मुंबई : आज रविवार 8 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 51.29 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 4 टक्के अधिक जलसाठा शिल्लक आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठा कमी होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम विदर्भातील मोठ्या, मध्यम आणि लघु पाणी प्रकल्पात एकूण 40 टक्के जलसाठा शिल्लक आहे. यंदा पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले होते, त्यामुळे यंदा अधिक पाणीसाठा आहे.
उस्मानाबाद शहरातील भानू नगर भागातील दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून मोठ्याप्रमाणात वित्तीय नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती
घटनास्थळी अग्निशमन दल दखल
नागरिकची मोठ्या प्रमाणात गर्दी पोलीसानी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली
युवा उद्योजकाचे झाले लाखो रुपयांचे नुकसान..
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला दिली तातडीने भेट..
शेळ्यांचे शवविच्छेदन करून नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले..
राज ठाकरे आणि माझी आज 25 मिनिटं भेट झाली
काल मी जी आरती केली त्याबद्दल त्यांनी कौतुक केलं
शहरात पदाधिकाऱ्यांनी अश्याप्रकारे नियोजन केलं, त्याप्रमाणं नियोजन केले असत तर आठ ही विधानसभा मतदारसंघात महाआरती झाली असती
पण पदाधिकारी ग्राऊंडवर नव्हते, मनसैनिक होते हे मी साहेबांना सांगितलं
माझ्या तिरूपती दौऱ्याबद्दल चौकशी केली
साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महिन्याभरात मिसळ महोत्सव घेतोय
राज साहेब आणि माझी भेट हे पक्षातील अनेकांना उत्तर आहे
कोणाच्या पोटात गोटात काय हे मला माहिती नसतं,
काल साहेबांनी जे ट्विट केलं ते माझ्याबद्दल नव्हतं, पण सध्या काही झालं की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा संबंध माझ्याशी जोडला जातो
पण मी साहेबांना सांगितलं 16 वर्ष मनसेत आहे तुमच्या विषयी कोण बोललं तर ते सहन होत नाही
अयोध्या दौऱ्यावर मी काही बोलणार नाही, जे काही असेल ते साहेब बोलतील
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे
या जिल्हयात जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करणार…
प्रत्येक गावाच सहकार्य असल्या शिवाय कोणतेही विकास होऊ शकत नाहीत.
स्वच्छते बाबत सातारा जिल्हा कायम पहिला राहिला…
राज्याला दिशा देण्याचे काम सातारा जिल्हयाने केले
राज्यात ऊसाची खूप परिस्थिती वाईट आहे.
साखर कारखाना चालवण्याचे एढ्या गबाळ्याचे काम नाही…
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर होत चाललाय
कार्यक्रमात ब्राह्मण भूषण पुस्काराच होणार वितरण
या वर्षीचा ब्राह्मण भूषण पुस्कार अभिनेते शरद पोंक्षे यांना
तर सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ही ब्राह्मण भूषण पुस्काराजने होणार गौरव..
यात ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच देखिल अनावरण..
शैक्षणिक संकुलाच्या उदघाटनासाठी येणार औरंगाबाद दौऱ्यावर
फेसबुक पोस्ट करत इम्तियाज जलील यांनी दिली माहिती
‘आ रहा हूं मै’ या टायटल खाली केली फेसबुक पोस्ट
अकबरुद्दीन ओवैसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे वातावरण पुन्हा तापणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं लावून धरली मागणी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं शरद पवार साहेबांना दिलं निवेदन
खाजगी कंपन्यांमार्फत गट क आणि गट ड ची भरती खाजगी कंपन्यांमार्फत नको केली मागणी
राज्य सरकारशी बोलून प्रश्न सोडवावा केली विनंती
कालच राज्यमंत्री बच्चु कडू यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलंय
आता थेट शरद पवारांकडे सरळसेवा भरतीचा प्रश्न मांडण्यात आलाय…
कोल्हापुरातल्या आसुर्ले पोर्ले मधील दत्त दालमिया कारखान्याच्या गोदामातील घटना
शेरेबंग नारझाया असे मृत कामगाराचे नाव
तर जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बिस्टू बसूमातारी हा कामगार गंभीर जखमी
जखमी कामगारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
साखर गोदामातील पोती ट्रकमधील भरत असताना घडला प्रकार
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सोमवारी दुपारी 1 ते 2 यावेळेत देणार पुणेकरांच्या प्रश्नांची ट्विटवर देणार उत्तर
पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता नागरिकांसोबत संवाद साधणार
तक्रारींचे निवारण करण्यासाठी लाईव्हद्वारे नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यास प्राधान्य देण्यात येणार
लखनऊ शहरात ठीकठिकाणी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बनर्स,
– उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या,बॅनर्सवर मजकूर,
– भाजप खासदार बृजभूषण शरणसिंह यांनी लावलीत बॅनर्स,
– राज ठाकरेंचा 5 जून रोजी अयोध्या दौरा
रुग्णालयाच्या काही वार्डातील विद्यूत पुरवठा सकाळी साडेदहा वाजता पासून खंडीत असल्याची रुग्णांची माहिती…..
ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे सुरू आहे हाल…..
पाच तासापासून विद्युत पुरवठा अद्यापही खंडित असल्याची रुग्णांची माहिती……
शवविच्छेदन गृहातील एसी सुद्धा आहे बंद…..
संगमनेर / अहमदनगर
शेततळ्यात बुडून सख्या बहिण – भावाचा मृत्यू ….
संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती येथील घटना…..
जयश्री बबन शिंदे ( वय २१ ) आणि आयुष बबन शिंदे ( वय ७ वर्ष ) असे मृत बहिण – भावाचे नाव….
धुणे धुण्यासाठी गेले असता घडली घटना….
शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरल्याने आयुष शेततळ्यात पडला….
भावाला वाचवण्यासाठी बहिण जयश्रीने मारली शेततळ्यात ऊडी….
भावाला वाचवताना दोघांचाही शेतततळ्यात बुडाल्याने दुर्देवी मृत्यू ….
दुर्देवी घटनेने परिसरात शोककळा….
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी भाजपच्या खासदाराची मागणी
तर पुण्यात अखिल उत्तर भारतीय संघटनेकडून राज ठाकरेंचा सत्कार
पुण्यातील राजमहल या निवासस्थानी जाऊन केलं स्वागत
उत्तर भारतीय संघटनेचे रविंद्र प्रजापती यांनी केलं स्वागत
यावेळी पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते
एखादी गोष्ट वारंवार सांगितली जाते
आपल्याला सुध्दा याच मार्गाने पुढे जावे लागेल
प्रचार करून लोकांची मनं जिंकू
तर कोथळा बाहेर काढण्याचा मलाही अधिकार
कोणती माहिती घ्यायची
रोज पन्नास लाख लोकांपर्यंत या माध्यमातून पोहचायचं आहे
दोघांच्या प्रचारात बरंच साम्य
सोशल मीडियाचा वापर गांभीर्याने घेतला
पंतप्रधान हिटलरला फॉलो करतात
राज्य आपल्याला टिकावायचं असेल
आता युध्द वडापाववरती होणार नाही
हे राज्य आपण भारतीय जनता पक्षाकडून खेचून घेतलं आहे
जिग्नेश मेव्हाणीला पोलिसांनी उचललं
त्याने पंतप्रधानांच्या विरोधात ट्विट टाकलं होतं
कंगणा राणावत, सुशांत सिंग प्रकरण, आमची प्रकरण याबाबत त्याचा सोशल मीडिया स्टॉंग आहे
माझ्यावरती रोज लोक बोलत असतात
शिवसेना कशी चुकीची हे सुध्दा सांगितलं जात आहे
खूप काळजीपर्वूक करायला हवं
अलीकडे दिपाली सय्यद दिसतात मला सोशल मीडियावर
मोजक्या शब्दांत जे मांडायचं मांडा
सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणार
अशा प्रकारची शब्दांची रचना
प्रत्येकाने आपआपल्या पध्दतीने जीवन जगावं
आम्हाला जे करायचं ते केलं
साहेबांचा प्रवास तुम्हाला पुढे न्यायचा आहे…
हे खूप मोठं काम आहे,
जोपर्यंत हे आतून येत नाही
२०१९ साली ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी कुणाला वाटतं होतं का आमचा मुख्यमंत्री होईल
एकचं होईल मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल
असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत आमच्यावरती
आजही लढण्याची प्रेरणा
ना झुकेंगे ना रूखेंगे
असली नकली क्या है वह
लोक वाट पाहत आहे
तरूणांच्या खांद्यावर शिवसेनेचं भविष्य आहे
ज्यांनी तुम्हाला खांद्यावर घेतलंय
-जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा 20 आणि 21 जून रोजी पार पडणार आहे
-देहूवरून संत तुकाराम महाराजाची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार तर 21 जूनला आळंदी वरून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे
– आळंदी आणि देहूत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतील
-दोन वर्ष कोरोनामुळे नियम व अटिच पालन करत तुकोबांचा आणि ज्ञानोबा माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडला होता यावर्षी कोरोना संकट कमी झाल्याने सध्या तरी निर्बंध नाही, यावर्षी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्याला लाखोंच्या संख्येने वारकरी देहूत आणि आळंदीत दाखल होणारेत पालखी सोहळ्याची लगबग सुरू झालीय
अमरावती जिल्ह्यातील अंबाडा गावातील आंतरजातीय प्रेम विवाहाचे प्रकरण…..
मुलीला आई वडिलांनी पोलिस स्टेशनला आणले परत; मुलगी आता पतीकडे राहणार….
चार तारखेला मुलीला पतीच्या घरातून आई वडिलांनी नेले होते फरफट…..
घटनेचा व्हिडिओ झाला होता व्हायरल;२८ तारखेला तरुण-तरुणीने आर्य समाजात केला होता प्रेमविवाह…
मुलीच्या कुटूंबाचा प्रेमविवाहाला विरोध…
प्रेम विवाह करनारे तरून-तरुणी आता पुन्हा एकत्र येणार;
आई-वडिलांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं. तरुणीने पोलिसांकडे नोंदवले बयान….
-पिंपरी चिंचवड च्या किवळे परिसरात बापदेव महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय
-या यात्रेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय
-यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांचे आयोजन करण्यात आलंय
-या वेळी महिलांचा आखाडा ही भरवण्यात आला
-येत्या 11 तारखेला किवळे इथं छकडा स्पर्धेचं ही आयोजन करण्यात आलय
त्यामुळे आता कष्टकरी ठरवतील
गुणरत्न सदावर्ते एसटी बॅंकेची निवडणूक लढवणार
चप्पला पडत नाहीत, हार पडत आहेत
ही संविधानाची ताकद आहे
हेच तुम्ही सरकार शिकलं पाहिजे
एसटी बॅंकेची निवडणूक लढणार
राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही चॅलेज देणार नाही
जामिनानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा सक्रीय
ज्यांनी ज्यांनी बॅंकेत भ्रष्टाचार केला,
त्या सर्वांना ईडी मार्फत जेलमध्ये जावे लागेल,
राज्यातून मला पुष्प माला येत आहेत,
ही आहे कष्टक-यांची निर्विवाद शक्ती,
मला जेलमध्ये टाकून ही शक्ती नामोहरण करता येणार नाही
आम्ही कष्टकर्ते,
आम्ही वयोवृद्ध राजकारण्याला चॅलेंज कशाला करू
शेतात बुजगावण्यापूर्ती ही लढाई नाही,
शरद पवार आमच्यासोबत कधी स्पर्धा करू शकत नाही
अंकुश काकडे लिखित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार पुस्तकाचे प्रकाशन
नाना पाटेकर, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलाय कार्यक्रम
शरद पवार
एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे
महापालिकेत काम करताना अनेक गमतीदार किस्से घडतात
कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो
पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होत
नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा
पुणे शहराच एक वैशिष्ट्य आहे
गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे
अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या
पुणे शहराच एक वैशिष्ट्य आहे
गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे
अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या
पण मला अजून लक्षात आलं नाही, गिरीश बापट कोठेही उभे राहतात अन निवडून येतात
एकदा बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही
आता हे पुस्तक पाहिल्यावर याच वाटत याच कारण बापट अंकुश आणि शांतीलाल यांची मैत्री आहे की काय असा संबध आहे का अस वाटत
त्या काळातलं पुणे आणि आजच पुणे फार बदललं आहे
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास 70 लाख आहे
एवढ्या लोकसंख्येचा या जुळ्या शहरात अनेक प्रश्न आहेत
पुणे जिल्ह्यात वेगवेगळे छोटे मोठे 1 कोटी पेक्षा जास्त कारखाने आहेत
एका दृष्टीने पुणे जस शैक्षणिक हब आहे तसेच रोजगार उपलब्ध करुन देणार पुणे हे महत्वाचे शहर आहे
– ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात बीजेपी सरकारने खून केला
– 2010 मध्ये कृष्णमूर्ती अहवालानंतर जनगणना करा असे आम्ही सांगितले होते
– 2016 मध्ये जनगणना संपल्यापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे
– देशात आणि राज्यात भाजप सरकार होते, फडणवीसांनी तेव्हा काही केले नाही
– दोन वर्ष आम्ही आणि तुम्ही सगळे जण मुखपट्टी लावून घरी बसलो होतो
– तुमच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर मध्यप्रदेशसह सर्व राज्य अडचणीत आली
– ट्रिपल टेस्ट पूर्ण होत नाही हे पाहून त्यांनी डेटा मागितला
– आमचे काम रात्रदिवस सुरू आहे प्रत्येक कायदा करत असतांना फडणवीसांच सहकार्य मागीतले घरी गेलो
– तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात पण आम्ही प्रामाणिक पणे काम करत आहोत आम्हाला सांगा काय करायचे ते सुचवा
– प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका
– आमचं पुढचे पाऊल म्हणजे मंगळवारी मध्यप्रदेशच्या निर्णयानंतर बघू
– आरक्षण देण्याचा प्रयतन आम्ही या निवडणुकीत करू
– ओबीसी डेटा बाठिया कमिशन करून आम्ही घेऊ
– तुम्ही सुद्धा तिथे जाऊन कसे करायचे ते सांगा
– मी बोलतोय त्यात कागदपत्राचा आधार आहे
भुजबळ ऑन राज आणि आदित्य अयोध्या दौरा –
– निवडणुका आल्या म्हणजे दौरे होणार
– पक्ष आपला अजेंडा राबविणार
– कोणी भोंगा वाजवणार तर कोणी ईतर काही करणार
– एवढेच आहे की समाजामध्ये दंगे घडवू नका
– तुम्ही येणार तेव्हा भोंगा, माईक असणारच आहे
– फक्त त्यातून महागाईवरही वाचा फोडा
– अयोध्येत शिवसेनाही त्यांच्या पद्धतीने होर्डिंग लावणार
नवनीत राणांची शिवसेनेवर जोरदार टीका
मी कोणती चूक केली, रामाचं नाव घेतले, त्यासाठी मला जेलमध्ये टाकलं
14 वर्ष मला जेलात टाकले, तरी मी उभारून येईल, जनता त्यांना येणा-या काळात धडा शिकवेल,
उद्धव ठाकरे यांनी त्यांना आवडेल त्या मतदार संघात उभे राहावे , मी त्यांच्याविरोधात उभे राहणार, जनता त्यांची जागा त्यांना दाखवेल,
मुंबईची जनता व राम भक्त त्यांना धडा शिकवेल, मी मुंबईची मुलगी!
पालिकेचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी लंकेचा -हास होणार
जिथे जिथे माझी गरज पडेल तेथे तेथे मी त्यांच्यासाठी प्रचार करणार, येणा-या काळात जनता खड्यात गाडेल त्यांच्यावर कारवाई व्हावी,
भ्रष्टाचाराने बरबरटले त्यांच्याविरोधात मी रस्त्यावर उतरणार, मी देवाचे नाव कधीही बंद करणार नाही
मी तेवढ्याच ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरणार लढण्यासाठी,
अयोध्येत असली नकली, याचा अर्थ शिवसेनेवर आत्ता वेळ आले ते सांगायची, जे अयोध्येत चाललेत ते नकली आहेत
बाळासाहेब होते ते असली होते, असली होते ते निघून चालले परंतु आता नकली राहीलेत
डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
मी ही लढाई पुढेही चालू ठेवणार
माझ्यावर जे अत्याचार जाले, लॉकअपपासून ते जेलपर्यंत , 27 पासून ते 4 तारखेपर्यंत त्रास झाला,
माझी तब्येत अजून ठीक नाही, मला मानसिक त्रास झालाय,
उद्धव ठाकरे यांना सांगते, जनतेत येऊन तुम्ही लढा, मी तुमच्याविरोधात लढेन,
बघू कोणाच्यात दम आहे, येणा-या काळात मी तुमच्याविरोधात मी उभी राहिन, जनता तुमच्याविरोधात आहे.
