मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह याचा निर्णय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. यानंतर होणारं हे पहिलं विधिमंडळ अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधी बाकावर असणारी महाविकास आघाडी या अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. शिवाय राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे या आपल्या बाळासह विधिमंडळ अधिवेशनात आल्या आहेत. बाळाला ताप असतानाही सुसज्ज हिरकणी कक्ष मिळाला नसल्याने त्यांच्या डोळ्यात काल अश्रू आले. त्यामुळे त्यांना आज सोयीसुविधांयुक्त हिरकणी कक्ष मिळणार का? हे पाहणंही महत्वाचं असेल. यासह राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा क्लिक करा…
मुंबई :
सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार
राज्यात कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण रोखण्यासाठी समिती गठीत
विरोधकांच्या जोरदार आंदोलनानंतर शासनाचा निर्णय
माजी पणन संचालक डॉ. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती
कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदानाची मागणी
कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना यांचा अभ्यास करणार
समिती योग्य त्या योजनांची शासनास शिफारस करणार
समिती ८ दिवसांत सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार
Manish Sisodiya And satyendra jain Resign | दिल्लीच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी
मनिष सिसोदिया यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून राजीनामा स्वीकार
नवी मुंबई :
कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले
कांद्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना रडवले
नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात किलोमागे पाच ते आठ रुपयांची घसरण झालीय
कांद्याच्या दरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच
याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज
कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत
कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत
त्यामुळे ही परिस्थिती कधी व्यवस्थित होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना पडला आहे
Guhagar | गिमवी गावात झोलाई देवी यात्रा उत्सवाला सुरुवात
पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो
झोलाई देवी यात्रेत पालखी उत्सवाला विशेष महत्व
पारंपारिक पद्धतीने लाठ फिरवण्याची प्रथा
पूर्वांपार चालत आलेली प्रथा आजही कायम
अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे.
कर्मचारी आणि सरकार यांच्या सहभागाने पेन्शन सुरु करणार.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल देखील दिले जाणार.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाधीच पुण्यातील वडगाव भागात धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लावण्यात आले होते
याविरोधात पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने तक्रार दिल्यानंतर आता पोलिसात याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सिंहगड रोड पोलिस ठाण्यात राहुल मानकर आणि अतुल नाईक यांच्या विरोधात शहर विद्रूपीकरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
फडणवीस यांच भाषण पुर्ण झालं असतं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळालं असतं
विरोधी पक्षाने जाणीवपूर्वक स्थगण आणले- प्रविण दरेकर
अंबादास दानवे हे कोणाच्या बाजूने आहे? दरेकर यांचा सवाल
औरंगाबादहून शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचा लाँग मार्च
कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकापासून निघाला लाँग मार्च
लाँग मार्च आज संध्याकाळी मुंबईत धडकणार
वन्यजमीन प्रश्न ,गावरान जमीन प्रश्नवर आज मुख्यमंत्री तोडगा काढणार
गावरान जमिनीवरील विकासाचा मार्ग आज मुख्यमंत्री मोकळा करणार
खात्रिलायक सूत्रांची माहिती
श्रमजीवी संघटना व मुख्यमंत्री यांच्यात महत्वाची बैठक आज 4 वाजता विधानभवनात होणार आहे
या बैठकीत वसई ,विरार ,ठाणे व पालघर ग्रामीण भागातील लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून परिषदेत गदारोळ
वन्यजमीन प्रश्न ,गावरान जमीन प्रश्नवर आज मुख्यमंत्री तोडगा काढणार
श्रमजिवी संघटना व मुख्यमंत्री यांच्यात महत्वाची बैठक आज 4 वाजता विधानभवनात होणार
या बैठकीत वसई ,विरार, ठाणे व पालघर ग्रामीण भागातील लोकांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार
नाशिक : श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज युवती सेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन,
श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्वयं रोजगार मेळाव्यात युवकांना दिले जाणार प्रमाण पत्र.
सरकार संवेदनशील आहे, यामुळे शेतकऱ्यांना १२ हजार कोटी दिले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाना पटोले यांना जोरदार उत्तर
मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावेळी विरोधकांचा गोंधळ
शेतकऱ्यांवर लाठीचार्जवरुन नाना पटोले यांनी सरकारला घेरले
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावरुन सरकारला विचारला जाब
सरकार शेतकरीविरोधी व कर्मचारी विरोधी आहे-नाना पटोले
धारशिव : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भुम मतदार संघातील आरोग्य यंत्रनेचा छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून पंचनामा
भुम येथील ग्रामीण रुग्णालयाला संभाजी महाराज यांनी भेट देत केली पोलखोल
रुग्णालयात डॉक्टर, नर्स याची कमतरता असुन अनेक ठिकाणी अस्वच्छता, स्वच्छता गृहात पाणी नाही, अनेक मशीन बंद असुन धुळखात
डॉक्टर कर्मचारी निवासस्थान येथे घाणीचे साम्राज्य, रुग्णांनीही मांडल्या व्यथा
नाफेडने कांदा खरेदी सुरु केली- मुख्यमंत्री
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्व मदत सरकार करेल
कांदा निर्यातीस बंदी नाही- मुख्यमंत्री
विरोधकांचा सभागृहात गोंधळ
सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा निवडणूकीच्या प्रचाराला जास्त महत्व – रोहित पवार
कापसाचा प्रश्न अनेक महिन्यापासून प्रलंबीत आहे- रोहित पवार
सरकारला फक्त 40 लोकांना खुश ठेवायचं आहे, रोहित पवार यांचा अधिवेशनात आरोप
विधानसभेत कांद्याच्या घसरलेल्या दरावर चर्चेला सुरुवात
छगन भुजबळ यांनी मांडला विषय
कांदे आणि द्राक्ष याच्या दरावर मांडली भूमिका
केंद्राशी चर्चा करण्याचे भुजबळ यांचे आवाहन
नाशिक : कांदा आणि कापसाच्या मुद्द्यावरुन आक्रमक,
कांद्यासह कापसाला हमीभाव देण्याची मागणी,
कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन
मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला कांद्यासारखं सोलून काढू- विरोधकांचा इशारा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक
दिल्लीतील कथित मद्यविक्री धोरण घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत?
सीबीआय तत्कालीन मविआ सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी करणार?
भाजप नेते आशिष शेलार यांनी केले सूतोवाच
अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे भेटीतून शंकेस वाव- आशिष शेलार
विधीमंडळ अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आशिष शेलार यांनी माध्यमांशी साधला संवाद
कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे विरोधक आक्रमक
गेटवर कांदे आणून वेधले सरकारचे लक्ष
कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी
कांद्याने शेतकऱ्यांना रडवले, विरोधकांनी सरकारला घेरले
ठाकरे गटाकडून विधान परिषदेत प्रतोद नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापती गोऱ्हे यांना दिले आहे. विलास पोतनीस यांना प्रतोद, तर सचिन अहिर यांना उपनेते म्हणून नियुक्तीसाठी पत्र दिले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठाकरे-शिंदेंच्या संघर्षाने गाजणार आहे.
विधानसभेत स्वतःचं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता विधान परिषदेकडे लक्ष दिले आहे. त्यांनी विधान परिषदेत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद म्हणून निवडीचे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिलं आहे.
विधानपरिषदेतील मोठी बातमी
शिवसेनेनं दिलेल्या प्रतोद पदाच्या निवडीबद्दल लगेच निर्णय होणार नाही
कायदेशीर बाजू तपासूनचं निर्णय घेतला जाणार
विधानपरिषदेत शिवसेनेचं संख्याबळ नाही
प्रतोद पदाबद्दल जरी पत्र दिलेलं असलं तरी आताचं निर्णय होणार नाही
कायदेशीर अभ्यास पुर्ण झाल्यानंतरचं विधानपरिषदेच्या सभापती निर्णय घेणार असल्याची माहिती
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती.