Maharashtra News Live Update : ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे-उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 29, 2022 | 3:12 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे-उद्धव ठाकरे
मोठी बातमी
Follow us on

मुंबई : आज रविवार 24 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. कल्याण कर्जत राज्य महामार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांदरम्यान असलेल्या चिखलोली परिसरात खड्डे पडले होते. अनेक दिवसांपासून हा महामार्ग खड्ड्यात गेल्यानं नागरिकांना त्रास होत होता. मात्र अखेर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं हे खड्डे बुजवण्यात आले असून नागरिकांनाही त्यामुळं दिलासा मिळालाय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jul 2022 07:58 PM (IST)

    ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे-उद्धव ठाकरे

    मुंबई- बंडखोरांनी केली बंडखोरी नाही तर हरामखोरीगिरी आणि नमकहरामी आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. त्यांना ठाकरे आणि शिवसेना हे नाते संपवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. हे शिवसेना नव्हे तर माझे वडीलही चोरायला निघाले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांचा फोटो न लावता स्वताचे फोटो लावावेत. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. आता सदस्य नोंदणी करायची आहे, शपथपत्र द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

  • 24 Jul 2022 07:53 PM (IST)

    आता जे मनावर दगड ठेवून केलं आहे, ते तेव्हा का नाही केलंत, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

    मुंबई- आता जे मनावर दगड ठेवून केलं आहे, ते तेव्हा का नाही केलंत, उद्धव ठाकरेंनी भाजपाला असा सवाल केला आहे. आत्ता जे केलं ते त्यावेळी केलं असतं. तर ही दगड ठेवण्याची परिस्थिती आली नसती, असा टोला त्यांनी लगावला आहे. अडीच वर्षे भाजपाच्याही एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता असेही ते म्हणाले. आता सामान्यांतून असामान्य व्यक्ती पुन्हा उभ्या करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी २०१९ साली केंद्रात जे मंत्रिपद नको होतं तेच दिलं होतं, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आत्ताचा जो प्रयत्न आहे तो शिवसेना संपवण्याचा आहे. भाजपाला शिवसेनेचा भगवा पुसायचा आहे.

  • 24 Jul 2022 07:48 PM (IST)

    शिवसेनेची पाळंमुळं घट्ट आहेत, आता चित्र स्पष्ट होतंय- उद्धव ठाकरे

    मुंबई – हल्ली दिवस असे आहेत की आमदार-खासदार जे बोलतील ते ऐकावंच लागतंय. सध्या कोण कुणासोबत आहे हे कळतच नाही. पण अरविंद सावंतांसारखे अनेक जण आहेत, ते आमच्यासोबत आहेत, शिवसेनेची पाळंमुळं घट्ट आहेत. हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. सच्चा शिवसैनिक त्यांच्यासोबत गेलेला नाही. जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता येते. जे गेलेत ते शिवसैनिकांच्या गर्दीत उभे राहू शकतील का, असा सवाल त्यांनी केला आहे. गद्दार हा शिक्का त्यांनी कपाळावर मारुन घेतला आहे.

  • 24 Jul 2022 05:42 PM (IST)

    विरारमध्ये कारचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू

    विरार:- विरार मध्ये झाडावर आदळून कारचा भीषण अपघात झाला आहे.

    विरार पूर्व ते विरार फाटा या मुख्य रस्त्यावरील राईपाडा येथे हा अपघात झाला आहे.

    या अपघातात कार ची एक बाजू पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून, कार मधील एकाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला आहे.

    आज सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

    दीपेश मर्चंडे आणि जतीन पाटील असे अपघातात मयत झालेल्या दोघांची नाव आहेत.

  • 24 Jul 2022 04:24 PM (IST)

    गडचिरोलीच्या पूरग्रस्तांचे अश्रू कोण पुसणार?, वडेट्टीवार यांचा सवाल

    गडचिरोली पूरग्रस्त भागाची पाहणी करताना राज्य सरकारवर विजय वडेट्टीवार यांच्या आक्रोश

    सांगली कोल्हापूर सोलापुरात पुर आला की प्रत्येक नेते धावपऴ करतात, गडचिरोलीच्या पूरग्रस्त आदिवासी यांचे अश्रू पोसणारा कोण

    मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री -मंत्री मंत्रिमंडळ विस्तार करा -की नको करा परंतु पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्यांना ताबडतोब मदत द्या वडेट्टीवार मागणी

