मुंबई : आज शुक्रवार 22 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांच्या मुंबईतील घरावर ईडीची धाड गोंदियात खळबळ उडाली आहे. गोंदियातील सीजे कंपनी 7 वाजताच बंद करण्यात आली. प्रफुल्ल पटेलांच्या 50 वर शाळा, महाविद्यालये बिडी कारखाने सुद्धा गोंदियात आहेत. सी.जे. कंपनी मार्फत कारखाने चालविले जातात. सर्वत्र सीजे नावानेच त्यांचा व्यवसाय सुरू आहे. प्रफुल्ल पटेलांच्या निकटवर्णियाचे फोन नाट रीचेबल आहेत. शरद पवाराचे खास माणूस म्हणून ओळख.
अभिनेता सोनू सुद याने घेतली खासदार श्नीकांत शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांची भेट
दिल्लीतील राहत्या घरी घेतली भेट
4 वाजता सदिच्छा भेट घेतल्याची माहिती
अवघ्या दहा ते 12 दिवसांच्या पावसाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 20 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
महापालिकेने 1 जुलै रोजी घोषणा केलेली दिवसाआड पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे,
शहरात या पुढे नियमित पाणी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
गेले दहा दिवस चंद्रपूर शहरातील सखल भागात इरई नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे झाले होते हाल,
या भागातील नागरिक शाळा- मंगल कार्यालये आदी ठिकाणी होते सुरक्षित स्थळी वास्तव्याला,
काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कुटुंबांना वितरित करण्यात आली धान्य व मदत सामुग्री
उल्हासनगर शहरात चौका चौकात मनेसेची बॅनरबाजी
अमित ठाकरे व पदाधिकाऱ्यांचे झलकले बॅनर
अंबरनाथ बदलापूर नंतर उल्हासनगर मध्ये थोड्याच वेळात सुरू होणार अमित ठाकरे यांचा महासंवाद
मनसे नेते अमित ठाकरे उद्या कल्याण डोंबिवली मध्ये येणार आहेत ,सकाळी 10 वाजता अमित ठाकरे कल्याण मधील स्प्रिंग टाईम क्लब मध्ये कार्यकर्त्यांशी भेटी गाठी घेत चर्चा करणार आहेत. तर सायंकाळी चार वाजता डोंबिवली पूर्व येथील सर्वेश हॉल मध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत चर्चा करणार आहेत.
राष्ट्रपतींचा सत्कार समारंभ आणि स्नेहभोजन कार्यक्रमाला लावणार हजेरी
दिल्लीत मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात येऊ शकतात
सदनाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान केले तैनात
7 वाजता मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात येण्याची शक्यता
त्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात !
शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
शिवसेना सोडून आपल्या गटात आल्यास शहराचा विकास केला जाईल अन्यथा शहराचा विकास थांबवून अडचणी निर्माण करण्यात येणार असल्याची दुसऱ्या गटाकडून मॅसेज द्वारे धमकी
मात्र मेसेज द्वारे होत असलेला दबाव व धमक्याला बळी न पडता जळगाव शहराची निष्ठा व नागरिकांचा विश्वास हा महत्त्वाचा असल्याने या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी केले स्पष्ट
महिनाभरापासून सुरू आहे साखळी उपोषण…
उपोषणाची दखल न घेतल्याने प्रांताधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा…
STP प्लांट अन्य जागेवर हलवावा ही प्रमुख मागणी
मोर्चात लहान मुलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी….
मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा…
प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा….
32 दिवसांपासून सुरू होते साखळी उपोषण…..
उपोषणाची दखल न घेतल्याने आज काढण्यात आला मोर्चा…..
हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिक सोमवारी माने यांच्या कोल्हापुरातील घर आणि कार्यालयावर काढणार मोर्चा
माने यांच्या भूमिकेबद्दल विचारणार जाब
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची माहिती
माने यांच्यावर उद्धवजींनी पुत्रवत प्रेम केलं
2019 च्या आधी संपलेल्या माने गटाला बळ दिलं
तरीही केलेल्या गद्दारी बद्दल जाब विचारणार
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी घरी जाऊन विचारणार जाब
माने यांच्या बंडखोरीने मुरलीधर जाधव आक्रमक
सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंतीचे पाठवले पत्र
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सोयीनुसार तीन नगरसेवकांची प्रभाग रचना केली होती
निवडणुक आयोगाला परत एकदा ओ.बी.सी. आरक्षणासहित प्रभाग रचना करणे बंधनकारक असल्याचे प्रताप सरनाईक याचं म्हणणे
येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये चार सदस्यांच्या प्रभाग रचना करण्याचा असलेला विषय मंजूर करून येत्या अधिवेशनामध्ये त्याची अंतिम मंजूरी घ्यावी, अशी मी आपणांस नम्र विनंती
शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग केला होता व त्यानुसार निवडणुकांही झाल्या होत्या
राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्याशी साधला संवाद, धानोरा , चिंचोली , कविठपेठ, विरुर स्टेशन या गावांना भेटी देत शेती- घरे- पुलांच्या नुकसानी संदर्भात घेतली माहिती,
50 हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्या, अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत,
राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाई बाबत निर्णय घेण्याचे केले आवाहन,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याचे केले आवाहन
ज्याच्याकडे संख्या जास्त त्याची शिवसेना
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे
एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळेल
2024 ला भाजपा शिवसेनेचं सरकार येईल
आम्ही एकत्रित निवडणूक लढवू
– पुण्यातील अलका टॉकीज चौकात महापालिका प्रशासनाविरोधात सेनेचे आंदोलन
– कुठं नेऊन ठेवलाय रस्ता माझा म्हणत शिवसेना करत आहे आंदोलन
– पुणे महापालिकेने याबाबत पुणेकरांननी उत्तर द्यावं अशी मागणी शिवसैनिक करत आहे
एकनाथ शिंदे यांच्याशी आमची कौटुंबिक चर्चा झाली, मी महाराष्ट्रात पुन्हा बाहेर पडणार आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवणा आहे. तसेच शंभुराजेंना विचारा कुणाचा फोन आला होता ते सांगतील. मला वाईट वागणूक दिली हे मी आधी सुद्धा बोललो आहे आणि पुढे सुद्धा बोलेल. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला हे मी लवकरच बोलणार आहे. तर आदित्य ठाकरे यांचे जेवढे वय नाही तेवढी राजकारणाची आमची वर्षे आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
शिवसेना बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुभाष देसाई हे विकास निधी देण्यासाठी 10 टक्के कमिशन मागायचे
1 कोटींचा निधी दिला तर 10 लाख रुपये कमिशन घ्यायचे
नुसतंच कमिशन मागायचे नाहीत तर त्यांनी 10 टक्क्यांनी माझ्याकडून कमिशन घेतलं
मी स्वतः सुभाष देसाई याना कमिशन दिलं आहे
असं खळबळजनक गौप्यस्फोट रमेश बोरणारे यांनी केला आहे.
आम्ही बंडखोर नाही, गद्दार नाही, आम्ही फक्त उठाव केलाय आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत,
मी स्वतः 25 वर्षे शिवसेना वाढवण्यासाठी रक्त अटवलं आहे, आदित्य ठाकरे आम्हाला गद्दार म्हणाले तरी आम्ही त्यांना उत्तर देणार नाही, शिवसेनेची चौकट आहे त्यांचा आम्ही समाचार घेतला आहे.
आम्ही भाजप सेना युतीत निवडून आलो त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार बनवलं त्यावेळी भाजपवले आम्हाला गद्दार म्हणत होते, बंडखोर म्हणत होते त्यामुळे आम्ही युतीच्या बाजूने कौल देण्याचा निर्णय घेतला
ठाकरे कुटुंबाबद्दल आम्ही बोलणार नाही पण त्यांच्या चमच्यांना सोडणार नाही, चंद्रकांत खैरे हे खूप बोलतात पण एक दिवस मी बोलेन चंद्रकांत खैरे यांचे कपडे उतरविन मला त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे
नागपूर ग्रामीणमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. नागपूर ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इटकीलवार शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
नाशिक – पोलिसांनी परवानगी दिली तर आदित्य ठाकरे यांना भेटायला जाणार असल्याचे बंडखोर आमादर सुहास कांदे यांनी सांगितले आहे.
शिवसेना हा प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे, संपर्क प्रमुखाकडे दोन वेळा निरोप दिला आहे, अजून भेटीचा निरोप आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात आले आहेत, त्यामुळे मातोश्रीवर भेटण्याचा मुद्दा नाही, असेही कांदे म्हणालेत.
आमदार या नात्याने मी मतदारसंघाचा प्रथम नागरिक आहे, मला मेळाव्याला बोलावले असते तर मी गेलो असतो, असेही वक्तव्य कांदे यांनी केले आहे. धनुष्यबाण चिन्ह आमचेच आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेवरही दावा केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षात जी परिस्थिती उद्धवली तीच शिवसेनेत आहे, असे कांदेंचे म्हणणे आहे. पक्षात उभी फूट आहे, विधानसभा आणि लोकसभेमध्ये 2/3 बहुमत आमच्या बाजूनं असल्यानं आमची खरी शिवसेना असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे.
