मुंबई : आज शुक्रवार 16 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस, वाढती उष्णता आणि वटपौर्णिमेमुळे वाढलेली जास्तीची आवक याचा फटका फणस विक्रीवर झालाय. कमी विक्रीमुळे एपीएमसी मार्केट मध्ये 30 ते 40% फणस खराब झाल्याने फेकून द्यावा लागत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात फणसाची 800 टनाहून अधिक आवक झाली. मात्र अवकाळी पावसामुळे भिजलेला माल तसेच उष्णतेचे वाढते प्रमाण यामुळे फणस खराब होण्याची टक्केवारी वाढली आहे. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त फणसाला जास्त मागणी असल्याने आवक वाढली मात्र विक्रीत घट झाल्यामुळे फणस फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
– बार्शीतील युवराज ढगे या तरुणाला बार्शी पोलिसाकडून अटक आणि जामीनावर सुटका
– आक्षेपार्ह कमेंटबद्दल बार्शी शहर पोलिसांनी आरोपी युवराज ढगे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या कलम 67 नुसार गुन्हा नोंद केला आहे
– दरम्यान आरोपी युवराज ढगे याला बार्शी शहर पोलिसांनी अटक करुन सुटका केली
अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण 17 कोरोना बाधित सक्रीय रुग्ण
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाढली
अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या पोहचली 1 लाख 6 हजार 1 वर..
मृग नक्षत्र लागल्या नंतरही जिल्ह्यात पाऊसाने हजेरी लावली नसली तरी आज तब्बल सात दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. एक तास पाऊस बरसला असला तरी शेतीच्या कामाला शेतीच्या कामाला हा पाऊस नसल्याची ओरड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे यंदा मृग नक्षत्रा नंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी लागण्याची आशंका व्यक्त केली असली तरी पडत असलेला तुरळक पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीची कामं खोळंबली असून अधिक पाऊस येण्याची वाट जिल्ह्यातील शेतकरी बघत आहे.
देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं भाषण झालं नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीच्या महानगर महिला आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांच्या हातातील बॅनरवर देहू ऐवजी जुहू (मुंबई) असा चुकीचा उल्लेख होता. हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली तेव्हा ही चूक बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिसाच्या लक्षात आली. तेव्हा कुठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भानावर आले. त्यांनी बॅनर गुंडाळून ठेवला आणि नुसती घोषणाबाजी करून आंदोलनाचा सोपस्कार पार पाडला.
काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, एच के पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाला दिनांक १६ रोजी दुपारी ४.३० वाजता राजभवन येथे भेटीची वेळ दिली होती.
परंतु आज श्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली.
राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबई येथे असून शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भात काही नेत्यांनी राज्यपाल मुंबईत उपलब्ध नसल्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मान्सूननं महाराष्ट्र व्यापला
18 तारखेपासून राज्यात होणार जोरदार पावसाला सुरुवात
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसात पावसाला होणार सुरुवात
20 तारखेला कोकणात अलर्ट जारी
मान्सून दोन दिवसात होणार सक्रीय
भारतीय हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांची माहिती
अकोला : वकील गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील आज चौकशीसाठी अकोट पोलिसांसमोर हजर. अकोट पोलिसांनी केले होते गुणरत्न सदावर्ते, पत्नी जयश्री पाटीलसह चौघांवर एसटी कामगारांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसुल केल्याच्या आरोप प्रकरणी गुन्हे दाखल. अकोट न्यायालयाने केला होता सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर.
तब्बल दीड तास निंबाळकर आणि ठाकूर यांच्यात बैठक झाली आहे..
4 वाजता बैठक संपवून निंबाळकर मुंबईसाठी रवाना झाले आहेत..
मी जरी विधानपरिषद उमेदवार असलो तरी आमच्या जुन्या संबंधातून मी भेटायला आलो होतो.. असे निंबाळकर यांनी सांगितले आहे..
दुसऱ्या फळीतील चेहऱ्यांना अमित ठाकरे यांनी पुढे आणलं, नव्या चेहऱ्यांनाही दिली संधी…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली असून पहिल्याच टप्प्यात त्यांनी मनविसेचे ७ विभाग अध्यक्ष बदलले आहेत. नव्या विभाग अध्यक्ष पैकी बहुतेक जण हे मनविसेच्या दुसऱ्या फळीत होते, तर काही नवीन चेहऱ्यांनाही अमित यांनी पुढे आणलं आहे. काही निवडक ठिकाणी मात्र त्यांनी जुनेच विभाग अध्यक्ष कायम ठेवले आहेत.
मनविसेचे मुंबईतील नवीन चेहरे – नवीन विभाग अध्यक्ष :
वरळी – वैभव मांजरेकर विभाग अध्यक्ष
मानखुर्द – प्रकाश हंगारगे विभाग अध्यक्ष
घाटकोपर पूर्व – रोहन अवघडे विभाग अध्यक्ष
घाटकोपर पश्चिम – समीर सावंत विभाग अध्यक्ष
विक्रोळी – प्रथमेश धुरी विभाग अध्यक्ष
मुलुंड – प्रवीण राऊत विभाग अध्यक्ष
भांडूप- प्रतीक वंजारे विभाग अध्यक्ष
….. …… ……
आधीचे, पण नव्या यादीतही कायम असलेले मनविसेचे विभाग अध्यक्ष :
वडाळा – ओमकार बोरकर विभाग अध्यक्ष
श्रीमती मीनल सोनावणे विभाग अध्यक्ष (विद्यार्थिनी)
शिवडी – उजाला यादव विभाग अध्यक्ष
माहीम – अभिषेक पाटील विभाग अध्यक्ष
… ….. …..
गेल्या 7 दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांनी मुंबईतील 15 विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांना भेटी देऊन मनविसेचे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत, त्यांच्याशी थेट बोलत आहेत. या 15 विधानसभेतील मनविसेच्या 15 विभाग अध्यक्षपैकी 7 विभाग अध्यक्ष त्यांनी बदलले आहेत, 3 विभाग अध्यक्ष आधीचे कायम ठेवले आहेत, तर उर्वरित 5 विधानसभा साठीच्या नेमणुका ते पुढच्या आठवड्यात करणार आहेत.
मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान मुंबईच्या सर्वच्या सर्व म्हणजे 36 विधानसभा मतदासंघामध्ये राबवण्यात येत आहे. प्रत्येक विभागात त्यांना किमान 200 नवतरुण विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत असून आतापर्यंत त्यांनी सुमारे 3000 हजार विद्यार्थ्यांशी वैयक्तिक तसंच गटागटाने संवाद साधला आहे.
……
अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यापासून महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे. नव्या दमाच्या तरुणांना मनविसेत महत्त्वाची जबाबदारी देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते नव्या ऊर्जेने कामाला लागले आहेत.
भाजपचं मिशन लोकसभा
भाजपची महत्वाची बैठक पार पडली
आम्ही कार्यकर्त्यांना लोकसंपर्काबाबत सतर्क केलं
त्यांना अनेक कामं कशी हाताळायची याची माहिती दिली
नव्याने जिंकण्यासाठी काही मतदारसंघ निवडले आहेत
आम्ही सर्वच मतदारसंघात चांगलं काम करणार आहे
चाळीस-बेचाळीस मतदार संघ जिंकण्यावर आमचा फोकस असेल
अनेक मंत्र्यांना आत्तापासूनच कामं देण्यात आली आहेत
देशातील सर्व मतदारसंघात मंत्री जाणार आहेत
काँग्रेसचं आंदोलनच चुकीचं आहे
राहुल गांधी यांची चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाने ठवली आहे
त्यांनी यंग इंडियाच्या नवे व्यवहार फिरवले
त्यामुळे असे भ्रष्टाचार करण्याचं लायसन्स कुणाला नाही
काँग्रेस दबाव आणतंय हे चुकीचं आहे
यातून सर्व सपत्ती ही गाधी परिवाराला मिळाली आहे
इम्तियाज जलील हे पूर्ण उघडे पडले आहेत
एमआयएम हे शिवसेनेची बी टीम आहे हे स्पष्ट झालं आहे
भाजप कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करून ही निवडणूक लढत नाही
राष्ट्रपतीपदाकरता एनडीएला पूर्ण बहुमत आहे
पवारांनी तब्येतीचं कारण सांगितलं आहे त्याचा आदर केला पाहिजे
पाऊसच नसल्याने पेरणी लांबणीवर,बियाणे खरेदी कडे शेतकऱ्यांची पाठ….
पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा…
गेल्यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झाल्या होत्या पेरण्या….
अग्निवीर या भरतीत मराठी तरुणांनी सहभागी व्हावं ही एक संधी आहे
यामध्ये नोकरी ही फक्त चार वर्षाची आहे त्यामुळे सैन्याची क्षमता कमी होईल असं बोललं जातं मात्र हा प्रश्न आपण आता लष्करप्रमुखांवर सोपवूयात
पुढील तीन महिन्यांत याची भरती प्रक्रीया सुरु होणार आहे
यामध्ये चार वर्षानंतर भरतीच्या 25 टक्के जणांच प्रमोशन होणार आहे तर इतरांना केंद्रीय पोलीस दलात प्राधान्य दिलं जाणार आहे
इतर राज्यांनीही त्या त्या सरकारी भरतीत प्राधान्य दिलं जाईल म्हटलंय ज्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आहे
तरुणांनी याची तयारी करायला हवी आहे
देशाची अर्थव्यवस्था वाढतीये मात्र नोकऱ्यांच प्रमाण कमी आहे
त्यामुळे अग्निवीर भरतीत सहभागी व्हा असं आवाहन हेमंत महाजन यांंनी केलंय.
– विजाच्या कडकडाटसह पावसाच्या जोरदार सरी
– आलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदित
– नागपूर हवामान विभागाने विदर्भात मान्सून दाखल झाल्याचा वर्तवला होता अंदाज
– आलेल्या पावसामुळे शेतीकामांना येणार वेग
– बळीराजा पेरणी करण्यासाठी होता पावसाच्या प्रतीक्षेत, पावसाचे आगमन झाल्याने पेरणीची गती वाढणार
– देवळी, आर्वी, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात जोरदार तर वर्धा आणि सेलू तालुक्यात मध्यम पाऊस
– मुंबई असो किंवा पुणे कुठलाही अध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव नाही,
– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
– पुणे आणि मुंबईचा भाजप शहराध्यक्ष बदलण्याच्या सुरू होत्या चर्चा
विधानपरिषद सभापती तथा राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी दाखल
विरार पश्चिम विवा कॉलेजमध्ये ठाकूर आणि निंबाळकर यांच्यात अर्धा तासापासून बंद दाराआड चर्चा
बविआचे 3 आमदारचे मत मिळवण्यासाठी विधानपरिषद उमेदवार ठाकूरकडे मारत आहेत चकरा
– अजित पवार- देहु बद्दल काहीच बोलायचं नाही. विषय संपला. पुढे चला
–अग्निपथ- कोणतीही योजना- चांगला प्रयोग आपण द्यावा असं प्रत्येकाला वाटतं- त्रुटी राहू शकतात. मतमतांतरं असतात-त्रुटी दूर करायला पाहिजे
– विधान परिषद-दुसऱ्या राऊंडला ते निवडून आले. त्या संदर्भात सगळी काळी महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही घेऊ
– विधान परिषद-दुसऱ्या राऊंडला ते निवडून आले. त्या संदर्भात सगळी काळी महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही घेऊ
– तीन दिवस आम्ही मुंबईत
– विखे पाटील वर- आमचे बरं चाललंय.
– देहु- वारकरी संप्रदाय आला होता. चांगला कार्यक्रम झाला
– पवारांनी लोकांतच रहावं अशी आमची भावना
– ओबीसी जनगणना आडनावावरून- संध्याकाळी चर्चा करणार. काही नावं वेगवेगळ्या जातीत असतात
– शिवसेनेचे मंत्री आहेत- त्यांचे प्रमुख मान्यवर चर्चा झाली
– सगळेच पक्ष आपल्या आमदारांना मुंबईला बोलावतील.
– हिततेंद्र ठाकुरांनशीही चर्चा
– 48 मतं घेऊन मतं सेकंड राऊंडला मोजली गेली – त्यामुळे त्यांची 27 आणि ही 14 वाढली ही वस्तुस्थिती
– माणूस अनुभवातून शिकतो. तिन्ही पक्ष धडा घेतील
– एखादी निवडणूक लढताना ज्यांचा बाजुने निकाल त्यांचे कौशल्य म्हणतात. या निकालानंतर कोणाकडे कौशल्य ते कळेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या कामाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे
राज्यसभा निवडणुकीत मतदारसंघातील काम न झाल्यानं खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते होते नाराज
खेडमधील काम मार्गी लावा उपमुख्यमंत्र्या़ची मुख्यमंत्र्यांना विनंती
स्थानिक शिवसेना नेते काम होऊ देत नसल्याचा राष्ट्रवादी आमदारांचा होता आरोप
विधानपरिषद निवडणुकीआधी काम करा दिलीप मोहितेंनी दिला होता इशारा
– खंडीत धान खरेदी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला घेऊन सिहोरा येथील शेतकऱ्यांचे धान रस्त्यावर फेकून रास्ता रोको आंदोलन.
– संतप्त शेतकऱ्यांनी समजवण्यात पोलीस प्रशासनाला दमछाक झाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
– तुमसर- बालाघाट राज्यमार्ग काही तास ठप्प
18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक
स्वतः अजित पवार आमदारांची बैठक घेणार
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना दिल्या जाणार सूचना
पीकविमा प्रकरणी परभणीत भाजप आक्रमक,
जिल्ह्यात ठीक ठिकाणी भाजप कडून जाळण्यात आले रिलायन्सचे प्रतिकात्मक पुतळे ,
रिलायन्स गो बॅकचे देण्यात आले नारे .
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले आहेत.
नवनीत राणा म्हणाले की, राज्यपालांना भेटण्यासाठी माझ्याकडे अनेक विषय आहेत, आणि सर्व विषय महाराष्ट्राशी संबंधित आहेत, त्या सर्व विषयांवर मी चर्चा करणार आहे,
आगामी बीएमसी निवडणुकीत नवनीत राणा मुंबईची कन्या म्हणून भाजपचा प्रचार करणार आहेत.
नवनीत राणा म्हणाले की, जो निकाल राज्यसभा निवडणुकीत लागला, तोच निकाल महापालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीतही लागणार आहे.
बाइट: नवनीत राणा
देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक विजया बाबत शुभेच्छा दिल्या..
विधानपरिषद आणि येणाऱ्या महापालिका निवडणूक बाबत ही चर्चा झाली..
विधान परिषदेच्या निवडणुकीत ही मोठा विजय भाजप चा होणार आहे..
गुप्त मतदान असल्याने शिवसेनेचे 50% आमदार भाजप ला मतदान करणार हा विश्वास आहे.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही यंत्रणा करत आहे…
राजभवन वर आंदोलन करणे चुकीचे आहे..
.
राहुल गांधी यांच्या चौकशी नंतर सर्व काही समोर येईल…
रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी
उद्या दहावीचा निकाल असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
आता पालक आणि विद्यार्थ्यांची दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या निकालावर (SSC Results).शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं होतं. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा रोल नंबर आणि आईचं नाव अशी माहिती विद्यार्थ्यांकडे असावी. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Results) पाहण्यासाठी तुम्हाला एक सोप्पी गोष्ट करायची आहे. बारावीप्रमाणे दहावीचा देखील निकाल तुम्हाला आमच्या TV9 मराठीच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तुम्हाला निकालाची घोषणा झाल्यावर TV9 मराठीच्या वेबसाईटवर करिअर सेक्शनमध्ये (TV9 Marathi) कुठेही ही लिंक सहज उपलब्ध होणार आहे किंवा तुम्ही इथे क्लिक करून सुद्धा तुमचा दहावीचा निकाल सहज मिळवू शकता.
अग्निपथ योजनेबाबत राजनाथ सिंह यांना पत्र
खासदार वरुण गांधी यांनी लिहिले पत्र
अग्निपथ’ योजनेबाबत देशातील तरुणांच्या मनात अनेक प्रश्न आहेत
तरुणांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढायचे असेल तर सरकारने या योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्ये लवकरात लवकर समोर ठेवून आपली भूमिका स्पष्ट करावी
जेणेकरून देशातील युवा ऊर्जेचा योग्य दिशेने सकारात्मक वापर करता येईल – खासदार वरूण गांधी
विधानपरिषद मतदानाबाबत इम्तियाज जलील यांचा मोठा खुलासा
विधान परिषदेसाठी आमचे एक मत चंद्रकांत हांडोरेना देणार
इम्तियाज जलील यांचं थेट स्पष्टीकरण
चंद्रकांत हांडोरे यांनी दलित समाजासाठी काम केल्यामुळे त्यांना करणार मतदान
उद्या मुंबईत घेणार अंतिम निर्णय
उद्या इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली एमआयएमच्या दोन्ही आमदारांची बैठक
सत्तेत असताना गोट्या खेळायच्या आणि सत्तेतून गेलं की मोर्चे काढायचे असे धंदे भाजपने सुरू केले आहेत, लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. सर्वात प्रथम जनतेने त्यांनाच पडायला पाहिजे
(भाजप जल आक्रोश मोर्चावर इम्तियाज जलील यांची टीका)
अयोध्येचा दौरा ही पूजा नाही तर फक्त गाजावाजा होता, मी पण तीन महिन्यांपूर्वी उमरा या ठिकाणी आमच्या श्राद्धस्थानी गेलो होतो पण मी गाजावाजा केला नाही, आदित्य ठाकरे दौरा हा प्रॉपर प्लॅनिंग करून मीडिया पब्लिसिटी केलेला गाजावाजा केला आहे.
राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. ईडी कडे काहीतरी मुद्दा असेल म्हणून तर ही चौकशी सुरू आहे. याचा विरोध करण्याचे काहीच कारण नाही, चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होऊ दिलं पाहिजे
भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत यांची ताकत काय तर ती पैश्यांची ताकात आणि केंद्रीय यंत्रणांची ताकत आहे त्याच्या जीवावर हे पाचवा उमेदवार देत आहेत.
जेंव्हा विधानपरिषदेचा निकाल येईल तेंव्हा तो निकाल खूप धक्कादायक असेल
विधानपरिषदेत आम्ही आमचं एक मत चंद्रकांत हंडोरे यांना देणार आहोत, चंद्रकांत हंडोरे यांनी दलित समाजासाठी खूप मोठं काम केलं आहे, त्यामुळे त्यांना मत देणार
उद्या आमची मुंबईत बैठक आहे अंतिम निर्णय बैठकीत घेणार
एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावणार आहे, मला तर हे पण माहिती की एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती
– तुमच्या अपेक्षा महाराष्ट्रला आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला केलं तुम्हाला शिकवला गेलं
– आता हे सगळं करत असताना आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचा पाया त्यांनी रचला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गौरव होतो ते आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने काम करत असलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे,
– त्याच्यात भाग दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा संबंध आलेला आहे,
– राज्याच्या फायद्याचा विषय असेल तर सरकार नक्कीच तुमच्या पाठीशी उभं राहणार,
– या कार्यक्रमाच्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारे तरुण-तरुणी पुढे आले पाहिजेत
– त्यांच्यातून आमची शेती व शेतीपूरक उद्योग या उद्योगाला किंवा समाजाला उपयोगी ठरतील,
– अशा नवीन संकल्पना पुढे आले पाहिजे अध्यासन कल्पनांना मूर्त स्वरूप मिळाले पाहिजे,
-या संकल्पनांच्या उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी झाला पाहिजे
– महत्त्वाचं म्हणजे या प्रयत्नांमध्ये सातत्य राहिले पाहिजे ही व्यवस्था कायम टिकली पाहिजे
– मेहरबानी करा कुठलीही चूक होऊ देऊ नका, तुम्ही इकडे शिकलेले आहेत, नाहीतर आमची वाट लावाल
काँग्रेस खासदारांची उपराष्ट्रपतीकडे तक्रार
पत्र लिहून केली तक्रार
काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिले पत्र…
13, 14, 15 जून रोजी खासदारांविरुद्ध पोलीस कारवाई आणि काँग्रेस मुख्यालयात झालेल्या मारहाणीची तक्रार
दिल्ली पोलिसांची कारवाई म्हणजे खासदाराच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन – काँग्रेस खासदार
त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत
सगळे लोक समान नाहीत
राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही विजय मिळेल
शिवसेनेचं अधिक मतदान भाजपला मिळेल
मुंबईत शिवसेनेचे दिवस भरले आहेत
महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी
पंकजा मुंडे यांना स्वतःचा पक्ष काढण्याचा इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव
इम्तियाज जलील यांनी मुंडे भगिनींना आतापर्यंत दोन वेळा प्रत्यक्ष भेटून स्वतःचा पक्ष काढण्याचा सल्ला दिला
पंकजा मुंडे यांनी स्वतःचा पक्ष काढला तर महाराष्ट्रात भूकंप येईल
गरज पडल्यास पंकजा मुंडे यांना एमआयएम पार्टी मदत करणार
इम्तियाज जलील यांचं टीव्ही 9 कडे सर्वात मोठं स्पष्टीकरण
– प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये भव्य मोर्चा
– भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काढला मोर्चा
– अक्कलकोट तालुक्यातील मुस्लिम समुदायातर्फे काढण्यात आला भव्य मोर्चा
– नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवारांना देहूतील नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात भाषणासाठी डावललं
मात्र देहू संस्थानचं प्रस्थान सोहळ्याचं अजित पवारांनी निमंत्रण स्विकारलं
अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला लावणार हजेरी
प्रस्थान सोहळ्याला येतो अजित पवारांचा देहू संस्थानला निरोप
अजित पवार नाराज नसल्याचं कृतीतून देणार दाखवून
20 तारखेला देहूत दूपारी 2 वाजता पार पडणार प्रस्थान सोहळा
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले.
विधानपरिषदेत गुलाल भाजपचाच आहे
कार्यक्रम ठरवितानाचं मी बोलणार नाही
देशाचे पंतप्रधान बोलले त्यात सगळं आलं
याला अपमान नाही म्हणतं
दुसऱ्या पक्षात काय सुरु आहे…हे मी कधीही पाहत नाही
केवळ गुलाल बाकी आहे…
राज्यसभेचा शिल्लक गुलाल, विधान परिषदेला वापरणार – चंद्रकांत पाटील
पक्षाशी गंधारी आमच्याकडे चालत नाही
परमेश्वर मानायचा नाही
आजची नेहमीप्रमाणे मिटिंग आहे
येणाऱ्या निवडणुकीच्या अनुशंगाने मिटिंग आहे
शक्तीशाली रचना, बुथ रचना
चौकशी करण्यात त्यात आहे
तपास यंत्रणा त्यांचं काम करीत आहेत
ज्या सगळ्या संस्था काम करीत आहेत.
त्या स्वायत्ता संस्था आहेत
भाजपकडून या संस्था चालत नाही
केंद्र सरकार कोणत्याही संस्थेला दबाव आणत नाही
यवतमाळ- विज पडून दोघांचा मृत्यू एक जखमी यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील मुदाटी व राजनी गावतील घटना
विजेच्या कडकडाट सह पावसाला सुरुवात झाली
शेतात काम करताना झाडाखाली थांबलेल्या 2 जणांवर वीज कोसळली असून यात दोन जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला आहे
हिंगोली- हेलिकॉप्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांनि मागितले कर्ज
निसर्गाचा लहरीपणामुळे शेती तोट्यात येत असल्याने मागितले कर्ज
भारतीय स्टेट बँकेच्या गोरेगाव शाखे कडे मागितले कर्ज
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास पतंगे यांनी मागितले कर्ज
पुणे महापालिका निवडणुकीची मनसेकडून जोरदार तयारी सुरू
शहरातील पक्ष संघटनेचा आढावा घेऊन प्रभाग रचना ,संभाव्य उमेदवार, इच्छुक उमेदवारांचा आराखडा शहर कार्यकारिणीनं केला तयार
आराखडा राज ठाकरेंना पाठवला
राज ठाकरे पुण्यासंदर्भात घेणार निर्णय
निवडणुकीची जोरदार तयारी सुरू
राज ठाकरे पुण्यातील निवडणूकीसंदर्भात पक्ष संघटनात्मक निर्णय घेणार सूत्रांची माहिती
– शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
– विदर्भात आज थोड्या वेळापूर्वी मॅान्सून दाखल
– विदर्भातील ११ जिल्ह्यात मॅान्सुन दाखल
– नागपूर हवामान विभागाची माहिती
– कालपासून विदर्भात ढगाळ हवामान आणि पाऊस
– विज्ञान दृष्टी निर्माण करणारे शिक्षण हे आपल्याला हवं आहे – अजित पवार
– आपल्याकडे अनेक मोठ्या मोठ्या विज्ञान संस्था आहेत विद्यार्थ्यांना कधीतरी त्या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळते
– आमच्या विद्यार्थ्यांना वाटतं परंतु त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची क्रीडांगण ठरतील अशी केंद्र सुरू होणं ही काळाची गरज आहे
– हे ओळखून आमच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग मुंबई यांनी महाराष्ट्रात यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहेत
– या सेंटर विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचा नक्कीच उपयोग होईल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही
– किती लोकांना माहिती माहिती नाही परंतु महाराष्ट्रात 9 ते 18 वयोगटातील 67 लाख शालेय मुलं आणि 26800 माध्यमिक शाळांच्या मध्ये औपचारिक शालेय शिक्षण त्या त्या ठिकाणी घेत आहेत
– प्रत्येक मुलाला स्वतःचे सामर्थ्य कौशल्य ओळखण्यात समर्थन करणं आणि ज्ञान कौशल्य आणि मूल्याचा पाला तळ पाया तयार करणार त्याबरोबरच रोजगार आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या निर्मितीसाठी व भविष्यातील शिक्षणासाठी पुढे जाण्यास तयार करणं याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे
– आपली आजची पिढी हे आपल्या देशाचे उद्याचे मनुष्यबळ आहे त्यांना भविष्यकालीन येणार्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यास तयार करत असताना त्या आव्हानांवर मात करून त्यांच्या संधीत रुपांतर करता येईल
राहुल गांधी विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाई विरोधात भिवंडीत युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली निदर्शने
औरंगाबादच्या लिटल फ्लॉवर शाळेसमोर पालकांचे आंदोलन
शाळा फिस साठी सक्ती करत असल्याचा निषेधार्थ आंदोलन
शाळेचे पालक आणि शिक्षकांमध्ये आक्रमक चर्चा
शाळेचा फिसचे हप्ते करून देण्यास नकार
तर पालक आंदोलनावर ठाम
काँगेस नेते राहुल व सोनिया गांधींना ईडी ची नोटीस पाठवल्या बद्दल नवी मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली आहे
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलंय
होश मे आओ होश मैं आओ नरेंद्र मोदी होश मैं आओ आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत
– महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल
– युवराज ढगे असे या आरोपी व्यक्तीचे नाव असून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
– वटपौर्णिमाबाबत रुपाली चाकणकर यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत एका फेसबुक पेजवरील पोस्टवर युवराज ढगे याने केली होती आक्षेपार्ह कमेंट
– त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे यांनी दिली ढगे विरोधात पोलिसात फिर्याद, भांदवि कलम 509, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 नुसार गुन्हा नोंद
शिवसेनेचा वर्धापन दिन व्हर्च्युल पद्धतीने साजरा होणार आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना online मार्गदर्शन करणार आहेत.
वाढत्या कोव्हीड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात वर्धापनदिना कार्यक्रम आयोजित करणे टाळण्यात आलंय.
यंदा शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांचा पवईतील रेनेसां हॉटेलमध्ये असणार मुक्काम
18 तारखेपासून असणार मुक्काम
18 तारखेला शिवसेना आमदारांची हॉटेलात बैठक, नेते करणार मार्गदर्शन
20 तारखेला विधान परिषद निवडणुकीसाठी होणार मतदान
राज्यसभा निवडणुकीवेळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये होता शिवसेना आमदारांचा मुक्काम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वास्थ व दिर्घायुष्यासाठी अक्कलकोट ते शिवतीर्थ मुंबई पायीवारी
मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपती जवळ पायी वारी काढणाऱ्यांचे स्वागत
-मुंबई पुणे द्रुतगति महामार्गवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात,पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटी
-बोरघाटात खोपोलीच्या हद्दीतील घटना
-सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने तांदळाचं ट्रक झाला एक्स्प्रेस वेवर आडवा यामुळे सर्वत्र तांदुळ चं तांदूळ द्रुतगती वर विखुरला होता,या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले होते जखमींना बाहेर काढण्यात देवदूत रेस्क्यू,आयआरबी कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांना यश.
2 मंत्र्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि दिल्लीचे सत्येंद्र जैन यांच्याविरोधात याचिका
मंत्रीपदावरू दोन्ही मंत्र्यांना हटवा – याचिका
अश्विनी उपाध्याय या याचिकाकर्तेकडून याचिका दाखल
IAS, IPS अधिकारी जर 2 दिवसांपेक्षा जास्त काळ कोठडीत असतील तर त्यांना पदावरून काढून टाकले जाते मग मंत्री पदावर का राहतात
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. तिने आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे
काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ संसदेत दाखल
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेणार भेट
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात करणार तक्रार
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्याचबरोबर कॉंग्रेस खासदारांसोबत पोलिसांचा गैरव्यवहार , याबाबत करणार तक्रार
अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचे शिष्टमंडळ संसदेत दाखल
– उत्तर प्रदेश ढवळून निघावा असा आदित्य ठाकरेंचा दौरा झाला. कमी वेळेत केलेले कालचे कार्यक्रम छाप पाडून गेले. अनेक वर्षे झाला नाही असा हा कार्यक्रम होता.शरयू घाटावरील आरती तर रोमांचक होती. हा अयोध्या दौरा राजकारणा पलिकडचा होता.
– अयोध्येतून ऊर्जा घेवून राज्यात काम करणार. अयोध्या भूमीतून सेनेला ऊर्जा मिळालीय
– महाराष्ट्र सदनाचा ऐतिहासिक निर्णय आहे.एक वेगळे नाते अयोध्येशी आहे. इथले लोक बाळााहेबांची आठवण काढतात.राज्याची वास्तू इथं असावी अशी मी विनंती सीएमना केली होती.युुपी सरकारशी संवाद सुर झालाय.इतर राज्यांना जागा मिळालीय तशी आम्हालाही मिळावी.
– त्यांची आडनावे पोटदुखे ठेवायला हवीत. हिंदुत्वाचे प्रमाणपत्र यांच्याकडून घ्यायची गरज नाही. आमचे हिंदुत्व तुम्ही नका ठरवू. आम्ही भूमिका बदलली नाही.पक्षाची साथ सोडली पण हिंदुत्व नाही. खुर्चीसाठी राजकारण नाही केले. हे नकली लोक आहेत. यांना मेहबुबा मुफ्तीसोबत सत्ता चालते. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व.
– हनुमान गढी व लक्ष्मण किल्लाच्या साधू महंतांनी उद्धव ठाकरेंना येण्याचे निमंत्रण दिले.
– इथले बृजभूषण सिंह हे आदित्य ठाकरेंशी फोनवरून बोलले व त्यांना शुभेच्छा दिल्या
– सहमतीचा उमेदवार असण्यापेक्षा देशाला मान्य होईल असा ताकदीचा उमेदवार हवा. रबर स्टॅम्प खूप मिळतील.
-चर्चेची दारे सेनेने बंद केली नाहीत. राष्ट्रीय प्रश्नासाठी सीएम खालच्या पातळीवरचे राजकारण नाही करत.
– मलिकांना अन्याय पद्धतीने अटक केलीय. आता त्यांचे मंत्रीपद काढून घेवू नये या मताचे आम्ही आहोत. दिल्लीत सत्येंद्र जैन यांना अटक झालीय,पण मंत्रीपद कायम आहे
– केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर इतका कधीच झाला नव्हता.विरोधकांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.काही झाले तरी या दडपशाहीसमोर झुकायचे नाही,असं आम्ही सर्वांनी ठरवलंय. बेड्या अडकवून न्याल ना…न्या
– हे दबावाचे राजकारण आहे.ही २०२४ ची तयारी सुरूय
– आमदारांना ठेवायची दुसरी जागा कुठे आहे. सगळ्याच पक्षांना ते करावे लागतंय.वेळेवर यावे याकरता हॉटेलवर ठेवावे लागते. आम्ही आमचे दोन उमेदवार निवडून आणू. राष्ट्रवादी काँग्रेसला तीनचार मतांची गरज आहे,त्यांचेही दोन येतील. काँग्रेसचा एक आरामात येईल मात्र दुस-यासाठी संघर्ष आहे. आमच्याकडे मतेच नाहीत.
आमदारांना एकत्र करण्याचा काँग्रेसच ही नियोजन
राहुल गांधीवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी आमदार ज्या त्या जिल्ह्यात आहेत
उद्यापासून आमदार पासून एकत्र येतील
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती
…………
On राज्यसभा
महाविकास आघाडी मध्ये समन्वय नव्हता हे म्हणणं चुकीचं
पक्षाच्या आमदारांचा प्रश्न नव्हता
पण अपक्ष आमदारांच्या बाबतीत घोळ झाला
काही कमी राहिली असेल
….
On बावनकुळे
भाजपमध्ये नाराजी प्रचंड आहे
प्रत्येक जिल्ह्यात नाराज आहेत
पंकजा मुंडे यांना न्याय देऊ शकल्या नसल्यामुळे ओबीसी आमदार नाराज आहेत
प्रत्येक जिल्ह्यातील त्याची स्टोरी वेगळी आहे
किमान शंभर उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली होती
तुम्ही घटक नाराज आहे
सगळे आलबेल आहे असं भाजपनं समजू नये
परवाच्या घटनेतून आम्ही शिकलो आहोत
आम्ही काफी नाही पण तुमचे करणं अभिप्रेत आहे ते सर्व करू
………
On काँग्रेस आंदोलन
आम्ही उद्या प्रत्येक जिल्ह्यात निदर्शनं करणार आहोत
या आंदोलनानंतर आमदार मुंबईमध्ये असतील
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 11 उमेदवारी अर्ज दाखल
1 डॉ. के. पद्मराजन, सेलम, तामिळनाडू
2 जीवन कुमार मित्तल, नवी दिल्ली
3 मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4 सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल तामिळनाडू
6 श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7 दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8 ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9 लालू प्रसाद यादव, बिहार
10 ए. मणिथन, तामिळनाडू
11 डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश
नंदुरबार बेर्किंग :- धडगाव तालुक्यातील कुंडल चा मालपाडा मद्ये नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यु
देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावर जात होते किराणा दुकानात
खोल खड्यात बुडून झाला तिघांचा मृत्यु
निलेश दीलवर पाडवी वय 4वर्षे, मेहेर दिलवर पाडवी वय 5 वर्ष आणि पार्वती अशोक पाडवी वय 5 वर्ष अशी मयतांची नावे
काल दुपारची घटना, रात्री उशिरा दाखल झाली फिर्याद
कोल्हापूर जिल्ह्यातील पोखले इथं पिसाळलेल्या मांजराच्या हल्यात पाचजण जखमी
पिसाळलेल्या मांजराकडून गावात धुमाकूळ
मांजराचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थाची मागणी
मांजराच्या हल्यात जखमी झालेल्या पाच रुग्णाच्यावर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
पिसाळलेले मांजर हे अचानक पाठीमागून येत ग्रामस्थाच्यावर हल्ला चढविते.
हजारो शिवसैनिक आले
हा सोहळा देशाला पाहता आला
हिंदुत्वाचा विचार करून ते इथे आले आहेत
महाराष्ट्रात काम करू
शिवसेनेच्या कार्यालयाला गती मिळेल
आम्हाला प्रचंड उर्जा मिळाली
त्यामुळे वारंवार आमची पाऊलं आयोध्येकडे वळतात
या भूमीशी आमचं विशेष नात आहे
साधू संत आजही लोकं बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढतात – संजय राऊत
महाराष्ट्राची एक वास्तू आहे
इथं नक्कीच भव्य सदन लवकरचं उभारणार
या मातीशी आमचं नात आहे, ते दृढ करू
या आंदोलनामुळे शिवसेनेची ओळख देशभरात झाली
बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व हिमालया एवढं तुमच्या मागे उभं होतं…
सगळ्यांची अडनाव पोट दुखी ठेवली पाहिजे
आम्ही भूमिका बददल्या नाहीत…
एकतरी असा प्रसंग दाखवा…
आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करणारे हे कोण
हनुमान गल्ली, लक्ष्मण किल्ला हे महत्त्वाची ठिकाण आहेत
बाळासाहेब ठाकरे सुध्दा आम्हाला भेटायला आले होते
काल नेत्रदिपक सोहळा झाला…
काल मी त्या बैठकीला हजर नव्हतो,
अनेक प्रमुख नेते उपस्थित होते
देशाला मान्य होईल असा उमेदवार
गैरवापर किती करावा
देशातल्या सगळ्या विरोधी पक्षाचा छळ सुरू आहे
काही झालं तरी दडपशाही समोर आम्ही छुकणार नाही
काय गणित आहे, ते समजतील
आमच्याकडे मतं नाही आहेत
मुख्यमंत्री सरकारशी बोलतील
कोरोनाचा आकडा पुन्हा वाढत आहे
– उद्योगपती गौतम अदानी बारामतीत दाखल,
– राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार अदानीच्या स्वागतासाठी विमानतळावर,
– सायन्स सेंटरच्या उदघाटनासाठी अदानी आणि पवार एकत्र
नाशिकब- आता वीस रुपये प्रतिकीलोमिटर उत्पन्न नसलेल्या सिटीलींक बंद
डिझेल सीएनजी इंधनाचे दर वाढल्याने फटका
नाशिक महानगर परिवहन महामंडळाचा निर्णय
बुधवारी झालेल्या बैठकीत झाला निर्णय
उत्पन्न नाही, मात्र सिटीलिंक सुरुवाती पासूनच तोट्यात असल्याने निर्णय
नाशिक – गौण खनिज च्या 2231 वाहनांना जीपीएस ची प्रतीक्षा
महाखनिजकडे 3544 वाहनं पैकी 1313 वाहने जीपीएस वर
जीपीएस बसविण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत
31 जुलै नंतर जीपीएस नसलेले वाहने आढळल्यास अवैध गौण खनिज समजून होणार कारवाई
नाशिक – कोरोनाच्या पर्शवभूमीवर जिल्हा प्रशासन हाय अलर्ट वर
जिल्ह्यात दिवसभरात चौदा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
मागील चोवीस तासात तेरा रुग्णांची करोनावर मात
मनपा क्षेत्रातील ११ रुग्ण मालेगाव मनपा क्षेत्रात १ रुग्ण तर, जिल्हाबाह्य २ रुग्ण आढळले
जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
अग्निपथ योजनेला प्रचंड विरोध
अनेक तरुण उतरले रस्त्यावर
अनेक ठिकाणी रेल्वे रोको आणि रास्ता रोको आंदोलन
गया मध्ये टायर पेटवून आंदोलन
मुजफ्फरपुर मधील राष्ट्रीय महामार्ग रोखला
अग्निपथ योजनेतील चार वर्षांच्या कराराला तरुणांचा प्रचंड विरोध
केंद्र सरकारची अग्निपथ योजना जाहीर
तरुणांना कंत्राट पद्धतीने सैन्यदलात घेतले जाणार
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पवारवाडीत ३५ लाखांची वीजचोरी..
– बर्फ कारखान्यासाठी मीटर बायपास करुन केली होती वीजचोरी..
– एका वर्षात तब्बल २ लाख ३४ हजार युनिट वीजचोरी..
– कारखाना मालक नारायण दगडू पवार यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
– महावितरणने ३५ लाख रुपये वीजबिल भरण्याची केली होती सुचना..
– पैसे भरण्यास टाळाटाळ केल्यानं महावितरणकडून सासवड पोलिस ठाण्यात तक्रार
बारामती : पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या..
– जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही..
– दिवसेंदिवस वाढतेय उन्हाची तीव्रता; पाऊस मात्र पडेना
– पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीची कामे खोळंबली..
– शेतीसह चारा पिकांसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा..
21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस
देशातील 75 मंत्री 75 ठिकाणी योगासनं करणार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 ठिकाणी योगासने
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक मधील मैसूर पॅलेस मध्ये योगासन करणार
गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिर परिसरात योगासन करणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तामिळनाडूमधील कोईम्बतूर मध्ये कार्यक्रमात सहभागी होणार
पर राष्ट्र मंत्री एस जयशंकर दिल्लीच्या लोटस टेम्पल तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी नागपूरच्या झिरो माईल स्टोन जवळ योगासने करणार
विदर्भातील शाळा २७ जूनपासून की २९. जून पासून संभ्रम कायम
२७ जून पासून शाळा सुरू करा, असे आदेश आयुक्तांनी दिले होते
आता शिक्षण विभागाने नव्याने काढलेल्या आदेशात विद्यार्थ्यांना २९ जूनपासून प्रत्यक्षात शाळेत बोलवावे, असे नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही आदेशामुळे शाळा नेमकी कोणत्या दिवशी सुरू करावी,
असा पेच शाळा आणि विभागासमोर पडला आहे.
शाळा २७ जूनपासून सुरू होणार या दृष्टीने शिक्षण विभागासह स्थानिक शाळा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मात्र अचानक आलेल्या शासन निर्णयामुळे शिक्षण विभागासमोर आता शाळा नेमक्या कधीपासून असा पेच निर्माण झालाय.
यावर उपसंचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती आहे.
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पवारवाडीत ३५ लाखांची वीजचोरी..
– बर्फ कारखान्यासाठी मीटर बायपास करुन केली होती वीजचोरी..
– एका वर्षात तब्बल २ लाख ३४ हजार युनिट वीजचोरी..
– कारखाना मालक नारायण दगडू पवार यांच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
– महावितरणने ३५ लाख रुपये वीजबिल भरण्याची केली होती सुचना..
– पैसे भरण्यास टाळाटाळ केल्यानं महावितरणकडून सासवड पोलिस ठाण्यात तक्रार..
रत्नागिरी- वाऱ्याच्या वेगानं आलेला मान्सुन गायब
कोकणातल्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण
तर दुपारनंतर कडक उन्हाचा करावा लागतोय सामना
पावसाची नाराजी बळीराज्यासाठी चिंताजनक
या आठवड्याच दमदार पाऊसच्या सरी नाहीत
१९ जून नंतर कोकणात तुरळक पावसाचा अंदाज
महाड औद्योगिक क्षेत्रातील नदीपात्रात सापडल्या कोरोना काळात वापरलेले टेस्ट किट.
धक्कादायक आणि धोकादायक घटनेने खळबळ
महाड एमआयडीसीमध्ये एक धक्कादायक आणि तीतकीच आरोग्यास धोकादायक घटना समोर आली आहे. महाड एम आयडिसीतुन वाहणाऱ्या काळ नदी पात्रात देशमुख कांबळे गावच्या स्मशानभूमी जवळ कोरोना काळात वापरलेले आरटी-पीसीआर टेस्ट किट आणि इतर साहित्या टाकुन दिलेले सापडले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असुन ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त होत आहे. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, महाड एमआयडीसी आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट देऊन नदी किनारी पडलेल्या आरटी-पीसीआर टेस्ट किट व इतर वस्तूचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.
बाईट : संदीप सोनावणे, प्रदुषण नियंत्रण मंडळ
बाईट : तुकाराम देशमुख, स्थानिक ग्रामस्थ
मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाचा अनुषंगाने पनवेल परिसरात पोलिसांचे मोकड्रिल
पोलिसांनी तसेच आणि अग्निशमन दलाने पनवेल परिसरातील विविध ठिकाणाचा मॉकड्रिलद्वारे आढावा घेतला आहे
-पिंपरी-चिंचवड शहरातून परदेशात जाणार्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.परदेशात वाहन चालविण्यासाठी लागणारा ‘आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना’ बरेच नागरिक शहरातूनच काढतायेत
-गेल्या संपूर्ण वर्षभरात 397 वाहन परवाने काढण्यात आले होते. या वर्षी मात्र पाच महिन्यातच 377 जणांनी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे
-संपूर्ण वर्षभरात आरटीओच्या महसुलात दुप्पट वाढ होण्याचे संकेत आहेत.आरटीओने गेल्या आठवडाभरापूर्वी नागरिकांचा वेळ वाचावा आणि कामकाजाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना ही सेवा देखील आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जूनला जाहीर होण्याची शक्यता
कलागुणांच्या प्रस्तावास मुदतवाढ दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे कलागुण निकालात समाविष्ट करायचे असल्यामुळे निकालास थोडा उशीर
राज्य मंडळाच्या नऊ विभागांपैकी अद्यापही दोन विभागांचे काही काम शिल्लक
त्यामुळे निकालासंदर्भात युध्दपातळीवर काम सुरू आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले, तर 17 तारखेला निकाल लागण्याची शक्यता
हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर निकाल जास्तीत जास्त 22 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता
– नागपुरातील ‘आपली बस’ चा प्रवास आजपासून महागला
– नागपूर महापालिका प्रशासनाचा निर्णय
– 2 किलोमीटर मागे 17 टक्के भाडेवाढ
– इंधन दरवाढ आणि बसच्या सुट्या भागांच्या किमती वाढल्याने भाडेवाढीचा निर्णय
– सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांना मोजावे लागणार जादा पैसे
खडकवासला कालव्यात एकाचा बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची घटना
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू
मयुर मरगळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव
बुधवारी दुपारनंतर घडली ही दुर्देवी घटना
मुंबईसह मुंबई उपनगरातील कुर्ला, वांद्रे, खार, कांदिवली, बोरीवली, अंधेरी परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे, कुर्ला परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याचा हा व्हिडिओ कुर्ला भागातील आहे, लोक छत्री घेऊन पावसातून बाहेर पडताना दिसत आहेत, हा व्हिडिओ खारमधील आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात सिरोंचा आलापल्ली अहेरी या भागात काल रात्री दोन ते तीन तास पाऊस सुरू असल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा 66 Kv विद्युत लाईन मध्ये बिघड
आलापल्ली ते सिरोंचा पर्यंत विद्युत लगेच ब्रेकडाऊन
साडेअकरा वाजेपर्यंत चालणार काम
जवळपास 350 गावांचा विद्युत पुरवठा सध्या ४तासासाठी खंडित
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज बोरिवली न्यायालयात हजर होणार आहेत.
खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचे आरोपपत्र खार पोलिसांनी बोरिवली न्यायालयात दाखल केले असून आज राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर राहायचे आहे.
आता राणा दाम्पत्याला बोरिवली कोर्टातून आज दिलासा मिळतो की अडचणी वाढणार… हे पाहायचे आहे.
गडचिरोली महाराष्ट्र तेलंगाना सिमावर्ती भागात लक्ष्मी मेड्डीगट्टा धरणाच्या संदर्भात तेलंगणातील अधिकारी घेणार आज आढावा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहण करण्याच्या संदर्भात तेलंगणा सरकारला अपील केली होती
याद शेतकऱ्यांनी दोन मोर्चे काढून गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तेलंगणा सरकारला संपर्क साधला
ज्या शेतकऱ्यांचे जमीन या मेडीगट्टा धरणाखाली गेले यांच्या विषयांवर आज होणार सभा
पुण्यात 22 जूनला वाहन परवाना चाचणी बंद राहणार
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 22 जून रोजी पुण्यात आगमन होणार असल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार
त्यामुळं 22 जून रोजी वाहनचालक परवाना चाचणी होणार नसून, ती 25 जूनला घेतली जाणार
आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली माहिती
अमरावती जिल्हात पाच महिन्यात १६३ अपघाती मृत्यू….
यंदाच्या पहिल्या पाच महिन्यात २८१ अपघात…
अपघातात ९५% वाहनचालक पुरुषांचा मृत्यू…
सर्वाधिक ३६ मृत्यू मार्च महिन्यात..
२०२१ च्या तुलनेत झाली रस्ते अपघातात वाढ…
भुसावळ तालुक्यातील वरणगाव : चंद्रकांत हरी बढे पतसंस्थे मुदत ठेवीची रक्कम वेळेवर परत न दिल्याने चेअरमन चंद्रकांत बढे यांच्यासह सात संचालकांना बुलडाणा सीआयडी पथकाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रकांत हरी बढे, राजेंद्र विश्वनाथ चौधरी, भागवत मुरलीधर पाटील, बळिराम केशव माळी, गोविंद ज्ञानेश्वर मांडवगणे, भिकू शंकर वंजारी, विजय गणपत वाघ या सात संचालकांचा समावेश आहे.
बुलडाणा येथील ठेवीदाराने बढे पतसंस्थेत दोन लाख २० हजार रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवली होती. या रकमेची मुदत १९ ऑक्टोबर २०१३ रोजी संपली होती. त्यानंतरही ही रक्कम न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 17 जूनला जाहीर होण्याची शक्यता
कलागुणांच्या प्रस्तावास मुदतवाढ दिल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे कलागुण निकालात समाविष्ट करायचे असल्यामुळे निकालास थोडा उशीर
राज्य मंडळाच्या नऊ विभागांपैकी अद्यापही दोन विभागांचे काही काम शिल्लक
त्यामुळे निकालासंदर्भात युध्दपातळीवर काम सुरू आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले, तर 17 तारखेला निकाल लागण्याची शक्यता
हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर निकाल जास्तीत जास्त 22 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता
– राज्यातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्यात गोंधळ,
– काही ठिकाणी पाठ्यपुस्तके गरजेपेक्षा कमी मिळाली, तर काही ठिकाणी पुस्तके शिल्लक,
– समग्र शिक्षा अभियानांतर्गत यंदा 5 कोटी 40 लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार होता,
– दरम्यान मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा केल्याचे बालभारतीकडून स्पष्ट.
कोरोनाच्या बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या 3 लाख 85 हजार 529 पुणेकरांनी लस घेतलेच नाही
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस 38 लाख 58 हजार 201 जणांनी, तर दुसरा डोस 32 लाख 25 हजार 254 जणांनी घेतला
दुसरा डोस घेणार्यांमध्ये अद्याप सुमारे सहा लाख जण बाकी
-देहूरोड बेंगलोर बायपासवर शिंदे पेट्रोल पंपासमोर सुनंदा एजन्सीच्या एका लाकडाच्या वखारीला रात्री साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली होती, यात सर्व लाकडे जळून खाक झालीत
-पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत तब्बल दीड तासानी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले
-ह्या आगीत सदैवाने कुठलीही जीवितहानि नाही
शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये चार टीएमसी म्हणजेच 14 टक्के पाणीसाठा शिल्लक
14 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने जलसंपदा विभागाने घेतला 20 जूननंतर मुठा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडणे बंद करण्याचा निर्णय
त्यानंतर फक्त पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात येणार
15 जुलैपर्यंत किमान एक टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवण्याचे नियोजन
– नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरु होणार
– मंत्री सुनील केदार यांच्यातर्फे वकील २७ जूनला करणार युक्तीवाद
– सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा NDCC घोटाळ्याशी संबंधीत खटल्याची प्रक्रिया सुरु होणार
– २००१-०२ मध्ये झाला होता घोटाळा
वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्णाणी केली 100 री पार
काल एकाच दिवसात 103 जणांचे कोव्हिडं पॉझिटिव्ह आले रिपोर्ट
आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 98174
काल एका दिवसात कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या 34
आजपर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुगणाची संख्या 95513
काल दिवसभरात एकाही रुगणाचा मृत्यू नाही
वसई विरार महापालिका हद्दीत उपचार घेत असलेल्या कोरोना रुगणाची संख्या 581
– नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत निलडोह परिसरात हत्या
– चेतन अंकुश मोहर्ले असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव
– मृतक आणि आरोपी दोघांचीही गुन्हेगार पार्श्वभूमीवर असून अवैध दारू विक्री करायचे
– दारूच्या देवाणघेवाणातुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
– आरोपी अल्पवयीन असून पोलिसांच्या ताब्यात
– गेल्या २४ तासांत नागपूर जिल्हयात ५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– मुबंई, पुणे, नांदेड आणि बंगळुरुवरुन आलेल्या प्रवाशांनी वाढवली चिंता
– २ हजार ३३ चाचण्यांमघून ५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद
– नागपूर जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली २५३ वर
– जिल्ह्यातील कोरोना पॅाझीटीव्हीटी दर पोहोचला २.५ टक्क्यांवर
विरार:- वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस सुरू
रिमझिम पावसामुळे हावेत पसरला गारवा
पूर्ण परिसरात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण
– विधानपरिषद निवडणूकीत विदर्भातील अपक्ष आमदारांच्या भुमिकेवर लक्ष
– विदर्भात देवेंद्र भुयार, आशीष जयस्वाल, विनोद अग्रवाल, नरेंद्र भोंडेकर, रवी राणा, किशोर जोरगेवार अपक्ष आमदार
– राज्यसभा निवडणूकीतील मतदानावरुन अपक्ष आमदारांवर निर्माण झाला होता संशयकल्लोळ
– आ. विनोद अग्रवाल, आ. रवी राणा भाजपाच्या गटाचे, तर देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीबरोबर
– आ. किशोर जोरगेवार याची भूमिका अद्याप अस्पष्ट
– आ. आशीष जयस्वाल, आ. नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेला पाठिंबा
– अजित पवारांच्या घराबाहेरील झाडाच्या फांद्या तोडणं पडलं महागात,
– दोन जणांविरोधात थेट गुन्हा दाखल,
– बारामतीतील घराबाहेर असणाऱ्या फायकस जातीच्या झाडाच्या 20 ते 25 फांद्या तोडण्यात आल्यात,
– संतोष वाबळे यांनी 2 जणांविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
विरार च्या अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनार्यावरील घरात रात्री पाणी शिरले आहे..
भरतीच्या लाटा घराच्या भिंतीवर आदळून पाणी घरात शिरल्याने रहिवाशांचे मात्र रात्रभर हाल झाले आहेत..
दर पावसाळ्यात अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनार्यावरील घरात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होते.. अनेक घरांची पडझड ही होते.
अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनार्यावर तटबंदी बांधावी अशी रहिवाशांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. पण शासन दुर्लक्ष करीत असल्याने राहिवाशाना मात्र पावसाळ्यात आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्यात मोठा फटका सहन करावा लागत आहे
16 कंपन्यांचे बियाणे व दोन कंपन्यांच्या खत विक्रीस बंदी.
भंडारा जिल्हा कृषी विभागाची कारवाई.
चार खत परवाने निलंबित.कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।
– ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीचे आमदार नाराज’
– ‘विधानपरिषद निवडणूकीत नाराज आमदार भाजपच्या बाजूने मतदान करणार’
– ‘विधानपरिषद निवडणूकीत भाजपचे पाचंही उमेदवार निवडूण येणार’
– भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
– आज मुंबईत भाजपच्या बैठकीत ठरणार विधानपरिषद निवडणूकीची रणनीती
– ‘निवडणूकीच्या एक किंवा दोन दिवस आधी भाजप आमदारांनी मुंबईत बोलावणार’
– ‘भाजप आमदारांनी निवडणूक प्रक्रिया समजावून सांगणार’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हौशी सायकलस्वारांना प्रवेशबंद
विद्यापीठात चारचाकी, दुचाकींना विद्यापीठात मुक्त प्रवेश दिला जात असताना केवळ हौशी सायकलस्वारांना प्रवेशबंदी
सायकलस्वारांमुळे अपघाताचे प्रकार घडल्याने विद्यापीठ आवारात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी वगळता हौशी सायकलस्वारांना प्रवेशबंद
विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल पवार यांची माहिती
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी १८ कोरोनाचे रुग्ण
सर्व रुग्ण ओमिक्राॅन व्हेरिएटचे रुग्ण
आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आव्हान
चोथी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग अलर्टवर
गेल्या दोन दिवसात २५ हून अधिक कोरोनाचे सापडले रुग्ण