मोठी बातमी! महायुतीचं खातेवाटप ठरलं? नव्या मंत्र्यांच्या शपथविधी पूर्वीच महत्त्वाची माहिती समोर, पाहा कोणाला कोणतं खातं मिळणार?

| Updated on: Dec 15, 2024 | 3:52 PM

भाजप विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला, भाजपनं 132 जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दरम्यान आता खेतवाटपाची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! महायुतीचं खातेवाटप ठरलं? नव्या मंत्र्यांच्या शपथविधी पूर्वीच महत्त्वाची माहिती समोर, पाहा कोणाला कोणतं खातं मिळणार?
Follow us on

5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचं पाहायला मिळालं. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालं असून, नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महायुतीमधील 39 आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाजपचे सर्वाधिक 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

दरम्यान खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिदे गट गृह मंत्रि‍पदासाठी आग्रही होता, मात्र हे खातं भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्रालयासोबतच भाजपकडे महसूल, शिक्षण आणि पाटबंधारे ही खाती राहणार असल्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

भाजप विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला, भाजपनं 132 जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला नगर विकास मंत्रालयासोबत गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी आणि मराठी भाषा ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अर्थ मंत्रालयासोबत, क्रीडा आणि सहकार खातं मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी

दरम्यान या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात तीनही पक्षांकडून काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर अनुभवी चेहऱ्यांना डावलण्यात आलं आहे. आज भाजपचे 20 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 तर शिवसेना शिंदे गटाचे 10 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपकडून आतापर्यंत नितेश राणे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन करण्यात आले आहेत.