पनवेल मध्ये उद्या भाजपची कार्यकारणी बैठक
भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या पनवेलमध्ये राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्या होणारे कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी त्यांनी उद्या काही राजकीय,सामाजिक ठराव घेतली जाणार असून राज्यातील आत्ताची राजकीय परिस्थिती आणि पुढील परिस्थिती यावर चर्चा होणार असून त्याविषयी काही ठराव येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
राज्यभरातून आमदार,खासदार आणि इतर मुख्य पदाधिकाऱ्यांसह जवळपास 800 पदाधिकारी या कार्यकारणी सभेला उपस्थित राहणार
पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये ही कार्यकारणी सभा पार पाडणार असून सकाळी दहा वाजता सभेचे कामकाज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाने होणार
मनसे विद्यार्थी सेनेची नवीन संघटना अमित ठाकरे यांची घोषणा
मनविसे कार्यकरणी ( युनिट ) नावाने स्थापन करणार संघटना
प्रत्येक कॉलेजच्या बाहेर संघटनेचे लावणार बोर्ड
अंबरनाथ मध्ये विद्यार्थी सोबत केली चर्चा करताना दिली माहिती
कोयना नगर परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का, कोणतीही हाणी झाली नसल्याची प्राथमिक माहिती
दुपारी 1वाजता
3 रेकटर स्केलचा सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला
भुकंपाचा केंद्र बिंदु कोयनाखोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्य दिशेला सात किलोमिटरवर
भुकंपाची जमिनीतील खोली 9 किलोमिटर
भुकंपाने कोणतीही हानी नसलयाची प्राथमिक माहिती
कोयना नगर परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का, कोणतीही हाणी झाली नसल्याची प्राथमिक माहिती
दुपारी 1वाजता
3 रेकटर स्केलचा सौम्य भुकंपाचा धक्का जाणवला
भुकंपाचा केंद्र बिंदु कोयनाखोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्य दिशेला सात किलोमिटरवर
भुकंपाची जमिनीतील खोली 9 किलोमिटर
भुकंपाने कोणतीही हानी नसलयाची प्राथमिक माहिती
अमृता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांना अनोख्या शुभेच्छा
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
विनायक राऊत , अरविंद सावंत राजन विचारे , यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची घेतली भेट
आमच्या सगळ्या प्रश्नांना लोकसभा अध्यक्ष यांनी उत्तर दिली नाहीत
आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली हे आम्ही विचारलं, याबाबत अधिकाऱ्यांनी अध्यक्षांकडे बोट दाखवलं
संसदेतील पदांच्या बदलाबाबत आज पुन्हा लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र, दोन पानांचे आज नवीन पत्र अध्यक्षांकडे सादर – विनायक राऊत यांची माहिती
लोकसभा सचिवालयाकडून चूक झालेली आहे,
राहुल शेवाळे यांना आता अक्कलदाढ सुचायला लागली आहे, एका नगरसेवक पदावरून खासदार पद शेवाळे यांना दिले त्यांनी आदित्य ठाकरे यांची अवहेलना करू नये, येत्या लोकसभा निवडणूक मध्ये शेवाळे यांची जागा मतदार दाखवून देईल -, राऊत
एकनाथ शिंदे यांनी सांगावं की मला सुरक्षा दिली नव्हती, शिंदे यांना योग्य ती सुरक्षा देण्यात आली होती – यावर शंभुराजे आणि केसरकर यांनी पोपटपंचीपणा करू नये – राऊत
आम्ही शिवसेनेच, आम्ही शिंदे नावाचा दुसरा गट स्थापन केला नाही
गट स्थापन करून दुसरीकडे कुठे आम्ही जाणार नाही
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेवून पुढे जातोय
मातोश्री शिवसेना भवन हायजॅक करावा अशी कुठलीही आमची भुमिका नाही
न्यायालयीन लढा आम्ही लढत आहोत
शिंदे यांच्यासोबत कायदेशीर लढाईत आम्ही त्यांच्यासोबत
आदित्या ठाकरे यांच्यावर टिका करणे आपल्या राजकारणात बसत नाही
दर पाच वर्षानी आम्ही निवडूका लढत आलोत, आम्ही शिवसेना सोडलेली नाही
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील आमदार हा भगवा घेतलेला आणि खासदार सुद्धा शिवसेनेचाच असेल
१६४ मतं असताना आमच्याकडे १८१ मते झाली आहेत
विरोधक राष्ट्रपती निवडणुकी बाबत शिंदे यांच्या बाबत अपप्रचार करत आहेत
विधानसभा अध्यक्षांना आणि बहुमतावेळी युतीचे आकडे वाढत गेलेत
एकनाथ शिंदे यांना धोका होता, त्या अनुशंघाने सगृराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठक पण घेतली होती
त्यानंतर हा प्रसंग घडलाय, तो प्रसंग शुंभुराजे यांनी सांगितला आहे
यात अजून काय घडलं हे शंभूराजे देसाई सागू शकतील
उद्धव ठाकरे यांनी दौरा करायचा नाही करायचा हा त्यांचा अधिकार
आम्ही शिवसेनेत आम्ही गद्दार नाही, हिच भुमिका आम्ही सर्वोच्च न्यायलायात मांडलीय
शिवसेना भाजपचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत
तर शिवसेना भाजपचे उपमुख्यमंत्री हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत
आमदार मोहन मते यांच्या जाहिरातीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
विनायक राऊत यांनी केलेली टिका हि खिलाडू वृत्तीने घेतली
कार्यालय सोडणे हा त्यांचा वैयक्तिक विषय
चांगल्या कार्यालय शुभ कार्यालय त्यांनी सोडू नये
रामदास कदम यांच्या संपर्कात कोकणातून कोण याची चर्चा केली
रामदास कदम यांनी घेतलेली भुमिका मोठी, संभाजीनगर पासून ते दौरा सुरु करणार
बाळासाहेबांचा विचारा पक्काकरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो
सर्व सामान्याचा शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला याचा अभिमान
मंत्री मंडळ विस्तार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं लवकरच विस्तार
अमरावतीतील विद्याभारती मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण…
विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू नंतर जवळपास 90 विद्यार्थ्यांना आई-वडील घरी घेऊन गेले…
मेळघाट मधील जामली येथील आदर्श कागे या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात झाला होता संशयास्पद मृत्यू….
मुलाच्या मृत्यूला महाविद्यालयात प्रशासन जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप.
या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत असून सध्या पोलीस वसतिगृहात तपासणी करत आहे….
गद्दारांनी पहिल उत्तर द्यावं की त्यांनी गद्दारी का केली
काहीही बोलायचं आणि ते करायतं
आपण सत्याच्या बाजूने उभे आहेत
कुणाचं वाईट कृत्य करायचं नाही.
नांदगावसाठी खूप निधी दिला आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज रात्री उशिरा अमित शाहांची भेट घेणार,
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती
खाते वाटपावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
एकनाश शिंदे गटाने मुळ शिवसेनेविरोधात ऊठाव केलाय, त्यानुळे जास्तित जास्त मंत्रीपदे आणि खाते या सगळ्यांना मिळावीत असा शिंदे गटाचा मानस…
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रात्री दिल्लीत दाखल होणार
मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडीला स्थगिती
मुक्ताईनगर राजकीय गोंधळ सुरू
आज मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदाची निवड असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी
वेळेवर नगराध्यक्ष पदाची निवड थांबवल्याने राजकीय गोंधळ सुरू
मुक्ताईनगर नगरपंचायतीवर राजकीय गोंधळ सुरू
मुक्ताईनगर च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे आपत्र केल्यामुळे ही निवड नगराध्यक्षाची होती
मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने शिंदे गटाचा नगराध्यक्ष होणार होता
नगराध्यक्षाच्या निवडीत राजकीय दोषापोटी ही निवड प्रक्रियेला स्थगितीचा आरोप केला आहे
जळगाव शिवसेनेला मोठा
युवा सेनेचे 80 पदाधिकारी व दोनशे युवा सैनिक शिंदे गटात सहभागी
आमदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश
एकीकडे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव युवा सेनेला मोठा धक्का
आदित्य ठाकरे यांच्या आधी सुहास कांदे यांनीच घेतला मनमाड मध्ये मेळावा
मेळाव्या नंतर कांदे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाणार आदित्य ठाकरे यांच्या भेटीला
मनमाड मध्ये सुहास कांदे आदित्य ठाकरे आमन्स सामने
मनमाड ला छावणीचे स्वरूप
आज सुद्धा त्यांचा अपमान होता कामा नये. हे जे संजय राठोड आहेत. त्यांचं ज्यावेळी लग्न ठरलं होतं. त्यावेळी ते जेलमध्ये होते. औरंगाबादचा लढा त्यांनी कितीवेळा दिला. शिवसेना आजही ताट आहे. तुम्ही लोकांच्या मनामध्ये कितीही संभ्रम काढा. एकनाथ शिंदे यांना वचन देण्यात आलं होतं. एकनाथ शिंदेंची मागणी काय होती. त्यांची तुम्ही बदनामी का चालवली आहे. आदराने आम्ही तुमच्याबद्दल बोलतो, तुम्ही सुद्धा आमच्याशी आदराने बोला
आदराने आम्ही तुमच्याबद्दल बोलतो, तुम्ही सुद्धा आमच्याशी आदराने बोला
उद्धव ठाकरे आजारी असताना आम्ही बंड केलेलं नाही.
शिवसेनेसाठी भुमरेंनी वर्षभर कारावास सहन केला
तुम्ही काय केलं अडिच वर्ष केलं ते सांगा
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा जो आदेश आहे ती भूमिका आम्ही घेणार
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना युपीएच्या उमेदवाराला मतदान करेल संजय राऊतांनी केल होतं जाहीर
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना युपीएच्या उमेदवाराला मतदान करणार ?
मुर्मुंना मतदान करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता तो आम्ही आदेश मानला
तसंच आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा आदेश पाळू
अरविंद सावंतांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत स्पष्ट केली भूमिका
मालवणात समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची स्टंटबाजी.
मालवण शहरात पुन्हा एकदा पर्यटकांची स्टंटबाजी किनारपट्टीवर पहायला मिळाली. आज सकाळी बंदरजेटी परिसरात पर्यटकांची एक गाडी समुद्रात स्टंट करताना दिसून आली. स्थानिकानी त्याला सूचना करूनही त्याने त्याकडे दुर्लक्ष करत आपली स्टंटबाजी चालूच ठेवली होती. यापूर्वी अशाच प्रकारच्या दोन घटनांमध्ये समुद्रात गाड्या फसण्याचे प्रकार घडला होता.पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अनेकदा जीवघेणा ठरतो.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट
भेट घेऊन गटनेता निवड चुकीची असल्याची केली तक्रार
गटनेता निवडीचा अधिकार हा पक्षाचा आहे
तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची केली मागणी
आर्टीकल 10 ए मध्ये पक्षाचा प्रमुख करतो आहे असं नमुद केलंय
असंविधानिक आणि अनैतिक सुरू आहे
ही लढाई महाराष्ट्राची नाही तर देशाची आहे
आम्ही जी याचिका दाखल केली होती
ती फेटाळून लावली असती मात्र ती आता घटनापीठाकडे जाणार हे काय खरं नाही
अरविंद सावंताचा इशारा
आम्ही लोकसभा अध्यक्षांना तीन पत्र दिली होती
तीन पत्र असताना लोकसभा अध्यक्षांनी निर्णय दिला नाही
19 च्या सकाळी आम्ही पत्र दिलं होतं आणि दूपारनंतर त्यांनी भेट घेतली
तर मग 18 तारखेला कसं पत्र दिलं..
हे असे पळवाटा शोधून सांगतायेत
ही काय कारणं आहेत का ?
