Maharashtra Crime : मुलाची ‘ती’ एक सवय मस्तकात गेली, जन्मदात्या बापाने पोराचे केले डझनभर तुकडे!

| Updated on: Aug 04, 2023 | 4:56 PM

Maharashtra Crime News : जन्मदात्या बापानेच आपल्या लग्नाला आलेल्या मुलाला संपवून टाकलं आहे. मुलाची ती एक सवय बापाच्या मस्तकात गेली आणि शेवटी वडिलांनीच मुलाचा खून केला. नेमकं असं काय झालं होतं की बापाने टोकाचा निर्णय घेतला.

Maharashtra Crime :  मुलाची ती एक सवय मस्तकात गेली, जन्मदात्या बापाने पोराचे केले डझनभर तुकडे!
Follow us on

शंकर देवकुळे, सांगली : मुलाने आपल्या वडिलांना संपवल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्य आहेत. यामध्ये घरगुती वादांमधून तरा कधी प्रॉपर्टीच्या हिस्स्यांवरून अशा प्रकारचे गुन्हे आपण घडले आहेत. मात्र महाराष्ट्रातमधील सांगलीतील मिरजमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या लग्नाला आलेल्या मुलाला संपवून टाकलं आहे. मुलाची ती एक सवय बापाच्या मस्तकात गेली आणि शेवटी वडिलांनीच मुलाचा खून केला. राजेंद्र यल्लाप्पा हंडिफोड वय 50 असंं आरोपी बापाचं नाव आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मिरजमधील गणेश तलाव लक्ष्मी मंदिराजवळ राहणाऱ्या राजेंद्र हंडिफोड यांचा मुलगा रोहित हांडीफोडला जुगार आणि व्यसनाधीन होता. आपल्या व्यसनाची तलाप पूर्ण करण्यासाठी तो घरामध्ये त्रास देऊ लागला होता. कुटुंबातील सर्वांनाच अशा प्रकार त्रास देऊ लागल्याने सर्वजण त्याला वैतागले होते. एक दिवशी संतापलेल्या वडिलांनीच त्याचा कायमचाच काटा काढला.

रोहितच्या वडिलांनी त्याचा कुऱ्हाडीने खून केला, बापाच्या मनाला इतकंच करून काही राहावलं नाही. मुलाला वैतागून गेलेल्या बापाने त्याला संपवलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले. कटरच्या मदतीने त्याने आपल्याच पोटच्या मुलाला संपवून टाकलं. शरीराचे तुकडे शेवटी पोत्यात भरले आणि काही तुकडे गणेश तलाव येथे फेकून दिले असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

आरोपी बापाने मुलाचा खून केल्यानंतर मिरज शहर पोलिसांमध्ये जात आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना त्यांनी सर्व काही सांगितल्यावर त्यांची पळापळ सुरू झाली. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा मिरज पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस फौज फाटा सुभाष नगर शिंदे हॉल आणि गणेश तलाव परिसरात दाखल झाला होता.

दरम्यान, आरोपी बापाने आपल्या मुलाला संपवलं आणि कबुलीही दिली. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या कृत्याच्या लवलेशही दिसला नाही. मात्र या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण झालं होतं.