आज दिनांक 7 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वच्या घडामोडी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणार आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शिंदे गटाकडून पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. काही राजकीय घडामोडी घडण्याची देखील शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीव आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक अपडेट्स.