मुंबई : आज रविवार 1 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज राज ठाकरेंची औंरगाबादमध्ये सायंकाळी सभा होणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे नेमके कोणता मुद्दा मांडणार किंवा कोणावरती टिका करणार हे सायंकाळी स्पष्ट होईल. मनसेचे अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते औरंगाबादमध्ये सभेसाठी दाखल झाले आहेत.
राज्यात भोंग्यावरुन राजकारण केलं जातं,भोंग्यावरुन हिंन्दु मुस्लिम वाद
राज्यात भोंग्यावरुव राजकारण वाढवण्याचा प्रयत्न होतोय
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय असा उपस्थितांना थेट सवाल
राज ठाकरेंवर निशाना साधला, आता जर दुसऱ्याची खपली काढायला गेलो तर आपल्याच अंगावर येणार असल्याचे वळसेपाटलांनी केलं स्पष्ट .
फडणवीस मुंबईतून कडाडले
काही लोकांनी मी म्हणजेच महाराष्ट्र वाटतो
मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा आहे
राज्याचा सन्मान म्हणजे शिवरायांचा सन्मान
राज्याचा अपमान म्हणजे बाबासाहेबांचा अपमान
तुम्ही महाराष्ट्र नाही, तुम्ही हिंदू ही नाही
पण मी आज असे म्हणणार नाही
मला हिंदुंची सख्या कमी करायची नाही
काही वेळात फडणवीस बोलणार
मुंबई महापालिकेच्या लोगोचा आणि धर्माचा संबंध शेलारांनी सांगितला
शिवसेनेवर जोरदार शेलारांचा जोरदार निशाणार
आपण धर्मच्या रस्त्यावर चालत आहोत
युतीत असताना आपल्याबरोबर असल्यामुळे शिवसेनेबरोबर धर्म होता
जो लालबाबगचा राजा होऊ देणार नाही
जो चिंतामणीचा चितपोकळी करू देणार नाही
त्याच्या बरोबर धर्म कसा असेल
पांडवांची टोली कृष्णरुपी फडणवीसांबरोबर
अतुल भातखळकर यांचं भाषण सुरू
काही वेळात फडणवीस बोलणार
महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधणार
महाराष्ट्राच्या वैभवाचे दर्शन होत आहे
राकट देशा म्हटल्यावर ते त्यात दिसलं पाहिजे
हे शिवरायांचं दर्शन सर्वांना दिसतंय
परदेशातून आलेल्या लोकांना मुंबई शहराचे नाव कळले पाहिजे
मुंबईदेवीला वंदन करून मुंबईत पाऊल टाकावं ही इच्छा पूर्ण झाली
बाकी बोलायचं आहे ते 14 जूनला बोलेन
मुख्यमंत्र्यांचा पुन्हा विरोधकांना थेट इशारा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईचा पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून अंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पोहोचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन..
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेना नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित
देवेंद्र फडणवीसांची मुंबई बुस्टर डोस सभा
फडणवीस भाजपच्या रथावर विराजमान
मुंबईत भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी जंग बांंधला
झेंडूंच्या फुलांची माळ संपूर्ण रथावर, सगळा रथ फुलमय…
फडणवीस यांच्या सभेला भाजपमकार्यकर्त्यांची गर्दी सुरू
सभेकडे कार्यर्त्यांचे लक्ष
संघटना हिचं शिवसेनेची ताकद आहे
या संघटनेच्या जोरावरच आपण, मोठ्या प्रमाणात काम करत असतो
औरंगाबादमध्ये 250 बुथ आहेत, येत्या तीन दिवसात आपण 35 टिमच्या
माध्यमातून संघटनात्मक विषया्वर बैठका घेणार आहोत
यामध्ये आ पल्या संघटनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे
6 7 आणि 8 मे ला आपल्याला संघटनात्मक काम करायची आहेत
शालिनी ठाकरे औरंगाबादेत दाखल
टीव्ही 9 मराठीला दिली पहिली प्रतिक्रिया
शिवसेना घाबरलीये केली टीका
महाराष्ट्र दिनादिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांकडून अनोखे आंदोलन.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात आंदोलन.
कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर स्वतंत्र विदर्भाचे पोस्टर्स लावून आंदोलन.
ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र होते, त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावण्यात आले.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट
यावेळी भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या व महाराष्ट्राची खास ओळख असणाऱ्या उत्पादनांचा समावेश असणारे दोन बॉक्सही भेट दिले.
वंचित बहुजन आघाडीच्या माजी जिल्हा अध्यक्षाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर घेतलं ताब्यात
आज सभेच्या वेळी आणि सभेच्या परिसरातून शांती मार्च काढण्याची केली होती घोषणा
वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अमित भुईगळ यांना घेतलं ताब्यात
– भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका
– भोंगे काढण्याची घोषणा बाळासाहेबांनी केली असे ते म्हणतात तर मग भोंगे काढायला हरकत काय
– तुम्हीही तेच म्हणा ना की बाळासाहेबांची भूमिका आहे आणि भोंगे उतरवा
– भोंगे केंद्रीय स्तरावर धोरण आखावे या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
हिंगोली- वर्षा गायकवाड यांची नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका
जर युपी सरकार महाराष्ट्र सरकारपेक्षा बेस्ट असेल तर तेथील लाखो लोक मुंबई आणि महाराष्ट्रात काय करतात,
यूपीच कौतुक करणाऱ्यांनी कधी तेथे राहून बघितलं पाहिजे
मला वाटतं देशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही जिंकलेली पहिली निवडणूक होती.
प्रमोद आणि गोपीनाथ गप्पा मारायला यायचे
बुध्दीबळ खेळलं जातं
त्यांनी मला असं वाटलं.
अनपेक्षित होतं, मला उणीधुणी काढायची तशी आवश्यकता नसते.
संघराज्याच्या अनुशंगाने विचार केला तर,एक अस्मिता आहे.
ती भावना सगळ्यांमध्ये असली पाहिजे
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होत्या.
प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे
लोकांची पोट कुठं भरत आहेत
आपली पोळी भाजायची
मी अशा आरोपांची पर्वा करीत नाही
एखाद्या वडिलाधाऱ्याप्रमाणे ते येतात. काही गप्पा गोष्टी आमच्या होतात. आमचं सुत्र एकच आहे
शेवटी काहीचं होत नाही म्हणून आरोप करतात
काहीवेळेला सुरूवातीला पंचवीस आमदार नाराज
काहीकाम सुरूवातीच्या काळात रखडली…त्यावेळी निधी कुठून आणायचा हा प्रश्न होता
माझ्याकडे ग्रामीण भागातली जनता. तुला निवडुन दिलंय तर तु काय करतो
आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे
माझा मुलगा पर्यटन मंत्री आहे
पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला आहे
तो माझ्यापेक्षा खूप पुढे गेला आहे..त्याचं सतत काम चालू असतं. त्या ठिकाणी सुविधा देणं
या विषयासाठी त्याची मुलाखत घ्या
नाणारचा प्रकल्प उभारण्यापूर्वी तिथल्या जमिनी बाहेरच्या लोकांनी घेतल्या आहेत
ही योजना आल्यानंतर चौपट भाव मिळणार होता हे त्यांना माहित नव्हते
तिथल्या लोकांनी समजून घ्यावं
ते बोलतात तेच दाखवयाचे असू शकतील. त्यांची दंतकथा वेगली असू शकेल
आम्ही तिघं एकत्रं आलो हे लोकांना आश्चर्य वाटतं आता आम्ही तीन विचारधारेचे लोकं चांगले काम करतंय याचं आश्चर्यही लोकांना वाटतं. हे सरकार निवडणुकीत आणि निवडणुकीतही कायम राहील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही, मित्र म्हणायचा आणि पाठीत वार करायचं असं होत नाही तोपर्यंत आम्ही २५ -३० वर्ष भाजप सोबत राहिलो होतो. त्यावेळीही चटके फटके खाल्ले होते
आम्ही खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात आतापर्यंत लोकांनी अनुभवलं. कधी मराठी कधी हिंदुत्वाचा खेळ… मी इतरांचा अपमान करत नाही. डोंबारी वगैरेंचा… मी असा खेळ पाहिला आहे. दोन वर्षाचा कालखंड मोठा होता. नाटक सिनेमा बंद होते. त्यामुळे करमणूक मिळत असेल तर का नाही पाहणार
शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. आता मार्केटिंगचा जमाना आहे. नाही पसंत पडलं तर परत करा. फळलं तर फळलं नाही तर परत. हे असेच भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितलेत
दावेदार हा शब्द चुकीचा आहे. हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका. त्यांना सर्व कळतं. हिंदु म्हणजे कोण कोणी परदेशातून आले नाही. आपल्याकडे हिंदू अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी मग बाकीच्यांना हकलून द्यायचं मग ते फसलं की आम्ही हिंदू. इतरांना घरात बोलवायचं. हे जे चाळे चालतात त्यांना माकड चाळे म्हणतात. महाराष्ट्रातील जनता ना समज नाही
हिंदुत्व आमचा श्वास आहे. त्यामुळे आम्हाला डंका वाजवावा लागत नाही. तुमच्या वागणुकीत असं काय आहे की तुम्हाला सांगावं लागतं का तुम्हाला तुमची नवनवीन ओळख झेंडे फडकावे लागतात. कधी या रंगाचा कधी त्या रंगाचा आम्ही कधीच झेंडा बदलला नाही. काही गोष्टी आता बोलणार नाही १४ तारखेला बोलणार
जन्मापासून काही लोकं झेंडेधारी आहेत. त्यांना अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. अस्तित्व टिकवणं वेगळं. अस्तित्व दाखवणं हा त्यांचा हक्क. काही लोकांप्रवास पाहिला तर मशिदीतून बाहेर पडतानाचे फोटो आहेत. कधी मराठी कधी हिंदूंसोबतचे
जनता राज ठाकरे चा भूलथापाला जनता फसणार नाही असा खोचक टोला भंडाऱ्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी राज ठाकरे यांना लगावला असुन आज औरंगाबाद मध्ये राज ठाकरे याची सभा असल्याने ते भंडाऱ्यात बोलत होते.
औरंगाबादमधील लेबर कॉलनीतील महिला राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आल्यात
आम्हाला लेबर कॉलनीतून हलवलं जातंय रहिवाशांचा आरोप
राज ठाकरेंना भेटण्याची नीतीन सरदेसाईंकडे मागितली वेळ
अजित पवार –
– कुणी काय दाखवावं हे त्याचा अधिकार आहे
– काही वर्षांपासून मीडियाचा स्वरूप बदलत आहेत, हे बदलतं स्वरूप थक्क करणारं आहे
– सोशल मिडियाकडे एक नजर टाकली तर अभासी जगात काय खरं आणि काय खोटं काही कळत नाही,
– भारतात 53 कोटी वॉट्सअप वापरकर्ते आहेत
– या आकडेवारीवरून सोशल मीडियाची ताकत कळते,
– सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे,
– सोशल मीडियाच्या परतीच्या पावसाने त्यानांही झोडपून काढलं आहे,
– सोशल मीडियाला कायद्याच्या चौकटीत बसवणं आवश्यक होतं
– यामध्ये मोठा धोका निर्माण झालं आहे,त्यामुळे हे वापरताना भान जपलं पाहिजे,
– प्रत्यकाने बोलताना भान ठेवलं पाहिजे, अमोल मिटकरीना पुन्हा एकदा अप्रत्यक्ष टोला,
– अनावश्यक लोकांना प्रसिद्धी दिली नाही पाहिजे,
शिवसेनेनं मनसेचा धसका घेतलाय
त्यामुळे शिवसेना नेते अशी विधानं करतायेत
आम्ही आमचं काम करत राहू
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही याला गांभीर्याने घेत नाही तर मग यांना आमच्यावर सभा कशाला घ्याव्या लागतात
आधी म्हणतात गांभीर्याने घेत नाही आणि प्रत्येक सभेत तर आमचंंच नावं घेतात
नीतीन सरदेसाईंचा सुप्रिया सुळेंना टोला
आजची सभा महाविकास आघाडीचे नेते घरात बसून पाहतील
नीतीन सरदेसाईंची सुप्रिया सुळेंवर जोरदार टिका
एक एकरातून दहा कोटी कसं मिळतात हे सुप्रिया सुळेंनी सांगावं. आमचं तोंड उलडलं तर आयुष्यात तोंड उघडता येणार नाही असं प्रत्युत्तर निलम ताई्ंना दिलं.
