मुंबई : आज रविवार 15 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांची (Cm uddhav Thackeray) काल सभा झाल्यामुळे आज दिवसभरात त्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) आज भव्य सभा घेत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देत आहेत ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचं वय 46 होतं. अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्स निधन झालं आहे.
मुख्यमंत्र्यांनी पाहिला धर्मवीर चित्रपट
अत्यंत प्रामाणिक मी कलाकार म्हणून चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली तर सांगेन की दुसऱ्याच्या जीवनात आनंद देणारे आनंद दिघे यांचं जीवन हुबेहूब उतरवलं
प्रसाद ओक यांनी कमाल केली आहे
सर्वांनी हा चित्रपट आवश्य वाहवा
जीवन जगावं कसं हा शिकवणारा चित्रपट
प्रत्येक शहरात आनंद दिघे असावा असे एक वाक्य आहे
शिवसैनिक कसा असावा हे चित्रपट पाहिल्यावर कळेल
शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचं नातं अधिक घट्ट होतं
असे शिवसैनिक मला लाभले ते आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले आहेत
पुढे जाण्याच्या आधी नेमंक गुरू शिष्याचं नातं कसं आसावं हे दाखवणारा चित्रपट
यात एक प्रसंग आहे की बाळासाहेब रागावलेले दिसत आहे ते खरं आहे
कारण आनंद दिघे वेळेवर कधीच पोहोचत नव्हते
तेव्हा बाळासाहेब एकच प्रश्न विचारायचे भगवा फडकवशील
ते यादीला हातही लावत नव्हते उमेदवारांच्या एवढा विश्वास होता दिघेंवर
सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे
पण यशस्वी झाला असता तर मंत्रिमंडळात वाझे नसता
दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवला नसता
मात्र आज वर्क फ्रॉम जेल चाललं आहे
सामनात सत्य छापून येतं बोलता तर 2014 पूर्वी छापलेलं सत्य होतं का
आम्ही सगळे मिळून लंकेचं दहन करू
मुंबईचा बाप म्हणून घेतात हे
पण मुंबईचा बाप एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री आयपीएलसारखे बसतात, यांच्या बाजुला चेअर गर्ल होत्या का
राज्यही तुम्ही आयपीएलसारखेच चालवत आहात.
पण तिकडे शेतकरी आत्महत्या करतआहेत
सामान्य माणसाची होरपळ होत आहे
मेट्रोचं जाळं असेल नवी मुंबईचा विमानतळ असेल
सी लिंक असेल, हजारो गोष्टी सांगण्यासारख्या केल्या
सामान्य माणासाची व्यथा तुम्हाला कधी कळणार
राजमहलाात बसून हे राज करणाऱ्यांना कळणार नाही
पाच वर्षे आमच्याशी संसार केला, आणि संपत्ती घेऊन पळून गेला
ऑफिशियली घटस्फोट तरी घ्यायचा होता, आमच्या नावावर मतं मागितली
कालचं भाषण सोनिया गांधींना समर्पित होतं
आरएसएसला शिव्या देऊन सोनियांना खूश करण्याचा प्रयत्न
परमपूज्य डॉ. हेडगेवार स्वातंत्र्यसंग्रामात होते
देशात आणीबाणी लावली तेव्हा तुम्ही कुणाच्या बाजुने होता
बोलायला काही नसलं की बोलतात मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न
इतिहास पहायाचा नाही उगाच बोलत सुटायचं
मुंबई आम्हाला वेगळी करायची आहे मात्र ती भ्रष्टाचारापासून
हे भाषण शिवसैनिकांकरिता होतं तसं ते सोनिया गांधींसाठीच होत
संभाजीनगरच नाव आता बदलायची गरज नाही बोलतात
ओ खैरे व्हा आता बहिरे
झाला खसरा आणि भाजप सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा
दोन वर्षात कोरोनात कुठे होता?
आम्ही दोन वर्षे मैदानात होतो
उद्धव ठाकरे म्हणाले बाळासाहेब भोळे असतात
उद्धव ठाकरे खरं बोलले वाघ भोळा असतो, मग धुर्त कोण असतो?
देशात आता एकच मोदी नावाचा वाघ आहे
दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा हिंदू म्हणजे पंतप्रधान मोदी
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला, पाकिस्तानात घुसून मारलं
तुमचं हिंदूत्व हे गधाधारीच आहे, गधाच लाथ मारतो
24 तासात तीन दहशतवादी आम्ही मारले
शर्जील आला देश तोडायची भाषा करून गेला
माझ्यावर उद्धवजींना खूप विश्वास आहे, फडणवीसांचा टोमना,
आज माझं वजन 102 किलो आहे, बाबरी पाडली तेव्हा 128 किलो माझं वजन होतं
माझ्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं राजकीय वजन तुम्ही कमी करू शकणार नाही
हाच फडणवीस तुमच्या सत्तेचा बाबरी ढाच्या खाली आणेल
बाळासाहेब पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे
त्यांचं पोत्याच्या पायावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झाला
वजनदार माणसापासून सांभाळून राहवा
वाघाचा सामना करून वाघ होता येतं, फोटो काढून नाही
मी काश्मीरात जाऊन आतंकवाद्यांचा मुकाबला करण्याकरता मनोबल वाढवलं
कधीही तिकीट काढलं नाही, कुठे हॉटेलात राहिलो नाही
आम्ही फाईव्ह स्टारमध्ये दिवस नाही काढले
रेल्वे फलाटावर झोपलो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मला नाही आलो
तेव्हा शेपट्या कुणी टाकल्या होत्या ते सांगा उद्धव जी
एक मुंबईकर मराठी असून तो मुंबईवर कहर करत आहे
मी जेव्हा म्हणालो राम जन्मभूमिच्या आंदोलनात कोण नव्हतं तेव्हा तुम्हाला मिरची लागली
मी गेलो होतो बाबरी पाडण्याकरीता याचा मला अभिमान आहे
नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेलो होतो
लाठी गोली खाएंगे मंदिर वहीं बनाएंगे बोलत गेलो होतो
पहिल्या कारसेवेलाही देवेंद्र फडणवीस गेले होते
अनेक दिवस मी बदायुच्या जेलमध्ये होतो
तेव्हाच्या जेलची आठवण आहे, कोणीही शिवसैनिक आला नाही
औरंगजेब धर्म बदलायला सांगत होता
संभाजीराजेंनी काहीच देणार नाही असं सांगितलं
त्या संभाजीराजेंना मारणाऱ्यांच्या कबरीवर ओवैसी जातो
आणि तुम्ही फक्त बघत बसता
पाण्यात जीव द्या, कुत्ता बी ना पहेचान करेगा औरंजेब की
जे महाजारांचं नाव घ्यायचे त्यांनी आपल्या तलवारी म्यानात ठेवल्या असतील
मात्र आम्ही नाही ठेवल्या, आम्ही मुकाबला करणार
हे सर्व हिंदी भाषिक मुंबईकर आहेत
यांना मराठीही समजते
महाशय मुख्यमंत्री दोन वर्षानंतर बोलले
नवनीत राणा आणि रवी राणा नादान आहेत
यांचं पैशाशिवाय काम होत नाही
यशवंत जाधव यांनी मातोश्रींना पन्नास लाखांचं घड्याळ दिलं
बाळासाहेब ठाकरेंना वाईट वाटलं असेल
कारण हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्यांना काहीच नाही
काल कौरवांची सभा झाली
आज पांडवांची सभा इथे होत आहे
कालची सभा म्हणजे लाफ्टर सभा
महापालिकेने आमचं जीवन नर्क बनवलं आहे
मुंबई आता देवेंद्र फडणवीस तुमची आहे
दोन वर्षे तुम्ही काय करत होता
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाग आली
हिंदुंना मुंबईतून पळवून लावलं, हिंंदू सणावर बंधन लावली
बीकेसीत बॉम्ब फुटेल म्हणत होते, मात्र फुसका बार निघाला
आज देवेंद्र फडणवीसांचा याठिकाणी अणुबॉम्ब फुटणार
आरे कारशेड को होत नाही हे सांगा
काश्मीर प्रश्न सोडवायला मोदी खंबीर आहेत
माहीममधील मंदिर तोडण्याचा निर्णय का घेतला याचं उत्तर द्या
मुंबईच्या स्थायी समितीतून ३ लाख कोटींची कंत्राचं मजूर झाली
त्याचा जनतेला हिशोब द्या, ते तुम्हाला विचलीत करत आहेत
मुंबई महापालिकेने उंदारांच्या आडूनही पैसे खाल्ले
राहुल भट्टच्या हत्येच काय झालं विचारतात
तर डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू का झाला याचं उत्तर द्या
बीएमसीच्या मेनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू
कमला मिलच्या आगीत अनेक गेले त्यांचं काय झालं
कमला मिल प्रकरणातील दोषींवर कारवाई फडणवीसांनी केली
सरकार बदलल्यावर एका वर्षात ते जेलच्या बाहेर आले
