Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
अमरावतीच्या वरूड-मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादीच्या संकल्प सभेला उपस्थिती…
देवेंद्र भुयार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.??
राजकिय वर्तुळात चर्चला उधाण;दोन महिन्यापूर्वीच देवेंद्र भुयार यांची झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी….
अनेक महिन्यात आमदार देवेंद्र भुयार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात..
संकल्प सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थित…
राज ठाकरेंच्या सभेसाठी अमित ठाकरेही पुण्यात
मनसे विद्यार्थी सेनेनं अमित ठाकरेंच केलं स्वागत
अमित ठाकरेंही एक दिवस आधी पुण्यात दाखल
उद्या राज ठाकरेंची तोफ धडाडणार !
मुख्यमंत्र्यांना त्रास देण्यासाठी भाजपचा खोडसाळपणा सुरू आहे
महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन फडणवीस मोर्चा काढत असल्याचा चंद्रकांत खैरे यांचा आरोप
औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा भाजपचे लोक मुद्दाम विस्कळीत करत असल्याचा केला आरोप
औरंगाबाद शहरात 23 तारखेला भाजप मोर्चा काढत असल्यामुळे चंद्रकांत खैरे यांची आगपाखड
23 तारखेला भारतीय जनता पार्टी औरंगाबाद शहरात काढणार जल आक्रोश मोर्चा
जळगाव जामोद मध्ये अजितदादा पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्याची तोबा गर्दी.
कार्यकर्त्याना थांबवताना पोलिसांची चांगलीच दमछाक..
शासकीय विश्राम गृहाच्या गेटवर कार्यकर्ते मोठया संख्येने..
निवेदन घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही लागली रांग…
– शिस्तबद्ध पद्धतीनं स्वयंसेवकांचं पथसंचलन
– संघाच्या तृतीय संघशिक्षा वर्गातील स्वयंसेवकांचा पथसंचलनात सहभाग
– देशभरातील ७३५ स्वयंसेवकांची तृतीय संघशिक्षा वर्गासाठी निवड
– नागपूरातील रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसरातून पथसंचलनाला झाली सुरुवात
– ९ मे ते २ जून पर्यॅत तृतीय संघशिक्षा वर्ग शिबीराचं आयोजन
गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल ,
शेतीचा वादातुन महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल ,
गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील महिलेने दाखल केला गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,
रत्नाकर गुट्टेंसोबत इतर 30 ते 35 इसमांनी मारहाण केल्याचा फिर्यादीचा दावा ,
रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथील रासपचे आमदार ,
354 (ब) 324, 184, 147, 149, 323, 504, 506 आणि 135 बी.पी.अॕक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कराड तालुक्यातील म्होप्रे येथे घटना घडली.
शिवानी अनिल पाटील (वय 23, रा. म्होप्रे, ता. कराड) असे शॉक लागून मृत झालेल्या युवतीचे नाव
या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
– राज्यभरातून 12 ब्राम्हण संघटना बैठकीत सहभागी होणार,
– आनंद दवे यांच्या ब्राम्हण महासंघाने आणि परशुराम संघटनेने बैठकीचे निमंत्रण नाकारले
जळगाव, पेट्रोल व डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदी यांच्या बॅनरला हार घालून महाआरती करून आंदोलन करण्यात आले
सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि ऑपरेशनल सज्जतेची माहिती घेणार
सैन्य आणि कमांडर यांच्याशी संवाद साधणार
धान कापणी होऊन पंधरा दिवस लोटले तरी आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदी केंद्र सुरू नाही
धान खरेदी केंद्राचे उद्घाटन ठरला शोभेची वास्तू
अहेरी चे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आठ दिवस आगोदर अनेक भागात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले
आठ दिवस लोटले तरी धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी चिंतित
गडचिरोली जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे
अनेक शेतकऱ्यांचे धान कापणी झाल्यानंतर धान शेतातच
पुण्यतिथी सोहळा निमित्त वारकरी साहित्य परिषदेकडून 100 दिंड्यांच्या माध्यमातून अभंग गायनाचा होणार जाहीर कार्यक्रम…
अभंग गायनानिमित्त शहरातील नगरप्रदक्षिणावर ठिकठिकाणी लावले मोठे भोंगे
महाद्वार चौकातील स्पीकरच्या कार्यक्रमास पोलिसांची फक्त परवानगी –
वारकरी साहित्य परिषदेच्या विठ्ठल पाटील यांनी लावले अनाधिकृतपणे शहरात 32 भोंगे
अभंग गायनाच्या सोहळ्यास महाराष्ट्र शासनाच्या संस्कृतीक विभागाचे सहकार्य …
वारकरी साहित्य परिषदेच्या विठ्ठल पाटील यांनी शासनाची फसवणूक केल्याचा होतोय आरोप…..
