Maharashtra Coronavirus LIVE Update : शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण कुटुंबला कोरोनाची लागण

| Updated on: Apr 27, 2021 | 12:32 AM

Maharashtra Coronavirus Live Update: महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आहे.

Maharashtra Coronavirus LIVE Update : शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण कुटुंबला कोरोनाची लागण
corona lockdown
Follow us on

Maharashtra Coronavirus Live Update :महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Apr 2021 10:11 PM (IST)

    शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण कुटुंबला कोरोनाची लागण

    उस्मानाबाद :

    शिवसेनेचे आमदार कैलास पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

    पाटील यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

    गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आमदार पाटील आले होते पॉझिटिव्ह त्यानंतर आता सर्दी व इतर लक्षणे आल्याने टेस्ट केल्यावर पून्हा पॉझिटिव्ह

    दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याच्या प्रकाराला पुष्टी

    आमदार पाटील यांच्यावर घरीच उपचार तर आई वडील खासगी रुग्णालयात उपचार

  • 26 Apr 2021 10:10 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजारच्या पुढे

    सांगली कोरोना अपडेट –

    सांगली जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजारच्या पुढे

    तर आज 40 कोरोना रुग्णांचा मृत्य

    यावर्षीचा मृत्यूचा नोंद संख्येत उच्चांकी नोंद

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 2143 वर

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1141 कोरोना रुग्ण

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 11544 वर

    तर उपचार घेणारे 935 जण आज कोरोना मुक्त

  • 26 Apr 2021 10:08 PM (IST)

    उस्मानाबादेत 720 नवे कोरोनाबाधित

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 720 रुग्ण व 17 मृत्यू तर 585 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुक 257, तुळजापूर 85,उमरगा 71, लोहारा 18, कळंब 103, वाशी 43, भूम 70 व परंडा 73 रुग्ण

    01 एप्रिल – 283
    02 एप्रिल – 292
    03 एप्रिल – 343
    04 एप्रिल – 252
    05 एप्रिल – 423
    06 एप्रिल – 415
    07 एप्रिल – 468
    08 एप्रिल – 489
    09 एप्रिल – 564
    10 एप्रिल – 558
    11 एप्रिल – 573
    12 एप्रिल – 680
    13 एप्रिल – 590
    14 एप्रिल – 613
    15 एप्रिल – 764
    16 एप्रिल – 580
    17 एप्रिल – 653
    18 एप्रिल – 477
    19 एप्रिल – 662
    20 एप्रिल – 645
    21 एप्रिल – 667
    22 एप्रिल – 719
    23 एप्रिल – 719
    24 एप्रिल – 810
    25 एप्रिल – 569
    26 एप्रिल – 720

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6276 ऍक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद – 2 लाख 07 हजार 903 नमुने तपासले त्यापैकी 35 हजार 065 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 26.73 टक्के

    27 हजार 920 रुग्ण बरे 80.96 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 869 तर 2.26 टक्के मृत्यू दर

  • 26 Apr 2021 08:22 PM (IST)

    राज्याला मोठा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 48,700, तर 71,736 रुग्णांची कोरोनावर मात

    राज्यात आज दिवसभरात 71,736 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज दिवसभरात 48,700 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 524 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला

  • 26 Apr 2021 07:43 PM (IST)

    वाशिममध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबजार, 16 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

    वाशिम : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामध्ये ऑक्सिजन, रेमडीसीवर सारखा तुटवडा भासत आहे.मात्र काहीजण याचा फायदा घेऊन ऑक्सिजन काळया बाजारात विकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा तक्रारी येत होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी कारंजा येथील न्यू हिंदुस्तान एजन्सी येथे चौकशी केली असता त्यांच्याकडे एका बोलेरो पिकपमधून 55 भरलेले ऑक्सिजन सिलेंडर आणि 9 रिकामे सिलेंडर आढळुन आले. त्यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने, 16 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर मुद्देमाल कारंजा पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. याबाबत जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांना अहवाल सादर करण्यात येणार असून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

  • 26 Apr 2021 07:40 PM (IST)

    वसई विरारला मोठा दिलासा, एका दिवसात 50 टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली

    वसई विरार कोरोना अपडेट:

    – वसई विरार कराना मोठा दिलासा, कालच्या पेक्षा आज 50 टक्क्याने रुगणाची संख्या घटली

    – काल दिवसभरात 1001 रुगणाचे किरोना पॉझिटिव्ह अहवाल आले होते, तर आज दिवसभरात 546 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

    -दिवसभरात 10 जणांचा मृत्यू तर 656 जणांनी केली कोरोनावर मात

    वसई विरार महापालिकेत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या : 50 हजार 853

    आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्ण संख्या : 1053

    कोरोनावर मात केलेल्या रुगणाची संख्या : 38 हजार 909

    कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुगणाची संख्या : 1 हजार 931

  • 26 Apr 2021 07:36 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 873 नवे रुग्ण

    नांदेड :

    गेल्या 24 तासात 873 नवे रुग्ण, 24 जणांचा मृत्यू, एकूण टेस्ट 3564 त्यापैकी 873 पॉझिटीव्ह

    24 तासात 1247 जणांना डिस्चार्ज

    एकूण पॉझिटीव्ह – 76928
    बरे झाले – 62418

    एकूण मृत्यू – 1454

    सध्या ऍक्टिव्ह – 12795
    गंभीर – 249

    गेल्या पाच दिवसात
    22 एप्रिल – 1099 – 27
    23 एप्रिल – 1201 – 28
    24 एप्रिल – 850 – 26
    25 एप्रिल – 1105 – 26
    26 एप्रिल – 873- 24
    पाच दिवसात 4228 रुग्ण 132 मृत्यू

  • 26 Apr 2021 06:29 PM (IST)

    चंद्रपुरात कोरोनाचा हाहा:कार, दिवसभरात तब्बल 1529 नवे रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

    चंद्रपूर:

    गेल्या 24 तासात कोरोनाचा हाहा:कार, 1529 नव्या रुग्णांची नोंद

    24 तासात 23 मृत्यू

    एकूण कोरोना रुग्ण : 54369

    एकूण कोरोनामुक्त : 37715

    सक्रीय रुग्ण : 15843

    एकूण मृत्यू : 811

    एकूण नमूने तपासणी : 359554

  • 26 Apr 2021 06:28 PM (IST)

    यवतमाळमध्ये दिवसभरात तब्बल 45 रुग्णांचा मृत्यू, 1323 नवे कोरोनाबाधित

    यवतमाळ :

    यवतमाळ जिल्ह्यात आज 1323 जण पॉझिटिव्ह, 803 जण कोरोनामुक्त
    45 जणांचा मृत्यू
    जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या : 6703
    जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या : 49132
    एकूण मृत्यू ” 1157

  • 26 Apr 2021 05:46 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात  कोरोनाचा उद्रेक, 352 रुग्ण वाढले, 4 जणांचा मृत्यू

    वाशिम जिल्ह्यात  कोरोनाचा उद्रेक …

    जिल्ह्यात आज 4 रुग्णांचा झाला मृत्यू …

    नवे आढळले 352 रुग्ण…

    तर 620 जणांना देण्यात आला डिस्चार्ज…

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 26 दिवसात एकूण 79 रुग्णांचा झाला मृत्यू तर एकूण आढळले नवे 9485 कोरोना रुग्ण….

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 25660

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3816

    आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 21577

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 266

  • 26 Apr 2021 05:16 PM (IST)

    वेदांत रुग्णालयातील 4 जणांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समिती: एकनाथ शिंदे

    वेदांत रुग्णालयातील 4 जणांच्या मृत्यूची चौकशी होणार असून या बाबत कमिटी नेमली आहे .कोणीही दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार ,मात्र रुग्णालय बाबत माहिती घेतली असता क्रिटिकल कंडिशन मुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कारण रुग्णालय यांनी दिली आहे..तसेच प्रत्येक ठिकाणी फायर ,इलोट्रॉनिक आणि ऑक्सिजन ऑडिट करणे गरजेचे आहे त्यासाठी देखिल एक टीम काम करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे..नगरविकास मंत्री तथा पालक मंत्री एकनाथ शिंदे हे वर्तल नगर येथील वेदांत रुग्णालय येथे माहिती घेण्यासाठी आले होते.

  • 26 Apr 2021 05:15 PM (IST)

    पुण्यात गेल्या 28 दिवसांमध्ये 4 लाख लसीचे डोस दिले: मुरलीधर मोहोळ

    1 मेच्या लसीकरणासंदर्भात आढावा बैठक घेतली,  शहरात 82 लसीकरण केंद्र आहेत. लसीकरणाचे नियोजन आज करण्यात आले, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

    आजपर्यंत 7 लाख 70 हजार डोस देण्यात आलेत. गेल्या 28 दिवसाच्या कालावधीत 4 लाखांपेक्षा जास्त डोस दिले गेले.

  • 26 Apr 2021 04:57 PM (IST)

    पशुवैद्यकीय दवाखान्यांचा आणि डॉक्टरांचा अत्यावश्यक सेवेत समावेश

    पुणे –

    – पशुवैद्यकीय दवाखान्यांचा आणि डॉक्टरांचा अत्यावश्यक सेवेत समावेश,

    – कोव्हीड 19 च्या सर्व नियमांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याच्या राज्य सरकारला सूचना

    – लॉकडाऊनच्या काळात पशुंना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय पशुवैद्यक विभागानं काढलं परीपत्रक,

    – पशुवैद्यकीय दवाखान्यात, काम करणारे कर्मचारी, खाजगी पशुवैद्यक डॉक्टर आणि पशुपालन केंद्रातील कर्मचाऱ्यांचा आता अत्यावश्यक सेवेतील यादीत समावेश,

  • 26 Apr 2021 04:53 PM (IST)

    जालन्यात आता ऑटो रुग्णवाहिका, शहरात कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याची सुविधा

    ◆जालन्यात आता ऑटो रुग्णवाहिका

    ◆जालना शहरात कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याची सुविधा
    ◆ऑटो मध्ये ऑक्सिजन वापरले तर 450 रुपये भाडे
    ◆ऑक्सिजन नाही वापरले तर 400 रुपये भाडे
    ◆आर.एस.एस. च्या आपत्ती निवारण समिती कडून करण्यात आली सोय.

  • 26 Apr 2021 04:10 PM (IST)

    पुणे शहरातील एकुण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात

    पुणे –

    – पुणे शहरातील एकुण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात,

    – अडीच हजारापैकी 600 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती

    – क्रिटिकल रुग्णांना उपचारासाठी पाठवलं जातं ससूनला, त्यामुळे ससूनमध्ये मृत्यूच प्रमाण जास्त

    – सध्या 477 रुग्णांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत,

    – शहरात आतापर्यंत 6 हजार 498 जणांचा कोरोनानं घेतलाय बळी,

    – काल दिवसभरात 55 जणांचा झाला होता कोरोनानं मृत्यू

    – पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला मात्र मृत्यू संख्या आटोक्यात येईना …

  • 26 Apr 2021 03:21 PM (IST)

    वर्धा : नियमांचं उल्लंघन केलेल्यानंतर दंड न भरल्यास त्याचा बोजा संपत्तीवर चढवणार

    वर्धा :

    # नियमांचं उल्लंघन केलेल्यानंतर दंड न भरल्यास त्याचा बोजा संपत्तीवर चढवणार

    # उपविभागीय अधीकारी सुरेश बगळे यांची माहिती

    # नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक दुकान मालक, मंगल कार्यालय तसच वैयक्तिकरित्या अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे

    # पण अनेकांनी वाद घालत दंड भरला नाही

    # दंड न भरलेल्यांची माहिती काढत प्रथम आठ दिवसांची नोटीस, त्यानंतरही दंड न भरल्यास सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, नगरपालिकेचे प्रॉपर्टी कार्ड, नमुना आठ अ यावर बोजा चढवणार

  • 26 Apr 2021 02:17 PM (IST)

    जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर

    जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वॉर्ड बॉयने मयत रुग्णाच्या बोटांच्या ठशांचा वापर करून त्यांच्या बँकेतील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली आहे.

  • 26 Apr 2021 12:29 PM (IST)

    नगरच्या शंभरी पार आजींची कोरोनावर मात, आजी म्हणतात, ‘इच्छाशक्ती असली की सगळं होतंय…!’

    अहमदनगरला शंभरी पार केलेल्या आजी लक्ष्मीबाई डोके यांनी कोरोनावर मात ,

    कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती

    पंधरा दिवसांच्या उपचारानंतर लक्ष्मीबाईंनी कोरोनावर मात करीत ठणठणीत बऱ्या झाल्या,

    नगरच्या सुप्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलच्या दीपक डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले

    ‘इच्छाशक्ती असली की सगळं होतंय…!’, आजींचा मंत्र

  • 26 Apr 2021 11:28 AM (IST)

    मोठी बातमी : पुण्यात आता रेमडिसिव्हीरच्या रिकाम्या बॉटल परत घेणार

    -पुण्यात आता रेमडिसिव्हीरच्या रिकाम्या वायल परत घेणार
    – रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी पालिकेचे मोठं पाऊल
    – हॉस्पिटलला रेमडिसिव्हीरच्या वायल म्हणजेच रिकामी बॉटल जमा करावी लागणार
    – यामुळं काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले

  • 26 Apr 2021 11:08 AM (IST)

    कलंबोली महामार्गावर वाहनांच्या रागांच रांगा

    सायन पनवेल महामार्गावर पोलीस आणि पनवेल मनपा कडून वाहनांची तपासणी

    कलंबोली महामार्गावर वाहनांच्या रागांच रांगा

    गाडीवर बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी : विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

    विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

    शासनाने जिल्हाबंदी केल्याने महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची कारवाई

    गाडीत जास्त लोकं प्रवास करीत असल्यास पोलिसांनी गाड्या रोखल्या

    सबळ कारणांशिवाय कुणीही बाहेर पडू नये आदेश असताना आदेशाला केराची टोपली

  • 26 Apr 2021 10:15 AM (IST)

    सोलापूर पालिकेच्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

    सोलापूर- कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

    पालिकेच्या सर्वच लसीकरण केंद्र समोरासमोर नागरिकांच्या रांगा

    दोन दिवस लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची मोहीम आली होती थांबवण्यात

    पालिकेकडे लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणासाठी नागरिकांनी केली गर्दी

    शहरातील 35 लसीकरण केंद्रासमोर नागरिकांच्या रांगा

  • 26 Apr 2021 10:14 AM (IST)

    आंतरजिल्हा प्रवासाच्या ई-पाससाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक

    आंतरजिल्हा प्रवासाच्या ई-पाससाठी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक

    पुणे शहर पोलिसांकडे गेल्या तीन दिवसात तब्बल ११ हजारांहून अधिक डिजिटल पाससाठी नागरिकांनी अर्ज

    त्यापैकी निम्म्यांहून अधिक अर्ज कोविड निगेटिव्ह रिपोर्ट नसल्याने नाकारण्यात

    रविवारी सायंकाळपर्यंत ११ हजार २३८ डिजिटल पासची मागणी करणारे अर्ज पुणे पोलिसांकडे दाखल

    त्यापैकी ५ हजार ९७ अर्ज नाकारत केवळ ३ हजार ३०२ पास मंजूर

  • 26 Apr 2021 09:17 AM (IST)

    सोलापुरात रुग्णवाढीचा नवा उच्चांक, 24 तासात दोन हजार कोरोना रुग्णांची वाढ

    सोलापूर– 24 तासात वाढले दोन हजार रुग्ण

    शहर आणि जिल्ह्यातील 33 जणांचा कोरोनाने मृत्यू

    जिल्ह्यातला रुग्णवाढीचा नवा उच्चांक

    शहरात 2418 चाचण्यांमधून 442 रुग्ण तर ग्रामीण भागात अकरा हजार 705 चाचण्यांमधून 1602 रुग्ण आढळले

  • 26 Apr 2021 09:16 AM (IST)

    अक्कलकोटला जोडणारे 21 रस्ते बंद, सहा पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी सुरु

    सोलापूर- अक्कलकोटला जोडणारे 21 रस्ते बंद

    वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीसांचा निर्णय

    सहा पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी सुरू

    वाहतुकीसाठी सुरू असलेल्या 6 मार्गावर पोलिसांची तपासणी नाके

  • 26 Apr 2021 09:15 AM (IST)

    पनवेल मनपा क्षेत्रात तीन दिवसानंतर पुन्हा लसीकरण, सकाळपासून नागरिकांच्या रांगा

    पनवेल

    तीन दिवसानंतर पनवेल मनपा क्षेत्रात आजपासून पुन्हा लसीकरण

    लसीकरण केंद्राबाहेर लोकांची गर्दी

    सकाळी 5 वाजल्यापासून रांगा

    पनवेल मनपाला 4 हजार लसींचा पुरवठा

    आजपासून पुन्हा लसीकरण

    एका आठवड्यानंतर लसीकरण सुरू झाल्या नंतर दोन दिवसानंतर लसीकरण पडले होते बंद

  • 26 Apr 2021 08:52 AM (IST)

    सोलापूर पालिकेच्या सिंहगड कोव्हीड सेंटरमध्ये सुमारे 500 रुग्ण, तपासण्यासाठी केवळ दोनच डॉक्टर

    सोलापूर- पालिकेच्या सिंहगड कोव्हीड सेंटरमध्ये सुमारे 500 रुग्ण

    तपासण्यासाठी केवळ दोनच डॉक्टर

    500 रुग्णांची तपासणी करण्यास वेळ लागत असल्याने रुग्णांकडे दुर्लक्ष

    कोव्हीड सेंटरमधील वस्तूस्थिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनास कळवली

    मनुष्यबळ मिळत नसल्याने कोव्हीड सेंटर येथील यंत्रणेवर ताण येऊन रुग्णाकडे दुर्लक्ष

  • 26 Apr 2021 08:16 AM (IST)

    पुणे पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, शिवाजीनगरच्या पोलिस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा

    पोलिस दलामध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आता शिवाजीनगर येथील पोलिस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा

    या ठिकाणी १० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असून बाधित अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सर्वप्रथम या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार

    पोलिसांना करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलिस दलाने कोव्हिड सेलची स्थापना

    या सेलमध्ये सहायक पोलिस आयुक्त, एक निरीक्षक व तीन उपनिरीक्षक व अंमलदार यांची नियुक्ती

  • 26 Apr 2021 08:02 AM (IST)

    कोरोनाबधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून सहा हजार रुपयांची मदत

    पिंपरी चिंचवड

    -कोरोनाबधित रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून सहा हजार रुपयांची मदत

    -शहरात कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर विद्युत दाहिनी व गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात

    -मात्र दिवसेंदिवस वाढता मृत्यूंमुळे या दाहिन्यांवर ताण आल्यामुळे लाकूड आणि सरण यांची उपलब्धता करून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार

    -सरण आणि लाकडाचा खर्च महापालिकेकडून नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था करणार

  • 26 Apr 2021 07:44 AM (IST)

    ‘ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर्स हवे असल्यास संपर्क करा’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं रुग्णालयांना आवाहन

    ‘ॲाक्सीजन आणि व्हेंटिलेटर्स हवे असल्यास संपर्क करा’

    – केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं रुग्णालयांना आवाहन

    – रुग्णालयांना जाणवत आहेत व्हेंटिलेटर्सची कमतरता

    – गडकरींच्या प्रयत्नाने कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपूरात

    – लॅबमध्ये ४२५ रुपयांत रोज २५०० जणांची RTPCR चाचणी

    – लवकरंच मोबाईल लॅबचं नागपूरात इन्स्टॉलेशन होणार

    – कोरोना चाचणीचा वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार

  • 26 Apr 2021 07:32 AM (IST)

    ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने दोन रुग्णांचे मृत्यू प्रकरण, पालकमंत्री धनंजय मुंडेंचे चौकशीचे आदेश

    बीड : ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने दोन रुग्णांचे मृत्यू प्रकरण

    पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले चौकशीचे आदेश

    चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

    जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले निर्देश

    अज्ञातांनी ऑक्सिजन कॉक बंद केल्याने दोन रुग्णांचा झाला होता गुदमरून मृत्यू

    बीडच्या शासकीय रुग्णालयात घडला होता प्रकार

  • 26 Apr 2021 07:31 AM (IST)

    बीड जिल्ह्यात 40 हजार 857 लोकांनी कोरोनाला हरविले

    बीड जिल्ह्यात 40 हजार 857 लोकांनी कोरोनाला हरविले

    आतापर्यंत 844 रुग्णांचा मृत्यू

    सध्या 5 हजार 591 रुग्ण ऍक्टिव्ह

    कोरोनामुक्तीचा रेट 86. 39 टक्के

    घाबरून न जाण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन

  • 26 Apr 2021 07:30 AM (IST)