त्यांना मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाने वाचवलं
आरे कारशेडला शिवसेनेचा विरोध
कोस्टल रोडला शिवसेनेचा विरोध
हे कुठलं हाताला काम दिलं
मुंबईचा मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस
फडणवीस आज मुख्यमंत्री असते
तर संपूर्ण मुंबईतल्या मेट्रो लाईन सुरू झाल्या असत्या
प्रत्येक माणसांपर्यंत भाजप पोहोचत आहे
सत्तेतील लोकांना प्रत्युत्तर तर मिळणार
दुसऱ्याच्या घरात जाऊनही हनुमान चालीसा म्हणा
हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्यांना शिक्षा नाही
ओवैसीवर एकही एफआयर दाखल नाही
कालची सभा थुचाट सभा
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध
नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध, हे कुठलं हाताला काम
बुलेट ट्रेनला विरोध, मुंबईत मेट्रोचं जाळं देवेंद्र फडणवीसांनी विणलं
जबाव तो मिलेगा और ठोक के मिलेगा
आता मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार
बाकीचे सध्या अत्यंत विचलित अवस्थेत आहेत
जयपूरच्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीवर हल्लाबोल
सत्तेत बसलेलेल विकासाबाबत बोलत नाहीत
आम्ही शिवसेनेची पोलखोल केली
आशिष शेलार यांच्या भाषणाला सुरूवात
जोरदार घोषणाबाजीने भाषणाला सुरूवात
कृपाशंकर सिंग, संजय उपाध्याय, राजहंस सिंह,
भाजपकडून उत्तर भारतीय नेत्यांचं प्रमोशन
उत्तर भारतीयांच्या मनात देवेंद्र फडणवीस
ओवैसीवर कारवाई करा, आर यू सिंह यांची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धर्मवरी चित्रपट पाहायल पोहोचले
चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे-एकनाथ शिंदे
-उद्या 11 वाजल्यापासून नोंदणीला सुरुवात
-आधारकार्ड घेवून पक्ष कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन
-मेळाव्यातून अयोध्या तयारीची मनसैनिकांना माहिती
-पुणे महापालिका, आंदोलने याबाबत मेळावा आयोजित केला
-नविन शहराध्यक्ष यांचा जाहीर सत्कार करण्यासाठी मेळावा आयोजित केला
-आगामी निवडणुकीच्या संदर्भाने मेळाव्यात चर्चा झाली
गडचिरोली नरभक्षक वाघाला जेरबंद करा या मागणीसाठी भारतीय शेतमजूर युनियन कडून देसाईगंज येथे मोर्चा
जिल्ह्यातील देसाईगंज व आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाने हादौस घातलेला आहे
मागील आठवड्यात या नरभक्षक वाघाने एक महिला एक पुरुषवर हल्ला करून ठार मारला होता
या नरभक्षक वाघाच्या हल्यामुळे सध्या आरमोरी यांनी देसाईगंज दोन तालुक्यात दहशत पसरली आहे
अनेक शेतकऱ्यांना शेतीत पाणी सोडण्यासाठी किंवा धान कापणीचा असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भीती निर्माण झालेली आहे
नरभक्षक वाघाला जेरबंद करून शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी दूर करावे ही मागणी घेऊन अनेक शेतकरी पोहोचले देसाईगंज वन वनपरिक्षेत्र कार्यालयात
चुलीवर भाकरी करून वाढत्या महागाईचा निषेध , टाळ वाजवीत काढला महिलांनी मोर्चा
चुलीवर भाजलेल्या भाकरी पंतप्रधान मोदी यांना निषेध म्हणून पोस्टाने पाठविल्या
पेट्रोल,डिझेल,गॅस ,भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने महिलांनी टाळ वाजवीत मोर्चा काढला व जोरदार घोषणाबाजी
महागाई वाढल्याने महिलांनी भर चौकात चुल मांडली व त्यावर भाकरी तयार केल्या
गॅस दर वाढल्याने गॅसला हार घालण्यात आला व निषेध व्यक्त केला
महिलांनी बाजारात जाऊन शेतकरी व सामान्य नागरिक यांची भाव वाढ बाबत केली विचारपूस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागीय अध्यक्ष वैशाली राहुल मोटे यांच्या नेतुत्वात आंदोलन
सकाळपासून होतं ढगाळ वातावरण
होत असलेल्या पावसामुळे उकाड्याने बेजार असलेल्या नागरिकांना काहीअंशी दिलासा
वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात
उकड्या पासून नागरिकांना काहीसा दिलासा..
