मुंबई | 03 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. तर महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांचा यात समावेश नाही. तर महाविकासआघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. उर्वरित सहा जागांवर तोडगा निघाल्यावर जागावाटप जाहीर होणार आहे. तर डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
ठाणे | कल्याण शीळ रोड येथील प्रीमियर मैदानात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचा आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.
मला खासदार यांनी सांगितले 1 लाख लोक येणार मात्र 1 लाख पेक्षा लोक या ठिकाणी आले आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. या आधी देखील योजना आणि लाभ होते. मात्र त्यावेळी फार कष्ट करावे लागत होते लाभार्थी याना मात्र आम्ही ठरवले आता आपण लोकांपर्यंत जायचे. आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळात आहे. शपथ घेयल्या नंतर प्रथन शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले. कोणाच्या फायद्या साठी नाही.
पुणे | अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचे स्टेटस व्हायरल झाले आहेत. बारामती एनसीपीच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचे स्टेटस व्हायरल झाले आहेत. यंदा भाकरी फिरणार, असं स्टेट्स अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी टाकलं आहे. सुनेत्रा पवार खासदार होणार, बारामतीत सोशल मीडियावर स्टेट्स व्हायरल झालं आहे. सुप्रिया सुळेंनी तुतारीचं स्टेट्स ठेवल्यानंतर अजित पवार गटाचं स्टेट्स ठेवलं आहे.
आपला मराठा आरक्षण लढा अंतिम टप्प्यात आला होता मात्र काही विघ्न संतोशी लोक होते. त्यांना असे वाटत होते लांब नेले म्हणजे थांबेल मात्र आम्ही थांबणार नाही. प्रत्येक मराठाच्या घरात हाल होत आहेत. 350 पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली. हजारो तरुणावर गुन्हे नोंद केले गेले. आता विषय अंतिम टप्प्यात आला फक्त सगेसोयरे अंमलबजावनी करुन द्यायची असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
धाराशिवच्या भूम येथे एका विवाह सोहळ्याला जरांगे पाटील यांनी हजेरी लावली तेव्हा, एक मराठा, लाख मराठा घोषणेने त्यांचे स्वागत झाले. सेल्फीसाठी तरुणांची गर्दी झाली.
आम्ही संविधान आणि राज्यघटना याचा आदर करून काम केले होते. आता संविधानच खुंटीला टांगले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले गेले आहे अशी टीका माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली आहे
भुम येथे संपदा तांबे पाटील व अमर काळे पाटील यांच्या विवाह सोहळ्यास मनोज जरांगे पाटील उपस्थितीत राहणार आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून दोन्ही नेत्यात झाली चर्चा.खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आनंदराव अडसूळ यांचा विरोध.
जळगावात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या पहिल्या असलेल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन. भूमिपूजन सोहळ्याची जिल्हा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू.
काही वेळातच अजित पवार हे त्यांचे खाजगी सचिव संजय खोडके यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला लावणार हजेरी…
देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे.
पुण्यात ३४ गावांची आज अजित पवार घेणार बैठक. काल धायरी गावात राष्ट्रसेवा समूहाने झळकावले उपरोधिक बॅनर. महापालिकेचा टॅक्स भरू शकत नसल्याने गाव विकणे आहे. हातात बॅनर घेवून मांडला टॅक्सचा मुद्दा. आज दुपारी ३ वाजता अजित पवार घेणार या विषयावर बैठक
पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवुन मुलींचे शोषण करणाऱ्या मांत्रिकासह टोळी गजाआड, ठाण्याच्या राबोडीतील धक्कादायक प्रकार. पैशांचा पाऊस पाडून देतो अशी भूलथाप मारून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली.
नारायण राणे तातडीने सिंधुदुर्गातून दिल्लीला दाखल झाले. भाजपने काल लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर दिल्लीत आज महत्वाची बैठक होत असून त्यासाठी नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे 5 मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जळगावातील सागर पार्क मैदानावर अमित शहा यांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम होणार असून नंतर शाह यांची सभाही होईल. युवा संमेलनाची जय्यत तयारी सुरू.
पुणे पोलिसांची शहरात सकाळपासून गस्त. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूणे पोलीस अलर्ट मोडवर. पुणे शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पुणे पोलीस आज दिवसभर काढणार रूटमार्च. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा आज अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून रूटमार्च. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांचे रूटमार्ट काढण्याचे आधिकाऱ्यांना आदेश
मावळ लोकसभेतुन यावेळचा खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणणार, असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. पण तो उमेदवार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेडगे हेचं असतील, असे सूतोवाच मावळचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी केले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. फडणविस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगर वरून होणार होता, महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाने गृहमंत्र्याचे काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने मावळ विधानसभा मतदारसंघात शक्ती प्रदर्शन केले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप युवा मोर्च्याच्या वतीने पदग्रहण सोहळा पार पडला.यावेळी अनेक युवकांनी भाजप युवा मोर्चा मध्ये पक्ष प्रवेश केला.
सोमवारी एकनाथ शिंदे, तर मंगळवारी अमित शाह जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर हवामान खात्याने दोन दिवस पारा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याने राजकीय वातावरण तापणार आहे.
यवतमाळमधील कळंब बस स्थानकावर मद्यधुंद अवस्थेत 3 तरुणींनी राडा घातला. प्रवाशांना त्यांनी शिवीगाळ केली. एकाला मारहाण केली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी कारवाई केली.
80 वर्षाचं वय असतानाही आनंदराव अडसूळ यांना निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा आहे. जोपर्यंत आनंदरावर अडसूळ हयातीत आहे तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील, असे वक्तव्य राणा यांनी केले. यानंतर अयोध्येला जाणाऱ्या ट्रेन मध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनाही श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ, असेही त्या म्हणाल्या.
आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीने पल्लेदार झेप घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत किंमती झपझप वाढल्या आहेत. मौल्यवान धातूंनी चढाई केली आहे. चांदी तीन दिवसांत 1100 रुपयांनी वधारली तर सोन्याने पण मोठा पल्ला गाठला आहे.
अमरावती वरून हजारो भाविक आस्था स्पेशल ट्रेन ने अयोध्येसाठी रवाना… अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दाखवली हिरवी झेंडी… अमरावती मॉडल रेल्वे स्थानकावरून हजारो रामभक्त भाविक रवाना…
पुणे विभागाकडून 500 बसेसच करण्यात येणार सीएनजी मध्ये रूपांतर… पुणे विभागातील 14 आगारांमधील डिझेल बसेस सीएनजी करण्यात येणार रूपांतर… प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय… पुणे विभागातील 800 बसेस पैकी 500 बसेसच सीएनजीत होणार रूपांतर
पुणे शहरात शुक्रवारी घडले सर्वाधिक गुन्हे… शुक्रवारी एकाच दिवसात शहरात 19 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद.. शहरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर… गेल्या एका वर्षात झालेल्या एका दिवसातील चोरीच्या सर्वाधिक घटना… 2024 मध्ये पहिल्या दोन महिन्यात 603 चोरीच्या घटनांची नोंद… एक मार्च रोजी पुणे शहरात वाहन चोरीच्या 6 तर अन्य प्रकारच्या चोरीच्या एकूण 13 घटना
पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक… पुणे लोणावळा लोकल आज राहणार बंद… पुणे लोणावळा दरम्यान तांत्रिक कामासाठी घेण्यात येणार मेगाब्लॉक… पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल आज रविवारी दिवसभर राहणार बंद… एकूण 7 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्या रद्द… रविवार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
कर्नाटकातील आरएसएस नेत्याचं 2016 चं हत्या प्रकरण… NIA ने विमानतळावरून PFI च्या सदस्याला अटक केली… टांझानियातून मुंबईत परतलेल्या मोहम्मद गाऊस नियाझिला अटक… आरोपी नियाझी 2016 पासून फरार होता…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता मनसे शहर कार्यालयात राज ठाकरे येणार आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या एम्समध्ये कॅन्सर रिसर्च सेंटर होणार आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून देशातील विविध शहरात असलेल्या एम्समध्ये अद्यावत सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ रिसर्च स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा सुद्धा करण्यात आली यात नागपूरचा सुद्धा समावेश असणार आहे. या पार्श्वभूमीवर सात विभाग मिळून कॅन्सर रिसर्च सेंटरची स्थापना केली जाणार आहे. यामुळे कॅन्सर वरील उपचार व संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पुण्यातील 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार बैठक घेणार आहेत. दुपारी साडे तीन वाजता सर्किट हाऊस येथे बैठक होणार आहे. पालिकेने घेतलेल्या वाढीव टॅक्स बद्दल गावकऱ्यांनी या आधीही नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या बैठकीला ३४ गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्व पूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही बैठक होणार आहे. सध्याच्या सत्ताधारी सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सर्व मंत्रालयांचे सचिवही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत 2047 च्या विकसित भारत रोड मॅपवर चर्चा होणार आहे.