मुंबई : आज सोमवार 30 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. बारामती तालुक्यातील सुपे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील ट्रक हॉटेलमध्ये घुसला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकने तिघांना चिरडले असून दोन पुरुष एका महिलेचा समावेश आहे. मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ट्रक हॉटेलमध्ये घुसला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना सुपे ग्रामीण रुग्णालयासह केडगावच्या खासगी रुग्णालयात केले दाखल आहे.
मी प्रप्रधान यांच्याबाबत बोलले ते अयोग्यच, पण जे तुमचे नेते बोलत आहेत त्याच काय?
माझ्यावर केस करण्याबरोबरच तुमच्या नेत्यांवर ही करा
शिवसेना कोणालाही अंगावर घ्यायाला तयार आहे
सेना भवनावर हवं असेल तर चंद्रकांत पाटील, सोम्मयांना पाठवा
ठाकरे सरकार घालवायचं आहे भाजपला, त्यासाठी राज्यात विकासात्मक बोला
माझ्यावर केस करण्याआधी आधी तुमच्या घरात बघा असा हल्ला
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरेंचा समाचार घेत म्हणाल्या, कोण आहे ही उमा खापरे
भाजप नेत्यांचे नको ते राजकारण सुरू आहे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन
अज्ञाताने राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफीसमध्ये फोन करून दिली धमकी, म्हणाली पुढील 24 तासात जीवे मारू
राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाला धमकीचा फोन आल्याची माहिती
धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही
धमकीचा हा तिसरा फोन
मला वरच्या वरच्या नगरला यायला जमत नाही म्हणून तर मी पालकमंत्रीपद नको म्हणून सांगितले होते
पण मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे
संभाजीराजे छत्रपती यांच्या जागेबाबत शिवसेनेने निर्णय घ्यायचा होता. तो प्रश्न शिवसेनेचा होता
जिल्हा नियोजनच्या निधीत शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा खासदार कीर्तिकर यांनी केला होता आरोप, ते आरोप फेटाळले.
ठोस पुरावे असतील तर शिक्षा झाली पाहिजे मात्र तसं होताना दिसून येत नाही
हुकूमशाही पद्धतीकडे देश चालला आहे
काँग्रेस ने नेतृत्व केलं पाहिजे
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर येणाऱ्या निवडणुकांची वाट पहावी लागेल
भाजपला टक्कर देण्यासाठी सगळ्या पक्षानी एकत्रित येण्याची गरज आहे
मोदी विरोधक समविचारी पक्षानी आघाडी करून 2024 च्या निवडणूक लढल्या पाहिजे
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचपीरवाडी गावातली घटना
उन्हामुळे पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा मृत्यू
स्वप्नील काळे आणि सोहेल काळे असं बुडून मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावे
पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्यानंतप भाजप आक्रमक
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरेंचा इशारा
दिपाली सय्यदवर कारवाई करा, अन्यथा सेना भवनावर मोर्चा काढू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहले पत्र
जिल्हा सहकारी बँका आणि शेतकऱ्यांची मोठी अडचण होण्याची शक्यता
उष्म्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना दिलासा
वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
पावसाचा परिणाम मेट्रोवर मेट्रोची वाहतूक मंदावली
गुडगाव आणि लखनऊ जाणाऱ्या हायवे वरचीही वाहतूक मंदावली
धालेवाडीत विसावा आणि महाप्रसादानंतर पालखी सोहळा जाणार मल्हारगडावर
धालेवाडी गावात पालखी विसाव्याची परंपरा
सोमवतीनिमित्त महाप्रसादाचंही केलं जातं आयोजन
स्वामी गोविंदानंद यांच्या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली
मात्र उद्या सकाळी ठरलेली शास्त्रार्थ सभा होणार
शहरात 144 लागू असल्याने शोभायात्रेला परवानगी नाकारली
वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत निर्णय
चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीने पैसे घेतल्याचा आरोप केल्यानंतर वंचित आक्रमक
चंद्रकांत खैरे यांच्या मच्छली खडक येथील घरी करणार निदर्शने
कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करत मिळवले घवघवीत यश
आयसिटीमध्ये केमिकल इंजिनिअर झाल्यावर लागलेली नौकरी सोडून राष्ट्र सेवेत वाहून घेण्याचा घेतला होता ध्यास
अनय नावंदरने बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरात घेतले त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यात घेतले
रेल्वे रुळात पाय अडकल्यामुळे महिला पडली होती रुळावर
रेल्वे चालकाने तातडीने रेल्वे थांबवत वाचवले महिलेचे प्राण
प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे थांबवली अवघ्या 20 सेकंदात, बलांबल वाचले महिलेचे प्राण
नेपाळमधील विमान दुर्घटनेत चार भारतीयांचा समावेश
मृतक हे ठाण्याचे
यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर हे विभक्त दाम्पत्य, तर धनुष आणि रितिका या त्यांच्या मुलांचा समावेश
तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहरातील संपूर्ण भागातील पाणीपुरवठा गुरुवारी 2 जूनला राहणार बंद
तर शुक्रवारी 3 जूनला कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली माहिती
वसई:-वसईत खदाणीत एक तरुण बुडाला आहे. वसईच्या भोयदापाडा परिसरात काल सायंकाळी च्या सुमारास ची ही घटना आहे. आज या घटनेला 12 तासांचा कालावधी उलटला तरी तरुणांचा अद्यापही पत्ता लागला नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल असून, तरुणांचा शोध घेत आहेत. अजित निषाद असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो भोयदापाडा परिसरातीलच राहणारा आहे काल रविवार सुट्टीचा दिवस गाठून 4 ते 5 जणांच्या मित्र गृप खदाणीत पोहण्यासाठी गेला होता, खदाणीच्या किना-यावर बसून पार्टी ही या तरुणांनी केली आणि नंतर खदाणीत उडी मारल्या नंतर तरुण हा तिथेच बुडाला आहे.
मुंबईतील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, एक आरोपी अद्याप फरार,
बांगूर नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरेंच्या घटनेआधी कोंढाण्याचं नावं सिंहगडच होतं त्याचे पुरावे असल्याचा उल्लेख असणारा शिलालेख
या शिलालेखावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
खोटा इतिहासाचे दाखले देऊन शिलालेख लावण्यात आल्याचा आरोप उत्तम कामठे यांनी केलाय
नरवीर तानाजी मालूसरे धारातीर्थी पडल्यावरच गडाला सिंहगड नावं शिवाजी महाराजांनी दिलं होतं
खोटं लिखाण करून तानाजी मालुसरेंचा अपमान करु नये
हा शिलालेख काढा नाहीतर आंदोलन करणार संभाजी ब्रिगेडचा इशारा..
नाशिक – हनुमान जन्मोत्सव वाद चिघळला
महंत गोविंदानंद यांच्या विरोधात अंजनेरी ग्रामस्थ आक्रमक
अंजनेरी ग्रामस्थांचा साधू महंतां सोबत रस्ता रोको
अंजनेरी मंदिरा समोरील रस्ता ग्रामस्थांनी रोखला
– छत्रपती संभाजी यांना कशाप्रकारे फसवण्याचा प्रयत्न करत होते ते यातून स्पष्ट होते त्यांना यात स्वतःचा उमेदवार टाकायचा होता व त्यांना घोडेबाजार करायचा होता व यामुळे छत्रपती संभाजी यांची भाजपकडून ढाल करण्यात आली..
– आपल्याकडे लोकशाही आहे व प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु महाराष्ट्रात कोणी घोडेबाजार करून अशा प्रकारच्या निवडणुका लढणार असतील तर सरकारच सुद्धा बारीक लक्ष आहे या सगळ्या घडामोडींवर
– आम्ही आमचा उमेदवार उतरवलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे व मुख्यमंत्र्यांना ही खात्री आहे की जेवढी मत हवे आहेत तेवढे मत शिवसेनेकडे आहेत व आघाडीतील इतर उमेदवारी देखील विजय होतील
ऑन काँग्रेस नाराजी
– नाराजी बद्दल मी बोलणार नाही त्यांची कोणत्या विषयावर ती नाराजी आहे काय आहे ते त्यांचे हायकमांड यांनाच माहिती
– काँग्रेस आणि मधील सगळे क्रेडीट खात आहेत अशा प्रकारच्या होणाऱ्या गोष्टीवर जराही विश्वास नाही. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते यांच्यात नेहमी चर्चा होत असते आणि असं काही असतं तर यावर ती नक्कीच मुख्यमंत्री डायरेक्ट सोनियाजी यांच्याशी बोलतात
– दिल्लीतील हायकमांड आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलीच चर्चा होत असतात
– उद्धव ठाकरे असे नेते आहेत की ज्यांच्यावर कोणतेही दबावतंत्र नसत
– काँग्रेसचे जी स्थिती आहे देशात त्यातून खूप कमी लोकांना ते पाठवू शकतात त्यांनी पाठवायचा उमेदवार ठरवलेला आहे पक्षानी जी व्यवस्था करायचे आहे ती त्यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील इम्रान प्रतापगडी ना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची चांगली व्यवस्था आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रातून कोणीतरी स्थानिक उमेदवार दिला असता तर नक्कीच चांगली बळकटी पक्षाला मिळाली असती मला वाटतं काँग्रेसने देशाचा विचार केलेला आहे व इतर राज्यांचा विचार केलेला आहे असं वाटतं..
– भाजप सरकारला प्रत्युत्तर देणारे चांगली लोक त्यांच्या नजरेत असू शकतात त्या दृष्टीने त्यांनी हा अभ्यास केला असावा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी किंवा न द्यावी यावर शिवसेनेने मत व्यक्त करणं चुकीचं आहे
नवी दिल्ली राजधानी नवी दिल्लीत शेतकरी संघटनांची बैठक
शेतकरी नेते VM सिंग यांच्या निवासस्थानी बैठक
माजी खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थित राहणार
देशभरातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार
हमीभावाच्या कायद्यासाठी रणनीती आखली जाणार
येत्या ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन होणार – राजू शेट्टी यांची माहिती
नवनीत राणांच्या घरी मुंबई पालिकेची टीम दाखल
नवनीत राणांच्या घरी मुंबई पालिकेची टीम दाखल झाली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे. आज पालिकेची अधिकारी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
देशात इतरही महत्त्वाचे प्रश्न आहेत
हनुमान जन्मस्थळाच्या वादावर भुजबळांची प्रतिक्रिया
वंचित बहुजन आघाडीने बोलावली तातडीची बैठक
चंद्रकांत खैरे यांना उत्तर देण्यासाठी बोलावली तातडीची बैठक
औरंगाबादच्या सुभेदारी विश्राम गृहावर बोलावली तातडीची बैठक
भाजपने वंचित बहुजन आघाडीला पैसे दिले असा केला होता चंद्रकांत खैरे यांनी आरोप
या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडी घेणार आक्रमक भूमिका
– दोन मुलींना नागपूर रेल्वे स्टेशनवर सोडून ती महिला पसार झाली
– आईसाठी दोन्ही मुलींचा आक्रोश
– सीसीटीव्ह फुटेजच्या मदतीनं त्या महिलेचा शोध सुरु
– महिला दोन मुलींसह रेल्वे स्टेशनवर आली, नंतर एका पुरुषासोबत महिलेचा संवाद झाला
– त्यानंतर दोन्ही चिमुकलीला बेवारस सोडून महिला झाली पसार
– दोन्ही चिमुकलींना अनाथालयात आश्रय
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद विरोधात भाजपची खारघर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा आक्रमक
दीपाली सय्यद हाय हाय म्हणत पोलीस स्टेशनमध्येच जोरदार घोषणाबाजी
पोलिसांनी तक्रारीचे निवेदन स्वीकारले
दिपाली सय्यद यांच्या अडचणीत आणखी भर
अनिल सदानंदकडे जमीन विकली आहे.
किरीट सोमय्याांचा अनिल परबांवर आरोप
अनिल कदमांवर कारवाई होणार
म्हणून ते आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत
परबांवरील गुन्हा कोर्टात सिद्ध करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
आमदारांच्या त्रासाला कंटाळून महिलेने मागितली गृहमंत्र्यांना आत्महत्येची परवानगी..
शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या भाऊजई ने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहले निवेदन..
जयश्री दिलीपराव बोरणारे असे महिलेचे नाव..
आमदारांनी मारहाण केल्याचा याआधी या भाऊजई ने केला होता आरोप..
शिवसेना आमदार रमेश बोरणारे वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असल्याचा भाऊजई चा आरोप..
वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले पत्र..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती वाटप करणार
शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम करणार हस्तांतरित
पीएम केअर्स पासबुक आणि आयुष्मान भारत-PMJAY योजनेअंतर्गत आरोग्य कार्डचे मुलांना वितरण केले जाणार
महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने काम करतंय
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे गेले अडीच वर्षे चांगलं काम करतेय
विकासाची कामे कुठेही थांबली नाहीत. विकासाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू आहेत
काँग्रेसचे आमदार , मंत्री सर्व मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत आहेत
मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुलूंड ते कांजूरमार्ग ट्रॅफिक जॅम…
– ७ किलोमिटर वाहनांच्या लांबच्या लाॅब रांगा… २० ते २५ मिनिटं गाड्या स्लो…
– मेट्रोचा कामामुळे हायवेवर ट्रॅफिक जॅम झाल्याची माहीती…
कोल्हापुरातील पंप धारकांची उद्या पेट्रोल डिझेल खरेदी राहणार बंद
प्रलंबित मागण्यांसाठी फेडरेशन महाराष्ट्र पेट्रोल डिझेल असोसिएशनचं आंदोलन
जिल्ह्यातील साडेसहा हजार पेट्रोल पंप धारक होणार सहभागी
पंप धारकांच्या आंदोलनामुळे वाहतुकीवर अंशतः परिणाम होण्याची शक्यता
एनडीएचा दिक्षांत समारंभ संपला
907 कँडेट्स या समारंभात सहभागी झाले होते
एअर मार्शल चिफ विवेक चौधरी यांच्या हस्ते कँडेट्सना मेडल प्रदान करण्यात आले
यावर्षी अभिमन्यू सिंग राठोड या विद्यार्थ्यांला गोल्ड मेडलं मिळालं
विवेक चौधरींनी कँडेट्सच अभिनंदन करत पुढील सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या …
ई -स्कूटर चा बेकायदा वेग वाढवणाऱ्या आरटीओची कारवाई, 50 दुचाकी केल्या ठाणे आरटीओने जप्त.
प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणार्यांनी ताशी 25 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरी मध्ये फेरफार करून तिचा वेग वाढल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्यात आहेत.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने बॅटरी मध्ये फेरफार झालेल्या सर्व कारवाईची मोहीम सुरू केली असून अशा 50 स्कुटरवर कारवाई केल्याची माहिती ठाणे आरटीओने दिली आहे….
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पुण्यात होणार्या सुनावणीच्या काळात साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्यासाठी बजावलं समन्स
6 आणि 7 जून या दिवशी पुण्यात होणार सौरभ राव यांची साक्ष
आयोगाचे सचिव व्ही.व्ही. पळणीटकर यांनी राव यांना समन्स बजावल्याला दुजोरा दिला
हा हिंसाचार झाला, तेव्हा राव हे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते
राव यांच्यासह निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मानद कॅप्टन बाळासाहेब जमादार तसेच ३ पोलीस अधिकार्यांनाही आयोगाने साक्ष देण्यासाठी बोलावलं
गडचिरोली देसाईगंज आरमोरी या भागात बिबट्याची दहशत कायमच
मागील चार महिन्यापासून एक बिबट्या आणि दोन वाघ या भागात सतत फिरत होते
त्यातून एक नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले
परंतु बिबट्याने पाळीव प्राणया वर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे
या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आरमोरी व देसाईगंज येथील नागरिक करीत आहेत
2 जुन ला आरमोरी येथे पुन्हा होणार आंदोलन
चंद्रपूर आलेसूर गावात बिबट्याचा हल्ला
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत उपक्षेत्र नवरगावमधील आलेसूर गावातील गुलाब शेंडे यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केला.
यामध्ये एका बोकडासह सहा शेळ्यांचा मृत्यू झाला.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
– ओबीसींचा इंम्पेरीकल डाटा गोळा करणाऱ्या समर्पित आयोगापुढे नागपूरात विविध संघटनांकडून शेकडो अर्ज
– ओबीसी नागरीक आणि संघटनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडली भूमिका
– नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यातील विविध संघटनांनी मांडली भुमिका
– एकूण 115 शिष्टमंडळांनी आणि व्यक्तिंनी आयोगापुढे आपली बाजू मांडली
– ओबीसींची स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया
– ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त संघटनांनी मांडली भुमिका
– विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे प्रवक्ते, स्थानिक स्वराज संस्थांच्या प्रतिनिधींनी निवेदने देत आपली भूमिका मांडली
राजधानीत होणारी काँग्रेसची बैठक रद्द
राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठ नेत्यांसोबत होती बैठक
राज्यसभा निवडणुकीबाबत होणार होती बैठक
उमेदवारी जाहीर झाल्यावर बैठक रद्द झाल्याची माहिती
– वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.
– भंडारा जिल्हाचा मोहाडीत बीअर बारमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला.
– हल्लेखोर स्वत:च गेले मोहाडी ठाण्यात.
– जखमीला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।
पुणे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावीचे प्रवेश अर्ज भरायला आजपासून होणार सुरुवात
दहावीचा निकाल जरी लागला नसला तरी अकरावीच्या प्रवेश अर्जाचा पहिला भाग आजपासून भरण्यास सुरुवात झाली आहे
शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आलीये
दरवर्षी एक लाख विद्यार्थी हे अकरावीसाठी प्रवेश घेतात
दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दूसरा भाग उपलब्ध करून दिला जाणार आहे…
बारामती : बारामती तालुक्यातील सुपे येथे भिषण अपघात..
– भरधाव वेगातील ट्रक हॉटेलमध्ये घुसला..
– तिघांना चिरडले, दोन पुरुष एका महिलेचा समावेश..
– मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ट्रक घुसला हॉटेलमध्ये..
– जखमींना सुपे ग्रामीण रुग्णालयासह केडगावच्या खासगी रुग्णालयात केले दाखल..
पुण्यातील खडकवासला इथं असणाऱ्या एनडीत आज दिक्षांत सोहळा
सोहळ्याला एअर मार्शल चिफ विवेक राम चौधरी लावणार हजेरी
142 वा दिक्षांत समारंभ खेलपात्रा मैदानावर संपन्न होतोय
थोड्या वेळात कँडेट्स मैदानावर दाखल होतील
दिक्षांत समारंभाची तयारी पुर्ण करण्यात आलीये…
मान्सून केरळात दाखल दोन दिवसात मान्सून होणार सक्रीय
24 तासात आणखी काही राज्यं व्यापण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रातही पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय
पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, दक्षित मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता
महाराष्ट्रात 5 ते 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता
हवामान विभागाचा अंदाज !