एम.आय.एमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याच्या निषेधार्थ पतीत पावन संघटना पुणे शहर यांच्याकडून आंदोलन करण्यात येणार आहे
मृतांचा आकडा चारवर…
अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…
तर एक महिला आणि मुलाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू…
एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू…
गंभीर जखमी असलेल्या महिला आणि मुलाचाही मृत्यू…
राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळील घटना…
शिर्डीहून शिंगणापूरकडे जाणा-या भाविकांच्या गाडीला बसने उडवले…
मध्यप्रदेशातील भाविकांच्या गाडीचा चक्काचूर…
नगरहून सटाण्याला जाणा-या बसने कारला उडवले…
रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू…
दोन्ही गाड्यांची झाली समोरासमोर भीषण धडक…
दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडलीय घटना…
एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहीती…
पोलीस घटनास्थळी दाखल…
अनेक वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे
त्यांच्या हाती काही लागलं नाही
काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहलं आहे
जे काही झालं ते अत्यंत दुरुदैवी आहे
मी कितेकी चितळेला ओळखत नाही
कुणाच्याही वडिलांवर त्यांनी मरावं हे बोलणं कोणत्या संस्कृतीत बसतं
मी मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, आणि राज ठाकरेंचे आभार मानते
ही विकृती समाजासाठी अत्यंत वाईट आहे, ही वेळ कुणावरही येऊ शकते
मिटकरी जे बोलले त्याबाबत मिटकरींनाही नोटीस आली आहे
या देशात एक यंत्रणा आहे तिथे जाऊन प्रत्येकाने न्याय मागावा
माध्यमे ही न्याय मागायची जागा नाही
मी ज्या मराठी संस्कृतीत वागले ते त्या संस्कृतीत बसत नाही
पवारांनी आजपर्यंत असा कुणाबद्दल शब्द नाही काढला
मी या गोष्टींचा जास्त विचार करत नाही
जनतेच्या पुढील महागाई हा सर्वात मोठा प्रश्न
सुषमा स्वराज यांचं उदाहरण देऊन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
पंतप्रधानांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक राजकारण बाजुला ठेवून घ्यावी
महागाईवर आधी तोडगा काढावा
नाना पटोलेंचं वक्तव्य म्हणजे भांड्याला भांड लागतं
नात जास्त घट्ट होतं
ज्याच्याकडून अपेक्षा असते त्यांच्याकडून त्यांनी मागितलं पाहिजे
समाजाचे ज्वलंत प्रश्न मांडली गेली.
शेती हे प्रमुख साधन या समाजाचे आहे. पण हे खरं आहे. ज्याची चार एकर शेती होती आत तो गुंठ्यावर आला आहे. सरकारने काही मदत करण्याची भावना स्वाभाविक आहे. आपल्याला प्रगती करायचं असेल तर उदयोग करण्याची गरज आहे.
भारतात आज ही काही शांतता आहे. ती जैन धर्माच्या विचाराने शांतता देश्यात आहे. ज्यावेळी संघर्षाची गरज होती. त्यावेळी भाऊबली केंद्र आहे.
राजू शेट्टी साहेब तुमचा आमच्या सरकारला अजूनही पाठिंबा आहे. असे मी गृहीत धरून तुम्ही मांडलेल्या सर्व गोष्टी करू
या समाजाच्या वतीने देश्याला देण्याच काम केले.
कर्नाटक च्या आमदारांना विचारले अल्पसंख्याक मध्ये काय दिले जाते. आम्ही दादांना आग्रह करून अल्पसंख्याक समाजाला लाभ मिळवून देऊ.
हा समाज कुणाच्या भुलथापाल बळी पडत नाही. राजू शेट्टी लोकसभेला उभे राहिले तर त्यांना मतं जास्त पडतात मी उभा राहिलो की मला ही मत चांगली पडतात. कारण काम चांगली असतात.
नदी काठी पुराचा फटका जास्त बसतो. पण निसर्गाच्या पुढे आपल्याला काही करता येत नाही. पुराचा फटका बसू नये यासाठी सरकारने काही अभ्यास केला आहे. पाणी पुढे कसे जाईल
परमेश्वर कडे मी प्रार्थना करतो की राज्यात पाऊस शेतकऱ्याच्या हिताचा व्हावा.
अजितदादा जे बोलतात ते दादा पूर्ण करतात हा दादाचा इतिहास आहे.
