मुंबई : आज सोमवार 9 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याच्या मुंबईतल्या घरावर मुंबई महानगरपालिका कारवाई करण्याच्या बेतात आहे. मुंबई महानगरपालिकेने त्यांना तशी नोटीस दिली आहे. आज मुंबई महानगरपालिका त्यांच्या घराची पाहाणी करणार आहे. या घरात अवैध बांधकाम झालं असल्याचा संशय असल्यामुळे अधिकारी ही पाहाणी करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ही आग 14 व्या मजल्यावर लागली आहे., मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लेव्हल 2 ची आहे,
अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या आगीमुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मेळघाटातून मध्यप्रदेश कडे लग्नाची वरात घेऊन जाणारा ४०७ ट्रक पलटी…
एका ५५ वर्षीय वऱ्हाडीचा मृत्यू ; ६ ते ७ वऱ्हाडी गंभीर जखमी….
धारणी तालुक्यातील राणी गावाजवळ घाटात झाला ट्रक पलटी…
जखमी वऱ्हाडीना केले तात्काळ रुग्णालयात दाखल….
– राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी उद्या बैठकीचे आयोजन,
– अयोध्यातील साधू संतासह परिसरातील 50 हजार उत्तर भारतीय नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा,
– ब्रिजभूषण सिंह नवाबगंजमधील निवासस्थानापासून ते नंदिनीनगर काढणार रॅली,
– उद्याच्या बैठकीत राज ठाकरेंना कसं रोखायचं यासंदर्भात ठरणार रणनीती.
सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली बैठक
जवळपास पाऊण तास चालली बैठक
चर्चेचा तपशील कळू शकला नाही
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब होते बैठकीला उपस्थित.
दोन आठवड्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत आदेश.
सोने पळविणे, भाविकांना शिवीगाळ व न्यायाधीश यांच्याशी वाद घालणे भोवले
6 महिने प्रवेश बंदी का करू नये अश्या लेखी नोटीसा बजाविण्यात आल्या
भाविकांनी देवीला अर्पण करण्यासाठी दिलेले सोने पळविणे, भाविकांना विनाकारण शिवीगाळ करणे व न्यायाधीश यांच्याशी वाद घालणे या पूजाऱ्यांना चांगलेच भोवले
भाविकांनी केलेल्या तक्रारी व सीसीटीव्ही फुटेज आधारे ही कारवाई
पुजारी दत्ता सुभाष बर्वे, नवनाथ आबासाहेब पिसे, संभाजी नेताजी क्षीरसागर व अरविंद अपसिंगेकर अशी या 4 पुजाऱ्यांची नावे
– राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची मनधरणी करण्याचा प्रयन्त,
– भाजपकडून आता मध्यस्थी केली जाण्याची शक्यता,
– केंद्रीय पातळीवरुन भाजपकडून प्रयन्त सुरू,
– केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांनी केला बृजभूषण सिंह यांना केला फोन,
– शहानवाज हुसेन यांचा फोन घेण्यास बृजभूषण सिंह यांनी दिला नकार
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ही महान व्यक्तीमत्व आपल्या भागात होऊन गेले याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे
1995 ला इथं आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच स्मारक बांधल
आज पाहतोय तर इथं दरवाजाचा नाही, कुठं गेला काय माहिती
गावकऱ्यांची जबाबदारी नाही का…? सरकार जे देत त्याची व्यवस्था नीट ठेवायची?
आत्ता आमदार संजय जगताप यांनी मोठी यादी वाचली…हे पाहिजे ते पाहिजे….आम्ही देऊ हो….पण ते व्यवस्थित ठेवायची जबाबदारी गावकऱ्यांची नाही का…?
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या दुरावस्थेवरुन अजित पवारांनी टोचले गावकऱ्यांचे कान
पुण्यात पंडीत भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने संगीत महोत्सवाचं आयोजन
सांस्कृतिक कार्य संचालनायाकडून संगीत महोत्सवाचं आयोजन.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख थोड्या वेळात करणार उद्घाटन
उदयपूर मध्ये होणाऱ्या चिंतन शिबिराबाबत महत्वपूर्ण बैठक
कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेही सीडब्ल्यूसी मध्ये दाखल
गडचिरोली- देसाईगंज तालुका काँग्रेसचे वनाधिका-यांना घेराव आंदोलन
देसाईगंज तालुक्यात मागील दोन महिण्यांपासुन धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा,या मागणीला घेऊन आज देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने वडसा वन विभागाच्या अधिका-यांना घेराव घालुन आंदोलन करण्यात आला. दरम्यान आंदोलनाला सामोरे जाताना युद्धस्तरावर नरभक्षक वाघाचा शोध घेणे सुरू असुन येत्या आठ दिवसात सदर वाघास जेरबंद करुन इतरञ हलवण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे आश्वासन वडसा वन विभागाचे सहाय्यक उप वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
कोल्हापुरात शरद पवार खासगी दौऱ्यावर
कोल्हापुरातील नातेवाईकांच्या भेटी घेणार
आज 43.6 या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आलीय ,
वाढलेल्या उन्हाचा तडाखा परभणीतील नागरिकांना .
दुपारच्यावेळी रस्ते निर्मनुष्य झालेत.
चंद्रपूर:- आपल्यावर झालेल्या अन्यायाच्यासंदर्भात आवाज उठवणे हा खासदार राणा यांचा अधिकार
राणा दाम्पत्य अटक प्रकरणात जामीन देताना न्यायालयाने या प्रकरणाबाबत मीडियाशी बोलता येणार नाही अशी अट टाकली होती.
मात्र त्यानंतर ही राणा दाम्पत्य मीडियाशी बोलले यावर वाद निर्माण झाला आहे.
त्यावर भाष्य करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कोर्टाने त्यांना मौन बाळगा असे म्हटलेले नाही याकडे लक्ष वेधले.
आपल्यावरील अन्यायाबाबत बोलावेच लागेल असे ते म्हणाले
बालगंधर्व कोणासाठी पाडताय ?.
बालगंधर्व पाडण्यास आम आदमीचा विरोध
बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आंदोलन सुरू
ब्रेक – नवनीत राणा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाणार…
– कार्यकर्ते हार शाल आणि जय श्री रामची शाल टाकून करणार सत्कार…
– काही वेळात दिल्लीतील निवासस्थानी पोहोचणार रांणा दांपत्य…
बालगंधर्व रंगमंदिर पाडलं जाणार जवळपास निश्चित
मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडू नका नाट्यकर्मी, निर्मात्यांची मागची
महापालिकेचीच तीन नाट्यगृह ही बंद पडायच्या अवस्थेत आलीत
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या अवस्थेसारखं नाही
बाजूला विकास करा मात्र बालगंधर्व पाडू नका याला आमचा विरोध असेल घेतली भूमिका
पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 26.45 लाख रुपयांचे सोने जप्त केले
गेल्या दोन ते तीन वर्षात पुण्यात दुबईहून कच्च्या सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले
दुबईहून स्पाईस जेटच्या फ्लाइटने आलेल्या दोघा प्रवाशांना रोखले
त्याची अधिक तपासणी केली असता, त्याच्याकडे कच्च्या सोन्याच्या बांगड्या आणि चैनीच्या रूपात 500 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे म्हणजेच 26.45 लाख रुपये किंमतीचे तस्करी केलेले सोने आढळून आल
या प्रवाशाकडून सर्व सोने जप्त करण्यात आले असून, संबंधित दोघांनाही सीमा शुल्क कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास पुणे पोलिस करत आहेत
संसदेच्या विशेषाधिकार समिती समोर होणार सुनावणी
राणा यांच्या पत्राची दखल केंद्र सरकारने घेतली
राणा यांचं म्हणणं समिती ऐकून घेणार
त्यानंतर समिती विरोधात असलेल्या व्यक्तींना बोलावणार
गुणरत्न सदावर्तेंकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या नव्या संघटनेची घोषणा
एसटी कष्टकरी जनसंघ असे नव्या संघटनेचे नाव
माझ्या घरावरील कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून
आमचं मुंबईत एकच घर आहे
शिवसेनेच्या नेत्यांसारखी आमच्याकडे दहा घरं नाही
यांनी जाऊन पाहवं आणि हवं तर संजय राऊत आणि अनिल परबांनाही घर नेऊन दाखवावं
कारण आता त्यांना तेवढेच काम उरले आहे
यांनी मनमानी सुरू केली
दोन लोकांनी हनुमान चालीसा वाचण्याने सरकार पडेल असे कोर्टात सांगतात
तर सरकार पाडायची गरज नाही जनता या सरकारला त्यांची जागा दाखवले
हनुमानाने लंका जाळली, तशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे
मी तीनवेळा शिवसेनेच्या उमेदवरांना हरवलं
मी लोकांची सेवा करतो
मागच्यावेळी यांनी मला जेलमध्ये टाकलं
उद्धव ठाकरेंंना ग्राऊंड लेव्हलचं शून्य नॉलेज आहे
कोणतं पिकं येतं, कोणतं खत लागलं काही यांना माहिती नाही
उद्धव ठाकरेंनी हवा तो मतदारसंघ निवडूण लढून दाखवावं
लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील
आम्हाला कोर्टाने जे आदेश दिले त्याचे पालन केले आहे
मी कोर्टातील प्रक्रियेबाबत बोलत नाही
हनुमान चालीसा वाचल्यास सरकार पडू शकते असे म्हणाले
पण आमच्यासोबत जे घडलं त्याबाबत बोलण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला
राजकारणात आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे
मी कोर्टाच्या निर्णयाबद्दल काहीही बोलले नाही
मी प्रत्येक गोष्ट कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करत आहे
हनुमान चालीसा वाचण्यासाठी आम्हाला भाजपच्याा आधाराची गरज नाही
त्यांची सत्ता आहे, त्यामुळे ते सत्तेचा दुरोपयोग करत आहेत.
माझ्या घरावर कारवाई ही सत्तेचा दुरोपयोग
राज्यात अनेक लोकांची घरं तोडली
मात्र जिथं लोकांचं ट्रिटमेंट होते तिथे जाऊन हे करू नये
हे रुग्णालयापर्यंत पोहोचले हेही सुडबुद्धीने
उद्या उद्धव ठाकरे यांनी लिलावती तोडले तरी आश्चर्य नको वाटायला
यांनी आधी यांच्या कामाचे रिपोर्ट द्यावे,
उद्धव ठाकरे दोन वर्षे मंत्रालयात का गेले नाही याचा रिपोर्ट द्यावा
उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या आजारपणाचे रिपोर्ट द्यावे
आमचे असे वयक्तीक डॉक्युमेंट मागण्याचा यांना अधिकार नाही
मला बेघर केलं तरी मी माझी लढाई लढणार
त्यासाठी मी जाऊन लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे
नवनीत राणा राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर निवडणून आल्या
आता त्या काय करत आहेत
राजकारणात काहीतरी नीतिमत्ता ठेवली पाहिजे
शिवसेना संपवतो म्हणणारे संपले पण शिवसेना संपली नाही
कायदा कोण मोडणार असेल तर कारवाई तर होणार
त्यांची सर्व ॲक्टींग पिक्चर मध्ये चालेल सामाजिक जीवनात हे चालत नाही.
त्यामुळे त्यांना महत्व देण्यात अर्थ नाही
मुख्यमंत्री सक्षम आणि ठाम आहेत
आरोपांना ते उत्तर देत नाहीत मात्र आपल्या मतांवर ठाम असतात
शिवसेना ही राज्यातील सर्वात मोठा पक्ष आणि एक हाती सत्ता घेईल
शिवसेनेवर आरोप करायचं आणि मोठं व्हायचं हे आता सोडून द्या
14 तारखेची सभा भव्य होणार
ईडी कारवाई, सत्ता गेल्यामुळे आलेले पोटतिडीक यावर मुख्यमंत्री बोलतील
शिवसेनेवर आरोप करणाऱ्या नालायकांना संरक्षण दिलं जातं यावर ही ते बोलतील
……….
On राज ठाकरे
राज ठाकरे हे काळ आणि परिस्थिती बघून बदलत असतात
त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये
देशावर प्रेम करणारा व्यक्ती आमच्या साठी हिंदू
………
On मनसे
नगरसेवक आमदार का गेलं याचा विचार राज ठाकरे यांनी करावा
पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना वेळ द्यायला वेळ नाही
काहीतरी कारण काढून तुम्हाला प्रकाशझोतात यायचा आहे
तुमची वाणी म्हणजे कृती नव्हे
पक्ष म्हणून सांभाळला असता तर आज 40 ते 45 आमदार तुमचे असते
तुम्ही फक्त चमकेशगिरी करता
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
महाविकास आघाडी बरोबर सत्तेत जाण्याची परिस्थिती भाजपने आमच्यावर आणले
काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेतलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही
राज ठाकरे तुम्ही स्वतःच्या पक्षा कडे लक्ष द्या,कार्यकर्त्यांना वेळ द्या
तुम्हाला मत मिळू शकत नाहीत
तुम्ही सभांचा मॅनेजमेंट करा आणि तुमचं नाव आबादीत ठेवा
नवनीत राणांचा MRI, लिलावतीच्या डॉक्टरांना शिवसेनेचे 20 प्रश्न
01. नवनीत राणांचा MRI दरम्यानचे फोटो कसे बाहेर आले?
02. MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते, तिथं इतके लोक का?
03. ही रुम निर्जंतुक असणं गरजेची असते, तरीही बाहेरचा व्यक्ती आत कसा?
04. MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते, तरीही मोबाईलने फोटो कसे क्लिक केले?
05. नवनीत राणांचा MRI सुरु असताना फोटो काढले, त्यावेळी अपघात झाला असता तर त्याला जबाबदार कोण?
09. फोटो काढताना MRI मशीन बंद नव्हती कशावरुन? फक्त फोटोसेशनसाठीच नवनीत राणा तिथं गेल्या नसतील हे कशावरुन?
10. लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं कसं सुरु होतं?
11. MRI सुरु असताना सगळे लांब असतात, इथं सगळे जवळ कसे उभे दिसतात?
12. नवनीत राणांचा MRI रिपोर्ट अद्याप कसा आला नाही?
13. नवनीत राणा घाबरल्या होत्या, तर त्यांचे पाय का बांधण्यात आले नाहीत?
14. पोटाचा MRI काढला गेला असेल, तर त्यांच्या पोटाला बेल्ट का नव्हता?
15. नवनीत राणांना जर मानही उचलत नव्हती, तर त्या लगेच बाहेर येऊन कशा बोलल्या?
16. स्पॉन्डिलीसीसाठी खरंच MRI ची गरज होती का?
17. मानदुखीचा त्रास होत असेल, तर नवनीत राणांना उशी कशी दिली?
18. राणांचे फोटो बाहेर आल्यानंतरही लिलावतीत दोषींची चौकशी का झाली नाही?
19. MRI वेळी रुग्णालयाचे सिक्युरिटी हेडही रुमध्ये होते, मग हे कसं घडू दिलं?
20. लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं, त्यांच्यावर कारवाई का होऊ नये?
अजून कोणी कोणाचा व्हिडीओ घेऊ शकतो
आम्ही त्यांना भगवान मानतो
त्यांच्यावरती कुणी दबाव आणला असेल त्यांनी स्पष्ट सांगावं
ज्यांच्याकडे बंदुक आहे, अशी लोकं सु्ध्दा इथं आली होती
लिलावती हॉस्पीटलमध्ये जे काही झालं ते चुकीचं होतं….
त्याचा आजार काय होता किंवा काय ते न्यायप्रविष्ठ आहे
रूग्णालयात अतिशय कडक नियम असतात
तिथं तुम्हाला मेटल अजिबात चालत नाही
अशा एका सेन्सीटिव्ही होण
कायंदे पेडणेकरांनी रूग्णालयाला छापलं
कुणाचं स्प्रेशर आहे का ?
स्पीकरवरती आदेश दिला जातो
कुणाला त्रास द्यायला आलेलो नाही
01. नवनीत राणांचा MRI दरम्यानचे फोटो बाहेर आले
02. MRI रुममध्ये रुग्ण आणि डॉक्टरांशिवाय इतर कुणालाही जाण्याची परवानगी नसते.
03. ही रुम निर्जंतुक असणं गरजेची असते
04. MRI मशीनजवळ कुठलाही धातू वा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नसते.
05. मात्र, तरीही नवनीत राणांचे फोटो काढणारा व्यक्ती आता आला.
06. त्याने मोबाईलने नवनीत राणांचे फोटो काढले.
07. दरम्यान, याचवेळी नवनीत राणा यांचा MRI सुरु होता, म्हणजे MRI मशीन सुरु होती.
08. MRI काढताना दुर्घटना होण्याची शक्यता होती.
09. असं नसेल, तर नवनीत राणा यांचा खोटा MRI काढल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांचा आहे.
10. लिलावतीत नातेवाईकांनाही जाताना अनेक निर्बंध लावले जातात, मात्र इथं सर्रास सगळं सुरु होतं.
उसाला एकरी 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी छावा संघटनेचे आंदोलन
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आंदोलन सुरू
छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित
उसाचे टिपरे घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी
– अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवप्रेमींनीचा मोर्चा..
– शेकडो शिवप्रेमी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर..
– दर्यापूर मधील गांधी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परवानगी देण्याची मागणी..
– १३ मे रोजी दर्यापूर येथे शेकडो शिवप्रेमी आत्मदहन करणार..
– १२ मे पर्यंत शिवरायांच्या पुतळ्याला परवानगी देण्याची मागणी..
– शिवरायांच्या पुतळ्यासाठी दर्यापूर मधील शिवप्रेमीचा आक्रमक पवित्रा..
औरंगाबाद शहरात पाण्याच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढला जाणार भव्य मोर्चा
मोर्चाला भाजपचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता
मे महिन्यातच काढणार पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असल्याची सूत्रांची माहिती
किशोर पेंडणेकर लिलावती रूग्णालयात दाखल
किशोरी पेंडणेकरांनी प्रशासनाला छापलं
नवनीत राणाचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही
सीसीटीव्ही आम्हाला दाखवावं
आज नवघर पोलिस स्टेशनमध्ये संजय राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे
मेधा सोमय्यांकडून राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे
मुंबई पोलिसांना माझी समज आहे
पोलिसांना कारवाई करावीचं लागेल
पंधरा दिवसांपासून मी राऊतांना चॅलेज करतोय
मुंबई पोलिस कमिशनरांनी चौकशी करावी
महागाईविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचं आंदोलन
शिवाजी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वात आंदोलन
रिकामे सिलेंडर रस्त्यावर ठेवत केला महागाईचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी
किरीट सोमय्यांवर आणखी एक आरोप
सोमय्यांविरोधात धर्मादाय आयुक्त चौकशी करणार
मी काहीकाही असेल माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या
मी परत सांगतोय मी
विक्रांत घोटाळ्यावर जामीनावर सुटलोय
भारतीय जनतेचं डोकं ठिकाण्यावर आहे का ? हे लवकरचं स्पष्ट होईल
राणा दाम्पत्याचा विषय कोर्टात आहे
वसुलीचा सुत्रधार हाचं आहे.
जे ही माझ्यसोबत घडलं ते मुख्यमंत्र्यांच्या गुंडांनी केलं आहे
वीस फुट खड्डयात गाडण्याची संजय राऊतांनी भाषा केली आहे
जे माझ्यासोबत घडलं ते वाईट होतं
कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं
आम्ही हनुमान चाळिसा वाचून
आमच्यासोबत जे काही घडलं
देशाचे आमचे गृहमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहोत
दादा तुम्ही मुख्यमंत्री असायला हवं
कोर्टाच्या प्रकरणावरती कोणीही बोलू नये…
शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्यां घराची मोडतोड केली होती.
आज आला आहात तर चौकशी करून घ्या
आमचा फ्लॅट पाहून कोणतीही कारवाई करा
मुख्यमंत्र्यांनी माझ्या घराची पाहणी केली
साडेबारा नंतर आम्हाल लॉकअपमध्ये नेण्यात आलं आहे
रात्री आम्हाला खूप त्रास दिला
अजित दादांनी सगळ्या प्रकरणाची माहिती घ्यावी
अजित दादांनी सगळ्या प्रकरणाची
आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही दिल्लीत थांबणार
दिल्लीत आम्ही आमच्यावरती झालेल्या अन्यायाचा न्याय मागण्यासाठी निघालो आहे
नवनीत राणाला सकाळी पाचवाजेपर्यंत थांबवण्यात आलं
संविधानाचा आम्ही अवमान करीत नाही
हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरेंबद्दल देशभरात आदर…
मात्र त्यांनी सत्तेसाठी कधी विचारांची तडजोड केली नाही…
मात्र आज शिवसेनेने तडजोड केली…
त्यांचा प्रवक्ता जे बोलतोय ते बाळासाहेबांचे विचार संपवण्यासाठीच बोलतोय…
राधाकृष्ण विखे पाटलांनी साधला संजय राऊतांवर निशाणा…
मला आदित्य ठाकरेंची कीव वाटते…
ते राजकारणात नवीन, त्यांना अजून बरंच काही शिकायचंय…
त्यांनी चांगल्या लोकांकडून धडे घेतले पाहिजे…
विखे पाटलांचा आदित्य ठाकरेंना सल्ला…
केवळ राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणून मी जाणार याने तुमचे हिंदुत्व सिद्ध होत नाही…
सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही ज्या तडजोडी केल्या…
त्याबद्दल राज्यातील जनता शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही…
विखे पाटील बाईट ऑन मुख्यमंत्री मास्क उतरवणार
मुख्यमंत्री मास्क उतरवणार याचा आनंद…
कारण दोन वर्ष लोकांना मुख्यमंत्री पाहायला मिळाले नाही…
ते इतरांचे काय मास्क उतरवतील माहीत नाही..
मात्र आता ते स्वतःचा मास्क उतरवत आहे तर विजेच्या प्रश्नावर बोलावे…
लोकांचे कनेक्शन कट करून वाताहत केली, एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या…
महाराष्ट्रातील जनतेला कुठल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळताना दिसत नाही…
मुंबई सोडले तर अन्य शहरातील व्यापाऱ्यांना करात सवलत मिळाली नाही…
मुख्यमंत्र्यांनी मास्क काढल्यामुळे किमान या प्रश्नांवर बोलावे अशी अपेक्षा…
अनेकांचे मास्क उतरवणार या वक्तव्यावर विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला…
विखे पाटील बाईट ऑन शेतकरी ५० हजार अनुदान
महाविकास आघाडी सरकारकडून जनतेला अपेक्षाच राहिल्या नाहीत…
नियमित कर्ज भरणाऱ्या शेकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही जमा करणार होता…
आम्ही अर्थ संकल्पात मागणी केली मात्र पुन्हा गाजर दाखवण्यात आले…
कोणत्याच विषयात सरकार गंभीर नाही…
राज्य सरकार व्हॅक्सीनेशन मोफत करणार होते पण शेवटी मोदी साहेबांना द्यावे लागले…
मात्र महाराष्ट्र व्हॅक्सीनेशनमध्ये पुढे हा पाठ थोपटून घेण्याचा प्रकार…
मात्र ही मोदी साहेबांची कृपा असून कोते पणा मनात ठेवून राज्य करता येत नाही…
केंद्र सरकार देशातील जनतेला मोफत धान्य देतंय मात्र राज्य सरकारचे काय योगदान..?
फक्त सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक प्रयत्न करत आहेत…
भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असून प्रत्येक मंत्री मुख्यमंत्र्यासारखा वागतोय…
राज्य कोण चालवतय याबद्दल लोक संभ्रमात…
विखे पाटलांची महाविकास आघाडी सरकारवर टिका….
कोल्हापूर शहरात उभारली जाणार पहिले इनडोअर स्टेडियम
इंनडोर स्टेडीयम साठी दहा कोटींचा निधी मंजूर
पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
नियोजित इनडोअर स्टेडियम चा आराखडा तयार
पाच एकर जागेत होणार स्टेडियम
आयटी पार्क किंवा शेंडा पार्क मधील जागा लवकरच निश्चित होणार
हॉलीबॉल,फुटबॉल क्रिकेट बघता सर्व खेळ आता कोल्हापुरातील क्रीडाप्रेमींना पावसाळ्यातही खेळता येणार
नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत एकाची हत्या….
स्वीपर कॉलनी भालदार पुरा परिसरात मध्यरात्री एका युवकांची हत्या…
अंकुश तायवाडे असे हत्या झालेल्या युवकांचे नाव…
हत्याचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलीस घटनास्थळी दाखल असून तपास करीत आहे
महानगरपालिकेच्या कचरा संकलन डेपोला मोठी आग,
संपूर्ण कचरा संकलन डेपोच आगीच्या विळख्यात,
चंद्रपूर शहराच्या सीमेवर बल्लारपूर वळण मार्गावर आहे कचरा संकलन डेपो,
कचरा वर्गीकरण संयंत्रासह संपूर्ण यंत्रसामग्री आगीच्या विळख्यात,
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र- चंद्रपूर मनपा -बल्लारपूर नगर परिषद आदी ठिकाणांहून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल,
आगीचे नेमके कारण मात्र अज्ञात,
गेले तासभर अग्निशमन पथकांकडून आग विझवण्याचे काम आहे सुरू ,
मागील भाजपच्या सत्ताकाळात चंद्रपूर नगर महानगरपालिकेच्या या कचरा संकलन डेपोची उत्तम व्यवस्थापन केल्याने झाली होती प्रशंसा
रोहित पवार बाईट –
ऑन सुजय विखे –
कर्जत जामखेड मधील अधिकार्यांवर माझा दबाव नक्कीच आहे… सामान्य लोकांची काम करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच… आमदार एवढा काम करत असेल आणि लोकांच्या हितासाठी लोकात जाऊन काम करत असेल… तर को-ऑर्डिनेशन चा काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच… मुळात ते पीए नाही तर कॉर्डिनेटर आहेत… कदाचित सुजय विखे ना हेच सांगायचं होतं की त्या ठिकाणी अतिशय चांगला काम सुरू आहे… आता काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत आहेत.
ऑन अयोध्या भेट –
कुठल्याही धार्मिक स्थळावर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो.. अयोध्या सह अजमेर, वाराणसी, पुष्कर, आणि सारनाथ ला ही जाऊन आलो.. मन प्रसन्न झालं… ही कौटुंबिक व्हिजिट होती… जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जातात तसेच मी पण कुटुंबासह गेलो होतो…
ऑन अनिल देशमुख वाढदिवस –
अनिल देशमुख आपले सर्वांचे नेते आहेत… मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.. त्यांच्या मतदारसंघात अतिशय चांगली काम झाली आहे…
पर्यावरणप्रेमी कडून नवी मुंबईत पहिल्यांदा फ्लेमिंगो महोत्सव भरवण्यात येणार
Anchor : नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी १४ मे रोजी शहरात फ्लेमिंगो महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील अशा प्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच असणार आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेने नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच फ्लेमिंगोचे महत्व पटवून देणे त्यांच्यासाठी असलेल्या जागेचे सर्वेक्षण करून अधिक माहिती जमा करणे. यासाठी हा महोत्सव भरवण्यात येणार आहे.
बियर शॉपितील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याची बेदम मारहाण
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने केली बेदम मारहाण
भारत दोंड असं ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव
गावगुंडासारखी केली ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील बियर शॉपित घडला धक्कादायक प्रकार
घटना घडून दोन दिवस उलटले तरी अधिकाऱ्यावर कारवाई नाही
नाशिक – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धरला संगीताच्या तालावर ठेका
पारंपरिक बोहाडा उत्सवात झिरवाळ झाले सहभागी
संबळ च्या तालावर ठेका धरत आणि पांडवांचा मुखवटा धारण करत आदिवासी सणांचं घडवलं दर्शन
दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव इथे पारंपरिक बोहाडा उत्सवाला झालींय सुरुवात
बोहाडा उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा
पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरावर तीव्र चक्री असानी वादळ पोहोचलंय..
10 मे पर्यंत वायव्येकडे सरकून उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनार्यापासून पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
त्यानंतर ते ओडिशाच्या किनाऱ्यापासून वायव्य बंगालच्या उपसागराकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत हळूहळू कमकुवत होऊन चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे
असानी चक्रीवादळाचा आंध्रप्रदेश, ओडीशा किनारपट्टीला धोका आहे.
-उच्च मधुमेह आजाराला कंटाळून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय
-गणेश मनिकम अस आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव
-गेल्या काही दिवसांपासून गणेश बेपत्ता होता,तशी तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी नोंदवली गेली होती
-गणेशने घरातून जात असताना मी आत्महत्या करायला जात आहे अस म्हटलं होतं त्यावरून पोलिसांनी गणेशने आत्महत्या केल्याचं सांगितलं आहे अमरजाई देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला
सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पळाले
लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना केली मारहाण
पहाटे 3 वाजता घडली घटना…
गृहमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना घडली घटना…
सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले सर्व रा. बीड व अहमदनगर अशी संशयित आरोपींची नावे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज पुणे महापालिका आयुक्तांना भेटणार
शहरातील विविध प्रश्नासंदर्भात करणार चर्णा
विक्रम कुमार प्रशासक म्हणून काम पाहतायेत चंद्रकांत पाटील आज भेटून चर्चा करणार आहेत
दूपारी 12 वाजून 30 मिनीटांनी घेणार महापालिकेत भेट !
पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात 443 कि.मी चे रस्ते जिल्हा परिषदेनं केले तयार
ग्रामीण भागासाठी नियोजित केलेल्या 1 हजार 8 कोटीच्या अर्थसंकल्पातील निधीच्या खर्चातून बांधले रस्ते
ग्रामीण भागातील गावांंना एकत्र जोडण्यासाठी , ग्रामस्थांचा त्रास कमी व्हावा यासाठी रस्ते तयार करण्यात आलेत
ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करतीये…
महानगरपालिका निवडणुका पावसाळ्या नंतरच होण्याची शक्यता
कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील यांचे सूतोवाच
आरक्षण,मतदार यादी, हरकती यामध्ये किमान तीन महिने जाणार
गणेशोत्सव ते दिवाळी दरम्यान निवडणुका होण्याचा अंदाज
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच त्रिसदस्यीय पद्धतीने होणार
पालकमंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत आज जिल्हा आढावा बैठक
जिल्ह्यातील पाणी टंचाई बाबत घेणार आढावा
पेठ,सुरगाणा,त्रंबकेश्वर सह अनेक तालुके अद्याप कोरडे
मंजूर होऊन देखील रखडलेल्या प्रकल्पाचा भुजबळ घेणार आढावा
बैठकी मध्ये दुष्काळ निवारणा बाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष
नाशिक – मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत रात्रीचे लसीकरण सुरू
लस देण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष मिशन
लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश
लसीकरणासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न
रत्नागिरी- कोकणातल्या शिवसेना आमदारांशी साधणार मुख्यमंत्री संवाद
दुपारी तीन वाजता साधणार संवाद
वर्षावर मुख्यमंत्री साधणार संवाद
शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत
मुख्यमंत्री आमदारांना काय सांगणार याची उत्सुकता
मुख्यमंत्री रिफायनरी बाबत काही मार्गदर्शन करणार का याचीही उत्सुकता
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते दहिसर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल बंद आहेत. ऐन सकाळीच ओव्हरहेड वायर तुटल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालामुळे महापालिका मालामाल.
दीड महिन्यात तब्बल दीड कोटी रुपयांचा मिळाला महसूल
पर्यटकांची संख्या वाढल्यानं महसूली उत्पन्नात वाढ
कोरोना काळात तब्बल 2 वर्ष प्राणिसंग्रहालय होतं बंद
उन्हाळ्याच्या सुट्टीत प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होतीये..
जवळपास 3 लाख पर्यटकांनी आतापर्यंत भेट दिलीये…
नागपुरात आयोजित लोक न्यायालयाने 17 दाम्पत्यांचं घडवलं मनोमिलन
शुल्लक कारणावरून एकमेकांपासून विभक्त झालेल्याना आणलं एकत्रित
17 दाम्पत्यानी वादाला तिलांजली देत संसाराची नवीन इनिंग सुरू करण्याचा घेतला निर्णय
81 प्रकरण लोक न्यायालय च्या समोर आली होती त्यात 28 दाम्पत्य उपस्थित होते
त्यापैकी 17 दाम्पत्यानच।झालं मनोमिलन
तर काही प्रकरण मनोमिलन च्या मार्गावर तर काही वेगळ्या वळणार
काल पुणे शहरात महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद
तापमानानं ओलांडला चाळीशीचा पारा,
40.7 अंश सेल्सिअसची झाली नोंद
राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता
मध्य महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा
पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये ..
पुणेकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय..
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गटाचे प्रारुप आराखडे निवडणूक आयोगाला सादर
शनिवारी जिल्हा प्रशासनाने आराखडा केला सादर
प्रारुप आराखडा बघितल्यानंतर नागरिकांच्या हरकती व सूचना मागितल्या जाणार.
नवीन नियमानुसार पुणे जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या 7 ने वाढणार आहे तर पंचायत समितीमध्ये एकुण 14 ने सदस्यसंख्या वाढणार आहे.
ही सदस्यसंख्या लक्षात घेता गट व गण पडण्याची शक्यता आहे…
दुय्यम निबंधकानं कोणीही व्यक्ती दस्त नोंदणीसाठी आला असता नोंदणी नाकारू नये असा आदेश मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय
मात्र यामुळे बोगस दस्त नोंदणी होण्याची शक्यता आहे
त्यामुळे या निर्णयाला नोंदणी व मुद्रांक विभागाकडून स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत
स्थगिती मिळावी यासाठी आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे
शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय
सर्वोच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली जाणार आहे…
नागपुरात महापालिका निवडणुकीसाठी आप सज्ज
महापालिकेत पहिल्यांदाच लढणार आप
दिल्ली आणि पंजाब चे मुख्यमंत्री नागपुरात आल्याने कार्यकर्त्यां मध्ये संचारला उत्साह
अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाने कार्यकर्ते झाले चार्ज
आपच्या महापालिकेतील प्रवेशच कोणाला बसणार फटका याकडे लागलं आहे लक्ष ?
नीट पीजी परीक्षा नियोजित वेळेतचं होणार
9 जूलैला होणार परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल नाही
एनबी ई एम एसनं पत्रक काढत दिली माहिती.
खोटं पत्र व्हायरल केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता
मात्र नीट परीक्षा वेळेतचं होणार अस बोर्डानं म्हटलंय..