Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणी घेतली शपथ? कोणाचा पत्ता कट? वाचा संपूर्ण यादी

| Updated on: Dec 15, 2024 | 6:30 PM

आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला, नव्या मंत्र्यांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 19 शिवसेना शिंदे गटाच्या 11 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

Maharashtra Cabinet Expansion 2024 :  महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणी घेतली शपथ? कोणाचा पत्ता कट? वाचा संपूर्ण यादी
Follow us on

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला, मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. दरम्यान आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, यावेळी भाजपच्या सर्वाधिक 19 मंत्र्यांनी शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.

विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, भाजपने विधानसभेत तब्बल 132 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 आणि शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर आता नव्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

दिग्गजांना धक्का 

दरम्यान या नव्या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांची देखील मंत्रिपदाची संधी हुकली आहे. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?  

भाजप

चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
गणेश नाईक
मंगलप्रभात लोढा
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
अशोक उईके
आशिष शेलार
संजय सावकारे
नितेश राणे
आकाश फुंडकर
माधुरी मिसाळ – राज्यमंत्री
पंकज भोयर – राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर – राज्यमंत्री
शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवसेना 

गुलाबराव पाटील
दादा भुसे
संजय राठोड
उदय सामंत
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
आशीष जैस्वाल – राज्यमंत्री
योगेश कदम – राज्यमंत्री

राष्ट्रवादी 

हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवळ
मकरंद जाधव
बाबासाहेब पाटील
इद्रनील नाईक