मराठवाड्यातील सहा आमदारांना मंत्रीपदासाठी फोन आले आहे. त्यात संजय शिरसाठ, अतुल सावे, मेघना बोर्डीकर, बाबासाहेब पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचा समावेश आहे.
अजित पवार हे नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. या ठिकाणी अजित पवार यांचा सत्कार पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद अजित पवार साधला.
वरळीमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वरळीतील पूनम चेंबर्स या इमारतीला आग लागली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे यासाठी जालन्यातील राजुर येथील होमगार्ड सदाशिव ढाकणे यांनी ४ डिसेंबर रोजी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. आज शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन आल्यानंतर सदाशिव ढाकणे यांनी भाजप सरकारचे आभार मानले आहे..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत. दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी शिंदे नागपूरला जात आहे.
नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्वागत रॅली काढण्यात आली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानावरून एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाले आहेत. सायंकाळी चार वाजता नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशन आधी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ते उपस्थित राहणार आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाही? अद्याप मंत्रिपदासाठी भुजबळांना फोन नाही. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा आहे. 2014 ते 2019 सोडून छगन भुजबळ अनेक वर्षे मंत्री राहिले आहेत. उपमुख्यमंत्रीसह गृहमंत्री म्हणून देखील भुजबळांनी कारकीर्द गाजवली आहे. नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी अमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला.
“आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉल आला आणि त्यांनी मंत्रिपदासाठी आमची वर्णी लागल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सुजय विखे पाटील यांचा जो पराभव होता त्यातून आम्ही बरंच काही शिकलो आणि तरीदेखील आम्ही विजयश्री खेचून आणली. कारण साहेबांची कामं जनतेकडे पोहोचलेली आहेत,” असं शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील म्हणाल्या.
“परभणीत झालेल्या आंदोलनात अनेक अनुयायांना अटक करण्यात आली. त्यातील एकाचा आज पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आहे. त्यात जेवढ्या जणांना पोलिसांनी पकडलं आहे त्यांना सोडून द्या. ज्यांनी भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांवर चौकशा लावा,” अशी मागणी करत आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. यामध्ये मंत्रीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मात्र कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच नेत्याला मंत्रिपद मिळावं अशी सुप्त भावना पाहायला मिळत आहे. चार वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आणि महिला चेहरा असलेल्या भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे. मंत्रिपद जाहीर होण्यापूर्वीच माधुरी मिसाळ यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जल्लोष सुरू करायला सुरुवात केली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ४ वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आला. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ताडोबा प्रशासनाच्या मदतीने या वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आले आहेत.रेडिओ कॉलर लावण्यात आलेले सर्व वाघ नर असून त्यांचं वय अंदाजे दिड ते अडीच वर्षा दरम्यानचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री शपथ घेणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली.
उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजी नगर कडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात सर्वात कमी ८.४, नगर ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते.
सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीनंतर महायुतीनेही पुन्हा डावलले. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन नाही. 2014 साली सोलापूर जिल्ह्याला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिले होते.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय सावकारे यांना मंत्रिपदासाठी फोन आला असून भुसावळ मध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे दरम्यान संजय सावकारे यांना फोन येताच संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे व त्यांचे कुटुंबीय हे नागपूरकडे रवाना झाले आहेत. मंत्री पदासाठी सावकारे यांना फोन आल्याची माहिती स्वतः त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी दिली आहे.
आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉल आला आणि त्यांनी मंत्री पदासाठी आमची वर्णी लागल्याचं जाहीर केलेला आहे आणि त्यामुळे आनंदाचा उत्साहाचे वातावरण आहे सुजय विखे पाटील यांचा जो पराभव होता त्यातून आम्ही बरेच काही शिकलो आणि तरीदेखील आम्ही विजयश्री खेचून आणली कारण त्यांची काम जनतेकडे पोचलेली आहेत, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारच्या पहिल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण नागपुरात महायुतीच्या नेत्यांची जोरदार बॅनरबाजी दिसून आली. होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा जोरदार शक्ती प्रदर्शन दिसून आले. महायुतीच्या विजयाचे कर्णधार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे एअरपोर्ट पासून विधानभवनापर्यंत मोठ-मोठे होर्डिंग आणि बॅनर्स तर चौका चौकात देवा भाऊ जो बोलता है वो करता है अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे होर्डिंग आणि बॅनर लागले आहेत.
या मंत्रिमंडळात रविंद्र चव्हाण यांना मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण त्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला अद्याप फोन नाही… 2014 साली सोलापूर जिल्ह्याला एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रिपद दिले होते… मात्र 2019 नंतर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद न दिल्याने सोलापूरकर नाराज… आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार आहेत… मात्र तरीही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे चित्र… अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाची मंत्रिपदाबाबत चर्चा होती… मात्र दोघांनाही अद्याप फोन न आल्याने सोलापूरकर नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत…
राज्यात जळगाव शहरात सर्वात कमी ८.४, नगर ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असलेल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते. डिसेंबरमध्ये शहरात किमान तापमान प्रथमच १०.६ अंश नीचांकी पातळीवर गेले. यापूर्वी डिसेंबर २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात १०.८ व त्यापेक्षा कमी तापमान गेल्याची नोंद आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ११.७ अंश तापमानाची नोंद झाली.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर भाजपचा शत प्रतिशत विजय झाल्याने रावल यांना संधी… सलग 5 वेळा भाजपकडून आमदार, विक्रमी मताधिक्य मिळवून विजयी… एकेकाळी दोन्ही जिल्हे मिळून रावल हे एकटे भाजप आमदार होते… संघर्षातून दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यात यशस्वी…
घाटी रुग्णालयात 100 व्हेंटिलेरच्या खाटा वाढणार आहेत. येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लवकरच 50 व्हेंटिलेटर खाटा कार्यान्वित होतील, तर गुरुवारी 50 खाटांच्या क्रिटिकल केअर युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. क्रिटिकल केअर युनिटची उभारणी 23 कोटी रुपयांच्या निधीतून होत आहे. यामध्ये मूलभूत सुविधा आणि यंत्रसामग्रीचा समावेश असून, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केला जाईल,असे डॉ.धानोरकर यांनी सांगितले.
विरोधी पक्ष राहू नये अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. मोदी ६५ वर्षातील असत्य बोलणारे पंतप्रधान आहेत. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. ईडी-सीबीआय भाजपच्या घरी कधी गेली नाही – संजय राऊत
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 :महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : उद्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या शपथविधी सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.
Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. त्यामुळे सध्या नागपुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Cabinet Minister Swearing-in LIVE : महाराष्ट्रात महायुती सरकारला बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख मिळताना दिसत होती. त्यातच आज (15 डिसेंबर) महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात आहे. येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.