आज दिनांक 10 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घाडमोडी आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी आज भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यभरात तगडा पोलीसबंदोबस्त असतो. अनंत चुतुर्दशीनिमित्त सोलापू शहरात पोलिसांचा तगडा बंदोेबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन डीसीपींसह 2080 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरातील संवेदनशील भागात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने 1 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.