मुंबई : आज बुधवार, 8 जून 2022. आज आपण राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.
जळगावात पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने निषेधार्थ लाड वंजारी व ओबीसी समाज रस्त्यावर
देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा विरोधात करण्यात आली जोरदार घोषणाबाजी
भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने जळगावात लाड वंजारी व ओबीसी समाजाच्या वतीने
टरबूज फोडून करण्यात आले आंदोलन
नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील चौघेजण सुखरूप बचावले
आयशर कंपनीच्या समोर संदीप गवारे यांची की या गाडीने अचानक पेट घेतला
पुण्याहून सातारला जात असताना घडला हा प्रकार
नवी मुंबईची कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे
आज कोरोना रुग्णसंख्या 186 वरती पोचली आहे
1 महिन्यापूर्वी कोरोना रूग्ण संख्या शून्य होती आणि आता हळूहळू वाढू लागली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या मोबाईलवरून झाली चर्चा
काय झाली चर्चा यावर हितेंद्र ठाकूर यांनी बोलणे टाळले
मी माझे 3 मतदान कुणाला द्यायचे ते 10 तारखेलाच ठरवणार : आ हितेंद्र ठाकूर
वाऱ्यामुळे झाडे कोलमडली..
मोठया प्रमाणात नुकसान
दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
मास्क नसलेले प्रवासी दंडास पात्र असणार
आपत्कालीन परिस्थितीमध्ये मास्क काढण्याची मुभा दिली जाणार – दिल्ली हायकोर्ट
भिवंडीत दारुड्या पतीने पत्नीस जबर मारहाण करून बेशुद्ध असताना जळणासाठी जमविलेल्या लाकुडफाट्यात टाकून जिवंत जाळली
हत्या करणारा दारुड्या पती संतोष चौरसिया पोलिसांच्या ताब्यात
कविता चौरसिया असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव
MIM आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा ‘मविआ’चा प्रयत्न
जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचं MIMकडे पाठिंबा देण्याच्या मागणीचं पत्र
अजितदादा, मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्तीनंतर अबू आझमींची नाराजी दूर
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायणराव राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडीक यांनी भेट घेतली. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार नितेश राणे, सम्राट महाडीक यांची उपस्थिती होती.
मनसे नेते गजानन काळे यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कायम हिंदू, हिंदुत्वाबद्दल गरळ ओकणारा समाजवादी पक्षाचा अबू आझमी हा चक्क मुख्यमंत्र्यांच्या भेटीला …
आता काय… मातोश्रीवर बसून बिर्याणीचा आस्वाद घेणार … ?
धन्य ते… ढोंगी हिंदुत्व …!!! हे यांचे धर्म आणि मर्म …!!!— Gajanan Kale (@GajananKaleMNS) June 8, 2022
शालीनी ठाकरेंची शिवसेनेवर टीका
त्यांनी ट्विट करून म्हटलंय की, ‘सभेत संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण समाजवादी आणि एमआयएम पक्षाचे मतदान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हवे आहे. यासाठी संभाजीनगरचे नामांतरची घोषणा मात्र आजच्या सभेत कलानगरचे टोमणे सम्राट सर्किट करूच शकत नाहीत. सत्तेसाठी किती ही लाचारी.’ असं ट्विट शालीनी ठाकरे यांनी केलं आहे.
सभेत संभाजी महाराजांचा पुतळा स्टेजवर आणून ठेवतील पण समाजवादी आणि एम आय एम पक्षाचे मतदान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी हवे आहे यासाठी संभाजीनगरचे नामांतरची घोषणा मात्र आजच्या सभेत कलानगरचे टोमणे सम्राट सर्किट करूच शकत नाहीत…..!!!!!
