मुंबई : आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यसह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुणे ,कोल्हापूर, कोकण,सातारा जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात यलो अलर्ट आहे. पावसामच्या पार्श्वभूमीवर नीद काठच्या लोकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेणार आहोत पावसासोबतच राज्यातील इतर काही महत्त्वाच्या घडामोडी.