मुख्यमंत्री कोणाला भेटतात हा त्यांचा विषय आहे
राहूल शेवाळे जे म्हणतात ते हास्यास्पद आहे
सुनील शिंदे निवडून आले तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला पाडून आले
2014 ला युती कोणी तोडली आणि 2019 ला उमेदवार पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले त्यांना विचारा
हे सगळं बेकायदेशीर आहे
राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत मुर्मुंना मतदान करण्याचे आदेश दिले होते
या निवडणुकीत त्याचच पालन होईल
अरविंद सावंत यांची भूमिका
– सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आमदार शहाजी बापू पाटलांना त्यांच्या पत्नीसाठी पाठवली रेशमी इरकल साडी
– बायकोला लुगडं घेण्याची ऐपत नसल्याचे शहाजी बापू पाटलांनी आपल्या व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये म्हंटले होते
– त्यामुळे आमदारांच्या पत्नीला शोभेल अशी आठ हजाराची इरकल साठी राष्ट्रवादीतर्फे पाठवली साडी
– अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिली भेट
– सोलापूर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्गे अनोखी भेट
– एका आमदाराला दीड ते पावणे दोन लाख रुपये मानधन असतानाही पाटलीन बाईला साडी घेता आली नाही म्हणून आम्ही साडी भेट पाठवतोय
शाळा सोडण्याच्या दाखल्यासाठी लाच मागण्याऱ्या मुख्याध्यापकासह . लिपिक व सहाय्यक शिक्षकाला लाच लुचपत विभागाने केली अटक.
सिहोरा येथील महाराष्ट्र शाळेची घटना.
तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने पीडित पालकाने लाच लुचपत अधिकारी कार्यालय गाठत तक्रार दिली.
सापळा रचला असता तडजोडीअंती अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने अटक केली आहे.
सुहास कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे म्हणून ते आरोप करतायत
झेड, झेड प्लस, वाय ही सुरक्षा पुरवणे हा केंद्राचा विषय असतो, सुरक्षेच्या बाबतीत रोंग नंबर लागला आहे, आता केंद्राने या गद्दारांना वाय सुरक्षा पुरवली आहे.
शंभूराज देसाई यांच्याकडे ग्रामीण सुरक्षा विभाग येतो त्यामुळे मातोश्री वरून फोन गेला हा आरोप खोटा आहे.
आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात जातात त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, जनता आणि शिकसैनिक त्यांच्यासोबत नाहीत त्यामुळे हे निवेदन देत आहेत, इतके दिवस त्यांना सुचलं नाही का निवेदन द्यायचं
स्वतःच्या पक्षाप्रमुखाला पदावरून काढणे हा उठाव नसून गद्दारी आहे, आणि हा उठाव असेल तर मग केंद्रात जाऊन अमित शहांचे पाय का चाटता, जनाधार सोबत नाही म्हणून हा आरोप आहे, यांनी शिवसेना सोडून समोर येऊन दाखवावे
ब्रेक – ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली…
– रामदास कदम एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आज ठाण्यात पोहोचणार
शिवसेनेचे निष्ठावंत नेते रामदास कदम यांनी शिवसेना नैतृत्वाला कंटाळून दिला होता राजीनामा…
शरद पवार यांच्याबद्दलही नाराजी केली व्यक्त… पक्ष फोडल्याचा केला होता आरोप…
रामदास कदम यांची पक्षातून हाकालपट्टी केल्याचं मुळ शिवसेनेनं केलं स्पष्ट…
– ११.३० नंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेणार रामदास कदम…
विनायक राऊत यांचा चुकीचा दावा आहे, लोकसभा अध्यक्षनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, आणि गटनेता म्हणून माझी निवड केली आहे
विनायक राऊत यांच्यावर सगळे खासदार नाराज होते, हिंदुत्व बाबत, विकास बाबत मुद्दे मांडताना त्यांनी आम्हा खासदारांना बोलायची संधी दिली नाही
इतर खासदाराना प्रश्न मांडायला राऊत देत नव्हते, त्यामुळं हा राग व्यक्त केला गेला
18 ला आमचं सबमिशन आहे, लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर पूर्तता केली आहे
उपराष्ट्रपती निवडणूक – संजय राऊत यांची भूमिका व्यक्तिगत असेल, आम्ही NDA उमेदवाराला पाठिंबा देणार
मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचं शिवसेना नेतृत्वाला टोला
मला शक्तीप्रदर्शन करायचं नाही
27 वर्ष जनतेत राहून काम करतो
त्या भागातील जनता माझ्यासोबत आहे हे मी माझ्या मतातून दाखवलंय
माझ्या मागे कार्यकर्त्यांच प्रेम आहे
आदित्य ठाकरेंच्या नेतत्वात आम्ही काम केलंय
त्यामुळे त्यांना काय आरोप करायचेत ते करू द्या मी यावर काही बोलणार नाही
आदित्य ठाकरेंच्या आरोपावर बोलण्यास नकार
शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभेमध्ये राहूल शेवाळे यांना गटनेता म्हणून निवडलं आहे
बाळासाहेब ठाकरेंचा विचार टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचललं त्यासाठी आम्ही समर्थन दिलंय
शिवसेना टिकावी यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय
आज पुण्यात भूमिका करणार जाहीर 3 वाजता मी पुण्यात भूमिका मांडेन
मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी रेल्वे मधून केला प्रवास
दादर ते अंबरनाथ लोकल ने केला प्रवास
विद्यार्थी विद्यार्थी तरुण अमित ठाकरे यांचा आज अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर येथे संवाद दौरा
युवक युवतींची करणार संवाद
अनेक महाविद्यालय विद्यार्थी मनसेत करणार प्रवेश
कार्यकर्त्यांमध्ये अमित ठाकरे यांच्या आगमनांचे जंगी तयारी केली आहे
अमित ठाकरे प्राचीन शिव मंदिरात जाऊन दुग्धअभिषेक करून नंतर संवाद दौराला सुरुवात करणार
– अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात रंगलय पोस्टर्स वॉर,
– दोन्ही नेत्यांच्या आदेशाला कार्यकर्त्यांनी फासले हरताळ,
– भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेत शहरभर शुभेच्छाचे पोस्टर्स,
– वाढदिवसानिमित्त पोस्टर्स नलावण्याचे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी केलं होतं आवाहन,
– पोस्टर्सचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करा दोन्ही नेत्यांनी केलं होतं आवाहन
मुर्मू या राष्ट्रपती झाल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्र दोऱ्यावर आहेत.ठाणे जिल्ह्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा महाराष्ट्र दौरा चांगला सुरु आहे. त्याचबरोबर त्यांना लोकांकडून प्रेम मिळतंय. पुन्हा शिवसेना राज्यात नव्याने उतरेल. न्यायाचं राज्य राखण्याची जबाबदारी मुर्मू यांची आहे. पहिल्यांदा आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्याने आम्हाला आनंद आहे. त्यात आमचा देखील काही प्रमाणात वाटा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने तिथपर्यंत त्या आल्या आहेत. त्यांना नक्कीच काही गोष्टी माहिती आहे.
आम्ही सगळे विरोधक लोक कोणत्याही पार्टीचे असोत, त्याचं आवाज दाबण्याचं काम केंद्रीय यंत्रणांमार्फत केलं जात आहे. या सगळ्या गोष्टी लोकांना माहित आहे. सोनिया गांधी पुन्हा चौकशीला बोलवलं होत. प्रफुल्ल पटेल यांच्यावरती काल ईडीची छाड पडली. तपास यंत्रणावरती केंद्राचा दबाव असल्याने त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे.
– पुणे शहर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस साजरा,
– केक कापून केला जाणार वाढदिवस साजरा,
– 100 नगरसेवक निवडणूक आणून देवेंद्र फडणवीस यांना गिफ्ट देणार,
– लाईव्ह फ्रेम दिलीय
मुंबईतील चारकोप पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे, जो कोणतीही लग्जरी महागडी बाईक दिसायचा आणि ट्रायल मागायचा आणि नंतर ती घेऊन पळून जायचा.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर इरफान सय्यद असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा असून तो हैदराबादचा रहिवासी असून मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहतो,
आरोपींविरुद्ध मुंबईतील चारकोप वांद्रे आणि ओशिवरा येथेही आलिशान महागड्या दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपीने कुणालाही लग्जरी महागडी दुचाकी दिसली तर त्याला थांबवून त्याचे कौतुक करायचे, नंतर त्याची दुचाकी त्याच बाजूला ठेवून त्याच्या दुचाकीची ट्रायल विचारायची आणि समोरची महागडी आलिशान दुचाकी पाहून तो फरार व्हायचा.
याप्रकरणी चारकोप पोलिसांनी चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या असून, त्यांची किंमत सुमारे 15 ते 20 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितले की, त्याला महागड्या आणि आलिशान दुचाकी चालवण्याचा शौक आहे आणि हा शौक पूर्ण करण्यासाठी तो महागड्या आणि आलिशान दुचाकी चोरतो.
सध्या चारकोप पोलीस आरोपीला अटक करत असून त्याने आतापर्यंत किती महागड्या दुचाकी चोरल्या आहेत, चोरलेल्या दुचाकीचे तो काय करतो, तसेच त्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
यंदा देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होणार साजरा
13 ते 15 ऑगस्ट या दोन दिवसात प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम राबवली जाणार
तिरंग्याचे तीन रंग घराला लावण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्टीट करून देशवासियांना केलं आवाहन …
हिंगोली-दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या खोलीतच गळफास घेतला आहे. स्वतःच्या ओढणीने गळफास घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वस्तीगृहातील घटना आहे.
– मेडीगट्टा धरणामुळे गडचीरोली आणि चंद्रपुरात भीषण पुरस्थिती आलीय
– आम्ही मेडीगट्टा धरणाला विरोध केला होता, पण गेल्यावेळेस भाजप सरकारने त्याला मंजुरी दिली
– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडचीरोलीत येऊन गेलेय, पण अद्याप मदत जाहिर झाली नाही
– त्यामुळे काँग्रेस कडून आम्ही आज आणि उद्या चंद्रपूर – गडचीरोली मदतीचं वाटप करणार
– शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे
……
– हे सरकार स्थगिती सरकार आहे, महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयावर हे सरकार सरसकट स्थगिती देत आहेत
– दीड वर्षांपूर्वीच्या कामांना स्थगिती दिली जातेय, हे योग्य नाही
– मंत्रिमंडळ विस्तार नाही, मग ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती कशी दिली जातेय?
– सर्वोच्च न्यायालयात घटला आहे, १ ॲागस्टपर्यंत हे सरकार मंत्रीमंडळ विस्तार करणार नाही
……..
( क्रॅास ओटिंग )
– राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत आमची मतं फुटली नाही
– शिवसेना आणि यांची मतं १८० आहे, यांना मतं मिळाली १८१ मग मतं फुटली कशी?
– आमच्याकडे ९८ मतं होती, तेवढी आम्हाला मिळालीय
– शिवसेनेनं द्रोपदी मुर्म यांना उघड पाठिंबा दिला होता, त्यांना त्यांची मतं मिळाली, एखादी अपक्षाचं मत मिळालं असेल
– आमची मत आम्हाला मिळाली
– उगाच मत फुटली असा गैरसमज केला जातोय
चंद्रपूर : वाघासाठी थांबविण्यात आलं महामार्गावरील ट्रॅफिक,
नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथील घटना,
वनविभागाने ट्रॅफिक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी करून दिला रस्ता,
परवा दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता मात्र रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे त्याला रस्ता क्रॉस करता येत नव्हता म्हणून वनविभागाने दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी दिला वेळ
हिंदुत्वासाठी लढलो ही काय चूक झाली आहे
एकनाथ शिंदेंना सुरक्षा द्यायची नाही असा मातोश्रीतून फोन आला
दहशतवाद्यांबरोबर आम्ही मांडीला मांडी लावून बसायचे आहे का ?
माझ्या जिल्ह्यात साधूंची हत्या झाली त्यांच्या मांडीला मांडी लावू बसायचं का ?
तुमच्या पर्यटन खात्यातून मी केलेल्या मागणीतून मला रिस्पोन्स दिला
आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेकदा मागणी केली
बाळासाहेबांचे वंशज असल्याने ते आमचे आदर आहेत
आदित्य ठाकरे माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहात
माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीत त्यांनी मी तात्काळ राजीनामा देतो
कोर्ट काय ते ठरवेल
आम्ही पक्षाच्या विरोधात मतदान केलं नाही
आमच्यात भगवं रक्त आहे
काल तुमच्या हातातला भगवा कुठे होतं
काल तुमच्या हातात भगवा दिसला नाही
आपण हिंदुत्व सोडून कुठे निघालो आहोत
आमची भेट ही आदरात्मक असेल
व्यासपीठावर जे लोक बसले होते, ते कोणत्या पक्षात जाऊन आले हे पाहावे लागेल
आदित्य ठाकरेंच्या विरोधात मी कोणताही पवित्रा घेणार नाही
औरंगाबाद जिल्ह्यातील 600 पेक्षा अधिक शाळांच्या वर्गखोल्याना गळती..
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक 621 शाळेत गळते पावसाचे पाणी..
एकीकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शाळेची दुरावस्था..
ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना करावा लागतो पावसाच्या पाणी गळतीचा सामना..
जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज..
महानगर पालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर
प्रभाग तीन मध्ये सगळ्यात कमी तर प्रभाग 51 मध्ये सर्वाधिक मतदार
सात प्रभागात झाले मोठे फेरबद्दल
पुढील आठवड्यात होणार ओबीसी आरक्षण सोडत
गुगलवर करणार औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती कारवाई..
गुगल मॅपवर शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आल्याने करणार कारवाई..
कायदेशीर कारवाई करण्याचा समितीने घेतला निर्णय..
कोणत्या आधारावर त्यांनी शहराचे नाव संभाजीनगर केले असा प्रश्न समितीकडून उपस्थित..
औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर वाद पुन्हा पेटणार..
सोशल मीडियावर शहराच्या नामांतराच्या पोस्ट फिरल्यानंतर समिती ॲक्शन मोडवर
जिल्ह्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांना रॉकेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण यांनी नागरी पुरवठा संचालक कान्हूराज बगाटे यांच्याकडे केली मागणी
नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वरिष्ठानकडूनही प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद
दुर्गम वाड्यावर त्यांना रॉकेल पुरवठ्याच्या अशा पुन्हा पल्लवी
जिल्ह्यातील अति दुर्गम हरपवडे धनगर वाड्याला संजय सिंह चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी दिली होती भेट
यावेळी धनगर वाड्यातील लोकांनी वीज आणि अति पावसामुळे सोलारही काम करत नाही त्यामुळे रॉकेल पुरवठ्याची केली होती मागणी
रिक्षात सीटवर प्रवाशांच्या ऐवजी बसला 5 फुटी अजगर
रिक्षाचालकाचा भीती ने उडाला थरकाप
कल्याण मधील टिटवाळा परिसरातील घटना
सर्पमित्रानी अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
वनाधिकारी याच्या सुचने नंतर निसर्गच्या सानिध्यात सोडून अजगराला केले मुक्त
सीमा भागातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण
हीरक महोत्सवी वर्षात शिवाजी विद्यापीठाचा क्रांतिकारक निर्णय
2022 – 2023 या शैक्षणिक वर्षापासून दिले जाणार मोफत शिक्षण
सीमा भागातील तब्बल 865 गावातील विद्यार्थ्यांना होणार फायदा
योजनेची माहिती देण्यासाठी बेळगाव आणि पितर जिल्ह्यात 26 जुलैपासून घेतल्या जाणार मार्गदर्शन कार्यशाळा
सीमा प्रश्नाचे भिजत घोंगडे असताना शिवाजी विद्यापीठाने घेतलेला निर्णय ठरतोय कौतुकास्पद
– ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर नव्याने 4 सदस्यांची प्रभाग रचना करण्याची मागणी,
– भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी,
– 3 सदस्यांच्या प्रभाग पद्धतीत सत्ताधार्यांनी आपल्या सोयीची प्रभाग रचना केल्याचा आरोप,
– नव्याने ओबीसी, महिला व अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण सोडती काढण्याची खर्डेकरांची मागणी.
अनिल परब विरुद्धच्या माझ्या याचिकेवर आज 11 वाजता मुंबई हायकोर्ट न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला उत्तम यांच्यासमोर सुनावणी
किरीट सोमैया
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर पर्शुराम घाटात आता तिसऱ्या डोळ्याची नजर
दरड प्रवण क्षेत्र असलेल्या सहा ठिकाणी सीसीटिव्हीची नजर
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पर्शुराम घाटात सीसीटिव्ही
कंत्राटदार कंपन्याकडून बसवण्यात आले सीसीटिव्ही
कोसळणाऱ्या दरडीमुळे पर्शुराम घाट बनला होता धोकादायक
नगरपालिका ग्रामपंचायतीसाठी आता होणार नव्याने आरक्षण प्रक्रिया
कोल्हापूर जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि 380 ग्रामपंचायतींसाठी होणार फेर आरक्षण प्रक्रिया
ओबीसी राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळाल्याचा परिणाम
दोन येत्या दोन दिवसात फेर आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
ओबीसी आरक्षण वगळून 15 दिवसांपूर्वीच झाली होती आरक्षण सोडत प्रक्रिया
मात्र ओबीसी आरक्षणा नंतर जुनी प्रक्रिया सरसकट रद्द होणार
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागली उतरती कळा,
– अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त,
– अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ,
– विशेष म्हणजे विद्यापीठात फक्त १४ प्राध्यापक राहिले आहे,
– सहयोगी ३५ तर सहायक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत ,
– गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा विद्यापीठाच्या दर्जावर परिणाम.
– विजेच्या खांबावरील पथदिवे लावतांना विजेचा धक्का लागल्यामुळे युवकांचा मृत्यू.
– ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याचा कार्य वीज प्रवाह सुरू असतांनाच अनेक दिवसांपासून करीत होता.
– घटनेची माहिती होताच गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक – आदित्य ठाकरे घेणार काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन
सकाळी 9.30 वाजता आदित्य ठाकरे देणारं नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट
आदित्य ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
त्यानंतर आज आदित्य ठाकरे देणार मनमाड आणि येवल्याला भेट
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. धरणात येणारे पाणी कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात कमी वाढ आहे. तर पानशेत धरण ७१ टक्के भरले असून वरसगाव धरण ६५ टक्के तर टेमघर धरण ५६ भरले आहे.
या पावसाळ्यात आता पर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, आज एकूण पाणीसाठा २० टीएमसी झाला असल्याने शहर आणि शेतीसाठी सिंचनाच्या पाणी पुरवठयासाठी ही काही प्रमाणात का होईना पण दिलासादायक बाब आहे.
खडकवासला -० मिमी, पानशेत -४ मिमी, वरसगाव- ७ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा २० ( ६८.६१ टक्के)* टीएमसी झाला आहे.
गेल्या २४ तासातील हा पाऊस आहे.मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १२.२३ (४१.८४ टक्के) होता.
नाशिक – खासदार हेमंत गोडसे आज नाशिक मध्ये होणार दाखल
शिंदे गटात गेल्यानंतर गोडसे आज पहिल्यांदाच होम पिचवर
कसारा घाटातून शक्तिप्रदर्शन करत गोडसे येणार नाशकात
नाशिकमध्ये गोडसे यांचा मेळावा
मेळाव्यात गोडसे काय बोलणार याकडे लक्ष
सीएनजी महागला पण भाडेवाढ नाही,
भाडे दर वाडी साठी 5 जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार रिक्षाचालकाचा बेमुदत संपावर !
संबंधित कोणत्याही यंत्रणेला निवेदन न देता फुकारणार बेमुदत संप
31 जुलैच्या रात्रीपासून प्रवासी भाडे न आकरता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटने कडून फुकारणार बंद
ठाणे , पालघर , रायगड , सिंधुदुर्ग , रत्नागिरी या परिसरातील रिक्षा चालक होणार सपात शामिल
-राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांच्या मुंबईतील घरावर ईडीची धाड गोंदियात खळबळ….
-गोंदियातील सीजे कंपनी 7 वाजताच बंद करण्यात आले…
-प्रफुल्ल पटेलांच्या 50 वर शाळा, महाविद्यालये….
-बिडी कारखानेसुद्धा आहेत गोंदियात….
-सी.जे. कंपनी मार्फत चालविण्यात येतात कारखाने….
-बिडिच्या भरोभ्यावर बनले प्रफुल्ल अब्जाधिश….
-सर्वत्र सीजे नावानेच त्यांचा व्यवसाय सुरू….
-प्रफुल्ल पटेलांच्या निकटवर्णियाचे फोन नाट रीचेबल….
-शरद पवाराचे खास माणूस म्हणून ओळख….