आज बुधवार दिनांक 27 जुलै 2022 आज आपण राजकीय (Political) आणि महाराष्ट्रातील इतर घडामोडी जाणून घेणार आहोत. आज देखील राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे, सोबोतच गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. लातून जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पावसाची संततधार, काल सायंकाळ पासून सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले तसचे उदगीर-लातुर रस्त्यावर उभारलेला पर्यायी रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे.
बच्चू कडू यांचा अजित पवारांवर हल्लाबोल
सरकारमध्ये असल्यावर शेतकऱ्यांबद्दल बोलायचं नाही
सरकारमध्ये नसल्यावर शेतकऱ्यांबद्दल बोलाव हा पायंडा पडला आहे
ओला दुष्काळाचे निकष काय असतात हे
अजित पवारांना माहित आहे त्यांना सांगायची गरज नाही.
सर्व निकष अजितदादांनी वाचले आहे.
परभणीच्या गंगाखेड-परळी रोडवरील करमपाटी परिसरात अपघात
काल रात्रीची घटना, 25 जखमी
त्यात 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले
बस चालक हनुमंत आवाळे ही गंभीर जखमी झाले
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय
गंगाखेड उपजिल्हा रुगणालयात प्राथमिक उपचार करून त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात पाठविले
इंदापूरमधील डापुरी रस्त्यावर खडी वाहतूक करणाऱ्या टिपर आणि दुचाकीचा अपघात
अपघातात शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू
तर मुलाला गंभीर दुखापत
सातवीत शिकणाऱ्या मुलीचा जागीच मृत्यू
मृत मुलीचा लहान भाऊ आणि चुलता जखमी
संतप्त नागरिकांनी टिपर पेटविला
पोलीस घटनास्थळी दाखल
शिंदे-फडणवीस सरकार उंटावरून शेळ्या हाकतंय
यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही
त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न माहित नाहीत
सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत
तिथे ते बोलत होते
खासदार नवनीत रवी राणा यांना धमकी!
आमदार रवी राणा यांच्या घराची रेकी केली
राजस्थान सीमेवरून काही लोक आले आहेत.
खासदार नवनीत राणा यांच्या हितचिंतकांचा इशारा
खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या हत्येचा विषय लावून धरल्याने
तसेच हिंदू हितासाठी बोलल्याबद्दल वारंवार धमक्या येत असल्याची माहीती
कल्याण-डोंबिवलीच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडतीला सुरुवात
कल्याण आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिरात पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दागडे यांच्या अध्यक्षतेखाली सोडत सुरु
सोडतीला इच्छुक उमेदवार आणि नागरिकांची पाठ फिरविल्याने सभागृह रिकामे
खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसेनेला टोला
यांना सगळंच बेकायदेशीर वाटतंय
गटनेत्याची निवड ही कायदेशीर आहे
18 पैकी 12 खासदार म्हणतात हा गटनेता आहे
या गटनेत्याला सभागृहाच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे
बेकायदेशीर असं काही नाही श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर केली टिका
मागच्या सरकारने सूडबुद्धीने भाजपाचे काम रोखलं
नाशिकचे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांचा आरोप
भूमिपूजन झालेल्या कामांना पुढे होऊच दिल नाही असा आरोप
आय टी पार्क, लॉजीस्टिक पार्क, नमामी गोदा या प्रकल्पाना लावला कारण नसताना ब्रेक
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटून कामांना चालना देण्याची विनंती करणार
माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती
महापौर एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर
हिंदू महासंघाच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांची 100 वी जयंती साजरी
बाबासाहेब यांच्या सर्व लेखन संपदेच पूजन आणि त्यांची 100 दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली
बाबसाहेबांचे एकही पुस्तकं ना दादोजीवर ना समर्थांवर तरीही बाबासाहेबांना बदनाम केल जातंय
हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांचा आरोप
बीड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का
माजी मंत्री सुरेश नवले करणार शिंदे गटात प्रवेश
31 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात प्रवेश करणार