टोमणे सभा म्हणा की काही आम्हाला काही फरक पडत नाही , आमचं सरकार विकासाचे काम जोरात करतेय त्यामुळं आम्हाला काहीही फरक पडत नाही
करार जवाब, त्यांना उत्तर देऊ द्या मग आम्ही उत्तर देऊ त्यांना करार जवाब वर
औरंगजेब स्वराज्याचा शत्रू आहे, ओवेसी ची वागणूक हिंदुना डीवचणारी आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, ओवेसी कुणासाठी नाटक करतो माहीत नाही मात्र हा स्वराज्याचा शत्रू आहे…
राणा दाम्पत्य आता बिकेसीं वर जाणार, एकदा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम त्यांनी पहिला, आम्हाला हनुमान चालीसा आणि हिंदुत्व शिकवू नये.. त्यांनी श्रद्धा ठेवत चालीसा म्हणावी
मुख्यमंत्री आज धर्मवीर चित्रपट पाहणार, तो आनंद दिघे यांची कारकीर्द आणि कडवं हिंदुत्व यावरचा जाज्वल्य चित्रपट आहे
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ठाकरे सरकारवर टीका,
लोकायुक्त कायद्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा इशारा…
राज्यातील 35 जिल्ह्यात कमिटी तयार केल्याची दिली माहिती…
फडणवीस सरकारच्या काळात कायदा बनविण्याचे दिले होते आश्वासन…
फडणवीस सरकार गेल्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारनेही लोकायुक्त कायदा बनवण्याचे दिले होते आश्वासन…
दोन वर्षे उलटून गेले तरीही मुख्यमंत्री काहीही बोलायला तयार नाहीत…
मुख्यमंत्र्यांचे कान नेमके कुणी टोचले समजायला मार्ग नाही…
अखेर आंदोलनाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही…
‘एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’
अण्णा हजारे यांचा ठाकरे सरकारला इशारा…
आमच्या सगळ्यांचं श्रध्दास्थान शरद पवार आहेत
असं कोणी केल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार आहे
प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळाले आहे
ज्या विकृतीने शब्द लिहीले आहेत ते अत्यंत चुकीचं आहे
– राज ठाकरे हे कुणाची कॉपी करत नाहीत, राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत, उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
– राज ठाकरेंच्या 2 सभानंतर सर्वांना जाग आलीय, आधी सगळे झोपले होते,
– संभाजीनगर नामकरण करणे हे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे नामकरण नको म्हणतायत,
– राज ठाकरेंनी फक्त दोन सभा घेतल्यात, पुढे ते प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार आहेत, त्यावेळी सर्वांची पळापळ होणार
– आजच्या बैठकीत निमंत्रण पत्रिकेत कोअर कमिटीच्या यादीतून माझं नाव वगळण्यात आलं आहे
– नाव वगळण्यात आले मला माहिती नाही, मात्र स्थानिक नेत्यांनी जाणूनबुजून नाव वगळले आहे,
– मात्र मी आजही राजमार्गावर आहे कायम राहणार
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी,
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी न्यायालयात अधिक वेळ मागितला होता.
– आमचे आयुष्य म्हणजे 24 बाय 7 जॉब आहे
– मार्च एप्रिल मध्ये तर ते खूपच तणावात असतात
– पार्लमेंट मध्ये काम करतांना जाणवते की पैशांचे सोंग आणता येत नाही बाकी सगळे आणता येतात
– गव्हाबाबत आता जो निर्णय झाला तो विशेष आहे
– श्रीलकेत जस झालं हे आपल्याकडे होणार नाही हा विश्वास
– पण महागाईचा प्रश्न आपण गंभीर्याने घ्यायला हवा
– न्यू वर्ल्ड ऑर्डर हा नवीन शब्द आलाय
– पक्षाचे राजकारण बाजूला ठेवा पहिले देश महत्वाचा
– सर्व मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन इकॉनॉमी वर चर्चा होणे आवश्यक
– आता दुर्दैवाने दोन गोष्टी झाल्या जीएसटी कौन्सिल मध्ये पास झाला म्हणजे सर्व राज्याने साथ दिली होती असे नसते काही गोष्टी पास केल्या जातात
– माझ्या प्रश्नाला अर्थमंत्र्यांनी उत्तर दिले नव्हते
– या वर्षी केंद्र स्वतःच कौतुक करतय की यावर्षी जीएसटीबाबत रेकॉर्ड झाले
– सत्ता सत्ता म्हणजे काय तर तुम्हाला दिलेली संधी आहे
– एक इलेक्शन माझी प्रतिष्ठा ठरवू शकत नाही तर ते समाज ठरवते
– तुमचा मुलगा जेव्हा सीए होतो तेव्हा कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते
– मी आल्यापासून सगळे म्हणतायत की नाशिकमध्ये तुम्ही आलात आणि मिसळ नाही खाल्ली त्यामुळे मला खावी लागली
– सगळ्यात चांगली मिसळ कुठे मिळते तर नाशिकमध्ये, नाशिक हा ब्रँड झालाय मिसळीचा
– चहाच्या दुकानाला तर आता आमदार चहा, खासदार चहा काहीही नावे देतात
– भोंगा म्हणजे करायला गेले एक आणि झाले दुसरे… करायला काय गेले आणि शिर्डीतला भोंगा पहिले काढावा लागला
– कोरोना काळात सेवा देतांना कोणी जात बघितली का ?
