मुंबई : आज मंगळवार 24 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर साळीरस्त्याजवळ भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये भरधाव निघालेली कार पुलाच्या कठड्यावर आदळली. त्यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयातील २१ वर्षीय नर्सला फ़िजोथेरपी शिकवण्याच्या नावाखाली केले डॉक्टरने अश्लील चाळे…
अमरावती शहरातील प्रसिद्ध रुग्णालयातील धक्कादायक प्रकार…
डॉ आशिष चौधरी विरुद्ध राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल…..
विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शारदा गणपतीची फ्रेम भेट देऊन केला सन्मान
अमित ठाकरेंना 28 तारखेला पुण्यात कार्यक्रमाला येण्याचं दिलं निमंत्रण
वाढदिवसानिमित्त पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी भेटून दिल्या शुभेच्छा !
पिंपरी चिंचवड आणि पुण्यात कार्यक्रमांच आयोजन
अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फुटबॉल स्पर्धेचं आयोजन
अमित ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन
मनसेच्या विद्यार्थी सेना आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेण्याची शक्यता
गडचिरोली- महाराष्ट्राची सीमावर्ती भाग सिरोंचा तालुक्यातील रांमजापूर येथे मोठ्या वादळासह पावसाला सुरुवात
वादळी एवढा मोठा होता की एचपी पेट्रोल पंप वरील पत्रे व सामान पूर्ण वादळाने हवेत उडाले
एकाच वेळी मोठा वादळ सुरू झाल्याने पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले ग्राहक दुचाकी सोडुन सुरत सुरक्षित स्थान गाठले
काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरू
प्रियंका गांधी, पी चिदंबरम, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल,अजय माकन, रणदीप सुरजेवाला बैठकीत उपस्थित
– शिवसेनेच्या दाबाव तंत्राला आम्ही घाबरत नाही
– संभाजी महाराजांच्या राज्यसभेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण
– विजयासाठी लागणाऱ्या 42 मतांची जलावजुळव झाली आहे.
– 5 ते 6 मतांची कमी असल्याने त्याची जुळवाजुळव चालू आहे
– मराठा समाज, बहुजनांचे मतदान हवे असेल तर आज छत्रपतीना बिनविरोध राज्यसभेत पाठवा
– पक्षाचा प्रोटोकॉल पाळायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधींना मराठा समाज त्यांची जागा दाखवेल
कार्यक्रमाच्या ठिकाणी परवानगी जमाव जमवून दहशत पसरवली
10 ते 15 तरुणांनाचा तलवारी हातात घेऊन नाचतांना व्हिडिओ व्हायरल
कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 143,144,149 तसेच भारतीय हत्यार कायदा 4-25 अंतर्गत गुन्हा दाखल
निसार जागीरदार, फैजान जागीरदार, यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल
31 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची उदघाटन पंतप्रधान करणार
दक्षिण भारतात पंतप्रधान मोदींचा दौरा
अपक्ष उमेदवारीला विरोध करू नका आणि राजकीय बेडीत अडकवू नका
अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवणार
अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा
200 मतदारसंघाचा आम्ही सर्व्हे केलाय कोणाचा कळस कसा फिरवायचा हे आम्हाला माहिती आहे
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही
अपक्षच निवडणूक लढवा मराठा समन्वयकांची भूमिका
वाढत्या सस्पेंसवरून मराठा समन्वयकांनी मौन सोडल
थेट इशारा !
नागपुरात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा
मात्र या अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम होण्याची शक्यता
भर दुपारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ
संभाजी छत्रपतींना पाठिंबा नाहीच
संजय पवार यांना उमेदवारी जाहीर
महाराजांना पक्षाचे वावडे नसावे
ज्याच्याकडे बेचाळीस मते असतील ते निवडून येतील
अधिकृत घोषणा लवकर होईल-राऊत
संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे
उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला आहे
23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द…
प्रकृती अस्वास्थ्यामुळे डाॅक्टरांचा सल्ला…
हभप निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी होते किर्तनाचे कार्यक्रम…
आयोजकांची गैरसोय होणार असल्याने इंदोरीकर महाराजांची दिलगीरी…
पत्रक जारी करून इंदोरीकर महाराजांची दिलगीरी…
वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा किर्तनास करणार सुरूवात ….
– पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप
– पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम तूर्तास थांबविण्यात आले
– खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असून त्याला अचानक आक्षेप
– पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून माहिती
– खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र
– पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा आक्षेप
निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक.
बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील झाली चर्चा
बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना नेते विजय नाहटा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक उपस्थित
31 मे रोजी जाहीर होणाऱ्या आरक्षणा नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार
बैठकीचा निर्णय प्रदेश पातळीवर पाठवला जाणार आहे
शिवसेना छत्रपतींसोबत जो अटी शर्थीनचा खेळ खेळत आहे. हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही आहे. तसच शिवसेने व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला व आम्हाला आवडलेलं नाही.
त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते.
शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, नारायण आठवले, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का??
मग आता संभाजीराजेंनाच का..??
पण सेनेला छत्रपतींसोबत न्याय करायचा नसेल तर आमच्या मतांवर पुढच्या वेळी तुमचे आमदार निवडून येतात कसे हे आम्ही पाहूच. 42 मतांचा आकड्याची जुळवाजुळव आम्ही सुरू केली आहे. 5/6 मते कमी आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
आपला : छावाप्रमुख धनंजय जाधव
संभाजीराजे यांची भेट घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला फोन
मराठा आमदार म्हणून तानाजी सावंत महत्त्वाची भूमिका बजावणार का ?
या आधी पुण्यात छत्रपती संभाजीराजे आणि तानाजी सावंत यांची झाली होती भेट
शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या
तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून माहिती दिली
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती…
कोल्हापूर गादीचा शिवसेनेने सन्मान करायला हवा होता
त्यांचा सन्मान झाला नाही ही वाईट बाब आहे
मराठा क्रांती मोर्चा मुख्य समन्वयक विनोद पाटील यांची प्रतिक्रिया
तीन लाखांचा मुद्देमाल नेला पळवून
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
खडकवासल्यात दूकानांमधील चोरीचं प्रमाण वाढलं
चोरट्यांचा हवेली पोलीसांकडून शोध सुरू
काल रात्री अडीच वाजताची घटना
– पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एका तरुणाला अटक
– जुनेद मोहोम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक
– काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फांडींग झाल्याचा आरोप
– या तरुणाचे गझवाते अल हिंद या काश्मीर मधील अतिरेकी संघटना च्या संपर्कात
– या संघटनेशी सोशल मीडिया च्या माध्यमातून तो संपर्कात होता
– पुणे न्यायालयात आज दुपारी २ च्या सुमारास करणार हजर
उद्या आपल्याला लाभ मिळू शकतो
आमची ताकद तर वाढली आहे
काही पक्षांची अवस्था अशी आहे की, फक्त चिंतन वर्णन आहे
ऑपरेशन यशस्वी, पण पेशंन्ट डेड अशी अवस्था आहे
ओबीसी आरक्षण
कशाप्रकारे आपलं काम पुर्ण होऊ शकत.
२०२२ साली सांगितलं…
कमिशन तयार केलं
नेमका डेटा कुठणं आला हे सांगू शकले नाहीत
गावोगावी जाऊन आम्ही डेटा तयार केला.
मोदींच्या सरकारला ३१ मेला आठ वर्षे पुर्ण होतील.
नव भारत निर्मितीची आठ वर्षे आहेत
संपुर्ण बहुमताने आलेलं सरकार, काय करू शकतो हे मोदीनी दाखवून दिलं
बोलेल तसे वागेल असे नेते बोटावर मोजण्या इतके आहेत
या आठवर्षामध्ये किती आरोप झाले टिका झाले
समर्थ भारत तयार करायचा असेल
मुठभर लोक एकत्र झाल्याने कोणी शक्तीशाली होत नाही
शक्ती देण्याचं काम मोदीजींनी केलं
आठ वर्षात मोदींजीनी कल्याणाचं काम केलं
गरिबाला वाटलं माझे पंतप्रधान आहेत असं वाटलं
ही माझीचं जबाबदारी
प्रत्येक गरज मुलभूत पुर्ण करण्याचं काम त्यांनी केलं
कालचं मी आकडेवारी आहेत
चार बिलियन डॉलरचं ते एक्पोर्ट आहे
हवेत झालेले एक्सपोर्ट नाही आहेत
सामान्य माणसाच्या लोकांच्या हाताला काम दिलं
देशात सगळीकडे भाव वाढ होत आहे
भारताने ठोस उपाययोजना केल्या
रशियाने आपल्याला ऑफर दिली
अमेरिकेने आपल्यावनरती दबाव आणलं
महागडं ऑईल आम्ही घेणार नाही
पेट्रोल डिझेलचे भाव वाढले म्हणून ओरडतो
देशात पेट्रोल डिझेलचे भाव दोनदा कमी केले.
कितीही टीका झाली तरी मोदींनी आपली दिशा बदलली नाही – देवेंद्र फडणवीस
केंद्राने दहा रूपयाने टॅक्स कमी केल्याने
महाराष्ट्रात टॅक्स कमी झाला
नाना पटोले, अजित पवारांना, उद्धव ठाकरे यांना माझा सवाल…१९ रूपये केंद्राचा टॅक्स २९ रूपये
महाराष्ट्र सरकारने टॅक्स कमी केले पाहिजेत
लोखंडाचे भाव वाढायला लागले आहेत.
तो कुस्तीच्या कार्यक्रमातला तो फोटो आहे
मनसे नेत्याचे आरोप बिनवुडाचे आहेत
पुढे त्याच्यात अधिक चौकशी करण गरजेचं आहे
असा आहे की, यावेळी हा विषय काढून महाराष्ट्रात वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मंदीर मशिद वाद काढून अस्थिर करण्याचा प्रयन्त केला जात आहे.
महागाई
महत्त्वाच्या विषयावर कोणालाही चर्चा करायची नाही
ईडी
आमचा पहिल्यापासून अभ्यास असा आहे की, ईडीला त्या तपासात काय सापडलं कुणासं ठाऊक…
ही मोठी गंभतीशीर गोष्ट आहे…कशाचा अर्थ कशाशीही पुरवला जात आहे
मंदा म्हात्रे यांचं पत्र मला प्राप्त झालं आहे.
पक्ष जो निर्णय घेईल मान्य असेल – संजय पवार
चढउतार आम्ही तीस वर्षे पाहिला आहे
संधी दिली तर आम्ही तयार आहोत लढायला
आम्हाला छत्रपतींच्या घराबाबत आदर आहे
राजेंकडून माझा अपमान व्हावा असं मला वाटतं नाही
साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश आहे.
खूप आनंद आहे, मिळत असेल तर काम करून दाखवायचं
मला बोलावलं तर नक्की भेटायला जाणार
अद्याप मातोश्रीकडून कोणताही निरोप नाही
मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे
मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील
मला पुर्ण विश्वास आहे, ते त्याप्रमाणे करतील
– हसन मुश्रीफवर कारवाईला सुरुवात झाली आहे, सोमय्यांची माहिती
– यशवंत जाधव यांच्या 53 इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत,
– विमल अग्रवाल आणि यतीन यशवंत जाधव यांनी पाटनरशिप केली
– यांच्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स
– अनिल परबच्या रिसॉर्टबाबत केंद्र सरकरने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे
– मी रत्नागिरीच्या एमएसइबीला पत्र दिलं आहे, रिसॉर्टचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करण्यासाठी
– रिसॉर्ट पाडण्याचे आदेश या आठवड्यात येणार
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवरती हल्ला
यतीन यशवंत जाधव मुलगा, याची दुसरी स्टोरी मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे
यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा उजवा हात आहे
समर्थने बद्रीकडून ऐशी कोटीचा आहे
घोटाळा काढला होता, त्यात पार्टनर कोण आहे…
पन्नास टक्के रश्मी उद्धव ठाकरे
पुण्यात हसन मुश्रीफ घोटाळ्याचा उल्लेख केला होता.
आता कारवाई सुरू झाली आहे.
– उद्धव ठाकरे, यशवंत जाधव तसेच श्रीधर पाटणकर आणि बुलेट फ्रुप जॅकेट कंपनीचे विमल अग्रवाल यांचे संबध सिद्ध झाले आहेत
– विमल अग्रवाल, श्रीधर पाटणकर आणि यशवंत जाधव यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची सोमय्या यांची मागणी,
– यासंदर्भातली कागदपत्रे आयकर विभाग, ईडीकडे सुपूर्द केली आहेत, यशवंत जाधव यांच्यावर कारवाइची मागणी
हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघात
लॉरी आणि खासगी बसची जोराची धडक
अपघातात ८ जण ठार,तर २६ जण गंभीर जखमी
मृतामध्ये कर्नाटकातील २ दोघांचा तर ६ जण कोल्हापूर,पुणे जिल्ह्यातील
जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार
किरीट सोमय्यांची आज पुण्यात पत्रकार परिषद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पार्टनर कुणाचे ?आज महाराष्ट्राला कळेल
किरीट सोमय्यांचा इशारा
आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोण आहेत ?हे महाराष्ट्रातील जनतेला सांगणार
थोड्या वेळात किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
शरद पवार देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत
मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे
पुण्यात तीन वर्षापूर्वी एक कुस्तीचा कार्यक्रम होता
माझ्या कामाला घेउन त्यांना अभिमान होता
जो हार पवार साहेबांसाठी यायचे ते माझ्या गळ्यात पडायचे
हो माझा आणि पवार साहेबांशी संबध आहेत
आजही शरद पवार मिळाले तर मी त्यांचा सन्मान करेल
राज यांनी त्यांच्याकडून शिकाव
पक्ष वेगळे असतात विचार वेगळे असतात
– पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची बनावट नियुक्तीपत्रे..
– बारामती, इंदापूर, दौंडमध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल..
– बनावट नियुक्तीपत्रांचा पुणे जिल्ह्यात सुळसुळाट…?
– बनावट नियुक्तीपत्र प्रकरणाबाबत दिवसेंदिवस वाढतेय उत्सुकता..
– आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यात खळबळ..
– बनावट नियुक्तीपत्रांमध्ये आरोग्य विभागातील वरीष्ठ अधिकारीच सहभागी असल्याची चर्चा..
औरंगाबाद शहरातील पती पत्नीच्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा
मुलानेच सावत्र आईच्या रागातून केला पित्याचा आणि सावत्र मातेचा खून
गुन्हे शाखेने लावला अवघ्या दोन तासात आरोपीचा शोध
देवेंद्र कलंत्री असं सावत्र आई आणि बापाचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव
पुंडलिक नगर परिसरात उघडकीस आली होती पती पत्नीच्या खुनाची घटना
पैश्यांच्या वादातून मुलानेच आई वडिलांचा खून केल्याचे झाले उघड
औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुली
सुरक्षा व्यवस्थेत कबर करण्यात आली खुली
परिस्थिती बिघडल्यामुळे पाच दिवसंकरता बंद करण्यात आली होती कबर
पाच दिवसानंतर पुन्हा उघडले औरंगजेब कबरीचे दरवाजे
नाशिक – थकबाकी भरा , अन्यथा वीज होणार खंडित
महावितरण विभागाचा थकबाकीदारांना निर्वाणीचा इशारा
नाशिकमशे झालेल्या आढावा बैठकीत महावितरण चा निर्णय
महावितरण ची ग्राहकांकडे मोठी थकबाकी
रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पच्या समर्थनर्थ आता भाजप मैदानात
रविवारी 29 मे रोजी प्रकल्प स्वागत मेळाव्याचे आयोजन
नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपचे शिष्टमंडळ घेणार केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट – प्रमोद जठार
राजापूर येते मेळाव्याचे आयोजन, माजी खासदार निलेश राणे राहणार उपस्थित
– रिक्षा भाडेवाढ तात्काळ करण्याची मागणी,
– सीएनजीच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे रिक्षा चालकांना आर्थिक फटका,
– त्यामुळे प्रशासनाने रिक्षा भाडे वाढ तत्काळ लागू करावी,
– रिक्षा पंचायतच्यावतीने प्रशासनाकडे मागणी,
– मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क,
– मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत माहिती घ्यावी,
– महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नायडू रुग्णालय सूचना,
– रुग्ण आढळलेच, तर त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार करण्यात येतील,
– सहायक साथरोग अधिकारी डॉ. संजीव वावरे यांची माहिती
– एसडीओच्या दालनात शेतकऱ्याने अंगावर घेतलं पेट्रोल
– नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील धक्कादायक घटना
– सागर काशीनाथ मंदरे या शेतकऱ्यांने अंगावर ओतले पेट्रोल
– वडीलोपार्जीत शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक २० आर जमिनीचा सातबारा मिळावा म्हणुन अंगावर ओतले पेट्रोल
– या मागणीसाठी स्थानिक कार्यालय ते मंत्रालयापर्यंत केला पाठपुरावा
– उमरेड पोलीसांनी सागर काशीनाथ मंदरे या शेतकऱ्याला केली अटक
– नागपूर जिल्ह्यातील ५०० ग्रामीण महिलांना मिळाल्या शेळ्या
– शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेतून शेळीवाटप
– मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या प्रयोगाचा शुभारंभ
– ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी शेळीपालनाची होणार मदत
– अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री येथे पार पडला कार्यक्रम
– नागपूर महानगरपालिका निवडणूकीचा आखाडा
– ३१ मे होणार आरक्षण सोडत
– १३ जून ला प्रभागानुसार अंतिम आरक्षण
– ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महानगरपालिका निवडणूक
– नागपूरात ५२ प्रभागात १५६ नगरसेवक असणार
– महिलांसाठी ७८ जागा असणार आरक्षित
– अनुसुचीत जातीसाठी ३१ तर अनुसुचीत जमातीसाठी १२ जागा राखीव
मनसे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त लेझर लाईटद्वारे शुभेच्छा दिल्या
अँकर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
23 मे च्या रात्री 12 वाजता शिवतीर्थाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना लेझर लाईटच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून अमित ठाकरे स्वतः रात्री शिवतीर्थाबाहेर आले आणि मनसे कार्यकर्त्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
ऐरोली दिवा सर्कलजवळ मालाने भरलेला ट्रक पलटी
पलटी झालेला ट्रक रिक्षावर पडल्याने रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे
ट्रकला बाजूला घेण्याचं काम वाहतूक पोलीस क्रेनच्या साह्याने करत आहेत
ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे
ट्रक चालक हा मद्यधुंद होता, असा अंदाज वर्तवला जात आहे