मुंबई : आज गुरुवार दिनांक 28 जुलै आपण आज दिवसभरात राज्यात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेणार आहोत. आज देखील काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पावसाबाबतच्या घडामोडी देखील जाणून घेणार आहोत.
कल्याणजवळ टिटवाळा येथील धक्कादायक घटना
५५ वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या
दोन महिलेचा फोन लागत नसल्याने नातेवाईकांची सुरू होती शोधाशोध
महिलेच्या कॅन्टीनमध्ये शोध घेतला असता आढळला महिलेचा मृतदेह
टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सुरू केला तपास
अनुबाई शेलार असे या मृत महिलेचे नाव
लोकसभा अध्यक्षांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, संजय राऊत यांना अध्यक्ष उत्तर देतील
गटनेता म्हणून मान्यता दिली आहे
आम्ही पक्ष शिस्त भंग केलीच नाहीय, हा केविलवाणा प्रयत्न आहे
संजय राऊत यांच्याकडे कोणताही अधिकार नाही
राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्यावर कारवाई करू शकत नाही
संसदेत कार्यालय ताबा आम्ही घेतला नाही, आम्ही कायम कार्यालयात जातो, इथं गट तट नाही, अखंड शिवसेना आहे, सर्व सदस्यांनी मिळून गटनेता बदलला आहे
विनायक राऊत यांच्या पत्राला काही अर्थ नाही
ऑटोरिक्षांच्या दरवाढीचा निर्णय प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित
पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामतीमधील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ प्रलंबित ठेवण्याचा निर्णय
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांची माहिती
ऑटोरिक्षा भाडेसुधारणा करण्याचा निर्णय 25 जुलै रोजी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणेच्या बैठकीत घेण्यात आला होता
पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान देय असलेल्या सद्याच्या 21 रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर 23 रूपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी देय भाडे 14 रूपयावरून 15 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र भाडेदरवाढीचा पुर्नविचार व्हावा, यासाठी विविध रिक्षा संघटना व प्रवासी संघटनांनी मागणी केली
केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी
शुक्रवारी आरक्षण सोडत कार्यक्रम !
इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे !
आरक्षणातील 116 जागांमधून मागास प्रवर्गासाठी 27 टक्के आरक्षणानुसार जागा निवडल्या जाणार
30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणार
30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत आरक्षणावर हरकती मांडण्याचा कालावधी
पुण्यातील नाना पेठेत झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो नागरिक समर्थ पोलीस स्टेशन मध्ये दाखल
– आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी
– या खूनामागे मुंबईतील गँगचे कनेक्शन असण्याची शक्यता,
– अशा परिस्थितीत नागरिक भीतीच्या सावटाखाली या दहशतीतून मुक्तता करावी
– पुण्यातील नाना पेठेत पूर्व वैमनस्यातून अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून करण्यात आला होता
– या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती
– नाशिक शहर पोलिसांच्या तपासत धक्कादायक माहिती समोर
– मनोज पाटील, पंकज सोनवणे, सागर दिघोळे, सूरज राजपूत हे चार संशयित गजाआड
– राजकीय वैमानस्यातून शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय
– शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
– शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता
भंडारा पोलीस अधीक्षक यांची तडकफडकी बदली.
शाळेच्या प्रकरणात शाळा आणि आमदार भोंडेकर यांच्या झालेले वाद
पोलीस अधीक्षक यांनी आमदार भोंदेकर यांच्यावर विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद केला
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची बदलीची चर्चा रंगली
आज अखेर वसंत जाधव यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आम्ही कायदेशीर गटनेता निवडला आहे
आमच्यावर कारवाई होऊ शकत नाही
गटनेत्याला ही अध्यक्षांनी मान्यता दिली आहे
कोर्टात जरी गेले तरी निकाल आमच्या बाजूने लागेल
आम्ही पक्ष सोडलेला नाही व्हीपचंही उल्लंघन केलं नाही
आम्ही शिवसेनेतचं आहोत
आमचे बंधुराज हे राजकीय अपेक्षेनं ठाकरेंसोबत गेलेत
आम्ही एकनाथ शिंदेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे
आम्ही ही त्यांना शुभेच्छा दिल्या
राजकीय अपेक्षा प्रत्येकाला असतात मात्र कुटुंबात विवाद नाही
माझ्या जिल्ह्यात मी शिवसेनेचा फाऊंडर आहे
आणि आम्हाला गद्दार म्हणणं योग्य नाही
जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली द्यायला निघाले त्यापासून आम्ही वाचवलं
एकनाथ शिंदेंनी एवढा मोठा निर्णय घेतला म्हणजे सगळ्या बाजू तपासल्या असतील
सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागेल
एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून आम्ही मान्यता दिली आहे
पक्ष प्रमुख कोण या प्रश्नावर पक्षाची घटना माहिती नाही म्हणून उत्तर देणं टाळलं
ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच;प्रकाश आंबेडकर
ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच आहे.
सुप्रीम कोर्टाने मागेच जाहीर केलं होतं की वॉर्ड रचना झालेली आहे, प्रभाग रचना झालेली आहे, त्याचप्रमाणे आपण निर्णय घ्या.
ओबीसींना 27 टक्के आरक्षण मंजूर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचार केला की ज्या निवडणुका होणार
त्या 27 टक्के ओबीसी आरक्षणासोबत घेण्यात येतील.
परंतु सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की, पावसाळा होता म्हणून त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची परवानगी दिली. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण विरहित घेतल्या जातील.
त्यामुळे ज्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही विचारतोय, हे आरक्षण या निवडणुकीत नाही, ते पुढच्या निवडणुकीत तरी राहणार आहे का ? याचा खुलासा त्यांनी करावा.
अमरावती जिल्ह्यात नव्याने 68 कोरोना बाधित आढळले
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेचा अहवाल
जिल्ह्यात नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या 1 लाख सहा हजार 577 झाली आहे.
क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे आयटीआयच्या जागेबाबत कौशल्य विकास, ठाणे मनपा यांनी त्वरीत बैठक घ्यावी
ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महापालिका यांनी त्वरीत संयुक्त बैठक घ्या
आयटीआयच्या मुलांची सोय व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने चर्चा करुन कार्यवाही करा
मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना
ब्रिजभूषण सिंग यांची दिल्ली निवास्थानी दिपाली सय्यद यांनी भेट घेतली
अनेक विषयांवर चर्चा
काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्या विरोधात भाजपकडून निषेध
नागपूरात निषेध आंदोलन
गोंड राजे बक्त बुलदंशहा यांच्या पुतळ्या जवळ आंदोलन
भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडी कडून केलं जातं आहे आंदोलन
काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज अध्यक्ष नायडू यांची भेट घेतली
गेल्या दोन दिवसांपासून राज्यसभेतील खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी
अध्यक्ष नायडू यांनी काही खासदारांच्या अनियंत्रित वर्तनाचे गांभीर्य अधोरेखित केले
निलंबित खासदारांना त्यांच्या वर्तनाबद्दल पश्चात्ताप झाला तरच रद्द करण्याचा विचार केला जाऊ शकतो:
पाकिस्तानकडे 682 कैदी आहेत जे भारतीय आहेत
किंवा भारतीय असल्याचे मानले जाते.
त्यापैकी 17 जण 10 वर्षांहून अधिक काळ पाकिस्तानच्या ताब्यात आहेत
राज्यसभेतील एका खासदाराच्या प्रश्नावर ही माहिती समोर आली
यापुढे राजकीय पक्षा तर्फे निवडणूक लढवण्या ऐवजी, निवडुन आलेल्या लोकांना एकत्र घेऊन सत्ता मिळवण्याची देशात नवी फॅशन
जयंत पाटील पाटील यांची शिंदे-फडणवीस गटावर खोचक टीका
बंगाली भाषेमुळे अधीर रंजन चौधरी यांच्या तोंडातून तो शब्द आला
भाजप विनाकारण हा मुद्दा रेटत आहे
काँग्रेसनेच या देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या मग आम्ही अपमान कसा करू
उलट स्मृती इराणी यांनीच सोनिया गांधी यांचा अपमान केला
महाराष्ट्रात नक्की पुन्हा निवडणुका लागतील
महाराष्ट्रात लोकशाहीला हरताळ फासला जात आहे
महाराष्ट्रातील जनता सगळं ओळखून आहे
इम्रान प्रतापगडी यांची महाराष्ट्र राज्य सरकारवर सडकून टीका
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू
नदी, नाल्यातील पाणी पातळीत वाढ
जनजीवन विस्कळीत
राष्ट्रीय महिला आयोगाची अधीर रंजन चौधरी यांना नोटीस बजावली आहे
3 ऑगस्टला महिला आयोगासमोर लेखी स्पष्टीकरणासह हजर राहावे लागणार
राष्ट्रीय महिला आयोगाने राष्ट्रपतींवर केलेल्या वक्तव्याची घेतली दखल
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना नोटीस बजावली
अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मांनी केला निषेध
आणि ते अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी असतील, पण विस्तार आणि अधिवेशन झालं पाहिजेत
रामदास आठवले यांचे मत
येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार,
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होण्याची शक्यता
आरपीआयला एक मंत्रिपद मिळेल
अधीर रंजन यांनी राष्ट्रपती पदाचा अपमान केला आहे
यांचं नाव अधीर आहे, पण त्याचं डोकं बधिर झालं आहे
सोनिया गांधी यांनी त्यांना पदावरून हटवाव
बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणजे असं बोलणं योग्य नाही, याचा आम्ही निषेध करतो
मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल
शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन
डोंबिवली-ठाकुर्ली परिसरात चैन चोरांची दहशत
मुलाला शाळेतून घेऊन परतत असलेल्या महिलेची इमारतीच्या आवारात घुसून चोरट्याने चैन केली लंपास
घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भर दिवसा चैन चोरीच्या प्रकरणानंतर परिसरात भीतीचे वातावरण
आरपीआयमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार विशेष कार्यक्रम
2 ऑगस्ट रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये कार्यक्रम
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
गडचिरोली ओबीसी राजकीय आरक्षणात तीन जिल्हा परिषदामध्ये शुन्यावर
महाराष्ट्रातील गडचिरोली पालघर व नंदुरबार हे तीन जिल्हे आदिवासी जिल्हे म्हणून ओळखले जातात
या तीन जिल्ह्यात ओबीसी आरक्षण शुन्यावर असून
गडचिरोली जिल्ह्यात येत्या काही दिवसात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार
ओबीसी आरक्षण वगळता निवडणूका होईल तर ओबीसींवर अन्याय होईल
याच्या अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतमध्ये ओबीसी आरक्षण वगळता निवडणुका
सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी, कोरची, धानोरा, कुरखेडा या 9 नगरपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिनेश परसावत यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
संघटनमंत्री संजय कौडगे यांनी त्यांचे पक्षात केले स्वागत
परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केला भारतीय जनता पक्षात प्रवेश
दिनेश परसावत शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात
-लोकसभा राज्यसभा कामकाज तहकूब
-उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
-काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावरुन वाद
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संघर्षात उपस्थित असलेल्या भाजप खासदार आणि मंत्रीपरिषदेच्या विरोधात तक्रार
काँग्रेस खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवलं जाणार,
वेळ आली तर या घटनेचे व्हिडीओ फुटेज तपासले जाणार
आज लोकसभेत दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं.
सभागृह तहकूब झाल्यानंतर श्रीमती गांधी यांच्या विरोधातल्या घोषणा ऐकून धक्का बसला.
आपण सर्वांनी सभागृहाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रतिष्ठा, पावित्र्य राखल पाहिजे
Unfortunate scenes were witnessed in lok sabha today. Was shocked to hear un necessary sloganeering against Mrs Gandhi after house was adjourned. We all should take responsibility of the house and maintain its dignity and decorum.
— Supriya Sule (@supriya_sule) July 28, 2022
राज्यातील विद्यमान शिंदे-भाजप सरकार ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे
सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या मेहनतीचे फलित.
उगाच आरक्षण मिळवून दिल्याचा डंका न पिटता ओबीसी आरक्षणाच्या वाटेत भाजपचा नेहमीच अडसर
भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार याचे आवाहन
शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील उद्धव ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सभापती कार्यालयात निवेदन दिले
पीकपाणी ,दुष्काळाचा तसेच विकास कामासाठी मुख्यमंत्री यांचा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील नाशिक, संभाजीनगर
पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात होईल
यावेळी जिल्हा प्रशासनासोबत विकास कामांसोबत आढावा बैठका होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात एकूण 6 सभा होणार
आमदार उदय सामंत यांची माहिती
अमरावतीच्या दर्यापूरमध्ये उपचारा दरम्यान एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू
संतप्त नातेवाईकांनी दर्यापूरमधील शतायू या खासजी रुग्णालयाची केली तोडफोड
घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
चुकीच्या उपचार पद्धतीने महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकाचा आरोप
आरती डिक्कर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव,
डॉक्टरला अटक करण्याची नातेवाईकांची मागणी..
शिंदे सरकारने सत्ता आल्यानंतर लक्ष दिलं असतं तर या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण शंभर टक्के मिळाले असते
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
आरेमधील वृक्ष तोडीला आव्हान, सर्वोच्च न्यायालय उद्याच (शुक्रवारी) घेणार सुनावणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प
मेट्रो कारशेड सरकार बनताच पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय घेणाऱ्या फडणवीसांना धक्का
ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी दाखल केली होती याचिका
सरन्यायाधीश रमण्णा यांनी डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे वर्ग केली याचिका
राज्य सरकार आठवड्याच्या शेवटी आणखी जेसीबी चालवेल; म्हणून, न्यायाधिशांकडे माझी विनंती आहे. कृपया उद्या या प्रकरण तात्काळ लिस्ट करण्याची मागणी
या याचिकेची दखल घेत न्यायालयाने उद्या सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहिम राष्ट्रपती यांचा ‘ राष्ट्रपत्नी’ असा मुर्खपणाने उल्लेख केला
भोचकगिरी केली आहे चुकून बोललो आता फाशी देता का मला हे त्यावरचे अधीर यांचे उत्तर अधिक संतापजनक
सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे
हे अधीर की बधीर.?
लोकसभेतील @INCIndia चे गटनेते @adhirrcinc यांनी महामहिम राष्ट्रपती यांचा ‘ राष्ट्रपत्नी’ असा मुर्खपणाने उल्लेख करून भोचकगिरी केली आहे चुकून बोललो, आता फाशी देता का मला,हे त्यावरचे अधीर यांचे उत्तर अधिक संतापजनक आहे.
असे सेल्फगोल करणारे नेते असतील तर कल्याणच आहे
हे अधीर की बधीर.? pic.twitter.com/Etztcf793D— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 28, 2022
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे स्वागत
आमदार जोरगेवार यांनी आईच्या नावाने सुरू केलेल्या अम्मा टिफिन या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या उपक्रमाची केली पाहणी,
जोरगेवार कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान चहावाला पंतप्रधान-रिक्षेवाला मुख्यमंत्री तर बांबूच्या टोपलीवाल्याचा मुलगा मंत्री का बनू शकत नाही अशी हास्यकल्लोळात दिली प्रतिक्रिया
चंद्रपूर: विरोधी पक्ष नेते अजित पवार शहरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना जोरगेवार यांनी आघाडीला दिले होते समर्थन,
सध्या आमदार जोरगेवार यांचे बंडखोर शिवसेना गटाला आहे समर्थन
अजित पवार यांची अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी होणारी भेट महत्त्वाचे असल्याची चर्चा
मंत्रिमंडळाचा विस्तार न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करतोय
भुजबळांचा एकनाश शिंदे, फडणवीसांना चिमटा
राज्यात पुरामुळे परिस्थिती बिकट
अशा स्थितीमध्ये राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा – भुजबळ
अजित पवारांचा विदर्भ दौरा
गडचिरोलीनंतर अजित पवार चंद्रपूरमध्ये दाखल
सिस्टर कॉलनी, रहमत नगरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात
खात्रीलायक सुत्रांची माहिती
शिंदे गटातील खासदारांनी कार्यालयावर ताबा मिळवला
संसदेमधल्या पक्ष कार्यालयावर आता शिंदे गटाचा ताबा
लोकसभा अध्यक्षांकडे कार्यालयाचा ताबा देण्याची केली होती मागणी
राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात
राज्य निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाला मोठा धक्का
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांना विलंब होऊ नये यासाठी आरक्षणाविना निवडणूक घेण्याचे आदेश
निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी फुटलेला पेपर सोडवला, स्क्रिपटेड मुलाखल वाटली
प्रश्नही माहित होते आणि उत्तरही माहित होते
जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना पालापाचोळा म्हटले
मग तुम्हाला संपलेले ठाकरे म्हणावे का?
निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
लीलाधर डाकेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे लाईव्ह
मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली लीलाधर डाकेंची भेट
सायंकाळी पाच वाजता मनोहर जोशींची भेट घेणार
शिवसेना वाढवण्यात डाकेंचे मोठे योगदान
एकनाश शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी
लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार – शिंदे
अजित पवार यांचा गडचिरोली दौरा
ओला दुष्काळ जाहीर करा
विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी
मुख्यमंत्र्यांनी मुंबई बसून निर्णय घेऊ नयेत, पहाणी करावी – अजित पवार
तातडीने अधिवेशन घेण्याची गरज – पवार
भितींना ओलावा आलेल्या घरांचेही पंचनामे करा – अजित पवार
गडचिरोलीमध्ये दहा लाख हेक्टर क्षेत्रबाधित
अजित पवार यांची माहिती
नाशिक : बांधकाम व्यवसायिकाला 47 लाखांची खडणी मागणाऱ्याला अटक
कार्यालयातील कर्मचाऱ्याने संगणकातील गोपनीय माहिती चोरून मागितली खंडणी
संशयित आरोपीने खंडणी न दिल्यास तपास संस्थांकडे तक्रार देण्याची दिली धमकी
संशयित आरोपीने 5 लाख रुपयांची रक्कम देखील स्विकारली
बांधकाम व्यावसायिक समीर सोनवणे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार
पोलिसांनी संशयित आरोपीला केले अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवसेना नेते लीलाधर डाकेंची भेट
या आधी गजनान किर्तीकर यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली होती भेट
लीलाधर डाके हे बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेत
मुख्यमंत्र्यांकडून जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी
आखाड पार्टी करत असलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून
पुण्यातील गांजवे वाडी परिसरात मध्यरात्री एक वाजता कोयत्याने वार करत केला खून
बारक्या जोरी असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव
जोरीवर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून मारामारीचे अनेक गुन्हे दाखल
पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज
विश्रामबाग पोलीसांकडून तपासाला सुरुवात
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून दिल्ली दौऱ्यावर
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात राज्यपाल दाखल होणार
राज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असल्यानं मंत्रीमंडळाचा विस्तार कधी यावर प्रश्नचिन्ह
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांचा मुक्काम
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीवारी करावी लागली नाही – राऊत
एकनाथ शिंदेंना शपथविधीनंतर पाच वेळा दिल्लीवारी करावी लागली -राऊत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सारखे दिल्लीला जातात – राऊत
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांची टीका
अजित पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर
अजित पवारांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी
अजित पवारांचा गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद
गडचिरोली जिल्ह्यात अद्याप सरकारकडून मदत नाही – अजित पवार
जिल्ह्यात अद्याप नुकसानाचे पंचनामे देखील नाही – अजित पवार
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज – अजित पवार
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज आरक्षण सोडत
सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत
जिल्हा परिषदेच्या 62 गट आणि पंचायत समितीच्या 124 गणांसाठी आरक्षण सोडत
पंचायत समितीसाठी तालुकास्तरावर आरक्षण सोडत
अजित पवारांचा गडचिरोली दौरा लाईव्ह
जिल्ह्यातील मिर्ची उत्पादक शेतकरी संकटात.
वातावरणात बदल झाल्यामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
उत्पादन घटण्याची शक्यता
भंडारा जिल्ह्यातील 23 मंडळांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस
ओल्या दुष्काळाचे सावट
अतिवृष्टीने धानाचे पीक धोक्यात, शेतकरी संकटात.
तुमसर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
गडचिरोलीत दीड वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
एटापल्ली तालुक्यातील बोर्गीमधील घटना
मुलीची अवस्था बघून आई-वडिलांना शंका
उपचारादरम्यान अतिप्रसंग झाल्याचे आले समोर
एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल
फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध
रत्नागिरी : एक ऑगस्टपासून परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 24 तास खुला होणार
पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत
दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे केवळ दिवसा घाटातून सुरु होती आवजड वाहनांची वाहतूक
आता एक ऑगस्टपासून 24 तास वाहतुकीला परवानगी
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा गेल्या पाच वर्षांतील निच्चांकी पाऊस
जून, जुलै महिन्यात सरासरीच्या 59 टक्के इतकाच पाऊस
दोन महिन्यांत सरासरी 610 मिलिमीटर पावसाची नोंद
जुलै महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये असतो 85 ते 100 टक्के पाणीसाठा
यावर्षी मात्र सरासरी 75 टक्के पाणीसाठा
ऑगस्टमध्ये दमदार पावसाची अपेक्षा
शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगाव दौऱ्यावर
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्भूमीवर शहरात तयारीला वेग
शहरातील अनेक रस्त्याची प्रशासनाकडून रंगरंगोटीसह डांगडुजी, सुशोभीकरण
नागपूर जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस
आतापर्यंत 627 मिमी पावसाची नोंद
जुलै महिना संपायला अजून चार दिवस बाकी ,
आकाशात अजूनही ढगांची गर्दी कायम
2013 मध्ये 550 मिमी पावसाची झाली होती नोंद
10 वर्षातील जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस