Corona Update : तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत अखेर लेखी आदेश जारी, 11 जिल्ह्यात कार्यक्रमांना परवानगी, यादीत तुमचा जिल्हा आहे का?

| Updated on: Feb 08, 2022 | 8:45 PM

आता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि तमाशा कार्यक्रमाबाबत अखेर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं लेखी आदेश काढला आहे. राज्यातील 11 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार आता बंदिस्त किंवा मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना परवानगी देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

Corona Update : तमाशा, सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत अखेर लेखी आदेश जारी, 11 जिल्ह्यात कार्यक्रमांना परवानगी, यादीत तुमचा जिल्हा आहे का?
तमाशा (फाईल फोटो)
Follow us on

पुणे : राज्यातील कोरोना संसर्ग ओसरू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली जात आहे. मागील काही दिवसांपासून तमाशाला परवानगी देण्याची मागणी तमाशा कलावंतांसह (Tamasha Artist) विविध संस्थांकडून करण्यात येत होता. त्याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानंतर आता विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि तमाशा कार्यक्रमाबाबत अखेर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं लेखी आदेश काढला आहे. राज्यातील 11 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार आता बंदिस्त किंवा मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना परवानगी देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील 11 जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि तमाशाला परवानगी देण्यात आली आहे. 50 टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह या कार्यक्रमांना परवानगी देण्याचे आदेश राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकारनं परवानगी देऊनही स्थानिक प्रशासनात परवानगीबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. यामुळे आता आपत्ती व्यवस्थापन विभागानं लेखी आदेश काढले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता कलाकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये परवानगी?

मुंबई
पुणे
भंडारा
सिंधुदुर्ग
रायगड
रत्नागिरी
सातारा
सांगली
गोंदिया
कोल्हापूर
चंद्रपूर

नेत्यांचं आश्वासन, पण प्रशासनाची दिरंगाई?

यापूर्वी 1 फेब्रुवारीपासून राज्यात तमाशाचा फडाला मुभा देण्यात येणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना तसं आश्वासन मिळालं होतं. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी याबाबत माहिती दिली होती. तत्पूर्वी ‘2 फेब्रुवारीपर्यंत लोक कलावंतांना तमाशा सादर करण्याची परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा रघुवीर खेडकर यांनी दिला होता. ते नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभर सर्व काही सुरू आहे. मात्र, तमाशा बंद आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. या प्रशासनाने आम्हाला सावत्र वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

इतर बातम्या :

Video : ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, अजितदादा काय उत्तर देणार?

Nitesh Rane : नितेश राणेंना पुन्हा कोर्टाकडून तारीख पे तारीख, आज हायकोर्टात काय झालं?