मुंबई : आज राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच गाजलेय. यामध्ये दादा भुसे आणि अजित पवार हे दोन दादा एकमेकांना चांगलेच भिडल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये संजय राऊत यांनी ट्विट करत दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावरून विधानसभेत बोलत असतांना दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत जहरी टीका केली होती. त्यावेळी दादा भुसे यांनी शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला होता. त्यावरून अजित पवार यांनी दादा भुसे यांना चांगलेच धारेवर धरले होते. आणि सवाल उपस्थित करत रेकॉर्डवरुन तो शब्द काढून टाकण्यास सांगितले होते. त्यावरून विधानसभेत दोन दादा चांगलेच भिडले होते.
यावेळी दादा भुसे विधानसभेत बोलत असतांना म्हणाले, आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर लुट केल्याचे आरोप केले होते. त्यामध्ये कुठल्याही यंत्रणेद्वारे चौकशी करा मी तयार असल्याचे भुसे म्हणाले होते.
याशिवाय मी जर दोषी आढळून आलो तर मंत्री नाही आमदार नाही थेट राजकीय निवृत्ती घेईल असे दादा भुसे यांनी म्हंटलं होतं याचवेळी दादा भुसे यांनी जहरी टीका केली होती. त्यामध्ये दादा भुसे यांनी संजय राऊत आमच्या मतावर निवडून आले त्यांनी राजीनामा द्यावा असेही भुसे म्हणाले.
याशिवाय संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खाऊन चाकरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांची करतात असा टीका दादा भुसे यांनी केली होती. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आक्रमक झाले होते.
यावेळेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दादा भुसे यांना खडेबोल सुनावत शरद पवार यांचे राष्ट्रीय नेते आहेत. त्याच्यावर टीका करण्याचे कारण काय असे म्हणत तो शब्द रेकॉर्डवरुन काढून टाका अशी मागणी केली होती. त्यावरून अध्यक्ष यांनी तपासून घेऊन काढून टाकू अशी ग्वाही दिली होती.
यावेळी बोलत असतांना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. अजित पवार म्हणाले दादा भुसे तुम्हाला जे बोलायचे ते बोला पण पवारसाहेब त्यांचे नाव घ्यायची गरज नव्हती. तो शब्द तुम्ही घ्याची गरज काय होती ? असा सवाल उपस्थित करून नाराजी व्यक्त केली होती.
या दरम्यान विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. दादा भुसे आणि अजित पवार यांच्यात झालेली खडाजंगी आजच्या दिवसभरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला असून संजय राऊत यांच्या ट्विटवरुन मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.