मुंबई : 13 जानेवारी 2024 | आजचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजपासून अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 21,200 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. तो मार्ग आज सकाळी 8 वाजेपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा पार पडणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
अमरावती : अमरावतीत देशी दारू दुकान विरोधात आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. शहरातील चैतन्य कॉलनी जुना बायपास येथील देशी दारू दुकान बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आलं आहे. रवी राणा यांच्या उपस्थितीत मनपाच्या अतिक्रमण विभागाने देशी दारू दुकान बुलडोझरने पाडले. देशी दारू दुकानाला स्थानिकांचा विरोध होता.
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, जगातील कोणत्याही मोठ्या मुद्द्यावर भारताशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय होत नाही. आपण बदललो आहोत आणि जगाची आपल्याबद्दलची धारणा बदलली आहे.
गुरुग्राम दिव्या पाहुजा हत्याकांडात नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीतचा साथीदाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने अभिजीतला शस्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे तेच तेच वारंवार बोलत असल्याचं सांगितलं. तसेच मतदारसंघात आले तेव्हा आम्ही पाहिलं की त्यांच्यासोबत 200 माणसंही नव्हती. त्यांची अशी स्थिती झाली आहे. खासदार सोडून गेल्यानंतर उमेदवार मिळाला नव्हता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली आणि उमेदवार दिला. त्यामुळे घराणेशाहीचा संबंधच येत नाही.
यूपीचे कार्यवाहक डीजीपी विजय कुमार म्हणाले की, अयोध्येबाबत सर्वसमावेशक सुरक्षा योजना केली आहे. आम्ही अयोध्या हनुमान गढी कनक मंदिरासाठी AI यंत्रणा वापरत आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था केली आहे. एआयच्या माध्यमातून संशयास्पद वर्तन असलेल्या लोकांची आणि वाहनांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मुंबई : मी उत्तर पश्चिममध्ये निवडणुकी लढणार आणि काँग्रेस पक्षातून लढणार. ही माझी पक्षाकडे विनंती आहे. मुंबईमध्ये आता शिवसेनेच्या जास्त बेस राहिलेला नाही. पूर्वीप्रमाणे ते जे सीट मागतात ते चुकीचे आहे. सध्या काँग्रेसच्या एक मोठा बेस मुंबईमध्ये आहे. आमची विनंती आहे की काँग्रेसवर तुम्ही जास्त दबाव टाकू नका. जर तुम्हाला इंडिया आघाडीला मजबूत करायचे आहे तर काँग्रेससाठी ही सीट सोडायला पाहिजे असे माजी खासदार संजय निरुपम यांनी म्हटले.
बुलढाणा : ही लोकसभा निवडणुक आपली पहिली आहे. एवढे लोक जर प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी उतरले तर पुढच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महायुतीच्या माध्यमातून आपण मिशन 48 हे राबवत आहे. हा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. जेव्हा महायुतीचा मेळावा होईल तेव्हा विरोधकांचे पानिपत होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.
बुलढाणा : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे कारण देत अडीच वर्षे घराबाहेर पडले नाही. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी तीस वर्षांची मैत्री असलेल्या भाजपशी युती तोडली. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध बाळासाहेब ठाकरे करत होते त्याच्यासोबत यांनी सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या आमदारांना अपमानाची वागणूक मिळत होती अशी टीका खासदार प्रतापराव जाधव यांनी केली. एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांने हा उठाव केला आहे असेही ते म्हणाले.
बीड : मी माढा आणि परभणी या दोन जागांसाठी लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहे. महविकास आघाडीने दोन जागा दिल्या तर मी त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करेल. मला कोणीही सोबत घेतले नाही तर मी राज्यातील 48 जागांवर स्वतंत्र लढणार आहे. मला इंडिया आघाडीचे निमंत्रण नाही. बीडमधून मुंडे भगिनी यांनाच उमेदवारी मिळेल. भाजप हा त्यांचा पक्ष आहे. मी डिमांड करणारा नाही, तर कमांड करणारा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे असा इशारा माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिला.
बुलढाणा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम बद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केलीय. बुलढाणा येथील सभेत आमदार संजय गायकवाड यांनी जितेंद्र आव्हाड हे मांजरीच्या तोंडाचा आहे अशी टीका केली.
कोल्हापूर : एक वेगळे वातावरण महाराष्ट्र आणि देशात निर्माण केले जात आहे. लोकसभा आणि विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे तो कायम ठेवावा लागेल असे माजी मंत्री सतेज बंटी पाटील यांनी सांगितले. 2014 मध्ये पहिल्यांदा निवडणूक फेसबुकवर झाली. यानंतर 2019 मध्ये व्हाट्सपवर झाली आणि आता 2024 मध्ये इन्स्टग्राम आणि युट्युब होणार आहेत. ही लोकसभा महत्त्वाची असणार आहे, असेही ते म्हणाले.
डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. यामध्ये लक्ष घालणार असल्याचं राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे.
बीड: आजचा मेळावा हा कुठल्या जातीच्या विरोधात नाही. आमचे आरक्षण सुरक्षित असले पाहिजे. म्हणून आम्ही मेळावे घेत आहोत. मराठा समाजाच्या विरोधात आम्ही नाही. मराठ्यांनी देखील आमचा विरोध करू नये. मराठा समोर आला तर आम्हीही मागे हटणार नाहीत. पंकजा मुंडे कुठल्याच मेळाव्याला आले नाहीत. माझं त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांचा भाऊ म्हणून मी सभेला आलो आहे.
नारायण राणेंना अजून हे माहिती नाही की शंकराचार्य हे पद आपल्या हिंदू धर्मात किती मोठ आहे. त्यांच्या शिवाय सनातन आणि हिंदू धर्म पुढे जाऊ शकत नाही. मूर्तीची स्थापना शंकराचार्य यांच्या हस्तेच करावी लागते असा धर्म सांगतो. परंतु त्यांना निमंत्रण दिलं नाही. राणेंना समजत नाही आणि राणेंना माहिती देखील नाही शंकराचार्य सगळ्यात मोठे असतात. त्यांना असं बोलणं म्हणजे नारायण राणे यांच्या बुद्धीची कीव येत. अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
कल्याण कोळशेवाडी मध्यवर्ती शाखेत उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी, ढोल ताशा वाजवत फुलांचा वर्षाव करत महिला व पुरुष कार्यकर्त्यांकडून करण्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कल्याण पूर्व येथील वादग्रस्त पहली मध्यवर्ती शिवसेना शाखा असून 1985 मध्ये त्या वेळचे कामगार मंत्री शाबीर भाई शेख आणि अभिनेते दादा कोंडके या शाखेची स्थापन केली होती. मात्र शिवसेना दोन गट पडल्याने या शाखेला शिंदे गटाकडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील ३४ हजार ९९९ शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याचा कलश अयोध्येत आणला आहे. बाबाजी परिवाराच्यावतीने हे पाणी अयोध्येत आणण्यात आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांच्याकडे कलश सुपूर्द करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीचं पाणीही २२ तारखेला वापरलं जाणार आहे. हा कलश घेवून सेवक अयोध्येत दाखल झाले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून सोने-चांदीत पडझडीचे सत्र सुरु आहे. सराफा बाजारात त्यामुळे पुन्हा चैतन्य आले आहे. बाजारात गर्दी वाढली आहे. या आठवड्यात पण ही घसरण दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्यात वाढ झाली तर चांदीच्या किंमतीत नरमाई दिसून आली.
भंडारा-गोंदिया जागेविषयी कुठलीच चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येत, भाजपला पर्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जुन्नरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर झोपा काढो आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले. दहा दिवसांपासून सुरू आमरण अन्नत्याग उपोषणात सहभागी समाजबांधवांची प्रकृती खालावल्याने आदिवासी कोळी समाज आक्रमक झाला आहे. झोपलेल्या सरकारला जाग येण्यासाठी कोळी समाज बांधवांचे अनोखे आंदोलन सुरु आहे.
बीडमध्ये आज ओबीसींचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र स्टेज वरील बॅनरहून या तिन्ही मात्तबर नेत्यांचे फोटो काढण्यात आले आहेत. हे तिन्ही नेते मेळाव्याला येणार नसल्याची कुजबुज होती. त्यामुळे आयोजकांनी त्यांचे फोटो काढले आहे.
राम मंदिर उद्धघाटनावेळी 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आनंदोत्सव साजरा करणार आहे. राज ठाकरे यांनी शांततेने, कोणालाही त्रास न देता हा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन मनसैनिकांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 2 कोटी महिलांना लखपती करण्याचे गॅरंटी मुंबईत दिली. शुक्रवारी पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाबाबत केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांची उजळणी केली. त्यावेळी महिलांना लखपती करण्याच्या योजनेची माहिती दिली. 2 कोटी महिलांना या फॉर्म्युल्याने श्रीमंत करण्याची योजना आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुद्दाम राजकीय दौरा होत आहे. पंतप्रधानांचा दौरा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कॉम्पिटिशन करण्यासाठी आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
कल्याण लोकसभेत ठाकरे यांच्या दौऱ्याला माजी आमदार सुभाष भोईर यांची पाठ. स्वागत बॅनर वरून ही त्याचा फोटो गायब झालाय. उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला आणि अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू.
आज शाखा उद्घाटन आहे जाहीर सभा घेण्यासाठी लवकरच मी कल्याण मध्ये येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सभा घेण्यासाठी कल्याणमध्ये जेव्हा येईल तेव्हा शब्दांचा चाबूक घेऊन येणार. संपूर्ण देशात कल्याण लोकसभेवरती एक वेगळी जबाबदारी आहे.
राम मंदिर बांधण्याचे आदेश देण्याची हिंमत कोणामध्ये नाहीये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी फिरलो, मला गावात अस्वच्छता दिसून आली असे राज ठाकरे हे म्हणाले आहेत.
मला बरं नव्हतं त्यामुळे मी येणार नव्हतो पण तुम्ही सर्वजण लांबून आले आहात म्हणून भेटायला आलो. तुम्ही पहिल्या राजकीय टप्प्यावर पाय ठेवला आहात तुमचं अभिनंदन- राज ठाकरे
मनसे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा पुण्यात मेळावा सुरू आहे. मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लोकांच्या सोयी सुविधासाठी मोदींनी उद्घाटन केली. निवडणुकी संदर्भाचा दौरा असा काही नव्हता. कोणताही राजकीय पक्ष अशी उद्घाटन करत असताना आपली पक्षाची राजकीय भूमिका मांडत असतो. मोदी साहेबांनी सभा घेऊन काही गैर केलं नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
घरंदाज कोण हे उद्धव ठाकरे यांनी सांगू नये, आदित्य ठाकरे यांचं लग्न का होत नाही? त्यांच्या लहान मुलाचं दारूचं बिलं 90 हजार रुपये. उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांचं लग्न लावून दाखवावे, लहान मुलाची दारू सोडून दाखवावी – निलेश राणे
ओबीसी मेळाव्याला मराठा आंदोलकांचा विरोध, विरोध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांची नोटीस त्यानंतर मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांना शिवाजी नगर पोलिसांनी घेतल ताब्यात घेतलं आहे. काळकुटे यांनी मेळाव्याला विरोध केला होता.
उद्धव ठाकरे यांनी कुणाला आमंत्रण द्यावे याबाबत आम्हाला सांगू नये. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
अयोध्येतील बाबरी मस्जिदचे मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारी यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण… इक्बाल अन्सारी राम मंदिर सोहळ्याला लावणार हजेरी … निमंत्रण मिळाल आहे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे… राम मंदिर उभं राहत आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच आम्ही स्वागत करतो…
कन्नड फलक फाडुन जाळल्या प्रकरणी मनसेच्या जिल्हाध्यक्षासह दोघांवर गुन्हा दाखल… कणेरी मठावरील फलक फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल… समाजसेवक निशांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल… कन्नड फलक लावल्याप्रकरणी शिवागाळ केल्याचा आरोप
मुंबईतल्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिका-यांना वर्षावर बंगल्यावर तातडीनं बोलावलं… २२ जानेवारीच्या उत्सवासाठी बोलावली बैठक… श्रीकांत शिंदे यांनी बोलावली बैठक
राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सुरु आहे. राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरु आहे… 4 हजार कोटींच्या कामासाठी 8 हजार कोटी कशाला? असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अयोध्येत 14 लाख दिव्यांपासून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या 14 लाख दिव्यांपासून बनवण्यात आलेल्या श्रीरामाच्या प्रतिकृतीचा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होणार आहे.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अटल सेतूचं लोकार्पण केलं, पण त्यात अटलजींचा फोटो कुठे होता? मला शंका आहे की राम मंदिरातही रामाची मूर्ती असेल का?, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
“मी देशभक्त आहे पण अंधभक्त नाही. कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. झेंडे लावायला सगळेच येतात,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींसह भाजपवर केली आहे.
22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार, तिथे आरती करणार. 22 जानेवारीच्या आमच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनाही आमंत्रण देणार आहोत. 23 जानेवारीला नाशिकमध्ये सभा घेणार आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुणे – शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 13 झाली आहे . पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडून काल रात्री 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विरार मध्ये संपन्न होणाऱ्या 19 व्या मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी निघाली आहे
पारंपरिक वेशभूषा, लेझिम खेळत या ग्रंथ दिंडीत महिला, विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले आहेत.
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज पहिला दिवस असून तैलाभिषेक सोहळ्याने यात्रेला सुरुवात झाली आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यात्रेत उपस्थित आहेत. यावर्षी सिद्धेश्वर भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची जन्म भूमी असलेल्या बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची ही पहिलीच सभा आहे. या सभेत भुजबळ काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पुन्हा समन्स. ईडीकडून केजरीवाल यांना चौथे समन्स बजावण्यात आले असून 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इंडिया आघाडीची आज सकाळी ११ वाजता ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार, राहुल गांधी , उद्धव ठाकरे हे सहभागी होणार असून लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोकणातून कोकण प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुका लढवणार. मुंबईसह कोकणातील 12 जागा कोकण प्रादेशिक पक्ष लढवणार. राज्यात सर्वांत चर्चा असलेल्या रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून सुद्धा जागा लढवणार. कोकण प्रादेशिक पक्षाचे समन्वयक अँड ओवेस पेचकर यांची माहिती.
रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 9 वर्षानंतर 11 हजार शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांसाठी व्याजमाफी. तीन महिन्याच्या व्याजापोटी 2 कोटी 71 लाख रुपये तर रुपातंरीत कर्जावरील 4 कोटी रक्कमेची व्याजमाफी. 2014 आणि 2015 मध्ये आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठं नुकसान.
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतारदऱ्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला. प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यात आता आणखी नवीन माहिती समोर आली असून याच दोघांनी 17 डिसेंबर रोजी एकावर गोळ्या झाडल्या होत्या. शरद मोहोळचा खून करण्यासाठी मदत न केल्याने त्याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. भूगाव परिसरात हा प्रकार घडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चिखलीत होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. ‘शिवसंकल्प मिशन-48’ चा बुलढाणा लोकसभा मतदार संघ कार्यकर्ता मेळावा होणार आहे. तिथे मुख्यमंत्री उपस्थित असतील.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या उपस्थितीत राज्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी ग्रामीण भागातील मनसे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गणेश कला क्रीडा सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार याकडे लक्ष आहे.
बीडमध्ये कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. अहमदपूर – अहमदनगर महामार्गावरील ससेवाडी इथली ही घटना आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. तर चार जण कोण आहेत, याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोकाष्ट्रार्पण करण्यात आलं. हा ‘अटल सेतू’ आज सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.