांत देशमुख

    पिडीतेने १७ तारखेला गुन्हा नोंद केला गेलाय.
    १८ तारखेला तिची वैद्यकिय चाचणी केली गेली.
    सोलापूरला ती केस वर्ग केली आहे.

    ७ दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे राज्य महिला आयोगाने आदेश दिलेत.

  • 19 Jul 2022 03:36 PM (IST)

    गुगल मॅपने केला औरंगाबादच्या नावात बदल, नावात बदल केल्यामुळे खळबळ

    गुगल मॅपने केला औरंगाबादच्या नावात बदल

    औरंगाबाद बरोबर मॅपवर दाखवलं जातंय संभाजीनगर नाव

    गुगल मॅपणे नावात बदल केल्यामुळे खळबळ

  • 19 Jul 2022 03:35 PM (IST)

    एक दिवसासाठी लोकसभा सभागृहाचं कामकाज स्थगित

    एक दिवसासाठी लोकसभा सभागृहाचं कामकाज स्थगित

    शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट

    भेट घेऊन गटनेता बदलण्याची केली मागणी

    12 खासदारांच्या सहीचं पत्र लोकसभा अध्यक्षांनी मागवलं

  • 19 Jul 2022 03:16 PM (IST)

    राहूल शेवाळे यांच्यावरती झालेले आरोप पूर्णतः निराधार – कामिनी राहुल शेवाळे

     

    खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या 25 वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन 11 जुलै 2022 रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

    सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे 80 दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

    प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते!

    -सौ. कामिनी राहुल शेवाळे

  • 19 Jul 2022 03:14 PM (IST)

    आई समवेत गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्ष बालकावर बिबट्याचा हल्ला

    नंदुरबार फ्लॅश :- आई समवेत गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका तीन वर्ष बालकावर बिबट्याचा हल्ला

    – हल्ल्यात लकी वीरसिंग पाडवी या बालकाचा मृत्यू

    – नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील सरदार नगर भागातील घटना

    – घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण वनविभागासह प्रशासन घटनास्थळी दाखल

  • 19 Jul 2022 03:14 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांच्या भेटीवर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांच्या भेटीवर भिसी येथून सुरुवात करत पिंपळनेरी व अन्य गावात शेतक-यांशी साधला संवाद,

    या भागात गेले दहा दिवस सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा,

    उपमुख्यमंत्र्यांसमवेत या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया, भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे व प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित ,

    या भागात सखल क्षेत्रात असलेल्या पूल व नाल्यांच्या पुराच्या प्रश्नाकडे स्थायी स्वरूपाचा पर्याय उपलब्ध करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

  • 19 Jul 2022 01:45 PM (IST)

    जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांनी महापौरांना घातला घेराव

    जळगाव शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरिकांनी महापौरांना घातला घेराव
    पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, नागरिकांनी शिवाजीनगर परिसरात जन आक्रोश आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला, या आंदोलनाच्या ठिकाणी महापौर जयश्री महाजन यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली, रस्ते दुरुस्तीचे त्यांनी आश्वासन दिले, पण वेळोवेळी निवेदन देऊन, आश्वासन मिळत असूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी महापौरांना घेराव घालत संताप व्यक्त केला.
  • 19 Jul 2022 01:44 PM (IST)

    शेअर ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरणाऱ्या पाच जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर शाखेने अटक

    शेअर ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरणाऱ्या ५ जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर शाखेने अटक केली आहे.
    अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे माजी कर्मचारी असून, त्यांच्यावर स्टॉक ट्रेडिंग कंपनीचा डेटा चोरून तीन लोकांचे शेअर्स सुमारे 3.58 कोटींना विकल्याचा आरोप आहे.
    सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेडिंग कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी जून महिन्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
    तक्रारीत कंपनीने सांगितले की, ही डेटा चोरी मे ते 8 जून दरम्यान झाली आहे.
    त्यानंतर आरोपींनी स्टॉक ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत तीन ग्राहकांना फोन करून त्यांचे ओटीपी मागितले आणि ओटीपी मिळताच त्यांनी त्या ग्राहकांच्या डिमॅट खात्यात प्रवेश घेतला.
    प्रवेश घेतल्यानंतर आरोपींनी ते शेअर्स विकले आणि ते विकल्यानंतर त्यांना ३.५८ कोटी रुपये मिळाले जे त्यांनी दुसऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरले.
    अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने ओटीपी मिळविण्यासाठी इंटरनेटवरून कॉल केला होता आणि हा कॉल युनायटेड किंगडम (यूके) येथून असल्याचे दिसून आले.
  • 19 Jul 2022 01:32 PM (IST)

    गिरणा धरणातुन 2376 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग वाढविला.