    भाजप सरकारच्या मागील पापामुळेच हे नुकसान मेड्डीगट्टा धरणं बांधण्यात आले व मेडीगट्टा धरणाला मागील भाजप सरकारने मंजुरी दिली

    या धरणाच्या बॅकवॉटरमुळेच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावाचे झाले नकसान

     

  • 24 Jul 2022 04:06 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व परतवाडा या दोन शहराचा पाणी पुरवठा बंदच

    अमरावती- मागील सहा दिवसापासून पाणी पुरवठा बंदच आहे.  सापन नदीला आलेल्या पुरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली आहे. अचलपूर व परतवाडा शहरात सध्या टँकरने पाणी पुरवठा होतो आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे युद्ध स्तरावर काम सुरू आहे. भर पावसाळ्यात पिण्यासाठी पाण्यासाठी अचलपूर व परतवाडा मध्ये हाहाकार आहे.

  • 24 Jul 2022 03:27 PM (IST)

    शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेनेतून तसेच जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी  

    बुलडाणा – जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस  देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त आज रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.  मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी शिवसेनेच्या 12 खासदाररांनी गट तयार करून 12 खासदाराचें पत्र लोकसभा सभापतींना देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दिला होता.  यानंतर जिल्ह्यातील  काही शिवसेना पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते.  सामना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतुन हकालपट्टी केलीय, तसेच त्यांच्या जागी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत..

  • 24 Jul 2022 03:21 PM (IST)

    मातोश्रीवर नाशिक व पुण्यातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांनी भेट

    मुंबई -मातोश्रीवर आज नाशिकमधून 36 नगरसेवक व शिवसैनिक पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. त्यातच पुण्यामधून देखील काही शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली,  आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहोत, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • 24 Jul 2022 03:13 PM (IST)

    चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज, वेगळा निर्णय घेण्याचा इशारा

    मुंबई- विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसते आहे. कार्यकर्ते  अणि आपण ज्यांनी क्रॉस वोटिंग केले त्यांच्यावर नाराज आहोत, कारवाई झाली नाही तर वेगळा निर्णय घेऊ असे वक्तव्य चंद्रकांत  हंडोरे यांनी केले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि मुंबईचे प्रभारी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे चेंबूर मध्ये शक्ती प्रदर्शन केले. हंडोरे हे ज्या भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेचे चेंबूर येथे चिंतन शिबिर सुरू आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडीवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे चिंतन शिबिर होत आहे. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त होत होता. त्या पार्श्वभूमीवर आजच्या या चिंतन बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे हंडोरे यांनी सांगितले.   .

     

  • 24 Jul 2022 03:08 PM (IST)

    नवी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाची बैठक

    नवी दिल्ली – राजधानी नवी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला. 31 वर्षे तरुणाला मंकी पॉक्स आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. देशातील रुग्णांची संख्या 4 वर पोहचली आहे. मंकीपॉक्सबाबत विचार करण्यासाठी दुपारीतीन वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शक्यता आहे.

  • 24 Jul 2022 03:01 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा शपथविधी उद्या सकाळी १०.१५ वाजता

    नवी दिल्ली- राष्ट्रपतीपदाचा शपथविधी उद्या सकाळी सव्वादहा वाजता होणार आहे.  दहा वाजून पंधरा मिनिटांनी द्रौपदी मुर्मु राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत.  भारताचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतील.  संसदेमध्ये हा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा सभापती, पंतप्रधान नरेंद्र मोदी,  केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शपथविधी समारंभाला उपस्थित असणार आहेत. शपथविधी समारंभ झाल्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. सलामीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे अभिभाषण होईल. पंधराव्या राष्ट्रपती म्हणून उद्या द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती पदाचा कार्यभार कार्यभार हाती घेतील.

  • 24 Jul 2022 01:43 PM (IST)

    काम चांगल्या क्वालिटी ची झाली पाहिजे ती जर झाली नाही तर मी तोडायला लावतो

    काम चांगल्या क्वालिटी ची झाली पाहिजे ती जर झाली नाही तर मी तोडायला लावतो

    नागपूर काटोल च काम सुरू झालं मात्र त्या ठिकाणी वनविभागाने काम करू दिलं नाही

    6135 कोटी रुपयांची काम नागपूर जिल्ह्यात झालीं आहे काही काम सुरू आहेत

    नदी नाल्यांचं खोलीकरण करण आणि पाण्याच नियोजन आवश्यक

    मी धापेवाडा येथे राहायला आलो तर हा रस्ता माझ्यासाठी सुदधा चांगल्या उपयोगाचा ठरणार

  • 24 Jul 2022 01:42 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या दिल्लीत

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या दिल्लीत

    उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकींसदर्भात विरोधी पक्षाच्या बैठका होण्याची शक्यता

    उद्या दुपारी 3 वाजता दिल्लीत होणार दाखल

  • 24 Jul 2022 01:16 PM (IST)

    नागपूरच्या विकासात गडकरी यांनी मोठं काम केलं

    देशभरात ज्यांनी आपल्या कामाच्या भरवशावर नाव कमावल त्या गडकरी यांच्या मुळगावत आज कार्यक्रम होत आहे

    नागपूर च्या विकासात गडकरी यांनी मोठं काम केलं

    डायरेक्ट मध्ये प्रदेशाला जोडणारा हा रस्ता बनला आहे

    काही लोकांना सवय आहे तुम्ही काम केले त्याच उदघाटन करून दुसरे श्रेय घेतात

    सावनेर विधान सभेत गडकरी यांच्या व्यतिरिक्त कोणीही एक काम केलं नाही

    एकादशीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात त्यांना पावसात थांबावं लागते त्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल यासाठी आपण निधी मिळून ध्यावा

  • 24 Jul 2022 01:16 PM (IST)

    भाजप मुख्यालयात आज बैठकांच सत्र

    भाजप मुख्यालयात आज बैठकांच सत्र

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी नवी दिल्लीत दाखल

    देशातील भाजपशासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आजच्या बैठकीच निमंत्रण

    राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार

    देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात दाखल होणार

  • 24 Jul 2022 12:47 PM (IST)

    संजय राऊतांचा तोल गेला आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका

    मी काय सांगतो हा काय झांझावात नाही. जी काय रॅली काढली, आदित्य ठाकरे काय बोलणार हे पाहायला लोक आली होती. लोक त्यांच्यासोबत नाहीत हे आम्ही वेळप्रसंगी तुम्हाला दाखवू

    मी काय सांगतो. बहुतांश पदाधिकारी बाळासाहेबांच्या विचाराचे आहे. त्यामुळे ते शिंदे गटासोबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लवकरचं दौरा सुरु आहे

    चौऱ्यामाऱ्या करून आलेले सरकार…संदीपान भुमरेला वडापाव खाता येत नाही…संजय राऊत शिवसेना वाढीसाठी आम्ही पंचवीस वर्षे काम केलं. संजय राऊतांचा तोल गेला आहे. आमच्यावरती त्यांनी आत्तापर्यंत अनेक आरोप केले आहेत.

  • 24 Jul 2022 12:38 PM (IST)

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका

    24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या , मंत्रिमंडळ विस्तार नाही विरोधकांची टीका – विरोधकांचे काम आहे टीका करणे त्यांच्या असवेदनशीलतीमुळे ही परिस्थिती आली आहे

    गडकरी यांचे वक्तव्य सत्ता कारण होत आहे , राजकारणात बदल होत असतात – देवेंद्र फडणवीस यांची गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

    संजय राऊत यांना आता तरी समज यायला पाहिजेत ,त्यांनी पक्षाची काय अवस्था केली हे माहिती आहे , कशाला त्यांच्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारता

    देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं

  • 24 Jul 2022 12:16 PM (IST)

    अमरावतीच्या वरुड तालुक्यात मुसळधार मुसळधार पाऊस, संत्रा बागांना तलावाचे स्वरूप

    1. अमरावतीच्या वरुड तालुक्यात मुसळधार मुसळधार पाऊस.
    2. पावसामुळे वरुड तालुक्यात संत्रा बागांना जबर फटका..
    3. संत्रा बागात साचले गुडघाभर पाणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..
    4. संततधार पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्यामुळे संत्राची गळती वाढण्याची भीती…
    5. विदर्भाचा कॅलिफोर्निया असलेल्या वरून तालुक्यातील संत्रा बागांमध्ये संत्रा बागांना तलावाचे स्वरूप
  • 24 Jul 2022 12:15 PM (IST)

    वैतरणा धरणातून 610 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

    नाशिक – वैतरणा धरणातून 610 क्यूसेस पाण्याचा विसर्ग

    धरण पाणलोट क्षेत्रात पावसाल पुन्हा सुरुवात

    मुंबईची तहान भागवणारे वैतरणा धरण 80 टक्के भरले

    धरणाचा एक दरवाजा उघडला

  • 24 Jul 2022 12:10 PM (IST)

    महाराष्ट्रातील एकच गोळवलकर विद्यालय का आहे सर्व राज्यात गोळवलकर विद्यालय असल पाहिजे

    – महाराष्ट्रातील एकच गोळवलकर विद्यालय का आहे सर्व राज्यात गोळवलकर विद्यालय असल पाहिजे .

    – सावकार एक विचार आहेत.त्यांचे विचार लहान मुलामध्ये भिनले आहेत.

    – सावरकरा बदल लहान मुलाल कळत मग दिल्लीत त्याला 50 वर्ष असणाऱ्या मुलाला कळत नाही,(Rahul Gandhi )गोळवलकर शब्द म्हणता येत नाही

    – सावरकर यांचा अपमान देशात झाला तेवढा कोणीच केलं नसल
    सावरकर नावाची दहशत किती आहे हे काँग्रसला माहीत आहे.

    – माझे जवळेचे स्नेही मुख्यमंत्री झालेत त्यांना सांगेल मी सावरकर विचार राज्यात शाळेत पोहविण्यासाठी मी प्रयत्न करेल .सर्व शाळेत कसा घेऊन जाता येईल मंत्रीमंडळ

    – वाटेल ते सावरकर बदल बोलतात सावरकर वर आक्षेप घेणारे खूप आहेत.उत्तर देणारे कमी आहेत.

    – सावरकर समजत नाहीत म्हणून त्यानं विरोध

  • 24 Jul 2022 11:50 AM (IST)

    डेहराडूनच्या डोईवाला इथं अपघात

    डेहराडूनच्या डोईवाला इथं अपघात
    लच्छीवाला टोल प्लाझा इथं टोल प्लाझाच्या केबिनला धडकल्यानंतर एक वेगवान ट्रक पलटी

    संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद

    व्हिडिओ हॉट लाईन वर पाठवला आहे

  • 24 Jul 2022 11:50 AM (IST)

    अभिनेते शरद पोंक्षे व दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट येथे कार्यक्रम,

    – डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय
    मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रम,

    – अभिनेते शरद पोंक्षे व दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत
    गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट येथे कार्यक्रम,

    – शरद पोंक्षे बोलतायत

  • 24 Jul 2022 11:44 AM (IST)

    गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात

    – सोलापूर – गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात

    – अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी

    – जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलंय

    – रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांना देखील पाचरण करण्यात आलं

    – सकाळी 10.30 च्या सुमारास अपघात झाले असून कारण अद्याप समोर नाही

  • 24 Jul 2022 11:36 AM (IST)

    दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

    दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. हा रुग्ण 31 वर्षांचा आहे. त्याला ताप आणि त्वचेच्या जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 24 Jul 2022 11:31 AM (IST)

    उद्याच्या कोल्हापूरातील मोर्चाला विरोध करू नका

    उद्याच्या कोल्हापूरातील मोर्चाला विरोध करू नका

    कार्यकर्त्यांना धैर्यशील माने यांच आवाहन

    तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मतदारसंघात आल्यावर देणार

    दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं मी दिल्लीत आहे

    तुमच्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे

    मोर्चाला कोणताही प्रतिकार किंवा प्रतिवाद होता कामा नये

    पत्राद्वारे खासदार धैर्यशील माने यांच आवाहन…

  • 24 Jul 2022 11:30 AM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत.

    आदित्य ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यासाठी बाहेर पडणार आहेत.

    ऑन देवेंद्र फडणवीस- 9 वाजता बोलणारे कमी झाले
    त्यांना देखील माझा लाऊड स्पीकर एकावं लागतं सरकार कधी पडणार याच्या पिपाण्या वाजवल्या जातं होत्या. परंतु आमचा लाऊड स्पीकर जो महाराष्ट्राचा आवाज आहे. भोंगे आणि लाऊड स्पीकर यात फरक आहे. आमचा लाऊड स्पीकर मागच्या 56 वर्षांपासून सुरु आहे. तुम्ही सरकार सांभाळा. लवकरच अंतर्गत कलाहाने हे सरकार पडेल. हे सरकार राहणार नाही. किती वेळा दिल्लीला जाल..

    देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचं चॅलेंज

    हा लाऊस्पिकर तुम्हाला बधीर केल्या शिवाय राहणार नाही मिस्टर फडणवीस…
    तुम्ही ईडी, सीबीआय माझ्या मागे लावा. त्यांनी लक्षात घ्यावं त्यांची आनेक कटकारस्थाने माझ्याकडे आहेत. त्यामुळें I am ready to face any Action

    चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन करतों कारण त्यांनी कोल्हापूरच पाणी दाखवलं. त्यांच्या पोटात जे मळमळत होतं ते ओटावर आलं

    उद्धव ठाकरे फोन उचलत नव्हते
    मी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलतं आहेत. माणूस किती खोटं बोलू शकतो हे उघड करणारा तो व्हीडिओ आहे. पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडण्यात आलं

    ऑन बाबसाहेब पुरंदरे
    मला त्याबाबत माहिती नाही मी त्याबाबत बोलणारं नाहीं

  • 24 Jul 2022 11:30 AM (IST)

    पन्हाळगडावरील अवैद्य कृत्य बंद करा

    पन्हाळगडावरील अवैद्य कृत्य बंद करा

    गडाच्या पडझडीची तात्काळ दुरुस्ती करा

    गडांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करा

    शिवप्रेमींची मागणी

  • 24 Jul 2022 11:29 AM (IST)

    खानदेशात आणि नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का…

    बिग ब्रेक – खानदेशात आणि नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का…

    माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे शिंदे गटात होणार सामिल… आज हजारो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नंदनवन इथे ५ वाजता करणार पक्ष प्रवेश…

    नंदूरबार जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहीती…

    शिंदे गटाला समर्थन देणारे फॉर्म या सगळ्यांनी पाच दिवसांपुर्वी भरुन दिलेयत….

    माजी आ.चंद्रकांत रघुवंशी हे २४ जुलै रोजी संध्याकाळी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात दाखल होणार सामिल…

  • 24 Jul 2022 11:29 AM (IST)

    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने पुल बांधण्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश

    नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने पुल बांधण्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश

    काही दिवसनापूर्वी वाहून गेला होता आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल

    एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल

    पहिल्याच पावसात आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने बांधला गेलेला पूल गेला वाहून

  • 24 Jul 2022 11:21 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा राजधानी दिल्ली दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा राजधानी दिल्ली दौऱ्यावर

    उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री हजर राहणार

    महाराष्ट्र राज्यात शपथविधी झाल्यापासून चौथ्यांदा मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर येणार

    आज रात्री 12 ते उद्या सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर

  • 24 Jul 2022 11:21 AM (IST)

    खानदेशात आणि नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का…

    बिग ब्रेक – खानदेशात आणि नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का…

    माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी हे शिंदे गटात होणार सामिल… आज हजारो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नंदनवन इथे ५ वाजता करणार पक्ष प्रवेश…

    नंदूरबार जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहीती…

    शिंदे गटाला समर्थन देणारे फॉर्म या सगळ्यांनी पाच दिवसांपुर्वी भरुन दिलेयत….

    माजी आ.चंद्रकांत रघुवंशी हे २४ जुलै रोजी संध्याकाळी मुंबई येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटात दाखल होणार सामिल…

  • 24 Jul 2022 11:14 AM (IST)

    जुन्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात रस्त्यावर आला बिबट्या

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आळेफाटा परिसरात रस्त्यावर आला बिबट्या

    बिबट्याला धरधाव गाडीने दिली धडक

    धडकेत बिबट्याचा गंभीर जखमी

    रस्त्यावर अचानक बिबट्या आल्याने गाडीची बसली धडक

    जखमी बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात नेण्यात आलंय

    तिथे त्यावर उपचार केले जातील..

    काल रात्री 11 वाजताची घटना !

  • 24 Jul 2022 11:05 AM (IST)

    पन्हाळगडावरील अवैद्य कृत्य बंद करा, शिवप्रेमींची मागणी

    पन्हाळगडावरील अवैद्य कृत्य बंद करा

    गडाच्या पडझडीची तात्काळ दुरुस्ती करा

    गडांच्या संवर्धनासाठी वेगळं महामंडळ स्थापन करा

    शिवप्रेमींची मागणी

  • 24 Jul 2022 10:58 AM (IST)

    मालेगावात खडीकरण रस्ता आणि फरशी पूल आणि वाहून गेला, दळणवळण ठप्प

    मालेगावात खडीकरण रस्ता व फरशी पूल आणि वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे दळणवळण ठप्प

    हिंगवे शिवारातील सिमेंट बंधाऱ्याचा बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

    कळवण तालुक्यातील पाळे खुर्द-असोली दरम्यानचा रस्ता पाण्यात वाहिला

  • 24 Jul 2022 10:47 AM (IST)

    नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा उद्या

    नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा उद्या (25 जुलै)

    संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार

    शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार

    मुख्यमंत्री  आज रविवार रोजी रात्री दहा वाजता विमानाने नवी दिल्लीकडे रवाना होतील

  • 24 Jul 2022 10:35 AM (IST)

    पन्हाळगडावर चालणाऱ्या अवैध कृष्टविरोधात शिवप्रेमी आक्रमक

    किल्ले पन्हाळगडावर चालणाऱ्या अवैध कृष्टविरोधात शिवप्रेमी आक्रमक

    नगरपालिका प्रशासनाला विचारणार जाब

    सर्व शिवप्रेमी थोड्या वेळात अंबरखाना इथं जमणार

  • 24 Jul 2022 10:19 AM (IST)

    महिनाअखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

    महिनाअखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती

    शिंदे नाशिक विभागातील विकासकामांचा घेणार आढावा

    महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात मुख्यमंत्री शिंदे नाशिक पासून करण्याची शक्यता

    नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री सुहास कांदे आणि दादा भुसे यांच्या मतदरसंघाचा देखील घेणार आढावा

    मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच येत आहेत नाशिक दौऱ्यावर

  • 24 Jul 2022 10:17 AM (IST)

    हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले

    आज सकाळी नऊ वाजता हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले

    हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 89 हजार 947 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

    तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

  • 24 Jul 2022 10:11 AM (IST)

    आज नऊ वाजता हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले

    आज नऊ वाजता हतनुर धरणाचे 36 दरवाजे पूर्ण उघडले

    हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 89 हजार 947 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

    तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

  • 24 Jul 2022 10:10 AM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद-संजय राऊत

    संजय राऊत म्हणतात…

    शिवसैनिकांच्या अश्रूत शिंदे-फडणवीस सरकार वाहून जाणार

    आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेला उत्तम प्रतिसाद

    ज्यांनी पाठिब खंजीर खुपसलं त्यांनी आम्हाला सत्य आणि न्यायाच्या गोष्टी सांगू नका

    हम दोनो एक दुजे के लिये, अशी शिंदे सरकारची अवस्था

    भोंगा तुमचा, लाऊड स्पिकर शिवसेनेचा

    सेनेच्या लाऊडस्पिकरसोमर तुमची पिपाणी चालणार नाही

  • 24 Jul 2022 09:14 AM (IST)

    इंद्रायणी नदीत 35- 40 वयाच्या व्यक्तीचा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

    – लोणवळ्यातील सदापुर गावाजवळून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीत 35- 40 वयाच्या व्यक्तीचा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय

    – या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आलीय

    – मृतदेहाच्या उजव्या हाताच्या दंडावर सूर्य, ओम असे गोंदलेले आहे, शिवाय उजव्या हातात लाल रंगाचा धागा आहे

    – संबंधित व्यक्ती कोणाचा नातेवाईक असल्यास लोणावळा ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा अस आवाहन त्यांनी केलंय

  • 24 Jul 2022 09:12 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 10 धरणे 100 टक्के भरली, धरणसाठ्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे ८१ टक्के जलसाठा

    नाशिक -जुलै महिन्यात नाशिक शहर तसेच जिल्हाभरात पावसाची दमदार हजेरी

    जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के भरली आहे

    धरणसाठ्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे ८१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे

    शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे असलेले गंगापूर धरण ६५ टक्के भरले आहे

    तसेच जायकवाडी धरण देखील ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने, आता नाशिकमधून पाणी सोडण्याचे संकट टळले आहे

  • 24 Jul 2022 09:09 AM (IST)

    दापोडीत मध्यरात्री 7- 8 जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून वाहनांची तोडफोड केली

    -दापोडीत मध्यरात्री 7- 8 जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून वाहनांची तोडफोड केली

    -यात सहा वाहनांच मोठं नुकसान झालं आहे

    -दापोडी च्या सुंदर बाग परिसरात घटना घडलीय

    -तोडफोड करणाऱ्या पैकी तीन आरोपीना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलंय

  • 24 Jul 2022 09:08 AM (IST)

    आलापल्ली भामरागड राष्टीय महामार्ग पुरामुऴे बंद

    आलापल्ली भामरागड राष्टीय महामार्ग पुरामुऴे बंद

    पाचव्यांदा पुरामुऴे ताडगाव जवऴील नाल्यावर वाहत आहे दोन फट पाणी

    वाहतुक राञी पासुन ठप्प

  • 24 Jul 2022 08:57 AM (IST)

    जुलै महिन्यात नाशिक शहर तसेच जिल्हाभरात पावसाची दमदार हजेरी

    नाशिक -जुलै महिन्यात नाशिक शहर तसेच जिल्हाभरात पावसाची दमदार हजेरी

    जिल्ह्यातील १० धरणे १०० टक्के भरली आहे

    धरणसाठ्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट म्हणजे ८१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे

    शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे असलेले गंगापूर धरण ६५ टक्के भरले आहे

    तसेच जायकवाडी धरण देखील ६५ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने, आता नाशिकमधून पाणी सोडण्याचे संकट टळले आहे

  • 24 Jul 2022 08:24 AM (IST)

    मध्य रेल्वेच वेळापत्रक कोलमडले

    मध्य रेल्वेच वेळापत्रक कोलमडले

    लोकल उशिराने धावतायेत

    रात्री आसनगाव ते वासींद दरण्यान १ तासाचा होता मेगाब्लॉक

    त्यानंतर मध्य रेल्वे चे वेळापत्रक कोलमडले

    लोकल ऐवजी लांब पल्ल्याच्या गाड्या सोडत असल्याने प्रवासी संतप्त

  • 24 Jul 2022 08:24 AM (IST)

    धरणसाठा आणि पाऊस अपडेट


    धरणसाठा आणि पाऊस अपडेट
    २४ जुलै २०२२ ( सकाळी ६ वाजता)
    धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. धरणात येणारे पाणी पुन्हा वाढले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर पानशेत धरण ७३ टक्के भरले असून वरसगाव धरण ६८ टक्के तर टेमघर धरण ५८ भरले आहे. तर खडकवासला धरणातून कालव्यात १००५ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.
    या पावसाळ्यात आता पर्यंत मुठा नदीत खडकवासला धरणातून ३.३४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

    खडकवासला -१ मिमी, पानशेत -२२ मिमी, वरसगाव- २३ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४४ मिमी पावसाची नोंद तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा २०.४८ * ( ७०.२७ टक्के) टीएमसी झाला आहे.
    गेल्या २४ तासातील हा पाऊस आहे.

  • 24 Jul 2022 07:55 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 13 ही दरवाजे उघडले

    अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 13 ही दरवाजे उघडले.

    धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला मोठा पूर..आर्वी-कौंडण्यपूर मार्ग बंद.

    वर्धा नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी.

    कौंडण्यपूर येथील पुलावरून वाहू लागले पाणी.

    मोर्शी-आष्टीची देखील वाहतूक बंद

  • 24 Jul 2022 07:55 AM (IST)

    शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर

    नाशिक – शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज मातोश्रीवर

    सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

    राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा देणार विश्वास

    शिवसेनेचे जवळपास 34 नगरसेवक आणि कोर कमिटी पदाधिकारी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

    नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदार सध्या शिंदे गटात दाखल

    मात्र नगरसेवक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा देणार उद्धव ठाकरेंना विश्वास

  • 24 Jul 2022 07:54 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात

    – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात,

    – कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचा उपक्रम,

    – यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे,

    – ही बस विद्यापीठाच्या मुख्यद्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते

  • 24 Jul 2022 07:53 AM (IST)

    पश्चिम विदर्भातील सात मध्यम प्रकल्प 100% भरले….

    पश्चिम विदर्भातील सात मध्यम प्रकल्प 100% भरले….

    15 प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू,साठवण क्षमतेच्या 63 टक्के वाढ…

    पश्चिम विदर्भातील एकूण 27 मध्यम प्रकल्प आहेत…

    सात मध्यम प्रकल्पात 60 टक्के पेक्षा अधिक पाणी…

    अप्पर वर्धा धरण 84 टक्के भरले…

  • 24 Jul 2022 07:37 AM (IST)

    पुणे महापलिकेला 42 कोटी रुपयांचा दणका

    – पुणे महापलिकेला 42 कोटी रुपयांचा दणका,

    – कचरा डेपोत कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई देण्याचे आदेश,

    – पुणे महानगरपालिका 42 कोटी 23 लाख 71 हजार 763 रुपयांची नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असल्याचा अहवाल,

    – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अहवाल केला सादर

  • 24 Jul 2022 07:36 AM (IST)

    पोलीस कुटूंबियांचा जीव धोक्यात..

