“जनसामान्यांच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. यासाठी पुण्यातील सर्वात जुने मंदिरात असलेल्या सारसबागेतील श्री सिद्धिविनायक गणेशाच्या चरणी आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं आहे. इव्हीएम मशीन विरोधात विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विरोधकांना आता पाच वर्ष आक्षेप घेण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. महायुती फेव्हिकॉलचा जोड आहे तो कधीच तुटणार नाही” अशी प्रतिक्रिया भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली
आळंदी,पुणे – देवाच्या आळंदी मध्ये 23 तारखेपासून कार्तिकी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभरातून जवळपास 2 ते 3 लाख वारकरी भाविक आळंदी मध्ये दाखल. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. उद्या 28 तारखेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीतर्फे मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली .
देवेंद्र पडणवीस यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ हे सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यापूर्वी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच दिल्लीत सुटू शकतो. आज दुपारनंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
गौतम अदानींना अटक केली पाहिजे. ते स्वत:वरील आरोप कधीच मान्य करणार नाहीत. त्यांच्यावर अमेरिकेत अनेक आरोप आहेत, अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय – राहुल गांधी यांची टीका.
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मतांच्या बेरजेत झालेल्या घोळाच्या संदर्भात रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलं आहे.
कन्नड विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही एकूण मतदानाच्या कित्येक पटींनी मोठी आहे. यावर टीका करताना आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे. गुजराती ईव्हीएम च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकले आहे का असा सवाल उपस्थित केला आहे?
#EVM मध्ये घोळ ही महाराष्ट्राच्या जनतेची शंका आता वस्तुस्थितीत बदलत आहे ? त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कन्नड मतदारसंघ ….
गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का ?#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/uBagdal05A
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 27, 2024
आमच्या कुणाच्याही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस , अजित पवार आणि एकनाथ शिंदे सगळेजण निवांत आहेत. संजय शिरसाट यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर .
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक संत्रा बागेत पडून आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार, अचलपूर ,वरुड ,मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्र्याचं उत्पादन केलं जातं. बाजारपेठेमध्ये संत्र्यांची मागणी घटली आहे. दुसरीकडे मागील वर्षीचा गारपिटीचा तीन कोटी रुपयांचा विमा कंपनीकडे थकीत आहे.
धाराशिव- श्री तुळजाभवानी मंदिर नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिरातील पुरातन दगडावर नंबर टाकण्याचे काम सुरु झाले आहे. एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुढील दोन टप्प्यांच्या कामाबाबत उद्या मिटींगमध्ये नियोजन होणार आहे. मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली.
“नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं. नांदेडमध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात. खरंच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं, शिकलो, त्यातून पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो. मतांची टक्केवारी वाढली,” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळेच याआधी भाजप सत्तेत आले. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर भाजप सत्तेत आलं नसतं. याचं सगळं श्रेय एकनाथ शिंदे यांना जातं. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर लाडकी बहीण योजना आली नसती. तुम्हाला एकनाथ शिंदेंमुळे ही योजना मिळाली म्हणून भाजपचे लाडके भाऊ आता सत्तेत आले आहेत. त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे यांना दुर्लक्षित करता येणार नाही,” असं बच्चू कडू मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले.
“जाती आणि धर्माचं फॅक्टर महत्त्वाचं ठरलं. धर्माचा झेंडा जिंकला आणि आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला. झेंडे जिंकले सेवा हरली. कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे. EVM मध्ये पारदर्शकता नाही. जगातील सगळे देश बँलेटवर जर निवडणुका घेत असतील तर भाजप का म्हणत नाही आम्ही बॅलेटवर निवडणुका घेऊ? मला पाडण्याचं श्रेय घेणाऱ्याना सांगतो की तुमची बच्चू कडूला पाडण्याची औकात नाही. मला पाडण्याचं जे श्रेय राणा घेत आहेत, त्यांची ती ताकद नाही,” असं बच्चू कडू म्हणाले.
मुंबईतील अंधेरी पश्चिम वीरा देसाई रोडवरील एका इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठ वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोणीही जखमी झाले नाही.
निवडणुकीच्या पराभवावर बैठकीत करण्यात आली चर्चा… शिवसेना मध्यवर्तीय कार्यालयात बैठक संपन्न मात्र बैठकीत प्रसार माध्यमांना करण्यात आली मनाई… येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्यासाठी ठरवण्यात आली रणनीती… नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक… नाशिक जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्व उमेदवार पराभूत… ठाकरे सेनेच्या पदाधिकारी बैठकीत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठी आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा ठेवण्यात आला आरोप… महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही ठाकरे गटाची नाराजी
महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र व्यवहार करत केली होती मागणी… एकूण असलेल्या बूथ पैकी पाच टक्के बूथ वरील फेर मतमोजणी होण्याची शक्यता… फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि GST भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुधाकर बडगुजर यांना पत्र… मतमोजणीनंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर केली होती शंका उपस्थित… याच मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील फेर मतमोजणीची केली आहे मागणी…
बंडखोर आता दिल्लीतल्या नेत्यांना घाबरत नाहीत… सरकार स्थापनेबाबत अद्यापही संभ्रमच.. 26 तारखेची मुदत उलटून गेली… भाजपनं तयार केलेले बंडखोर त्यांच्याच नेतृत्वाला आव्हान देत आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
जळगावच्या मुक्ताईनगरात असंख्य लाडक्या वहिनींनी एकत्र येत नागेश्वर मंदिरात घातलं देवाला साकडं… केला दूध अभिषेक… लाडक्या बहिणींनी एक मुखाने केली मागणी, पुन्हा मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे व्हावे….
नवी मुबंईच्या Apmc बाजारात मटारच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. दरही निम्म्यावर आले आहेत. Apmc बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाला असून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रतिकिलो शंभरी पार केलेल्या हिरव्या वाटाण्याचे दर निम्यावर उतरले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात प्रतिकिलो १००-१२० रुपयांवरून उपलब्ध असलेला वाटाणा आता ६०-७० रुपयांवर विक्री होत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही वाटाणा आवाक्यात आहेत.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणखी आशियाई सिंह दाखल होणार आहेत. गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणखी दोन आशियाई सिंह मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी आणण्यात आली होती. सिंहांच्या बदल्यात, SGNP सक्करबाग प्राणीसंग्रहालयाला वाघांची जोडी देईल. आशियाई सिंह प्रदर्शन आणि प्रजननासाठी आणले जात आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात १ हजार ४०० तर चांदीच्या दरात १ हजार ५०० ने घसरण झाली आहे. सोमवारी रोजी सोने एक हजार ३०० रुपयांनी तर चांदीच्या भावात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली होती. दोन दिवसांत मिळून सोने व चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू २ हजार ७०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सोन्याचे दर ७६ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर तर चांदी ८९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. ऐन लग्न सराईत सोन्या चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं आहे. पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १८ जागा महायुतीला तर केवळ दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार, याचे सूत्र अद्यापही निश्चित झालेले नसताना आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं, यासाठी जुळवणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेबाबत मोठी अपडेट… महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष आहे. काल 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. अश्विनी वैष्णव आणि भाजपचे दोन निरीक्षक महाराष्ट्रात येणार आहेत. तेव्हा नेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.