– सिप्ला कंपनी देखील हमीदची आहे
सुप्रिया सुळे ऑन अनिल देशमुख –
– बाकी कोणी बोलणार नाही पण मी बोलेल, फार फार तर रेड होईल
– अनिल देशमुखवर 109 वेळा रेड झाली, हा वर्ल्ड रेकॉर्ड
– हा खूप सिरीयस ईश्यू आहे
– चार्टर्ड अकौंटट संघटनेला पण नोटीस बजावले जाते की तुम्ही काही बाहेर बोलत जाऊ नका
– एलोरा, अजिंठा आणि ताजमहाल हे आपले आश्चर्य
– पण ताज वरून वर वाद होणे योग्य नाही
– पुरंदरला काल मी होते आणि मी खूप शॉक झाले
– एकाचा सत्कार केला त्यात हडपसरचा एक तरूण होता
– बोलता बोलता तो म्हणाला की मी लंडनला आता जाणार आहे
– लंडनला तीन महिन्यासाठी पाच महिने काँट्रॅकट आहे
– टुरिझम वाढावा या दृष्टीने टॅक्समध्ये आम्हाला सवलत दिली आहे लंडनने,
– हे ऐकून मला खूप शॉक बसला, दुसऱ्या देशात जावे लागत आहे लोकांना
– आज खुप बाबतीत आपला देश मागे आहे, लिडरशिप ही सत्तेतून येत नाही
आम्हाला म्हणता आणि आम्ही पळून गेलो
बाळासाहेबांनी शिववडापाव सुरू केला होता.
महाराष्ट्रातल्या समस्येवर बोलले नाही
हनुमान चाळिसा वाचणाऱ्या लोकांच्यावरती हल्ला करता
सत्तेचा दुरूपयोग करून
देवेंद्र फडणवीसांनी चांगली इमेज तयार केली आहे.
सत्ता गेल्यांतर जेव्हा रश्मी ठाकरेंच्या मागे जेलची पिडा लागेल, तेव्हा मी त्यांना विचारेल कसा त्रास होतोय ते..
लॉकअप कसा वाटतो, गुन्हा न करता जेलमध्ये जाणं कसं वाटतं, हे प्रश्न मी तेव्हा विचारेन
नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
ज्या दिवशी काँग्रेसच्या दारात जायची गरज लागेल, तेव्हा पक्ष बंद करेन, अशा विचारांच्या बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी हरताळ फासलाय
आमदार रवी राणा यांचा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल
नवनीत राणा यांच्यावर दाखल केलेल्या राजद्रोहावरुनही जोरदार टीका
मोदींचा फोटो वापरुन मतं मिळवली, रवी राणांचा टोला
शिवभोजन थाळीचं नाव घेऊन महाराष्ट्रात भ्रष्टाचार झाली
कंत्राटं देऊन भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय
शिवभोजन थाळीच्या नावाखाली पैसे लाटले जात असल्याचा रवी राणा यांचा शिवसेनेवर आरोप
फडणवीसांनी केलेल्या कामाची आठवण आजही घेतली जाते
फडणवीसांच्या नखाइतकं काम उद्धव ठाकरेंनी करुन दाखवावं
उद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री
नवनीत राणा यांचा हल्लाबोल
दिल्लीतून नवनीत राणा यांची पत्रकार परिषद
मुख्यमंत्र्यांनी संस्कृतीचा अपमान केला
राज्यातील प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत
हनुमान चालीसा काश्मिरात जाऊन म्हणा असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंवर पलटवार
औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकणाऱ्यांवर उद्धव ठाकरे का बोलले नाहीत?
दस जनपथ मातोश्री आहे, असं भासू लागलंय.
शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे
विरोधकांवर टीका करण्यासाठी फक्त उद्धव ठाकरेंनी सभा घेतली
मुख्यमंत्र्यांनी रोजगारावर बोलायला हवं होतं..