मुख्यमंत्री चांगल नेतत्व आहे म्हणून पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
सुरेश नवले यांची माहिती
आज अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्याबरोबर सुरेश नवलेही होते उपस्थित
सहकार्य करावे अशा प्रकारची माजी राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने आम्ही गेल्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाच्या पंतप्रधानांना भेटलो होतो आता बरेच वर्षे त्याला झालेले आहेत महागाई वाढलेली आहे मग त्यावेळेस आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आम्ही ते बदलतोय परंतु वर्ष झालं दुर्दैवाने ते अजून बदलले गेलेले नाहीत आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही एसबीआय चे नाव बाजूला ठेवले आणि त्याच्या तिप्पट चौपट मदत तर आता अडचणी नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना तशाच पद्धतीचे निर्णय एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असं माझं स्पष्ट मागणी आहे काय आहे दोन हेक्टर म्हणजेच पाच एकराची अट आहे पाच एकराच्या वरचा लाभार्थी असेल पर्यंतच मदत केली जाते मराठवाडा विदर्भ मध्ये लँड होल्डिंग ये कभी असतं सवय कर एकर अर्धा एकर दीड एकर दोन एकर असं त्याच्यावर तिथे चालतं इथं थोडसं आत्ताची लोकांच्या घरांचे झालेली पडझड बघता आणि त्यांचा प्रपंच जो उघड्यावर पडलेला आहे ते सगळं बघता आपल्याला त्यामध्ये बदल करावा लागेल तशा प्रकारची मागणी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करू
अवैध गर्भपात प्रकरणी डॉ.नंदकुमार स्वामीला सात दिवसाची पोलीस कोठडी,
निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली चालवायचा अवैध गर्भपात केंद्र
नवी मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात लॅब्राडॉर जातीच्या श्वानाचा
प्रशिक्षणासाठी पुण्यात पाठविणार
आधीच नवी मुंबईत पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकात लॅब्राडॉर श्वान तीन असून आता त्यात अजून एक भर पडली आहे
विसर्जन घाट व कृत्रिम तलावांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
विसर्जन घाटावरील अत्यावश्यक कामे तातडीने करण्याचे दिले निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री शिंदे आणि रामदास कदम यांच्यात गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू होती.
अमरावतीच्या धामनगाव रेल्वे तालुक्यातील अंजनवती परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला अचानक पूर..
शेतात काम करणारे चौदा मजूर पुराच्या पाण्यात होते अडकलेले…
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकाने काढले 14 ही मजूरांना काढले सुखरूप बाहेर..
जिल्हा व शोध व बचाव पथकाचे शर्तीचे प्रयत्न आले कामी…
ठाण्यात स्वाईन फ्ल्यूने काढले डोके वर
स्वाईन फ्लूचे शहारत 20 रुग्ण
तर पार्किंग प्लाझामध्ये स्वाईन फ्ल्यू कक्ष
ठाणेकरांनो सावधान स्वाईन फ्ल्यू वाढत आहे !
ठाण्यात स्वाईन फ्ल्यूने काढले डोके वर
स्वाईन फ्लूचे शहारत २० रुग्ण तर पार्किंग प्लाझामध्ये स्वाईन फ्ल्यू कक्ष
आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी वसईत मजुरीचे काम करणाऱ्या एका टोळीने चक्क चोरीचा मार्ग निवडला
पण पहिल्याच प्रयत्नातील त्यांच्या चोरीचा भांडाफोड
वालीवच्या गुन्हे शाखा पथकाला यश
3 जणांना अटक करून त्यांच्याकडून 12 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त
मोहम्मद मेहताब अन्वर अली (वय 29), कारीमुद्दीन उर्फ छोटा जलालूद्दीन खान (वय 24), इकरामुद्दीन जलालूद्दीन खान (वय 32), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं
मोहम्मद हा नालासोपारा येथील तर अन्य दोघेजण जोगेश्वरीचे राहणारे
तिघेही मोलमजुरीचे काम करतात.
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनवती परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला अचानक पूर
शेतात काम करणारे 14 मजूर पुराच्या पाण्यात होते अडकले
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा शोध व बचाव पथकाने 14 मजूरांना सुखरूप बाहेर काढले
जिल्हा व शोध व बचाव पथकाचे शर्तीचे प्रयत्नमुळे जीव वाचले
अमरनाथ यात्रेवर गेलेल्या भक्तांवर मोठं संकट
अमरनाथ गुफेजवळ ढगफुटीची वृत्त
सरकारने जारी केला अलर्ट
दक्षता टीमने 4000 भक्तांना सुरक्षितस्थळी हलवले.
सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं यंत्रणांचे म्हणणं आहे
गेल्या आठवड्यातच 16 लोकांचा ढगफुटीने दुर्दैव मृत्यू झाला होता. तर 18 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता
34 भक्तांना भारतीय वायू सेनेने वाचवले होते
अमरनाथ गुफेजवळ ढगफुटीची वृत्त
सरकारने जारी केला अलर्ट
दक्षता टीम ने 4000 भक्तांना सुरक्षितस्थळी हलवले.
सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं यंत्रणांचे म्हणणं आहे
गेल्या आठवड्यातच 16 लोकांचा ढगफुटीने दुर्दैव मृत्यू झाला होता. तर 18 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.
34 भक्तांना भारतीय वायू सेनेने वाचवले होते
– सध्या सेनेला माझी आणि महाराष्ट्राला सेनेची गरज आहे, त्यामुळे मी सेनेत प्रवेश करणार आहे,
– माझ्या डोक्यावर कुठली ईडीची फाईल नाहीय, त्यामुळे माझ्यावर कुठलाही दबाव नाहीये,
– उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाहीये, त्यामुळे मला सेनेच्या विचारधारेची अडचण येणार नाही,
– नुपूर शर्मा, कंगना राणावत सारखं सेनेचं कट्टरवादी हिंदूत्व नाहीये.
स्पाईसजेटवर मोठी कारवाई
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कडून कारवाई
8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय
विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर कारवाई
विविध स्पॉट चेक, तपासणी आणि स्पाईसजेटने सादर केलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कडून कारवाई
8 आठवड्यांसाठी 50 टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय
मी शाळेत असताना अण्णासाहेब शिंदे यांच नाव ऐकलं आहे
त्यावेळी अन्न सुरक्षेत देश कसा प्रगत होईल यासाठी त्यावेळी अनेक क्रांती करण्यात आल्या
त्यामध्ये अण्णासाहेब यांचे नेतृत्व महत्त्वाचे
जे संशोधन देशात झालं ते महत्त्वाचे आहे
मी 48 नद्याजोड़ प्रकल्प तयार केले होते, देशातील पाणी पुरवठा वाढला तरच देशात समृद्धता येऊ शकते
देशात पाण्याची कमी नाही, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे – गडकरी
पाण्यासाठी कुणी माघार घाययला तयार नाही, राज्यांमधील पाणी समुद्रात जात आहे, पण नियोजन नाही
चंद्रपूर जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्यांचं मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरू…
चुनाळा येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या,
या आठवठ्यात झालेली तरुण शेतकऱ्याची तिसरी आत्महत्या,
रविंद्र नारायण मोंढे (वय 45) याने आज दुपारी आपल्या राहते घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
सतत चार वेळा पाण्याखाली आले शेतपिक
घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सेवा सहकारी संस्थेतून शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी
25 जुलै रोजी वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे प्रफुल्ल भोयर (35) या तरुण शेतकऱ्यांने कीटक नाशक पिऊन केली होती आत्महत्या
23 जुलै रोजी राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथे अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्यांने शेतातच कीटकनाशक पिऊन केली होती आत्महत्या
– अण्णा साहेब शिंदे शताब्दी कार्यक्रम दिल्ली.
– तो काळ अडचणीचा होता. देश भुकेच्या प्रश्न पुढे हतबल झाला होता
– त्यावेळी भारताने विज्ञानाची साथ घेतली हा विचार अण्णासाहेब शिंदे यांनी पुढे आणला.
– अन्न सुरक्षा निर्माण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्याने आज अन्नाची अडचण निर्माण होत नाही.
– भारत आगामी वर्षात चीन पेक्षा लोकसंख्येत पुढे जाईल पण अण्णासाहेब शिंदे यांनी कामामुळे अन्नाची समस्या निर्माण होणार नाही
-अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली….
-सततच्या पावसामुळे शेतकरी झाला हवालदिल…
-कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेसुद्धा नाही..
-गोंदिया जिल्ह्यात पावसाचे थैमान
-अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली
-सततच्या पावसामुळे शेतकरी झाला हवालदिल
-कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेसुद्धा नाही
– सोलापूरमध्ये 15 ते 18 महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा
– सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी विषबाधा
– हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना अन्नातून झाली विषबाधा
– सोलापुरातील सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल
– काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास
– पोलिस प्रशासनातील अधिकारी विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी दाखल
– सिध्देश्वर वूमन पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी झाली विषबाधा
– हॉस्टेलमधील विद्यार्थिनींना अन्नातून झाली विषबाधा
– सोलापुरातील सिध्देश्वर हॉस्पिटलमध्ये केले दाखल
– काल रात्रीच्या जेवणामुळे आज सकाळपासून जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरु झाला
– पोलिस प्रशासनातील अधिकारी विद्यार्थिनींच्या चौकशीसाठी दाखल
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधात केलं आंदोलन
भर पावसात केला रेल रोको
राज्यात सगळीकडे युवक काँग्रेसचं आंदोलन
पुणे लोणावळा लोकल धरली अडवून !
युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात केलं आंदोलन
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
रभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथील घटना, पोषण आहारामध्ये अळ्या आणि किडे निघाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय, महिला व बालकल्याण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..
अंगणवाडीच्या पोषण आहारात निघाल्या अळ्या ,
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा येथील घटना
पोषण आहारामध्ये अळ्या आणि किडे निघाल्याचा गंभीर प्रकार समोर आला
महिला व बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे .
-गोंदियातील सुर्याटोला रामनगर संपर्क तुटला
-अनेकांच्या घरात शिरले पाणी
-कुलरच्या मोटारीने घरात शिरलेला पाणी काढत आहेत
-मुठीत जीव घेऊन करत आहेत प्रवास
पुण्यातही युवक काँग्रेसच्यावतीनं रेल रोका
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीच्या विरोधात केलं आंदोलन
भर पावसात केला रेल रोको
राज्यात सगळीकडे युवक काँग्रेसचं आंदोलन
पुणे-लोणावळा लोकल धरली अडवून
युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात केलं आंदोलन
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात निष्ठावान शिवसैनिकांचं भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोटरसायकल रॅली काढून, वृक्षारोपण करून निष्ठावान शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दर्शवला पाठिंबा
आजही हजारोच्या संख्येने निष्ठावान शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा संदेश यावेळी देण्यात आला
धरणगाव शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत निष्ठावान शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याची ग्वाही दिली
नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात पवार, गडकरी येणार एकाच व्यासपीठावर
अण्णासाहेब शिंदे फाउंडेशनचा कार्यक्रम
शरद पवार आणि नितीन गडकरी या दोघांच्या उपस्थितीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आज 6 वाजता कार्यक्रम
आमचं रक्त काढलं तर त्यातून फुले शाहू आंबेडकर बाहेर निघतील,
द्रौपदी मूर्म यांनी राष्ट्पती पदाची शपथ घेतली, त्याच्यापुढे त्यांची आदिवासी ही जात लावली
शपथ घेण्याच्या आधी मंत्रोच्चार केला गेला
अमोल मिटकरी यांनी भर कार्यक्रमात वाजवली मंत्रोच्चाराची क्लिप
शिल्पकार देवरे यांनी कुठल्या शिल्पाचा अभ्यास केला माहीत नाही, सिंहाचे जबडे बंद होते पण या सिंहाचे जबडे उघडे आहेत.
पण रमन्ना यांनी सांगितले अशोक स्तंभावरील सिंह संविधानाला धरून नाहीत
रमन्ना यांचे दोन महिने रिटायरमेंटचे राहिले आहेत तोपर्यंत काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही
आरोप निश्चितीची पुढची सुनावणी पाच ऑगस्टला होणार
5 तारखेला सर्व आरोपींना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर ठेवल जाणार
आज वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड सुनावणीसाठी होते हजर
मात्र इतर आरोपीना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या
आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली मागणी
पटवर्धन यांच्या मागणीनंतर आता पुढील सुनावणी पाच ऑगस्टला होणार
वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा, सुनावणी दरम्यान संशयित आरोपी वीरेंद्र तावडे यांनी न्यायालयाकडे केली विनंती
पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही असे नियोजन करा. मुंबई, मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागातील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील यासाठी तत्काळ आणि दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांच्या घरांची परिस्थिती बदलून टाकण्याचा आमचा निर्धार आहे.
