मुंबई : आज गुरूवार 26 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मालेगावातील लोणवाडे शिवारात कांदा चाळीत युरियामिश्रीत पाणी टाकल्याची घटना नुतीच उजेडात आली आहे. हा प्रकार कुणीतरी जाणूनबुजून केला आहे. त्यामुळे कष्टाने पिकविले लाल सोनं वैराने हिरावले अशी मालेगावात चर्चा आहे.
समुद्रात सांडपाणी जात असेल तर त्याच पैशाचा हिशोब आला कुठून
हे सर्व कोर्टात स्पष्ट होईल
मला सर्व कायदा महिती आहे
कायद्याने काय होईल ते बघू
विरोधकांनी केले दावे खोटे आहेत
या पेरलेल्या बातम्या आहेत
आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर आणि माझ्याशी संबंधित लोकांवर छापेमारी केली आहे
गेल्या अनेक दिवसांपासू आशा बातम्या समोर येत होत्या
यामागचा गुन्हा हे तपासल्यावर हे लक्षात आलं दापोली येथील साई रिसॉर्ट, याचे मालक सदानंद कमद आहेत. त्यांनी त्यांची मालकी सांगितली आहे. त्यांनी खर्चाचा हिशोब दिला आहे.
काही दिवसांपूर्वी इनकम टॅक्सची रेड झाली आहे
हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालं नाही
तरी सांडपाणी समुद्रात जातं असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्यानं दाखल केला
याबाबात सर्वांनी रिपोर्ट बंद असल्याचे रिपोर्ट दिले आहेत
तरीही माझ्यावर तक्रार दाखल केली आणि आज माझ्यावर छापे मारले
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत
मी उत्तरं द्याला बांधिल आहे.
आधीही उत्तरं दिली होती, आजही दिली आहेत
याच्यापुढेही प्रश्न विचारले तरी उत्तरं देण्याची माझी तयारी आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा 7 ठिकाणी आज सकाळ पासून ED च्या धाडी सुरू आहे, मंत्री अनिल परब यांचा निकटवर्तीय मानले जाणारे अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक संजय कदम यांच्या घरी सकाळी सात वाजेपासून ED अधिकाऱ्यांकडून तब्बल 12 तासापासून रेड सुरू आहे, ED च्या रेडची माहिती मिळताच संजय कदम यांच्या घरा खाली मोठा संख्यामध्ये शिवसैनिक जमा झाले आहेत, शिवसैनिक हाता मध्ये काळी पट्टी बांधून केंद्र सरकारच्या आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे,
– ईडीची कारवाई म्हणजे एक प्रकारचे दबावतंत्र.
लोकशाहीला घातक आहे.
सुडापोटी कारवाई योग्य नाही. सत्ता येते व जाते.
यापूर्वी अनिल परब यांची चौकशी झाली आहे
– बीएमसी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारवाई करणे उचित नाही.
राजकारणासाठी अशी कारवाई ही लोकशाहीचा गळा घोटणारी. झालेली कारवाई ही दुर्देवी
– सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान.
– सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील
– मुंबई महापालिका अशा कारवाया करून जिंकून येणार नाहीत.
मुख्यमंत्र्यांवर असा दबाव नाही येणार
मोदींनी मसनात जा, शहांनी मसनात जा,
वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या.
शिवसेना नेते संजय कदम यांच्या घराबाहेर शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ उभे आहेत.
ईडीचे पथक शिवसेना नेते आणि अनिल परब यांचे जवळचे मित्र संजय कदम यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्या घरी चौकशी सुरू आहे.
आणि इमारतीच्या खाली शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत.
पुण्यात बॅनरबाजी करून चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध
पुण्यात पाषाण सुस रस्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने लावले बॅनर
एका महिलेचा मतदार संघ चोरून आमदार झालेल्या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? असा सवाल या बॅनरमधून उपस्थित करण्यात आलाय
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप नेते चंद्रकांत पाटलांविरुद्ध आंदोलन, प्रतिमेला घातला चप्पलांचा हार
चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा नोंदवला निषेध
आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन
आंदोलनामुळे आकाशवाणी चौकात वाहतुकीची झाली कोंडी
चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी मागण्याची केली मागणी
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद निमंत्रित केलेली आहे. तरी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, ही विनंती !
स्थळ : मुंबई मराठी पत्रकार भवन, मुंबई
वेळ : शुक्रवार, दि. २७/०५/२०२२
ठीक स. ११ वा.
रत्नागिरी- केंद्रीय पर्यावरण विभागाने मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणातील दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी पुढे
सुनावणी होणार 20 जून रोजी
केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली न्यायालयात दाखल केलाय खटला
पालकमंत्री अनिल परब यांच्यासह तिघाविरोधात खटला
केंद्रीय पर्यावरण विभागाने crz कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल आहे खटला
चीनचा विस्तारवाद भारताच्या हिताचा नाही
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबतचे भारताचे संबंध संरक्षणाच्या पलीकडे जाऊन विकास निर्माण करणाऱ्या आर्थिक करारांच्या दिशेने गेले पाहिजेत
चीनचा सामना करण्यासाठी पर्यायी जागतिक दृष्टीकोन तयार करण्याची संधी भारताकडे
सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागायला हवी
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशातील सगळ्या महिलांचा अपमान झाला आहे.
भाजपकडून महिलवेर खालच्या पातळीवर नेहमी टीका केली जातेय
संजय राऊत जेव्हा बोलतात, तेव्हा महाराष्ट्र बरोबरच दिल्ली भाजप ला देखील त्रास होतो.
त्यामुळेच भाजपची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रावरती इडीचे विशेष प्रेम आहे
इडीच्या कारवाया करून देखील सरकार पडत नाही उलट मजबूतीने सरकार चालवले जात आहे
अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल
आयटी विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर
शिवकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
मी स्वतः आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री, पवारसाहेब, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे सर्व खासदार, आमदार ही उपस्थित होता आणि मी खात्रीने सांगतो, की शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार हे राज्यसभेवर जातील.
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे सोमवारी अर्ज भरणार आहेत.
महाविकास आघाडी एकत्र आहे आणि एक आहे.
आम्ही सगळे सहा जागांपैकी आमच्या ज्या चार जागा आहेत, त्या निवडणून आणू
ईडी, सीबीआय दबाव टाकून जर जागा जिंकता येणार असतील, तर त्यांनी प्रयत्न करावेत
शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही
पण एक दिवस हा काळ निघून जाईल आणि सूत्र आमच्या हातात असतील
किरीट सोमय्या यांचे पत्रकार परिषदेतून अनिल परब यांच्यावर टीका
परबांनी बांधलेला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिला
चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सांगितलं की अनिल परबांना जी मुदत दिलेली होती, ती 2 मे 2022 ला संपली आहे
आता रिसॉर्टचं वीजपाणी बंद केलं पाहिजे
ज्या धाडी टाकल्या आहेत, त्या माझ्या तक्रारींच्या आधारे टाकल्याचं दिसतंय
सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले, 25 कोटी ब्लॅक आणि सात कोटी व्हाईट, हे अनिल परबांनी दाखवलेले नाहीत
सदानंद कदम आणि अनिल कदमांच्या सीएनेच याबाबत माहिती दिली आहे
इलेक्ट्रीक मीटर अनिल परबांच्या नावे आहे, बिलही तेच भरत आहे
प्रॉपर्टी टॅक्सही तेच भरत आहेत
25 कोटीची प्रॉपर्टी असं ते सांगतात, पण त्यांनी याची माहिती कुठे दिलेली नाही
अनिल परबांचा रिसॉर्ट पुढे बेनामी असल्याचं घोषित केलं जाणार
काळ्या पैशाची चौकशी इनकम टॅक्सने केलं पाहिजे
अनिल परबांनी खोट्या पद्धतीनं कागरपत्र मिळवले
वेगवेगळे गुन्हे अनिल परबांनी केलेले आहेत
त्यांना अटक व्हायलाच हवी, किरीट सोमय्यांची मागणी
अनिल परबांवर फौजदारी प्रक्रिया व्हायला हवी आणि होणार
कोल्हापुरात शिवसैनिकांची निदर्शनं
ईडीने केलेल्या कारवाईवरुन शिवसैनिक आक्रमक
कोल्हापुरात भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
कोल्हापुरात शिवसैनिकांची रस्त्यावर उतरून घोषणाबाजी
केंद्रतील भाजप सरकारवर हल्लाबोल
ताराराणी चौकात शिवसैनिकांची घोषणाबाजी
राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्तावाखाली आंदोलन
अनिल परब विभागप्रमुख आहे, शिवसेनेचे नेते आहे.
ते तपासाला पूर्ण सहकार्य़ करतील
जे काय आज महाराष्ट्र आणि मुंबईत चाललंय, जिथं जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं तिथं काय सुरु आहे, हे जनता पाहतेय.
सरकारी यंत्रणाला मदत केली पाहिजे आणि अनिल परब ती करत आहेत
किशोरी पेडणेकर यांची अनिल परबांच्या घरी झालेल्या ईडी छापेमावर पहिली प्रतिक्रिया
अनिल परबांच्या कामाचा दबदबा दिसतच राहिल
कोणाच्या पत्रात कुणाचं नाव आणि सरकार, कोर्ट या सगळ्याकडे कसं पाहतं
बऱ्याच जणांसोबत काम करताना अनेकांशी बोलणं होतंच, याचा अर्थ आरोप सगळे खरे आहेत, हे समोर येईल
आम्हाला ईडी वगैरे काही माहिती नाही, आताआता कळायला लागलंय..
जास्तीत जास्त आम्हाला इनकम टॅक्स माहिती होतं, त्यामुळे जे आहे त्याला सामोरं जाणार
माझ्याही नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीची कारवाई केली होती
तपास पारदर्शी होत असेल, तर कुणाची ना नाही.
कुणानंतर कुणाचा नंबर लागणार, याचे सूतोवाच काहींनी वर्तवले होते
कायद्यानं तपासाचा अधिकार दिलेला आहे, फक्त त्याचा गैरवापर होऊ नये, एवढी माफक अपेक्षा सगळ्यांची असते
विभास साठे यांची कसून चौकशी
विभास साठेंच्या कोथरुडमधील दोन्ही निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचले
दापोलीतील रिसॉर्टची जमीन अनिल परबांनी विभास साठेंकडून खरेदी केली होती
विभास साठेंच्या चौकशीतून काय समोर येणार, याकडे लक्ष
भाजपकडून सातत्याने सत्तेचा गैरवापर सुरू आहे, महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम बंगाल असेल या राज्यात सातत्याने ईडीच्या रेड टाकल्या जातात, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांना त्रास देणं सुरू आहे, पण अशाने काही होणार नाही शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेला किमान पाच लाख लोक उपस्थित राहणार आहेत, औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर झालेलं आहे, येणाऱ्या सभेत मुख्यमंत्री संभाजीनगर बद्दल काय बोलतील त्याबद्दल कल्पना नाही पण आमच्या दृष्टीने संभाजीनगर नाव झालेलं आहे.
चार महत्त्वाची नावं आहेत
विभाग साठेकडून अनिल परबांनी मे 2017 मध्ये घेतली
एग्रीमेन्ट 2019 मध्ये
ठाकरे सरकार आलं आणि त्यानंतर सीआरझेडमध्येही बांधकाम
सीआरझेड नाही, गावरस्ता आहे, असं म्हटलंय.
सीए सदानंद कदमने सांगितलं की सव्वा सात कोटीचं काम झाल्याचं सर्टिफिकेट दिलं
सव्वा सात कोटी कॅशमध्ये खर्च झाले
हे बजरंग खरमाटेचे पैसे आहेत की सचिन वाझेचे? हा तर क्राईम मनी..
आता नंबर सदानंद कदमचा लागणार..
अनिल परबचा साथीदार आहे कदम आहे..जो अनिल परबांचा केबल बिझनेसमध्ये पार्टनर आहे, याच्या घरात कोट्यवधी रुपये आढळलेत
अनिल परबांच्या रिसोर्टवर कारवाई करण्याची परवानगी आदित्य ठाकरेंनी मागितली, त्यावर कारवाई करण्यासाठी हिरवा कंदील उद्धव ठाकरेंनी दिला
अनिल परब आता जेलमध्ये जाणार, किरीट सोमय्या यांचा घणाघात
ठाकरे सरकारनंतर ठाकरे परिवार
या सगळ्याेच धागेदोरे ठाकरे परिवारापर्यंत जात असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
विभास साठे आणि अनिल परब यांच्यात जमिनीचा व्यवहार झाल्याची ईडीची माहिती
विभास साठे अनिल परब यांचा निकटवर्तीय
पुण्यात येथे कोथरूड मध्ये विभास साठे यांच्या घरावरही छापेमारी
विभास साठेंच्या घरावर छापा
दापोलीतील जमीन विभास साठे यांच्याकडून अनिल परबांनी खरेदी केली होती
1 कोटी 10 लाख रुपयांचा व्यवहार झाला असल्याची माहिती
अनिल परब आमचे सहकारी
कडवट शिवसैनिक आहेत
कॅबिनेट मंत्री आहे
ही कारवाई राजकीय सूडबुद्धीनं सुरु आहे
ज्याप्रकारचे आरोप ईडीकडून लावले जात आहेत, त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हा भाजपच्या लोकांवर आहेत, पण त्यांना कुणी हात लावत नाही..
आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत
सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही
अशा कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय, राऊतांचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकं वाईट वळत कधीच मिळालं नव्हतं
सबळ पुरावे असणाऱ्यांनी जीतू नवलानीला कुणी पळवलं, याचंही उत्तर द्यावं
सरकारला त्रास देण्यासाठीच या कारवाया सुरु आहेत
फक्त शिवसेनाला त्रास द्यायचा आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारवाया करायच्या, असे प्रयत्न सुरु आहेत
मी केलेल्या आरोपांवर आणि दाखल केलेल्या तक्रारींवर अद्याप उत्तर येत नाही
ईडीकडे आम्ही अनेक प्रकरणं पाठवली आहेत, पण ती फाईल उघण्याची तसदीही कुणी घेत नाही, आम्ही पाहून घेऊ…
ईडीची छापेवारी
अनिल परबांशी संबंधित व्यक्तींवर आणि मालमत्तांवर ईडीची छापेमारी
शिवालय बंगल्यावरही ईडीचे अधिकारी
अनिल परबही शिवालय बंगल्यात दाखल
अनिल परब यांना अटक होणार का? यावरुन चर्चांना उधाण
यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवण्याच्या तयारीत, मुलाची चौकशी
दुबईतील सिनर्जी व्हेंचर्स कंपनीविरोधात चौकशी
यशवंत जाधव यांच्या मुलाचा जवाब नोंदवला
त्याचबरोबर यशवंत जाधवांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे, परंतु यशवंत जाधव गैरहजर राहिल्याची माहिती मिळाली आहे
यशवंत जाधव यांच्या दोन्ही मुलांविरोधात फेमा कायद्यांतर्गत जबाब नोंदवला आहे.
नाशिक – महापालिका घनकचरा विभागातर्फे 10 लाख 20 हजारांचा दंड वसूल
– मागील आर्थिक वर्षात सुमारे 193 कारवाया
– प्लास्टिक मुक्ती साठी घनकचरा विभागाच्या दंडात्मक कारवाया
– प्लास्टिक मुक्ति सह गोदावरी स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी महापालिकेचा उपक्रम
अमरावती जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वीच नाफेडची हरबरा खरेदी बंद…
शासनाने हरबरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टलही बंद…
शेतकरी वाऱ्यावर,ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हरबऱ्याची खरेदी केव्हा होणार…..
खाजगी बाजारपेठ पेक्षा नाफेड मध्ये हरभऱ्याला मिळत होते जास्त भाव…
खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येलाच शेतकऱ्यांना मोठा झटका.
नाशिक – पीओपी च्या मूर्तींबाबत मनपा आयुक्तांच्या सूचना
पीओपी च्या मूर्तींची विक्री,साठवणूक,आयात करणाऱ्यांवर होणार थेट कारवाई
गोदावरीत होणार प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी मूर्तींवर यंदा बंदी
सूचनांच्या काटेकोर पालनाचे आयुक्तांचे आदेश
अंधश्रद्धा निर्मूलन कडून आयुक्तच्या आदेशाचे स्वागत,
तर मूर्तिकारांकडून मात्र निर्णयाचा विरोध
रत्नागिरी- फ्रान्समधील तज्ञांच्या पथकाचा जैतापूरचा आजचा दौरा रद्द
जैतापूर अणउर्जा प्रकल्पाची आज हे पथक करणार होते पहाणी
दौरा रद्द झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांती माहिती
अणुउर्जा प्रकल्पासोबत सहयोगी म्हणुन काम करणारी हि टिम
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी रिअँक्टर उभारणी संदर्भात फ्रान्सच्या तज्ञांचा आज होणार होती पहाणी
शिष्ठमंडळाच्या नवीन दौ-याची तारिख अद्याप निश्चित नाही
हजारो औरंगाबाद शहर पोलीस दलातील कर्मचार्यांच्या अंतर्गत बदल्या..
शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई पदावरील एक हजारांवर कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे आदेश..
काही बदल्या प्रशासकीय कारणास्तव तर काही बदल्या विनंती स्वरूपाच्या..
कामात निष्काळजीपणा करणाऱ्या बारा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव मुख्यालयात बदली..
पोलीस आयुक्त निखिल गुप्तांनी केल्या बदल्या..
औरंगाबाद विभागाच्या दहावी बारावीच्या निकालाचा मार्ग झाला मोकळा..
दहावी बारावीच्या शंभर टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी झाली पूर्ण..
औरंगाबाद विभागातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे 100% संकलन पूर्ण..
संकटांचा सामना केल्यानंतर वेळेत दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याचा मार्ग मोकळा..
पेपर तपासणी मध्ये मागे पडलेले औरंगाबाद मात्र निकालात मागे पडणार नाही अशी माहिती..
नाशिक – नामांकित मोतीवला कॉलेजचचे अतिक्रमित बांधकाम हटवले
कॉलेज आवारातील चार शेड अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून जमीनदोस्त
राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई केल्याचा मोतीवाला कॉलेज चा आरोप
स्वताहून अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देऊन देखील मनपा कडून कारवाई झाल्याचा आरोप
मानामडचा कांदा चक्क व्हिएतनामला..
निर्यात केल्याने शेतकरी समूहाला व्यापाराची नवी संधी..
मनमाडमधून दोन कंटेनर कांदा निर्यात..