मुंबई : आज बुधवार 25 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद शहरात सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत तीन जणांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 71 वर्षीय शैलजा कुलकर्णी यांच्या अंगावरील साडे सहा तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची तक्राग पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. ही घटना उस्मानाबाद शहरातील बालाजी नगर येथे घडली आहे. सोने चोरणारी टोळी शहरात फिरत आहे अंगावर सोने घालून फिरू नका, तुमच्या अंगावरील दागिने आमच्याकडे द्या असे सांगत दागिने पळविले. उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शहरातील अनेक ठिकाणचे सीसीटिव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेत आहे.
NIA च्या आरोपा नंतर पटियाला कोर्टाचा मोठा निर्णय
दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप
यासीन मलिक काश्मीर मधील फुटीरतावादी नेता
आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये अनेक भागामध्ये बंद पुकारण्यात आला होता
काश्मीर मध्ये हिंदूंची हत्या केल्याचाही यासिन मलिक याच्यावर आरोप
यासिन मलिक याच्या शिक्षेच्या आधी श्रीनगर मध्ये जोरदार दगडफेक
मलिकच्या घराजवळ जोरदार तणाव
सुरक्षा दलाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
श्रीनगर मध्ये मोठा तणाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू दौरा आणि आषाढी वारी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि देहू, आळंदी देवस्थानचे पदाधिकारी यांच्यात बैठक सुरू
बैठकीला ग्रामीण पोलीस अधिकारी देखील उपस्थित
दोन जहाल नक्षलवाद्यांवर एकूण बारा लाखाचे बक्षीस असून अनेक गुन्ह्यांमध्ये होते हे नक्षलवादी सामील
रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत तर माधुरी उर्फ सुमन मटामी यांच्यावर 37 गुन्हे दाखल आहेत
खून, जाऴपोऴ, चकमक, भूसुरुंग स्फोट घडवणे अशा अनेक गुन्ह्यात हे दोन नक्षलवादी सामील होते
आज नक्षल चळवळीतून या दोन नक्षलवाद्यांनी शांततेच्या मार्ग निवडला
मलिकच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी
श्रीनगरमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात
शिवसेना नेते – खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल
राज्यसभा निवडणुकीसाठी संजय राऊत उद्या शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार
राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस येईल असे संकेत हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज खरे ठरताना पाहयला मिळत असून याचे शुभ संकेत गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत. आज दुपारी सुमारास जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊसाने वादळी वाऱ्यासह आगमन केले आहे. यंदा लवकर पाऊसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात सुध्दा आनंदचे वातावरण पसरले आहे.
फाशीची शिक्षा देण्याची NIA ची मागणी
यासिन मलिकला काय शिक्षा मिळणार?
टेरर फंडिंगसह यासिन मलिकवर अनेक आरोप
पटियाला कोर्टाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त
ओबीसी मोर्चात सहभागी नेत्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आझाद मैदानात त्यांना आणण्यात आलं…
– या ठिकाणी भाजप नेते प्रविण दरेकर, गोपीचंद पडळकर, योगेश टिळेकर यांनी मविआ सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलंय…
अमरावतीत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
अमरावती शहरात धुव्वाधार पाऊस
नागरिकांना उष्णतेपासून दिलासा
मनसे नेते आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा लवकरच राज्यव्यापी दौरा
मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना आता विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी करणार
विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी जिल्ह्यात जाऊन संवाद साधणार
सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मुद्दाम केंद्राला आरक्षणाच्या मुद्द्यात आणत आहेत.
पवार घराणं इतक्या दिवस काय झोपलं होतं काय ?
भाजपचा ओबीसी मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने रवाना
औरंगाबाद शहरात पोलिसांचे कंट्रोल राहिले नाही,
नशेखोरांचे प्रमाण वाढले, गुन्हेगारी वाढली असा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पोलिसांची बैठक घेतली. दररोज होणारे खून, कुरियर मार्गे येणाऱ्या तलवारी, गर्भपाताच्या गोळ्या, बटन नावाच्या गोळ्या यामुळे औरंगाबाद शहरात गुन्हेगारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये काफी कशाला हवे आहेत?, महिला सुरक्षा साठी दामिनी पथक कुठे आहे? असा प्रश्नही शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला. शहरातल्या गुन्हेगारीवर वचक ठेवावा अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.
