आज दिनांक 1 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यभरात दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचा आढावा आपण घेणार आहोत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आज सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात येत आहे. तब्बल 31 हजार महिला या उपक्रमात सहभागी झाल्या असून, यंदा या उपक्रमाचं हे 35 वं वर्ष आहे. कोरोनामुळे मागच्या दोन वर्ष हे अथर्वशीर्ष पठण होऊ शकल नव्हतं. मात्र यंदा महिला मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. अथर्वशीर्ष पठणाला ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची देखील उपस्थिती आहे.
सांगली
शहरात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाला सुरुवात
सकाळपासून वातावरण ढगाळ
अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ
गणेश बाप्पाला पाहायला येणाऱ्या गणेश भक्तांमध्ये नाराजी, तर शेतकरी राजा समाधानी
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावात कुत्र्यांची दहशत
चार कुत्र्यांनी शेतकऱ्यावर केला प्राणघातक हल्ला
हल्ल्यात सचिन सिद्धनाळे हा शेतकरी गंभीर जखमी
गेल्या काही दिवसातील कुत्र्यांचा चौथा हल्ला
कुत्र्यांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंता
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी
श्री पंचकेदार मंदिराच्या देखाव्यात बाप्पा विराजमान
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ गणपती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या दर्शनाला पुणेकरांची गर्दी
हुतात्मा राजगुरू यांच्या पणतूंच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
उद्या संध्याकाळी कसबा पुरस्कारांचे वितरण
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारीत यंदाचा देखावा
प्रत्येक शाळेत 15 सप्टेंबरपर्यंत परिवहन समिती स्थापन करा
न्यायालयाने फटकारल्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश
प्रत्येक शाळेत स्कुलबस समिती बंधनकारक शिक्षण विभागाचे निर्देश
झाडं तोडतांना घरटी कोसळून शेकडो पक्ष्यांचा मृत्यू
सिन्ररमधील हृदयद्रावक घटना
झाडं तोडताना घरटे खाली पडल्याने 115 पक्ष्यांचा मृत्यू
झाडं तोडणारे मजुरांवर गुन्हा दाखल
तीन मजूर वनविभागाच्या ताब्यात
22 पक्ष्यांना वाचवण्यात यश
नागपुरातील मोठ्या गणेश मंडळात मिळणार बुस्टर डोस
दरर्शनासाठी आलेल्या भाविकांना मिळणार डोस
जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांची माहिती
नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं बुस्टर डोस घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन