मुंबई : आज शुक्रवार 17 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. वसई – वसईत एका देशी बार रेस्टॉरंटमध्ये हॉटेल कर्मचारी आणि गिऱ्हाईकात तुंबळ हाणामारी झाली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील वसई फाटा येथील लक्ष्मी देशी बार मध्ये रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. हाणामारीचा हा व्हिडीओ वसई विरार च्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांना इडीने बोलावलेल्या चौकशी विरोधात केंद्र सरकार आणि इडी विरोधात निदर्शने करण्यात आलं आहे
यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते महिलासह रस्त्यावर उतरून केंद्र आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दोन वर्षानंतर पाहता येणार महाराष्ट्राचा महासोहळा
20 तारखेपासून आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला होणार सुरुवात
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
तुम्ही हनुमानाच्या शेपटीला आग लावलीय; तुमचा अहंकार जाळल्याशिवाय “अग्निवीर” शांत बसणार नाही..
अहंकाराच्या लंकेच दहन अटळ आहे..मंत्री यशोमती ठाकूर यांची फेसबुक पोस्ट द्वारे केंद्र सरकार वर टीका…
-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेली 2 वर्ष पालखी सोहळा हा मोजक्या वारकऱ्याच्या उपस्थिति मध्ये पार पड़त होता
-कोरोनाच्या काळात लावलेल्या निर्बंधामुळे वारकऱ्यांच्या मनासारखी वारी झाली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचं सावट कमी झाल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे दोन वर्षानंतर राज्य सरकारकडून पायी वारीला परवानगी मिळालेली आहे. यंदा 20 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होईल
-तर नऊ जुलैला पालखी वाखरी तळावर पोहणार असल्याची माहिती वेळापत्रकात दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे
संत तुकाराम महाराज पालखीचा प्रवास
-देहूतील मुख्य मंदिरातून पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 आणि 23 जूनला निवडुंगा विठ्ठल मंदीरात मुक्काम असेल, 24 जूनला लोणी काळभोर येथे मुक्काम असेल, 24 जून यवत, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती, 29 जून सणसर, 30 जूनला आंथर्णी, 1 जुलै निमगाव केतकी, 2 जुलै इंदापूर, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज, 6 जुलै बोरगाव, 7 जुलै पिराची कुरोली, 8 जुलै वाखरी तळ येथे मुक्काम असतील. 9 जुलैला पालखी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलैला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर 10 जुलैपर्यंत याच ठिकाणी मुक्कामी असेल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल
काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांना इडीने बोलावलेल्या चौकशी विरोधात केंद्र सरकार आणि इडी विरोधात निदर्शने करण्यात आलं आहे
यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते महिलासह रस्त्यावर उतरून केंद्र आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर,
यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारलीय,
जिल्ह्यात सर्वाधिक निकाल जिंतूर तालुक्याचा 97. 27 % लागलाय, तर सर्वात कमी निकाल हा सेलूचा
92.टक्के 27 असा लागलाय,
जिल्ह्यात एकूण 27 हजार 953 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ,यात 26 हजार 659 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालात मुलींची बाजी; 98.04 टक्के मुली उत्तीर्ण…
माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 अर्थात दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा 97.13 टक्के निकाल लागल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा 1 लाख 13 हजार 825 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे.
संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर कोर्टात जाऊन सांगावं
बाहेर नौटंकी करत बसतात उगाच
यांची माफियागिरी, दादागिरी वाढली आहे
विधान परिषदेत गोंधळ झाला तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राहणार नाही याची भिती
मलिक आणि देशमुख आता कोणत्या कोर्टात जाणार?
राष्ट्रपती पद निवडणूक
भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी
भाजपकडून 16 जणांची टीम जाहीर
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत समन्वयक म्हणून काम करणार
विनोद तावडे आणि सी टी रवी हे सहसमन्वयक असणार
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारही टीम मध्ये असणार
१८ जुलैला होणार मतदान, 21 जुलै ला मतमोजणी
नवी दिल्ली
बेशुद्ध पडलेल्या कॅमेरामनवर मंत्री भागवत कराड यांनी केले प्राथमिक उपचार
नक्की काय घटना घडली होती भागवत कराड यांनी टीव्ही नाईन मराठीला दिली सविस्तर मुलाखत
मला लहानपणापासूनच गरिबांची रुग्णांची सेवा करायला आवडतं भागवत कराड
अग्निपथ योजने विरोधात आंदोलन हे योग्य नाही
सर्वांनी शांतता बाळगावी – राज्यमंत्री भागवत कराड यांचे आवाहन
अमरावतीत युवक काँग्रेसचे आंदोलन..
राहुल गांधी यांना ईडीची नोटीस आणि चौकशी विरोधात आंदोलन सुरू..
अमरावती शहरातील इर्विन चौकात आंदोलन…
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावर ठिया..
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी….