    मालेगाव…

    पोलीस कुटूंबियांचा जीव धोक्यात..

    जीर्ण होत आलेल्या इमारतीत धोकादायक वास्तव्य..

    नव्या इमारतीत स्थलांतराला मिळेना मुहूर्त..

  • 24 Jul 2022 07:36 AM (IST)

    जिल्हा परिषदेत 70 कंत्राटी शिक्षकांना मिळेल नियुक्ती

    जिल्हा परिषदेत 70 कंत्राटी शिक्षकांना मिळेल नियुक्ती

    सेस फंडातून देणार मानधन

    दोन आठवड्यात भरणार जागा

    शिक्षकांची 700 पद जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहे

    त्यामुळे 5 हजार रुपये मानधन वर 70 कंत्राटी शिक्षक भरणार

  • 24 Jul 2022 07:14 AM (IST)

    नागपुरात 6 लाख घरांवर फडकणार तिरंगा

    नागपूर ब्रेकिंग –

    नागपुरात 6 लाख घरांवर फडकणार तिरंगा

    हर घर तिरंगा अभियान अंतर्गत फडकणार तिरंगा

    महापालिका प्रशासनाने बैठक घेत केली तयारी

    13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविले जाणार अभियान

  • 24 Jul 2022 07:03 AM (IST)

    पुतण्यामधील राजकीय वाद राज्याला सर्वश्रुत आहे.

    पुतण्यामधील राजकीय वाद राज्याला सर्वश्रुत आहे. मात्र गेली पाच वर्षांपासून कौटुंबिक कलह देखील राज्याने पाहिलाच आहे. एकाच बंगल्यात सर्व कुटुंब एकत्रित असले तरी एकमेकांचे चेहरे देखील न पाहणारं क्षीरसागर कुटुंब एका धार्मिक कार्यक्रमात एकत्रीत आल्याचे पहिल्यांदाच पहावयास मिळाले. नगरसेविका जयश्री विलास विधाते यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला क्षीरसागर कुटुंबातील सर्वच महिला सदस्या आमनेसामने दिसून आले खरे मात्र एकमेकींनी कोणाकडेही पाहिले नाही. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील राजकीय वादच नव्हे तर कैटुंबिक कलह देखील वाढल्याचे पहावयास मिळाले.

  • 24 Jul 2022 07:03 AM (IST)

    बीडच्या हिरापूर येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता

    बीडच्या हिरापूर येथील विवाहिता तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. पोलिसांचा तपास सुरू असतानाच बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जप्ती पारगावजवळ एका शेतकऱ्याच्या विहिरीत हा मृतदेह आढळून आला आहे. पल्लवी सखाराम चव्हाण असं मृत महिलेचे नाव आहे. तिची हत्या झालीय की आत्महत्या याचा तपास पोलीस करीत आहेत.

  • 24 Jul 2022 07:02 AM (IST)

    गुटख्याने भरून असलेला कंटेनर देखील पकडला.

    एका कंटेनरमधून गुटखा जात असल्याची माहिती वरिष्ठांनी स्थानिक पोलिसांनी दिली. गुटख्याने भरून असलेला कंटेनर देखील पकडला. मात्र 50 पोते गुटखा आढळून आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यातील 23 पोते गुटखा पसार केलाय. ही कृष्णलीला पाटोदा पोलिसांनी केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तिघांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यावर  संपूर्ण पाटोदा तालुक्याची धुरा होती असे सहायक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर गुटखा प्रकरणात निलंबित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोळेकर यांच्यासह संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके हे कर्मचारी देखील निलंबित करण्यात आले आहेत.

  • 24 Jul 2022 07:01 AM (IST)

    केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल

    केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल

    भारताचा तिरंगा आता दिवसा आणि रात्रीही फडकविता येणार

    पॉलिस्टर पासून तयार झालेल्या झेंड्याला आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या झेंड्याला मानवंदना देण्यास परवानगी

    यापूर्वी सूर्यास्तानंतर तिरंगा झेंडा फडकवायला नव्हती परवानगी

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या काळात हर घर तिरंगा ही नवी मोहीम

    अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तिरंगा झेंडयाबाबत मोठा निर्णय