रत्नागिरी- राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेच्या आगोदर शिवसेनेच्या बालेकिल्यात मनसेचे बॅनर्रबाजी
राज गर्जना नावाने रत्नागिरी शहरात मनसेची झळकली बॅनर्स
भगवी शाल पांघरलेले बॅनर्स ठिकठिकाणी झळकले
औरंगाबादच्या सभेपासून ते ५ जूनच्या राज यांच्या अयोद्धा दौऱ्याचा बॅनरमध्ये उल्लेख
– महाराष्ट्राच्या इतिहासात पत्रकारितेच मोलाचं योगदान आहे
– जे काम करतात ते चुकत असतात, जे कामच करत नाहीत, ते चुकणार कसे
– सोशल मीडियामुळे सेकंद सेकंदाची माहिती मिळत असते,
– 4 दोन वर्षे काम केलं की लगेच त्याला जेष्ठ पत्रकार म्हटलं पाहिजे असं अनेकांना वाटतंय, अजित पवारांचा पत्रकाराना टोमणा
– आताची जी परिस्थिती देशात आणि राज्यात निर्माण झाली आहे, त्याची नोंद घेतली पाहिजे
राज ठाकरे आपण धर्माद आणि धर्माभीमानी नाही आपण एका जातीचे पुरस्कर्ते आणि दुसऱ्या जातीचे, धर्माचे द्वेषकर्ते आहात हा शिक्का पुसण्यासाठी आपण औरंगाबाद नामांतरभूमीत सभेला जाण्याअगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून नतमस्तक व्हावे… सचिन खरात
राज ठाकरे हल्ली संविधान आणि कायद्याची भाषा बोलत आहेत. भोंग्यावरून धार्मिक राजकारण करत आहे. राज ठाकरे आपण धर्माद नाही परंतु धर्माभीमानी पण नाही आपण एका जातीचे पुरस्कर्ते व दुसऱ्या धर्माचे आणि जातीचे द्वेषकर्ते आहात. आपण औरंगाबाद येथील क्रांतीभूमी आणि नामांतरभूमीत आहात त्यामुळे हा शिक्का पुसण्यासाठी सभेच्या अगोदर आपण औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून नतमस्तक व्हावे असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) करत आहे.
नागपूर- बच्चू कडूच्या कामगार मेळाव्याच्या ठिकाणी
मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगार चे ठिया आंदोलन,
कामगार आनंद मेळाव्याच्या ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन ,
बच्चू कडू नी आंदोलकांची घेतली भेट 8 दिवसात प्रश्न मार्गी लावून देण्याचे केले आश्वासन मात्र कामगार आंदोलन करण्यावर ठाम ,
पगार वाढी, पर्मनंट करने, सह विविध मागण्या आहेत
राष्ट्रवादी चे नेत्यांचा आहे कामगार कंत्राट
– विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
– महाराष्ट्र दिवस हा विदर्भाकारिता काळा दिवस असल्याच सांगत आंदोलन
– जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ‘विदर्भ’असे स्टिकर लावण्याचा प्रयत्न
– स्टिकर लावत असलेल्या कार्यकर्त्यांन पोलिसांनी घेतले ताब्यात्त
– वेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांकडून घोषणा
शिवसेनेच्या कामगार संगठने च केंद्र सरकार विरोधात आंदोलन
कामगार कायद्या विरोधात आंदोलन
महाराष्ट दिन आणि कामगार दिनाच औचित्य साधत केलं आंदोलन
केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र नेहमी प्रगती पथावर राहील – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना खुप शुभेच्छा देता
आज भाजपचे सगळे आमदार हुतात्मा चौकात आले आहेत
महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिल राहील
काही लोकांना महाराष्ट्र दिनी सुध्दा राजकारणबाबत बोलतात
राजकीय कुठल्याही गोष्टीला मी उत्तर देणार नाही
राज ठाकरेंच्या आजच्या सभेला अतिप्रचंड गर्दी होईल
सभेला मोठ्या प्रमाणात लोक येतील,
आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे
शिवसेना नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे
त्यांनी या सभेचा धसका घेतलाय
जर शिवसेना असं म्हणतीये की ही सभा स्पॉन्सर आहे तर मग एम आय एमचा खासदार आणि 27 नगरसेवक कसे निवडून येतात
मात्र आम्हाला कोणाला कॉपी करायचं नाहीये
राज ठाकरेंचं स्वतः चं असं एक वेगळं अस्तित्व आहे
आम्हाला कुठे बाळासाहेब व्हायचंय
नीतीन सरदेसाईंचा संजय राऊतांना टोला
एम आय एम नं परवानगी ही प्रशासनाकडून घ्यावी आम्ही थोडी परवानगी देणार आहोत
आमच्या सभेला लोकं उत्स्फूर्तपणे येतात आम्ही गोळा करून लोक आणत नाहीत
नीतीन सरदेसाईंची असदुद्दीन ओवैसींवर टिका
गडचिरोली जिल्ह्यातील 136 पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह
पोलीस अधीक्षक अंकित गोयल सह दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 3 उपविभागीय पोलिस अधिकारी व 24 पोलीस उपनिरीक्षक पोलीस 106 पोलीस शिपायांचा सन्मान होणार
नक्षल विरोधी पोलीस पथकात योग्य व यशस्वी कामगिरी केल्याबद्दल
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी अधिकाऱ्यांनी व शिपायांनी अनेक नक्षल विरोधी ऑपरेशन राबविले
– देशाच्या तिजोरीत 68 भर महाराष्ट्र घालतो
– लोक शही त प्रत्येकाला मत माडण्याचा अधिकार
– सर्व जाती धर्माच्या देश घडविण्यात योगदान
-अनेक जातीचे धर्माचे लोक रहातत
– जातीय सलोखा बिघडणार नाही हे लक्ष्यात घ्यावे
– मत मांडा परतू जातीय तेढ निर्माण होणार नाही काळजी घ्या
– जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
– तेढ निर्माण होईल असं कोणी बोलू नये असं आवाहन करतो
– पोलिस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे.
– तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलिस जप्तीची कारवाई करत आहेत.
– मास्टर माईंड कोण हे पोलिस शोधतील
ॲान सभा
– बुस्टर डोस हे नाव तुम्हीच पाडलंय.
सभांना परवानगी लागते.
औरंगाबाद सभेला अटींसह परवानगी दिली आहे.
ॲान तापमान
– महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे.
२-३ दिवस ती कायम राहील
दुपारी उन्हात जायचं असेल तर छत्री वापरा
ॲान पाणी टंचाई
– प्रांत आणि संबंधित अधिकारी यांना पाणी टंचाई यावर पाणी पुरवठ्याचे आदेश दिले.
ॲान गाडी दंड
– आमची गाडी किती पळावी हे पायलटवर अवलंबून असतं. मी नियम मोडू नका असं सांगत असतो.
तुम्ही उलट आमचं कौतूक केलं पाहिजे
२४-२५ हजार मी ताबडतोब भरले.
लांडगा बघायला कोण येईल?
– बारामतीत बिबट्या सफारी होईल असं मी म्हटलो नाही.
बारामतीत लायन किंवा टायगर सफारी करण्याचा विचार
कोरोना निर्बंध
– आता कुठेलही निर्बंध नाहीयत, मात्र राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली आणि टास्क फोर्सने सूचना केली तर निर्बंध लागू शकतात
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा
महाराष्ट्रावरील आणि देशावरील कोरोनाचं संकट तुळजाभवानी दूर करेल एवढंच मागणं आहे
आजच्या सभेला कार्यकर्त्यांनी शांततेत यावं
आजच्या सभेतून महाराष्ट्राला आणि देशाला दिशा मिळेल
राज ठाकरे काय बोलणार ? यासाठी माझेही कान आतुर झालेत
मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या इच्छा आकांक्षा यामध्ये असतील,
राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे मी सांगू शकत नाही
राज यांनी राज्याच्या हिताचं बोलावं : वडेट्टीवार
राज्यात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण हे बोलताना राज्याच्या अस्मितेसाठी बोलावं,
बदनामीसाठी नव्हे. द्वेष वाढेल, धर्मांधता वाढेल असं काही बोलू नका, असा सल्ला राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
हनुमान चालीसा पठण करायचा असेल तर, मंदिरात जाऊन करा. म्हणजे देवही पावेल आणि संकटही टळेल.
मात्र कुणाच्या घरासमोर चालीसा म्हणाल तर संकट आल्याशिवाय राहणार नाही,
असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याच्या संदर्भात लगावला. राज यांनी आजच्या सभेतून राज्याला पुढे नेण्याचा,
जातीय सलोखा टिकवण्याचा विचार द्यायला हवा. राज्य सरकारला काही सूचना करायच्या असतील तर कराव्या.
मात्र जातीय तेढ, द्वेष वाढवू नका. असं आवाहनही वडेट्टीवार यांनी केलं.
सभा म्हणजे सुपारी सभा
भोंगा कमळाला किती त्रास देतो पाहावे लागेल
वातावरण अजिबात खराब होणार नाही
अशा सभा होत राहतील, त्यांना सुरक्षा देण्याचं काम आमचं आहे.
जे काही सध्या जोरात बातम्या येत आहेत
आमचं पोलिस दल सगळीकडं लक्ष ठेऊन आहे
त्याची मा्हिती बारकाईने घेण्याचं काम सुरू आहे
जातीय सलोखा ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे
समाज्यात तेढ निर्माण होईल, असं वागू नये
नागरिकांनी भरपूर पाणी प्यायला हवं
पाण्याची कमतरता आम्हाला वाटेत तिथं सुरळीत करण्याच आदेश दिले आहेत
आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतो
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन झालं आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
– जातीय धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे
– बेळगाव अद्याप महाराष्ट्रात येऊ शकलं नाहीय, याची खंत कायम राहणार आहे, मात्र ही गाव जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत या गावांना पाठींबा असणार आहे
– वडू बुद्रूक येथील संभाजीराजेंच्या दर्शनावरुन भीम आर्मीने केला राज ठाकरेंचा निषेध
– वडू बुद्रूक येथे केवळ संभाजीराजेंचे दर्शन घेतले मात्र राजेंच्या देहाचे तुकडे वेचून त्यांचे अंत्यसंस्कार करणाऱ्या गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीचे दर्शन घेतले नाही
– राज ठाकरे सारख्या जातीयवादी आणि धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांपासून सावधान रहा
– पुण्यात पौरोहित्य केल्याच्या घटनेवरुन राज ठाकरेंची तुलना अफजलखानाशी केली
– शिवाजी महाराजांच्या भेटी अगोदर अफझलखानाने शेकडो पुरोहितांकडून पुजाआर्चा करुन आशिर्वाद घेतले होते. अफलखान आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीत काय झाले हा इतिहास सर्वानाच माहिती आहे.
– भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांची जहरी टीका
नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजावंदन
नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर केलं ध्वजवंदन
थोड्याच वेळात पोलिस दलाचे संचालन..
शिवसेना नेते खासदार संजय राऊत फोनवर बोलताना कोणाचा साहेब म्हणून उल्लेख करत असतील तर त्याची माहिती आवर्जून द्या अशा सूचना संभाषण ऐकणाऱ्या पोलिसांना होत्या.
फोन टॅपिंग प्रकरणात संभाषण ऐकणाऱ्या पोलिसाने कुलाबा पोलिसांना आपल्या जबाबात ही माहिती दिलीय.
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या मोबाईल फोनचे बेकायदेशीर टॅपिंग करताना विशेष शाखेतील पोलिसांना काही सूचना करण्यात आल्या होत्या.
7 ते 14 नोव्हेंबर 2019 आणि 18 ते 24 नोव्हेंबर 2019 या दोन कालावधीत राज्य गुप्तवार्ता विभागाकडून संजय राऊत यांच्या मोबाईल फोनचे टॅपिंग.