नवी दिल्ली – देशभरात कॉंग्रेस आंदोलनाची व्याप्ती वाढवणार
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल यांचे
सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र
नॅशनल हेराल्ड प्रकरणात, ईडीने राहुल गांधींच्या चौकशीच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचे आदेश
20 आणि 21 जून रोजी वरिष्ठ नेत्यांना आंदोलनात सामील होण्यास सांगण्यात आले आहे
पोलीस जमादार ची गळफास घेऊन आत्महत्या
यवतमाळ च्या पुसद शहरातील लक्ष्मी नगरातील घटना
विष्णू सखाराम कोरडे हेड कॉन्स्टेबल असे मृत जमादाराचे नाव बिटरगाव पोलीस ठाण्यात होते कार्यरत
आत्महत्येपूर्वी लिहिली चिट्ठी
चिट्ठीत जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ हे आत्महत्येस जबाबदार असल्याचे नमूद करत केली आत्महत्या
या घटनेने पोलीस दलात खळबळ
मिलन सबवेची पाहणी
पावसाच्या अनुशंगाने पाहणी दौरा
मिनी पंपींग स्टेशनचं आता काम सुरू आहे
शहरात जिथं जास्त पाऊस पडतोय
सगळ्या सोसायट्यानी पाणी जिरवण्यासाठी काम करावं
इथं कामानं वेग पकडला आहे
पुढच्यावर्षी आपण नक्की इथं काळजी घेऊ
कुठे काय कमी पडत असेल तर आम्ही ते पुरवू
आरोप करणाऱ्यांनी माहिती घ्यावी
पावसापुर्वीची काम बघत आहोत, निवडणुकी पूर्वीची नाही – आदित्य ठाकरे
रत्नागिरी- विधान सभा निवडणुकीवरून माजी खासदार नीलेश राणे यांचा शिवसेनेवर प्रहार
मुख्यमंत्री घाबरलेले, महाविकास आघाडीचे आमदार नाराज
एवढा घाबरलेल मुख्यमंत्री पाहिला नाही
शिवसेनेचे आमदार या निवडणुकीत विरोधात मतदान करतील
शिवसेनेनं व्हिप बजवला नाहीतर शिवसेनेचे आमदार फुटतील
मुख्यमंत्र्यांकडे विरोधी आमदारांची लिस्ट नाही असा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री
राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांचे डोळे पांढरे झाले
निवडणुकीत गणित कच्चा असलेला मोहरा म्हणजे संजय राऊत
राज्यसभा निवडणुकीत काय झाले हे संजय राऊत यांनी पहावे
विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणणार
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरणार – निलेश राणे
जय राज्यसभेचे झालं तेच विधान परिषद होणार
राहुल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधात कोल्हापुरात काँग्रेसचे धरणे आंदोलन
शहरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलनाला थोड्याच वेळात होणार सुरुवात
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होतय आंदोलन
राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक,
परभणीत कॉंग्रेसचे आंदोलन सुरू ,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोठ्यासंख्येने जमले काँग्रेस कार्यकर्ते ,
मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी .
मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून महाविकासआघाडी सोबत आहे.
संजय राऊत विधानसभेला आघाडीसोबत सोबत आले.
मी लोकसभा पासून आहे.
माझ्यावर शंका घेण्याचे कारण नाही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल यात काही शंका नाही.
विधान परिषदेत जर महाविकास आघाडीचे एखादा उमेदवार पराभूत झाला तर संजय राऊत पुन्हा अपक्षांवर खापर फोडतील हे मला शंभर टक्के माहित आहे.
म्हणून मी एकच ठरवल आहे महाविकास आघाडीच्या बैठकीत माझी मागणी राहील संजय राऊत यांना माझ्यासोबत मत टाकण्यासाठी पाठवा
माझ्या टेबल समोर उभे करा नाहितर माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना देऊन टाका
मग शंका घेण्याचे काही कारण राहणार नाही
हे माझ्या एकट्याच मत नाही अपेक्षांवर झालेला अविश्वास आहे सर्व अपक्ष आमदारांना एकत्र बोलावून गरजेच आहे .
भाजपवाले मला कधीच फोन करणार नाही त्यांना माहित आहे देवेंद्र भुयार त्यांच्यासोबत येत नाही.
मविआ तील वरिष्ठ नेते स्थानिक आमदारांना विश्वासात घ्यायला तयार नाही.शिवसेनेचे आमदार नाराज आहे. कारण मुख्यमंत्री महोदय त्यांना वेळ देत नाही काँग्रेस पक्षाची काय अडचण आहे हे सर्वांना माहीत आहे.
भाजपचा माईका लाल सुद्धा एकनाथ खडसे यांना पराभूत करू शकणार नाही त्यांना संपवण्यासाठी खूप सारे प्रयत्न झाले .
मी बजरंग बली सारखी छाती फाडून दाखवू शकत नाही
-मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे रो हाऊस परिसरात 22 घोणस जातीचे साप आढळलेत
-वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाने त्यांना जंगलात सोडलेय,रो हाऊसमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने फोन करून रो हाऊस परिसरात 20 ते 22 घोणस जातीचे साप आढळले असल्याची माहिती मावळ च्या वन्यजीव रक्षका संस्थेला दिली, तात्काळ संस्थेचे पदाधिकारी परिसरात पोहचले, सापांना पिशवीत घेऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय, अशी माहिती निलेश गराडे यांनी दिली
नंदुरबार फ्लॅश :- नवापूर तालुक्यातील श्रावणी रेल्वे गेट जवळ डंपर आणि ॲपे रिक्षा यांचा भीषण आपघात…
आपघातात सहा जण गंभीर जखमी….
जखमीवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू …..
आपघतानंतर मोठ्या प्रमानात वाहतूक कोंडी…..
पोलिसांनी वाहतूक केली सुरळीत
चंद्रपूर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाळला नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक आंदोलन…
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक,
चंद्रपूर शहरातील गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले निषेध आंदोलन,
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन,
गांधी कुटुंबाला ईडीच्या माध्यमातून नाहक त्रास दिल्या जात असल्याचा धानोरकर यांनी केला आरोप
उद्या आमच्या आमदारांची बैठक घेऊ
समजून सांगू… करून घेऊ
राष्ट्रपती पदाची निवडणूक ही देश पातळीवरील निवडणूक आहे
संवाद असायला हवा
भाजप सरकार आलं…कार्य पद्धती असायला हवी
आमची काही अडचण नाही
msbshse ssc result 2022 : राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी
त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के
मार्च 2020 च्या तुलनेत मार्च एप्रिल 2022 च्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 1.64 टक्क्यांनी जास्त
– विधान परिषदेच्या समर्थनासाठी अद्याप आम्हाला महाविकास आघाडी किंवा भाजपकडून फोन आलेला नाही
– राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन आमदार आहेत. एक दोन आमदारांना फारसे महत्व नसते
– मात्र आमच्या पक्षाची पार्लमेंटरी बिर्डाची मिटिंग उद्या होणार आहे. त्यानंतर आमच्या पक्षाची भूमिका ठरवू
– संसदीय दलाची मिटिंगमध्ये आम्ही सांगू की कोणाला मतदान करायचे
– भाजपसोबत आम्ही होतो मात्र आता आम्ही त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे
महादेव जानकर ऑन पंकजा मुंडे :
– पंकजा ही माझी बहीण आहे मात्र त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत.
– त्यामुळे त्यांच्या पक्षातील गोष्टीवर मला बोलण्याचा अधिकार नाही.
– कोणत्याही पक्षात हस्तक्षेप करणे योग्य नाही. कॉंग्रेस, भाजपत काय सुरुय यावर बोलणे योग्य नाही
नागपूरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
राहूल गांधींच्या ईडीच्या चौकशी विरोधात आंदोलन
कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे
कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत
अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
भाजपच्या आमदारांना ऊद्या सकाळी मुंबईत दाखल होण्याचे आदेश
मुंबईच्या ताज प्रेसिडेंसी इथेच थांबणार १०६ आमदार…
राज्य सभा निवडणुकीनंतर ताज प्रेसिडेंसी हाॅटेलला आमदारांची पसंती… ताज भाजपसाठी लकी ठरल्याची चर्चा…
मुंबईत राहणार्या आमदारांना स्वेच्छेने राहण्याचा दिला पर्याय…
आज संध्याकाळपासून ताज प्रेसिडेंसीमध्ये हालचाली वाढणार…
सोनिया गांधी यांची प्रकृती चिंताजनक
काँग्रेसकडून तब्येती बाबत प्रेस नोट
सोनिया यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं
सोनिया यांच्या फुफुस जवळ फंगल इन्फेक्शन
दिल्लीत गंगाराम रुग्णालयात सोनिया यांच्यावर उपचार
काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या कडून प्रेस नोट
– बूलावा आया हैं जाना तो पडेगा… राहूल गांधी तीनदा गेले परत जावं लागत आहे… अनिल परब यांनाही जावं लागणार आहे…
– ऊद्धव ठाकरे २४ महिने लुटण्याचं काम करत आहे, कांग्रेसने ७० वर्ष लुटलं… मिडीयाच्या नावाने घेतलेला प्लाॅट केवळ ५० लाखात घेतला , आज त्याचं बाजारमुल्य ४०० कोटी ते १००० कोटी आहे… जनतेची जमिन लाटली ऊत्तर द्या कांग्रेसवाले
– ऊद्धव ठाकरेंनी तोडफोड शब्द बदलला धमकी हा नवा शब्द, बघून घेईल ही त्यांची भूमिका… पुन्हा एकदा धमक्या दिल्या ना तर आम्ही माफ करणार नाही…माफियांचं राजकारण बंद करणार…
– सोमवारी मोठी कारवाई होणार…
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सावध
आज सायंकाळी 4 वाजता सह्याद्रीवर शिवसेना आमदारांची बैठक
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठींबा असलेल्या अपक्ष आमदारांना मतांसाठी गळ सुरू केल्याची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल
ठरलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच शिवसेना आमदारांना मुंबईत बोलावले
उद्या होणार होती शिवसेना आमदारांची पवईतील हॉटेल रेनेसांमध्ये बैठक आणि करणार होते हॉटेलमध्ये मुक्काम
– मविआतील शिवसेना समर्थक आमदारांच्या फोडाफोडीवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
– महाविकास आघाडी या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र येऊन कारभार चालूय. यामध्ये कोणाचाच कोणावर विश्वास नाही.
– एकमेकावर विश्वास नसलेली माणसं जेव्हा एकत्र येतात त्यावेळी निश्चितपणाणे मी मोठा का तू मोठा यासाठी भांडण सुरु होतात
– आणि या नादात एकमेकाचे घर जाळायला निघतात तीच परिस्थिती आज महाविकास आघाडीत आलेय
– शिवसेनेचे असे झालेय की, मुख्यमंत्री शिवसेनेचा मात्र गाजरही शिवसेनेला नाही
– शिवसैनिक उपाशी आणि राष्ट्रवादीवाले तुपाशी आहेत
– शिवसैनिक आमची सत्ता आहे की राष्ट्रवादीची आहे अशा आशाळभूत नजरेने पाहतायत
– शिवसेनेची अवस्था म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ
– म्हणजे (राष्ट्रवादी) याच्या कुऱ्हाडीचा दांडा ( शिवसेना) हे झाले आणि तीच कुऱ्हाड आता त्यांच्या पायावर आलीय
– राज्यातील सर्व आमदार यावेळी आमच्या मतदारसंघाचा विकास झाला नाही त्यामुळे सदसदविवेक बुध्दीने आमदार यावेळी मतदान करतील
– वीजबील माफी, कर्जमाफी, दुधाला हमीभाव नाही या प्रश्नाला आमदारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे पाचही आमदार निवडून येतील
– ऑन संजय राऊत :
– आपल्याच आमदारांना घोडे म्हणने कितपत योग्य आहे. आणि घोडा एकाद्याच्या मागे लागल्यावर कसे असते यासाठी एक वाईट म्हण आहे ती मी म्हणणार नाही
– तीन चार लाखाच्या लोकांचा मतदारसंघातील हा लोकप्रतिनिधी असतो . त्याच्यावर विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलेला असतो
– त्याला तुम्ही घोडा बनवून टाकल्यावर त्यांना निश्चितपणे राग येईल
– आमदार म्हणजे काय चार पायाचे जनावर आहे का?
– त्यांचा असा उल्लेख करणे म्हणजे त्यांचा मोठा अपमान झालेला आहे
– त्यांना मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही. मतदारसंघातील लोक प्रश्न विचारतात की म्हणतात लय माल मिळाला की काय…
– त्यानंतर लोकांना सभेला बोलावले तरी ते म्हणतात आम्हाला गाडी पाठवा, जेवण द्या वगैरे म्हणतात
– त्यामुळे आमदारांचा झालेला हा अपमान ते कदापिही विसरणार नाहीत आणि या निवडणुकीतही भाजपचे पाचही आमदार निवडून येतील
आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपाला पाठिंबा राज्यसभेच सारखे विधानपरिषदेवर आमदार येणार निवडून
महा विकास आघाडी सरकारमधील संपर्क जरी केला तरी माझा पाठिंबा भाजपाला असेल
माझा संपूर्ण विश्वास भाजपला आहे इथून पुढे संपूर्ण राजकारण भाजपा बरोबर असे
अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, त्यांचा रुबाब आणि दरारा वेगळा आहे – संजय राऊत
अजित पवार हे महा विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, त्यांचा रुबाब आणि दरारा वेगळा आहे
ते आता मैदानात उतरलेले आहेत त्यांचे निवेदन मी काल ऐकलं आहे
राज्यसभेत आपण गाफील राहिलो असून आता गाफील राहणे चुकीचे ठरेल
आता सगळ्यांनी सक्रिय व्हायला हवं आता निवडणूक आहे
बविआ बद्दल मला फारसे माहित नाही यांच्या विषयी मला माहिती नाही
विरोधी संपवायचा प्रयत्न करत असतील असतील तर आम्ही पाहून घेऊ लढत राहू
हॉटेल मालक अशोक शिनगारेविरोधात गुन्हा दाखल
खोतांचा ताफा हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी आडवला होता
या सर्व प्रकारामागे राष्ट्रवादीचा हात -सदाभाऊ खोत
हॉटेल मालक शिनगारेची ड्रामेबाजी म्हणजे राष्ट्रवादीचं षडयंत्र – सदाभाऊ खोत
माझी बदनामी करण्याचा प्रयत्न -खोत
सर्वत्रपणे काम करणारे राष्ट्रपती देशाला कमी मिळाले आहेत
ममता बॅनर्जी आहे
सगळ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे
सत्ताधारी पक्षातला एखादा नेता तिथं पाठवलं होतं
वेळ निघून गेलेली नाही
शिवसेना यात पडणार नाही
ममता बॅनर्जी यावर चर्चा करत आहेत
ही निवडणूक लढण्यास नकार दिला
कदाचित पारडं पवार साहेबांकडे झुकलं असतं
अनेक राज्यांमधून पवार साहेबांना मदत झाली असती.
– टीम देवेंद्र ची टीम वर्क या निवडणुकीत सुद्धा दिसेल
– भाजप चे 5 ही उमेदवार विधान परिषद निवडणूकित निवडून येतील
ही निवडणूक अविरोध होत होती मात्र कॉग्रेस ने भ्रष्टाचार च्या समर्थनार्थ आंदोलन केले ईडी च्या विरोधात आंदोलन केल्याने
त्याना उमेदवारी परत घेता आली
नाही ही निवडणूक होत आहे
– राज्यसभा निवडणूक मध्ये सर्वांनी पाहिलं महाविकास आघाडी मधील आमदार ची काम होत नाही त्यामुळे ती खदखद निवडणूक मधून पुढे आली आता ही त्याच पद्धतीने खदखद पुढे येईल
– मी गोआ निवडणूक मध्ये स्वतः हुन जबाबदारी घेतली होती
या निवडणुकीत माझ्यावर जी जबाबदारी देवेंद्र फडणवीस देतील ती मी योग्यरीत्या पार पाडेल
यावेळी आम्ही जास्त काळजी घेऊ
उद्या आमदार चार ते पाच वाजेपर्यंत येतील
राज्यपालांनी भेट नाकारली
पहिली जागा सुरक्षित आहे
दुसऱ्या जागेसाठी मदतीची गरज आहे
संपर्क सगळ्यांशी साधतोय
वीस तारखेला निवडूक आहे
– राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत. पण नव्या व्हेरियंटे रुग्ण नाहीत
– कोरोना वाढत असला तरिही सध्या तरी राज्यात निर्बंध नाही
– शाळा बंद होणार नाही किंवा शाळेवर कुठलेही निर्बंध आणण्याचा विचार नाही
– विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर देणार
– शाळांमध्ये मुलांचं लसीकरण वाढवणार
– कोरोना वाढतोय त्यामुळे लोकांनी काळजी घेणं गरजेचं
– उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगून तुझी नोकरी घालविन,
– राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पूजा कोद्रे यांची अधिकाऱ्याला दमदाटी,
– नामफलक काढल्यामुळे संतप्त पूजा कोद्रे यांचा हडपसर क्षेत्रीय कार्यालयात गोंधळ,
– हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे उपअधिक्षक प्रदीप भुजबळ यांना शिवीगाळ,आणि जीवे मारण्याची धमकी,
– पूजा कोद्रे यांच्या विरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार,
– घटनेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी पुकारले होते कामबंद आंदोलन
मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
सगळे म्हणतात आमच्या संपर्कात हाय
ज्या प्रमाणे आम्हाला निर्देश देतील
त्याप्रमाणे मतदान होईल
पुढच्या दोन दिवसात मी मुंबईत जाणार आहे
आत्ता हरभऱ्याची खरेदी झाली आहे
उरलेल्या हरभऱ्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे
ब्रेक – शिवसैनिकांना आजपासून पवईच्या रेनिसंसमध्ये दाखल होण्याचे आदेश…
– सेना अपक्ष आमदार फुटण्याच्या भितीने सर्व सेना आमदार आणि सेना समर्थित अपक्ष आमदारांना रेनिसंसमध्ये दुपारी १ नंतर दाखल होण्याचे आदेश…
– आतली कुठलीही बातमी फुटू नये यासाठी हाॅटेल प्रशासनाला सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा वाढवण्याचे आदेश…
– कुठल्याही अनोळख्या व्यक्तीस हाॅटेलमध्ये परवानगी न देण्याच्या सुचना…
– महाविकास आघाडी एकत्र ही विधान परिषद निवडणूक लढतोय
– मतदारांशी संपर्क साधणे काही गैर नाही
– आम्हीही काही मतांसाठी संपर्क साधतोय
– आमचे सहा आमदार निवडणूक येतील
– भाजपला जे राज्यसभा निवडणूकीत शक्य झालं ते आता होणार नाही
– काल महाविकास आघाडीची बैठक झाली, त्यात तिन्ही पक्ष मिळून विधानपरिषद निवडणूक लडण्याचा निर्णय झाला
नाशिक – महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत सोहळा संपन्न
121 व्या तुकडीचा झाला दीक्षांत सोहळा
प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्याकडून संचलन
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्रात पार पडला सोहळा
171 पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली विशेष प्रशिक्षण
गडचिरोली मेडीगट्टा धरणाच्या नावावर तेलंगणा सरकारने महाराष्ट्र शेतकऱ्यांची लुबाडणूक केली
कराराप्रमाणे 30 हजार एकर जमीन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी
धरण होऊन तीन वर्ष लोटले तरी कोणती सुविधा तेलंगाना सरकारने महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी केलेली नाही
मंजुरी पेक्षा अधिक जमीन बुडीत क्षेत्रात यांच्या सर्वे महाराष्ट्र शासनाने करावा
तेलंगाना सरकार दहा लाख रुपये प्रति एकर देण्यास तयार परंतु गडचिरोली शेतकऱ्यांची वीस लाख रुपये एकरी ची मागणी
मंजुरी मिळालेल्या जमिनीचे भूसंपादन तात्काळ करावे व नवीन दराने शेतकऱ्यांना दर देण्यात यावा
धरणाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शेतीचे सर्वे करावे
कोल्हापूरच्या राधानगरी धील फुलपाखरू उद्यानात आढळते भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू
सदर्न बर्डविंग जातीच फुलपाखराचा आकार तब्बल 190 मीटर
काळसर रंगाच्या आणि सोनेरी पंखाच्या सदर्न बर्डविंग ने वेधलं पर्यटकांचे लक्ष
राधानगरीच्या फुलपाखरू उद्यानात पास 55 वेगळ्या जातीच्या फुलपाखरांची नोंद
राधानगरी आणि दाजीपूर अभयारण्यातील जैवविविधत पुन्हा एकदा अधोरेखित
गडचिरोली मेडीगट्टा धरणाच्या नावावर तेलंगणा सरकारने महाराष्ट्र शेतकऱ्यांची लुबाडणूक केली
कराराप्रमाणे 30 हजार एकर जमीन सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी
धरण होऊन तीन वर्ष लोटले तरी कोणती सुविधा तेलंगाना सरकारने महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी केलेली नाही
मंजुरी पेक्षा अधिक जमीन बुडीत क्षेत्रात यांच्या सर्वे महाराष्ट्र शासनाने करावा
तेलंगाना सरकार दहा लाख रुपये प्रति एकर देण्यास तयार परंतु गडचिरोली शेतकऱ्यांची वीस लाख रुपये एकरी ची मागणी
मंजुरी मिळालेल्या जमिनीचे भूसंपादन तात्काळ करावे व नवीन दराने शेतकऱ्यांना दर देण्यात यावा
धरणाच्या प्रवाहात वाहून गेलेल्या शेतीचे सर्वे करावे
नाशिक – आज रात्री पुन्हा बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराट
रात्री दीड ते दोन च्या सुमारास बिबट्याचे दर्शन सीसीटीव्ही मध्ये बिबटयाच्या हालचाली कैद
सातपूर midc मधील यश एंटरप्राइजेस मध्ये दिसला बिबटया
– कंपाऊडवरून उडी मारून बिबट्या पसार झाला
– दोन दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवस्तीतील सिटी सेंटर मॉल परिसरात दिसला होता बिबट्य
– बिबट्याला पकडण्याची नागरिकांची मागणी
बारामती : पुणे जिल्ह्यातील १४०५ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार..
– जलजीवन मिशनअंतर्गत १५८७ पाणी पुरवठा योजना राबवणार..
– पुणे जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांसाठी ९१३ कोटी रुपयांचा निधी..
– प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं यासाठी जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी..
– २०२४ पर्यंत पुणे जिल्ह्यात प्रत्येक घरात पोहोचणार पाणी..
– जिल्ह्यात ६६२ पाणीपुरवठा योजनांच्या निविदा झाल्यात प्रसिद्ध..
– ४९४ पाणीपुरवठा योजनांची प्रत्यक्षात कामे सुरु..
-पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे
-शहरात काल दिवसभरात 96 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे… त्याच वेळी 47 जण कोरोना मुक्त झाले आहेत
-पण तरी ही शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 372 आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच आणि शक्य झाल्यास मास्क वापरावे असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय
अमरावतीच्या मेळघाटातील ४२ गावांमध्ये दोन आठवड्यापासून विजेचा लपंडाव…
पाणीपूरवठा योजना मृत, मोबाईल टॉवर बंद,दवाखान्यातील लशी निकामी…
चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम काटकुंभ चुरणी-हतरु परिसरातील गावात विजेचा लपंडाव..
वीजपूरवठा खंडित होत असल्याने आदिवासी बांधव झाले त्रस्त..
हिस्त्र वन्यप्राणी यांची भीती वाढली.
साखर उत्पादनात भारत देश ठरला जगात अव्वल..
देशाचे आणि देशात महाराष्ट्राचे साखरेचे विक्रमी उत्पादन ..
साखर उत्पादनात भारताने ब्राझीलला टाकले मागे..
भारतामधून 90 लाख टन साखरे पैकी 56 टक्के साखर महाराष्ट्राने केली निर्यात..
साखरेबरोबरच इथेनॉल उत्पादनातही ही राज्यातील साखर क्षेत्रातने घेतली आघाडी..
एसटीचे अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाचे कठोर पावले..
दारू पिऊन एस टी चालवल्यास चालकासह आगारप्रमुखही असणार दोषी..
कर्तव्यावर जाण्यापूर्वी एसटीच्या चालकांची केली जाणार चाचणी..
मद्यप्राशन केलेला कर्मचारी आढळल्यास होणार पोलीस तक्रार आणि सेवेतून बडतर्फची कारवाई..
एसटी महामंडळाच्या वाहतूक व्यवस्थापकांनी पत्रातून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना तपासणी करण्याचे दिले आदेश..
वेगवेगळ्या प्रकारे तपासणी करण्याच्या आणि कार्यक्रम राबवण्याच्या दिल्या सूचना..
मुंबई, बोरिवली पश्चिम MHB पोलिसांनी अशाच एका शातिर गुन्हेगाराला अटक केली आहे, ज्याच्या विरोधात मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एक नाही तर अनेक गुन्हे दाखल आहेत,
हेमंत राजन देशपांडे उर्फ हेमू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला रुम नंबर 1505, धर्वेश म्हाडा कॉलनी, पेणकर पाडा रोड, काशिमीरा, मीरा रोड येथून अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले की, हेमंत राजन देशपांडे उर्फ हेमूविरुद्ध
सानपाडा पो.स्टे.हद्दीतील विचित्र प्रकार
बिचारे बीट मार्शल झाले हतबल
मद्यरात्री मद्यपान करून युवतीने दिला पोलिसांना त्रास
युवतीचा रस्त्यावर धिंगाणा
पुरंदर ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची निरा येथे मोठी कारवाई..
– ६६ लाख रुपयांचा दारुसाठा केला जप्त..
– गोव्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारुचा साठा जप्त..
– गोव्यातील दारु महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विकण्याचा होता डाव..
– निरा-लोणंद रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली कारवाई..
– ६६ लाखांच्या मद्यासह वाहतुक करणारा ट्रकही केला जप्त..
– ट्रकचालकावर केला गुन्हा दाखल..
– अवैध दारु वाहतुक प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता…
स्वताची दारू सोडवू न शकणाऱ्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या.
कारधा पुलावरील घटना
विशेष म्हणजे दारू सोडविण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवण्यात आले होते.
दोन महिन्यांपूर्वी गोळ्या घेणे बंद करून पुन्हा दारू प्राशनास सुरुवात केली यामुळे त्याची मानसिक स्थिती पुन्हा बिघडली नैराश्यतुन त्यांनी आत्महत्या केली
– सोलापूरमध्ये ॲटो रिक्षावर ‘नुपूर शर्मा समर्थक’ पोस्टर चिटकवणाऱ्या दोन रिक्षा चालकावर कारवाई
– शेळगी भागातील रिक्षावर ‘नुपूर शर्मा समर्थक’ बॅनर लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
– रिक्षाचालक रामचंद्र राजमाने आणि त्याचा सहकारी श्रीकांत सुरवसे असे पोस्टर लावणाऱ्या रिक्षाचालकांची नावे
– चालकासह पोलिसांनी दोन रिक्षा ताब्यात घेत केली कारवाई
– दरम्यान कारवाईवेळी गर्दी जमल्यानंतर कशासाठी गर्दी जमलीय हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पिडीत तरुणाने केलाय
– तू नुपूर शर्मा समर्थक असल्याचे सांगत पोलिसांनी मला विनाकारण मारहाण केल्याचा महेश दुधगी या तरुणाकडून करण्यात आलाय
– चार ते पाच पोलिसांनी मारहाण केल्याचा पिडीत तरुणाचा आरोप
– तर महेश दुधगी हा नुपूर शर्मा समर्थक लिहिलेले बॅनर रिक्षावर चिटकवत असल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण
– सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिस स्टेशनकडून प्रतिबंधात्मक कारवाई
– शहरातील नागरिकांनी कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट किंवा बॅनर लावू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेय
-जुन्या मुंबई पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी बीआरटी मार्गाच्या देखभालीसाठी 1 कोटी 12 लाख 68 हजार 253 रुपयांचा खर्च वर्षभरासाठी केला जाणार आहे
-या खर्चाला महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे
-या मार्गावरील थाब्यांची दुरावस्था झाली आहे.बहुतेक थांबे तुटलेले आहेत.मेट्रोच्या कामामुळे अनेक थांबे खराब झाले आहे तर बॅरिकेड्स ही तुटलेले आहेत.त्या सर्व थांब्याची या खर्चात दुरुस्ती केली जाणार आहे
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
यंदा शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून 1 लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास नऊशे जागा कमी झाल्या
महापूर काळात पशुपालकांवरील कारवाईचा आदेश अखेर मागे
नागरिकांमधील संतप्त प्रतिक्रियेनंतर पशुसंवर्धन विभागाचा निर्णय
महापुरात जनावरे वाहून गेल्यास मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पशुसंवर्धन विभागाने काढला होता आदेश
शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतींना दिला होता कारवाईबाबत आदेश
पशुसंवर्धन विभागाच्या आदेशामुळे शिरोळ तालुक्यातील 78 हजार पशुपालकांचा जिव लागला होता टांगणीला
शेतकरी संघटनांनी आदेशाचा निषेध करत दिला होता आंदोलनाचा इशारा
आदेश तूर्तास मागे घेत असल्याचे पशुसंवर्धन विभागाने केल स्पष्ट
– नागपूरात दीड लाख मतदारांची संख्या वाढली
– वाढलेल्या दीड लाख मतांमुळे मनपा निवडणूकीची गणितं बदलणार?
– दीड लाख मतदार वाढल्याने प्रस्थापितांची धाकदुक वाढली
– प्रत्येक प्रभागात तीन हजारच्या आसपास मतदार वाढले
– नागपूरात २२ लाख ४५ हजार ५०९ मतदार निवडणार १५६ नगरसेवक
विधानपरिषद निवडणूक
आज एमआयएम आमदारांची इम्तियाज जलील यांच्यासोबत बैठक
मुंबईत होणार इम्तियाज जलील आणि दोन आमदारांची बैठक
विधानपरिषदेत 2 मते कुणाला द्यायची याबाबत होणार अंतिम निर्णय
एक मत चंद्रकांत हंडोरे यांना देणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी केलं होतं स्पष्ट
उर्वरित एक मत कुणाला देणार याबाबत होणार बैठक
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसचे नियोजन
पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी भाविकांच्या सोयीसाठी 18 जून ते 22 जूनपर्यंत आळंदीसाठी स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणाहून दररोज एकूण 130 बसेसची सोय
21 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आळंदीसाठी बसेस व्यवस्था
याशिवाय देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा, निगडी या ठिकाणावरून एकूण 22 बस पीएमपीकडून सोडण्यात येणार तर देहू ते आळंदी अशा 10 बस सोडण्याचे नियोजन
22 जून रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 3 वाजेपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा 18 बसची व्यवस्था
– मुबंई बॅाम्बस्फोटातील कैदी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी याला फेरतपासासाठी हवे कागदपत्र
– एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी याला विवरणपत्र आणि संबंधीत कार्यालयीन शेरे याची माहिती द्या
– माहिती आयुक्त राहूल पांडे यांचे नागपूर मध्यवर्ती कारागृहाला आदेश
– एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी याला विनामुल्य सात दिवसांत संबंधीत कागदपत्र देण्याचे आदेश
– २००६ च्या बॅाम्बस्फोट प्रकरणात एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती
– सध्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकी नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे
– एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धीकीचा प्रकरणाच्या तपासावर आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी मालेगावात पडसाद..
माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा ..
नांदेडमध्ये ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आलीय, त्यातून तरोडा नाका भागात जलवाहिणीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातेय. त्याचबरोबर रस्त्याच्या खोदकामामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागतोय. तसेच रस्त्यावर साचणाऱ्या चिखल मातीमुळे रोजच लहानसहान अपघात देखील होतायत. त्यामुळे रस्त्यांच्या कामावर नांदेड करांनी मोठी नाराजी व्यक्त केलीय.
सामना अग्रलेख -पवार नाहीत, मग कोण?
विरोधक जर राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचा ‘कडक’ उमेदवार उभा करू शकत नाहीत तर ते देशाला सक्षम पंतप्रधान कसा देणार?
असा प्रश्न जनतेच्या मनात येऊ शकतो.
उद्या विरोधी पक्षांचे आकडे जमलेच तर पंतप्रधानपदासाठी अनेक नवरदेव रांगेत उभे राहतील,
पण राष्ट्रपतीपद नको रे बाबा! तरीही ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही 2024 ची तयारी आहे.
विरोधकांना ती गांभीर्याने घ्यावीच लागेल. सरकार पक्षाकडून कोणीही उभे राहो,
विरोधकांना गांभीर्यपूर्वक लढावे लागेल. पवार नाहीत, मग कोण?
या प्रश्नाचे उत्तर सहा महिन्यांपूर्वीच शोधले असते तर गांभीर्य झळाळून निघाले असते.
आता उशीर झाला आहे. तरीही वेळ निघून गेलेली नाही
संस्थाचालक आणि जागा मालकाच्या वादात विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ
आजरा तालुक्यातील धनगरमोळा इथला संतापजनक प्रकार
भर पावसात विद्यार्थ्यांना घ्याव लागतय शिक्षण
जागेच्या वादातून जागा मालकाने शाळेचे साहित्य बाहेर काढत इमारतीला लावले कुलूप
इमारतीच्या काही भागात बांधली जनावरे
जनावरे इमारतीत विद्यार्थी उघड्यावर अशी अवस्था
प्रशासनाकडून शाळेसाठी पर्यायी जागा किंवा इमारत देण्याची मागणी