सर्वात मोठी बातमी… मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर जाणार?, गृह नव्हे आता ‘या’ खात्यावरून कोंडी; काय घडतंय महायुतीत?

| Updated on: Dec 14, 2024 | 11:54 AM

अखेर उद्या म्हणजे रविवारी १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

सर्वात मोठी बातमी... मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर जाणार?, गृह नव्हे आता या खात्यावरून कोंडी; काय घडतंय महायुतीत?
ajit pawar devendra fadnavis eknath shinde
Follow us on

Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तीन आठवडे उलटले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. येत्या १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरुन महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडणार?

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनेक तारखा समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोललं जात होतं. तर काही नेत्यांनी १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या या सर्व तारखा चुकीच्या ठरल्या आहेत. अखेर उद्या म्हणजे रविवारी १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.

मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावर अद्याप एकमत नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारावरुन सध्या महायुतीतील तिढा कायम आहे. खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ पाहायला मिळत आहे. महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जातं आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रविवारी दुपारी ४ वाजता नागपुरातील राजभवनात शपथविधी होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले आहेत.

भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप

महायुतीत गृहखात्याबाबत संभ्रम कायम पाहायला मिळत आहे. त्याऐवजी एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्यासोबतच महसूल खात्याची मागणी केली आहे. पण महसूल खाते सोडण्याची भाजपची तयारी नाही. याशिवाय शिंदे यांच्या काही माजी मंत्र्यांच्या फेर समावेशालाही भाजपने आक्षेप घेतला आहे. यावरही एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या भाजपकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.