आपले पोलीस, वारा, पाऊस, सण – उत्सव आणि कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यासाठी उभे असतात. त्यांना घरे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध पर्याय आणि योजनांचा विचार करा. म्हाडा, सिडको, एसआरए, क्लस्टर योजना यांसह सर्वसमावेशक घरकुल योजना, परवडणारी घरे तसेच एमएमआरडीए आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावीत यासाठी आराखडा तयार करा. पोलिसाकरिता घरे बांधताना ती अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सामुग्रीचा वापर करण्यात यावा.
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी अकोल्यातून आमदार नितीन देशमुख पोहोचले मातोश्रीवर
अकोला जिल्ह्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र उद्धव साहेबांनासाठी आणले
उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो या महाराष्ट्रावर या विधानसभेवर अखंड भगवा फडकू अशी प्रार्थना यावेळेस त्यांनी केली
उद्धव साहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो शिवसेनेचा नेता झाला
तुम्ही ज्यांना नेते समजतात ते शिवसेनेचे नाही आमच्या शिवसैनिक सोबत असणारा साधा शिवसैनिक ही आमच्यासाठी नेता आहे
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे उद्या करणार शिवसेनेत प्रवेश
उद्या 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत करणार प्रवेश
अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभी राहणार
विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी गाजवल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा
उद्या शिवसेनेत करणार प्रवेश
स्वतः सुषमा अंधारेंनी दिली माहिती…
शिवसेनेला मिळणार आंबेडकरी चळवळीतला चेहरा
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे उद्या करणार शिवसेनेत प्रवेश
उद्या 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत करणार प्रवेश
अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभी राहणार
विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी गाजवल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी अकोल्यातून आमदार नितीन देशमुख पोहोचले मातोश्रीवर
अकोला जिल्ह्यातून पाच हजार प्रतिज्ञापत्र उद्धव साहेबांसाठी
उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो या महाराष्ट्रावर या विधानसभेवर अखंड भगवा फडकू अशी प्रार्थना त्यांनी केली
उद्धव साहेबांनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो शिवसेनेचा नेता झाला
तुम्ही ज्यांना नेते समजतात ते शिवसेनेचे नाही आमच्या शिवसैनिकसोबत असणारा साधा शिवसैनिक ही आमच्यासाठी नेता
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
आरोप निश्चितीची पुढची सुनावणी पाच ऑगस्टला होणार
5 तारखेला सर्व आरोपींना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर केले जाणार
आज वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड सुनावणीसाठी होते हजर
मात्र इतर आरोपीना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या
आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयासमोर केली मागणी
पटवर्धन यांच्या मागणीनंतर आता पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होणार
वकिलांशी चर्चेला योग्य वेळ मिळावा सुनावणी दरम्यान संशयित आरोपी वीरेंद्र तावडे यांना न्यायालयाकडे केली विनंती
ठाण्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर अतिक्रम विभागाकडून उतरवले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्र कोपरी पाचपाखाडी येथील उद्धव ठाकरे गटाकडून वाढदिवसाच्या लावण्यात आलेला बॅनर पालिका अतिक्रमण विभागाने उतरून केली कारवाई..
कोणाच्या दबावा पोटी हा बॅनर उतरवला अशी ठाण्यात चर्चा…
राजमाता स्पोर्स्टस क्लब आणि प्रदीप स्पोर्स्टस क्लबच्या वतीने शुभेच्छाचे बॅनर लावण्यात आले होते..