मी पालिकेच्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरेन
मला लॉकअपमध्ये चटई देखिल दिली नाही, महिलेला आरोग्य सेवा दिली नाही,
माझ्याविरोधात निवडणूक लढून आणि जिंकून दाखवा – नवनीत राणा
महाराष्ट्रातला कोणताही एक मतदारसंघ निवडा, मी तुमच्यासमोर निवडणुकीला उभी राहेन आणि जिंकून दाखवेन, तुम्ही माझ्याविरोधा निवडणूक जिंकूनच दाखवा
नवनीत राणा यांचं उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेंज
नवनीत राणा लीलावती हॉस्पिटलमधून बाहेर
बाहेर उपस्थित समर्थकांनी त्यांना जयश्रीरामाची शाल दिली,
हळद कुंकू लावून औक्षण केले
यावेळी समर्थकांचा शंखनाद, तसेच हनुमानाची छोटी मूर्ती दिली
राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक झालं जाहीर.
20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान
9 जूलैला वाखरी तळावर पोहोचणार पालखी
वारकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण
यंदा वारी सोहळा होणार…
चंद्रपूरच्या दुर्गापुर भागात आढळला वृद्ध वाघ,
दुर्गापूर नागरी वस्ती- सरकारी कोळसा खाणी- ताडोबा व्याघ्रप्रकल्प यांच्या सीमा आहेत लागून,
याच सीमा भागातून वाघांचे अन्यत्र होते स्थलांतर,
असाच स्थलांतरित झालेला वाघ सध्या खाण क्षेत्रात पडतोय नजरेस,
या भागातील बांधकाम मजुरांना दिसला हा वृद्ध वाघ,
वाघ म्हातारा झाल्याने या भागात सहज शिकारीसाठी नागरी भागात फिरत असल्याची शक्यता,
दुर्गापूर-उर्जानगर भागात सातत्याने होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाला हाच वाघ कारणीभूत आहे का? याबाबत वनविभाग करत आहे चौकशी,
सध्या वनपथकामार्फत वाघावर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष
वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला
काल वसंत मोरेंनी केली होती आरती
आज पुण्यातील राजमहल या ठिकाणी राज ठाकरेंची घेतायेत भेट
नाशिक -जिल्हा रूग्णालयात इपिलेप्सी शिबिर उद्घाटन सोहळा
– नाशिक चे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन
– केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांची ऑनलाइन उपस्थिती
– इपिलेप्सी आजारावर निधान व उपचार करण्यासाठी शिबिराचे आयोजन
– प्रभू राम भक्तांसाठी आनंदाची बातमी …
– डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिराच्या गर्भगृहाचे काम पूर्ण होणार,
– शिवाय त्याचवेळी प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठपणा करून मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाणार,
– एकूण १७ हजार वेगवेगळ्या प्रकारचे दगड मंदिरासाच्या पायाभरणीसाठी वापरले जाणार
– मंदिराचे एकूण ७ टप्पे असून पाच टप्प्याचे काम पूर्णत्वास आहे,
– मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कामात लक्ष घातलं आहे,
– कर्नाटक, तेलंगणा राज्यातुन दगड आणली गेलीत.
शिवसेनेला संपवण्याच काम स्वतःहा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच करत आहे….
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच शरद पवारांना मान वर करू दिली नाही…त्याचाच बदला ते आता घेत आहे.
.त्यामुळे विरोधकाना आता शिवसेना संपवण्याची गरज राहली नाही.
राहुल गांधी जशी काँग्रेस संपवत आहे. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या पायाने शिवसेना संपवत आहे.
राणा यांच्या विरोधात उतरवले शिव सैनिक हे नाशिक ठाणे मुंबईवरून मागवलेले शिवसैनिक होते..
भाजप नेते अनिल बोंडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर टीका…
बीड: शिवसेना पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बैठक
आज दुपारी 12 वाजता होणार बैठक
बैठकीला जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित राहणार
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन
– जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केलंय
– कोरोना काळ संपला असलातरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये
– सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत
– हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे
– पीक विमा,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळाले नाही
– शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावर 10 हजर भरणार हे आश्वासन देण्यात आले होते
-10 हजार तरी सोडा शेतकऱ्यांचे वीज आता सरकार कट करत आहे
– आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार सांगितले होते
– नाही दिले तर आम्ही पवार यांचे अवलाद मानणार नाही असे बोले होते
– मग आता तुम्ही कुणाचे अवलाद आहे हे पवार साहेबांनी सांगावे
– सरकारने कष्टगरी वर्गाचे चेस्था करत आहे
– दूध,कांदा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाहीये
– सरकार विरोधात जे बोलेल त्यांना गुन्हे दाखल करण्याचा काम सुरू आहे
– सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता तुम्ही काय औरंगजेबचे अवलाद आहे का संजय राऊत यांच्यावर टीका
– याच प्रश्नांवर आम्ही हा जागर यात्रा सुरू केलंय येत्या 18 तारखेला सोलापूर जिल्ह्यातील माढा मध्ये होणार आहे
On कांदा
– कांद्याला 5 रुपये वाहतूक अनुदान सरकारने तातडीने दिला पाहिजे
On शरद पवार
– सरकार सध्या बारामती वरून चालतंय
– मराठा आरक्षण देखील बारामतीकरानी घालवलं
– मराठा समजाचा वाटोला या बारामतीकरानी केलंय
– राज्याचा वाटोला या पवार अँड पवार कंपनीने केलंय
– राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली आहे
– हरबल गांजा देण्यासाठी मी शरद पवार यांना पत्र लिहून देखील मला अजून मिळाले नाही
– पवार यांच्याकडे हा हरबळ गांजा फक्त नवाब मलिक यांच्यासाठी आहे का
– आम्हाला पण ते गांजाचा बियाणे द्यावे आम्ही शेतकऱ्यांना देऊन पेरणी करू पण आम्हाला अजून मिळाले नाही
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोठ्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला, तायाचूनंच नागपूरात आयआयएम साकार झालंय
– आयआयएम नागपूर ला मंजुर झाल्यानंतर वाद झाला, कुणी म्हटलं औरंगाबाद आणि नाशिक आयआयएम चा प्रस्ताव होता. पण प्रस्ताव फक्त नागपूरचा होता
– मिहानमध्ये १५० जमिन दिलीय, प्रधानमंत्री यांच्या हस्ते भुमिपुजन झाले, आणि आज लोकार्पण होतेय.
– नागपूरात एम्स आणलं, ट्रीपल आयआयटी, लॅा स्कुल यासारख्या मोठ्या संस्था नागपूरात आणल्या
– आज नागपूर शिक्षणाचं हब बनलंय
– जिथे मानव संसाधन असेल तिथेच उद्योग येतात. आयआयएम ने जागतिक स्तरावरचे ह्युमन किसोर्चेस तयार केलेय
– आयआयएममुळे लवकरंच नागपूर जगाच्या नकाशावर आपले नाव कोरणार
– नॅशनल लॅा युनवर्सीटीला ६०० कोटी रुपये आम्ही दिले जागा पण दिली, पण त्यांनी नॅशनल लॅा युनवर्सीटीच्या भुमिपुजनाला बोलावलं नाही, नाही उद्घाटनाला बोलावलं
अयोध्येत आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी तयारी
त्याची तारिख जवळ-जवळ फिक्स झाली आहे
हा आमचा राजनैतिक दौरा नाही
उत्तरप्रदेशात कोणी बॅनर लावले माहित नाही
तिथली जनता सुजान आहे
असली आणि नकली त्यांचं ते बघतील
साधारण १० जून ही तारीख आमच्यासाठी फायनल ठरत आहे
आम्ही श्रध्दा आहे
अयोध्येची जनता सुजान त्यामुळेचं ‘असली नकली’चे बॅनर
संजय राऊत चवनी छाप आहे आहेत.
आमच्या घरावरती अमरावतीला हल्ला झाला
शिवसेनेचा कार्यकर्त्यांना आदेश दिला होता हल्ला करायचा
त्यानंतर आम्हाला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे
दिल्लीमध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या फायली पुढे आल्या आहेत
त्यावर कारवाई केली पाहिजे
मुख्यमंत्र्यांवर सुध्दा कारवाई करायला पाहिजे
चवनी छाप सारख्या गोष्टी संजय राऊत करीत आहेत
महाराष्ट्राचं सरकार सुडाचं काम करीत आहे
रावणाचा सुध्दा अहंकार टिकला नाही
सांताक्रुझ पोलिसांनी आमची अवस्था वाईट केली
रात्री बारानंतर कोणतीही व्यवस्था केली नाही
ऍड गुणरत्न सदावर्ते आता एसटी बँकेची निवडणूक लढवणार…
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटीच्या कामगारांचा ५ महिने संप केल्यानंतर
आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटीच्या बँकेची निवडणूक टार्गेट केली आहे….
याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहेत…
सदावर्ते स्वतःचे पॅनल उभारणार
वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत…
मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट
नव्हते. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत….
सदावर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले स्वतःचे पॅनल उभे करणार आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे…
एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित
एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग
फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील, अशी शक्यता वर्तवली आहे…
राज्यात डीवायएसपी अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्याचा राज्य सरकारचा निर्णय ?
राज्यातील 93 डीवायएसपी अधिकाऱ्यांकडून मागवले पहिले तीन पसंतीक्रम
निर्णयामुळे डीवायएसपींमध्ये संतापाची भावना
मुदत पुर्ण होण्याआधीचं पसंतीक्रम कसे मागवले ?
पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप ठरल्याची पोलिसांची भावना
राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी 6 मे रोजी बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केलीये
मुदतीआधीचं बदल्या कशा ? असा सवाल आता अधिकारी विचारताये
राज ठाकरे खाजगी कामाचा दौरा आटोपून आज मुंबईला रवाना होण्याची शक्यता
मात्र पुण्यात येताचं मनसैनिकांसाठी पत्रक केलं प्रसिद्ध
अयोध्या दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांशी कोणीही बोलू नये दिल्या सूचना
राज ठाकरेंनी काढलेल्या पत्रकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा,
राज ठाकरे आथ मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे
पुण्यातील राजमहल या निवास्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
नाशिक – शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा
शहरात सुमारे 15 हजार अनधिकृत फेरीवाले असल्याचा मनपाचा अंदाज
शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंग प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कारवाई
अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाल्यांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश
नाशिक – गंगापूर धरण जलवाहिनीसाठी प्रकल्प अहवालाची तयारी
विस्कळीत पाणीपुरवठा समस्या सुटणार
केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगातून नाशिक मनपाला जलवाहिनी साठी 224 कोटी
धरणातून नाशिक शहरात पाणी आणण्यासाठी थेट जलवाहिनी
यात्रेत फटाके उडवण्याच्या कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी
शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी गावातील घटना
पालखीसमोर फटाके उडवण्याचा कारणातून दोन गट भिडले
झालेल्या दगडफेकीत युवती सह दोघेजण जखमी
हणामारी,दगडफेक प्रकरणी 23 जणांविरोधात कुरुंदवाड स्टेशनला गुन्हा दाखल
गावात वाढवला पोलीस बंदोबस्त,तणावपूर्ण शांतता
कचऱ्या पेटवायला गेले अन चारचाकी पेटवुन आले.
शहरातील ए- वन लॉन समोरिल घटना..
अज्ञात व्यक्तिने कचऱ्याला लावलेल्या आगेचे लोट बाजूला ठेवलेल्या मारुति व्हेन पर्यत्न पोहचल्याने व्हेन ला ही आग लागून काही खाक झाल्याची विचित्र घटना शहरातील ए- वन लॉन समोर मध्यरात्रि घडली आहे.
पेटलेली गाड़ी ही कबाड़ी ची असल्याने गाड़ी मालकाला मात्र आर्थिक नुकसान झाले नाही.वेळीच अग्निशमन दल पोहल्याने आगिवर नियंत्रण मिळविन्यात यश आले.
नाशिक – आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा दोन टप्प्यात
19 मे पासून परीक्षेला सुरुवात
राज्यभरातील केंद्रावर 2200 विद्यार्थी प्रविष्ट होणार
परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
नाशिक – मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना हद्दपारीची नोटीस
10 दिवस शहरातून बाहेर राहण्याचे पोलिसांचे आदेश
दातीर यांना कालच पोलिसांनी केली होती अटक
अटकेनंतर आता दातीर यांच्या वर हद्दपारीची कारवाई
राज्यात पुन्हा उकाडा वाढणार
विदर्भात 11 मे पर्यंत उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार
बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या वादळाचा महाराष्ट्राला प्रत्यक्ष परिणाम नाही
मात्र तापमानात वाढ होणार हवामान विभागाचा अंदाज
तर पुण्यातील तापमानही चाळीशीच्या जवळ गेलंय काल पुण्यात 39 .6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये
पावसाळ्यापूर्वी महापालिकेनं खबरदारी घेऊन उपाययोजना करायला सुरुवात
पडक्या अवस्थेत असलेल्या 14 धोकादायक वाड्यांना नोटीसा देऊन उतरवण्यात आलंय 7 वाडे उतरवले जाणार आहेत
तर धोका असलेल्या 245वाड्यांना महापालिकेनं नोटीसा दिल्यात
पावसाळ्यातील घटना टाळण्यासाठी महापालिकेनं आतापासूनच कार्यवाही करायला.सुरुवात केली आहे
राज्यात तंत्रशिक्षण परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने होणार सुरुवात
पहिल्यांदाच पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन
एका पेपरनंतर मिळणार दोन दिवसांची सुट्टी
तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
उद्यापासून परीक्षेला होणार सुरुवात
हा निर्णय फक्त उन्हाळी परीक्षांसाठी घेण्यात आलाय…
बंगालच्या उपसागरात वादळ पट्टा निर्माण होतंय
त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे
आज संध्याकाळपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडीसाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय
वाऱ्याचा वेग ताशी 75 कि मी असण्याची शक्यता आहे
मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय समुद्रकिनारी जाछ नये असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आलाय
– राष्ट्रपती रामनाथ कोवींद आज नागपूर दौऱ्यावर
– राष्ट्रपतींच्या हस्ते आज आयआयएम नागपूर कॅम्पसचं उद्घाटन
– सकाळी ९.१५ ला राष्ट्रपती नागपूर विमानतळावर येणार, १० वाजता कॅम्पसचं उद्घाटन
– राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी दोन हजार पोलीस तैनात
– राष्ट्रपतींच्या मार्गावर ठिकठिकाणी असणार पोलीस तैनात
अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 120 फेरीवाल्यांना ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू….
अमरावती शहरात एकूण 3 हजार 432 फेरीवाले….
फेरीवाल्यांचे मोबाईल अप्स व बायोमेट्रिक पध्दतीने केले सर्वेक्षण….
2019 मध्ये एका संस्थेच्या माध्यमातून फेरीवल्याचे सर्वेक्षण….
– माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त आ. रोहीत पवार यांचा काटोल दौरा
– ९ मे रोजी आ. रोहीत पवार यांचे काटोल मतदार संघात विविध कार्यक्रम
– अनिल देशमुख कारागृहात असल्याने आ. रोहित पवार करणार विकास कामांचं भुमीपूजन
– काटोल मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन साजरा करणार अनिल देशमुख यांचा वाढदिवस
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात 51.29 जलसाठा…
मागील वर्षीच्या तुलनेत 4 टक्के अधिक जलसाठा शिल्लक; मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यास जलसाठा कमी होण्याची भीती..
पश्चिम विदर्भातील मोठ्या, मध्यम आणि लघु पाणी प्रकल्पात एकूण 40 टक्के जलसाठा…
यंदा पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरले होते अप्पर वर्धा धरण…