फोन ऐकणाऱ्या पोलीसाची कुलाबा पोलिसांना माहिती
संजय राऊत यांचे संभाषण हे राजकीय भेटीगाठी, बैठका आयोजित करणे, सह्याद्री अतिथीगृहावर जाणे, मातोश्रीवर बैठकीसाठी जाणे याबाबतचे होते.
ते संभाषण ऐकल्यानंतर त्याबाबतची माहिती महत्वाची वाटल्यास ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली जात असे.
कोल्हापूरच्या खासबाग मैदानात 20 मेपासून घुमणार कुस्त्यांचा शडु
ऐतिहासिक खासबाग मैदानात दोन वर्षानंतर होणार राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
20 ते 22 मे दरम्यान होणार स्पर्धा
राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वा निमित्त जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि क्रीडा परिषदेच्या वतीने करण्यात आल आयोजन
16 ते 23 मे दरम्यान गटातील फुटबॉल स्पर्धा देखील होणार
1 मे हा महाराष्ट दिन विदर्भवादी काळा दिवस म्हणून पळत आहे
विदर्भ राज्याच्या मागणी साठी विदर्भ वाद्यांनी महाराष्ट्र शासन चा बोर्ड असलेल्या ठिकाणी स्टिकर विदर्भ शासन असे लावले स्टिकर
विदर्भ वाद्यांनी रात्री च लावले स्टिकर ,
विदर्भवाद्यांनी लावलेले स्टिकर पोलिसांनी काढले
कोल्हापूर जिल्हा परिषदे मध्ये नऊ सदस्य वाढणार
जिल्हा परिषद सदस्यांची 67 वरून आता 76 वर
राजपत्रात निर्णय प्रसिद्ध झाल्याने सदस्य वाढी वर झाला अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब
पंचायत समिती सदस्य संख्या ही 18 ने वाढणार
करवीर हातकणंगले गडिंग्लज कागल या तालुक्यातील सदस्य वाढणार
वाढलेल्या सदस्य संख्या म्हण कार्यकर्त्यांना मिळणार राजकीय संधी
– शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी 2 मेपर्यंत मुदत,
– परीक्षा परिषदेने केले शिष्यवृत्ती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर,
– यानुसार 20 जुलै रोजी होणार शिष्यवृत्ती परीक्षा,
– या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 23 ते 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
आजची सभा ऐतिहासिक ठरणार आहे, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम होईल, आजच्या सभेने संपूर्ण देशाला मॅसेज जाईल
भडकावू भाषण करणं आणि दोन धर्मात भांडणं लावणं हे ओवैसी बंधुचं काम आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स पाळाव्या
आम्ही आमचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत
संजय राऊत यांच्या वक्तव्यावकडे फार लक्ष द्यायची गरज नाही कुत्रा आपल्याला चावायला आला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही
आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते, शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे
रेल्वेच्या आरक्षण अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे रत्नागिरी हापूस रेल्वे स्टेसनवर पडून
चार दिवस उलटून हापूसच्या पेट्या दिल्लीकडे झाल्या नाही रवाना
आंबा बागायतदार समिर दामले यांचे २ लाखांचे नुकसान
रेल्वे स्थानकावर ३७४ किलो आंबा पडून
पंधरा दिवसात रेल्वेनी भरपाई द्यावी आंबा बागायतदाराचे रेल्वेला पत्र
रेल्वेनी हापूस दिल्लीत पाठवायचा आंबा बागायतदाराचा प्रयत्न
रेल्वे प्रशासनाचं गाडीत जागा नसल्याचं कारण
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर
नियम तोडल्यास थेट मोबाईल वर चालान पाठवून भरा लागणार दंड
दंड न भरल्यास जावं लागणार लोकं अदालत मध्ये
तीन महिण्यात 24 हजार 411 जणांना नोटीस
नागपूर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी 81 लाख 63 हजाराचा दंड केला वसूल
मागील वर्षीच्या तुलनेत 38 लाख रुपये जास्त आहे