नागपूर ब्रेकिंग –
भाजप युवा मोर्चा ने केलं राज्य सरकार विरोधात आंदोलन
केंद्र सरकार ने पेट्रोल डीझल चे दर कमी केले
मात्र राज्य सरकार वॅट कमी करत नाही या विरोधात केलं आंदोलन
जोरदार घोषणाबाजी करत केलं आंदोलन
उल्हासनगरात रस्त्यावर ऑइल सांडल्यानं अपघात
कॅम्प ४ ओटी चौकात ऑइल सांडल्याने अपघात
दुचाकीवरून जाणारे चार जण घसरून पडले
ऑइल घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधून रस्त्यावर सांडलं ऑइल
अग्निशमन दलाने संपूर्ण रस्ता धुतला
वसंत मोरेंनी घेतलेल्या भूमिकेचं सरहल संस्थेच्या अध्यक्षांनी केलं कौतुक
वसंत मोरेंना लिहीलं पत्र पत्र लिहून मानले आभार
सरदार मोठा झाला तर राजा मोठा होतो.
मात्र राजा मोठा आहे म्हणून सरदार मोठे होतातचं असं नाही याची खात्री मला पटतीये
तुमच्यासारखे कर्तुत्ववान सरदार हीच पक्षाची ,समाजाची शक्ती आहे
तुमच्यासारखे सरदार दूखावले जाऊ नयै त्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे
राजाने, समाजाने, आणि देशाने राखला पाहिजे
तुमचं कर्तृत्व उजळत राहो हीच सदिच्छा
वसंत मोरेंची भेट न घेताचं राज ठाकरे मुंबईकडे गेले त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं
मात्र वसंत मोरेंना लिहीलेलं संजय नहार यांच पत्र मोरेंनी सोशल मीडीयावर शेअर केलंय.
यामध्ये संजय नहार यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरे यांचे कान टोचलेत
सिंधुदुर्ग—- मालवण -तारकर्ली बोट दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सात जणांना अटक.तारकर्ली येथे काल पर्यटक बोट समुद्रात पलटी होऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी बोट मालकासह सात जणांवर ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.यात बोट मालक,चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांचा समावेश आहे.
मराठा समन्वयकांचा सर्वच राजकीय पक्षांना थेट इशारा
अपक्ष उमेदवारीला विरोध करू नका आणि राजकीय बेडीत अडकवू नका
अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवणार
अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा
200 मतदारसंघाचा आम्ही सर्व्हे केलाय कोणाचा कळस कसा फिरवायचा हे आम्हाला माहिती आहे
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही
अपक्षच निवडणूक लढवा मराठा समन्वयकांची भूमिका
वाढत्या सस्पेंसवरून मराठा समन्वयकांनी मौन सोडल
थेट इशारा !
खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्याच्या लेह-लडाख मधील भेटीवर अमरावतीतील शिवसैनिकांची नाराजी..?
शिवसेनेचे सहकारसेना जिल्हा प्रमुख गोपाल राणे यांनी शिवसेनेच्या फलकावर मजकुर लिहून केली नाराजी व्यक्त….
अशा भेटीमूळे शिवसैनीकांचे खच्चीकरण होत असल्याची केली भावना व्यक्त….
शिवसेनेच्या या फलकाची अमरावती शहरात जोरदार चर्चा….
आम्ही राणांच्या घरासमोर उन्हात आंदोलन करायचं आणि नेते तिकडे एकत्र येतात शिवसैनिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी……
– संभाजी राजे यांच्या उमेदवारी बाबात ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी हा विषय सुरु केला. आणि त्यानंतर हा विषय वेगळ्या दिशेनं गेला. कदाचित संभाजी राजे यांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. पण हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर मी बेलण्याचं कारण नाही
( यशवंत जाधव यांना ईडी नोटीस )
– मला कल्पना नाही
– सर्वात आधी पवार साहेबांनी याचं उत्तर द्यायला हवं की, पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर २९ रुपये आणि केंद्राचा कर १९ रुपये. राज्याचा कर का कमी करत नाही. महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहेत. २९ रुपये कर पेट्रोल डिझेलवर लावून हे लोक महागाईवर बोलू कशे शकतात. याचं मला आश्चर्य वाटतंय
त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे
सगळ्यात आदी पवार साहेबांनी पेट्रोल डिझेलवरती बोलावं
इतका कर का लावला आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांनी ओबीसी लोकांना फसवले असल्यामुळे ते आज भाजपच्या कार्यालयात आले आहेत. लोकांना देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हवं आहे. पवार साहेबांनी लोकांना फसवलं आहे, महाविकास आघाडीच्या हातात सरकार आहे. त्याच्या पक्षातले काही लोक रस्त्यावर उतरले आहेत.
राणा दापत्त्याची शिवसेने विरुद्ध तक्रार
सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती
मुंबईमधील अटक आणि अन्याय झाल्याबाबत तक्रार
झालेली घटना दोन्ही तपास यंत्रणांना राणा दाम्पत्याने सांगितली
सीबीआय , ईडी, नेमकं काय करणार याची जोरदार चर्चा
उस्मानाबादकरांचा आगामी 30 वर्षाचा 2052 पर्यंतचा पाणी प्रश्न मिटला
उजनी धरणातून पाणी आरक्षण व समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर
उजनी धरणातून 20 दलघमी पाणी आरक्षण व 300 कोटींच्या समांतर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी
दुष्काळ व उस्मानाबाद शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नियोजन
योजनेमुळे नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करणे शक्य होणार
प्रती माणसी दररोज 135 लिटर इतके पाणी मिळणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी दिली
२८ मे रोजी नागपूरात खा. नवनित राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार
– खा. नवनित राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस नागपूरात राष्ट्रवादीचं महागाईने विरोधात आंदोलन
– नवनित राणा हनुमान चालीसा पठन करणार त्याच रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादीचं आंदोलन
– राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार महागाईचं संकट जावं म्हणून करणार हनुमान चालीसा पठण
– एकाच मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनित राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठन
बारामती : ओबीसी मोर्चाने पुकारलेल्या बारामतीत प्रतिसाद..
– बारामती शहर आणि तालुक्यात बंद..
– बारामती शहरातील बाजारपेठ राहणार ११ वाजेपर्यंत बंद..
– भारत बंदमध्ये बारामतीतील व्यापारी आणि दुकानदारांचाही सहभाग..
– बारामतीतील विविध संघटना बंदमध्ये सहभागी..
राज ठाकरे हे स्वतः जाळ्यात फसले आहेत
आम्ही कुठलही जाळ तयार केलं नाही
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा प्रशंसा
ब्रिज भूषण सिंह यांनी केली प्रशंसा
गुजरात मध्ये उत्तर भारतीयांना विरोध झाला मात्र अभियान चालवले गेले नाही
राज ठाकरे यांनी मात्र अभियान चालवले
राज ठाकरे यांनी माफी मागावी त्यांना अयोध्येत यायला देऊ
चंद्रपूर : प्रियकराने प्रेयसीवर केला चाकू हल्ला…
हल्ल्यानंतर प्रियकराने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा केला प्रयत्न,
जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावरील काल दुपारची घटना,
सुदैवाने मुलीच्या मानेवर चाकूचा हलका वार बसल्याने मुलगी सुरक्षित,
गडचांदूर येथे दोघांवर ही कऱण्यात आले प्राथमिक उपचार,
त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपुरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कऱण्यात आले दोघांना दाखल,
दोघेही गडचांदूर चे राहणारे असून काल दुपारी माणिकगड वर गेले होते फिरायला,
लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती,
२१ वर्षीय आरोपी अजय कांबळे वर ३०७ (खुनाचा प्रयत्न) आणि ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) कालमानव्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे,
हल्ल्यात जखमी झालेली मुलगी २० वर्षांची आहे
राज्यसभेच्या 57 जागांसाठी भाजपची जोरदार तयारी
15 राज्यातील 57 जागांसाठी भाजप उमेदवार देणार
महाराष्ट्रातील 2 जागांसह तिसरी जागाही भाजप लढणार
काल रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पार पडली बैठक
तिसऱ्या जागेबाबत अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस घेणार
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा आदेश
संभाजी राजे छत्रपती अपक्ष उभे राहील्यास पाठिंबा द्यायचा की नाही निर्णय फडणवीस यांनी घ्यावा वरिष्ठ नेत्यांचा आदेश , सूत्रांची माहिती
देशभरातील 57 जागांसाठी येत्या 2 दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पुन्हा एकदा होणार बैठक
अंबरनाथमध्ये मध्यरात्री कारचा भीषण अपघात
लोकनगरी बायपास रस्त्यावर रात्री ३ च्या सुमारास अपघात
एर्टीगा कार डिव्हायडरला धडकून उलटल्यानं कारचा चक्काचूर
अपघातात कारमधील एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्यानं मुंबईला हलवलं
45 महाविद्यालयांवर धोक्याची घंटा..
शैक्षणिक सुविधा नसलेल्या 45 महाविद्यालयांना दिली नो ग्रेड ची शिक्षा..
विद्यापीठ प्रशासन 45 महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द करण्याची शक्यता..
45 महाविद्यालयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक सुविधा दिली जाणार ,अन्यथा होणार कठोर कारवाई..
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मूल्यांकन वाढवण्यासाठी हाती घेतली मोहीम..
कांद्याला औरंगाबादेत फक्त 55 पैसे प्रतिकिलो भाव..
कांद्याचे भाव घसरले,कांद्याला सर्वात कमी 55 पैसे प्रति किलो भाव..
नाफेडचे यावर नियंत्रण नसून उपाय योजना नसल्याने शेतकरी हवालदिल..
एकाच वेळी जास्त प्रमाणात कांदा विक्रीस आनल्याने कांद्याचे ढासळले भाव..
शेतकऱ्यांच्या या अवस्थेकडे जिल्हा प्रशासन आणि शासनाने पाहण्याची गरज..
पुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची झाली वाढ
क्रेडाईनं केलेल्या सर्वेक्षणात माहिती आली.समोर
जानेवारी ते मार्च या कालावधीत तीन टक्क्यांची झाली वाढ
आगामी सहा ते न ऊ महिन्यांमध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता क्रेडाईनं व्यक्त केलीये
क्रेडाईनं कॉलीअर्स अँण्ड फोरम या संस्थेच्या सोबत सर्वेक्षणाचं काम केलंय
देशातील 8 शहरात 5 ते 6 टक्क्याची वाढ झाल्याचं क्रेडाईचं म्हणणं आहे
आज दिवसभर अमरावती-बडनेरा शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद….
सिंभोरा हेडवर्क्स येथे महावितरनमार्फत विद्युत फिडरचे मान्सूनपूर्ण देखभाल कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद…
देखभाल व दुरुस्तीचे कामे नेहमीच होत असल्याने नागरिक त्रस्त..
सायंकाळी अल्प प्रमाणात होऊ शकतो पाणीपुरवठा
केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून वेळेवर दाखल होईल का ? याबाबत साशंकता
नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावल्यानं हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता धूसर
27 मे ला केरळात तर 5जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती
मात्र आता मोसमी पावसाचा वेग कमी झालाय त्यात प्रगती होत नसल्यानं मान्सून वेळेत दाखल होईल का ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे …
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचं खेड तालुक्यात काम थांबलं
संरक्षण विभागानं आपल्या जागेतून जात असलेल्या प्रकल्पावर घेतला आक्षेप
54 गावांमधून हा प्रकल्प जातोय त्यापैकी 40 गावाचं जमीन मोजणी पुर्ण झाली आहे
सध्या संरक्षण विभागानं आक्षेप घेतल्याने हे काम थांबवण्यात आलंय
18 बोगदे, 41 उड्डाणपूल,128 भुयारी मार्ग आहेत रेल्वेचा दूहेरी मार्ग असणार आहे
पुणे जिल्ह्यातून प्रकल्पासाठी आता 26 खरेदीखत झालेत
मात्र खेड तालुक्यात काम थांबलं आहे …
पुण्यात महापालिकेकडून मंकीपॉक्सच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता उपाययोजना करायला सुरुवात
नायडू रुग्णालयात वार्ड केला राखीव
13 देशांमध्ये होत असलेल्या प्रसारावरून महापालिका सतर
रुग्णालयात वार्ड केला राखीव अजून तरी पुण्यात संशयित रुग्ण आढळलेला नाही मात्र महापालिका सतर्क झालीये…