    * गिरणा धरणातुन 2376 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग वाढविला..

    * धरणाचे 1 व 6 क्रमांकाचे दरवाजे 2 फुटाने उचले..

    * धरणातून एकूण 6 गेटमधून 9504 क्यूसेस वेगाने विसर्ग

    * गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इसारा

    * जुलै महिन्यात प्रथमच सलग चौथ्या दिवशी होतोय विसर्ग..

    * धरणात सध्या स्थितीत 92.12 टक्के पाणीसाठा ..

    धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

  • 19 Jul 2022 01:30 PM (IST)

    अरविंद सावंतांची रामदास कदमांवर टिका

    अरविंद सावंतांची रामदास कदमांवर टिका

    त्यांना सल्ला देण्याचा कोणताही अधिकार नाही

    त्यांच काय योगदान आहे त्यांना विचारा

    त्यांच राजकीय पुर्नवसन उद्ध् ठाकरेंनी विधापरिषदेवर पाठवतं केलं

    हे उपकार आहेत का त्यांचे

    उद्धव ठाकरेंचा यांनी छळ केलाय हा सगळा छळवाद महाराष्ट्र पाहतोय

    काय त्यांनी चर्चा केली का ?

    यांना कसली आली अस्वस्थता

    औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती कधी झुकले नाहीत

    हे उद्धव ठाकरेंना झुकवायला निघालेत

    हे आता उद्ध् ठाकरेंना सल्ला देणार का ?

    यांच्या मुलाला उमेदवारी दिली का शिवसैनिक उभा करता आला नाही

    तुम्ही तुमचा स्वार्थ साधता तेव्हा कुठे जातो परमार्थ तुमचा ?

    कठीण समय येतो तेव्हा पळून जाता उद्धवजींना कमी त्रास दिला का ?

    स्वार्थासाठी आंधळे झालेले लोक आहेत

    जो गट फुटलाय त्याला विलीन व्हावं लागेल जाताय का भाजपात ?

    तुम्हाला बोलायची संधी दिली का नाही आलात?

    अडीच वर्षात ते मातोश्रीवर फिरकले नाहीत

    शिवसेना प्रमुखांच नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही

    हे घटनेच्या विरोधात आहे

    दोन ततीयांश बाहेर पडले तरी त्यांना पक्षात विलीनचं व्हावं लागेल

    गट म्हणून तुम्हाला मान्यता नाही त्यांना विलीन व्हावं लागेल

    न्यायाची अपेक्षा आहे

    अरुणाचल प्रदेशात जो निर्णय लागला तो माहिती आहे

    अरविंद सावंत यांचा रामदास कदमांवर टिकास्त्र !

  • 19 Jul 2022 01:28 PM (IST)

    सुजित पाटकर यांची तीन तासापासून सुरू होती चौकशी.

    संजय राऊत यांच्याशी संबंधित मनी लौडरिंग प्रकरण..

    संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची ईडीकडून चौकशी..

    सुजित पाटकर यांची तीन तासापासून सुरू होती चौकशी..

    मुंबई ईडी कार्यालयात सुजित पाटकर यांची चौकशी झाली..

    अटकेत असलेल्या प्रवीण राऊत यांच्या प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आलं होतं..

    संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता आणि याआधी चौकशीही झाली होती..

    पाटकर यांच्याव्यतिरिक्त ईडीने आणखी काही लोकांना आज ईडीने चौकशीला बोलावलं आहे..