या मुद्द्यावर देशभरात आंदोलन होऊ शकतं
इंटेलिजन्स ब्युरोने दिला गंभीर इशारा, सूत्रांची माहिती
देशातील सलोखा कायम राखण्यासाठी ज्ञानवापी मुद्दा निकालात काढायला हवा
आयबी कडून केंद्र सरकारला माहिती
औरंगाबाद शहरातील देवगिरी कॉलेज परिसरात घडली घटना
विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेऊन केला खून
एकतर्फी प्रेमातून घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज
विद्यार्थीनीच्या खुनामुळे औरंगाबादेत खळबळ
ओबीसी आरक्षणासाठी सरकार कोणतीही धडपड करत नाही
जेलमधील मंत्र्यांसाठी सरकारची धडपड सुरू
आरोप पत्रातून अनेक खळबळजनक खुलासे होत आहे
डी गँगशी मलिकांचा संबंध असल्याचे स्पष्ट जाणवत आहे
असा मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री काम करत आहेत
शिवशाहूंच्या रक्ताचे व विचारांचे वारसदार मा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांना सर्व पक्षियांनी मिळून अपक्ष म्हणून राज्य सभेवर पाठवावे अशी कोल्हापूर मुस्लिम समाजाची मागणी आहे. संभाजी महाराज मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जितक्या आग्रहाने लढले तितक्याच आग्रहाने इतर समाजासाठी काम केले आहे. कोल्हापूरच्या मुस्लिम समाजासाठी करवीर छत्रपतींचे योगदान अमुल्य आहे. मराठा आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाला समाविष्ठ करून सर्व जातीधर्माना एकत्रित करणेचे काम छत्रपती घराणेंनी केलेले आहे. शाहू महाराजांची विचारसरणी आणि केलेले काम पूर्ण भारत विसरणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांचा कृतज्ञा पर्व सुरू आहे. पूर्ण महाराष्ट्र या कृतज्ञा पर्व मध्ये सामील होऊन संभाजीराजेंना अपक्ष खासदार करावे. सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन फक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजाना कृतज्ञा व्यक्त करण्याचा हा अवसर सोडून नये. छत्रपती संभाजीराजे यांना खासदार करावे असे आवाहन आम्ही करत आहोत. या घराण्यापती समाज सदैव ऋणात रहाणे पसंद करतो महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाणाऱ्या छत्रपतींच्या वारसाला राज्यसभेत पाठवून त्यांचा उचित सम्मान करावा.असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर व प्रशासक कादर मलबारी यांनी केले.
मुंबई दि. 21: चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.
शरद पवारांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी
आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू
ब्राम्हण महासंघ आजच्या बैठकीत सहभागी होणार नाही
कारण फक्त चर्चा होणार आहे
वेदना आणि दुःख पवार साहेब जाणून घेणार आहेत
मात्र पवार साहेबांना ब्राह्मण समाजाच्या वेदना माहिती आहेत
अमोल मिटकरींची त्यांनी आज कान उघाडणी करावी ब्राम्हण महासंघाची मागणी
आजच्या बैठकीकडे ब्राम्हण महासंघानं फिरवली पाठ
राज्यसभेच्या जागेबाबत कोणती खलबत झाली नाहीत
मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो निर्णय पक्ष पुढे नेईल
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत लाईव्ह
राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊतांनी ठणकावलं
राहुल गांधी यांची केंद्रीय यंत्रणांबाबत जे म्हटलं ते योग्यच होतं- राऊत
छत्रपती हे आमचेच आहेत, आम्ही त्यांना विनंती केली आहे, आपण शिवसेनेमध्ये या, यात कोणाची भावना दुखवणं अस नाही- राऊत
सहावी जागा आमची आहे, आम्हांला तिकडे शिवसेनेचा माणूस पाठवायचा आहे आणि त्यावर शिवसेना ठाम आहे – राऊत
जगातील गोष्ट तुमच्य़ा मनाप्रमाणे मिळाली
आम्ही कुठलंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही
आमच्या पालिकेला महाालिकेची परवानगी
त्या बिल्डरने दहा बिल्डींग बांधल्या आहेत
आम्हाला मुंबई महापालिकेनं फसलवलंय
तेव्हा किशोरी पेडणेकर या का बोलल्या नाहीत
माझ्या परिसरातल्या दहा इमारतींचं मोजमाप करावं
मला असं कुठे ना कुठे
त्या महानगर पालिकेने सगळ्या बिल्डींगचं मोजमाप करावं
महानगर पालिकेचं मोजमाप करू शकतं
नवनिर्माण आणि नवनीत यांचं काय चाललं आहे
धनंजय मुंडेचा राज ठाकरेंना टोला
येणाऱ्या काळात आपण सुधारला नाहीतर…
या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या चुका आहेत
महागाईवर कुणी काहीचं बोलत नाही
वाटेल ते आरोप करीत आहेत
एक गोष्ट लक्षात घ्या…गोपीनाथ मुंडेच्या नावाने सरकार आल्यानंतर महामंडळ काढलं
ऊस तोड कामगारांसाठी महामंडळ काढलं आहे
महागाईवरून लक्ष हटवण्यासाठी भोंग्याचा मुद्दा काढला
ऊसतोड मजूरांच्या कल्याणासाठी महामंडळ काढलं आहे
दहापट माणसं महाविकास आघाडीत आहेत
पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतला राज ठाकरेंच्या सभेचा आढावा
शहराध्यक्ष साईंनाथ बाबर यांच्याकडून घेतली माहिती
आज दुपारपर्यंत सभेची पोलीसांची अधिकत परवानगी मिळणार
औरंगाबादच्या सभेत घातलेले नियम पुणे पोलीस घालण्याची शक्यता
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची माहिती
16 नियम व अटी पुणे पोलीस घालण्याची शक्यता
पुणे पोलीसांचही राज ठाकरेंवर बंधन असणार ?
पुण्यातील सभा यशस्वी होणार शहराध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास
कोरेगाव तालुक्यातील पिंपरी गावच्या महिलांनी विधवा प्रथा बंदीचा दिला नारा…
सामुदायिक प्रतिज्ञा घेऊन एकमुखी विधवा प्रथेविरुद्ध केला ठराव…
हळदी कुंकू समारंभ घेऊन विधवा प्रथा बंदचा घेतला एकमुखी निर्णय…
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान क्रांतिसिंह नाना पाटील महिला ग्रामसंघ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला पुढाकार
पिंपरी गावातून घेतलेल्या महिलांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत..
पुण्यातील आयुक्तांच्या बैठकीत सर्वपक्षीय निर्णय
यापुढे पुण्यात नेत्यांच्या घरासमोर आंदोलन होणार नाही
प्रत्येक आंदोलन पोलीस परवानगी घेऊनच होणार
पुण्याची संस्कृती बिघडणार नाही याची काळजी घेऊ
पुण्यातील सर्वच पक्षाचा बैठकीत निर्णय
फिर्यादी स्वप्निल जगताप 121 ऑन केतकी अट्रोसिटी गुन्हा
केतकीने नवबुद्ध 6 डिसेंबरला फुकट प्रवास करतात अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती
त्या पोस्टवर सूरज शिंदे अजून दोन जणांनी खूप गलिच्छ भाषेत कमेंटस केल्या होत्या
त्याअनुषंगाने आम्ही रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये ipc 295 अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता
9सप्टेंबर 2021 रोजी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात शिरसाठ नायधीशांनी केतकीचा अटक पूर्व जामीन फेटाळला होता
मात्र तेव्हा अटक केली नाही
आम्ही पाठपुरावा करत होतो पोलिसांनी सांगितले आम्ही फक्त 295 ऍक्ट लावला आहे, त्यामध्ये 295A अजून ऍड करायचा आहे, आम्हाला वरून परवानगी अजून भेटत नाही आहे त्यासाठी तिला अटक करत नाही आहे
आता या गुन्ह्यात सध्या 24मे पर्यत पोलीस कोठडी आहे त्यानंतर तिला mcr होईल त्यानंतर तिचे वकील जामिनासाठी अर्ज करतील आणि आम्ही 100% तो जमीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करू
त्यांच्या कृतीचा राग प्रचंड आहे
तिथला अभ्यास गट म्हणून गेलेले आहेत
नाहीतर चांगलं आहे, त्यांनी महापालिकेला सांगावं
योगाला मान्यता देण्यात आली आहे
त्यासाठी तुमचा दहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे
अवैद्य पुरावा नसल्याचा त्यांनी पुरावा द्यावा
ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेणं अयोग्य – आंबेडकर
या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगलं योगदान राहिल
प्रत्येक राज्याला स्वायत्ता देण्यात आली
कोर्टाचा निवडणुकांबाबतचा निर्णय घटनेला धरून नाही
सुप्रीम कोर्टाचा निर्णय हायकोर्टात टिकणार नाही हे मी त्यावेळी सांगितलं होतं
ओबीसींनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांना आम्ही मतदान करणार नाही
तरचं ओबोसींना आरक्षण मिळेल
या देशाला स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली मिळालं…देश तसाचं ठेवावा लागलं
समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.
– दक्षिण सोलापूर धोत्री गावात आज शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार
– गोकूळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यावतीने आयोजित केला स्नेहमेळावा
– गोकूळ शुगरच्या गाळप हंगामाचा सांगता समारंभ आणि शेतकरी मेळावा होतोय.
मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली
छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यात नुकतीच याबाबत चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींपुढे ठेवलेला प्रस्ताव त्यांना मान्य करावा लागेल, असं राऊत यांनी मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले.
समाननिधी वाटप व्हावे अशी आमची मागणी आहे – नाना पटोले
सातत्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडतोय
समाननिधी वाटप व्हावे अशी आमची मागणी आहे
आम्ही कोणावर टीका करीत नाही
मला कोणीशी बोलायचं नाही
माझी माझी भूमिका सोनिया गांधी यांच्याकडे मांडली आहे
विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे
कसं वागवावं आणि कसं राहावं हे कोणी सांगू शकत नाही
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आज अमरावतीच्या दौऱ्यावर…..
दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे करणार उद्घाटन….
बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार….
साडे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार.
थोड्याच वेळात पुण्यात सर्वपक्षीय राजकीय प्रमुखांची बैठक
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घेणार बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी बैठकीला पोहोचले
धारवाड तालुक्यात भीषण अपघातात 7 ठार,10 जखमी
धारवाड : धारवाड तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे.
महागाई विरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारच्या विरोधक गॅस सिलेंडरची काढली अंत्ययात्रा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात शिवसेनेचे आंदोलन
पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ कमी झाली पाहिजे या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा शिवसेनेचा महागाई विरोधात आक्रमक मोर्चा
नवी मुंबईतील एपीएममसी मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून कांद्याचे भाव उतरले आहेत,
हलक्या प्रतीचा कांदा हा 4 ते 5 रुपये किलोदराने
तसेच साधारण कांदा हा 8 ते 12 रुपये दराने
उन्हाळ्यात कांद्याचे पिक जास्त प्रमाणात होत आसल्याने कांद्याचे दर घसरले आहेत
थोड्याच वेळात पुण्यात सर्वपक्षीय राजकीय प्रमुखांची बैठक
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घेणार बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी बैठकीला पोहोचले
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आज अमरावतीच्या दौऱ्यावर…..
दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे करणार उद्घाटन….
बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार….
साडे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार.
पुणे
-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुण्यातील लाल महालात नृत्याविष्कार केला म्हणून लाल महाल अपवित्र झाल्याच्या निषेधार्थ लाल महालाचे शुद्धीकरण
जिजाऊच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करत,ज्या ठिकाणी नृत्याविष्कार झाला ती जागा गौमूत्राने स्वच्छ करणार
उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्रीपदासाठी दाऊदशी दोस्ती केली? सोमय्यांचा सवाल
सोमय्यांची नवाब मलिकांवर टीका
दाऊदशी संबंधांवर सोमय्यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांच्यावरही सोमय्यांचा निशाणा
उद्धव ठाकरेंना मलिकांचे सगळे कारनामे माहीत होते – सोमय्या
संजय राऊत रोज मनोरंजन करतात – सोमय्या
औरंगाबाद ब्रेकिंग :-
राष्ट्रवादी काँग्रेसचा पाण्यासाठी हंडा मोर्चा
भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा
पुंडलिक नगर परिसरातील नागरिकांनी काढला हंडा मोर्चा
मोर्चात रिकामे हांडे घेऊन अनेक महिला सहभागी
पंचगंगा प्रदूषण प्रकरणी इचरकंजी पालिकेवर कारवाईची शक्यता
प्रदूषण नियंत्रण मंडळाने शेतकऱ्यांकडे मागितला खुलासा
सात दिवसांत खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इशाऱ्याने पालिका प्रशासनात खळबळ
पंचगंगा प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसापासून नदीत काळा पाण्यासह मृत माशांचा पडतोय खच
वारंवार होणाऱ्या प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावातील लोकांचा होतोय उद्रेक
चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा येथील ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू…
दशरथ पेंदोर (६५) असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचं नाव,
बकऱ्या चारण्यासाठी गावतलावा शेजारी गेलेले दशरथ हे काल संध्याकाळी परत न आल्याने गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली शोधाशोध,
आज सकाळी याच परिसरात सापडला छिन्न विच्छिन्न मृतदेह,
या परिसरात गेल्या काही दिवसांपासून “वाघडोह” या ताडोबातील प्रसिध्द वाघाचा आहे वावर,
अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग ठेवून होता वाघावर नजर,
मात्र वाघावर नजर ठेवूनही अखेर ग्रामस्थाचा गेला जीव,
ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल तीव्र नाराजी
पुण्यातील वाढत्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बोलावली बैठक
भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच इतर पक्षांनाही आमंत्रण
पोलीस आयुक्त आज राजकीय पक्षांशी करणार चर्चा
चार दिवसांपुर्वी भाजपा आणि राष्ट्रवादीत झाला होता संघर्ष
आज 11.30 वाजता बोलावली बैठक !
क्रूझर झाडावर आदळल्याने भीषण अपघात
धारवाड तालुक्यातील बड गावाजवळ मध्यरात्री घडली घटना
अपघातात सात जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी
मृतक धारवाड तालुक्यातील बेनकट्टी गावचे आहे
नातेवाईकाचे लग्नकार्य उरकून परतणाऱ्या वर काळाचा घाला
जखमींवर धारवाड जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
एसपी कृष्णकंठा यांची घटनास्थळी भेट
वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या किरण इनामदार ला कोर्टाचा दिलासा
अभिनेत्री केतकी चितळेची शरद पवरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर किरण इनामदारने या इसमाने केली होती
पनवेल पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं
काल त्याला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते
त्यावेळी पोलिसांकडून पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती
आश्या प्रकारचे गुन्हे दाखल करणे म्हणजे अभी व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे असा युक्तवाद त्याच्या वकिलाने केला होता
किरण इनामदार यास न्यायाल्याने 20,000 च्या जामिनावर सोडण्याचे आदेश केलेला आहेत.
– बालविवाह रोखण्यासाठी सोलापूर पोलिस अधिक्षकांनी हाती घेतले परिवर्तन ऑपरेशन
– सोलापुरात बालविवाहाची प्रथा कायद्याने बंद झाली मात्र तरीही बालविवाह थांबलेले नाहीत.
– बालविवाहात सोलापूर राज्यात अव्वल असल्याने ही ओळख पुसण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘परिवर्तन’ ऑपरेशन हाती घेतले आहे.
– तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले
– अधिकाऱ्यांना आठ दिवसांतून एकदा दत्तक दिलेल्या गावाला भेट देणे बंधनकारक आहे.
– महिला आणि बालविकास विभागाच्या ३ जून २०१३ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवकास बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
– त्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांनी ग्रामसेवकास मदत करणे अपेक्षित असतानाही तसे होताना दिसत नाही.
– अडीच वर्षांत चाईल्ड लाइनवरील माहितीवरून महिला बालकल्याणच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने जवळपास १०० बालविवाह रोखले.
– तर मार्च २०२२ नंतर सोलापुरात आतापर्यंत १५ बालविवाह रोखले गेले.
– गुपचूप पद्धतीनेही मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत असतात. त्यामुळे ही प्रथा समूळ नष्ट व्हावी म्हणून ‘ऑपरेशन परिवर्तन’च्या धर्तीवर पोलिस अधीक्षकांनी नवीन ऑपरेशन हाती घेतले आहे.
– तीन वर्षांत ज्या गावांमध्ये बालविवाह रोखले किंवा झाले अशा ७८ गावांची निवड करून प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दत्तक दिले आहे.
– त्याअंतर्गत पोलिस अधीक्षकांनी स्वत: नरखेड गाव दत्तक घेतले आहे.
– उसाला लावलेल्या आगीतून बचाव करताना बिबट्या पडला विहिरीत….
– दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर 60 फूट खोल विहिरीतून स्वतः बिबट्या बाहेर पडत ठोकली जंगलात धूम…
– सिन्नर तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) येथील घटना
– बिबट्या विहिरीतून बाहेर पडताच बघ्यांची झाली पळता भुई थोडी…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आज पत्रकार परिषद
5 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद
ब्राम्हण संघटनांची बैठक झाल्यावर शरद पवार बोलणार
शरद पवार आज काय बोलणार ?
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती
पवारांची आज पत्रकार परिषद !
रत्नागिरी- चिपळूणातील वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची ड्रोन व्हिजवल्स
चिपळूणला पुराच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम
वाशिष्ठी आणि शीव नदीतील गाळ काढण्याचं केलं जातंय काम
४ लाख ६० हजार क्युबीक मिटर गाळ काढला गेलाय
६३ मशिनरीच्या सहाय्याने साडेतीन कोटी रुपये खर्चून काढला जातोय गाळ
बहादूरशेख नाका, उक्ताड, बाजारपुल, वालोपे, पेठमाप भागातला काढला जातोय गाळ
नाशिक – मैदाने क्रीडांगण उद्यानामध्ये जाहिरात फलक लावण्यास बंदी
– अन्य भागात जाहिरात फलक लावण्यासाठी विशिष्ट नियमावली
– शहरात होर्डिंग द्वारे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी नवे धोरण
– महानगरपालिका नियम 2022 नवे जाहिरात धोरण
राधानगरी धरणातील पाणी साठा टप्प्याटप्प्याने कमी केला जाणार
ऐन पावसाळ्यात स्वयंचलित दरवाजे उघडून होणारी पूरपरिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाचे नियोजन
सध्या धरणात पावणे तीन टीएमसी पाणीसाठा
पाणी साठा 44 टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आणला जाणार
पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी बियरची विक्री
तब्बल 30 लाख लिटरने झाली विक्रीत वाढ
213 कोटींनी महसूलात झाली वाढ
गेल्यावर्षी 1434 कोटी रुपये एवढा महसूल मिळाला होता यंदा त्यात वाढ होऊन 1647 कोटी रुपये एवढा महसूल जमा झालाय
उन्हाळ्यात तळीरामांनी बियरला चांगलीच पसंती दिलीये…
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा गावाजवळ चालकाच्या ताबा सुटल्यामुळे गोडेतेल वाहतूक करणारा टँकर पलटी.
टँकर चालक किरकोळ जखमी झाला असून गुजरात कडून मुंबईच्या दिशेने जात असताना घडला अपघात ,
गोडेतेल टँकर मधून लिक होऊन महामार्गावर सांडत असल्याने व तेलाच्या गगनात भिडलेल्या किंमती पाहता गोडेतेल भरून घेण्यासाठी स्थानिकांनी केली गर्दी,
आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी जाहीर; जिल्हातील २०२४ बालकांची निवड
२७ मे २०२२ पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . भाऊसाहेब कारेकर यांचे आवाहन
जिल्हात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील २०२४ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी २७ मे २०२२ पर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
– नाशिक मध्ये CNG दरात पुन्हा 3 रुपयाने दरात वाढ
– आता CNG चालकांना किलोमागे मोजावे लागणार 86 रुपये
– गेल्या महिन्याभरात CNG दरात सतत वाढ होत असल्याने CNG वाहनाचलकामध्ये नाराजी
– काल मध्यरात्रीासूनच नवे दर नाशिक मध्ये लागू
– याआधी 80 रुपयाने किलोने होते CNG चे दर
पुण्यात सीएनजीच्या दरात झाली 2 रुपयांची वाढ
आज मध्यरात्रीपासून सीएनजी 80 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा लागणार
सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांमध्ये नाराजी
पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींबरोबरच सीएनजीच्याही दरात मोठी वाढ
तीन आठवड्यात तब्बल 14 रुपयांची वाढ सीएनजीमध्ये झाली आहे..
– सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याच्या हलचाली सुरु
– उजनीच्या पाण्यावरून ही खांदेपालट होण्याची दाट शक्यता
– महापालिका, जिल्हा परिषदेच्या तोंडावर उजनीच्या पाण्याचा वाद चिघळत असल्याने खांदेपालट होण्याची शक्यता
– पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदलून त्यांच्या जागी हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री नेमण्याची शक्यता
– याबाबतचे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिल्याची राष्ट्रावादीतील सुत्रांची माहिती
– सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली
– पवारांची भेट घेऊन उजनीच्या पाण्यावरून पक्षविरोधी वातावरण तापल्याची माहिती पवारांना दिल्याची चर्चा
– दरम्यान या भेटीत 25 मे नंतर बदल दिसेल असे संकेत खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारांनीच दिल्याची सुत्रांची माहिती
नाशिक ब्रेकिंग –
– 115 कोटींनी पत आराखडा वाढला
– खरिपासाठी 67 कोटी, रब्बीसाठी 48 कोटींची वाढ
– खरीप आणि रब्बी पिक कर्ज वाटपाचे 3हजार 650 कोटी रुपयांचे उद्दिष्ट
– जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
– खाजगी बँकांना यंदा एकूण 60 कोटी जादा कर्ज वाटपाचे उद्दिष्ट
शरद पवारांचं निमंत्रण दोन ब्राह्मण संघटनांनी नाकारल!
परशुराम सेवा संघ आणि ब्राम्हण महासंघ यांनी पवारांच्या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय..