किती जणांना नोकऱ्या दिल्या सांगा
नवनीत राणा यांचा सवाल
फडणवीसांच्या काळापेक्षा तीन टक्के जास्त बेरोजगारी वाढली
-जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 337 वा पालखी सोहळा 20 जून ते 24 जुलै पार पडणार आहे
-या दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रथ, चौघडा गाडीसाठी बैलजोडा निवडण्यात येणार आहे
-पालखी रथासाथी दोन बैलजोडी, चौघडा म्हणजे (बैलगाडीसाठी एक बैलजोडी घेण्यात येणार आहे
-यासाठी 18 मे ते 19 मे दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी पाच दरम्यान अर्ज स्वीकारले जातील अस देहू संस्थांकडून सांगण्यात आलंय
केतकी चितळेला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलंय
थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे
उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेसाठी अंबादास दानवे यांची सूचक पोस्ट
मुंबईची सभा ही फक्त झलक आहे, संभाजीनगर आणखी बाकी आहे
शिवसेना आमदार आणि जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी केली पोस्ट
मुंबई सभेचे फोटो शेअर करत औरंगाबाद सभेची करून दिली आठवण
8 जून रोजी औरंगाबादेत होणार उध्दव ठाकरे यांची सभा
मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे…राज्याच्या विकासाविषयी बोललं पाहिजे
मुंबईला तोडण्याचा कोणाचा ईरादा नाही,मुंबई अभेद्य आहे…
कोण टिनपाट हे त्यांनी ठरवावं का? जर राज्य सरकार सुरक्षा देत नसेल तर केंद्राला द्यावी लागते…
ओवैसी, दाऊद हे यांचे ठरलेले मुद्दे…
ज्यांनी मुस्लिम लिगशी हातमिळवणी केली त्यांनी आम्हांला शिकवू नये
असंगाशी संग करुन तुम्ही दगाफटका केला…तुम्ही हिंदुत्ववादी राहीले नाही
आमच्या कोणत्याही टीम नाही, निव्वळ गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न करु नये…
मोदींच्या वडलांचं नाव घेऊन हे म्हणटले होते की दामोदार दास मोदी आले तरी मोदी लाट येणार नाही
अडिच वर्षांनंतर पहिल्यांदा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलात…यावर बोला
कोणाचं वजन किती आहे ते त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी मोजा…कोणाकडे किती जिल्हा परिषदा आहेत, कोणाकडे किती ताकद आहे यावरुन देवेंद्र फडणविसांचं वजन मोजा
– मनसे शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आज आयोजन,
– बैठकीत आगामी महापालिका निवडणूक आणि अयोध्या दौऱ्यावर चर्चा होणार,
– बैठकीत मनसे नेते, सरचिटणीस आणि शाखाध्यक्ष उपस्थित राहणार,
– सकाळी 11 वाजता घोले रोड परिसरात होणार बैठक
केतकी चितळेची काल ठाणे गुन्हे शाखा 1 च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी
चौकशीनंतर केतकी चितळेला ठाणे नगर पोलीस ठाण्यात आणण्यातं आलंय
दूपारी 12 च्या दरम्यान ठाणे सत्र न्यायालयात केतकीला हजर केलं जाणार आहे
केतकीला आज बेल मिळते की जेल हे पाहणं महत्वाचं
ठाणे पोलीस चौकशीसाठी पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता
कोर्टाच्या निकालानंतर पुणे पोलीस केतकी चितळेचा ताबा मागणार
काल पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल झालाय
आज कोर्टाच्या निर्णयानंतर पुणे पोलीस ताबा मागणार असल्याची माहिती
आज दूपारी 12 च्या दरम्यान ठाणे कोर्टात केतकी चितळेला केलं जाणार हजर,
पुण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातल्या एटीएम ला मोठी आग,
देलनवाडी परिसरातील बँक ऑफ बडोदा एटीएमला लागलेल्या आगी मोठी हानी,
सकाळच्या सुमारास एटीएम मधून धूर निघत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली,
समोरच्या पेट्रोल पंपावरील नागरिकांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा केला प्रयत्न,
काही वेळातच ब्रह्मपुरी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल,
मात्र तोवर प्रचंड आगीमुळे झाले होते मोठे नुकसान,
बँक ऑफ बडोदाच्या शाखेला लागूनच आहे हे एटीएम,
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे शहर तापमानाच्या बाबतीत राज्य व देशात आहे अग्रेसर,
त्यामुळे आगीच्या घटनांमुळे परिसरात पसरली दहशत
अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा ग्रामीण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे केतकी चितळी यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार 500, 501, 505,553-A हे गुन्हे दाखल करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला अध्यक्ष संगीता ठाकरे यांनी केली
नागपूर महापालिका 30 जून पर्यंत टॅक्स भरणार्यांना देणार 10 टक्के सूट
तर डिसेंबर 2022 पर्यंत कर भरल्यास 5 टक्के मालमत्ता करत सूट दिली जाईल
कर देयक वाटायला झाली सुरवात
26 मे पर्यंत होणार 5 लाख देयकांच वाटप
नागपूरकराना कर भरून सूट मिळविण्याची संधी
त्यांची इच्छा होती की, मुख्यमंत्र्यांनी देखील यावं
याही संघटेना अधिवेशन घेता आले नाही
सांगलीतून अजित पवारांची पत्रकार परिषद
काल मी रात्री आल्यानंतर महापौरांशी मी चर्चा केली
महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षापुर्वी आलं
कोरोनामुळे आम्हाला निधी देता आलेला नाही
सांगली शहारातील विविध उद्घाटन आज होणार आहेत
काल मी सगळा आढावा घेतला
सांगली आणि मिरजला अंडरग्राऊंडचा प्रस्ताव आहे
सगळ्या महापालिकांनी पुढाकार घ्य़ावा
निधी मागितला विकास कामाच्या बाबतीत
100 कोटी निधी सांगली महानगरपालिका ला जाहीर करतो आणि तातडीने 25 कोटी रुपये देतोय
पुणे खरीप हंगामा ची बैठक लावली आहे शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहे
– पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार,
– शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला गेल्यावर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी,
– प्रकल्पात सद्य:स्थितीत सुमारे ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध,
– सध्या खडकवासला धरणातून उन्हाळी पिकांसाठी तिसरे आवर्तन सुरू आहे,
– शहराला १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
नवतपा लागायला अजून वेळ असला तरी तापमानात झाली मोठी वाढ
नागपुरात काल 45.2 अंश तापमानाची नोंद झाली
अचानक दोन डिग्री तापमान वाढल्याने नागपूरकर हैराण
यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस , उन्हात बाहेर न पडण्याचा प्रशासनाचा सल्ला
नागपूर सह विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान पोहचल 45 पार
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 46. 5
तर चंद्रपूर 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट
नागरिकांना सावध राहण्याचा इशारा
नाशिक – महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
आलेल्या तक्रारींनंतर , 7 प्रभागांच्या रचनेत बदल
तर 2 प्रभागांच्या लोकसंख्येत बदल
एकूण 133 जागांसाठी होणार निवडणूक
43 प्रभागा पैकी 43 प्रभागात त्रिसदस्यीय रचना
तर एका प्रभागात चार सदस्यीय रचना
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उद्या बुद्ध पौर्णिमेपासून वन्य प्राण्यांची जनगणना….
कोरोनाच्या दोन वर्षानंतर वनविभागाचा उपक्रम; निसर्ग प्रेमी, प्राणी प्रेमी होणार सहभागी….
६ वन्यजीव विभागात तयार केलेल्या कृत्रिम ४६६ पाणवठ्यावर केली जाणार जनगणना….
४२४ निसर्गप्रेमी आणि ५८ स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी गननेत सहभागी होणार…
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला रात्री केली जाते मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची जनगणना….
– टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी
प्रितिष देशमुख याचा जमीन मंजूर,
– प्रीतेश देशमुख याची पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली,
– २०१७-१८ मध्ये टीईटी परीक्षेचे काम प्रितिष देशमुख संचालक असणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते,
– या कंपनीतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून अपात्र उमेदवारास पात्र घोषित करून तसा निकाल जाहीर केला होता
मनसे नेते अखिल चित्रे यांची मविआवर घणाघाती टिका…
– मविआचेया नेत्यांना ऊद्योग राहीले नाहीत, कोण कधी ऊठतो हेच यांना ऊद्योग राहीले जणु हेच बेड टी द्यायला जतात..तुम्ही लवकर ऊठून ऊद्योग मंत्री बनून काय दिवे लावले…
– संजय राऊत भगवं उपरणं घालून घाम पुसतात, हे यांचं हिंदुत्व…
– बाळासाहेबांचं हिंदूत्व जर आत्मसात करणं केमिकल लोच्चा असेल तर तो तो आम्हाला झालाय…. जनता ठरवेल खरं हिंदुत्व कुणाचं…
– मुन्नाभाईत एक कॅरेक्टर होतं सर्किट, मविआत सगळेच नेते शाॅर्टसर्किट… यांच्या पक्षांतर्गतच लोच्चा…
– शरद पवारांवरील टीकेनंतर आता राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
– यापुढे राज्यात जो कोणी शरद पवार तसेच पवार कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका केल्यास त्याला शोधायचे आणि तोडायचे अशी भूमिका घेणार
– राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना लेखी आदेश
– शरद पवार हा एक विचार आहे मात्र या विचाराला काही समाजकंटक गालबोट लावत आहेत
– त्यामुळे महाराष्ट्रात यापुढे कोणीही पवार कुटुंबीयांबाबत खालच्या पातळीवर टीका करेल त्याला शोधायचे आणि तोडायचे असा आदेश पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांना दिले
वकिलांच्या कार ला बेराळा फाट्याजवळ भिषण अपघात,
अनियंत्रित कार उडून लक्झरीवर आदळली,
ऍड. बी. के. सानप जागीच ठार, तर ऍड. रमेश भागिले गंभीर जखमी,
लक्जरीमधील 4 ते 5 प्रवासी सुद्धा जखमी,
मुलाच्या एडमिशन साठी गेले होते औरंगाबाद ला,
बुलडाणा परतत असताना घडला अपघात,