Maharashtra News Live Update :हनुमान जन्मस्थळाचा वाद कायम, गोविंदानंद महाराज उद्या घेणार पत्रकार परिषद

| Updated on: May 31, 2022 | 8:59 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update :हनुमान जन्मस्थळाचा वाद कायम, गोविंदानंद महाराज उद्या घेणार पत्रकार परिषद
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्स
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज मंगळवार, 31 मे 2022. आज आपण राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआय कोठडीत जाणार की दिलासा मिळणार? याचा निर्णय आज होणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबत आज निकाल देईल. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 May 2022 08:50 PM (IST)

    पोलीस अधीक्षकांचा जोरदार दणका

    नंदुरबार ब्रेकिंग :- लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या नंदुरबार येथील महिलेसह एका पोलीस हवालदार व पत्रकारास अटक.

    नंदुरबार व शहादा येथील अनेकांना खंडणी मागत ब्लॅकमेल केल्याचा संशय.

  • 31 May 2022 08:30 PM (IST)

    रुपाली पाटलांवर.राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली जबाबदारी

    पुणे शहर उपाध्यपदाची दिली जबाबदारी

    शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी दिलं नियुक्तीपत्र

    रुपाली पाटलांची शहर कार्यकारिणीत लागली वर्णी !


  • 31 May 2022 08:30 PM (IST)

    सिंधुदुर्गात उद्यापासून होणारी टोलवसुली तूर्तास टळली

    ओसरगाव येथील टोलनाक्यावर होणार उद्यापासून टोल वसुलीला होणार होती सुरवात.मात्र राजकीय पक्षांचा विरोध पाहता हा टोल वसुलीचा मुहूर्त आणखी चार दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.यासंदर्भात आज सायंकाळी भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली होती प्रांताधिकारी यांची भेट.जिल्हावासीयांना टोल माफी दिल्याशिवाय टोल वसुली करण्यास विरोध दर्शविला होता. तर शिवसेनेने ही उद्या टोल वसुली केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता.या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन टोलवसुलीचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.

  • 31 May 2022 08:29 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात 

    – टेभुर्णीत मेघ गर्जनेसह पाऊण तासांपासून सुरु आहे वादळी वाऱ्यासह पाऊस,शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरीक हैराण

    माढ्यासह अन्य शहरात रिमझीम तर तालुक्यातील अन्य भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे

    अचानक आलेल्या पावसाने शेतकर्याची उडाली धांदळ-

  • 31 May 2022 07:36 PM (IST)

    कारखान्याला भीषण आग

    भिवंडी शहरातील शांती नगर येथील जब्बार कंपाऊंड येथे फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग .

    आगीत लाखो रुपयांचा फर्निचर जाळून खाक.

    अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थस्ळी दाखल .

    आगीचे कारण अस्प्ष्ट कोणतीही जीवितहानी नाही.

  • 31 May 2022 07:34 PM (IST)

    पावसळ्यात एक कॉलवर मुंबईकरांना मिळणार मदत

    मुंबई आणि उपनगरातील रहीवाशासाठी महत्वाची बातमी

    MMRDA कडून पावसाळानिमित्त नियंत्रण कक्षाची स्थापना

    पावसळ्यात नागरिकांना मदतीसाठी निंयत्रण कक्ष

    नियंत्रण कक्ष नंबर – 022- 26591241 , 022- 26594176 , 8557402090 आणि टोल फ्री – 1800228801

  • 31 May 2022 07:33 PM (IST)

    मान्सूनपूर्व पावसाची येवल्यात जोरदार हजेरी

    – 15 मिनिटे पावसाने लगावली हजेरी…

    – उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा…

    – चिमुकल्यांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद…

  • 31 May 2022 06:29 PM (IST)

    नाशिक – शास्त्रार्थ सभा राडा प्रकरण

    गोविंदानंद महाराज उद्या घेणार पत्रकार परिषद

    आज झालेले आरोप, साधू महंतांचा गोंधळ यावर गोविंदानंद काय बोलणार याकडे लक्ष

    सभा झाली मात्र, हनुमान जन्मस्थळाचा वाद मात्र अद्याप कायम

  • 31 May 2022 06:28 PM (IST)

    अमरावती शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

    – महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार शहरात कलम ३७(१) आणि (३) लागू..

    – एक जून ते 15 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी..

    – अमरावती शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश जारी करण्यात आलेत..

    – शहरातील पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात हे आदेश जारी करण्यात आलेत..

    – कलमांचा भंग करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा पोलीस उपायुक्त यांनी सांगितले आहे..

  • 31 May 2022 06:27 PM (IST)

    बुधवारी ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद

    ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे NH -4 च्या कामातंर्गत गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे 22 केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत. तसेच टेमघर जलशुध्दिकेंद्रामध्ये रॉ वॉटर (PAC)  पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दिकरण केंद्रामधील सॅन्ड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे. तसेच स्टेम प्राधिकरणाच्यावतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल दुरूस्तीची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक 01.06.2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

    या कारणास्तव बुधवार दिनांक 01.06.2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, गांधीनगर, सिध्दांचल, आकृती, सिध्देश्वर, जॉन्स्न, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, डिफेन्स, येऊर, विठ्ठल क्रिडा मंडळ, सुरकुरपाडा तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
    वरील शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

  • 31 May 2022 06:27 PM (IST)

    रावेर, यावल तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

    या वादळामध्ये तालुक्यातील आहेरवाडी परिसरात केळी बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

    आहेरवाडी गावात घरांची घराचे पत्र पळून एक युवक गंभीर जखमी

    मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकर्‍यांना फटका

    तर काही गावांमध्ये पावसामुळे वृक्ष कोलमडले

    वीज पुरवठा खंडित

  • 31 May 2022 05:30 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही

    शर्यत सुरू ठेवण्यासाठी सर्व काही करणार

  • 31 May 2022 05:15 PM (IST)

    नवी दिल्ली-राष्ट्रपती भवनाजवळ आढळले मृत गरुड

    मृत गरुडावर आढळल ट्रॅकिंग डिवाइस

    तपास यंत्रणा धास्तावल्या

    मात्र वन्यजीव संरक्षणासाठी डिवाइस लावल्याचा खुलासा

    पक्षांच्या विश्रांतीचे ठिकाण आणि अन्न याबद्दल माहिती मिळवण्यासाठी गरुडाला उपकरण जोडलं होतं

    सुरुवातीला संशयास्पद गरुड आढळल्याने तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ

    कालच्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गरुडाचा मृत्यू

  • 31 May 2022 05:14 PM (IST)

    एमपीएससीनं आज दोन निकाल केले जाहीर

    एमपीएससी स्थापत्य अभियांत्रिकीचाही निकाल केला जाहीर

    652 पदांचा निकाल जाहीर

    रोहित कट्टे स्थापत्य अभियांत्रिकीत राज्यात प्रथम

    एमपीएससीनं आजच मुलाखती आयोजित केल्या होत्या

    मुलाखती झाल्यानंतर काही तासातचं निकाल केला जाहीर

    दोन निकाल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण!

  • 31 May 2022 05:13 PM (IST)

    पंढरपूरच्या वारीची जोरदार तयारी सुरू

    संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैलजोडीची झाली निवड

    फुरसूंगीच्या अप्पासाहेब खुटवड यांच्या कुटुंबाला मिळाला पालखीचा मान

    सोन्या आणि माऊली या बैलजोडीला मिळाला मान

    पाच वर्षानंतर मान मिळाल्याने कुटुंबात आनंद

    2 तारखेला फुरसूंगीत काढली जाणार बैलाची मिरवणूक आणि मग बैलजोडी अर्पण केली जाणार

  • 31 May 2022 04:04 PM (IST)

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक

    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेत आहे

    कृषी विभागाचा आढावा

    बी-बियाने, खतांचे नियोजन याबाबत घेत आहेत नवनीत राणा आढावा

  • 31 May 2022 04:02 PM (IST)

    चित्र रेखाटून केले अभिवादन

    मालेगाव-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हुबेहूब चित्र रेखाटले केले अभिवादन

    कला शिक्षक भारत पगार यांनी रेखाटलेले चित्र सर्वत्र व्हायरल..

     

  • 31 May 2022 03:33 PM (IST)

    सलग दुसऱ्या दिवशी ही भंडारा जिल्हात पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी

    भंडारा जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पावसानी हजेरी लावली आहे. काल जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होता.तर आज सकाळ पासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी सुर्यनारायण आग ओकत होता तर दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला. व काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.तर आलेल्या पावसामुळे उकाढयापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

  • 31 May 2022 03:32 PM (IST)

    सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंना भर कार्यक्रमात लागली डुलकी

    – सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात सुरूय गरीब कल्याण संमेलनाचा कार्यक्रम

    – या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना व्हिसीच्या माध्यमातून करत आहेत मार्गदर्शन

    – कार्यक्रमादरम्यान रामदास आठवलेंना झोप झाली अनावर

    – मंत्री रामदास आठवले यांचा रात्रभर प्रवास झाला असून त्यांच्या मेडीसीन सुरू असल्याने त्यांना डुलकी आल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले

  • 31 May 2022 03:31 PM (IST)

    प्रदेश काँग्रेस महासचिव आशिष देशमुख यांनी दिला राजीनामा

    – इमरान प्रतापगडी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने नाराजी

    – ‘परराज्यातील उमेदवार महाराष्ट्रावर लादने हा महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय आहे’

    – थेट काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांना पाठवला राजीनामा

  • 31 May 2022 03:30 PM (IST)

    शास्त्रार्थ सभेत साधू महंतांचा राडा

    नाशिक – महंत सुधीरदास महाराज यांनी उगारला गोविंदानंद महाराज यांच्यावर माईक

    जगद्गुरूंचा अपमान केल्याने सुधीर महंत यांनी माफी मागावी अशी गोविंदानंद यांनी केली होती मागणी

  • 31 May 2022 01:15 PM (IST)

    प्रशासनाचा गैरउपयोग केला जातोय, फडणवीसांची टीका

    प्रशासनाचा गैरउपयोग केला जातोय

    जेजुरीत सुरू असलेल्या राजकारणावर देवेंद्र फडणवीसांची टीका

  • 31 May 2022 12:00 PM (IST)

    शरद पवारांकडून प्रशासनाचा गैरवापर, गोपीचंद पडळकरांचा आरोप

    शरद पवारांकडून प्रशासनाचा गैरवापर

    शरद पवारांना समोरासमोर सभा लावावी

    पवारांच्या पायाखालची वाळू सरकली

    पोलिसांकडून आम्हाला चुकीची वागणूक, पडळकर

    मी यात्रेवर ठाम आहे-पडळकर

    सोहळ्याला जाताना आमची अडवणूक

    शरद पवारांच्या ‘सातबाऱ्यावर’ चौंडी नाही, पडळकरांची टीका

    पवारांना आता अहिल्यादेवी जयंती आठवली का?

    पवारांच्या पायाखालची वाळू सरकली

    शरद पवारांचं हे कुठलं पुरोगामित्व

    सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

  • 31 May 2022 11:37 AM (IST)

    खोत, पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला

    खोत, पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला

    मी पोलिसांना मला दर्शनाला जाऊ देण्याची विनंती करणार

    हे राजकारण कशासाठी केलं जातंय, पडळकरांचे सवाल

  • 31 May 2022 11:08 AM (IST)

    मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत सुरू

    मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत सुरू

    रंगशारदा सभागृहात सोडत सुरू

  • 31 May 2022 11:00 AM (IST)

    अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं शरद पवारांनी घेतलं दर्शन

    अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांनी दर्शन घेतले

    हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता मामा भरणे, भूषणसिंह राजे होळकर यांच्यासोबत घेतलं दर्शन

    शरद पवार पोचल्यानंतर अहिल्यादेवी होळकर स्मरकवर हेलिकॉप्टरमधून केली पुष्पवृष्टी

  • 31 May 2022 10:58 AM (IST)

    राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

    राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

    1 जूनला राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया

    राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं वाढलं

    राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित

  • 31 May 2022 10:40 AM (IST)

    राज ठाकरे लिलावती रुग्णालयाकडे रवाना

    राज ठाकरे लिलावती रुग्णालयाकडे रवाना

    1 जूनला राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया

    राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं वाढलं

    राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई उपस्थित

  • 31 May 2022 10:39 AM (IST)

    गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या निशाण्यावर

    शरद पवार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे पुतळ्याला अभिवादन करणार

    गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या निशाण्यावर

    जेजुरीत राजकीय घडमोडींना वेग

  • 31 May 2022 10:21 AM (IST)

    डॉ. आशिष देशमुख काँग्रेस महासचिव पदाचा राजीनामा देणार

    डॉ. आशिष देशमुख काँग्रेस महासचिवपदाचा राजीनामा देणार

    – इमरान प्रतापगडी या बाहेरच्या उमेदवाराला महाराष्ट्रावर लादल्याने देणार राजीनामा

    – बाहेरचा उमेदवार दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये वाढली खदखद

    – बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा

    – ‘काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशिष देशमुख यांना राज्यसभेचं आश्वासन दिलं होतं’

    – ‘सोनीया गांधी यांनी आश्वासन देऊन पाळलं नाही’

    – देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशिष देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती

    – पदाचा राजीनामा देणार, पक्ष सोडणार नाही

  • 31 May 2022 08:48 AM (IST)

    दीपाली सय्यद यांच्यावर कारवाईची मागणी

    -भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांचे महिला आयोगाला पत्र

    – दीपाली सय्यद यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची केली मागणी,

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा दीपाली सय्यद यांच्यावर आरोप

    – दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं पत्रात नमूद

  • 31 May 2022 08:47 AM (IST)

    भागरचना आराखडा व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई

    महापालिका प्रभागरचना आराखडा व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई

    औरंगाबाद महापालिका प्रशासनाचे कारवाईचे संकेत

    महापालिका प्रभागरचनेचा बोगस आराखडा झाला होता व्हायरल

  • 31 May 2022 08:40 AM (IST)

    शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

    ईडी पुन्हा चौकशीसाठी अनिल परबांना समन्स पाठवण्याच्या तयारीत

    पुन्हा होऊ शकते अनिल परबांची चौकशी

    अनिल परबांनी विभास साठेंकडून रिसाॅर्ट विकत घेऊन सदानंन कदमांना विकला

    सदानंद कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ असल्याची माहीती

    त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या रडारवर

    या नेत्याचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहीती

  • 31 May 2022 08:35 AM (IST)

    कार्यक्रमात राजकारण करू नये, रोहित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

    कार्यक्रमात राजकारण करू नये

    रोहित पवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

    द्वेषाने बोलतात त्यांना अहिल्यादेवीचा विचारच कळला नाही

  • 31 May 2022 08:34 AM (IST)

    राज्यभरातील पंप चालकांचं ‘पेट्रोल-डिझेल नो परचेस’ आंदोलन

    राज्यभरातील पंप चालकांचं ‘पेट्रोल-डिझेल नो परचेस’ आंदोलन

    या आंदोलनामुळे आज 31 मे पासून पंप चालक ऑईल कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत. केंद्राच्या धोरणांवर पंप चालक नाराज

    केंद्र शासनाने पेट्रोल डिजेलवरील एक्साईज ड्यूटी कमी केल्यामुळे पेट्रोल पंप चालकांना याचा थेट फटका बसतोय

    या निर्णयाचा दिलासा हा सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे

    याचा भुर्दंड हा पेट्रोल पंप चालकांना मोठा बसलेला आहे

    गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा नियमित नसल्याने, सोमवारी अनेक पंप बंद होती

    आज अनेक पेट्रोल पंप चालकांनी पेटिरोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय

  • 31 May 2022 08:32 AM (IST)

    चौंडी गावात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात बॅनर युद्ध

    चौंडी गावात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात बॅनर युद्ध

    चौंडी शहरात रोहित पवार आणि राम शिंदे यांनी लावले शेकडो बॅनर

    रोहित पवार आणि राम शिंदे यांची पाठोपाठ बॅनरबाजी

    बॅनरबाजीतून सुरू आहे राम शिंदे आणि रोहित पवार यांची प्रतिष्ठेची लढाई

    बॅनरबाजीतून राम शिंदे आणि रोहित पवार यांचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बॅनरबाजी

  • 31 May 2022 07:45 AM (IST)

    जातियवादी लोकांचे पुतळ्याला हात, पडळकरांची टीका

    अहिल्यादेवीला दुग्धाभिषेक केला

    जातियवादी लोकांचे पुतळ्याला हात लागल्याने दुग्धाभिषेख केला

    भाजप नेते गोपीचंद पडळकर खंडेरायाच्या दर्शनाला

  • 31 May 2022 07:41 AM (IST)

    राणांविरोधात शिवसैनिक गप्प का? नागपूर शिवसेनेत गटबाजी?

    नवनीत राणा आणि रवी राणांविरोधात नागपुरातील शिवसैनिक गप्प का राहिले?

    – राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांवर टीका करत असताना नागपूरातील शिवसैनिक होते गप्प

    – राणा दाम्पत्याविरोधात नागपूरातील शिवसैनिक गप्प राहिल्याने चर्चेला उधाण

    – नागपूर शिवसेनेतील गटबाजीमुळे अनेक नेते नाराज असल्याची चर्चा

    – संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर नाराजी असल्याने शिवसैनिक गप्प का?

    – राणा दाम्पत्याविरोधात मुंबईतील शिवसैनिक आक्रमक, नागपूरातील शिवसैनिक मात्र गप्प

  • 31 May 2022 07:30 AM (IST)

    विभास साठे यांच्या जिवाला धोका, किरीट सोमय्यांचा इशारा

    विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती भाजप नेते किरीट सोमय्यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे. यासंदर्भातील ट्विट त्यांनी केलंय.

  • 31 May 2022 07:27 AM (IST)

    गडचिरोली पोलिसांकडून 133 पदांची पोलीस भरती

    गडचिरोली पोलिसांच्या वतीने 133 पदाची पोलीस भरती यावर्षी घेण्यात येत आहे

    या भरतीत फक्त गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी अर्ज करू शकतात

    गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुके आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागातील युवकांना आवाहन करण्यात येत आहे की

    जास्तीत जास्त युवक-युवती पोलीस भरतीत अर्ज करावा

    नक्षलग्रस्त भागातील पिढीत युवक-युवतींना पहिले प्राधान्य

    अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 5 जून पर्यंत राहणार

    गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यात कुठे अर्ज स्वीकारता येते

  • 31 May 2022 07:18 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

    आगामी नागपूर मनपा निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

    महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी वगळता आज आरक्षण सोडत

    आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाची सोडत

    कोणता वॅार्ड आरक्षित होते? याकडे लागलंय जिग्गजांचं लक्ष

    नागपूरातील रेशीमबाग सभागृहात सकाळी १० वाजता आरक्षण सोडत

    नागपूर मनपाचे एकूण 52 प्रभाग, 156 नगरसेवक निवडले जातील

    156 जागांपैकी 78 जागा महिलांसाठी असणार आरक्षित

    ज्या प्रभागात एससी, एसटीची लोकसंख्या जास्त असेल, तो प्रभाग त्या प्रवर्गासाठी राखीव असेल

  • 31 May 2022 07:17 AM (IST)

    नाशिकात आज खरेदी बंद आंदोलन

    नाशिक – पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे आज खरेदी बंद आंदोलन

    पेट्रोल कंपन्यांनी कोटा कपात व्यवस्था लागू केल्याने पेट्रोल डीलर्सची अडचण

    मागणीच्या फक्त 20 टक्के पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल डीलर्समध्ये नाराजी

    आजच्या आंदोलनाचे परिणाम पुढचे दोन तीन दिवस दिसण्याची शक्यता

  • 31 May 2022 07:15 AM (IST)

    सिगारेट ओढण्याचे वय वाढवण्यावर आज सुनावणी

    देशभरात सिगारेट ओढण्याची वयोमर्यादा वाढविण्यात यावी, यावर आज सुनावणी

    स्मोकिंग झोनमध्ये बदल करण्यात यावेत

    जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

    वकील शुभम अवस्थी यांनी ही याचिका दाखल केली आहे

    सिगारेट ओढण्याच वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यात यावे

    एअरपोर्ट, क्लब, पब, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्याचे जाहीर केलेले स्मोकिंग झोन बंद करण्यात यावेत

     

  • 31 May 2022 06:36 AM (IST)

    अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा

    अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती सोहळा

    आमदार रोहित पवारांच्या निमंत्रणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार चौंडीत येणार

    तर दरवर्षी राम शिंदे करायचे मोठा उत्सव

    मात्र, यंदा पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात होतोय कार्यक्रम

    अनेक दिग्गज लावणार कार्यक्रमाला हजेरी

    तर चौंडीत दंगल घडवायचा डाव, आमदार गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा

    पडळकर देखील दर्शनासाठी चौंडीत येणार

  • 31 May 2022 06:32 AM (IST)

    अमरावती पालिका निवडणुकीची आज आरक्षण सोडत

    अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

    सर्व 33 प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे लागले सोडतीकडे लक्ष

    मनपा निवडणूकीसाठी अनुसूचित जाती, अनुचित जमातीआणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण निश्चित केले जाणार

    सकाळी अकरा वाजता सांस्कृतिक भवनात आरक्षण सोडत काढली जाणार

  • 31 May 2022 06:24 AM (IST)

    अविनाश भोसलेंना सीबीआय कोठडी की दिलासा

    पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले सीबीआय कोठडीत जाणार की दिलासा मिळणार?

    याचा निर्णय आज होणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबत आज निकाल देईल

    या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

    पुण्याचे व्यवसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली होती

    येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं

    मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात अविनाश भोसले यांच्या सीबीआय रिमांडवर दोन्ही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली आहे

    न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून आज दुपारी बाराच्या सुमारास न्यायालयात या संदर्भात निर्णय देण्यात येईल