    अलिबागमधली जप्त केलेली जमीन आणि इतर व्यवहारसबंधी ईडीकडून चौकशी केली जात आहे।।

  • 19 Jul 2022 01:26 PM (IST)

    आगोदर तुमचा पक्ष दाखवा – अरविंद सावंत

    ते मोठे आहेत आहेत उद्धव ठाकरेंपेक्षा

    तेव्हा सुध्दा पक्षाला ब्लॅकमेक केल जात होतं

    सगळ्या गोष्टी उद्धवजींना केल्या आहेत.

    उद्धव ठाकरेंना घरी का बसवलं

    उद्धवजींना कमी त्रास का दिलाय का ?

    नैतिक अधिकार त्यांनी घालवला आहे

    संधीचा दुरुपयोग करताय हे अत्यंत चुकीचं आहे

    तुम्ही कोण आहात हे सिद्ध आहे

    आगोदर कोणत्या पक्षात जाताय हे सिद्ध करा

  • 19 Jul 2022 01:25 PM (IST)

    भारतीय जनता पक्ष कोणत्या पक्षाला संपवत नाही, तसेच आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत – रावसाहेब दानवे

    भारतीय जनता पक्ष कोणत्या पक्षाला संपवत नाही. तसेच आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. त्यामुळे कोणा एकामुळे पक्ष संपत असेल तर त्याला आम्ही काय करू असं रावसाहेब दानवे यांनी मीडियाला सांगितले.

  • 19 Jul 2022 01:09 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री दिल्लीला रवाना होण्याची शक्यता ?

    ब्रेक –

    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री दिल्लीला रवाना होण्याची शक्यता ?

    – विदर्भाचा दौरा आटपून दिल्लीकडे रवाना होणार,

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री दिल्लीत दाखल,

    – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता

  • 19 Jul 2022 01:09 PM (IST)

    जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ने केलं आंदोलन

    जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ने केलं आंदोलन

    नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय च्या समोर करण्यात आलं आंदोलन

    जोरदार घोषणाबाजी करत केलं आंदोलन

    जीवनावश्यक वस्तू वरील जीएसटी मागे घेतला नाही तर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा

  • 19 Jul 2022 12:47 PM (IST)

    रामदास कदम यांची पत्रकार परिषद

    शिवसेनासाठी संपूर्ण आयुष्य घालवलं

    अजून किती जणांची हकालपट्टी करणार

    रामदार कदम यांचा सवाल

    मीच राजीनामा दिला त्यामुळे हकालपट्टीचा प्रश्न नाही – कदम

    मी 52 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं – कदम

    राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एकही फोन आला नाही – कदम

    शिवसेनेवर आत्मपरीक्षण करण्याची वेळी  – कदम

    विनायक राऊतांनी शिवसेनेबद्दल बोलू नये

    विनायक राऊत यांच्यावर कदमांचा घणाघात

  • 19 Jul 2022 12:31 PM (IST)

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा युपीएला पाठिंबा

    उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा युपीएला पाठिंबा

    UPA उमेदवार मार्गारेट अल्वा यांना शिवसेनेचा पाठिंबा

    शिवसेना नेते खासदार संजय राऊत मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित

  • 19 Jul 2022 12:14 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचा आज जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांशी संवाद

    आमदारांपाठोपाठ आता शिवसेना खासदारांचेही बंड

    शिवसेनेमध्ये सुरू असलेली गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात

    आज सायंकाळी सर्व जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुखांशी साधणार संवाद

  • 19 Jul 2022 11:39 AM (IST)

    वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी

    शिंदे गटाचा शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का

    वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी

    शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेना राज्य सचिवपदी नियुक्ती

  • 19 Jul 2022 11:19 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर

    फडणवीसांकडून आज चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

    विदर्भात पूरपरिस्थिती भीषण, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान – फडणवीस

     

  • 19 Jul 2022 10:39 AM (IST)

    रामदास कदम लाईव्ह

    सेना कोसळताना पहावत नाही –  रामदास कदम

    रामदास कदम यांच्या डोळ्यात आश्रू

    अजून किती जणांची हकालपट्टी करणार

    रामदास कदम यांचा सावल

    शरद पवार यांनी शिवसेना फोडली – कदम

    पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली – कदम

    उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही  – कदम

    शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे – कदम

    52 वर्ष शिवसेनेसाठी लढलो – कदम

     

  • 19 Jul 2022 10:23 AM (IST)

    मराठवाड्यात शिवसेनेला खिंडार; एक खासदार शिंदे गटात सामील

    मराठवाड्यात शिवसेनेला खिंडार

    3 खासदारांपैकी 1 खासदार शिंदे गटात सामील

    तर 12 आमदारांपैकी 9 आमदार शिंदे गटात सामील

    शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील

    मराठवाड्यातील 90 टक्के शिवसेना शिंदे गटात सामील

  • 19 Jul 2022 09:56 AM (IST)

    संजय राऊत लाईव्ह

    कोणत्याही परिस्थितीत लढा देण्यासाठी शिवसेना तयार -संजय राऊत

    आमदारांनंतर आता खासदारांसाठीही पोलीस बंदोबस्त – संजय राऊत

    आता खासदार फोडण्यासाठी पोलीस बळाचा वापर – संजय राऊत

    जो होगा, देखा जायगा -राऊत

    एकनाथ शिंदे भाजपाचे मुख्यमंत्री – राऊत

    शिवसेना खासदारांना आमिष आणि धाक – राऊत

  • 19 Jul 2022 09:34 AM (IST)

    आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर यांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल

    राज्यातील चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक

    आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड या तरुणाने केली आर्थिक फसवणूक,

    आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांची फसवणूक

    मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी केली होती पैशांची मागणी

    पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

     

     

  • 19 Jul 2022 09:24 AM (IST)

    Bhandara : तब्बल 11 तासांनंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 6 तरुणांची सुटका

    मासेमारीसाठी गेलेले तरुण अडकले नदीच्या पुरात

    11 तासांच्या प्रयत्नानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या सहा तरुणांची सुटका

    पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकले होते तरुण

    पवनी तालुक्यातील पाथरीची घटना

  • 19 Jul 2022 09:01 AM (IST)

    राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील भाजपाच्या वाटेवर?

    मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनीही दिला दुजोरा

    राष्ट्रवादीचे उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील वाद विकोपाला

    त्यामुळे राजन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा

  • 19 Jul 2022 08:31 AM (IST)

    शहरातील 90 टक्के खड्डे बुजवल्याचा पुणे महापालिकेचा दावा

    शहरातील 90 टक्के खड्डे बुजवल्याचा पुणे पालिका प्रशासनाचा दावा

    तीन दिवसांत 968 म्हणजेच 90 टक्के खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा

    मात्र शहरातील अनेक भागात आजही जैसे थे परिस्थिती

    निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

  • 19 Jul 2022 08:02 AM (IST)

    चांदुर बाजारमध्ये पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू; तीन जखमी

    अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील फुगावमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली

    भिंत अंगावर पडल्याने आई आणि मुलीचा मृत्यू, तीघे जखमी

    जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

    पायल वऱ्हाडे आणि चंदा वऱ्हाडे असं या घटनेत मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे

    संततधार पावसामुळे कोसळली घराची भिंत

  • 19 Jul 2022 07:40 AM (IST)

    कोल्हापूर महापालिकेला शिंदे सरकारचा दणका; दहा कोटींचा निधी रोखला

    कोल्हापूर महानगरपालिकेसह कागल नगरपालिकेला शिंदे सरकारचा दणका

    कोल्हापूर महानगरपालिकेचा 10 तर कागल नगरपालिकेचा पाच कोटी रुपयांचा निधी रोखला

    कोल्हापूर महानगरपालिकेला पायाभूत  सुविधांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आला होता निधी

    निधी रोखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    कोल्हापूर महानगरपालिकेत सतेज पाटील तर कागल नगरपालिकेत माजी मंत्री हसन यांचं वर्चस्व

  • 19 Jul 2022 07:05 AM (IST)

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल 8.85 टीएमसी जास्त पाणीसाठा

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तब्बल 8.85  टीएमसी जास्त पाणीसाठा.

    खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून जोरदार पाऊस.

    गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत चारही धरणांमध्ये केवळ 9.73 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता.

    सध्या धरणांमध्ये तब्बल 18.58 टीएमसी पाणीसाठा