    नाशकातील 4 खासगी रुग्णालयांना मनपाची नोटिस, कोरोना नियम न पाळल्याचा ठपका

    नाशिक -शहरातील 4 खासगी रुग्णालयांना मनपाने बजावली नोटिस

    कोरोना संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने कारवाई

    कोरोना रुग्णांचे बिल शासन दराने आकारले आले का नाही या संदर्भात वारंवार सांगून देखील माहिती दिली नाही

  • 26 Apr 2021 07:23 AM (IST)

    नागपूर महापौरांचे फक्त पाहणी दौरे, कोविड रुग्णालय सुरु होईना

    नागपूर महापौरांचे फक्त पाहणी दौरे, कोविड रुग्णालय सुरु होईना

    – पाचपावली, केटीनगर, पक्वासा येथे ॲाक्सीजन उपचार सुरु होण्याची प्रतिक्षा

    – केटीनगर येथे दोन आठवड्यांपासून मनपाच्या अधिकाऱ्यांचे दौरे सुरु

    – पण अद्याप ॲाक्सीजनसह उपचार सुरु झाले नाही

    – रविवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुन्हा केला दौरा

    – एक-दोन दिवसांत रुग्णालय सुरु करण्याचं महापौराचं आश्वासन

    – पहिल्या लाटेनंतर मनपा प्रशासनाने कोरोना उपचाराची सोय का केली नाही?

    – संतप्त नागपूरकरांचा मनपा प्रशासनाला सवाल

  • 26 Apr 2021 07:18 AM (IST)

    औरंगाबादेत दुकानात दारुची विक्री, लॉकडाऊनचं उलल्ंघन करणाऱ्या 11 ठिकाणांवर कारवाई

    औरंगाबाद :-

    लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी राज्य उत्पादन शुल्क ऍक्शन मोडवर

    लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या 11 ठिकाणांवर केली जोरदार कारवाई

    4 वाइन शॉप 2 देशीची दुकाने आणि 5 परमिटवर केली कारवाई

    होम डिलिव्हरी ऐवजी दुकानात केली जात होती दारूविक्री

    11 ठिकाणांवर बेकायदेशीर दारू विक्री आणि साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल

    गुन्हे दाखल करून 11 ही ठिकाणे राज्य उत्पादन शुल्क ने केले सील

  • 26 Apr 2021 07:16 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 137 मेट्रीक टन ॲाक्सिजन उपलब्ध, आवश्यकतेनुसार रुग्णालयांना पुरवठा

    नागपूर जिल्ह्यात १३७ मेट्रीक टन ॲाक्सिजन उपलब्ध

    – काल दिवसभरात ७८ मेट्रीक टन ॲाक्सीजनचा पुरवठा

    – आवश्यकतेनुसार रुग्णालयांना ॲाक्सीजनचा पुरवठा

    – नोडल अधिकारी सतिश चव्हाण यांच्या मार्फत ॲाक्सिजनचं वितरण

    – नागपूर जिल्हा आणि विभागात ॲाक्सीजन पुरवठ्यासाठी १५ टॅंकर

    – ॲाक्सीजनचा पुरेसा साठा असल्याने कोरोना रुग्णांना दिलासा

  • 26 Apr 2021 07:15 AM (IST)

    पुण्यात रेमडेसिव्हीरची किमान साडेचार हजार इंजेक्शन्स उपलब्ध होण्याची शक्यता

    पुणे :

    रविवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यासाठी केवळ १६४७ रेमडेसिविर आणि ऑक्सिजन ३०० मे.टन उपलब्ध

    आज रेमडेसिविरची किमान साडेचार हजार इंजेक्शन्स उपलब्ध होण्याची शक्यता

    पुणे जिल्ह्याची रेमडेसिविर इंजेक्शन्सची दररोज पाच हजारांपेक्षा अधिक मागणी

    पुण्यासाठी दिवसाला सरासरी ३२०-३३० मे.टन ऑक्सिजनची गरज

    रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन जिल्ह्यासाठी कसा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत

  • 26 Apr 2021 07:15 AM (IST)

    औरंगाबादकरांची चिंता मिटली, 25 हजार कोरोना लस प्राप्त

    औरंगाबाद

    औरंगाबादकरांची चिंता मिटली,25 हजार कोरोनाच्या लसी प्राप्त

    उद्यापासून होणार सर्व लसीकेंद्रावर लसीकरण सुरू.

    लसींचा साठा समाप्त झाल्याने लसीकरणास लागला होता पूर्ण विराम

    उद्यापासून पुन्हा सुरू होणार जम्बो कोरोना लसीकरण

    काही दिवसांपूर्वी लसी समाप्त झाल्याने नागरिकांची वाढली होती चिंता

    लसी संपल्याचा पाठपुरावा करून प्राप्त केल्या 25 हजार कोरोनाच्या लसी

  • 26 Apr 2021 07:14 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात आठवडाभरात 40 हजार कोरोनामुक्त

    नागपूर :

    – नागपूर जिल्ह्यात आठवडाभरात ४० हजार कोरोनामुक्त

    – रोज सरासरी ५८०० रुग्ण होत आहेत कोरोनामुक्त

    – प्रतिकुल परिस्थितीतंही रुग्ण करत आहेत कोरोनावर मात

    – जिल्ह्यातील शेकडो ज्येष्ठ नागरीकांची कोरोनावर मात

    – १८ ते २४ एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ४० हजार रुग्ण कोरोनामुक्त

    – सकारात्मक मानसिकतेचाही होतो फायदा

  • 26 Apr 2021 07:12 AM (IST)

    शिवसेना आमदाराकडूनच संचारबंदीचं उल्लंघन, पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटनासाठी गर्दी जमवली

    औरंगाबाद :-

    शिवसेना आमदारांकडूनच संचारबंदी आणि लॉकडाऊनचं उल्लंघन

    संचारबंदी काळातही पाणी पुरवठा योजनेचं केलं उद्घाटन

    पाणी पुरवठा योजनेद्वारे आलेल्या पाण्याचं जलपूजन करून केलं उद्घाटन

    शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी जमाव जमवून केलं उद्घाटन

    औरंगाबादच्या बजाजनगर परिसरातील जय भवानी नगरात केलं उद्घाटन

    उद्घाटनाला 50 पेक्षाही जास्त लोकांची होती उपस्थिती

    आमदार संजय शिरसाठ यांनी संचारबंदीच्या नियमांना फासला हरताळ

    आमदार संजय शिरसाठ यांच्यावर कारवाई करण्याची वेगवेगळ्या संघटनांची मागणी

  • 26 Apr 2021 06:47 AM (IST)

    आजोबा 105 वर्षाचे, आजी 95 वर्ष, लातुरातील दाम्पत्याची कोरोनावर मात, आमदार धीरज देशमुखांकडून डॉक्टरांचे आभार

    माझ्या मतदारसंघातील काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन आज कोरोनावर मात केली. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे, असे ट्वीट आमदार धीरज देशमुख यांनी केले आहे.

  • 26 Apr 2021 06:40 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 107503 सक्रिय रुग्ण

    पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मोठी विध्वंसक

    ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

    पुणे जिल्ह्यात बाधितांचा आकडा 796645 वर

    आतापर्यंत एकूण 680067 जण कोरोनामुक्त

    पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 9020 जणांचा मृत्यू झाला

    सध्या 107503 सक्रिय रुग्ण आहेत.

  • 26 Apr 2021 06:39 AM (IST)

    मुंबईतील कोरोना स्थिती

    मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव

    मुंबईत 75,498 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.

    मुंबईत कोरोनामुळे 12790 जणांचा मृत्यू झालाय.

    मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 627644 वर पोहोचला

    आतापर्यंत एकूण 537944 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 26 Apr 2021 06:38 AM (IST)

    महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, 66191 नव्या बाधितांची नोंद

    राज्यात काल दिवसभरात 66191 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    तर दिवसभरात तब्बल 832 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले.

    दिवसभरात काल 61,450 जण कोरोनोमुक्त

    राज्यात एकूण 35,30,060 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

    राज्यातील मृत्यूदर हा 1.51 टक्क्यांवर आला आहे.