लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवला, दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

| Updated on: Apr 27, 2021 | 9:12 PM

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज (27 एप्रिल) महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं.

लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवला, दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज (27 एप्रिल) महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं. याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलंय. तसेच राज्याने आता दररोज 8 लाख लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवावं, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केंद्र शासनाकडे केलीय (Maharashtra cross  one and half crores of Corona Vaccination inform Rajesh Tope).

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी सुमारे 12 कोटी डोसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी लसींची उपलब्धता हे आव्हानात्मक काम आहे. राज्यात ऑक्सिजनच्या वापराबाबत प्रमाणीत कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर रुग्णालयांनी नंदूरबार पॅटर्ननुसार ऑक्सिजन नर्सची नेमणूक करावी.”

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बोलण्यातील महत्वाचे मुद्दे

जागतिक निविदा

ऑक्सिजन, रेमडीसीवीर उलब्धतेसाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्याद्वारे 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 132 पीएसए, 27 ऑक्सिजन टँक, 25 हजार मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आणि 10 लाख व्हायल्स रेमडीसीवीरच्या या साहित्यासाठी ही जागतिक निविदा काढली आहे.

लसीकरण

  • 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी 12 कोटी डोसेस लागतील. त्याच्या उपलब्धतेविषयी आरोग्य विभागामार्फत सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
  • लसीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठं आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे.
  • 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे 1 मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

ऑक्सिजनची उपलब्धता

  • राज्यात सध्या 1615 मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला जातो. त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी प्रमाणीत कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती सर्व रुग्णालयांना पाठविण्यात आली आहे.
  • नंदूरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली. 50 रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत आहे. अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.
  • राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आतापर्यंत 100 पीएसए प्लांटसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Mask in House : आता घरातही मास्क घालणं आवश्यक, कारण काय? वाचा सविस्तर…

कोव्हिड रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी, नातेवाईकांवर थेट गुन्हे नोंदवण्याचा इशारा

VIDEO | आरोग्यमंत्र्यांना जेवायलाही वेळ मिळेना, गाडीतच बसून राजेश टोपेंचा अल्पोपहार

व्हिडीओ पाहा :

Maharashtra cross  one and half crores of Corona Vaccination inform Rajesh Tope