सत्तेसाठी किती ही लाचारी…#राज्यसभाघोडेबाजार
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 8, 2022
वाराणसी : ज्ञानवापी मशिद प्रकरण
मशिद सर्वेचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी
रवी कुमार दिवाकर यांना पत्रातून धमकी
हिंदू न्यायाधीशाकडून मुस्लिम समाज अपेक्षा ठेवू शकत नाही
वाराणसी पोलिसांनी घेतली गंभीर दखल
भाजपमध्ये ज्यांना संधी मिळाली त्याबद्दल नाराजी नाही
मित्रांना धोका देऊ नये
विश्वास आज ढळमळला- मेटे
सचिन अहिर विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार
आमशा पाडवींनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
नाराजीनाट्यानंतर अबू आझमी मुख्यमंत्र्याच्या भेटीला
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार ‘वर्षा’वर
राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘वर्षा’वर खलबतं
Maharashtra HSC Result 2022: बारावीचा निकाल, थेट तुमच्या स्क्रीवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा : बारावीचा निकाल लाईव्ह
आमदारांमधील नाराजी दूर करायची असेल तर आमदारांचे ऐकले पाहिजे, असं शरद पवार म्हणालेत
यामध्येच सर्वकाही आले- आशिष शेलार
पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत
पंकजाताईंचं स्थान खुप मोठं आहे
त्यांच्याकडे येणारी संधी मोठी असेल
मविआ नेते स्वत:च्या आमदारांना खूश ठेवत नाहीत
चेतन कांबळे याचा आणि आमचा संबंध नाही- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
त्याला विरोधकांनीच मुद्दाम जाहिरात द्यायला लावली
आम्ही चेतन कांबळेचं समर्थन करत नाही
भाजपचे लोक विनाकारण काड्या करतात
मुख्यमंत्र्यांबद्दलही टीका करतात या काड्या करणाऱ्यांना मी सोडणार नाही
भाजपचे दिवस आता भरले आहेत
संपत चाललंय त्यांचं सगळं 2024 लाही आणि कधीच त्यांची सत्ता येणार नाही
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राजधानीत येणार
19 जूनला नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकआंदोलनाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ‘वर्षा’वर दाखल
अजित पवार ‘वर्षा’वर दाखल
आमदार रवी राणा आज कोर्टासमोर हजर राहणार नाहीत
रवी राणा आणि नवनीत राणा आज कोर्टासमोर हजर राहणार नाहीत
कोर्टाच्या आदेशानुसार वेळोवेळी हजर राहिलो
अमरावतीत पाणीटंचाईचा आढावा घेतला
केंद्राच्या निर्णयाचं पालन करायला हवं -चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी फडणवीसांनी प्रयत्न केले
पंकजा मुंडे सध्या मध्य प्रदेशच्या प्रभारी
विधानपरिषदेसाठी भाजकडून पाच नावं निश्चित
पंकजांना विधानपरिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी नाही म्हणजे नाहीच!
श्रीकांत भारतीय, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे यांची नावे निश्चित
पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांना डावललं
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात खळबळजनक घटना घडली
घरात झोपलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उकळतं तेल टाकून खून करण्यात आलाय
माढा तालुक्यातील सापटणे गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरुन गेलाय.
जमिनीच्या व रस्त्याच्या किरकोळ वादातून सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.
शहाजी गोविंद ढवळे असं खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव असून ते 55 वर्षांचे होते.
टेभुर्णी पोलिसांत संतोष राजेंद्र ढवळे, नरसिंह राजेंद्र ढवळे या दोघांवर या शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
मृत शहाजी ढवळे हे सोमवारी रात्री आपल्या घरात झोपले होते.
दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नी अनिता या शेतात पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे घराचा दरवाजा उघडा होता.
त्यावेळी दोघांनी घरात येऊन ढवळे यांच्या अंगावर तापलेले तेल टाकले.यात ते गंभीर जखमी झाले आणी त्याचा मृत्यु झाला.
आताच्या घडीची मोठी राजकीय बातमी समोर येतेय. भाजपकडून पाच उमेदवारांची नावं विधानपरिषदेसाठी निश्चित करण्यात आली आहे. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. ही नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यताय. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडेना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.
संपूर्ण मराठवाड्यातून शिवसैनिक सभेला येतील
अनेक घडामोडी घडतायेत
शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाकडे लक्ष लागून आहे
विरोधकांचं तोंड म्हणजे गटार, संजय राऊतांची टीका
जितेंद्र ठाकूर हे आमच्या परिवारात आहे
अत्यंत मनमोकळे नेते आहेत, त्यांच्यासोबत आमचा संवाद होतो आहे
अपक्ष कुणाबरोबर हे 10 तारखेला निकाल लागल्यावर कळेल
औरंगाबादमधील भाजपची बॅनरबाजी राऊतांची टीका
मनसेचे नेते संदीप देशपांडेंची ट्विट करुन शिवसेनेवर टीका
तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2022
तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची बोचरी टीका
सभेला गर्दी व्हावी यासाठी औरंगाबाद शहराला 227 कोटी रुपये दिले
पूर्वी राजे लोक गर्दी करण्यासाठी रस्त्याने पैसे उधळायचे
तशी अवस्था शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची झाली आहे.
रावसाहेब दानवे यांची टीका
शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांची जोरदार जाहिरातबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जोरात जाहिरातबाजी
जाहिरातबाजीचा माध्यमातून भाजपवर टीका
भिवंडीत पालिका क्षेत्रात स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज सकाळी 9 वाजपासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यत भिवंडीचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे
सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे
यामध्ये 5 डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, 100 पीएसआय आणि 1200 पोलीस असणार आहे
एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या याठिकाणी तैनात असतील
पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निगरानीखाली हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी शिवसेने बनवले नागरिकांसाठी नियम
■ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तसेच जळगाव जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी हर्सुल सावंगी बायपास मार्गे केंब्रिज चौक, झाल्टा फाटा, बीड नाका, देवळाली चौक, गोदावरी चौक, एम आय टी कॉलेज महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन कडून आपली वाहने कर्णपुरा पार्किंग व आयोध्या नगरी पार्किंग याठिकाणी पार्किंग करावी
■ जालना तसेच लगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी केंब्रिज नाका, झाल्ता फाटा, बीड नाका, देवळाली चौक,एम आय टी, महानुभाव चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाने येऊन अयोध्या नगरी व कर्णपुरा या ठिकाणी आपली वाहने पार्किंग करावीत
■ नवीन धुळे सोलापूर हायवे वरून अंबड, बीड कडून सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने कांचनवाडी येथुन महानुभाव आश्रम, रेल्वे स्टेशन येथून आपली वाहने अयोध्या नगरी व कर्णपुरा पार्किंग येथे पार्क करावीत
■ कन्नड व वैजापूर या तालुक्यातुन सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने, AS क्लब, नगर नाका, लोखंडी पूल या मार्गे येऊन कर्णपुरा पार्किंग या ठिकाणी पार्किंग करावीत
■ बाहेरुन जिल्ह्यातून सभेसाठी येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पक्षातर्फे दिलेले स्टिकर व झेंडे गाडीवर समोरील दर्शनी भागात लावून यावे,
■ बाहेर जिल्ह्यातून येणारी वाहने यांनी आपली वाहने व्यवस्थित कर्णपुरा व अयोध्या नगरी येथे पार्किंग करावीत
■ आपल्या वाहनामुळे इतर वाहनांना पार्किंग करण्यास व पार्किंग मधून गाडी घेऊन जाण्यास अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी
■ कुठेही रस्त्यावर अस्ताव्यस्त गाड्या पार्क करू नये
■ पोलिसांनी दाखवलेल्या रस्त्यानेच वाहने घेऊन पार्किंग कडे यावीत, विनाकारण त्यांच्याशी हुज्जत घालू नये
■ पार्किंग ची माहिती होण्यासाठी विविध पॉइंटवर नेमलेल्या पोलीस अंमलदार यांची मदत घेणे, वाहने पार्किंग केल्यानंतर ती व्यवस्थित लॉक करावीत शक्य असल्यास ड्रायव्हर वाहना जवळ ठेवावेत
■ सभेकरिता येणाऱ्या नागरिकांनी सभा संपल्यावर व सभेसाठी जाताना आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे किंवा नागरिकांशी हुज्जत घालू नये असे प्रकार करू नये.
■ कोणीही पदाधिकारी, कार्यकर्ता पोलिसांच्या कोणत्याही सूचनेकडे दुर्लक्ष करणार नाही, त्या सूचनांचे उल्लंघन करणार नाही
■ बाहेरगावच्या कार्यकर्त्यांनी सभेसाठी येताना व जाताना ज्या ठिकाणी कोणत्याही हॉटेल वर आपण चहा-नाश्ता जेवणासाठी थांबल्यास, आपली व पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने काटेकोर वर्तन ठेवावे…
■सभेच्या दरम्यान कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करू नये.
■ सभेच्या ठिकानी कोणतीही सूचना असल्यास जवळच्या पोलिसांकडे व्यक्त करावी.
■ सभेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी रांगेचे पालन करावे.
■ सभेला येणाऱ्या महिलांचा योग्य तो आदर करावा..
■ सभा संपल्यानंतर महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अगोदर जाऊ द्यावे. त्यानंतरच पुरुषांनी निघायचे आहे म्हणजे वाहतूक व्यवस्था अत्यंत सुरळीत राहील,
■ या शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित ठेवण्यासाठी पोलिस विभाग अत्यंत खडतर परिश्रम घेत आहे.. आपल्या कोणत्याही निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये याची दक्षता घ्यावी…
■ सभेसाठी येताना जाताना वाहनांच्या मागे जर एखादी अॅम्बुलन्स रुग्णवाहिका आल्यास तिला सर्वप्रथम रस्ता मोकळा करून द्यावा. या सोबत वाहतूक नियोजन, पार्किंग याचा नकाशा जोडला आहे त्यानुसार पालन करावे.
शिवसेना
औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शहरातील इतरही मैदानांवर लावले जाणार स्क्रिन
सभेसाठी प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे इतरही मैदानावर लावणार स्क्रिन
कर्णपुरा मैदान, खडकेश्वर मैदान, जिल्हा परिषद वसाहत या ठिकाणी लावले जाणार स्क्रिन
सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे येणाऱ्या रस्त्यांवरही लावले जाणार स्क्रिन
मैदानावर पोचू न शकणाऱ्या कार्यकर्त्यांना स्क्रिनवर पाहता येणार सभा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला काही तासच शिल्लक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय. आज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग कमान, भडकल गेटशेजारील आयटीआय मुलींचे हायस्कूल ते खडकेश्वर टी पॉइंट, मिल कॉर्नर ते महात्मा फुले चौक- औरंगपुरा, ज्युबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे जाणारा रस्ता आणि आशा ऑप्टिकल्स ते सभा मैदानाकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी मिल कॉर्नर ते भडकल गेट असा रस्ता वापरावा
मान्सून गोवा सीमेवर रेंगाळला, महाराष्ट्र तापला
मुंबईत उष्णतेच्या लाटीची भीती
मान्सून आणखी 5 ते 6 दिवस लांबणीवर जाणार
मुंबईत उष्णतेच्या लाटेची भीती
पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील
12 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार
महाराष्ट्र 12वी निकाल 2022 आज जाहिर होणार
या निकालाची कमालीची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे
महाराष्ट्र 12 वीचा निकाल दुपारी 1 वाजता
12वीचा निकाल तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकत
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये काल महाविकास आघाडीनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली
त्यावेळी 12 अपक्ष आमदारही उपस्थित होते
या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं
सुमारे 50 मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केलाय
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जाणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
आज औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विराट सभा
सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे
शिवसेना नेते औरंगाबादेत ठाण मांडून
नेत्यांकडून सभेच्या तयारीचा आढाव घेण्यात येत आहे
सभा रेकॉर्डब्रेक होईल असा दावाही शिवसेनेकडून करण्यात येतोय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजत असल्याने संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा
सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजप आणि राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांच्या नजरा