राष्ट्रवादी कडून सातत्याने ब्राह्मण समाजाचा होत असलेल्या अपमानामुळे या दोन संघटना नाराज…
शरद पवार यांच्याकडून राज्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासोबतच विविध ब्राम्हण संघटनांना निमंत्रण देण्यात आले होतं
– नागपूरातील कळमना APMC मार्केटमध्ये आंब्याची आवक घटली
– आवक कमी झाल्याने आंब्याच्या दरात ४० टक्के वाढ
– कळमना मार्केटमध्ये ठोक बाजारात चांगल्या प्रतिच्या आंब्याचे दर ५० ते ६० रुपये किलो
– गेल्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के आवक घटली
– आंब्याचं उत्पादन कमी असल्याने आवक कमी, आंब्याची दरवाढ कायम
– ओबीसी आयोगाचा आजपासून राज्यव्यापी दौरा,
– आजपासून आठ दिवस राज्यातील विविध विभागात दौऱ्याचे आयोजन,
– या दौऱ्याची सुरुवात पुण्यापासून केली जाणार,
– दौऱ्याच्या सुरुवातीला ओबीसी आयोगातील कर्मचारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार,
– त्याशिवाय या आठ दिवसीय दौऱ्यात ओबीसी आरक्षणाबाबत आवश्यक माहिती गोळा केली जाणार.
शेतात जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता मिळत नसल्याने शेतकऱ्याची चिठी लिहून आत्महत्या….
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी गावातील तूरखेड येथील घटना; शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक.
पांडुरंग महल्ले असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव..
– नागपूरातील सीए रोडवरील मेट्रो सुरु करण्यास उशीर
– मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये दिलं सेफ्टी सर्टीफीकेट
– सेफ्टी सर्टीफीकेट मिळून तीन महिने लोटल्यानंतरंही सीए रोडवरील मेट्रो सुरु नाही
– काही काम अपूर्ण असल्याने सीए रोडवरील मेट्रो सुरु न झाल्याची माहिती
– सीए रोडवरील मेट्रो सुरु झाल्यास नागपूर मेट्रोचे प्रवाशी वाढणार
नवाब मलिकांचे डी गॅंगशी संबंध होते
डी गॅंगशी संबंध असल्याचे उघड
वारंवार हसिना पारकर यांच्याशी अर्थिक व्यवहार केले आहेत.
अनेकांच्या संपर्कात होते
त्यामुळे नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
राज ठाकरेंच्या सभेचा आणखी एक ट्रेलर होणार लॉंच
सकाळी 10 वाजता होणार प्रसारीत
राज ठाकरेंकडून करारा जवाब मिळणार पोस्टरबाजी
राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय..
– फॅाल्टी वीज मिटरमुळे महावितरणचं मोठं नुकसान
– नागपूर झोनमध्ये महावितरणने वर्षभरात १२ हजार मिटर बदलले
– मिटर बदलल्यामुळे १.२० कोटी रुपयांचं उत्पन्न वाढलं
– वर्षभरापासून मिटरची टंचाई असल्याने ग्राहकांना घ्यावे लागतात खुल्या बाजारातून मिटर
– फॅाल्टी वीज मिटरमुळे महावितरणचं मोठं आर्थिक नुकसान
पुण्यातील येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी
पाण्याच्या वादावरून झाली हाणामारी
पत्र्याने एकमेकांना मारल्यानं कैदी जखमी
सोनु शेटे आणि किशोर मंजूळे अशी कैद्यांची नावं आहेत..
पुढील दोन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा
मान्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण
मान्सूनपुर्व पावसाची राज्यात ठिकठिकाणी हजेरी
कोकण,पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी काल पावसानं जोरदार हजेरी लावली.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात बाप्पयुक्त वारे वाहतायेत त्यामुळे पाऊस पडतोय !
नाशिक शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार
उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार
नाशिक शहरातील लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
काशी पिठाच्या जगदगुरूपदी सोलापूरच्या होटगी मठाचे मठाधिपती मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांची नियुक्ती;
निवडीनंतर महाराजांच्या स्वागताला हजारो भक्तांची उपस्थिती
पालखीतून मिरवणूक काढत जंगी स्वागत