संयमाचा महामेरू. हिंदुत्वाचा ज्वलंत योद्धा .मराठी माणसाचा मानबिंदू शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे. आशा प्रकारचा मजकुराचा बॅनर पालिका अतिक्रमणविरोधी विभाग यांनी हटवला..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मागे हा बॅनर काढून ठेवण्यात आला
– पुण्यातील गुडकल चौकात काँग्रेसचे आंदोलन,
– स्मृती इराणी यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी,
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या विरोधात काँग्रेसच्या महिला आघाडीचे आंदोलन
पुण्यातील गुडकल चौकात काँग्रेसचे आंदोलन
स्मृती इराणी यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी
शरद कळसकर, सचिन अंधुरे, वीरेंद्र तावडे या तीन आरोपींना आरोप निश्चितीसाठी न्यायालयात हजर
जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या समोर होणार सुनावणी
सरकारी पक्ष्याच्या वतीने अॅड शिवाजीराव राणे
आरोपींच्या बाजूने समीर पटवर्धन बाजू मांडणार
सोनिया गांधींना हात लावला तर देशात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होईलःयशोमती ठाकूर
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू
संपूर्ण देशभर सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस आक्रमक
काँग्रेसच्या नेत्या व अमरावतीच्या माजी पालकमंत्री ठाकूर यांनी केंद्र सरकारला इशारा दिला
सोनिया गांधींना का त्रास देताय? कशासाठी काय कारण आहे हे आता कोणी खपून घेणार नाही
सोनिया गांधींना जर हात लावला तर देशात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होईल
आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला
अमरावती : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे, संपूर्ण देशभर सोनिया गांधींच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर काँग्रेसच्या नेत्या व अमरावतीच्या माजी पालकमंत्री ठाकूर यांनी केंद्र सरकारला एक इशारा दिला आहे, सोनिया गांधींना का त्रास देताय? कशासाठी काय कारण आहे हे आता कोणी खपून घेणार नाही तर सोनिया गांधींना जर हात लावला तर देशात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होईल. आमच्या नेत्याला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा -यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन.
अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा -यशोमती ठाकूर
जिल्हाधिकारी यांना निवेदन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर यशोमती ठाकूर यांची टीका…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही एकत्र आज संध्याकाळी सातच्या विमानाने दिल्लीला रवाना होणार
उद्या रात्री मुंबईत होणार दाखल, दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार,
पहिल्या टप्प्यात 32 मंत्री शपथ घेणार असल्याची सुत्रांची माहीती
एकनाथ शिंदे गट 12 आणि भाजपचे 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता
कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार
केंद्र सरकारकडून मिळाली परवानगी
खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
धावपट्टीच्या विस्तारीकरणाला ही केंद्र सरकारकडून मंजुरी
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी होणार मोठी मदत
निम्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या
ओबीसी मेळाव्यात कार्यकर्ते उपस्थित नाहीत
ऐन वेळी मेळावा ठरल्याचे भाजप कडून स्पष्टीकरण
धुळ्यात दिवसाढवळ्या ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला नागरिकांकडून चोप
शहरातील साक्री रोड भागातील HDFC कंपनीचे ATM दिवसा फोडण्याचा चोरट्याचा पराक्रम…
जावेद पिंजारी रा. मेहेरगाव असे चोरट्याचे नाव असून शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले…
नागरिकांच्या सतर्कतेमुळे भामटा पोलिसांच्या ताब्यात…
शहर पोलिसांचा अधिक तपास सुरू…
धुळ्यात दिवसाढवळ्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न
भामट्यालाला नागरिकांकडून चोप
शहरातील साक्री रोड भागातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्याचा पराक्रम
जावेद पिंजारी (रा. मेहेरगाव) असे चोरट्याचे नाव
शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू होणार
केंद्र सरकारकडून मिळाली परवानगी
खासदार धनंजय महाडिक यांची माहिती
धावपट्टीच्या विस्तारीकरणालाही केंद्र सरकारकडून मंजुरी
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी होणार मोठी मदत
संशयित 9 आरोपींवर आरोप निश्चितीसाठी नोटीस
9 पैकी 3 आरोपींना काही वेळात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार
विरेंद्र तावडे याच्यासह आणखी दोन आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता
कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी संशयित 9 आरोपींवर आरोपनिश्चितीसाठी नोटीस
9 पैकी 3 आरोपींना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार
वीरेंद्र तावडे याच्यासह आणखी दोन आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून गुजरात आंध्र मध्य प्रदेश रास्थान व इतर राज्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्या देण्यासाठी येत आहेत
त्यांना आधार देत आहे, आपलेल्या लढायचे आहे जिंकायचे आहे, असा भकम आधार देत येणारा प्रत्येक जण देताना खूप अभिमान वाटत आहे.
फडणवीसांच्या शुभेच्छांना आम्ही फार काही किंमत देत नाही
त्यांनी पक्षप्रमुख म्हटल पाहिजे असे काही नाही
त्यांची जागा काय आहे हे आता येत्या काही दिवसांत नक्की ठरेल.
सध्या व्हिडीओ कॉल करून, कॉल उचलताच त्याचे स्क्रिन शॉट काडून, ते एडिट करून, सोशल मीडियावर टाकण्याची धमकी
आर्थिक ब्लॅकमेल करणारी टोळी सक्रिय
विरारमधील सामाजिक कार्यकर्ते मूनाफ बलोच यांना 24 जुलै रोजी आला होता कॉल
व्हिडीओ कॉलमध्ये अर्धनग्न स्त्रीचा व्हिडीओ दाखवताच कॉल कट करताच त्या स्क्रिनशॉट वरून बलोच यांचेच अश्लील चित्र सोशल मीडियावर व्हारल करण्याची धमकी देऊन केली पैशाची मागणी
विजय शिवतारेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
बॅनरवर उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख असा उल्लेख
बॅनरवर नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो
विजय शिवतारेंची उद्धव ठाकरेंनी केली होती हकालपट्टी
मात्र आज विजय शिवतारेंनी फेसबुकवर पोस्ट करत दिल्या शुभेच्छा
अमरावतीत शेतकरी आक्रमक
नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा तिवसा तहसील कार्यालयावर ठिय्या
तिवसा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन
अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करा व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
अमरावतीत दीड लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान तर 50 लाख हेक्टरवर दुबार पेरणी
राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात आज पुन्हा नागपुरात आंदोलन
नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन
रघुपती राघव राजाराम भजन म्हणत ईडी कार्यालयात पोहोचले काँग्रेस कार्यकर्ते
काँग्रेस शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन
अतुल लोंढे, राजेंद्र मुळक उपस्थित
आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग
मेळघाटमध्ये क्रूझरचा भिषण अपघात
अपघातात एक ठार, तेरा जखमी
टेबुरसोण्डा – परतवाडा रोडवर अपघात
क्रूझर रस्त्याच्या खाली घसरून पलटली
जखमींवर अचलपूर व अमरावती मधील रुग्णालयात उपचार सुरू
एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याची सुरक्षा आणखी वाढवली
नंदनवन बंगल्याभोवती 10 फूट ऊंच भींतीचं कुंपन उभारणार
पाच दिवस चालणार काम, युद्ध पातळीवर कामाला सुरुवात
सुरक्षेच्या कारणास्तव भिंतींची उंची वाढवण्याचा निर्णय
उद्धव ठाकरेंचं नेतृत्व तावून सुखाखून बाहेर पडणार – राऊत
चुका सगळीकडेच होतात, कुटुंबातही चुका होतात
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला राऊत
विश्वासघात करण्याचा हा एक बहाणा होता – राऊत
बाळासाहेबांनी माकडाची माणसं केली – राऊत
शिवसेनेतला प्रत्येक घटन आव्हान झेलायला तयार
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात पावसाची विश्रांती
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट
गोदा काठावरील जनजीवन पूर्वपदावर येत आहे
भाविकांची तसेच पर्यटकांची गर्दी
गोदा काठावर साप्ताहिक भाजी बाजार देखील भरला
बोरिवलीमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने रेल रोखो
युवक काँग्रेसच्या सात आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बोरिवलीमध्ये सौराष्ट्र एक्सप्रेस रोखून ईडी आणि केंद्र सरकारचा काँग्रेसच्या वतीने निषेध
नाशिक जिल्ह्यातील घोटी देवगाव रस्त्यावर अपघात
अपघातात तीन शिक्षिका जखमी
देवगाव आश्रम शाळेतील शिक्षिका जखमी
आश्रम शाळेत जात असताना झाला अपघात
पुणे जिल्ह्यातील 311 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेची नोटीस
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या ग्रामपंचायतींना नोटीस
सरंपच आणि ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेची नोटीस
बारामती तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश
येत्या 15 ऑगस्टपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – पटोले
उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलेली टीका योग्य – पटोले
इंग्रजपण सत्याग्रहाला नौटंकी म्हणायचे – पटोले
देशाची परिस्थिती चिंताजनक, लोक उपाशी मरत आहेत – पटोले
नाईट लँडिंग वरून दोन नेत्यांमध्ये ट्विटर वॉर ?
कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी ट्विट करून दिली माहिती
राज्यसभा माजी खासदार संभाजी राजे यांच्याकडूनही ट्विट
गेल्या सहा महिन्यातील पाठपुराव्याला यश आलं – खासदार संभाजी राजे छत्रपती
तर धनंजय महाडिक यांनीही व्हिडिओ जारी करत नाईट लँडिंग सुरू झाल्याबद्दल मानले आभार
पारनेर पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
कोठडीतील 18 आरोपींना कोरोनाची लागण
कोरोबाधितांचे स्वतंत्र बराकींमध्ये विलगीकरण
दोन कोरोनाबाधित रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना खासदारांच्या जाहिराती ‘सामना’ने नाकारल्या
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित देण्यात आल्या होत्या जाहिराती
आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात महाआरतीचे आयोजन
पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरती
सारसबागेतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात शिवसैनिकांच्या वतीने आरती
मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लाईन लावण्यास सुरुवात केली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे
मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रांग लावायला सुरुवात केली
एका शिवसैनिकांनी रक्ताने बनवलेली फ्रेम उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून देण्यासाठी रांगेत उभा आहे
मुसळधार पावसामूळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान
भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात मोठी वाढ, सर्वसामान्याना फटका
भाजीपाला उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अमरावतीत कोथिंबीर-70 रुपये किलो तर वांगे,भेंडी, कोबीही,कारले ही महागले
गणेश उत्सव काही दिवसांवर आला असल्याने मूर्तिकारांची गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न
तर शाडू मातीचे,आणि रंगांचे दर वधारल्याने यंदा गणेश भक्तांना महागाईची झळ बसणार
देहूच्या कुंभारवाड्यात यावर्षी गणेश मुर्तीकारानी पुण्यातील मानाचे गणपती बनविण्यावर मोठा भर दिला आहे
दगडूशेठ कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग,केशरीबाग,बाबू गेनू,गुरुजी तालीम, खडकमाळ,आणि मुंबईचा लालबागचा राजा
या मानाच्या गणपतीना मोठ्या प्रमाणात यावर्षी मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ट्विट करत दिल्या शुभेच्छा
निरोगी दिर्घायुष्या लाभो, अश्या सदिच्छा
शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख
औरंगाबाद जिल्ह्यातील कसाब खेडा या गावाला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे तब्बल सहा गावांचा संपर्क तुटला आहे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या संततदार पावसामुळे हा पूल वाहून गेला आहे. नागरिकांनी अनेक वेळेला हा रस्ता बनवण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी कमकुवत झालेला पूल वाहून गेला आहे. परिणामी सहा गावातील शेकडो लोकांचा संपर्क तुटला आहे.
महाबळेश्वरमधील इंग्रजी पॉईंटची नावे बदलण्याची मागणी
सर्व पॉईंटला स्वातंत्र्यसैनिकांची नावे द्या
भाजपच्या हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांची मागणी
येत्या 15 ऑगस्टला नावांमध्ये बदल न झाल्यास स्वतः नावे बदलणार
हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष विक्रम पावसकर यांचा इशारा
गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल
धान खरेदीच्या पैशांत अफरातफरीचा आरोप
एका आरोपीला अटक तर एक फरार
जिल्हाधिकारी संजय मीना करणार चौकशी
मराठवाड्यात 3 हजार 640 गावांना अतिवृष्टीचा फटका
सहा लाख 21 हजार शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान
चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील 182 मंडळात पावसाने उडवली दाणादाण
सव्वालाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पाच महाविद्यालयांवर कारवाई
भौतिक सुविधा आणि शिक्षक नसलेल्या पाच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यास बंदी
पाच महाविद्यालयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड
महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवीन प्रवेशास बंदी
सलग्रीकरण देणाऱ्या समित्यांचीही चौकशी करण्याचा कुलगुरूंचा निर्णय
शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात पुन्हा धक्का
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदें गटात प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यापूर्वीच शिंदे गटात इन्कमिंग सुरू
प्लास्टिक वापराबाबत नव्या राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून प्लास्टिक कोडेट वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरण विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.
अकोल्याच्या भाजपा खासदाराचे घर बॉम्बने उडून देण्याची धमकी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. तसेच अकोला -पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा देखील माहिती अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोनद्वारे दिली होती. त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले. संपूर्ण रेल्वेची तपासणी करण्यात आली. मात्र रेल्वेमध्ये काहीही आढळून न आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आता हा फोन कुठून आला होता, कोणी केला होता याचा शोध पोलीस घेत आहेत.