मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे. कारण राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा आणि वाटचाल ठरवणार आहे. आज शिवसेना पक्षासाठीही महत्वाचा दिवस आहे. कारण 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे. याबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. यासोबतच इतरही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील साखळी उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. या उपोषणस्थळी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आरक्षणासंदर्भात आश्वासन द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे तिथे जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
मुंबई | मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या श्रावणहर्डीकर यांची बदली होऊन दीड महिन्याचा अर्थात ४५ दिवसांपेक्षाअधिक कालावधी लोटल्यानंतर अखेर या पदाला अधिकारी लाभलाय. महापालिकेत यापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाची कमान सक्षमपणे पार पाडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती या पदावर झालीय. जोशी यांनी पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त म्हणून महापालिकेची सुत्रे हाती घेत जोरदार कमबॅक केलं आहे.
नवी दिल्ली | राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाला उपस्थित राहण्याचे आदेश हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने राष्ट्रवादीत फुट पडली. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह नक्की कुणाचं असा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता 3 ऑक्टोबरला काय होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
मुंबई | देशात 5 मोठ्या धार्मिक स्थळांवर निवडणुकींदरम्यान हल्ला होऊ शकतो. त्यामुळे धार्मिक स्थळांची सुरक्षा सशस्त्र दलांकडे द्यावी, अशी मागणी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तर आंबेडकर यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली आहे. आंबेडकर हे ठाकरे यांचे मित्र असल्याने ते असं बोलतात, अशा शब्दात नारायण राणे यांनी आंबेडकर यांच्यावर टीका केली.
मुंबई | गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी डिलाईल रोड ब्रिजची पाहणी केली.
डिलाईड रोड ब्रिजची पाहणी
आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांनी डिलाईल रोड ब्रिजची पाहणी केली. ह्यावेळी त्यांनी संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी तसेच अभियंत्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला.@AUThackeray pic.twitter.com/8gvupoWxl2
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) September 14, 2023
नाशिक येथील कवि संमेलन वादात सापडले आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे करण्यात आले हिंदी दिनानिमित्त कवि संमेलनाचे आयोजन. मात्र मराठी रसिकांचे सर्व आरोप आयोजकांनी फेटाळले आहेत. आमचे जे सदस्य आहे, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, त्यांनाच हे पास दिल्याचा आयोजकांनी दावा केला.
नाशिकमध्ये हिंदी दिनानिमित्त कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले. नाशिकच्या कवी कालिदास कलामंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र या कार्यक्रमात मराठी भाषिक लोकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय. हिंदी भाषिक लोकांचा कार्यक्रम असल्याने मराठी भाषिक लोकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप आहे. हिंदी आणि मराठी असा आयोजकांनी वाद केल्याचाही आरोप नागरिकांनी केला.
दादा काय म्हणले मी दादांवर बोलणार नाही. मी त्यांना महत्त्व देतो मी आणि खूप मानतो, ते आदरणीय नेते आणि सगळ्यात मोठे नेते आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, सरसगट समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मागणी आहे, परंतु कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचे का नाही हा ज्याचा त्याचा अधिकार असणार आहे.
माजी मंत्री आणि भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांची मुलगी कोमल ढोबळे साळुंखे यांचे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत. सोलापुरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्याबाबत पोलीस आयुक्तांची गृहमंत्र्यांना लेखी तक्रारही केलीये. बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल ढोबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसरातील ASI सर्वेक्षणादरम्यान हिंदू धर्माशी संबंधित गोष्टी सापडल्या त्या वस्तू वाराणसीच्या डीएमकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे.
केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानला एकाकी पडावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान भारतात सामने खेळायला का येत आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण विशेष अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या राज्यसभा खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. केंद्र सरकारने 18 सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संविधान सभेपासून सुरू झालेल्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा होणार आहे.
अनंतनाग दहशतवादी हल्ल्यांनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काल जे घडले ते अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आता पाकिस्तानसोबत कोणताही सामना झाला तर आम्ही त्याला विरोध करू.
भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. 18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनात आपली उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. गणेशोत्सव कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेनाय्त आला आहे. जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री दुकाने १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच, २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद असेल.
MUMBAI AIR PORT : मुंबई विमानतळ दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. तर, 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर विमानतळावरील LANDING आणि TAKE OFF बंद करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावर एक खाजगी विमान क्रॅश झाले. खराब हवामानामुळे हे विमान क्रॅश झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही दुर्घटना कशी झाली याची माहिती घेण्यात येत आहे.
धाराशिव : नगर परिषदेत 27 कोटी 34 लाख रुपयांच्या अपहार झाला. या प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यलगट्टे यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्यात लम्पी आजाराने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. लम्पी आजाराने 94 जनावरं दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले आहे. राज्यभरात लम्पी आजाराने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे सावट असताना लम्पीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सरसकट मराठ्यांना कुणबी दाखला देऊ नये. कुणबी दाखले द्यावेत अशी 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. गरीब, गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वीच्या मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देताना हात आखडता घेतला नाही. त्यामुळे इतरांनी पण आता मराठा समाजाला पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी केली.
कोणी कितीही आरोप केले तरी घटनेतील तरतूदीनुसार सुनावणी सुरु असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. लवकरच पुढील सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर नार्वेकर सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गट आणि ठाकरे गटाला दोन आठवड्यांची वेळ देण्यात आली आहे. लेखी उत्तर सादर करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी ही मुदत वाढून दिली. दोन्ही गट आपआपली कागदपत्रं एकमेकांना देणार आहेत. कागदपत्रांसाठी शिंदे गटाने वेळ वाढवून मागितला होता.
मराठा आरक्षणासाठी सतरा दिवस उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 12 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर असे 30 दिवस आणि मनोज जरांगे यांनी दिलेले वाढीव 10 दिवस असा 40 दिवसाचा वेळ दिला आहे.
अपात्र आमदार प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आजपासून दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने हा वेळ वाढवून देण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झाला आहे. शिंदे गटाचे वकील अनिल सिंग आता बाजू मांडत आहेत. शिंदे गटाकडून यावेळी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. तसेच ठाकरे गटाकडून करण्यात आलेला युक्तिवादही खोडून काढण्यात येत आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार अपात्रतेसंबंधी सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं आहे. मात्र आम्हाला याचिकेची कागदपत्रेच मिळाली नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली आहे. आज 34 याचिकांवर सुनावणी होणार आहे. सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. आज सुनावणी झाल्यानंतर आजच निकाल देण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू हे करणार आहे. तसं पत्रच ते विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहेत.
आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. वकील असीम सरोदेही बाजू मांडत आहेत. विधानसभा अध्यक्षांपुढे सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घ्यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली आहे.
शिंदे-ठाकरे अपात्र प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर 34 याचिकांची सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदो यांच्याकडून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे.
दिल्लीतही मनोज जरांगे पाटील यांची चर्चा आहे. मनोज जरांगेंच्या संरक्षणाची जबाबदारी सरकार घेईल. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. जरांगेंनी उपोषण मागे घेतलं त्याबद्दल धन्यवाद, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
कोणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार आहे. लाठीचार्जमधील दोषींचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. एकनाथ शिंदेसुद्धा गरीब कुटंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे. माझ्या पोटात एक आणि ओठावर एक असं नाही. रद्द झालेलं आरक्षण मराठा समाजाला देण्याची भूमिका असल्याचं शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारचीही भूमिका आहे. लाठीचार्जमध्ये गावकऱ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणखी 10 दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे आणि आणखीन वेळ वाढवून देईल पण आरक्षण घेतल्याशिवाय काही राहणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणात स्वत:हून लक्ष घातलं आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडलं. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून ते त्यांच्याशी चर्चा करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते उपोषणस्थळी पोहोचून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, उपोषण सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर-अमरावती मार्गावर एसटी बसने पेट घेतला. चालक, वाहकाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला.
कोंढाळी बसस्थानकावर एसटीआल्यावर अचानक आग लागली, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत आग विझवली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या राणा दांपत्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे यशोमती ठाकून यांनी जाहीर केलं आहे.
लोकसभेच्या प्रचारावेळी ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या , असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता.
विधानसभा अध्यक्षांसमोर आज होणाऱ्या सुनावणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आज हजर राहणार नाहीत.
सुनील प्रभू यांच्या याचिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी बच्चू कडू यांना अपात्रतेच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती.
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येणार असून ते संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोचून जरांगे यांची भेट घेतील.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, उपोषण सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांवरील सुनावणीपूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांची ११ वाजता बैठक होणार आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोरील चौकशीसाठी या बैठकीत रणनिती ठरवण्यात येणार आहे. समान उत्तरे देण्यासाठीच्या सूचना या बैठकीत आमदारांना दिल्या जाऊ शकतात. ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत आणि असिम सरोदे हे बाजू मांडणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत सहा आदिवासी विद्यार्थिनींची शिक्षकाने छेड काढली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम शिक्षकास अटक केली. प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. धरणात जलसाठा वाढला आहे. यामुळे या धरणाचे 9 गेट अर्धा मीटरने उघडली आहेत. धरणातून 41 हजार 984 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेशी द्रोह केला आहे. अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करण्यास तयार नाही. अपात्रतेच्या निर्णय घेण्यास अजून किती कालावधी लागणार सांगता येत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. सरकारने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार प्रसारची त्यांच्यावर जबाबदारी होती. “कोणाच्या ही बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत त्यांनी राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यासाठी निघाले आहेत. ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आज मनोज जरांगे यांचे उपोषण सुटणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 च्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी यावं, अशी मागणी केली होती.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे .पी .नड्डा पुणे दौऱ्यावर आहेत. जे पी नड्डा आजपासून 3 दिवस पुण्यात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीला जे पी नड्डा हजर आहेत. तीन दिवस पूर्ण वेळ जे पी नड्डा संघाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. जे पी नड्डा पुणे विमानतळावर दाखल झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना ऊपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार प्रसारची होती जबाबदारी. “कोणाच्या हि बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत दिला राजीनामा.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत रात्री उशिरा रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांनी चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. जरांगे पाटील आज सकाळी 11.30 वाजता फायनल पत्रका परिषद घेणार आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयनं सर्व पुरावे सादर केले आहेत. सीबीआयनं न्यायालयात अर्ज केला आहे. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेल्या साक्षी, जबाब नोंदी सादर करण्यात आल्या आहेत. यापुढे आता बचाव पक्षाला साक्षीदार सादर करता येणार आहे. 18 सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. अंतिम टप्प्यात फक्त आरोपींचे जबाब नोंदवले जाणार आहेत. मात्र सीबीआयनं सर्व पुरावे सादर केल्याचा अर्ज केला आहे.
शनिवारी दिवसभर संपूर्ण नाशिक शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यासाठी महावितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची महापालिकेकडून देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे .पी .नड्डा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आजपासून पुढचे 3 दिवस जे पी नड्डा पुण्यात असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीला जे पी नड्डा हजेरी लावणार आहेत. तीन दिवस पूर्ण वेळ जे पी नड्डा संघाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. थोडयाच वेळात जे पी नड्डा यांच पुणे विमानतळावर दाखल होतील.
शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांची आज एकत्रित सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गट आज विधानसभा अध्यक्षांकडे बाजू मांडणार आहेत. ठाकरेंना गट विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट देणार आहेत. सुप्रीम कोर्टानं अपात्रतेचा थोडक्यात निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं पक्षांतरबंदी कायदा ,गटनेता, व्हीप यावर जे निरीक्षण नोंदवलं आहे त्याचा अंतर्भाव उत्तरात करण्यात आला आहे.