विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. नव्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार? कोणाच्या वाट्याला कोणंत खात जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर आज मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त लागलं असून, नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत महायुतीमधील एकूण 39 आमदारांना फोन करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही अनुभवी चेहऱ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
आज होणाऱ्या शपथविधीसोहळ्यासाठी आतापर्यंत महायुतीच्या 39 आमदारांना फोन करण्यात आला आहे. ज्यामध्ये भाजप 20, शिवसेना शिंदे गट 10 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 आमदारांचा समावेश आहे.
कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
भाजप आमदारांची यादी
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे
शिवसेना आमदारांची यादी
एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची यादी
नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील,
दत्ता भरणे, सना मलिक, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
आज नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.या सोहळ्याची जय्यत
तयारी करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी हा शपथविधी सोहळा पार
पडत आहे. दरम्याना आता महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार
याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.